पोटपुजेची ठिकाणे

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
9 Dec 2010 - 7:22 pm

रोमनाचा धागा बघितला .. आणि वाटले ज्याला जिथले पदार्थ आवडतात तो येथे त्या ठिकाणाची माहिती लिहिन ..
त्यामुळे केंव्हाही कोठे ही महाराष्ट्रभर फिरलो तरी कळेल की कोठे काय छान मिळते.
परवाच एका च्या सांगण्यावरुन .. शिंदेवाडिच्या पुढे कैलास मध्ये रात्री जेवन केले पिठल भाकरी थाली अआणि इतर महाराष्ट्रियन पदार्थ .. जबराट आहे एकदम सगळे ..

असो ... खालील माहितीचा बाकीच्यांना उपोयोग होयील असे वाटते.
-------------------------------------

मिसळ :
१. सिन्नर ची मिसळ ही अतिशय उत्कृष्ठ आहे असे मला वाटते.. नंतर नाशिकची ..

२. कोल्हापुरची मिसळ खुप प्रसिद्ध आहे , पण मी कोल्हापुरमध्ये मेन ठिकाणी खाल्ली नसेन म्हणुन येव्हडी आवडली नाही, शिवाय त्याबरोबर ब्रेड होते म्हणुन मज्जा आली नाही. (कोल्हापुरला २ दाच गेलो आहे फक्त म्हणुन माहीती नाही काही)

३. पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे) - जनता मिसळ हाउस मध्ये खुप भारी मिसळ मिळते .. दर विकएंड ला जातो मी घरी गेल्यावर.. मसाला ते कोल्हापुर मधुन मागवतात आणि फरसान घरीच बनवतात म्हणुन तर खुप जबरी लागते ...
जवळच तेथे निसर्ग म्हणुन हॉटेल आहे तेथे ही छान मिळते मिसळ.
बाकी अजुनहि खुप भारी ठिकाणे असतीलच ...

वडापाव :

१. कृष्णा वडापाव- सारंग, सहकारनगर - मला येथील वडापाव खुप आवडतो.
तळजाईला जाताना हमखास येथे वडापाव खातोच .. खुप मोठी रांग असते येथे.;
२. अहमदनगर : येथील एका चौकातील वडापाव खुप फेमस आहे, पण नेमके नाव विसर्लो त्याचे .. नगरकरांनी सांगावे .. खुप पुर्वी गेलो होतो म्हणुन आठवत नाहिये .
३. कुंजविहार, ठाणे पश्चिम.

पिठल भाकरी /शेव भाजी
१. सोहम , डेक्कन जिमखाना, पुणे
२. कैलास , निअर शिंदेवाडी आणि निअर खेड शिवापुर, मुंबई-बँगलोर हायवे.

चहा :
१. टिळकरोड, पुणे येथील कुठल्याही अमृततुल्य मध्ये , खास करुन टिळक येथे आणि शक्तीस्पोर्ट समोर ( बहुतेक नाव : आंबाई आहे.. देवीचे नाव आहे हे नक्की पण)
२. त्रिवेणी : जंगली महाराज रोड.
३. भवानी : गजानन महाराज मठा शेजारी.. पर्वती पायथ्याकडुन मठाकडे येताना. (क्रिमरोल पण खुप छान आहे इथला).
४. माऊली : पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे)

तवा सुरमई:
१. पुना गेट , निगडी. NH4 पुणे -मुंबई हायवे.
( नक्की खा, मी कायम खातो .. खुप वेगळी अआणि मस्त आहे. मुंबईत ही नाही मिळाळी अशी अजुन.

चिकन/चिकन थाली
१. हॉटेल सिंधुदुर्ग, निअर शिवसेना भवन, दादर , मुंबई.
२. गोमंतक , दादर , मुंबई.
३. गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर, पुणे. (मुर्ग मसल्लम)

- बाकी आठवेन तसे देइन .. आपण ही आपल्या जवळील माहिती द्यावी
(नोट : असो आपली माहिती देत रहा अशी विनंती .. आणि आम्हीच दिलेले भारी आणि तुम्ही दिलेले टुकार असे म्हणुन भांडन करु नये ही सुचना )

पाकक्रियाशिफारसअनुभवमदतमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

रेवती's picture

9 Dec 2010 - 7:52 pm | रेवती

कृष्णा वडापाव- सारंग, सहकारनगर
यांचा वडापाव खरच चांगला होता. अजून हे दुकान चालू आहे काय?

गणेशा's picture

9 Dec 2010 - 8:18 pm | गणेशा

हो आहे अजुन चालु ..

खडूस's picture

10 Dec 2010 - 4:54 pm | खडूस

आता तेवढा नाही
आता सहकारनगरपर्यंत आलाच आहात तर घरी या की राव.
घरीच वडापावचा बेत करू
कसे??

सहकार नगर ला माझी रुम होती ३ वर्ष .. स्वामी समर्थ मठा जवळ ..
आपण कोठे राहता ?
आलो की येवुच की नक्की

+१

कृष्णा वडापाव- सारंग, सहकारनगर
यांचा वडापाव आता अजिबात चांगला राहिला नाही :-(

Relax - सारंग, सहकारनगर ची coffee अप्रतिम!
जयश्री गार्डन, टिळक रोड ची पावभाजी उत्तम.

मालोजीराव's picture

25 Feb 2011 - 2:40 pm | मालोजीराव

+१
सहमत :(
चव पहिल्यासारखी राहिली नाई अजिबात !

स्वैर परी's picture

9 Dec 2010 - 8:15 pm | स्वैर परी

बेडेकर मिसळ , लक्ष्मी रोड, पुणे!

मेघवेडा's picture

9 Dec 2010 - 8:20 pm | मेघवेडा

अच्छा इकडं कुठलंही ठिकाण चालेल का? त्या धाग्यावर बृहन्मुंबै पर्यंतच मर्यादित होतं!

बरं मग आपली फेव्हरीट्स

१. मालवण मेढ्यातल्या साळगांवकरांच्या जय गणेश मंदिराच्या मागल्या बाजूस जय गणेश खानावळ आहे. तिथे साबुदाण्याची खिचडी उत्तम मिळते. अशीच उत्तम साबुदाण्याची खिचडी आणखी एका ठिकाणी खायला मिळाली होती ती गणपतीपुळ्याला देवळाबाहेर असणार्‍या बारक्या दुकानांतून.
२. पालीला पार्किंग जवळ वैद्यांची खानावळ आहे. तिथे सर्व प्रकारची न्याहारी उत्तम मिळते.
३. पोलादपूरला एसटी स्टॅण्डसमोर 'भगवती' खानावळ आहे. उत्तम जेवण!
४. त्याच खानावळीच्या समोरच्या बाजूला, महाबळेश्वर फाटा सोडून थोडं पुढे गेल्यावर डाव्याबाजूला लाईनीत दुकानं आहेत. त्या रांगेत एक म्हातारी आजीबाई चहाचा स्टॉल लावत असे! अमृतच ते!
५. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्याही बाजारातल्या कुठल्याही हाटेलात जाऊन चहा नि 'बाम' खा! जब्बरदस्त नाश्ता! एकेक बाम चहात बुडवून टपाटप खायला मजा येते!
६. बाकी एलपी/नाविक/विनोदा/कर्केराज/दहिसर चेकनाक्यावरचा कुठलाही अशा एखाद्या बार मध्ये जाऊन पेयपान झाल्यावर एक दालखिचडी मागवा! काम फिट्ट! असली अप्रतिम चव असते.. अहाहा!
७. रात्री १२ ते ४ वगैरे सायकली घेऊन फिरणार्‍या कॉफीवाल्यांकडे इडली चटणी मिळते! क्लासिक!!

मस्त .. गणप्ती पुळ्याला जाणार आहे येव्हड्यात नक्कीच खिचडी खाईन ..
आणि एक ...
"बाम" म्हणजे काय असते सांगा ना.. मला माहित नाही...

मेघवेडा's picture

9 Dec 2010 - 9:07 pm | मेघवेडा

मैद्यापासून (कन्फर्म करून सांगतो) बनवतात. गोडसर असतात. बारीक बारीक तळलेले गोळे, मूगाच्या भजीसारखे. गरम गरम खायला मजा येते! मध्ये फोडायचा चहात बुडवायचा नि गट्ट! पंधरावीस तर सहज!

सिंधुदुर्ग ला अजुन गेलो नाही.. गेलो की नक्कीच "बाम" खाईन ..
मी पहिल्यांदाच नाव ऐकलेला हा पदार्थ आहे ...
धन्यवाद सांगितल्या बद्दल

सुहास..'s picture

10 Dec 2010 - 11:34 am | सुहास..

मालवण मेढ्यातल्या साळगांवकरांच्या जय गणेश मंदिराच्या मागल्या बाजूस जय गणेश खानावळ आहे. तिथे साबुदाण्याची खिचडी उत्तम मिळते. अशीच उत्तम साबुदाण्याची खिचडी आणखी एका ठिकाणी खायला मिळाली होती ती गणपतीपुळ्याला देवळाबाहेर असणार्‍या बारक्या दुकानांतून. >>>

एक नंबर रे मेव्या !!

बहुतेक यादी आलेलीच आहे .

१ ) पुणे- औरंगाबाद प्रवासादरम्यान बस ' वडाळा-नाका' येथे जर थांबली तर प्लेटमधुन ओसंडुन जाणारी गरमागरम ' भजी ' खा . ऑस्सम !!(पुण्यात आजकाल मोजुन सहा भजी असतात.)

२) पुण्यातल्या कुठल्याही इराण्याच्या हॉटेलात शिरा. कोबी आणि वाटाणे असलेला कुरकूरीत 'पेपर समोसा ' मागवा . सोबतीला मिळालेच तर केच-अप, वर बोनस म्हणुन इराणि स्टाइलचा दुध मलाइ चहा.

३) औरंगाबाद ला मुस्लीम लग्नविधीत नान-कंदुरी मटण ,इतर पंगतीतले वांग्या-बटाट्याचे 'शाक' म्हणजे झकास असते. ( एकताय ना बिरुटे काका ,कोणाला पाकृ येत असेल तर द्या राव ,) औ.बाद मध्ये अजुन कुठे मिळते ही चौकशी ही आहे

४ ) रमजानच्या सिझनात , पुण्यातल्या मोमेनपुराला एक बाजार लागतो . तिथे मिळणारा ' मटण दालचा ", म्हणजे कल्लाच असतो .

५) वाडिया कॉलेजचा चौकात, अण्णाच्या टपरीत, गेल्या बारा-तेरा वर्षांपासुन चव न बदलेलेल्या, काहीही खा, भजी-ईडली-वडापाव-मिसळ-पॅटीस ..एक नंबर लागतात..पण त्याचे काही विषेश नाही. सर्वात चवदार असतो ते " दाल वडा ".

यादी बरीच मोठी आहे ..आलोच थोड्या वेळात !

अशीच उत्तम साबुदाण्याची खिचडी आणखी एका ठिकाणी खायला मिळाली होती ती गणपतीपुळ्याला देवळाबाहेर असणार्‍या बारक्या दुकानांतून.

+१००००

तिथली साचिखि तर अफलातून मस्त्..आणि त्या बारक्या दुकान कम टपरी हाटेलांत इतर जिन्नसही उत्कृष्ट मिळतात. मला वाटते देवळातून बाहेर पडल्यावर प्रदक्षिणामार्गाच्या दिशेकडे जाताना लायनीतले एकदम पहिलेच दुकान ब्येष्ट आहे.

तिथले नुसते फरसाणही किलोभर तरी विकत घेऊन यावे, घरीही मिसळीला अप्रतिम चव येते.

यकु's picture

9 Dec 2010 - 8:37 pm | यकु

आमच्या औरंगाबादमध्ये:
१. उत्तम, गुलमंडी इथे मिळणार्‍या ईमरती (चक्कर येईल एवढ्या गोड असतात), मिरची भजे इ.इ.इ.
२. मथुरावासी, गोमटेश मार्केट इथे मिळणारे कांदा/लसुणरहित देसी घी सहित पदार्थ - भल्ला, चाट, गाजराचा हलवा इ.इ.इ.
३. शहराबाहेर - हिरण्य रिसॉर्ट , दौलताबाद घाट, मोमबत्ता तलावाखाली - हुरडा, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, मांडे, पुरणाच्या पोळ्या

आणि रात्री बाराच्या नंतर

तारा पान सेंटर, उस्मानपुरा

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 8:46 pm | धमाल मुलगा

त्या तारा पान सेंटरवाल्याला किडन्यापच करुन आणायचा प्लॅन होता राव!
काय खंग्री पान जमवतो. :)

विलासराव's picture

9 Dec 2010 - 9:24 pm | विलासराव

३. शहराबाहेर - हिरण्य रिसॉर्ट , दौलताबाद घाट, मोमबत्ता तलावाखाली - हुरडा, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, मांडे, पुरणाच्या पोळ्या
दोनच दिवसापुर्वी लाभ घेतला आहे. निवांत आनी छान व्हेज रिसॉर्ट आहे. येथे पाच टेंटही आहेत रहाण्यासाठी. १८०० रुपये प्रतिदिन.

मुलूखावेगळी's picture

9 Dec 2010 - 10:40 pm | मुलूखावेगळी

आत्ता नक्की आठवत नाही पण औरंगाबादमध्ये एकदा दहिपुरी खाल्ली होति

ती पण फार प्रसिद्ध होती

पैठण गेटजवळ बरेच गाडे असतात, रॉक्सी सिनेमाला लागुन.
त्यांवर ऑल मिक्स फ्रुट ज्युस लै भारी.

मुलूखावेगळी's picture

9 Dec 2010 - 10:40 pm | मुलूखावेगळी

आत्ता नक्की आठवत नाही पण औरंगाबादमध्ये एकदा दहिपुरी खाल्ली होति

ती पण फार प्रसिद्ध होती

एस्.पी.डि.पी

मल्टीस्पाईस, निअर म्हात्रे ब्रीज, पुणे.
म्हात्रे ब्रीज ते सिंहगड रोड यांना जोडणार्या नदिकाठच्या रोडवर .. (ऑपोझिट टु हार्वेश्ट क्लब)

'वैशालीच्या' एसपीडीपीची चव एवढ्यात बदलली आहे असे कोणाला वाटते आहे काय?
अतोनात पब्लिक असतं तिथे.......चव कशी राखणार?
पण अगदी नविनच हा पदार्थ वैशालीत सुरु झाल्यावर खुपच चवदार असायचा.

चिंतामणी's picture

9 Dec 2010 - 11:44 pm | चिंतामणी

'वैशालीच्या' एसपीडीपीची चव एवढ्यात बदलली आहे असे कोणाला वाटते आहे काय?

चव बदलली आहेच. पण तिच्या किंमतीमुळे जास्त बदल जाणवतो असे वाटते.;)

नुसत्या नोंदी करण्यापेक्षा शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा. वाचणार्‍यांची लाळ टपकली पाहिजे आणि जीवाचा चडफडाट झाला पाहिजे (ह. घ्या.)

अहमदनगरमध्ये पूर्वी खूप वडापाव होते. आता संख्या कमी झाली आहे. तरी दोन वडापाव अजून प्रसिद्धी टिकवून आहेत. सगळ्यात भारी म्हणजे एकमुखी दत्ताच्या देवळाबाहेरचा वडापाव. संध्याकाळी आठनंतर गेलात तर फक्त भजी खावी लागतात. एक वडापाव खाऊन भागत नाही. किमान तीन वडापाव हाणल्याशिवाय जीभ आणि पोट गप्प बसत नाही. दुसरा वडापाव म्हणजे 'बेक्कार वडापाव'. याच्या नावावर जाऊ नका. आपण एखाद्या गोष्टीला 'भयानक सुंदर' म्हणतो तसेच नगरकर याला 'बेक्कार' म्हणतात. वड्यासोबत कापलेला कांदा आणि गोडसर चटणी मिळते. तेवढाच हुळहुळत्या जिभेला दिलासा. घासगल्लीच्या कोपर्‍यावर पण एक गाडी आहे, पण तिथला वडापाव 'बरा' कॅटॅगरीतला आहे.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या ( प्रत्येकी ४ मार्कांचा प्रश्न)
१) तवा सुरमई डिशची वैशिष्ट्ये सांगा.
२) मुर्ग मसल्लम डिशचे वर्णन करा.
३) 'बाम' म्हणजे काय?

गणेशा's picture

9 Dec 2010 - 9:04 pm | गणेशा

सुरमई डिश : (पुना गेट , निगडी) -

मी २००४-७ मध्ये निगडी ला कॉलेज ला होतो, तेंव्हा ३ ही वर्ष मी प्रत्येक पार्टी याच हॉटेलात केली होती , अआणि स्टारटर सेम - तवा सुरमई .. ( नंतर नंतर .. २ -२ प्लेट घेवुन हेच जेवण असायचे आणि नंतर फ्रूट पंच)

तवा सुरमई - या हॉटेल मध्ये मस्त ३० सेंमी (अंदाजे, त्या ही पेक्षा मोठी असते, म्हणजे मोठ्या ताटात सरळ मावेल अशी) अशी लांब सुरमई मसाल्यामध्ये आणि तव्यावर केलेली मिळते. (अशी बनवतात माहित नाहि)
त्यात भरलेला मसाला खुप अप्रतिम आहे. तो कोकण्/मंग्लोरीअन या स्टाईल मध्ये बनवलेला असतो .

४ माणसे एक सुरमयी आरामात स्टारटर म्हणुन फस्त करु शकतात.
आम्ही चौघेजण अस्लो की २ मागावयचो आणि मग फक्त भात खाल्ला की जेवण समाप्त होत असे ..

(बाकी मला व्यवस्तीत वर्णन नाही करता आले , पण आपले म्हणने ऐकुन लिहिले आहे. कोणॅए येथे खाल्ली असेन सुरमई तर सांगा ना जरा व्यवस्थीत राव)

तसेच

फ्रुट पंच
हे देखिल येथील वेगळे आणि मस्त आहे, अजुन असे जाड भरीव थर मी कुठल्याच हॉटेलातील फ्रुट पंच मधेय बघितले नाहियेत.

अहमदनगर मध्ये बहुतेक तो " माणिक चौक " होता.. अआणि तेथील वडापाव खुप छान होता.
बरोबर का ?

विलासराव's picture

9 Dec 2010 - 9:26 pm | विलासराव

येथील वडा सोपानचा वडा म्हणुन ओळखला जातो. ८७-८८ ला लाभ घेतलेला आहे . २ रुपयात मिळायचा.

खरं तर तो माणिक चौक नाही. पण तिथुन दोन मिनिटांवर.

सोपानरावचा वडा म्हणुन पुर्वी (सुमारे १०-१२ वर्षांपुर्वी) अप्रतिम वडा मिळत असे. नंतर वरीजनल सोपानराव बदलला, वडा छोटाही झाला आणि पुर्वी इतका झकास उरला नाही. (माझं मत)

ह्या सोपानरावाबद्दल बर्‍याच दंतकथा होत्या. एक नेहमीची म्हणजे तो रोज एव्हढे वडे बनवतो की उकडलेले बटाटे तो एका मोठ्ठ्या टबात घालुन पायाने रगडतो वगैरे.

त्याच्या वड्याची चव इतकी भारी असते कारण बटट्यांमध्ये त्याचा घाम (वगैरे वगैरे) मिसळलेले असते.

सगळ्यात हैट्ट म्हणजे, इन्कम टॅक्स वाल्यांनी त्याच्यावर रेड टाकली. त्याच्या गाडीच्या आसपास लोकांनी टाकलेले कागद मोजुन त्यांनी ह्याचे उत्पन्न ठरवले.

वरीजनल सोपानराव नंतर, गंज बाजारात महाराज म्हणुन एक वडेवाल्याचं दुकान होतं, त्याचे वडेही छान असत.

पुण्यात डहाणुकर कॉलनीत, अन्नपुर्णा म्हणुन वडे मिळत असत( अजुन सुरु आहे की माहित नाही) संध्याकाळी गरम गरम खायला गेलात तर ४-५ असे फस्त कराल इतके भारी असतात. असो.

बाकी सर्वात बेस्ट लागायचा तो, सहा महिन्यांनंतर मद्रासहुन परत येताना पहाटे पहाटे सोलापुरात खाल्लेला वडा. एकदा चेन्नईलाही (सावकार पेठेत) वडा-पाव मिळाला होता . असो.

विलासराव's picture

9 Dec 2010 - 9:36 pm | विलासराव

'भयानक सुंदर'
खरय. चितळे रोड जेथे संपतो आनी नालेगाव चालु होते तेथे त्या चौकात हा वडापाव मिळायचा. साधारण १९८९-९० ला हा सुरु झाला. त्यावेळेस मी नालेगावातच रहायचो. तिथे होतो तोपर्यंत आमची संध्याकाळ बेक्कारकडेच जायची.
हे नाव ईतके फेमस होते की लोक दोन वडापाव द्या ऐवजी दोन बेक्कार द्या असेच म्हणायचे.

एकमुखी दत्ताच्या देवळाबाहेरचा वडापाव.
सोपानचा वडा हा आमच्या (म्हणजे सासूसासर्‍यांच्या) जावयांचा लाडका आहे म्हणे.
नुकत्याच झालेल्या भेटीत त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या मित्रांबरोबर पैज लावून वडे खाल्ले.
बर्‍याच वर्षांपूर्वी मी जावयांच्या आईवडीलांना 'त्यात काय एवढे?' असे म्हटल्याबरोबर लगेच जाऊन त्यांनी सोपानचे वडे आणले होते. एक खाऊन माझे समाधान झाले. नंतर चमचाभर साखर खावी लागली.;)
नगरला अप्पूहत्तीचा चौक आहे तिथे मिळणारी कचोरी भेळ (अंबिकाची) मला फार आवडते.

विलासराव's picture

9 Dec 2010 - 11:07 pm | विलासराव

नगरला अप्पूहत्तीचा चौक आहे तिथे मिळणारी कचोरी भेळ (अंबिकाची) मला फार आवडते.

लाल टाकी एरिया जवळ मी रहायचो कॉलेजला असताना तेंव्हा नुकताच तो अप्पुहत्ती आनी लहानशी बाग झाली होती.
बाकी भेळ खाल्लीय तिथे पण अंबिकाची होती की नाही ते आठवत नाही.

अप्पू चौकात मला भेळेपेक्षा पाणीपुरी चांगली मिळाली. कापड बाजारात वर्धमानच्या दुकानासमोर अजून पाणीपुरी, रगडा, कचोरी चांगली मिळते.

नगरीनिरंजन's picture

10 Dec 2010 - 9:17 am | नगरीनिरंजन

बास की आता. किती आठवणी काढून जळवाल?
सोपानचा वडा, बॉम्बेवाल्याची बासुंदी, बन्सीमहाराजचे गुलाबजाम, रसनाची मिसळ, वर्धमानसमोरची रगडाकचोरी, सरदवाडीची कोरडी भेळ, नगरकॉलेजचा कढीवडा, महेंद्रचा पेढा, प्रभात बेकरीच्या पॅटीज, सिद्धीबागेतली सुधाकरची ओली भेळ, दुर्गासिंग आणि द्वारकासिंगची लस्सी वगैरे चवी आठवल्या की फार त्रास होतो जीवाला.

विलासराव's picture

10 Dec 2010 - 9:30 am | विलासराव

सोपानचा वडा, बॉम्बेवाल्याची बासुंदी, बन्सीमहाराजचे गुलाबजाम, रसनाची मिसळ, वर्धमानसमोरची रगडाकचोरी, सरदवाडीची कोरडी भेळ, नगरकॉलेजचा कढीवडा, महेंद्रचा पेढा, प्रभात बेकरीच्या पॅटीज, सिद्धीबागेतली सुधाकरची ओली भेळ, दुर्गासिंग आणि द्वारकासिंगची लस्सी वगैरे चवी आठवल्या की फार त्रास होतो जीवाला.

व्वा मस्त आठवणी. जवळपास सर्व पदार्थ खायचा योग आला आहे. नगरकॉलेजचा कढीवडा तर फारच मस्त. ग्राऊंडच्या कट्ट्यावर बसुन आजुबाजुची हिरवळ पहात हा कढीवडा खाण्याची लज्जत काही वेगळीच. मी ११-१२ वीला नगर कॉलेजलाच होतो , होस्टेलवर रहात असे.

रात्री बॉम्बेवाल्यासमोर काही दुधाच्या गाड्या लागत. मोठ्मोठ्या कढया भरुन दुध तापवतात. बरोबर मलाई बर्फीही छान मिळते तिथे.

नगरीनिरंजन's picture

10 Dec 2010 - 9:46 am | नगरीनिरंजन

रात्री बॉम्बेवाल्यासमोर काही दुधाच्या गाड्या लागत. मोठ्मोठ्या कढया भरुन दुध तापवतात. बरोबर मलाई बर्फीही छान मिळते तिथे.

हो. आणि खास नगरी स्टाईलचा फालुदासुद्धा. घट्ट दुधात शेवया, सब्जा बी, भरपूर सुकामेवा आणि कधी कधी आईस्क्रीमचा छोटा गोळा टाकलेला हा फालुदा मला लहानपणी फार आवडायचा.

जोशी 'ले''s picture

10 Dec 2010 - 10:31 am | जोशी 'ले'

माझे लहानपन नगर ला गेले, प्रेमदान चौ़का जवळ (झोपडी कँटिन च्या पुढे) रहायचो ८५ ते ९० पर्यंत त्या वेळी आम्हि रोयल कुल्फि खायचो १ रु. मिळायचि तेव्हा मस्त पिस्ता कुल्फि होति...आता मिळ्ते का?

नगरीनिरंजन's picture

10 Dec 2010 - 10:37 am | नगरीनिरंजन

रॉयल कुल्फी आणि फेमस व्हेज सँडविचेस (ज्याला नगरात स्नॅक्स म्हणतात) अजूनही मिळतात.

विलासराव's picture

10 Dec 2010 - 10:59 am | विलासराव

माझे लहानपन नगर ला गेले, प्रेमदान चौ़का जवळ (झोपडी कँटिन च्या पुढे) रहायचो ८५ ते ९० पर्यंत त्या वेळी आम्हि रोयल कुल्फि खायचो १ रु. मिळायचि तेव्हा मस्त पिस्ता कुल्फि होति...आता मिळ्ते का?

मीही त्या कुल्फीचा आनि स्नॅक्सचा लाभ घेतलेला आहे. ८८-८९-९० ला मी प्रेमदान्च्या समोर तोरणा कँटीनला नेहमी बसायचो माझ्या बीएचएमएस च्या मित्रांबरोबर. आता मीळते का ते माहीत नाही.

पियुशा's picture

10 Dec 2010 - 10:23 am | पियुशा

एकदा पाइप लाइन रोड ,च्या चोकात येउन पाहा ईथ्लि चव घेउन पहा ,पानिपुरि,मिसल ,पाव्भाजि,पुलाव्,चाएनिज,
सेर्व झक्कास ,कचि दाबेलि, आनि वडा क्या बात वडा, क्या बात , क्या बात !

बास की आता. किती आठवणी काढून जळवाल?

खल्लास, मी पण जळुन खाक आज.

फिरोदियाच्या कँटिनमधला (काय राव त्याचं नाव!!) तर्री-वडा! शाळेच्या समोरचे, त्याचंही नाव विसरलो, पॅटीस. वर्षांनुवर्षं खाती असायची त्याच्याकडे . बाकी नगर कॉलेजचा चटनीवडा पण मस्त असायचा.

Bhakti's picture

14 Mar 2023 - 10:09 pm | Bhakti

वर्धमानच्या दुकानासमोर अजून पाणीपुरी, रगडा, कचोरी चांगली मिळते.
मथुरा होटेल शिवाय कुठलीच पाणीपुरी आवडतं नाही.
रच्यकाने
परवा वडगाव शेरी ला ब्रम्हा गार्डन जवळ पहिल्यांदा ७ वेगवेगळ्या चवीची पाणीपुरी खाल्ली , व्यवसायातील कल्पकता आवडली.A

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 8:57 pm | धमाल मुलगा

द्येवा,
चहाबद्दल लिहिताना फुगेवाडी नाक्यापासचा 'अशोक' विसरलात का? :)
अर्धा अर्धातास तिथं चहा पित बसणारं पब्लिक अजुनही आहे. कित्येक ओळखी तर 'अशोक'ला चहाच्या टेबलावर नेहमी पाहून पाहोन झाल्या आहेत इतकं फेमस है ते. :)

शनिवारपेठेत 'रामदास'ची मिसळपण भारी (होती.)

चाकण (की त्याच्या थोडं पुढे गेल्यावर) समाधान म्हणून एक हाटिल आहे. तिथलं मटण...अग्ग्ग्ग्ग्गं! नादच करायचा नाही!

डेक्कनला सोहममध्ये भरल्या वांग्याची भाजी, वांग्याचं भरीतही छान मिळतं आणि सोलकढीदेखील. तिथं गेल्यावर (तिथंच काय, कुठेही गेल्यावर) मी निम्मं जेवण तर सोलकढीवर संपवतो. :) (अधिक माहितीसाठी भेटा अथवा लिहा- मिपा सदस्य : मनिष. ;) )

औंधच्या ब्रेमेन चौकातून खडकीकडे जायला उजवीकडे वळलं, की स्पायसर कॉलेजच्या आधी एक कळकट खानावळ दिसते. 'महाराष्ट्र हॉटेल' म्हणून. तिथे खिमा आणि पाव खाऊन पहावा. :) येक लंबर!

डेक्कनला जिमखाना ग्राऊंडपाशी चितळेंच्या कोपर्‍यावर साबुदाणा खिचडी एकदम ब्येष्टेष्ट मिळते राव.

आणखी काही आठवतील तशी सांगेनच.

विलासराव's picture

9 Dec 2010 - 9:30 pm | विलासराव

मी निम्मं जेवण तर सोलकढीवर संपवतो.
हावरटच दिसताय.
मग जा नाशिकला महामार्ग बसस्टँडजवळ साहेबा मधे. सोलकढी तर अप्रतिमच. व्हेज नॉनव्हेज , भाकरी , मिरचीचा ठेचा, कांदा ,चटणी सगळंच मस्त.

मेघवेडा's picture

9 Dec 2010 - 9:34 pm | मेघवेडा

>> मग जा नाशिकला महामार्ग बसस्टँडजवळ साहेबा मधे. सोलकढी तर अप्रतिमच. व्हेज नॉनव्हेज , भाकरी , मिरचीचा ठेचा, कांदा ,चटणी सगळंच मस्त.
आयशप्पत काय आठवण काढली राव! लै लै लै खास! आणि सायबा मध्ये तितर फ्राय मस्त मिळतो म्हणे! ही ऐकीव आणि देखीव माहिती! :D

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 9:53 pm | धमाल मुलगा

हावरट म्हणजे काय बोलायची सोय नाय. खाणार मापट्याचिपट्यानं पण आव मात्र मोठ्या खवय्याचा. :D

नाशिकला महामार्ग बसस्टँडजवळ साहेबा मधे. सोलकढी तर अप्रतिमच. व्हेज नॉनव्हेज , भाकरी , मिरचीचा ठेचा, कांदा ,चटणी सगळंच मस्त.

:? असं म्हणताय? कधी जायचं बोला.

विलासराव's picture

9 Dec 2010 - 10:07 pm | विलासराव

तयारच आहे.
तुम्ही सांगा कधी निघताय?

मुलूखावेगळी's picture

9 Dec 2010 - 9:43 pm | मुलूखावेगळी

>>>> शनिवारपेठेत 'रामदास'ची मिसळपण भारी (होती.)
+ १

तिथेच श्री ची मिसळ पण चान्गली आहे.

आणि चहा शनिवारपेठेत 'रामदास' च्या जवळच अम्रुततुल्य चहा मिळ्तो .
१ नम्बर आहे.

मी शनिवारी न रविवारी फक्त तिथेच चहा पिते

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 9:53 pm | धमाल मुलगा

आणि चहा शनिवारपेठेत 'रामदास' च्या जवळच अम्रुततुल्य चहा मिळ्तो .
१ नम्बर आहे.

मोतीबागेच्या गेटासमोरचा का? :)

मुलूखावेगळी's picture

9 Dec 2010 - 10:03 pm | मुलूखावेगळी

हो तोच कयम गर्दी असते तिथे

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 10:06 pm | धमाल मुलगा

आणी डि.एस.के.च्या दारात लागणारी त्या काकूंची वडापावची गाडी?
तो वडापाव खाल्लाय का कधी? भारी असतो (त्यांचा मूड असेल तर. ;) ). :)

मुलूखावेगळी's picture

9 Dec 2010 - 10:23 pm | मुलूखावेगळी

हो खाल्लाय छान असतो

पण मूड कोणाचा ?

सुदर्शन समोर मिळ्णारे दडपे पोहे खाल्ले का?

ते पण चान्गले असतात.

धमाल मुलगा's picture

10 Dec 2010 - 7:23 pm | धमाल मुलगा

सुदर्शनसमोरचं म्हणजे आस्वाद ना?
पहिल्यांदाच गेलो होतो तेव्हा त्यानं मला पुणेरी खाक्या दाखवायचा प्रयत्न केला होता...मी त्याला बारामतीचा दणका दिला ;) तेव्हापासून त्याची (माझ्यासकट) २०-२५ गिर्‍हाईकं तोडली. नादच नाय करायचा. :D

>>पण मूड कोणाचा ?
त्या काकूंचा. :) काकांवर भडकल्या असतील तर वडे जरा जास्तच करपतात. =))

मुलूखावेगळी's picture

9 Dec 2010 - 10:23 pm | मुलूखावेगळी

हो खाल्लाय छान असतो

पण मूड कोणाचा ?

सुदर्शन समोर मिळ्णारे दडपे पोहे खाल्ले का?

ते पण चान्गले असतात.

चिंतामणी's picture

9 Dec 2010 - 11:54 pm | चिंतामणी

चहाबद्दल लिहिताना फुगेवाडी नाक्यापासचा 'अशोक' विसरलात का?
पन वाचता वाचता तु लिवलेले दिसले.

डेक्कनला जिमखाना ग्राऊंडपाशी चितळेंच्या कोपर्‍यावर साबुदाणा खिचडी एकदम ब्येष्टेष्ट मिळते राव.

न्हजी त्या अप्पाच्या कँटिंगमघली व्ह्य. तेच्या बरोबर काकडी बी मिळते.

पण भौ येक सांग हे "सोहम" कुट आहे नक्की?

"सोहम" हे जंगली महाराज रोड ला आहे. डेक्कन जिमखानाच्या बसटॉप च्या समोर या आणि जरा २-३ दुकाने सोडा तेथेच आहे.
तेथील भयानक गर्दी मुळे आशियात खाण्यासाठी १ नं असलेला जंगली महाराज रोड वरील सगळ्या हॉटेलचे पब्लिक हळु हळु कमी होउ लागले .. म्हणुन पॉलिटीक्स करुन नगरपालिकेने स्टे आणला बाहेरच्या कंपाउंड मध्ये माणसांना बसण्यास.. त्यामुळॅ हे हॉटेल आतील २-३ वाड्याच्या खोल्यापुरतेच झाले आहे आता.
तरीही पब्लिक असतेच पण फॅमीली कमी झाल्यात त्यामुळे ..

असो तुम्ही जा एकदा ..
शेवभाजी (कट्/तर्री मारुन घ्या) , पिठल (साधे/मेथी).. भाकरी(ज्वारी/बाजरी/तांदुळ) , आणी वरती सांगितल्याप्रमाणे वांगे तसेच भरीत ही उत्तम मिळतेच .. शिवाय सोलकडी आणि इतरही जबरदस्त आहे सगळे ..

रानडेंचा ओंकार's picture

29 May 2015 - 4:16 pm | रानडेंचा ओंकार

येथिल सांजा पोळी एक लंबर...तुपामध्ये बुडवुन आणलेली असते.. आहाआहा... केवळ अप्रतीम...

डेक्कनला जिमखाना ग्राऊंडपाशी चितळेंच्या कोपर्‍यावर साबुदाणा खिचडी एकदम ब्येष्टेष्ट मिळते राव.

तुम्हाला डेक्कन्च्या कोपर्यावरची सिग्नल जवळची "अपना घर" मधली साबुदाणा खिचडी म्हणायचंय का?
ती पण अप्रतिम असते.

एकुलता एक डॉन's picture

14 Mar 2023 - 9:29 pm | एकुलता एक डॉन

कुठे?

मार्केट यार्ड ला गेलात तर 'कावेरी' चं सुकं मटण,मटण सूप...आणि बाजरीची भाकरी....
आवारे लंच होम ची मटन थाळी झक्कास !
आणि कायतर नवीन खायचं आसल तर कोरेगाव पार्कातल्या शिशा कॅफे(आधीचा शिशमहाल) चा इराणी मटन कबाब आणि इराणी तंदूर मटन आणि सोबतीला हुक्का !
दोराबजी अँड सन्स चा मटन सालीगोश,पारशी बिर्याणी आणि शामी कबाब लय भारी.

विलासराव's picture

9 Dec 2010 - 9:08 pm | विलासराव

खायचे असतिल तर अपुर्वा हॉटेल, हर्नीमन सर्कल जवळ फोर्ट्मधे अप्रतिम मिळतात. खास करुन हिरव्या मसाल्यातील पापलेट (मोठ्या आकाराचा) साधारण ६५० रुपयांना मीळतो. ओले बोंबील फ्राय ( बॉम्बे डक ) खुपच चांगले असतात. दादर पुर्वेला़ ॠषी माशांसाठी चांगले आहे.

मिसळः
करी रोड्वरुन लोअर परेल ला जाताना सिग्नलला जयहिंद हे मिसळ साठी प्रसिध्द आहे.
वडापावः अंबरनाथ स्टेशन पुर्वेला बबनचा वडापाव आहे. घाटकोपर पुर्वेला ठाण्याच्या बाजुच्या पुलावरुन बाहेर आल्यावर उजव्या हातालाच एक छोटेसे हॉटेल आहे.

सामोसे, जिलेबी, भजी:
सांताक्रुज स्टेशन पुर्वेला स्टेशनजवळ एक छोटासा स्टॉल आहे. एक बाई त्या चालवतात. मला वाटते हा मुंबईतला सर्वात चांगला समोसा असावा. (५-६ वर्षापुर्वी नेहमी जायचो तिथे. अलिकडे माहीत नाही).

शेवबुंदी, जिलेबी:
कुर्ला पश्चीमेला दिपक फरसान मार्ट आहे. खुपच फेमस आहे. फरसान, पापडीही प्रसिध्द आहे.

गुलाबजामुनः
हर्नीमन सर्कलजवळ कराचीवाला हे फारच प्रसिध्द आहे.

व्हेज जेवणः
दादरला प्लाझासमोर तृप्ती हे मस्त आहे . एसी असुनही भाव आनी टेस्ट चांगले आहेत.

च्याआयला जयहिंद समोर ६ महिने राहिलो मी आणि तेथील मिसळ खाल्लीच नाही मी कधी ..

असो बरोबरच जावु मग नंतर ..
आणि मुंबईची ठिकाणे सांगितली ती बरे झाले .. येथे असुन कळतच नाहि कोठे काय खावे

विलासराव's picture

9 Dec 2010 - 9:20 pm | विलासराव

आवाज द्या.
जाउ लगेच.

रेवती's picture

9 Dec 2010 - 10:47 pm | रेवती

गरम गरम गुलाबजाम दोन वर्षापूर्वी दिल्लीत खाल्ला होता.
आपल्याकडच्या गुलाबजामला मागे टाकणारे होते.
छोटा लाडू असावा असा आकार म्हणून एकच खाल्ला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Dec 2010 - 12:30 am | निनाद मुक्काम प...

फाळणी नंतर मुंबईत आलेल्या पंजाबी काकांनी गुरुकृपा सायन येथे काढले आहे .दिल्लीची गल्लीतील आवृत्ती हवी असेल तर गुरुकृपा मध्ये याच .
निराशा होणार नाही (एकच खा आकार पाहून ) आम्ही मात्र किमान २ चापतो .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Dec 2010 - 11:26 pm | निनाद मुक्काम प...

ऋषी हे माझ्या मित्राच्या बहिणीच्या सासर्यांचे आहे .आणि आमच्या आया बालमैत्रिणी आहेत .
बाकी कुर्ल्यात राहत असल्याने दीपक लहानपणापासून अनुभवतोय
बाकी अपूर्वा फोर्ट मधील कसे काय नजरेतून राहिले ह्याचे अपूर्व दुख्ख होत आहे . माझा जर्मन भाषेचा क्लास व पूर्वी नोकरीसाठी फोर्ट वारी नेहमीची होती .फोर्त मधील एक सांगायचे राहिले .तेथील बँकामध्ये काम करणारे सुट बुटात वावरणारा समूह डी बी एस च्या समोरील गल्लीत भुर्जी व आम्लेट चापतांना दिसेल .
सामोश्यावरून बरी आठवण झाली सायन मधील साधना शाळेजवळील गुरुकृपा येथील सामोसा व गुलाबजाम पूर्ण मुंबईत प्रसिध्द .त्याचे सामोसे आय्मेक्स मध्ये विकायला असतात .अर्थात गुरुकृपाची सामोसा रगडा व दही आणि आंबट गोड चटणी खाणे हे माझ्या पत्नीचे भारतात आल्यावर पहिले कार्य असते मग गरमागरम गुलाबजाम (तिने ६ सामोसे नुसते खाल्ले होते .)
बाकी फोर्ट च्या गल्ली बोळातून फिरताना कधी काय सापडेल ह्याचा नेम नाही .त्याच गल्लीत नाव आठवत नाही पण मित्राबरोबर बन मस्का इराण्याकडे खाल्ला होता .ते ठिकाण वल्ड हेरीटेज म्हणून घोषित झाले आहे .
सगळेच कस पारंपारिक आहे तिथे .

चिंतामणी's picture

9 Dec 2010 - 11:58 pm | चिंतामणी

अर्थात गुरुकृपाची सामोसा रगडा व दही आणि आंबट गोड चटणी खाणे हे माझ्या पत्नीचे भारतात आल्यावर पहिले कार्य असते मग गरमागरम गुलाबजाम

भारतीय पदार्थांनी तुझ्या बायकोला भुरळ घातली तर. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Dec 2010 - 12:35 am | निनाद मुक्काम प...

दाल माखनी हे ती सूप आहे असे समजून वाडगा भर प्यायली .व अजून मिळेल का ह्या आशेने माझ्या पंजाबी मित्राच्या आईकडे पाहत होती . अर्थात ताटातील रोटी आता मला कशाची खाणार ह्या विवंचनेत होत्या .
आपली आमटी पण आवडते (अर्थात ती भाताबरोबर न खाता सूप म्हणून पिते .)पंजाबी खाणे विशेतः आवडते कारण लंडन मध्ये प्रथम इंडियन फूड म्हणून ते मुबलक उपलब्ध होते .(इग्लिश खाण्यापेक्षा जास्त प्रमाणात )

धमाल मुलगा's picture

10 Dec 2010 - 7:25 pm | धमाल मुलगा

झकास किस्सा. :)

६ सामोसे नुसते खाल्ले होते
व्वा! मी भारतात आजकाल फक्त पदार्थ बघते.
खाण्याची हिम्मत होत नाही.

व्वा! मी भारतात आजकाल फक्त पदार्थ बघते.
खाण्याची हिम्मत होत नाही.

भारतीय असून खाण्याची हिम्मत होत नाही.???????????

निनादची बायको जर्मन आहे.

नाय नाय. ते चुकून तसं लिवलं ग्येलं.
भारतात आल्यावर म्हणायचं होतं.
निनादच्या पत्नीचे कौतुक आहे.
तिनं भारतीय पदार्थाची खरी चव ओळखली.:)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Dec 2010 - 12:48 am | निनाद मुक्काम प...

दादरला कैलास नाथ ची लस्सी फेमस हि लस्सी पिण्यापेक्षा खायची असते चमच्याने (आमच्या डोंबिवली पूर्व ला एक शाखा आहे त्यांची ) ती पण जाम आवडते .आणि सी एसटी स्टेशन समोरील जे खाण्याचे स्टोल आहेत तेथील SANDWICH पण आवडतात .तिला .मला मात्र हाजी आली दर्ग्याच्या जवळ असलेले ज्यूस व SANDWICH आवडतात .त्याचा मुलगा शेट्टी माझ्या वर्हात होता हॉटेल मेनेज मेंट च्या वेळी .

विलासराव's picture

10 Dec 2010 - 9:45 am | विलासराव

दादरला कैलास नाथ ची लस्सी फेमस हि लस्सी पिण्यापेक्षा खायची असते चमच्याने

ह्या लस्सीत ती घट्ट होण्यासाठी टिश्यु पेपर वापरत होते असे ऐकले आहे. जेंव्हा ही गोष्ट बाहेर आली तेव्हापासुन कैलास लस्सी कुप्रसिध्द झाली.

गणेशा's picture

9 Dec 2010 - 9:25 pm | गणेशा

कोल्ड कॉफी

१. दुर्गा , MIT जवळ, पौड रोड, पुणे.

स्ट्राबेरी विथ क्रीम

१. महाबळेश्वर (नादच नाय )

आंबरस / महाराष्ट्रीयन डायनिंग थाली

१. दुर्वांकुर, टिळक रोड, पुणे
२. मथुरा, जंगली महाराज रोड, पुणे.

(आंबरस असताना फक्त आंबरसाच्याच १५ वाट्या तरी संपवायचो मी.. आता ह्यावेळेस पुण्यातच राहयला आलोय म्हंटल्यावर मस्त घरीच आंबरस हाणीन ... हॉटेल मध्ये जावुन खायची वेळ कमी यीइन ..
पण जे पुण्यात घरच्यांबरोबर नाही राहत त्यांनी मनसोक्त आंबरस खायला जा नक्की )

वपाडाव's picture

25 Feb 2011 - 1:33 pm | वपाडाव

कोल्ड कॉफी
१. दुर्गा , MIT जवळ, पौड रोड, पुणे.

२. ज्ञान प्रबोधीनी चौकात, द मोबाईल शॉप समोर, दुकानाचं नाव नाही माहीती.

मुलूखावेगळी's picture

26 Feb 2011 - 12:00 am | मुलूखावेगळी

स्ट्राबेरी विथ क्रीम

१. महाबळेश्वर (नादच नाय )

दर्शन हॉटेल डेक्कन जवळ प्रभात लॉज समोर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Dec 2010 - 9:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पोटपुजा म्हटल्यावर मला भलतीच पूजा आठवली. असो.

खाण्यासाठी मला स्वतःच्या घरचंच आवडतं. आधीच माझे खाण्यापिण्याचे हजार नखरे, आणि ते सगळे इतरांना समजून सांगण्यापेक्षा स्वतःचं स्वतः करून खाल्लेलं उत्तम!

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 9:54 pm | धमाल मुलगा

अभिनंदन!

श्रावण मोडक's picture

12 Dec 2010 - 10:38 pm | श्रावण मोडक

>आधीच माझे खाण्यापिण्याचे हजार नखरे, आणि ते सगळे इतरांना समजून सांगण्यापेक्षा
>>अभिनंदन!
'र' राहिला का रे?

धमाल मुलगा's picture

13 Dec 2010 - 6:10 pm | धमाल मुलगा

ओ गपा ना.
ती टेक्सासमध्ये आहे. घोड्यावरुन येऊन गोळ्या घालेल ना. ;)

-(द बॅड) धम्या पाब्लो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Dec 2010 - 9:46 pm | निनाद मुक्काम प...

र्धा डोंबिवली व अर्धा मुंबईकर आल्याने मुंबईतील काही जागा सांगतो .बाकी लेखाच्या मालकाने मुंबईतील सिंधुदुर्ग व गोमंतक ची चव चाखलेली दिसते .पण सागायला वाईट वाटते ह्या दोन्ही हॉटेल वाल्यांनी आपला दर्जा अत्यंत ढासळला आहे .आता जर रुचकर व चविष्ट नॉन वेज खायचे असेल तर कॉपर चिमणी कबाब साठी बडे मिया (ताज हॉटेल च्या पाठच्या गल्लीत ) व अवचट ह्यांचा दिवा महाराष्ट्राचा जरूर चाखावी .वडापाव ठाण्याचा ओके पण दर्जेदार म्हणजे दादरचा आयडील च्या गल्लीत श्रीकृष्ण (अजून दर्जा राखून )मामा काणे (दर्जा राखून ) व मुंबईत वडापाव स्पर्धेत दुसरा आलेला कीर्तीचा कॉलेजचा वडापाव (हा वडापाव दादरला समुद्रकिनारी असलेल्या कीर्ती कॉलेज च्या गल्लीत असल्याने त्याचे नाव आपसूकच कीर्तीचा वडापाव असे झाले .मुंबईत नंबर १ वड्याचा किताब जुहू येथील मिठीबाई ह्या हाय फाय कॉलेजच्या समोरील वडापावने पटकावला (अर्थात त्याने वडापाव वर बरेच प्रयोग केले आहेत जसे अमूल बटर व अजून बरेच अर्थात त्यामुळे माझ्या मराठी जिभेला तो रुचला नाही .अजून शाहीद कपूर तेथे वडा ख्याला येतो असे ऐकून आहे .
बाकी भेल खायची तर मुंबईत फोर्ट मधील विठ्ठलची .बाकी पावभाजी मुंबईतील खाऊ गल्लीतील .(अजून दर्जा राखून आहेत .)

मेघवेडा's picture

9 Dec 2010 - 10:00 pm | मेघवेडा

>> बाकी भेल खायची तर मुंबईत फोर्ट मधील विठ्ठलची. बाकी पावभाजी मुंबईतील खाऊ गल्लीतील
प्रचंड सहमत! विठ्ठलला तोड नाही! सुपरहिटच! खाऊगल्लीतली पावभाजीही सुपर चवीची असते!

यावरून कसं तरी आठवलं, अंधेरी स्टेशनला १ नंबर प्लॅटफॉर्मवर मेन एन्ट्रन्सच्या डाव्याबाजूला जे रेल्वे कँटीन आहे त्याच्याकडे रगडा-पाव तुफान हिट मिळतो! इतर ठिकाणी गोरेगाव, पार्ल्यालाही ट्राय केले पण मजा नाही आली! हा सॉल्लीडच बनवतो! तसंच अंधेरी स्टेशनच्या बाहेर पश्चिमेला, आदर्श रेलवे कँटिनसमोर, मोठ्या फूटओव्हर पुलाच्या पायाकडे रात्री बारानंतर तवापुलाव/भुर्जीपावची गाडी लागते! त्याच्याकडचा तवापुलाव भारीच!

विलासराव's picture

9 Dec 2010 - 10:06 pm | विलासराव

प्रचंड सहमत! विठ्ठलला तोड नाही! सुपरहिटच! खाऊगल्लीतली पावभाजीही सुपर चवीची असते!
जोकुणी ह्या वरील पदार्थ खाणार तो असहमत होउच शकत नाही.

रेवती's picture

9 Dec 2010 - 10:50 pm | रेवती

नको, अजून वर्णन करू नकोस मेवे!

चिंतामणी's picture

10 Dec 2010 - 12:02 am | चिंतामणी

यावरून कसं तरी आठवलं, अंधेरी स्टेशनला १ नंबर प्लॅटफॉर्मवर मेन एन्ट्रन्सच्या डाव्याबाजूला जे रेल्वे कँटीन आहे त्याच्याकडे रगडा-पाव तुफान हिट मिळतो! इतर ठिकाणी गोरेगाव, पार्ल्यालाही ट्राय केले पण मजा नाही आली!

पुर्वी गोरेगावच्या ठ्क्करकडे रगडा पॅटीस, पाणिपुरी/शेवपुरी प्रकार चांगले मिळायचे.

आता अजून आहे त्याची क्वालिटी?????/

मेघवेडा's picture

10 Dec 2010 - 12:05 am | मेघवेडा

ठक्कर म्हणजे ग्रामपंचायत रोडवरचा ना? त्याच्याकडे रगडा पॅटीस खाल्लेलं आठवतं. आता असतो का तेही माहिती नाही.

विलासराव's picture

9 Dec 2010 - 10:03 pm | विलासराव

अवचट ह्यांचा दिवा महाराष्ट्राचा जरूर चाखावी
कुठे आहे हा दिवा. पत्ता सांगता का?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Dec 2010 - 10:59 pm | निनाद मुक्काम प...

A restobar owner Dr. Suhas Awchat of Diva Maharashtracha writes a letter to Rajesh Tope Minister of Higher and Technical Education and have decided to file a petition in the court to make regional Maharashtrian cuisine as a compulsory subject, the institutes believe it is sensible to do such only when there is scope for their students having number of outlets providing Marathi cuisine. However, few Marathi dishes are taught in the second year of the degree course in a subject food production.
http://www.divamaharashtracha.com/a/Cook%20Book.html
मराठी माणूस व मराठी खाद्य संस्कृतीचा प्रचंड अभिमान असणार्या ह्या अवचट दांपत्याने मराठी जेवण पेज ३ वर आणले .पण दर मात्र कुठल्याही पॉश उपहारगृहात असतात .त्यापैकी कमी आहेत .
ह्यांनी मराठी माणसाला नोलात २५% सवलत जाहीर केल्याने प्रचंड खळबळ उडाली होती .

विलासराव's picture

9 Dec 2010 - 11:15 pm | विलासराव

धन्यवाद.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Dec 2010 - 10:20 pm | निनाद मुक्काम प...

@अंधेरी स्टेशनला १ नंबर प्लॅटफॉर्मवर मेन एन्ट्रन्सच्या डाव्याबाजूला जे रेल्वे कँटीन आहे
च्यायला हे नवीन आहे .एरवी मी रेल्वे कँटीन टाळतो .पण येत्या भारत भेटीत नक्की
बाकी टिपिकल डोसा खायचा तर रुईयाचे कॉलेजच्या बाजूचे मणी
(अजूनही हवा तेवढा सांभार तोही फुकट आख्या मुंबईत तिथेच मिळतो .
आमच्या मासाहेब जेव्हा रुईयात होत्या (आमच्या नशिबी हे भाग्य नव्हते )पण काट्यावर पडीक असायचो .
एकदा आई समवेत मानिज मध्ये गेलो .नि आई म्हणाला चवीत अजिबात फरक नाही .बाकी डोसेवाले उडपी पद्धतीने डोसे बनवितात .मानिज आपले वेगळेपण जपून आहे .बाकी कट्या मागील डीपीज मध्ये उत्कृष्ट असे फास्ट फूड व अनेक मराठी सिनेतारिका ज्या नाट्य व सिनेमा व टीवीवर दिसतात .त्यांना भेटण्याचा .नशीब असेल तर प्रत्यक्ष बोलण्याचा चान्स मिळतो .म्हणून जायचो . रेल्वे कँटीन मधील काश्मिरी सोडा हे एक भन्नाट रसायन आहे .(येत्या भारत भेटीत त्याला काश्मिरी का म्हणतात ह्याचा शोध घेईन
अरे मेधवेध अंधेरीत राहतो आणि स्टेशन समोरील इराण्याला का विसरतो (तो अजूनही असावा असा जबरी आशावाद मनी बाळगून ) बाकी ईशान्य मुंबईत चेंबूर स्टेशन च्या बाहेर सदगुरू ची पावभाजी मस्त
बाकी मुंबईत कोणत्याही भटाचा चहा ज्याचा दुकानाच्या सुरवातीला शंकर कैलास अशी नावे असतात त्याचा प्यावा .

प्रदीप's picture

10 Dec 2010 - 8:28 pm | प्रदीप

अहो, मानिज नव्हे त्याचे नाव. स्वच्छ 'मणी' असे आहे (आणि 'मणी'चे म्हणून मणीज). आता दस्तुरखुद्द मणी तिथे असेल असे वाटत नाही.

.बाकी डोसेवाले उडपी पद्धतीने डोसे बनवितात .मानिज आपले वेगळेपण जपून आहे .

हे समजले नाही. मणी अगदी खास उडुपी आहे, ज्याप्रमाणे माटुंग्याचे इतर खास इतर काही उडुपी आहेत (रामा नायक, कॅफे म्हैसूर, कॅफे मद्रास, शारदा, अंबा भुवन, आनंद भुवन) तसाच मणीही.

डी. पी. आता पार 'बिघडले' आहे, पूर्वी तोही एक साधा उडुपी होता. पण त्याने धंदा कसा जोरदार एक्सपांड केला आहे! त्यापलिकडचे मराठी दुकानदार ('जयेश मिल्क बार') केव्हाच आले आणी गेले, मणी आणि डी. पी. टिकून आहेत-- मणी अगदी मूळ स्वरूपात, डी. पी. बदललेल्या!

बाय द वे, रूईयाचा 'कट्टा' नव्हे, त्याला 'नाका' म्हणतात!