Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नाखु on Mon, 03/28/2016 - 16:20
मूळ कलाकृती

संदर्भ फक्त चालीसाठी आणि गाभा हेतु: मिपावर पुन्हा पुन्हा प्रवेश करणार्या आणि मिपावर दंग्यासाठी ठरावीक आयडीने येणार्या महाभागांना हा भाग समर्पीत आहे

( हल्ली मिपावर वावर आहे ‘एक्स्पर्ट(?) टॉकर’चा! अशीच एक टॉकर येतो ‘डु आय्डी बनून’. जुन्या आय्डीने बदल्यासाठी नवी कोरी डु आयडी सलामत! मग काय? जुन्या आय्डीची 'फुकाची घालमेल'. नव्या डु आय्डीची 'उत्साही सुरर्सुरी. पण, त्या जुन्या आयडीला काय बरे सांगायचे असावे? ) लढत होतो मी पूर्वी जेव्हा सुसंवादक मिपा दारी तेव्हा अजून याद येतात मला रोचक आणि मधुर माळा चर्च्या चोथ्याला बहर आला कायमचुर्णाचा वसा पाहिला उगी तगमग, फुका ऐट झटके फसवे, बघ्येच कैक काथ्याकुटांच्या शिंदळीकतून बनलो मी लाडीक, भांडखोर केले साजिरे अनेक धागे चालवाट ती पुरती लागे नियमांची ती पाचर मारुनी संपादक ते पट्ट्यात घेई तक्रार थैली जशी भरत जाई रामप्रहरी मग उड्डाण होई नवा डु आय्डी आणि जुनेच विचार थकले मिपा मात्र नाही सुमार धुतली माया, सुटले बोळे पाठवणींचे मज देती शहाळे पण मिपाला कसे हे कळत नाही? की थकेन कसा का कधी मीही श्वान पुच्छ घालीता नळी बाहेर येता कधी सरळ ते होत नाही येत राहील माझीच नवी बिडी चल काढ, तुझीही जुनी काडी! – शंका नडले

Submitted by प्रचेतस on Mon, 03/28/2016 - 16:30

Permalink

नाखुकाका फॉर्मात.

नाखुकाका फॉर्मात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 03/29/2016 - 10:37

In reply to नाखुकाका फॉर्मात. by प्रचेतस

Permalink

हौ ना.

काका लै फार्मात आहेत. लिहित राहा. हयगय नका करु. आपल्या पाबळ कट्ट्याचा वृत्तांत कधी लिहिणार तुम्ही ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 03/29/2016 - 10:38

In reply to हौ ना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बस का सर.....:(

बस का सर.....:(
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 03/29/2016 - 10:40

In reply to बस का सर.....:( by प्रचेतस

Permalink

आवं तुम्ही म्हणजे.

नाखु काकांनी लिहिलं पाहिजे, असं विड्या काड्या सोडून. (मरा आता पुढच्या भेटीत) आणि तुम्ही त्यांना मदत करा. असं म्हणतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 03/29/2016 - 10:49

In reply to आवं तुम्ही म्हणजे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

विषय

मस्तानीशी संबधीत असल्याने वल्लींनीच ही जबाबदारी घ्यावी ही म़्ंडळाकडून विनंती. विज्ञान आश्रमला मात्र पुन्हा एकदा (किमान अर्ध्या दिवसासाठी) वेळ काढून जाणे आवश्यक आहे. मी सध्या जवळपास काही लेणी/दगडी चुंबक आहेत का ते शोधतोय. म्हणजे वल्ली यायला तयार होतील. धन्या शेठनी आधीच होय म्हटलय (भला मनुष्य आहे तो). वि.का.सुचना नोंद घेण्यात आली आहे. नाखु कट्टेवाला
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 03/29/2016 - 10:51

In reply to विषय by नाखु

Permalink

नाय हो.

नाय हो. पेशवे इतिहासात मी शून्य आहे. प्रतिसादात मात्र तिथल्या प्राचीन मंदिराच्या अवेशेषांबाबत, तिथल्या भल्या थोरल्या स्तंभाबाबत आनी तिथल्या पुष्करिणीबद्दल लिहिन. रा. रा. बिरुटे सरांनीच पाबळ कट्टा लिहिण्याची जबाबदारी घ्यावी असे मी त्यांना येथे आवाहन करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by viraj thale on Mon, 03/28/2016 - 16:35

Permalink

मी

मी पण विचारात आहे दो आइडि च्य
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 03/28/2016 - 16:42

Permalink

अहहाहाहा. मला नाखुकाकाची

अहहाहाहा. मला नाखुकाकाची कविता समजली. धॅण्टॅड्ढॅण. आस्सल कंदीलछाप लाल धागा. काढा बंडल. लावा बत्ती.
  • Log in or register to post comments

Submitted by चेक आणि मेट on Mon, 03/28/2016 - 16:49

Permalink

if a=b........(1)

if a=b........(1) and b=c........(2) from equation 1 and 2 a=c we can also say that a=b=c
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Mon, 03/28/2016 - 17:09

Permalink

जब्बरदस्त

जब्बरदस्त
  • Log in or register to post comments

Submitted by भिकापाटील on Mon, 03/28/2016 - 17:29

Permalink

खाजवून खरुज काढणे

तुम्हाला नाही पटत त्यांचे मुद्दे तर प्रतिवाद करा. नाय कोण बोल्लय. पण हा धागा म्हणजे एकमेकांची पाठ खाजवत बळचकर केविलवाणी धडपड वाटली. कोणाला राग आला तर येवूद्या. पान आपण खरे बोलायला अज्जिबात घाबरत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 03/28/2016 - 20:36

Permalink

This is simply circles of

This is simply circles of batter fried and soaked in shugar syrup.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 03/28/2016 - 20:41

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Mon, 03/28/2016 - 22:18

Permalink

काय आहे हे

चांगले विडंबन हे कोणाचे लेख / बातम्या चोप्य पेस्ते करणे आणि परत अमूक अमूक ला फोन कराच हे आर्जवे नसते एवढे कळाले तरी जमलं म्हणायच.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 03/29/2016 - 08:56

In reply to काय आहे हे by मितभाषी

Permalink

धन्यवाद

आपल्याला कुणाचं चांगल्या कामाच कौतुकं करावे अशी विनंती बरीच झोंबलेली दिसतेय. तेव्हा त्या धाग्यावरची चर्चा इथे करू नका आणि तिथे चर्चेस मी नेहमी तयार आहे.फक्त त्या पुर्वी लेखाची सुरुवात किमान ४-५ वेळा वाचा आणि मग चर्चा सुरू करू. हमाल भारवाही नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 03/29/2016 - 09:08

In reply to धन्यवाद by नाखु

Permalink

तुम्ही बातम्या देत रहा,

तुम्ही बातम्या देत रहा, सकारात्मक बातम्या वाचतानाही बरे वाटते. बाकी जौद्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 03/29/2016 - 09:55

Permalink

मस्त जमले आहे

काठिण्य पातळी कमी केल्या मुळे जास्त डोके न खाजवता समजलेही. आता आमची काऊ स्टॅम्प घेण्याची वेळ झाली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Tue, 03/29/2016 - 10:17

In reply to मस्त जमले आहे by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

वा वा..

कितीला मिळती आता पुडी ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 03/29/2016 - 11:08

In reply to वा वा.. by नीलमोहर

Permalink

नऊ रुपये फकस्त. दहाची नोट

नऊ रुपये फकस्त. दहाची नोट दिली की एक चुना डबी देतेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 03/29/2016 - 12:18

In reply to नऊ रुपये फकस्त. दहाची नोट by अभ्या..

Permalink

ओSsssssssss , धा ला झाली कि

ओSsssssssss , धा ला झाली कि अता. काय तुम्ही ? आं!? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 03/29/2016 - 14:07

In reply to ओSsssssssss , धा ला झाली कि by अत्रुप्त आत्मा

Permalink

याला म्हणतेत

"हातो हात" उत्तर !!! बुवा घ्या डब्बल अभ्यासाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 03/29/2016 - 14:14

In reply to याला म्हणतेत by नाखु

Permalink

तंबाखू खाणं आणि नंतर पचापचा

तंबाखू खाणं आणि नंतर पचापचा थुंकणं हे अतिशय गलिच्छ आणि इतरांना किळस आणणारं व्यसन आहे. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 03/29/2016 - 14:23

In reply to तंबाखू खाणं आणि नंतर पचापचा by प्रचेतस

Permalink

हो राव. लैच त्रास होतो.

हो राव. लैच त्रास होतो. . . अजिंठ्याची चित्रे रंगवणारे कारागीर चक्क शिंपल्याचा चुना वापरायचा म्हणे. तुम्हाला काय माहीतीय का हो वल्लीसेठ? शिवाय ते कशास जाशी मथुरा कान्हा, तिथे तमाखू नाही असे काहीतरी लिव्हलेय ना?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 03/29/2016 - 15:27

In reply to हो राव. लैच त्रास होतो. by अभ्या..

Permalink

कृष्ण चालले वैकुंठाला| राधा

कृष्ण चालले वैकुंठाला| राधा विनवी पकडून बाही|| इथे तमाखू खाऊन घे रे| तिथे कन्हैया तमाखू नाही||
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 03/29/2016 - 16:07

In reply to कृष्ण चालले वैकुंठाला| राधा by तर्राट जोकर

Permalink

ह्या वरुन

ह्या वरुन स्वयें श्री रामप्रभू पाहती कुशलव तंबाखू चोळती|| ह्या महान विडंबनाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 03/29/2016 - 16:15

In reply to ह्या वरुन by प्रचेतस

Permalink

खिक्क...लिंक द्या की

खिक्क...लिंक द्या की
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 03/29/2016 - 16:17

In reply to खिक्क...लिंक द्या की by टवाळ कार्टा

Permalink

आठवत नै.

आठवत नै.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 03/29/2016 - 16:30

In reply to आठवत नै. by प्रचेतस

Permalink

धमाल आहे. आठवलं तर टाका जरुर.

धमाल आहे. आठवलं तर टाका जरुर. =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 03/29/2016 - 16:06

In reply to हो राव. लैच त्रास होतो. by अभ्या..

Permalink

खी खी खी.

खी खी खी. ते चुनकळीच्या खडकांपासून मिळणारा चुना वापरायचे बहुधा. शिंपल्यांपासूनचा कदाचित वापरतही असावेत नक्की माहीत नै पण.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 03/29/2016 - 16:36

In reply to खी खी खी. by प्रचेतस

Permalink

अरे अजिंठ्याची चित्रे

अरे अजिंठ्याची चित्रे फ्रेस्को आहेत ना. मग त्याला शिंपल्याच्या चुन्याच, गेरुचे अस्तर करावे लागायचे ना आधी. मग चुन्याला काय कमी? शिवाय तेथल्या छोट्याश्या चुन्याच्या घाणीत सापडले पण आहेत शिंपले. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 03/29/2016 - 16:47

In reply to अरे अजिंठ्याची चित्रे by अभ्या..

Permalink

चुन्याचं अस्तर होतंच रे.

चुन्याचं अस्तर होतंच रे. त्याबाबत शंकाच नै. शेण, चुना, काथ्या, माती इत्यादींचं मिश्रण. पण तो चुना शिंपल्यांपासूनही बनवलेला आणत होते का ह्याविषयी जरा साशंक आहे इतकेच. चुन्याच्या घाण्यात शिंपले सापडले हे माहित नव्हते.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 8645 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com