चोरून बघणे - आधुनिक पद्धत (शतशब्दकथा)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
6 Apr 2016 - 11:32 am

परवा सहज तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलेलं. नवा 'डीपी' आणि 'स्टेटस्' बघायला.

"Online" ह्या शब्दांतून जणू ती माझ्याकडे पाहतेय असंच वाटलं.... माझ्या हातापायातली शक्तीच गेली!
वाटलं, तिने पाहिल असेन का? मी तिचं प्रोफाईल बघताना. तिला मी "Typing..." असा दिसलो असेन का? बापरे! आता कस भेटणार तिला कॉलेजात?

आरारा, ओशाळून कसनुसं हसलो नि हळूच 'ब्याकचं' बटण दाबलं!

पुन्हा वाटलं, ती म्हणेल, "Typing..." तर दिसलेलं, मग काहीच कस नाही लिहीलं. मग पुन्हा हिंमत करून तिच्या प्रोफाईलात गेलो आणि लिहिल... "आज पहिल्यांदाच तुझा डिपी आणि स्टेटस बघितलय ग.... आई शप्पथ!....परत नाही बघणार."

सम्याचा काय मेसेज आलाय आत्ता! बघूया......"आव्या, तुला शितलीचा भाऊ शोधतोय! :/ "

- संदीप चांदणे

कलाकथाविनोदसाहित्यिकkathaaमौजमजाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

6 Apr 2016 - 11:35 am | आदूबाळ

लोल! शशक बरेच दिवसांनी वाचायला मिळाली.

रातराणी's picture

6 Apr 2016 - 11:40 am | रातराणी

खि खि खि :)

विजय पुरोहित's picture

6 Apr 2016 - 11:44 am | विजय पुरोहित

सुरेख हल्की फुलकी कथा...

एस's picture

6 Apr 2016 - 11:46 am | एस

हाहाहा!

मराठी कथालेखक's picture

6 Apr 2016 - 12:30 pm | मराठी कथालेखक

जर तिच्याकडे याचा नंबर आहे (आणि तशी याला खात्री आहे) , याच्याकडे तिचा नंबर आहे तर मग प्रोफाईल,डीपी बघण्याचे काय मोठे टेन्शन ?

चांदणे संदीप's picture

6 Apr 2016 - 12:38 pm | चांदणे संदीप

जर तिच्याकडे याचा नंबर आहे (आणि तशी याला खात्री आहे)

तुम्हाला खात्री आहे?

मराठी कथालेखक's picture

6 Apr 2016 - 1:25 pm | मराठी कथालेखक

पुन्हा वाटलं, ती म्हणेल, "Typing..." तर दिसलेलं

असं त्याला वाटतंय म्हणजे तिने त्याचा नंबर सेव्ह केलेला आहे असंच तो मानतोय ना ?

टवाळ कार्टा's picture

6 Apr 2016 - 1:02 pm | टवाळ कार्टा

चॅट विंडो येते आणि "Typing..." असे दिसू शकते म्हणजे फ्रेंडलिस्टात आहे...म्हणजे तिच्या संमतीने तो तिच्या फ्रेंडलिस्टात आहे
फ्रेंडलिस्टात असूनही मेसेज पाठवायचा नाही / कमेंट लिहायची नाही अथवा काही ठरावीकजणांनीच मेसेज करावा / कमेंट लिहावी अशी अपेक्षा??? मग फ्रेंडलिस्टात अ‍ॅडवले तरी कशाला???

"आज पहिल्यांदाच तुझा डिपी आणि स्टेटस बघितलय ग.... आई शप्पथ!....परत नाही बघणार."

तो = low self esteem
ती = #$%@%$#@$#@...वरचा मेसेज पाहून डायरेक्ट भावाला सांगणे म्हणजे लैच रिकामे डोके =))

चांदणे संदीप's picture

6 Apr 2016 - 1:30 pm | चांदणे संदीप

तो = low self esteem

यातच सगळ आलंय! :D

(माझा जव्हेरगंज झालाय का?)
Sandy

टवाळ कार्टा's picture

6 Apr 2016 - 1:37 pm | टवाळ कार्टा

ओ...असे अर्धवट वाचू नका

तो = low self esteem

आणि

ती = #$%@%$#@$#@...वरचा मेसेज पाहून डायरेक्ट भावाला सांगणे म्हणजे लैच रिकामे डोके =))

थोडक्यात फक्त तो नाही तर दोघेही नग आहेत

भरत्_पलुसकर's picture

6 Apr 2016 - 1:22 pm | भरत्_पलुसकर

झेपलीच नाय. डीपी बगितला म्हणून भावाला सांगितल? लईच कडू ; )

नाखु's picture

6 Apr 2016 - 2:24 pm | नाखु

दिनु गवळीशी घालून देणे.

भुताच्या भीतीने भाउच काय शीतली पासून सुटका होईल याची खात्री ! ह का ना का.

उगा काहितरीच's picture

6 Apr 2016 - 1:48 pm | उगा काहितरीच

पुढचा भाग टाका...

जव्हेरगंज's picture

6 Apr 2016 - 10:04 pm | जव्हेरगंज

परवा सहज तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलेलं. नवा 'डीपी' आणि 'स्टेटस्' बघायला.

नवा डीपी? म्हणजे जुना बघितला होतात तर !

"Online" ह्या शब्दांतून जणू ती माझ्याकडे पाहतेय असंच वाटलं.... माझ्या हातापायातली शक्तीच गेली!
वाटलं, तिने पाहिल असेन का? मी तिचं प्रोफाईल बघताना. तिला मी
"Typing..." असा दिसलो असेन का? बापरे! आता कस भेटणार तिला कॉलेजात?

कसं भेटणार? म्हणजे भेट ठरली होती तर!

आरारा, ओशाळून कसनुसं हसलो नि हळूच 'ब्याकचं' बटण दाबलं!

आर्रर्र..तिच्या...! आसं झालं का? बरं मग..

पुन्हा वाटलं, ती म्हणेल, "Typing..." तर दिसलेलं, मग काहीच कस नाही लिहीलं.

लाखमोलाचा सवाल..! घामच फुटलाय बघा आमास्नीबी !

मग पुन्हा हिंमत करून तिच्या प्रोफाईलात गेलो आणि लिहिल... "आज पहिल्यांदाच तुझा डिपी आणि स्टेटस बघितलय ग.... आई शप्पथ!....परत नाही बघणार."

"ऑ लब्बाडा.. असं चोरुन चोरुन काय बघतो? खुल्लेआम बघ ना स्टेटस माझं" अश्या गरमागरम रिप्लायच्या प्रतिक्षेत... लवकर...लवकर..

सम्याचा काय मेसेज आलाय आत्ता! बघूया..... ."आव्या, तुला शितलीचा भाऊ शोधतोय! :/ "

बोंब ! खोबऱ्याचं तेल लावावं लागणार आता..! शोधा शोधा..! घाम फुटलाय आमास्नबी..!

सिरुसेरि's picture

7 Apr 2016 - 7:54 am | सिरुसेरि

तुमची ती " बाबा , तु आपिसला जाउ नको . तुला वाघ खातो" वाली गोष्ट भारी होती .

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2016 - 8:59 am | अत्रुप्त आत्मा

छान लिहिलय