काल माझ्या एका जीवलग मित्राने quote of the day असा मथळा देऊन एक वाक्याचा विरोप पाठविला. त्यावर झालेली चर्चा आणि देवणघेवाण येथे मांडत बसत नाही. पण झाले असे की ते वाक्य उगाचच मनात रेंगाळत राहिले. बर्याचदा असेच कोणाचे तरी, कोठेतरी ऐकलेले एकच वाक्य मनात घोळत राहते. कधी मन मोहरून जावे असे तर कधी विचारात पडावे असे. कधी अंगाचा भडका उडावा असे तर कधी हसून हसून गडाबडा लोळावा असे. तर कधीकधी उगाचच आवडून जावे असेही.
तसेही अलिकडे आपण जगतो ते Sound Bites च्या जगात. ह्या अशा Sound Bite झळकविण्यासाठी मिपावर एखादा कोपरा असायला हवा असे वाटले. खादाडीचे चित्र असते किंवा थोरामोठ्यांची वचने दिलेली असतात तेथेच कोठेतरी ताज्या मुक्ताफळांनीही जागा असावी असे वाटले. तसे झालेच तर छानच पण नाही झाले तरी आग्रह नाही.
तोवर आजची मुक्ताफळे असे हे छोटेखानी सदर प्रकाशित करावेसे वाटते आहे. प्रतिसादांमध्ये quote of the day दिसावेत अशी अपेक्षा आहे.
(संक्षिप्त) एकलव्य
(रंगास्टाईल बाता - मला जेव्हा काही रुचेल, आवडेल ते ते मी देईनच... पण दररोज मला शक्य नाही. मुख्य कारणे दोन - (१) आवडल्यावर लिहिणे सोपे आहे... एखाद दुसरे वाक्यच तर जोडायचे पण रोज काहीतरी आवडायला हवे ना; (२) येथे भलेभले दादा/काका/माई/दादा/काका बसलेले असताना रोज माझी टॅवटॅव हवीय कशाला?
प्रतिक्रिया
11 Jan 2009 - 10:45 am | एकलव्य
श्रीगणेशा म्हणून शिळी बातमी देतो आहे... पण हेच ते वाक्य जे माझ्या मित्राने पाठविले.
"The Indians, after the attacks, were deeply offended and furious, but they are also clever. We may be crazy in Pakistan, but not completely out of our minds." - इति आयएसआयचा प्रमुख अहमद पाशा
आर आर पाटलांपासून ते झरदारीपर्यंत तोल सुटलेल्या विधानांचे तीर वेडेवाकडे सुटत असताना पाशाचे वक्तव्य मुत्सद्दीपणाची वेगळी पातळी दाखवून जाते.
11 Jan 2009 - 10:48 am | एकलव्य
अमेरिकेच्या होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षाने आर्थिक परिस्थितीवर टिपण्णी करताना आज म्हटले की - "Only government" can provide the solution to the country’s economic ills."
"मार्केट शुड क्युअर बाय ईटसेल्फ" आणि "सेंट्रल प्लॅनिंग म्हणजे बरबादी" ह्यावर अमेरिकन सरकारचाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकाचाही मोठा विश्वास आहे... अगदी अंधश्रद्धा म्हणावी या टोकाइतका. त्या पार्श्वभूमीवर ओबामाने दिलेली (किंवा खरे तर देण्यास भाग पडलेली) कबुली बरेच काही सांगून जाते.
9 Jan 2009 - 1:17 pm | नंदन
ही मुक्ताफळांची कल्पना चांगली आहे.
कुठेतरी वाचलेले वाक्य -
सत्यम इज अ वन वर्ड ऑक्झिमोरॉन :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
9 Jan 2009 - 5:05 pm | लिखाळ
सत्यम मधला अंतर्गत विरोधाभास एकदम आवडला.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
9 Jan 2009 - 1:45 pm | मदनबाण
Arriving at one point is the starting point to another.
John Dewey
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
9 Jan 2009 - 1:52 pm | सखाराम_गटणे™
If fate means you to lose, give it a good fight anyhow...
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
9 Jan 2009 - 2:42 pm | राघव
fate वरून आठवले!
"I never blame my fate. After all, how can I deny the Self-existance!"
मुमुक्षु
9 Jan 2009 - 5:28 pm | चाणक्य
The problems which the world is facing today can not be solved by today's wisdom, which has created them
9 Jan 2009 - 10:21 pm | विकास
The problems which the world is facing today can not be solved by today's wisdom, which has created them
खरं आहे! एकदम पटले!
24 Jan 2009 - 4:43 am | धनंजय
चांगले वाक्य कोणी म्हटले ते महत्त्वाचे नाही.
पण हे वाक्य आइन्स्टाईनचे नसावे.
याचे अनेक पाठभेद दिसतात :
A problem can not be solved with the same consciousness that ...
“The significant problems we face cannot be solved at the same level of thinking we were at when we created them.”
वगैरे. ते पाठभेद वेगवेगळे लोक आपल्याला ठीक वाटतील त्या प्रसंगात वापरतात.
"the same consciousness" हे श्री-चिन्मय यांच्या दुव्यावर दिसते - त्यांना अर्थात चैतन्याबद्दल काही सांगण्यात रस आहे.
"same level of thinking we were at when" वापरणारे साधारण बंडखोर असतात, म्हणजे पूर्वीच्या काळच्या विचारधारेपेक्षा भविष्यातली विचारधारा वेगळी हवी असे त्यांना सांगायचे आहे.
"by today's wisdom" या पाठात पूर्वीचे ज्ञान उजवे होते, असा काही अर्थ निघतो ("विजडम" शब्दात अनुभवी ऋजू सदसद्विवेक - असा काही अर्थ आहे.)
उगीच बिचार्या आइन्स्टाइनला असले विसंवादी विचार सांगायला लावतात. त्याच्या ज्ञात साहित्यात अशा प्रकारचे कुठले वाक्य असेल तर बघायला आवडेल.
यांच्यापैकी कुठलेही मुक्ताफळ चांगलेच आहे, पण आइन्स्टाइनच्या नावानी भारदस्तपणा आणता-आणता बिचार्या आइन्स्टाईनबुवाचे काय मत होते, ते कळतच नाही.
9 Jan 2009 - 5:35 pm | वाहीदा
A Superb Quote by socrates on Leadership
A Group of Donkeys led by Lion
can Defeat a Group of Lion Lead by Donkey
~ वाहीदा
9 Jan 2009 - 7:24 pm | केदार केसकर
सही!
केदार
11 Jan 2009 - 1:21 pm | संजय अभ्यंकर
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
9 Jan 2009 - 8:19 pm | किट्टु
" If your success is not on your own terms, if it looks good to the world but does not feel good in your heart, it is not success at all."
9 Jan 2009 - 10:23 pm | विकास
सक्सेस वरून आठवले:
I don't know the key to success, but the key to failure is trying to please everybody.
- Bill Cosby
9 Jan 2009 - 10:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
If you are not living on the edge you are taking too much space.
(ऐसपैस) अदिती
12 Jan 2009 - 11:05 am | वाहीदा
as there is no much space left now in Mumbai
Edge शीवाय नाही पर्याय ! :-(
~ वाहीदा
9 Jan 2009 - 10:28 pm | चतुरंग
एका धूळभरल्या गाडीवरच्या मागल्या काचेवरल्या धुळीत गिरगटलेली अक्षरं "आता तरी पुसा!"
हा मला नेहेमीच क्वोट ऑफ द डे वाटत आलाय! ;)
चतुरंग
10 Jan 2009 - 11:58 am | अभिरत भिरभि-या
एका धूळभरल्या गाडीवरच्या मागल्या काचेवरल्या धुळीत गिरगटलेली अक्षरं -
" गाडी विकणे आहे "
अभिरत
9 Jan 2009 - 10:29 pm | टुकुल
Pat on the Back is just feet away from kick on the A**
-- Unknown
9 Jan 2009 - 10:41 pm | विकास
हा चर्चा विषय छान आहे. वास्तवीक "मुक्ताफळे" म्हणले की "सुविचार" म्हणून डोक्यात येत नाहीत :-) तर "अकलेचे तारे तोडणे" येते. त्या संदर्भात जॉर्ज बुश इतका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मुक्ताफळे उधळणारा कोणी झाला असेल असे वाटत नाही :-) खाली काही माझी आवडती वाक्ये देतो. जालावर "बुशिझम"च्या नावाखाली बरेच हसायला मिळू शकते!
"Our enemies are innovative and resourceful, and so are we. They never stop thinking about new ways to harm our country and our people, and neither do we." —Washington, D.C., Aug. 5, 2004
We're concerned about AIDS inside our White House - make no mistake about it.
"People say, well, do you ever hear any other voices other than, like, a few people? Of course I do."—Washington, D.C., Dec. 18, 2008
"I want to thank my friend, Senator Bill Frist, for joining us today. He married a Texas girl, I want you to know. Karyn is with us. A West Texas girl, just like me." --Nashville, Tennessee, May 27, 2004
"Yesterday, you made note of my—the lack of my talent when it came to dancing. But nevertheless, I want you to know I danced with joy. And no question Liberia has gone through very difficult times."—Speaking with the president of Liberia, Washington, D.C., Oct. 22, 2008
इत्यादी! :-)
9 Jan 2009 - 10:59 pm | एकलव्य
... आपल्या सहभागाबद्दल आभार.
तुम्ही येथे प्रतिसादात मांडलेली "थोरामोठ्यांची मार्गदर्शनपर वचने" किंवा "उधळलेले तारे" हे चांगलेच खाद्य आहे. (तसेच संपादकांनी उडवलेले अन्य काही प्रतिसाद तर खूपच प्रतिभासंपन्न होते असेही आम्हाला समजले. ;) )
हा धागा सुरू करताना माझ्या मनातील विचार मात्र आजच्या ताज्या बातम्या/ न्यूज चॅनेलवर झळकणारे एखादे वाक्य येथे प्रकाशित व्हावे असा होता/आहे. म्हणजे दिवसाला ३-४ पेक्षा प्रतिसाद म्हणजे डोक्यावरून पाणी!
जर प्रकाशित केलेल्या मुक्ताफळांवर खूपच प्रतिक्रिया आल्या किंवा जास्तच वाद रंगला तर "ते" मुक्ताफळ उचलून स्वतंत्र चर्चाविषय करता येऊ शकतो.
(बातम्यांतील स्टंटबाजीही आवडणारा) एकलव्य
9 Jan 2009 - 11:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेतनवाढीसाठी पेट्रोल-डिझेलच्या निमित्ताने भारतीयांना वेठीस धरणार्या अधिकार्यांना जोडे हाणले पाहिजेत - प्रा.डॉ :)
10 Jan 2009 - 8:59 am | सुचेल तसं
एका ट्रकच्या मागे लिहीलं होतं..
थोडा कम पी रानी, महेंगा है इराक का पानी!!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
10 Jan 2009 - 9:11 am | घाटावरचे भट
एका ट्रकच्या मागे वाचलेले वाक्य -
"विठ्ठल-रखुमाईच्या आशीर्वादाच्या लाटा, म्हणून चालते ही जगदाळेची टाटा"
:)
10 Jan 2009 - 11:42 am | निखिलराव
एका ट्रकच्या मागे वाचलेले वाक्य -
" घासल्या शिवाय तलवारीच्या पात्यांना धार नाही "
" शिवबा शिवाय मराठी मातीला मान नाही "
आणि त्याच्या खाली लिहले होते :-
" आता बघतो काय मुजरा कर..."
11 Jan 2009 - 5:06 am | llपुण्याचे पेशवेll
एका ट्रकच्या मागे.
'असं काय बघतो रागानं
ओव्हरटेक केलय वाघानं'
पुण्याचे पेशवे
Since 1984
14 Jan 2009 - 2:32 pm | घाशीराम कोतवाल १.२
या जगातील १० सत्य
1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो!
संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.
11 Jan 2009 - 10:38 am | एकलव्य
हुतात्मा तुकाराम ओम्बळे यांची कन्या वैशाली उवाच - कसाबला माफी कसली देता? सहानुभूती कसली दाखविता? त्याला तत्काळ फाशी द्या!
10 Jan 2009 - 11:04 am | अमोल केळकर
ज्यांचा ईश्वरावर विश्वास नाही ते नास्तिक आहेत असे प्राचीन धर्मानी म्हटले आहे.
नवा धर्म म्हणतो की ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही ते नास्तिक होत
- स्वामी विवेकानंद
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
10 Jan 2009 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार
Great People Don't Do Any Different Thing, They Do Thing Differently.
Sometimes Majority Means All The Fools Standing On One Side!
I Received Nothing I Wanted, But Everything I Needed.
The Only Job Where You Start At The Top, Is Digging A Hole.
Fortune Does Not Change A Man, It Unmasks Him.
The Difference Between Genius And Stupidity Is That The Genius Has Its Limits.
An Apple A Day Keep The Doctor Away,Unfortunately The Nurse Too.....
PREVENT HANGOVER, Stay Drunk.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
14 Jan 2009 - 2:47 pm | वाहीदा
Never underestimate the strength of fools standing together
Fool will remain a fool nomatter which tool he use ! (this was a famous one from our Project Management Plan exam) :-)
~ वाहीदा
10 Jan 2009 - 11:56 am | मनस्वी
महागुरु उवाच : "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
10 Jan 2009 - 12:01 pm | जृंभणश्वान
Sometimes a road less traveled is traveled less for a reason
एवढा सोप्पा रस्ता सोडुन लोक पायऱ्यांनी का जात आहेत असा विचार केला. थोड्यावेळाने असा धडपडलो की वरील वाक्याचे महत्व पटले
10 Jan 2009 - 1:04 pm | खादाड
''फक्त इमानदार लोक ह्या देशात अल्प्सन्ख्यक आहेत!''
हे कोणत्या तरी जीप वर होत .
10 Jan 2009 - 1:11 pm | खादाड
If u can't see the brighter side of life....its better to paint the darker side!!! ;)
10 Jan 2009 - 2:44 pm | अवलिया
"Trust is like the air we breathe. When it's present, nobody really notices. But when it's absent, everybody notices." ---Warren Buffett
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
10 Jan 2009 - 6:13 pm | पात्र
"Length of love line for any girl is exactly the same she wants it to be "
10 Jan 2009 - 6:39 pm | वेताळ
महान संत शिबु सोरेन ह्यानी त्याचा झारखंड मध्ये झालेल्या पराभवानंतर काढलेले उदगार
"आजच मी पराभवानंतर संपुआ नेते लालु प्रसाद यादव याची भेट घेतली,नैतिकतेला अनुसरुन राजीनाम्याची गरज नसलेचे त्याचे मत.म्हणुन मी राजीनामा देणार नाही."
कालच एका कॉग्रेस नेत्याने राहुल गांधी भारताचे पुढील पंतप्रधान असतील असे सांगितले.त्यावर मनु श्रिवास्तव ह्यानी सांगितले "राहुल गांधी ना पंतप्रधान करायचे की नाही ह्याबाबत सर्व निर्णय कॉग्रेस पक्ष घेईल.व त्याबाबत कॉग्रेस वर्किग कमीटीने आपले सर्व निर्णय श्रीमती सोनिया गांधीवर सोपवले आहेत."
वेताळ
12 Jan 2009 - 11:15 am | मैत्र
महान लोकांची महान सदवचने!!...
एक णंबर!!
11 Jan 2009 - 12:04 am | अविनाशकुलकर्णी
Wealthy are those who have which money can't buy!!
Destiny decides who u meet in life
but its only your heart that can decide
who gets to stay in your life.
Judge a man by his questions rather than his answers~~~Voltaire
11 Jan 2009 - 10:35 am | एकलव्य
पाकिस्तान पंतप्रधान गिलानी उवाच -
जहां तक दुनिआ का ताल्लूक है कि दुनिआ अगर इक इन्सिडन्स (= मुंबई हत्याकांड) को इतना बढाके पेश करती है, जो कि वो उनका अपना इन्टिलिजन्स फेल्युअर है । कि वो नहिं कि हमारा (= पाकिस्तानका) फेल्युअर है । वो कहते है कि दस लोगोंने पूरे हिन्दुस्तानको होस्टेज कर लिया । तो अब ए बताऍ हम तो रोजाना उनकी उमर की दुआऍ करते है कि खुदा न करे अगर फिर अगर कोई ... हो जाऍ तो वोभी हमारे खातें में आ जाऍ । तो अब हम इक मुल्क नहिं दो दो मुल्कोंका निफाजा कर रहै है ।
http://media1.itgo.in/aajtak/video/012009/011009101444_10gilani1.wmv
11 Jan 2009 - 2:53 pm | सचिन
द ओन्ली वे टु बी हॅपी ईज स्टॉप बीइंग अनहॅपी !!
11 Jan 2009 - 3:37 pm | भिडू
यश न मिळणे म्हणजे अपयश नव्हे.
11 Jan 2009 - 3:46 pm | अविनाशकुलकर्णी
its is better to b hated for what ur ..then to b loved for what ur not...
अविनाश ..कोटिच्या कोटि उड्डाणे
12 Jan 2009 - 6:59 am | एकलव्य
स्वामिनॉमिक्सच्या आजच्या लेखात मांडलेले सूत्र आहे - While Enron deserved to die, Satyam deserves to be rescued.
जगातील मोठमोठ्या आर्थिक व्यवस्थांमध्ये (प्रामुख्याने अमेरिकन आर्थिक जगतात) सरकारच्या मदतीने बुडत्या कंपन्यांना वाचविण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. आर्थिक गैरव्यवहाराने कंपनी बुडते आहे की व्यवस्थेतील उलथापालथीने याचा विचार मह्त्त्वाचा राहिलेला दिसत नाही. "टू बिग टू लेट फेल" या -- योग्य अथवा अयोग्य -- एकमेव कारणाखाली सत्यमही वाचणार किंवा कसे ही एकप्रकारे वयात येऊ घातलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचीही कसोटी आहे.
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/3961881.cms?frm=mailtofriend
12 Jan 2009 - 11:55 am | मोहन
My life is full of disastars... which never happened !
मोहन
12 Jan 2009 - 12:07 pm | अमोल केळकर
BEING IGNORANT IS NOT SO MUCH A SHAME AS BEING UNWILLING
TO LEARN TO DO THINGS IN RIGHTWAY
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
12 Jan 2009 - 12:59 pm | सातारकर
Life should not be a journey to the grave with the intention of arriving safely, in an attractive and well-preserved
body, but rather to skid in sideways, totally worn out, shouting "WOO-HOO! What a ride"
13 Jan 2009 - 6:53 am | एकलव्य
Not having weapons of mass destruction was a significant disappointment - जॉर्ज बुश
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष यांनी आपल्या समारोपाच्या (?) मुलाखतीतही अनेक तारे तोडले. (No Pain - No Gain! No Brain - No Pain!!) नमुने येथे पाहा... http://www.cnn.com/video/#/video/bestoftv/2009/01/12/nr.bush.speech.anal...
अधिक माहिती - http://www.cnn.com/video/#/video/bestoftv/2009/01/12/njacns.best.bushism...
14 Jan 2009 - 11:23 am | विकास
Dalai Lama - "Be kind whenever possible. It is always possible."
14 Jan 2009 - 12:20 pm | वेदनयन
I have not failed. I've just found 10,000 ways that won't work
The value of an idea lies in the using of it
We don't know a millionth of one percent about anything
I never did a day's work in my life. It was all fun
16 Jan 2009 - 3:43 pm | शंकरराव
© २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
सखाराम गटणे
17 Jan 2009 - 10:23 am | एकलव्य
"If it weren't for the political power of the industry, nationalizing is what you'd want to do. It's almost a no-brainer!" डीन बेकर यांचे अमेरिकन अर्थव्यवस्थेवरील एक प्रातिनिधिक भाष्य
http://www.financialweek.com/apps/pbcs.dll/article?AID=/20090116/REG/901...
आज अमेरिकेतील (आणि पर्यायाने जगातल्याही) दोन भल्यामोठ्या बँकांनी -- बँक ऑफ अमेरिका आणि पंडितांची सिटी -- दोघात मिळून जवळपास १० बिलिअन डॉलर्सचा तोटा नोंदविला. सरकारने आतापर्यंत या दोघांना मिळून ~९० बिलिअन डॉलर्सचे कॅपिटल इंजेक्शन दिलेले आहे तरीही येत्या काही दिवसात पुन्हा मोठी पडझड व्हायची शक्यता आहे.
अमेरिकेच्या ट्रेझररने पुन्हा "ऍग्रीगेट" बॅकेचे तुणतुणे वाजविले... अर्थात हे नुसते तुणतुणे नाही. TARP, TGLP, TALF या आणि अशा अनेक मार्गांनी अमेरिकन सरकार आधीच मार्केटवर डायरेक्ट प्रभाव टाकते आहेच. जगातील भांडवलशाही देशात आणि जगातही नवीन वर्षात कोणत्या दिशेने बदलांचे वारे वाहणार याची चाहूल वॉल स्ट्रीटवरच्या आजच्या घडामोडीत लागते.
17 Jan 2009 - 10:28 am | एकलव्य
सदर लेखास अनेक अवांतर प्रतिसाद आलेले दिसत आहेत. हे प्रतिसाद चांगले आहेत आणि अतिअवांतर नाहीत हेही खरे आहे. त्यांत वाह्यातपणा नसल्याने संपादकांचे दुर्लक्ष झालेले असू शकते पण तरीही हे सर्व प्रतिसाद एकाच प्रतिसादाखाली संकलित केल्यास मूळ लेखाच्या हेतूस हातभार लागेल असे वाटते.
- एकलव्य
19 Jan 2009 - 10:03 am | एकलव्य
काश्मीरमध्ये नुकत्याच दहशतावादाला न जुमानता तडीस गेलेल्या निवडणुका, निकालानंतर झपाट्याने जन्मास आलेली युती, अलगतावादाचे अजेंडे आणि भारताशी नाळ जोडलेली राखण्याची कसरत, दिल्लीने बरखास्त न केलेले सरकार ह्या सार्या पार्श्वभूमीवर तरुण मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला याच्या समोरील आव्हाने अनेक आहेत...
त्यातील एक आहे ते काश्मीरच्या राजकारणावरील समीक्षकांच्या खालील टिपण्णीस पुरून उरण्याचे -
Kashmir is a graveyard of reputations for politicians.
19 Jan 2009 - 1:44 pm | भिडू
People laugh because I am different. And I laugh because they are all the same..
That's called ATTITUDE ....Swami Vivekananda
19 Jan 2009 - 10:11 pm | एकलव्य
"I have a dream that my four little children will one day live in a nation where they will not be judged by the color of their skin, but by the content of their character." - मार्टिन ल्युथर किंग यांचे हे जगप्रसिद्ध वाक्य आजचे नाही... पण MLK च्या आजच्या स्मृतीदिनी हे वाक्य आज कधी नव्हे तेव्हढे अनेकांच्या मनात घोळत असेल.
ओबामाच्या रूपाने पहिला आफ्रिकन अमेरिकन जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्राच्या अध्यक्षपदाची शपथ उद्या येथे घेईल तेव्हा आपल्या स्वप्नाची जणू पूर्तता झाल्याचे किंवा त्यादिशेने एक फार मोठे पाऊल पडल्याचे समाधान मार्टिन ल्युथर किंग यांना आज मिळत असेल.
"Has that dream been fulfilled? With the election of Barack Obama, two thirds of African-Americans believe it has," CNN senior political analyst Bill Schneider said.
"Most blacks and whites went to bed on election night saying, 'I never thought I'd live to see the day.' That's what the nation is celebrating on this King holiday: We have lived to see the day," Schneider said.
22 Jan 2009 - 7:23 am | एकलव्य
अमेरिकन अर्थव्यवस्थेचे आणि बर्याच अर्थांनी अमेरिकन सामर्थ्याचे प्रतीक असणार्या GM and Chrysler या अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहेत. बेलआउटची लाईफलाईन आणखी काही आठवडे पुरेल त्यानंतरचे भविष्य अवघड आहे हे सांगताना GM and Chrysler येथील व्यवस्थापनावर चालू असलेल्या टीकेचा हा आजचा नमुना -
"This is like an alcoholic who is drinking two quarts a day, saying he'll go down to one quart a day"
23 Jan 2009 - 6:19 pm | लिखाळ
अल्कोहोलच्या उल्लेखाने बुश यांच्या शेवटच्या वार्ताहरपरिशदेतले वाक्य आठवले. बेलाआउतचे पैसे सामान्यांचेच आहेत आणि त्यांनी कर वेळोवेळी भरलेलाच आहे. तरी सुद्धा पुन्हा बेलाआउटच्या मार्गाने त्यांनी पैसे का द्यावे असा प्रश्न त्यांना पडेल असे बुश म्हणाले आणी वर अश्या तर्हेचे काही... की वॉलस्ट्रीटने दारु ढोसली आणि त्याचा हेंगओवर आम्हाला..अशी सामन्यांची भावना होऊ शकते..इत्यादी. मला ती उपमा आवडली..
-- लिखाळ.
22 Jan 2009 - 8:25 am | एकलव्य
Heroes only if system fails - अतिरेक्यांच्या हल्याच्यावेळी उघडकीस आलेली गोंधळ आणि व्यवस्थेतील त्रुटी यांवर राहुल गांधी यांनी केलेली मार्मिक टिपण्णी
23 Jan 2009 - 9:48 am | एकलव्य
आज खरे तर आणखीही बर्याच घडामोडी झाल्या... पण एकच वाक्य उचलायचे म्हटले तर हे घ्या -
"Only a foreigner could have made such a film" - Slumdog Millionaire ला ऑस्करसाठी १० वेगवेगळ्या शिफारसी (नामांकने) मिळाल्यानंतर इरफान यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया बोलकी आहे ;)
23 Jan 2009 - 6:01 pm | अमोल केळकर
हजारो मैलाचा प्रवास एका पावलाने सुरु होतो
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
24 Jan 2009 - 3:53 am | एकलव्य
येणार्या वादळाची -- बहुदा पेल्यातीलच कारण खरे वादळ झेपणारे नाही -- चाहूल
अमेरिकन ट्रेझररने नवीन राजवटीच्या सुरुवातीस चीनवर केलेला डायरेक्ट आरोप - "President Obama -- backed by the conclusions of a broad range of economists -- believes that China is manipulating its currency."
त्यावर चीनने अधिकृतरित्या मारलेला टोला - "Directing unsubstantiated criticism at China on the exchange rate issue will only help US protectionism and will not help towards a real solution to the issue"
25 Jan 2009 - 11:00 am | एकलव्य
China and America - War of words अगदी माझ्या मनात असेच विचार आले असे म्हणायला हरकत नाही! तपशील देत नाही पण इच्छुकांनी लेख http://www.economist.com/finance/displaystory.cfm?story_id=13005072 येथे वाचावा.
25 Jan 2009 - 11:47 am | सखाराम_गटणे™
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
25 Jan 2009 - 6:32 pm | प्रदीप
हे अलिकडचे बूकर पारितोषिक विजेते, त्यांच्या 'द व्हाईट टायगर' ह्या पुस्तकासाठी.
आमच्या येथील वर्तमानपत्राने आज त्यांची मुलाखत छापली आहे. त्यात त्यांना त्यांच्या एजंटशी झालेल्या तथाकथित वादाबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांची मल्लिनाथी:
"ब्रिटिश वृत्तपत्रांत माझ्याबद्दल काही छापून आले तरी त्याबद्दल मला काही वैषम्य नाही, कारण मी मुंबईत रहातो. (पण) भारतीय माध्यमे त्यांचा ५० % वेळ, वसाहतवादी ब्रिटिश, जे त्यांच्या देशातून ६१ वर्षांपूर्वी निघून गेले आहेत, त्यांच्यावर टिका करण्यात घालवतात. व उरलेला ५०% वेळ ब्रिटनमधील गटारपत्रांतील 'बातम्या' इमानेइतबारे उचलून घेण्यात!"
["The British press is of no concern to me because I live in Mumbai. The Indian media spends half its time attacking the British colonial masters who left them 61 years ago, and the other half faithfully copying stories from the English gutter press"]
26 Jan 2009 - 2:13 am | आचरट कार्टा
Whenever you say "I Can" or "I Can't", you are always right !
----------------------------------------------- Sir Henry Ford
27 Jan 2009 - 6:23 am | एकलव्य
ओबामाचे राष्ट्राध्यक्ष होणे आणि वंशभेदाची त्यानिमित्याने झालेली ऐशीतैशी यांवर मिपाकर "सहज"रावांना गवसलेले हे अवतरण -
Excellent black people have always been compensated for excellence. Always. The real equality is when we can have a black president as dumb as George Bush - Comedian Chris Rock joking after President Obama's inauguration.
30 Jan 2009 - 8:05 am | एकलव्य
"This is the first I've heard of Prime Minister Putin coming out for free enterprise," Clinton joked "I hope it works for him."
अर्थव्यवस्थेची उलथापालथ येऊ घातलेल्या काळात सेन्ट्रल प्लॅनिंगचे जगातील आजवरचे विक्रम मागे टाकण्याची शक्यता असलेल्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाने गंजलेले पोलादी दरवाजे किलकिले करू पाहणार्या रशियाच्या सर्वेसर्व्यावर केलेली ही टिपण्णी म्हणजे अर्थव्यवस्थेतील उलथापालथीचा एक मासलेवाईक नमुना आहे.
Putin has often been criticized for exerting state control over Russia's key industries such as oil and gas.
30 Jan 2009 - 11:39 am | आम्हाघरीधन
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
31 Jan 2009 - 6:19 pm | एकलव्य
इराणी दूरदर्शनवरील एका समीक्षेत हॅरि पॉट्टरच्या अतिलोकप्रिय पुस्तकावर आणि चित्रपटाचे केलेले हे समीक्षण - Propaganda for purity of blood and race ... is openly portrayed and emphasized in the second Harry Potter film.
हॅरि पॉट्टरच्या वाटेला आम्ही कधी गेलो नाही... तेव्हा वरील विधानातील विनोदीपणा अथवा दाहकातेची आम्हाला नेमकी कल्पना नाही हे समजून घ्यावे - एकलव्य
31 Jan 2009 - 10:47 pm | अविनाशकुलकर्णी
Put your hand on a hot stove for a minute, and it
seems like an hour. Sit with a pretty girl for an
hour, and it seems like a minute. THAT'S
relativity.
- Albert Einstein
The brain is a wonderful organ. It starts working
the moment you get up in the morning and does not
stop until you get into the office.
- Robert Frost
The trouble with being punctual is that nobody's
there to appreciate it.
- Franklin P. Jones
We must believe in luck. For how else can we explain
the success of those we don't like?
- Jean Cocturan
It matters not whether you win or lose; what
matters is whether I win or lose.
- Darrin Weinberg
19 Feb 2009 - 1:36 pm | प्रदीप
आपले गृहमंत्री बी. बी. सी. शी बोलतांना म्हणाले की 'तीन महिन्यांपूर्वी मुंबईवर झाला, तश्या हल्ल्याचा मुकाबला करण्यास आता भारत अधिक सज्ज आहे.'
20 Feb 2009 - 10:56 am | एकलव्य
बुडणार्या किंवा सरकारी अनुदानावर तरणार्या बँका ह्याची "न्यूज"व्हॅल्यू राहिलेली नाही. पण झाकलेली अब्रू आणि दडपलेली पापे उघड्यावर आणू शकणार्या ह्या एका डेव्हलपमेन्टकडे लक्ष खेचले गेले.
स्विस बँकेतील छुपी खाती ही जगभरातील उद्योगपतींचे, माफियांचे आणि राजकारण्यांची भलतीच सोय मानली जाते. पण त्यांचे दिवस भरले आहेत असे (वरवर तरी) दिसते आहे...
The Swiss are saying that this is the end of Swiss banking as they knew it.
JACK BLUM, a specialist in offshore banking, on the decision of UBS to reveal the names of Americans who may have used the Swiss bank to avoid paying income tax
http://www.nytimes.com/2009/02/19/business/worldbusiness/19ubs.html
24 Feb 2009 - 8:11 am | एकलव्य
"All my life, I've had a choice of hate and love. I chose love, and I'm here" आयुष्यभर जपून ठेवावे अशी ही प्रतिक्रिया आणि शिकवण आहे ए आर रेहमान यांची!
जय हो - एकलव्य