<"ऊभारू का पण डु आय्डी">

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
28 Mar 2016 - 4:20 pm

मूळ कलाकृती

संदर्भ फक्त चालीसाठी आणि गाभा हेतु: मिपावर पुन्हा पुन्हा प्रवेश करणार्या आणि मिपावर दंग्यासाठी ठरावीक आयडीने येणार्या महाभागांना हा भाग समर्पीत आहे

( हल्ली मिपावर वावर आहे ‘एक्स्पर्ट(?) टॉकर’चा! अशीच एक टॉकर येतो ‘डु आय्डी बनून’.
जुन्या आय्डीने बदल्यासाठी नवी कोरी डु आयडी सलामत! मग काय?
जुन्या आय्डीची 'फुकाची घालमेल'. नव्या डु आय्डीची 'उत्साही सुरर्सुरी.
पण, त्या जुन्या आयडीला काय बरे सांगायचे असावे? )

लढत होतो मी पूर्वी जेव्हा
सुसंवादक मिपा दारी तेव्हा

अजून याद येतात मला
रोचक आणि मधुर माळा

चर्च्या चोथ्याला बहर आला
कायमचुर्णाचा वसा पाहिला

उगी तगमग, फुका ऐट
झटके फसवे, बघ्येच कैक

काथ्याकुटांच्या शिंदळीकतून
बनलो मी लाडीक, भांडखोर

केले साजिरे अनेक धागे
चालवाट ती पुरती लागे

नियमांची ती पाचर मारुनी
संपादक ते पट्ट्यात घेई

तक्रार थैली जशी भरत जाई
रामप्रहरी मग उड्डाण होई

नवा डु आय्डी आणि जुनेच विचार
थकले मिपा मात्र नाही सुमार

धुतली माया, सुटले बोळे
पाठवणींचे मज देती शहाळे

पण मिपाला कसे हे कळत नाही?
की थकेन कसा का कधी मीही

श्वान पुच्छ घालीता नळी
बाहेर येता कधी सरळ ते होत नाही

येत राहील माझीच नवी बिडी
चल काढ, तुझीही जुनी काडी!

– शंका नडले

जिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीमुक्त कवितारोमांचकारी.सांत्वनाभयानकहास्यकवितामुक्तकविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Mar 2016 - 4:30 pm | प्रचेतस

नाखुकाका फॉर्मात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2016 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काका लै फार्मात आहेत. लिहित राहा. हयगय नका करु.
आपल्या पाबळ कट्ट्याचा वृत्तांत कधी लिहिणार तुम्ही ?

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

29 Mar 2016 - 10:38 am | प्रचेतस

बस का सर.....:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2016 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाखु काकांनी लिहिलं पाहिजे, असं विड्या काड्या सोडून. (मरा आता पुढच्या भेटीत)
आणि तुम्ही त्यांना मदत करा. असं म्हणतोय.

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

29 Mar 2016 - 10:49 am | नाखु

मस्तानीशी संबधीत असल्याने वल्लींनीच ही जबाबदारी घ्यावी ही म़्ंडळाकडून विनंती.

विज्ञान आश्रमला मात्र पुन्हा एकदा (किमान अर्ध्या दिवसासाठी) वेळ काढून जाणे आवश्यक आहे. मी सध्या जवळपास काही लेणी/दगडी चुंबक आहेत का ते शोधतोय. म्हणजे वल्ली यायला तयार होतील. धन्या शेठनी आधीच होय म्हटलय (भला मनुष्य आहे तो).

वि.का.सुचना नोंद घेण्यात आली आहे.

नाखु कट्टेवाला

प्रचेतस's picture

29 Mar 2016 - 10:51 am | प्रचेतस

नाय हो.
पेशवे इतिहासात मी शून्य आहे. प्रतिसादात मात्र तिथल्या प्राचीन मंदिराच्या अवेशेषांबाबत, तिथल्या भल्या थोरल्या स्तंभाबाबत आनी तिथल्या पुष्करिणीबद्दल लिहिन.
रा. रा. बिरुटे सरांनीच पाबळ कट्टा लिहिण्याची जबाबदारी घ्यावी असे मी त्यांना येथे आवाहन करतो.

viraj thale's picture

28 Mar 2016 - 4:35 pm | viraj thale

मी पण विचारात आहे दो आइडि च्य

अभ्या..'s picture

28 Mar 2016 - 4:42 pm | अभ्या..

अहहाहाहा. मला नाखुकाकाची कविता समजली. धॅण्टॅड्ढॅण.
आस्सल कंदीलछाप लाल धागा.
काढा बंडल. लावा बत्ती.

चेक आणि मेट's picture

28 Mar 2016 - 4:49 pm | चेक आणि मेट

if a=b........(1)

and b=c........(2)

from equation 1 and 2
a=c
we can also say that
a=b=c

अन्या दातार's picture

28 Mar 2016 - 5:09 pm | अन्या दातार

जब्बरदस्त

भिकापाटील's picture

28 Mar 2016 - 5:29 pm | भिकापाटील

तुम्हाला नाही पटत त्यांचे मुद्दे तर प्रतिवाद करा. नाय कोण बोल्लय. पण हा धागा म्हणजे एकमेकांची पाठ खाजवत बळचकर केविलवाणी धडपड वाटली.

कोणाला राग आला तर येवूद्या. पान आपण खरे बोलायला अज्जिबात घाबरत नाही.

कंजूस's picture

28 Mar 2016 - 8:36 pm | कंजूस

This is simply circles of batter fried and soaked in shugar syrup.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2016 - 8:41 pm | अत्रुप्त आत्मा

=))

मितभाषी's picture

28 Mar 2016 - 10:18 pm | मितभाषी

चांगले विडंबन हे कोणाचे लेख / बातम्या चोप्य पेस्ते करणे आणि परत अमूक अमूक ला फोन कराच हे आर्जवे नसते एवढे कळाले तरी जमलं म्हणायच.

नाखु's picture

29 Mar 2016 - 8:56 am | नाखु

आपल्याला कुणाचं चांगल्या कामाच कौतुकं करावे अशी विनंती बरीच झोंबलेली दिसतेय. तेव्हा त्या धाग्यावरची चर्चा इथे करू नका आणि तिथे चर्चेस मी नेहमी तयार आहे.फक्त त्या पुर्वी लेखाची सुरुवात किमान ४-५ वेळा वाचा आणि मग चर्चा सुरू करू.

हमाल भारवाही नाखु

यशोधरा's picture

29 Mar 2016 - 9:08 am | यशोधरा

तुम्ही बातम्या देत रहा, सकारात्मक बातम्या वाचतानाही बरे वाटते. बाकी जौद्या.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Mar 2016 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार

काठिण्य पातळी कमी केल्या मुळे जास्त डोके न खाजवता समजलेही.
आता आमची काऊ स्टॅम्प घेण्याची वेळ झाली.
पैजारबुवा,

नीलमोहर's picture

29 Mar 2016 - 10:17 am | नीलमोहर

कितीला मिळती आता पुडी ?

अभ्या..'s picture

29 Mar 2016 - 11:08 am | अभ्या..

नऊ रुपये फकस्त. दहाची नोट दिली की एक चुना डबी देतेत.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Mar 2016 - 12:18 pm | अत्रुप्त आत्मा

ओSsssssssss , धा ला झाली कि अता. काय तुम्ही ? आं!? ;)

नाखु's picture

29 Mar 2016 - 2:07 pm | नाखु

"हातो हात" उत्तर !!!
बुवा घ्या डब्बल अभ्यासाठी.

तंबाखू खाणं आणि नंतर पचापचा थुंकणं हे अतिशय गलिच्छ आणि इतरांना किळस आणणारं व्यसन आहे. काय म्हणता?

अभ्या..'s picture

29 Mar 2016 - 2:23 pm | अभ्या..

हो राव. लैच त्रास होतो.
.
.
अजिंठ्याची चित्रे रंगवणारे कारागीर चक्क शिंपल्याचा चुना वापरायचा म्हणे. तुम्हाला काय माहीतीय का हो वल्लीसेठ?

शिवाय ते कशास जाशी मथुरा कान्हा, तिथे तमाखू नाही असे काहीतरी लिव्हलेय ना?

तर्राट जोकर's picture

29 Mar 2016 - 3:27 pm | तर्राट जोकर

कृष्ण चालले वैकुंठाला| राधा विनवी पकडून बाही|| इथे तमाखू खाऊन घे रे| तिथे कन्हैया तमाखू नाही||

प्रचेतस's picture

29 Mar 2016 - 4:07 pm | प्रचेतस

ह्या वरुन

स्वयें श्री रामप्रभू पाहती
कुशलव तंबाखू चोळती||

ह्या महान विडंबनाची आठवण झाली.

टवाळ कार्टा's picture

29 Mar 2016 - 4:15 pm | टवाळ कार्टा

खिक्क...लिंक द्या की

प्रचेतस's picture

29 Mar 2016 - 4:17 pm | प्रचेतस

आठवत नै.

तर्राट जोकर's picture

29 Mar 2016 - 4:30 pm | तर्राट जोकर

धमाल आहे. आठवलं तर टाका जरुर. =))

प्रचेतस's picture

29 Mar 2016 - 4:06 pm | प्रचेतस

खी खी खी.
ते चुनकळीच्या खडकांपासून मिळणारा चुना वापरायचे बहुधा. शिंपल्यांपासूनचा कदाचित वापरतही असावेत नक्की माहीत नै पण.

अभ्या..'s picture

29 Mar 2016 - 4:36 pm | अभ्या..

अरे अजिंठ्याची चित्रे फ्रेस्को आहेत ना. मग त्याला शिंपल्याच्या चुन्याच, गेरुचे अस्तर करावे लागायचे ना आधी. मग चुन्याला काय कमी? शिवाय तेथल्या छोट्याश्या चुन्याच्या घाणीत सापडले पण आहेत शिंपले. ;)

प्रचेतस's picture

29 Mar 2016 - 4:47 pm | प्रचेतस

चुन्याचं अस्तर होतंच रे. त्याबाबत शंकाच नै. शेण, चुना, काथ्या, माती इत्यादींचं मिश्रण. पण तो चुना शिंपल्यांपासूनही बनवलेला आणत होते का ह्याविषयी जरा साशंक आहे इतकेच.
चुन्याच्या घाण्यात शिंपले सापडले हे माहित नव्हते.