लहान असताना जरी मनात भुता खेतांबद्दल खुप भिती होती तर भयपटांबद्दल एक आकर्षण्ही होतं.
पहिला भयपट कोणता पाहिला ते आठवत नाही पण मराठितला हा खेळ सावल्यांचा मधेल काही प्रसंग पाहुन टरकलो होतो.
येवढा की रात्री दिवे बंद असताना बाथरुम/बेडरुम मध्ये जायला पण टरकत असे.
असो तर हळु हळु भयपट पाहाण्यात मी प्रगती केली आणि चक्क पहिलाच इंग्रजी भयपट (चोरुन) पाहिला तो म्हणजे 'दी इव्हील डेड'.
बहुतेक तेव्हा ५वी ६वीत होतो. एका मित्राच्या घरी व्हिडियोवर पाहिला होता.
'दी इव्हील डेड' त्या काळी बराच गाजला होता त्यामुळे निर्मात्याने वाहात्या गंगेत हात धुतल्या प्रमाणे लगोपाठ २ नव्हे ३ नव्हे तब्बल ४ सिक्वेल काढले.
दर्जा त्या सिव्केलच्या आकड्या गणीक घसरत गेला. इतका की भाग ४ पहाताना मला चक्क हसु येत होत.
त्यानंतर अनेक भयपट पाहिले.
हिंदितला विराना पाहिला. नंतर त्या वाटे गेलो नाही.
या रामसे-बंधुंनी या भारतीय भुतांची एवढी दयनीय अवस्था करुन ठेवली की त्यांना भयपटांपेक्षा विनोदी चित्रपट म्हणण जास्त संयुक्तिक ठरेल.
रामसे-बंधुंनी घातलेल्या या पायावर सध्या कळस चढवायच कार्य त्यांचा नाम-बंधु, वर्मांचा रामु करतोय.
एकवेळ अशी आली की मी भयपट पाहाणेच सोडुन दिले.
थेटरात जाऊन चित्रपट पाहाण्याची बोंब होती. मुळात इंग्रजी चित्रपट लागणारी थेटरे पार व्हिटी आणि चर्चगेटात. एवढ्या लांब कोण जातोय मरायला.
पण मित्राच्या व्हीसीआरमुळे शालेय जीवनात बरेच इंग्रजी चित्रपट पाहिले.
४-५ रुपयात चाड्याने कॅसेट मिळायची, मग १० मित्र गोळा केले की माणशी आठ आण्यात चित्रपट पदरात पडायचा.
त्याच दरम्यान पाहिलेला दुसरे भयपट म्हणजे ग्रेगीपेगचा 'दि ओमेन'.
आणि 'दी एक्सॉर्सिस्ट'
नंतरही बरेच चित्रपट पाहिले पण उत्तरोत्तर ते भितीदायक वाटण्यापेक्षा किळसवाणेच जास्त वाटुलागले.
आपल्या लक्ष्याचा तात्यावींचु फेम झपाटलेला पाहील्या नंतर त्याची मुळप्ररणा 'चाईल्ड्स प्ले' पहाण्यात आला.
पुढे केबल मुळे बरेच इंग्रजी चित्रपट घरबसल्या पहाता येऊ लागले.
"दी ब्लेअर वीच प्रोजेक्ट"
"रोज(स)मेरीज बेबी"
अलीकडे पाहिलेला
'वन मिस् कॉल"
अणि 'शटर'
बरेच उत्तमोत्तम चित्रपट टाकायचे राहुन गेले असतील.
पण ती त्रुटी तुम्ही भरुन काढा. तुम्हाला आवडलेले भयपट कोणते?
प्रतिक्रिया
16 Oct 2010 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त आढावा गणपाशेठ :)
ह्या यादीत :-
द ग्रज १/२/३

द अनबॉर्न :-

मिरर्स :-

जिपर्स क्रिपर्स :-

कसे काय विसरलात ? ;)
16 Oct 2010 - 5:26 pm | प्रिया देशपांडे
राजकुमार साहेबांच्या अ़़क्षरा अक्षराशी सहमत.
(भयपट पाहणारी) प्रिया
16 Oct 2010 - 5:59 pm | इंटरनेटस्नेही
राजकुमार साहेबांच्या अ़़क्षरा अक्षराशी सहमत.
(भयपट पाहणारा) इंट्या.
16 Oct 2010 - 7:39 pm | गणपा
पराशी १००% सहमत. त्याने उद्बोधलेले चित्रपट ही पाहिलेत. पण हा लेख टाकताना जरा घाईत होतो. त्यामुळे राहुन गेल.
सदर धाग्याच प्रयोजन म्हणजे काही चुकुन पहायचे राहुन गेलेल्या भयपटांची नावे गोळा करणे.
@नायल्या चांगल्या भारीतल्या सस्पेंस, क्राईम थ्रीलर्स ची नाव सुचवलीस तरी चालतील.
हाणामारी वाले/थ्रीलर्स चित्रपटांचे आम्हीही शौकिन आहोत :)
17 Oct 2010 - 2:55 pm | भडकमकर मास्तर
सरीवर सरी हा गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित सिनेमा पाहून आता मराठी सिनेमाचं कसं होणार अशी खूप खूप भीती वाटली...
16 Oct 2010 - 5:24 pm | प्रचेतस
माझ्या अत्यंत आवडत्या भयपटांपैकी एक म्हणजे आल्फ्रेड हिचकॉकचा -'सायको'
खर्या अर्थाने भयपटांची(थ्रिलरपटांची) परंपरा 'सायको' पासून सुरु झाली हे आमचे मत.
रूढार्थाने याला भयपट म्हणता येणार नाही. किंबहुना हा भूतपट नाहीच. पण यातील थरार भूतपटांपेक्षा किंचितही कमी नाही.
अँथनी पर्किन्सचा सर्वोत्तम अभिनयाने सजलेला हा चित्रपट मरियन क्रेनच्या (जेनेट लाय) शॉवर सीनच्या खुनाच्या दृश्याने एक अप्रतिम थरारक सीन पाहील्याचा आनंद देतो. चित्रपटाचा शेवट तर अविस्मरणीयच.
16 Oct 2010 - 5:27 pm | दिपक
रिक आवडला होता..

बाकीचे आठवतील तसे.
16 Oct 2010 - 5:27 pm | प्रियाली
मस्त धागा. सक्काळी सक्काळी बघून आनंद झाला.
माझाही पहिला भयपट हा खेळ सावल्यांचा. हा चित्रपट आज बघितला तर अभिनय टुकार आहेत परंतु तरी स्थळ, माड आणि संगीत यामुळे भीती वाटते.
कालच रात्री मी बॉबी देओलचा हेल्प असा टुक्कार भयपट पाहिला. बाकी बॉबी चित्रपटात असताना भुताची गरज काय हेच कळत नाही पण असो.
माझे आवडते भयपट - रक्ताळलेले वेडसर चित्रपट सोडून बाकी सर्व. ;) पण सर्वात आवडता चित्रपट -
आणि त्यातला आय अॅम योर डॉटर! हा संवाद तर भारीच. भयपट कसे असावेत त्याचा उत्तम दाखला. रक्त नाही. भयंकर चेहरे नाहीत. किळस नाही. सुपर्ब!!!!
द ब्लेअर विच प्रोजेक्ट आणि रोजमेरी'ज बेबी ही मस्त.
16 Oct 2010 - 5:32 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
मी तर साध आहट च> किंवा झी हॉरर शो चं music पण ऐकु शकत नाही.
मी मध्ये ते राज मूव्ही आलं होतं ना त्यात्ला तो खिडकी वाला सीन चुकुन पाहिला होता तर ७-८ दिवस खिडकीत पहात नव्हते.
.... आणि भूत मधला सीन पाहिला तर आरशात पहात नव्हते...
(लेकिला सोबत घीउन जायचे साधा लाईट लावायला)
म्हटलं तुझ्या धाग्यावर साधा reply टाकावा...तर मेली ही चित्र!
फ फटके द्यायला हवेत तुला!
<<<भयपट कसे असावेत त्याचा उत्तम दाखला. रक्त नाही. भयंकर चेहरे नाहीत. किळस नाही. सुपर्ब!<<<>>>>
त्याचीच तर भिती वटते...जे न दिसता आपल काम करतं...
चेहरे पाहुन तर मला भिती नहि वाटत पण music आणी कसलीतरी अज्ञात शक्ती...बाप रे....झाली आजपासुन ७-८ दिवस झोपेची काशी!
गणप्या..... मेल्या...दुष्टा...
!@#$@$%$%^$&$%&*%*%*%&*
@$#%#$^$%^$%&%&*%*%*%&*(&(
@$$^$#^#$%^$&$^^*
16 Oct 2010 - 5:40 pm | यशवंतकुलकर्णी
ऑर्फन !!
हा काही भूतपट नाही पण भयपट नक्कीच आहे.
या काट्टीला काय झालंय ते सिनेमा संपेपर्यंत कळलंच नव्हतं.
16 Oct 2010 - 5:48 pm | Nile
आम्हाला भयपट भय आणतच नाहीत. (मी भयपटात खदाखदा हसतो म्हणुन मित्र शिव्या घालतात) पण सर्वात पहिला बघितलेला सायको (तेव्हा ४-५ वीत होतो) मनात घर करुन बसला आहे.
भुतं बीतांपेक्षा सस्पेंस, क्राईम थ्रीलर्स आपले फेव्हरीट.
-(जिवंत भुत) निळोबा.
17 Oct 2010 - 3:15 am | मराठमोळा
>>आम्हाला भयपट भय आणतच नाहीत
सहमत आहे... :) (लहानपणी सुद्धा कधी भुतांची भिती वाटली नाही)
पण मी माझ्याच"डरना मना है" मधल्या प्रसंगात खरच घाबरलो होतो.
>>भुतं बीतांपेक्षा सस्पेंस, क्राईम थ्रीलर्स आपले फेव्हरीट.
+१०० सहमत आहे. :)
(अवांतरः सस्पेंस, क्राईम थ्रीलर्स यांची पण यादी जमवावी.)
16 Oct 2010 - 6:11 pm | यशवंतकुलकर्णी
आणि हा एक...
शाळेत मास्तरांचे "तात्याविंचू", "कुबड्या खविस," " बाबा चमत्कार" असे बारसे करायला कामी पडला होता.
दिलीप प्रभावळकरांचा आवाज भार्री...रामदास पाध्येंच्या करामती त्याहून भारी.
16 Oct 2010 - 6:19 pm | स्पा
16 Oct 2010 - 6:50 pm | नीतु
द रिंग

16 Oct 2010 - 6:47 pm | रेवती
भयपट असा काही प्रकार नाहीच्चे!;)
काही दिवसांपूर्वी लेकिन नावाचा चित्रपट मी डोळे झाकून पाहिला.
'हा खेळ...' सिनेमा बघताना मी शेंबडी पोर असल्याने तो भयपट आहे हेच समजले नाही.;)
नंतर उर्मिला मातोंडकरचे दोन सिनेमे (नावं माहित नाही) मान खाली घालून पाहिले.
मी फक्त प्रेमळ सिनेमेच पाहते.;)
18 Oct 2010 - 8:30 am | स्पंदना
मान खाली घालुन?
रेवती तुझ्या धाडसी पणाला सलाम !!
मी सिंदबादची सफर हा ईंग्लिश पिक्चर खुर्ची खाली बसुन बघितला होता.
बाकिच सांगुन कशाला हसु करुन घ्यायच ना?
16 Oct 2010 - 7:19 pm | पर्नल नेने मराठे
मी भयपट पहात नाही पण लहानपणी श्वेतांबरा मालिका पहात असे.
टाइटल सॉन्ग सुरु झाले की ति बाइ म्हणजेच श्वेतांबरा पान्ढर्या साडित झाडाखाली येउन उभी राहाते असा सिन असे.
मला त्या टाइटल सॉन्गच्या म्युझिकची पण भिति वाटत असे.
भयानक अगदी भयानक !!!
16 Oct 2010 - 9:48 pm | मस्त कलंदर
मला तर लहानपणी 'आपण यांना पाहिलंत का' हा कार्यक्रम देखिल भयानक भीतीदायक वाटत असे. एकतर त्यातले फोटो जुने पुराणे, आणि ही व्यक्ती अमक्या कपड्यांत, ढमक्या ठिकाणाहून गायब झाली आहे असे ऐकले की आपणही हरवू असेच वाटायचे. डोळे गच्च मिटून आणि कानात बोटे घालून मी बसायचे तेव्हा. त्याला हेही कारण असेल, की लहानपणी एक माणूस मला पळवून नेत होता, आणि (माझ्या बहिणीच्या मते) दुर्दैवाने तो रंगेहाथ सापडला!!! त्यामुळे हरवले जाण्याची भीती मला पुष्कळ दिवस होती!!!
17 Oct 2010 - 11:25 am | स्वानन्द
दुर्दैवाने?? की सुदैवाने?
18 Oct 2010 - 5:05 pm | मृत्युन्जय
दोन्हीही. मकीच्या बहिणीच्या दुर्दैवाने आणि त्या अपहरणकर्त्याच्या सुदैवाने.
16 Oct 2010 - 8:45 pm | सहज
एम नाईट शामलनचा सिक्थ सेन्स कसा काय कोणी लिहला नाही.

वर भयालीतैंनी लिहलेला द अदर्स पण भारी आहे!
16 Oct 2010 - 8:55 pm | गणपा
सिक्थ सेन्स ची थिम मस्त होती, पण मला तो खुप भितीदायक नाही वाटला ३-४ प्रसंग सोडले तर.
शेवट धक्का दायक होता हे मात्र खरं :)
16 Oct 2010 - 9:43 pm | मस्त कलंदर
सिक्स्थ सेन्स आणि मिस्ड कॉल आवडते चित्रपट. बाकी, त्या ब्लेअर विच प्रोजेक्ट बद्दल लै ऐकले होते, म्हणून आधीच घाबरायची भरपूर मानसिक तयारी करून आणि एकटी घाबरेन म्हणून सोबतीची पण सेटिंग करून पाहायला बसले. पण आता घाबरेन, मग घाबरेन असे करत पिक्चरच संपला!!!! :( कदाचित घरी लॅपटॉपवर पाहिल्याने असे झाले असावे. पण अशी तयारी केली की मोठ्या पडद्यावरही मी घाबरत नाही. 'भूत' बघताना असेच झाले होते.
पण मला व्यक्तिशः विनाकारण ओंगळ भुते दाखवणार्या मालिका आणि मूव्हीजचा भयंकर तिटकारा आहे.. अजून मला आहट मधली भुते डोळ्यासमोर बर्याचदा दिसतात. आणि खदखदा हसणारा प्लेटमध्ये ठेवलेला अर्चना पूरणसिंगचा चेहरापण!!!! :(
16 Oct 2010 - 9:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>> अजून मला आहट मधली भुते डोळ्यासमोर बर्याचदा दिसतात. आणि खदखदा हसणारा प्लेटमध्ये ठेवलेला अर्चना पूरणसिंगचा चेहरापण
मला कॉमेडी सर्कस बघतानाचा अर्चना पूरणसिंगचा खदखदा हसणारा चेहरा आठवला की अंगावर शहारे येतात. (तो चेहरा प्लेटमध्ये नसून तिच्या स्वतःच्या अंगावर असतानापण)
13 Jul 2016 - 2:10 pm | nanaba
LOL
16 Oct 2010 - 9:56 pm | नितिन थत्ते
तेजायला वरचे सगळे विंग्लिश शिनेमे आहेत. ते कळणारच नाहीत त्यामुळे भीतीच वाटणार नाही.
मला आवडलेला भयपट म्हणजे "डरना मना है". गहराई हा अरुणा-विकास यांचा लागू, पद्मिनी कोल्हापुरे चा एक साउथी पिक्चर येऊन गेला. त्यात काही सीनमध्ये भीती वाटायची.
पण माझी सर्वात जास्त टरकली होती Jaws मधला इंटरवलपूर्वी अचानक दिसलेला जबडा पाहून.
(अवांतर : एन्टिटी हा चित्रपट भयपट म्हणून पाहिलाच नव्हता).
18 Oct 2010 - 5:07 pm | मृत्युन्जय
(अवांतर : एन्टिटी हा चित्रपट भयपट म्हणून पाहिलाच नव्हता).
एन्टिटी भयपट म्हणुन फार थोड्या जणांनी बघितला. ;) . गहराइचे देखील तेच.
16 Oct 2010 - 11:10 pm | आनन्दा
माझा एक मित्र रिन्ग पाहत असताना क्लायमॅक्स च्या वेळी अचानक घरातले लाइट गेले... नन्तर जाम मजा आली
16 Oct 2010 - 11:16 pm | नभा
स्लिपी हॉलो नावाचा चित्रपट पाहिला होता मागे..... जाम भीती वाटली होती बघताना
16 Oct 2010 - 11:41 pm | मी-सौरभ
येड्पट लोकांनी बनवलेले टुकार चित्रपट (बॉलीवूड) म्हंजे भयपट असे मी मानतो.
तवा म्या फकस्त वॅक्शन अन कामेडी पिच्चर बगतो :)
17 Oct 2010 - 12:26 am | शुचि
मुलहॉलंड ड्राईव्ह फारच मस्त आहे.
17 Oct 2010 - 2:19 am | Pain
भयपट पाहून किंवा इतर कशाची भीती वाटत नाही.
अचानक मोठा आवाज, नजीक झालेली हालचाल किंवा एखादे भीषण दृष्य पाहून दचकायला होते पण ती शरीराची मूलभूत प्रतिक्रिया झाली.
केवळ भीतीच नव्हे तर इतर भावनाही फारशा जाणवत नाहीत.
17 Oct 2010 - 5:18 am | चतुरंग
फारशा जाणवत नाहीत - हे मात्र जरा सीरीअस वाटते बॉ! :(
(भावनाप्रधान)रंगा
17 Oct 2010 - 7:04 am | शहराजाद
मी भयपट फारसे बघत नाहीत. बर्याच चित्रपटांतला अमानवी भाग ओंगळ आणि हिडीस दाखवलेला असतो ते आवडत नाही. वर उल्लेखलेला सायको आवडला होता. मी पाहिलेल्यांत त्यासारखे हिडीसपणा न दाखवताही आत्यंतिक भय/ ताण यांचा अनुभव देणारे चित्रपट फार थोडे.
इंटरव्ह्यू विथ द व्हॅम्पायर मात्र आवडला. खरं तर तसा तो फारसा भयप्रदही नाही. माणूसपणाचे अंश शिल्लक असलेल्या व्हॅम्पायरची कथा, टीपीकल व्हॅम्पायर स्टाइल शिकारी, व्हॅम्पायरच्या चित्रपटांत असते तसे सेन्शुअल हॉरर आणि ते करायला तीन देखणे व्हॅम्पायर.
ब्रॅड पिट, टॉम क्रुअ, अँटोनिओ बॅन्डेरास- आणखी काय पाहिजे?
17 Oct 2010 - 12:46 pm | गांधीवादी
आम्हाला कशाचेच भय वाटत नाही. त्यामुळे कोणताही चित्रपट हा आमच्यासाठी भयपट नसतो.
त्यातल्या त्यात जर एखादे भयपट दृश्य बघायचे असेल तर आम्ही INDIA TV बघतो.
17 Oct 2010 - 1:55 pm | इन्द्र्राज पवार
धागाकर्ते श्री.गणपा यांनी त्यांच्या यादीतील १. ओमेन व २. रोझमेरी'ज बेबी ये दोन चित्रपट भयपटांच्या Sophisticated Genre या प्रकारात येतात. मात्र अशी काही मोजकी उदाहरणे सोडल्यास हॉलीवूडने बर्याच वेळा हॉरर मीन्स हाय पिच अग्लीनेस अशी काहीशी ढोबळ व्याख्या करून हिंसेचा असा काही भडीमार (इव्हिल डेडच्या यशानंतर) केला की प्रेक्षकांच्या डोक्यावर ट्रकभरून रक्तमांसाचा चिखल ओतला नाही तर तो थिएटरकडे येणारच नाही अशीच निर्मात्यांनी कल्पना करून घेतली की काय असे वाटू लागले आहे. 'Saws' सीरीजमधील एखादीही आठवण तर तुम्हास जेवणाच्या ताटावरून उठवेल. तीच गोष्ट Final Destination Part-1 to 4 ची. चांगले कथानक पण परत तीच अट्टाहासाने घातली जाणारी रक्ताची आंघोळ. एफ.डी. पार्ट-२ मधला रोड अॅक्सिडेंट तर पूर्णपणे कोणत्याही चॅनेलवर दाखविला जात नाही असे त्याचे भयावह चित्रण केले आहे.
पण असे असले तरीही Sophisticated Horror Movies चे महत्व अजूनही ओसरलेले नाही...आणि ते दिसून येते ते Silence of The Lambs या ऑस्कर विजेत्या चित्रपटात. मला वाटते अखंड हॉरर मूव्हीज निर्मितीमधील हा एकमेव चित्रपट असा आहे की ज्याच्या अभिनेत्याला (अँथोनी हॉपकिन्स) आणि अभिनेत्रीला (ज्योडी फोस्टर) 'बेस्ट अॅक्टर, बेस्ट अॅक्ट्रेस' ची ऑस्कर्स मिळाली.
हॉपकिन्स यांनी साकारलेला डॉ.हॅनिबल लेक्टर एक मनोविकारी पण गुन्हा करताना गुन्हेगाराची मेंदू नेमके कोणते कार्य करीत असतो हे अचूक जाणणारा... तर ज्योडीने साकारलेली एफबीआय एजंट क्लॅरिस ही तितक्याच ताकदीची व्यक्तीरेखा जी एका 'सीरियल किलर' ला पकडण्यासाठी खास तुरुंगात कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या डॉ.लेक्टरचाच सल्ला घेत असते.
संपूर्ण चित्रपट भीतीचे जबरदस्त वातावरण निर्माण करतोच पण सर्वच पात्रांचा अभिनय दाद देण्यासारखा. प्रमुख भूमिकेतील वरील दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी खिळवून ठेवते.
All time Greats मध्ये ही 'सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स' चा सातत्याने उल्लेख असतो.
जरूर पाहावा असाच आहे.
इन्द्रा
17 Oct 2010 - 2:15 pm | Nile
गणपाभौ ने विचारलं इतर चित्रपट टाका, त्यात पहिले ह्याचेच नाव टंकणार होतो. (इतका आवडला म्हणुन मग हॅनिबल पाहिला पण त्याने निराशा केली.)
17 Oct 2010 - 2:47 pm | इन्द्र्राज पवार
Nile, your sure about your views on "Hannibal? तुम्ही हा चित्रपट एकांतात (....म्हणजे तुम्ही एकटे असता त्यावेळी....उगा गैरसमज नको...) असाल त्यावेळी, त्यातही रात्रीच्या वेळी आणि मोबाईल हडळीची वाचा बंद करून...पाहा, हा दुसरा भाग 'हॅनिबाल', मला "सायलेन्स...."च्याच तोडीचा वाटला तो. फार सोफिस्टिकेटेड आहे एकूणच या दुसर्या भागाची धाटणी (जरी त्या डुक्कर कोंड्वाड्यातील एक प्रसंग आणि मेंदू कोरणे असे अंगावर शहारे आणणारे एकदोन प्रसंग असले तरी...).
अँथोनी हॉपकिन्स तर बापमाणूसच आहे...पण ज्युलियाना मूर हिनेही ज्योडीची उणीव भासू दिलेली नाही.
मला खात्री आहे नक्की तुमचे मतपरिवर्तन होईल.... (न झाले तर समजावून सांगायला डॉ.हॅनिबाल लेक्टर यांना पाठवू का तुमच्याकडे?)
इन्द्रा
17 Oct 2010 - 2:56 pm | सहज
सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज आणी हॅनीबल मला पण आवडले.
मला 'रेड ड्रॅगन' ज्यात सुरवातीला हॅनीबल पकडला जातो तो सिनेमा पण आवडला होता.
18 Oct 2010 - 11:30 am | अप्पा जोगळेकर
तुम्ही हानिबाल रायझिंग बद्दल तर बोलत नाही ना?
18 Oct 2010 - 11:45 am | Nile
हॅनिबल सायलेंस इतका फ्लोईंग नाही असे मला वाटते. मूरलाही फोस्टरची सर येत नाही. व्हिलन वर्जरचे चित्रणही मला प्रभावी वाटले नाही. स्टोरी दमदार आहे, पण चित्रण-डिरेक्शन सायलेंस इतकं भावलं नाही.
17 Oct 2010 - 3:15 pm | मस्त कलंदर
एकदा एका इलेक्ट्रॉनिक्स शॉपी मध्ये गेले तर नेमका हाच सीन लागला होता. आता अॅक्सिडेंट संपला वाटेवाटेपर्यंत त्यात परत काहीतरी होतच होते.. जाम जीवघेणा होता तो!!!
18 Oct 2010 - 10:00 am | इन्द्र्राज पवार
".....एकदा एका इलेक्ट्रॉनिक्स शॉपी मध्ये गेले तर नेमका हाच सीन लागला होता...."
~ म.क. >> तू तर रेग्युलर शॉपीमध्ये म्हणतेस; इथे कोल्हापुरात 'सकाळ वर्धापन दिन फेस्टिव्हल' भरले होते, एका मोठ्या मैदानात आणि अन्य विविध स्टॉल्ससमवेत एक कोपरा 'इलेक्ट्रॉनिक्स गुड्स' ने व्यापला होता. तिथेही विविध टी.व्ही. कंपन्यांचे स्टॉल्स होते. पैकी फक्त तीन वर स्पोर्टसचे कार्यक्रम तर जवळजवळ पाच-सहा स्टॉल्सवर डीव्हीडीवरून एफ.डी.२ मधील हेच 'जीवघेणे' दृश्य झळकत होते....आणि सर्व थरातील लोक अगदी मिटक्या मारत तो 'रक्तरंजीत थरार आनंद' लुटत होते.
याबद्दल सकाळच्या तिथल्या फेस्टिव्हल प्रमुखांकडे याबाबत लेखी निषेध आम्ही तीनचार मित्रांनी नोंदविला... पण तुला माहित असेलच की अशा सूचनांची वरच्या पातळीवर कशी वाट लागते ते.
इन्द्रा
18 Oct 2010 - 12:58 pm | केशवसुमार
हे मला आवडलेले भयपट.. सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज आणी हॅनीबल बाघितल्यापासूण अँथोनी हॉपकिन्स कुठल्याही सिनेमात दिसलातरी तो अता कोणाला तरी खाणार असेच वाटते..
रिंग चित्रपटातल्या पर्श्वसंगीता मुळे जास्त मजा आली असे वाटते..
अजून एक ..आय नो वॉट यू डीड लास्ट समर..
हा खेळ सावल्यांचा मी ५ वीत असताना पाहिला होता त्यानंतर किती तरी दिवस नारळाच्या झाड दिसल की नरसूच भूत आठवायचे..
(घाबरट)केशवसुमार
17 Oct 2010 - 2:36 pm | सविता
कॅनिबल होलोकास्ट... अग्गा बाबो.....

मी तर हा पाहिला पण नाही...फक्त विकीपिडियावर माहिती वाचूनच घाबरले......
18 Oct 2010 - 11:28 am | अप्पा जोगळेकर
क्रौर्याची परिसीमा असलेले रोंग टर्न-१ आणि २ पाहिले आहेत. पहिला पार्ट तर इतका क्रूर आहे की तो चित्रपट पाहणार्या माणसाच्या मनाची संवेदनशीलताच नष्ट होते. मला हे दोन चित्रपट पाहिल्यावर कोणत्याही थराचे हिडीस दॄश्य पाहायला काहीच वाटत नाही. कारण या चित्रपटांमुळे नजरच मरुन गेली आहे. मनाची संवेदनशीलताच नष्ट करणारे असे चित्रपट कोणीही पाहू नयेत असे वाटते. माझा एक मित्र हा चित्रपट पाहताना ओकला होता. (घरी कोणी नाही म्हणून हौसेने ही सीडी घेउन आला आणि नंतर स्वतःवरच वैतागला.) चित्रपटाच्या सुरुवातीलाच फरस वापरुन एका बाईच्या दोन उभ्या चिरफाळ्या करतानाचे दॄश्य आहे.तिच्या शरीराचे दोन तुकडे होताना पोटातली आतडी बाहेर येउन जमिनीवर लोळण घेतात आणि रक्ताचे थारोळे जमिनीवर जमा होते. त्या चिरफाळ्या जमिनीवरुन फरफटत घेउन जाउन मग त्या बाईला खाल्ले जाते. भोसकाभोसकी आणि पोटातून बाहेर लोंबकळणारी आतडी, रक्ताचे थारोळे, डोळे फोडणे, नरमांस खाणे, शरीराचे अवयव कापणे या सगळ्या गोष्टींचा चित्रपटात भडिमार आहे. भाजी कापणे आणि माणूस कापणे यात दिग्दर्शकाला काहीही फरक वाटत नसावा. सगळ्यात शेवटी तर एका तान्ह्या बाळाला माणसाचे कापलेले बोट भरवतानाचे दॄश्य आहे.
'हिल हॅव आईज', 'सॉ', हॉस्टेल हीदेखील अशीच काही नावे होत. हा चित्रपट लिहिणारे, दिग्दर्शित करणारे लोक विकॄत मनोवॄत्तीचे मनोरुग्ण असणार असे मत आहे. हिंदीत असे चित्रपट नसतात हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे.
13 Jul 2016 - 1:05 pm | मारवा
हे विधान अनेक पातळींवरुन तपासण्यायोग्य आहे.
यात "बघणारे" चा समावेश केल्यास अजुन काँम्प्लीकेटेड बाब होते.
"सालो" या चित्रपटात शेवटी क्लायमॅक्स्ला कौर्याची परीसीमा गाठली जाते. चार व्हीलन/नायक जे कोणी ते
टॉर्चर सुरु करतात व एक एक जण दुर घरातुन दुर्बिणीतुन पाहतो. त्यात दिग्दर्शक पासोलीनी एक ट्रीक करतो.
पुर्ण पडदाभर एका दृश्यात फक्त दुर्बिणीचे दोन गोल दाखवतो.
तो एक प्रकारे म्हणतोय की तुम्ही म्हणजे (आपण प्रेक्षक) सुद्धा त्याच चित्रपटातील पात्राप्रमाणे सॅडिस्ट आहोत.
आपणही तो आनंद घेत आहोत.
फार प्रभावी रीतीने ते दर्शवलेले आहे. अगदी एका क्षणासाठी पण हादरवुन टाकणारा अनुभव तो देतो.
हे दिग्दर्शक प्रेक्षकाला पॅसीव्हली एंटरटेनमेंट घेऊ देत नाहीत. काही कलाकृती प्रेक्षकाला ओढुन खेळात घेतात व फरफटत नेतात जसे नो एक्झीट नाटक
मजा आहे
असो
18 Oct 2010 - 11:55 am | अप्पा जोगळेकर
'१४०८' हा एक सुंदर भयपट आहे. तात किळसवाणी दॄश्ये अजिबात नाहीत तरीदेखील अंगावर काटा येतो. एका हॉटेलात '१४०८' या नंबरची खोली भुतांनी झपाटलेली असते तिथे एक पत्रकार हट्टाने राहायला जातो आणि मग त्याची कशी भंबेरी उडत जाते याचे फार सुंदरे चित्रण आहे. सगळ्यात जास्त धमाल येत ती या प्रसंगात -
'तो लॅपटॉपवरुरुन आपल्या बायकोला (जिच्याशी त्याचे ब्।आंडण झालेले असते) चॅटवरुन सांगतो की मी अमुक एका खोलीत अडकलो आहे जी झपाटलेली आहे. तू ताबडतोब पोलिसांना कळव. ती आधी नाही म्हणते पण मग तयार होते. थोड्या वेळाने ती सांगते की पोलिस खोलीत येउन खोली तपासून गेले पन काहीच सापडले नाही.' हे कळल्यावर त्याला आणि प्रेक्षकांना जो धक्का बसतो तो अनुभवण्यासारखाच आहे.
18 Oct 2010 - 5:12 pm | मृत्युन्जय
हे सही आहे. हा बघितला पाहिजे.
18 Oct 2010 - 5:12 pm | मृत्युन्जय
हे सही आहे. हा बघितला पाहिजे.
18 Oct 2010 - 5:12 pm | मृत्युन्जय
हे सही आहे. हा बघितला पाहिजे.
18 Oct 2010 - 12:14 pm | इन्द्र्राज पवार
"......तिथे एक पत्रकार हट्टाने राहायला जातो ...."
श्री.जोगळेकरांनी ओळख करून दिलेला "१४०८" (स्टीफन किंगच्या कथेवर आधारित...) हा चित्रपट मी पाहिलेला आहे आणि खरोखरीच एक चांगला भयपट पाहिल्याचे समाधान नक्की मिळते. पण ते वर म्हणतात तसे तो पत्रकार हट्टाने त्या हॉटेलमध्ये राहायला जात नसून तो (एनस्लिन) 'भयकथा' लिहिणाराच लेखक असतो आणि ज्या ज्या गावी 'भूतानी झपाटलेले घर, इन, हॉटेल, हॉस्टेल' अशा आख्यायिकेचे ठिकाण असते तिथला अनुभव खरा की खोटा हे पाहण्याची त्याला सदैव उत्सुकता असते. बर्याच ठिकाणी त्याच्या पदरी निराशाच पडत असते, कारण अफवा/अंधश्रध्देमुळे पसरलेला गैरसमज. रूम नंबर १४०८ मात्र त्याचा घामटा काढते, हे सत्य.
इन्द्रा
13 Jul 2016 - 2:04 pm | nanaba
aapalihi vaat lagate :)
Other ch Marathi translation karayacha prayatna kelela.. pan jamala nahi neet :(
18 Oct 2010 - 1:56 pm | सुहास..
द मिस्ट
हाय टेन्शन (२००३)
18 Oct 2010 - 2:08 pm | satish kulkarni
हा पण मस्त आहे,...
18 Oct 2010 - 2:47 pm | जागु
मी भयपट तसे कमीच बघितलेत. आता त्यातला कोणता आवडला हे सांगण कठीण आहे.
18 Oct 2010 - 4:37 pm | ऋषिकेश
भयपटही (खरतर कोणतेही चित्रपट) मला खूप आवडतात.. बरेचसे वर आले आहेत. एकाची भर घालतो. नाईट श्यामलन चा "व्हिलेज" अगदी फार भितीदायक भयपट नसला तरी एक वेगळाच चित्रपट आहे. सुरवातीला भिती आणि नंतर आपल्या रहाणीमानावर विचार करायला लावणारा
18 Oct 2010 - 4:43 pm | प्राजक्ता पवार
हा माझा आवडता भयपट. पण या लेखामुळे बरेच नविन कळले.
18 Oct 2010 - 5:26 pm | utkarsh shah
The Ring मस्त आहे........
पहाच एकदा. जाम टरकते........
18 Oct 2010 - 5:30 pm | मृत्युन्जय
राम गोपाल वर्मा निर्माणित आणि तुषार कपूर, अंतरा माळी अभिनीत (??) गायब हा खचितच मी बघितलेला सर्वात भितीदायक चित्रपट आहे. या चित्रपटानंतर मी राम गोपाल वर्मा संबंधीत एकही चित्रपट पाहणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. जवळजवळ संपुर्ण वेळ मी देवाची प्रार्थना करत होतो (१० मित्रांची तिकीटं मी काढली होती आणि पैसे ते नंतर देणार होते. साधारण अर्ध्या तासात मला कळून चुकले की त्यांच्याकडुन अश्या पिक्चरचे पैसे काढणे अवघड आहे. त्यामुळे देवाचा धावा सुरु केला)
8 Jul 2016 - 10:58 pm | निओ
:))
18 Oct 2010 - 6:07 pm | सूर्य
हॉरर चित्रपट खुप बघितलेत. पण फार कमी चित्रपट खरोखरच घाबरवतात. हॉलिवूड हॉररपट म्हणजे आजकाल किळसवाणा प्रकार असतो. तरी मला आवडलेले चित्रपट म्हणजे, रिंग, ओमेन आणि द आदर्स.
- सूर्य.
19 Oct 2010 - 4:14 pm | नगरीनिरंजन
द रिंग आणी ग्रज आवडले. भयपट आहे हे आधीच माहिती असेल तर अजिबात भीती वाटत नाही. हे दोन्ही चित्रपट काहीही माहिती नसताना टीव्हीवर पाहिले त्यामुळे थोडीतरी भीती वाटली.
इव्हील डेड सारखे चित्रपट पाहून भीतीपेक्षा किळस जास्त येते.
हिंदीमध्ये रात नावाचा चित्रपट बरा होता.
8 Jul 2016 - 1:39 pm | nishapari
कर्स ऑफ चकी , डॉन ऑफ द डेड , डोन्ट बी अफ्रेड ऑफ द डार्क , हाईड अँड सिक , इंटरव्यू विथ द व्हॅम्पायर , इट , मामा , ऑक्युलस , पेट सिमेटरी , रोजमेरीज बेबी , द बाबाडुक , द कॉन्जुरीन्ग , द शाईंनिंग , द अनबॉर्न , द वुमन इन ब्लॅक .... हे काही हॉरर चित्रपट पाहिले आहेत . पण यातला कोणताच चित्रपट फारसा घाबरवू शकला नाही . हॉन्टेड या हिंदी चित्रपटातील काही प्रसंगांनी मात्र खरोखरच घाबरवलं . सगळ्यात जास्त भीती ( अनेक रात्री ) वाटली ती नारायण धारप यांची लुचाई ही कादंबरी वाचून . आजही लुचाईच्या कथानकाची आठवण जरी झाली तरी मी लगेच दुसऱ्या कुठल्यातरी विचारात मन गुंतवते नाहीतर रात्रीच्या झोपेचं खोबरं निश्चित . स्टीफन किंगची पुस्तकं वाचण्याची फार इच्छा आहे पण त्यातलं इंग्रजी झेपत नाही ... जड वाटतं .
12 Jul 2016 - 10:47 pm | अजिंक्य विश्वास
स्टीफन किंगच्या ’पेट सिमेट्री’ चे मराठीकरण केलेली कादंबरी. पेट सिमेट्री वर २ टी.व्ही. मूव्ही आले आहेत. एकदा नक्की पहा.
15 Jul 2016 - 10:34 am | nishapari
काय नाव आहे मराठी कादंबरीचं ? लेखक कोण ?
17 Jul 2016 - 10:32 am | अजिंक्य विश्वास
लुचाई- नारायण धारप
17 Jul 2016 - 12:23 pm | nishapari
लुचाईं सालेम्स लॉटचं स्वैर रूपांतर आहे ... पेट सिमेट्रीचं नाही .
19 Jul 2016 - 10:15 pm | अजिंक्य विश्वास
Sorry. My bad. Pet symmetry cha subject vegala aahe. Navane confuse zalo. But Salem's lot aani pet symmetry hya 2 books var movies aale aahet
8 Jul 2016 - 7:34 pm | सुंड्या
मंडळी आफ्टर डार्क हॉररफेस्ट मधल्या मुव्हीज पण बघा की.....मी एक दाेन बघीतल्या (ड्रेड, द ग्रेवडांसर्स, कील थेअरी इ.) पण 'लेक मुंगो' आवडला...
संपुर्ण सीरीज उतरवण्याची इच्छा अपुरी राहुन गेलेला -सुंड्या
9 Jul 2016 - 6:51 pm | बोका-ए-आझम
सायलेन्स आॅफ द लँब्ज हाही अप्रतिम. बाकी हिचकाॅकचाच बर्ड्स, थर्टीनाईन स्टेप्स, नाॅर्थ बाय नाॅर्थवेस्ट आणि व्हर्टिगो हे पण जबरदस्त आहेत. मायकेल केन आणि सर लाॅरेन्स आॅलिव्हिए यांचा स्ल्यूथ पण भारी. त्यावर आधारित कलम ३०२ हे मराठी नाटकपण अफाट होतं.
12 Jul 2016 - 10:45 pm | अजिंक्य विश्वास
स्ल्यूथ माझा ऑल टाईम फेव्हरिट मूव्ही आहे. त्याचा रिमेक पण आला होता. मायकल केन ला लॉरेन्स ऑलिव्हीए चा रोल देऊन. पण जुन्या स्ल्यूथची मजाच और आहे. त्या मूव्हीची एक खासियत आहे. तो पाहिल्याशिवाय कळणार नाही. आणि दोघांनाही ऑस्कर नॉमिनेशन होते, तेही बेस्ट अॅक्टर इन् लिडिंग रोलसाठी!
9 Jul 2016 - 7:40 pm | तिमा
जुन्या कृष्ण धवल चित्रपटांत खूप चांगले भयपट येऊन गेले. त्यातील 'द बिस्ट विथ फाइव्ह फिंगर्स' हा जरुर बघण्यासारखा आहे. टोरेंट वरुन उतरवता येतो. प्रत्यक्षांत भूत नसूनही खिळवून ठेवणारा आहे.
9 Jul 2016 - 8:04 pm | मेघनाद
चित्रपट नाही पण "अलवणी" नावाचं अनिकेत समुद्र ह्यांनी लिहिलेलं पुस्तक जरूर वाचून बघा, अतिशय मस्त भयकथा लिहिली आहे. ह्या कथेवर नक्कीच एखादा उत्तम भयपट बनू शकतो.
पुस्तक जालावर पीडीफ स्वरूपात उपलब्ध आहे, फुकटात!
9 Jul 2016 - 8:08 pm | कैलासवासी सोन्याबापु
पिच्चर तर जास्त नाही पण कथा आवडतात, गानू आज्जींची अंगाई वाचून दरवाजा झालेला आमचा! बाहेर धोधो पाऊस सुरु असताना लाईन गेलेली असताना वाचत होतो, घरा बाहेर असलेली केळीची पाने जेव्हा वाऱ्याने खिडकीच्या तावदानावर घसपटली तेव्हा जीवाच्या आकांताने केकटलो होतो
9 Jul 2016 - 8:09 pm | एक एकटा एकटाच
अनिकेत समुद्रे ह्यांची ही कथा मस्त होती.
9 Jul 2016 - 8:07 pm | एक एकटा एकटाच
कुणी काहीही म्हणा
पण रामगोपाल वर्मा चा "रात" मस्त होता.
Camera work अतिशय उत्कृष्ठ होतं.
रेवतीची acting आणि ओमपुरीची नजर .......खल्लास
9 Jul 2016 - 8:14 pm | धनंजय माने
हो, रेवती डेंजर च.
(अवांतर- रामगोपाल वर्मा ला सध्या मानसोपचाराची गरज वाटते.)
10 Jul 2016 - 3:02 am | अनिता
the ghost and darkness
11 Jul 2016 - 3:21 pm | गौतमी
हॉरर चित्रपट मी मला कितीही भिती वाटली तरी बघतेच. (अगदी डोळे बंद करुन सुद्धा)
'हा खेळ सावल्यांचा' चित्रपट मी अगदी लहान अस्ताना पाहीला होता.... दुसरी-तिसरीत असताना.. त्यामुळे जास्त काही घाबरले नाही पण नारळच्या झाडाची भिती वाटायला लागली होती नंतर खुप दिवस. त्यानंतर 'तात्या विंचु' चा चित्रपट पाहुन बाहुल्यांनी खेळायचंच सोडुन दिलं होत मी. (असं वाटायचं हा बाहुला/बाहुली पण त्याच्यासारखचं चालायला लागली तर, मला पण तसच म्हणाली तर, "माझा आत्मा तुझ्यात, आणि तुझा आत्मा बाहेर... ओम फट्ट स्वाहा.. हा"
त्यानंतर 'आहट', 'द झी हॉरर शो', मानो या ना मानो'(हिचं सुत्रसंचालन इरफान खान करायचा... इकदम खत्री होती हि मालिका पण)
अप्पा जोगळेकरांनी उल्लेख केलेले 'राँग टर्न' आणि 'हिल हॅव आईज' चा पहिला भाग पाहिलाय आणि दुसरा भाग बघायची हिम्मतच नाही झाली. ( मला ही किळस वाट्ली हे चित्रपट बघताना... २ दिवस जेवलेच नाही, इतकं भयाण आनि भकास आणि त्यापेक्शा जास्त किळसवाणं दाखवलं आहे त्यात.)
'१४०८' हा चित्रपट बघुन फारशी भिती नाही वाटली. "अलवणी" हि कथा मात्र जाम भारी आहे. अनिकेत यांच्या ब्लॉग वर वाचली आहे.
11 Jul 2016 - 7:38 pm | मराठी कथालेखक
13B (हिंदी) , डरना मना है
11 Jul 2016 - 7:39 pm | मराठी कथालेखक
एक थी डायन पण चांगला वाटलेला
12 Jul 2016 - 3:34 pm | सिरुसेरि
द स्केलेटन की , नीलकमल , अर्धांगी
12 Jul 2016 - 10:37 pm | अजिंक्य विश्वास
कोणी डेड-एन्ड हा मूव्ही पाहिला आहे का?
Dead End (2003)
Christmas Eve. On his way to his in-laws with his family, Frank Harrington decides to try a shortcut, for the first time in 20 years. It turns out to be the biggest mistake of his life.
http://www.imdb.com/title/tt0308152/?ref_=fn_al_tt_1
आणि ’द अदर्स’ ची एक गावठी कॉपी बघण्यात आली होती. मनिषा कोईराला, संजय कपूर (’हा कोण?’ म्हणून विचारू नका ), आणि हेलन. बाकी काही बोलायलाच नको.
टीम बर्टनचा ’बीटलज्यूस’ कोणी पाहिला आहे का? तो असल्या जॉनर मध्ये माहिर आहे. बाकी जॉन कारपेंटरचे भयपट पाहण्यासारखे असतात.
13 Jul 2016 - 12:57 pm | मारवा
इन्द्राज पवारांनी लिहीणं का थांबवल ?
ते दुसरीकडे कुठे सक्रीय आहेत का ?
मला त्यांचे लेखन प्रतिसाद फार आवडतात.
13 Jul 2016 - 7:14 pm | अविनाशकुलकर्णी
हॉलिवुडचे काही सिनेमे बघणे म्हणजे निखळ आनंद असतो...
हॉलिवुदचे भयपट आपण पहात असालच..साधारण साचा एकच असतो..भयानक चेहे-याची भुते..ड्राकुला..आदी अमानवी व्यक्तिरेखा.....भयाण हवेल्या त्यात नायक रहायला जाणे तिथे आधीच एक आत्मा असणे मग अशक्य घटनांची साखळी आदी..
या सर्वाना छेद देणारा एक "Midnight Cabaret" हा सिनेमा पहाण्यात आला..
एक नाटक कंपनी..त्यात एक कुमारीकेचे पात्र...तिचा वापर करुन एका "सैतान पुत्रास" जन्म देण्याचा प्ल्यान..असे साधारण कथानक आहे..नाटकातल्य घटना त्या मुलिच्या जीवनात घडु लागतात..खरे काय अन आभास काय यात तिचा उडालेला गोंधळ..असे साधारण कथानक आहे...
२ तास सिनेमा तुम्हाला खिळवुन ठेवतो...
हॉलिवुडचे काही सिनेमे बघणे म्हणजे निखळ आनंद असतो
18 Jul 2016 - 10:35 pm | एनिग्मा
अनफ्रेन्डेड,
काही दिवसानपुर्विच हा सिनेमा पाहिला. सम्पुर्न सिनेमा स्काइप वर आहे. वेगळी सन्कल्पना होती.
19 Jul 2016 - 1:10 am | स्पार्टाकस
अफलातून भितीदायक सिनेमाचा एक अनुभव म्हणजे हाऊस ऑफ वॅक्स!
या सिनेमात जो व्हिलन आहे तो जिवंत माणसांवर उकळतं मेण ओतून त्यांचे पुतळे बनवत असतो! संपूर्ण सिनेमात एकदाच त्याचा चेहरा दिसतो पण तो झोप उडवून जातो!
अवांतरः शाहरुख्/सलमान्/सैफ अली खानचा कोणताही सिनेमा (अपवादः स्वदेस आणि चक दे, ओमकारा) हे कोणत्याही भयपटाच्या तोडीसतोड नाहीत काय?
19 Jul 2016 - 9:51 am | स्नेहश्री
अहल्या...