मैथिली

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
19 Apr 2016 - 12:23 am

हत्ती कळपात घुसला अन अस्ताव्यस्त हत्तीणीची झोप चाळवली. उठून बसत तिनं " आवं, आज रिकामंच आलाव?" म्हणत हत्तीकडं पाहिलं.
हत्तीनं बसकन मारुन आधी बादलीभर पाणी घटाघटा पिऊन टाकलं. मग " आरारा, काय हे उन " म्हणत राहिलेलं पाणी सोंडेनं अंगावर फवारलं.

" हा, घ्या कापायला कलिंगड " शेवटचा फवारा कुल्यावर मारत हत्ती बायकोला म्हणाला. तशी हत्तीण पेटलीच.
"कसलं कलिंगड, तुमी तर रिकामंच आलाव की " मग जरा हत्तीनं डोकं खाजवलं. विचार केला. सालं आता भांडण पेटणार की काय?

तेवढ्यात झुडपात झोपलेली रानडुक्करीण जागी झाली. " काय रं हात्तीभाव, बाजारला गेला नव्हता काय आज?" राणडुक्करीण आळोखंपिळोखं देत हत्तीघराकडं येत म्हटली.

मग मात्र हत्तीला जरा बरं वाटलं. रानडुकरीणीचा त्याच्यावर लय जीव. काय बी संकट आलं की ती त्याच्या पाठीशी उभी राहायची.
"काय सांगायचं तुला डुकरीणकाकू, येवढ्या उन्हाचं बाजारला गीलतू, पण उन्हात काय चालणं हुईना गड्या, तरीबी पिशवी खच्चून भरुन बाजार आणला हुता " हत्तीनं उठून फॅनचं बटत दाबत पलंगावर पडी मारत रानडुकरीणीला म्हटलं.

"मग गीली कुठं म्हणायची पिशवी?" पिसाळलेली हत्तीणबाई आतल्या आत धुसमत हुती.

"आगं जरा दम धर, सांगतुय नव्ह त्यो, त्यझं आयकून तरी घी" रानडुकरीणीनं तंबाखूची पिशवी काढून चुना लावून मळत म्हटली.

ढेरपोट्या हत्ती पोटावरनं हात फिरवतं कायतर आठवल्यासारखा म्हटला," त्येझं काय झालं मी पिशवी घीऊन वाटंनं चालत होतू, पण तळ्याजवळ भान्याकुत्रं माझ्यावर भुकलं, मग तिथंच कुठंतर पाण्यात पडली आसंल, मी आपला जीव खात पळत आलुय हितवर"
हत्तीणबाईनं कपाळावर सोंड मारून घेतली. रानडुकरीणीला मात्र यात निराळाच वास येत हुता.
तेवढ्यात भानू कुत्रं दरवाज्यात येऊन टपाकलं. "हायतं का भाव घरात?" म्हणून उंबऱ्यातच बूड टेकवलं. भानूला बघताच हत्ती पांघरुन घीऊन झोपूनपण गेला. पार घोराय लागला.
"भान्या, कुत्तरड्या, आपल्या माणसावर भुकायला तुला लाज तर कशी वाटली न्हाय?" रानडुकरीण चवताळली.
"येहे, म्हातारे, याडबिड लागलं का काय? म्या नुसतं म्हनलं, देशी का इंग्लिश? तर ह्यानं मला पिशवीच फेकून मारली बघ "

"आस्सं ?"

" न्हायतर काय, पिऊन आलाय ह्यो गश्टेल"

तसा रानडुकरीणीनं वला फोक काढला. हत्तीणबाईन तर फुकारीच फेकून मारली. त्या दिवशी हत्तीला लय तुंबला.

दुसऱ्या दिवशी हत्ती जेव्हा सहज चक्कर मारायला म्हणून वाटंला लागला तेव्हा हळून पाठीमागणं गाढव पण आलं.
"काय वो हत्तीराव, काल लय धुतलं म्हण तुमास्नी!" गाढवानं वरची गालफाडं खिदळवत विचारलं.

" तर काय, त्या कुत्तरड्यानं घात केला वो, पण बरं की नुसतंच दारुबद्दल सांगितलं"

"म्हजी? मैथिलीबद्दल काय सांगितलंच न्हाय म्हना की " गाढवानं हासणं, खिदाळणं, उड्या हाणणं एकदमंच सुरु केलं.

"मैथिलीचं त्येला म्हायीत आसंल तर सांगल ना?" हत्तीनं उगाचच्या उगाच सोंड ताठ करत म्हटलं.

" काय सांगता, म्हजी आजपण मैथिलीकडं जायचं म्हणा की, तसा तमाशा काय रोजरोज थोडाच यीतुय? घ्या मजा मारुन " गाढवानं डोळाच हाणला.

" बाकी समदं खरंय गाढवशेट, पण आज दारु न्हाय प्यायची, नुसता खिस काढायचा, द्या हजार पाचशे उसने " हात्ती डिगीडिगी चालत निघाला. गाढव पाय झाडत खिकाळत राहिलं.

मागून भानू कुत्रं पण येत राहिलं. आज त्याच्या बियरची व्यवस्था झाली होती. झालंच तर चिकन फ्राय, मटण फ्राय अन सोबतीला फिश करी पण असणार होती.

संस्कृतीनृत्यकथामौजमजाप्रकटनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

19 Apr 2016 - 12:30 am | अभ्या..

हेहेहेहेहेहे
एक लंबर
पैल्या वाक्यापासून टॉप गिअर.
गषटल लैच नंबरी

बोका-ए-आझम's picture

19 Apr 2016 - 8:09 am | बोका-ए-आझम

हे लय भारी! एकदम गष्टेलच!

DEADPOOL's picture

19 Apr 2016 - 10:41 am | DEADPOOL

एक नं!

दत्ताभाऊ गोंदीकर's picture

19 Apr 2016 - 10:57 am | दत्ताभाऊ गोंदीकर

जव्हेरभाऊ नादच खुळा!

जेपी's picture

19 Apr 2016 - 11:17 am | जेपी

मस्तय...

उगा काहितरीच's picture

19 Apr 2016 - 11:40 am | उगा काहितरीच

कथा छान आहे. पण बिटवीन द लाईन्स काही कळलं नाही बघा. असेल तर समजावून सांगावे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Apr 2016 - 12:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्तच गोष्ट आवडली
पैजारबुवा

एस's picture

19 Apr 2016 - 12:23 pm | एस

हाहाहा!

नीलमोहर's picture

19 Apr 2016 - 12:32 pm | नीलमोहर

भारीच की !!

विजय पुरोहित's picture

19 Apr 2016 - 12:33 pm | विजय पुरोहित

:)
भारीच...

मराठी कथालेखक's picture

19 Apr 2016 - 12:43 pm | मराठी कथालेखक

:)

बाबा योगिराज's picture

19 Apr 2016 - 1:22 pm | बाबा योगिराज

आवड्यास,
भेष्ट.

काय लिहिता हो! अस्वस्थ करून सोडता!

धन्यवाद!

जव्हेरगंज's picture

19 Apr 2016 - 8:54 pm | जव्हेरगंज

खरंच काय,
खिक्क!

आनंद कांबीकर's picture

19 Apr 2016 - 11:08 pm | आनंद कांबीकर

मस्तच

पैसा's picture

19 Apr 2016 - 11:11 pm | पैसा

=))

अपरिचित मी's picture

21 Apr 2016 - 2:18 pm | अपरिचित मी

टल्ली हत्ती आवडला :)

नूतन सावंत's picture

21 Apr 2016 - 4:49 pm | नूतन सावंत

आवडली.

रातराणी's picture

22 Apr 2016 - 9:28 am | रातराणी

लोल कथा! जाम आवडली!

बरखा's picture

23 Apr 2016 - 3:58 pm | बरखा

वाचताना मजा आली. छान लिहीलय. :)