यथा शास्त्रप्रमाणेनं...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
2 May 2016 - 10:06 pm

सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.

1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे)

(केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले. मग 'केस काढले', म्हणून पुन्हा त्याला अंघोळ घातली गेली.

वरील प्रसंगात घडलेली गोष्ट ही व्यवहारात फक्त "चुकिची-दुरुस्ती" एवहढाच अर्थ लक्षात आणून देते. पण सदर घटना ही धर्माच्या क्षेत्रात घडलेली असल्यामुळे पाहणारे , ती गोष्ट धार्मिक मनानी पाहतात, व्यावहारीक मनानी नाहि. (कारण तो धर्म आहे) थोडक्यात सदर घटना "का व कशासाठी? " म्हणून पाहिली जात नाही.

पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते.

अश्या या गोष्टी व्यवहारधर्मातून धर्मव्यवहारात घुसत ऱहातात.
हा प्रकारही तसा सामान्य आहे. याखेरीज अजून काही प्रकार घडतात, ज्यात विधींची वेळ बदल होते. आणी त्याचंही धर्मशास्त्र होतं.

2)विवाहासंस्कारातील नाम लक्ष्मीपूजन:-
वैदिक पद्धतिनी लग्नविधी झाल्यास, सदर विधी मंगलाष्टकांच्या आधी? की नंतर योग्य? असा एक वाद अगदी हल्लीही ऐकू येतो. याची पहिली तोड अशी की वधू ही लग्न होऊन सासरी माप ऒलांडून आत आली की लगेचंच हे नामलक्ष्मीपूजन करावे, असा नियम आहे. अता घरीच हा विधी करणे "सांगितलेले" असल्यावर , तो मंगलकार्यालयात करणे ही सरऴ सरळ सोय आहे. मग तो मंगलाष्टकांच्या आधी होवो अथवा नंतर! ( पाकशास्त्रात कुकरमधे डाऴ आधिच्या डब्यात लावावी ? की नंतरच्या? असा वाद पेटणार नाही. पेटला, तर त्याची तोड काय कुठे लावल्यानी कमी/अधिक शिजते? यावर निघेल. पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो! )
ज्यांना हे पटतं, किंवा अन्य कारणांनी आवश्यक वाटतं ते हा विधी आधी करतात. पण बहुसंख्य लोक हा विधी मंगलाष्टकांच्या नंतर करावा.., असेच मानणारी असतात. जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. मग हे असे एंजॉई
@यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे?

@बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का?

@कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे?

@पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे?

इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात!

सदर लेखन इथे मांडण्यामागे हेतू इतकाच की अश्या प्रसंगी सजग-कर्त्यांनी वरील गोष्टी समजून घेउन आडमुठेपणा, राजकारण इत्यादी करणाय्रांना जमेल तसे रोखावे. किंवा सवाई राजकारण करून त्यांची ताकद कमी करावी. म्हणजे अनेक ठिकाणी अनेकांची त्रासापासून सुटका होईल.

(ता. क. - ह्या प्रकारचे आणखिही गोंधळ याच धाग्यावर जमेल तसे मांडत राहीन, जेणेकरून ते माहित होतील. )

संस्कृतीधर्मसमाजविचारअनुभवमत

प्रतिक्रिया

पैसा's picture

3 May 2016 - 10:08 pm | पैसा

किस्से आवडले. धाग्याचे शंभर झाले की सत्कार करायचा ही प्रंपरा मिपावर जेपीने सुरू केली. आता त्याचा नेटपॅक संपला तर दुसरा कोणतरी करतो. काही वर्षानी सत्कार झाला नाही तर संपादक लोक धागे वाचनमात्र करतील. =))

असो. बुवा, शनीच नव्हे तर सगळे पापग्रह तुमच्या कुंडलीत जमा झालेले दिसत आहेत. =))

बुवा धर्मसुधारक पुरोहित आहे. कुंडली वगैरे त्याचे लेखी टनाटनी आहे. =))

पैसा's picture

3 May 2016 - 10:13 pm | पैसा

कुंडली तयार केली नाही तरी साडेसाती कधी चुकते काय! ;)

प्रचेतस's picture

3 May 2016 - 10:16 pm | प्रचेतस

ते खरं.
एकटा शनिदेवच काफ़ी है. बुवांनी मारुतीची उपासना केली नै वाट्टं.

पैसा's picture

3 May 2016 - 10:20 pm | पैसा

मारुती कशाला अता?

प्रचेतस's picture

3 May 2016 - 10:22 pm | प्रचेतस

तोच शनिदेवाचा कोप शांत करू शकतो ना.

सतिश गावडे's picture

3 May 2016 - 10:29 pm | सतिश गावडे

बेक्कार पंच आहे हा =))

सूड's picture

3 May 2016 - 10:42 pm | सूड

=))

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2016 - 10:45 pm | अत्रुप्त आत्मा

माझ्या मिपाकुंडलीत एक अस्वल एक हत्ती एक डुक्कर एक बोकड एक खोकड एक माकड आणी काही लांडगे , कोल्हे असे अनेक प्राणी आहेत. त्यांची मी व्यापकशांत नेहमीच करित असतो!

ल्लूल्लूल्लूल्लू

तरिही तुमच्यावर अशी वेळ यावी हेच दुर्दैव.

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2016 - 10:55 pm | अत्रुप्त आत्मा

@हेच दुर्दैव.››› असोच्च असो!
निरर्थक आत्मकुंथक.

प्रचेतस's picture

3 May 2016 - 10:58 pm | प्रचेतस

बघा बघा.
तरी मी म्हणत होतो की......

विजय पुरोहित's picture

3 May 2016 - 10:47 pm | विजय पुरोहित

अग्गाग्गा बुवा...
तुमच्या शिव्या सुद्धा गुदगुल्या करतात हो...
उल्लूल्लूल्लूल्लूल्लूल्लू.....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 May 2016 - 11:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हायला, कुंडली आहे का सर्कस?

व्यापकशांत हा शब्द विशेष आवडला.

ल्लूल्लूल्लूल्लू ल्लूल्लूल्लूल्

यशोधरा's picture

3 May 2016 - 10:59 pm | यशोधरा

१००. हुश्श!

याॅर्कर's picture

3 May 2016 - 11:03 pm | याॅर्कर

एका व्यक्तीवर एवढेजण तुटून पडत आहेत हे पाहून मज्जा आली.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 May 2016 - 11:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शतक झाल्याबद्दल बुवांना ताम्रकलश, शालजोडी, सत्यनारायण पुजा आरतीसह (पॉकेटबुक एडिशन), धोतरजोडी व टनाटनीट वाजणारे २१ नारळ देउन सत्कार करणेत येत आहे.

इदं न मम!!

(मिपाधर्मसुधारणासमिती जेपीसंचालितनाखुनटोचीतअगोबाप्रेरित नवग्रहदशापिडीत)

ताम्रकलशऐवजी टम्रेल दिलं तर?

mugdhagode's picture

10 May 2016 - 1:14 pm | mugdhagode

ताम्रकलश .... टाम्रकलश ..... टामरल ..... टमरेल

फुणा ओख

mugdhagode's picture

10 May 2016 - 1:14 pm | mugdhagode

ताम्रकलश .... टाम्रकलश ..... टामरल ..... टमरेल

फुणा ओख

सुरवंट's picture

3 May 2016 - 11:39 pm | सुरवंट

निलकांत साहेब,
बघा या धाग्यावर संपादक सदस्यांनीच अवांतर प्रतिसाद देण्याचा धडाका लावला आहे. खेळीमेळी समजू शकतो पण शंभरी करायची म्हणून काहीही टायपायचे का? त्यासाठी खफ आहेच की.

आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली.

वैभव जाधव's picture

3 May 2016 - 11:45 pm | वैभव जाधव

मी या शरम आलीला अणू मोडण देत आहे.

खटपट्या's picture

4 May 2016 - 1:30 am | खटपट्या

बुवा एकदाच येउन सर्व बॉल टोलाउन जातात वाटते...

सस्नेह's picture

4 May 2016 - 11:18 am | सस्नेह

एकदाच येऊन इतकेच नाही, तर ब्याटीच्या एकाच फटक्यात सगळे बॉल टोलवतात =))

इष्टुर फाकडा's picture

4 May 2016 - 1:53 am | इष्टुर फाकडा

आत्मू शेठ लेख पटला. भावना पोचल्या. बहुतेक प्रतिसाद विरोधी का आहेत हे कळले नाही, मिपावर हा अनुभव नवाही नाही.
बाकी मुंज वगैरे कालबाह्य आणि असबंध गोष्टी लोक मुळात करतातच का हे मला कळत नाही. हल्ली तर मुंजाची घोड्यावरून वरात काढणे, त्यासमोर नाचणे वगैरे प्रकारही होतात. हास्यास्पद आहे. लोकांकडे पैसा आहे, सत्कारणी लावावा कसा याची अक्कल नाही. अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे वगैरे मान्यच. हिंदू धर्माचा मला अभिमान आहे आणि मी नास्तिक नाही. पण मला कर्मकांडात लॉजिक दिसत नाही.

खटपट्या's picture

4 May 2016 - 2:15 am | खटपट्या

+१ सहमत...

अत्रुप्त आत्मा's picture

4 May 2016 - 7:20 am | अत्रुप्त आत्मा

@आत्मू शेठ लेख पटला. भावना पोचल्या.››› धन्यवाद.

@बहुतेक प्रतिसाद विरोधी का आहेत हे कळले नाही, मिपावर हा अनुभव नवाही नाही. ››› दू आयडी आणी डूआयडी यांचा खेळ आहे तो! ह्या धाग्याकरता मलाही सदर प्रकार धक्का देउन गेला. लोक धार्मिक गोष्टिंचं अंधानुकरण आणी राजकारण कसं करतात? एव्हढाच मुद्दा होता. बरं, कर्मकांड कालबाह्य, अनावश्यक आहेत असं मत असेल तर काहीच म्हणणं नाही. पण करायची आहेत, तर एंजॉयमेंट साठीच करतो. असं तरी म्हणावं. किंवा लोकनिंदेला भिउन करतो .. हे तरी! म्हणजे करवणारा त्या खेळाला तयार होतो. पण आपल्याकडे पुरोहितापाशी संकेतानी वा प्रत्यक्ष बोलायची पद्धतच नाहिये. (वर्तमान काळातले बरेच पुरोहित यजमानाला आवश्यक सेवा देण्याच्या प्रव्रुत्तीचे आहेत. ) बोललं गेलं तर खूप गोष्टी सोप्या होतात, असा माझा अनुभव आहे.
हा समन्वय व्हावा , असं मला/आंम्हाला वाटतं. म्हणूनच हे इथे मांडलय.

प्रचेतस's picture

4 May 2016 - 9:21 am | प्रचेतस

हे दू आयडी कोणते हो?

सतिश गावडे's picture

4 May 2016 - 9:36 am | सतिश गावडे

दू आयडी कोणते असतील ते असतील. मात्र तुम्ही का त्यांच्या कुंडलीतील पापग्रह असल्याप्रमाणे हात धुवून त्यांच्या मागे लागला आहात?

प्रचेतस's picture

4 May 2016 - 9:42 am | प्रचेतस

तो तुमचा समज आहे.

सतिश गावडे's picture

4 May 2016 - 10:03 am | सतिश गावडे

चालू दे तुमचं निरर्थक अत्मकुंथन. कुंथा अता हुंब..हुंब..हुंबक्क्क्क्क्क्क्क्क्क.

प्रचेतस's picture

4 May 2016 - 10:05 am | प्रचेतस

हे 'हुंब..हुंब..हुंबक्क्क्क्क्क्क्क्क्क' म्हणजे नेमके काय असते?

नाखु's picture

4 May 2016 - 10:40 am | नाखु

अर्रर्र... तुम्हाला अजून तीन सुवचने माहिती नाहीत. नाहीतर इतक्यात माफी न मागता ती सुवचने तोंडावर फेकून मारली असती तुम्ही. असो. तुमच्या सोयीसाठी चारही सुवचने पुन्हा लिहितो. व्यवस्थित नोट करुन ठेवा.

|| श्री तांब्याराम प्रसन्न ||
१. तो तुमचा समज आहे.
२. चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन
३. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात
४. आपणास मुद्दा कळलेला नाही

ही सुवचने (आपल्याकडे उत्तर नसले की) समोरच्याची बोलती बंद करण्यासाठी याच क्रमाने वापरावीत. अतिशय प्रभावी अशी ही सुवचने असून आम्ही त्यांचा वापर करुन खात्री केली आहे.

चौथे सुवचन हे ब्रम्हास्त्र आहे. मात्र तुम्ही ते पहिल्याच बाणावर आणि ते ही चुकीच्या पद्धतीने अभिमंत्रित केलेत त्यामुळे घोळ झाला.

गावडे सरांचा प्रीतीसाद तुमच्यासाठी जसाच्या तसा.... काडी चा बदल न करता.

चोपपेस्तेवाला नाखु

सतिश गावडे's picture

4 May 2016 - 11:11 am | सतिश गावडे

=))

अत्रुप्त आत्मा's picture

4 May 2016 - 10:34 am | अत्रुप्त आत्मा

@ कुंडलीतील पापग्रह असल्याप्रमाणेे ›››› पापग्रह नाही! छलग्रह!!!

सतिश गावडे's picture

4 May 2016 - 9:01 am | सतिश गावडे

बाकी मुंज वगैरे कालबाह्य आणि असबंध गोष्टी लोक मुळात करतातच का हे मला कळत नाही. हल्ली तर मुंजाची घोड्यावरून वरात काढणे, त्यासमोर नाचणे वगैरे प्रकारही होतात. हास्यास्पद आहे. लोकांकडे पैसा आहे, सत्कारणी लावावा कसा याची अक्कल नाही. अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे वगैरे मान्यच. हिंदू धर्माचा मला अभिमान आहे आणि मी नास्तिक नाही. पण मला कर्मकांडात लॉजिक दिसत नाही.

सहमत आहे. लोक बरेच विधी अनेक पीढयांपासून चालत आले आहेत म्हणून करतात. त्याची आजच्या काळातील आवश्यकता तपासून पाहत नाहीत. काही वेळा तुम्ही म्हणत आहात तसे हे विधी मिरवण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी केले जातात.

कुणालाही हे विधी आता कालबाह्य झाले आहेत म्हणून बंद करावेसे वाटत नाही. तुम्ही दिलेले मौजीबंधनाचे उदाहरणच घेतले तरी अशा विधींचा फोलपणा लक्षात येतो. औपचारीक शिक्षणाची सुरुवात किंवा आपले मुल शिक्षणासाठी गुरुगृही जाण्यास योग्य वयाचे झाले या वेळी करण्याचा हा विधी. आज गुरुकुल व्यवस्था राहीलीच नाही. आणि औपचारी़क शिक्षण (लहान मुलांच्या दुर्दैवाने) वयाच्या तिसर्‍या वर्षीच सुरु होते.

सूड's picture

4 May 2016 - 11:02 am | सूड

लोक बरेच विधी अनेक पीढयांपासून चालत आले आहेत म्हणून करतात. त्याची आजच्या काळातील आवश्यकता तपासून पाहत नाहीत. काही वेळा तुम्ही म्हणत आहात तसे हे विधी मिरवण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी केले जातात.

कुणालाही हे विधी आता कालबाह्य झाले आहेत म्हणून बंद करावेसे वाटत नाही. तुम्ही दिलेले मौजीबंधनाचे उदाहरणच घेतले तरी अशा विधींचा फोलपणा लक्षात येतो.

सगाकाकांशी सहमत!!

अत्मबंध गुर्जी, एक धर्मसुधारक पुरोहित म्हणून, कालबाह्य झालेला प्रकार असलेने मुंजच करु नका असे आपण कोणत्या यजमानास सांगून त्याचे मन वळवण्यात यशस्वी झाला आहात का? असल्यास आपले अनुभव वाचावयास आवडतील.

अत्रुप्त आत्मा's picture

4 May 2016 - 1:04 pm | अत्रुप्त आत्मा

चला.. .., पुन्हा एकदा तेच दळण दळू. (या धाग्याचा तो विषय नाही, हे विचारणाय्राला माहीत असूनंही! )

सूड,
@एक धर्मसुधारक पुरोहित म्हणून, कालबाह्य झालेला प्रकार असलेने मुंजच करु नका असे आपण कोणत्या यजमानास सांगून त्याचे मन वळवण्यात यशस्वी झाला आहात का?››› तुम्हाला असं नेहमीच का वाटतं की धर्मसुधारक हा धर्मउच्छेदक असतो? स्वत:चा प्रश्न जाणीवपूर्वक मुदलातच गंडवून तुम्हाला काय मिळतं?

@असल्यास अनुभव अनुभव वाचावयास आवडतील.›› आहेत .. असेही अनुभव आहेत. एक काळ असा होता की मी काही कर्मकांड योग्य व काही अयोग्य असं समजत होतो. तेंव्हा असं होत होतं. पुढे आणी आजला धरून आता झालेलं आकलन असं की सगळं काही कालबाह्य, चूक कसंही असलं तरी 'करू नका' हे सांगितलेलं मी भटजी असल्यामुळं लोक ऐकत नाहीत. दुसरं म्हणजे हे धर्मउच्छेदकाचं काम आहे. माझं नाही. कारण मी धर्मउच्छेदक नाही. याखेरीजंही मी कोणिही असलो नसलो तरी मी "काय सांगायचं? " याची योग्यायोग्यता "ऐकणाय्राला किती आकलन होणार आहे!? आणी आचरणात येणार आहे? " यावर ठरवितो.

वैभव जाधव's picture

4 May 2016 - 2:08 pm | वैभव जाधव

मुळात मुंज आताच्या काळात करावी का? ती धर्मसंगत आहे का? ती प्रथा परंपरा म्हणून करावी का? धर्म उचछेदन म्हणजे धर्म आहे पण त्याचं उखडून फेकणे असं मानलं जात असेल तर मुंज करणे म्हणजे धर्म असं मत आहे का?

धर्मसुधारक आणि धर्मउच्छेदक यातील भेद आम्हा पामरांस समजावोन सांगावा.

तर्राट जोकर's picture

4 May 2016 - 10:42 am | तर्राट जोकर

जैसे कर्म तैसे कांड घडते येथे. ;)

सतिश गावडे's picture

4 May 2016 - 11:13 am | सतिश गावडे

ज्ञानी असो की अज्ञान
गती एक आहे जाण
प्रतिसाद न चुकवी कोणी
थोर असो अथवा सान

चौकटराजा's picture

4 May 2016 - 3:54 pm | चौकटराजा

प्रेरणा -
टाळी वाजवावी
गुढी उभारावी
वाट ही चालावी
पंढरीची

काडी ही सारावी
मंडई पेटवावी
वाट ही लावावी
धाग्यामाजी

प्रचेतस's picture

4 May 2016 - 4:03 pm | प्रचेतस

काडी ही सारावी
मंडई पेटवावी
वाट ही लावावी
धाग्यामाजी

a

मार्केटयार्ड उठलं! a

तर्राट जोकर's picture

4 May 2016 - 2:17 pm | तर्राट जोकर

आत्मुबुवा, पण 'कर्मकांड म्हनजे धर्म नाही' ह्यास तुम्ही सहमत झाला व्हतात ना खफवर? मग हे धर्मसुधारक, धर्मौच्छेदक कुठून उपटलेत मधेच? भाकड गोष्टी करुच नयेत ना माणसाने, तुम्हीही आणि तुमच्या विरोधात बोलणार्‍यांनीही. लग्नाला भटजी कशाला हवा, मुळात लग्नच का हवं तेही तर एक कर्मकांडच आहे, मुलाची नाव ठेवायला बारसे कशाला...?

अत्रुप्त आत्मा's picture

4 May 2016 - 3:45 pm | अत्रुप्त आत्मा

@कर्मकांड म्हनजे धर्म नाही' ह्यास तुम्ही सहमत झाला व्हतात ना खफवर? ››› मी सहमत झालो ते ती व्यक्ती तसं मानते याला! मला स्वत:ला नैतिकता सोडून बाकी काहीच धर्म/धर्म्य वाटत नाही. पण हे माझं खाजगी मत आहे. तेच ते (एकमेवं) धर्म सुधारणेच्या वाटेवर उपयोगी पडत नाही. हा दाखला वर आलेला आहे.

तर्राट जोकर's picture

4 May 2016 - 2:18 pm | तर्राट जोकर

मेलेला माणुसही जंगलात फेकुन द्यावा.

जेपी's picture

4 May 2016 - 4:21 pm | जेपी

लेख खुपच छोटा वाटला.

प्रणवजोशी's picture

10 May 2016 - 7:18 am | प्रणवजोशी

मुळात संपुर्ण केस काढुन गोटा करायची गरज नाही मी पण केला नव्हता