तुमचा आवडता भयपट कोणता ?

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
16 Oct 2010 - 4:51 pm

लहान असताना जरी मनात भुता खेतांबद्दल खुप भिती होती तर भयपटांबद्दल एक आकर्षण्ही होतं.

पहिला भयपट कोणता पाहिला ते आठवत नाही पण मराठितला हा खेळ सावल्यांचा मधेल काही प्रसंग पाहुन टरकलो होतो.
येवढा की रात्री दिवे बंद असताना बाथरुम/बेडरुम मध्ये जायला पण टरकत असे.

असो तर हळु हळु भयपट पाहाण्यात मी प्रगती केली आणि चक्क पहिलाच इंग्रजी भयपट (चोरुन) पाहिला तो म्हणजे 'दी इव्हील डेड'.
बहुतेक तेव्हा ५वी ६वीत होतो. एका मित्राच्या घरी व्हिडियोवर पाहिला होता.

'दी इव्हील डेड' त्या काळी बराच गाजला होता त्यामुळे निर्मात्याने वाहात्या गंगेत हात धुतल्या प्रमाणे लगोपाठ २ नव्हे ३ नव्हे तब्बल ४ सिक्वेल काढले.
दर्जा त्या सिव्केलच्या आकड्या गणीक घसरत गेला. इतका की भाग ४ पहाताना मला चक्क हसु येत होत.

त्यानंतर अनेक भयपट पाहिले.
हिंदितला विराना पाहिला. नंतर त्या वाटे गेलो नाही.
या रामसे-बंधुंनी या भारतीय भुतांची एवढी दयनीय अवस्था करुन ठेवली की त्यांना भयपटांपेक्षा विनोदी चित्रपट म्हणण जास्त संयुक्तिक ठरेल.
रामसे-बंधुंनी घातलेल्या या पायावर सध्या कळस चढवायच कार्य त्यांचा नाम-बंधु, वर्मांचा रामु करतोय.

एकवेळ अशी आली की मी भयपट पाहाणेच सोडुन दिले.
थेटरात जाऊन चित्रपट पाहाण्याची बोंब होती. मुळात इंग्रजी चित्रपट लागणारी थेटरे पार व्हिटी आणि चर्चगेटात. एवढ्या लांब कोण जातोय मरायला.
पण मित्राच्या व्हीसीआरमुळे शालेय जीवनात बरेच इंग्रजी चित्रपट पाहिले.
४-५ रुपयात चाड्याने कॅसेट मिळायची, मग १० मित्र गोळा केले की माणशी आठ आण्यात चित्रपट पदरात पडायचा.

त्याच दरम्यान पाहिलेला दुसरे भयपट म्हणजे ग्रेगीपेगचा 'दि ओमेन'.

आणि 'दी एक्सॉर्सिस्ट'

नंतरही बरेच चित्रपट पाहिले पण उत्तरोत्तर ते भितीदायक वाटण्यापेक्षा किळसवाणेच जास्त वाटुलागले.

आपल्या लक्ष्याचा तात्यावींचु फेम झपाटलेला पाहील्या नंतर त्याची मुळप्ररणा 'चाईल्ड्स प्ले' पहाण्यात आला.

पुढे केबल मुळे बरेच इंग्रजी चित्रपट घरबसल्या पहाता येऊ लागले.

"दी ब्लेअर वीच प्रोजेक्ट"

"रोज(स)मेरीज बेबी"

अलीकडे पाहिलेला

'वन मिस् कॉल"

अणि 'शटर'

बरेच उत्तमोत्तम चित्रपट टाकायचे राहुन गेले असतील.
पण ती त्रुटी तुम्ही भरुन काढा. तुम्हाला आवडलेले भयपट कोणते?

चित्रपटमतशिफारसचौकशीमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

21 Jul 2016 - 9:18 am | चौकटराजा

पुण्यातील राहुल थिएटर ला एक्झोरसिस्ट हा सिनेमा पहायला गेलो. त्यात एक पंधरा वर्षाच्या मुलीला भूत लागते. फादर ना
बोलावणे जाते. फार " तू कोण आहेस..? असा प्रश्न भुताला करतात. मुलगी उत्तर देण्याच्या बदल्यात फादरच्या अंंगावर हिरवे
काळे ओकते तेंव्हा अंधारातून एक प्रेक्षक जोरात ओरडला " अरे आळूची भाजी रे ..... !" त्याबरोबर भय पटाला आलेले सर्व
प्रेक्षक हास्यरसात डूबून निघाले.

हॉरर स्टोरीने (२०१३) सुध्दा खिळवून ठेवले.

एव्हिल डेड १ बद्दल बोलावं तितकं कमी इतका भारी आई भयानक मूवी होता. भूत दिसणार असं वाटलं की पांघरूण ओढून घ्यावं लागतं होतं. नवीन काळात द कंजुरिंग १ पण सॉलिड भयानक आहे.
बाकी व्ही सी आर ची गोष्ट इकडे पण लागू. फक्त भयपटासाठी नाही... पण इतर सिनेमांसाठी सुद्धा.. इतर म्हणजे बालक पालक मध्ये दाखवलं आहे ना.. सेम! ;)

भयपट पेक्षा रहस्य पट चांगले वाटतात..
बाकी भयपट बघू शकतो पण मन खाली घालून...

कपिलमुनी's picture

6 Sep 2016 - 3:35 pm | कपिलमुनी

भावना'ओंको समझो ! _/\_

क्षमस्व's picture

6 Sep 2016 - 5:14 pm | क्षमस्व

मुनिवर!!!

पेट सिमेटरी - झेल्डा चा सीन . हार्ट अटॅक येता येता राहिला . :(

हर्मायनी's picture

3 Oct 2016 - 2:11 pm | हर्मायनी

काही दिवसांपूर्वी आलेला चित्रपट.. भयपट म्हणता नाही येणार पण गूढपट.. एकदम थरारक.. नक्की बघावा असा.

बाबाडूक पण चांगला चित्रपट आहे.. हॉरर पण थोडा मानसिक विश्लेषणाच्या अंगाने जाणारा
इट फॉलोज पण चांगला आहे
drag me to hell सुद्धा खुप मस्त आहे