दुपारपासंनच शंकऱ्या आणि बाप्या पवळंमागच्या रूईटीच्या आडोशाने त्याच्या पाळतीवर होते. त्याला उचलताना कोणीही आजूबाजूला नसेल याचीही खबरदारी त्यांना घ्यायची होती. तो एवढासा जीव बागडत होता.
चारला अब्दुल्या काम थांबवून बाजेवर निजला. घरातूनही हालचाल जाणवेना. शंकऱ्याने बाप्याला खुणावले. बाप्या कापऱ्या आवाजात कुजबूजला, "अब्दुल्या उठला तर ठिवायचा न्हाय!"
पोत्याने कितीही धडपड केली तरी दोघांचे सुसाट पाय थांबणार नव्हते. गावाला वळसा घालून ते दुसऱ्या टोकाला रियाजच्या खोपटावर आले. पुरावे नष्ट करण्यासाठीची सर्व तयारी त्याने केलेलीच.
दिवस बुडाला आणि खोपटात रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.
रात्री दारूच्या घोटांनी तिघांना कमालीचा थरार दिला. शंकऱ्या हसत ओरडलाच, "पाचशेला दिला न्हाय अब्दुल्यानी! गेलाच शेवट पोटात रूस्तूम्या! ह्याला म्हणत्यात गेम!"
- संदीप चांदणे
प्रतिक्रिया
9 Nov 2016 - 3:45 pm | नाखु
एक बळी घेतलास कथेत, असहिष्णु कुठला !!! (खास मिपा विचारवंत प्रतिसाद)
अता मूळ प्रतिसाद, भारी जमलीय कथा
9 Nov 2016 - 4:12 pm | एस
रुस्तुम्या कोंबडा किंवा बकरू असावं हे गृहित धरून प्रतिसाद - कथा फक्कड झाली आहे
9 Nov 2016 - 4:29 pm | पियुशा
भारी !
9 Nov 2016 - 5:24 pm | संजय पाटिल
जबरा...
9 Nov 2016 - 5:29 pm | वेल्लाभट
सहीए! मस्त
9 Nov 2016 - 5:57 pm | जव्हेरगंज
थरारक!!!
9 Nov 2016 - 6:52 pm | ज्योति अळवणी
मस्त
9 Nov 2016 - 7:19 pm | खटपट्या
मस्त
10 Nov 2016 - 3:14 pm | विजुभाऊ
रुस्तुम्या = भुजबळ
बाप्या = बारामतीचे काकांचा पुतण्या
शंक-या = तटकरे
तिसरा= बारामतीचे काका
अबदुल्या= उठ्धव
10 Nov 2016 - 4:25 pm | चांदणे संदीप
ठठो!!
चांगलंय...
Sandy
10 Nov 2016 - 4:51 pm | चांदणे संदीप
सर्व वाचक व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार!
Sandy
10 Nov 2016 - 5:37 pm | तुषार काळभोर
रुस्तुम्या 'तो' होता हे वाचून जीव भांडी घेऊन खाली पडला!
11 Nov 2016 - 10:09 pm | अत्रुप्त आत्मा
यूं की.. मजा आगया पढ के!
11 Nov 2016 - 11:35 pm | रातराणी
भारी जमलीये !
12 Nov 2016 - 1:32 am | निओ
शेवटी ते कोकरू किंवा कोंबडं आहे, हे कळूनही ज्या पद्धतीने लिहिली आहे, ती अस्वथ करून गेली.