मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 9:34 pm

स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...

हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...

१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.

२. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्‍यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे.

.

राजकारणशिक्षणविचारप्रतिक्रियाबातमी

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

27 Feb 2016 - 3:43 pm | कपिलमुनी

या भाषणामधल्या (काही ) खोट्या गोष्टी उघड होत आहेत,
ज्या स्मृती ईराणी यांनी संसदेत चुकीच्या सांगितल्या आहेत त्याला सुद्धा खोट्याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे का ?

बोलबच्चनला भुलणारी आपली जनता आहे !

त्यामुळे सदर लेख आणि भाषणाची भलामण करणारे प्रतिसाद सदर विधानाचा आदर्श वस्तुपाठ आहेत!

आरोह's picture

27 Feb 2016 - 5:07 pm | आरोह

दुर्गा महिषासुर प्रकरणावर आपले काय मत आहे

याॅर्कर's picture

27 Feb 2016 - 5:20 pm | याॅर्कर

चर्चा पुराणकथांवर न घसरलेलीच बरी असे वाटत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2016 - 5:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे मात्र खरे आहे की, अवकाशात फिरणार्‍या तरंगांना पकडण्याची आणि त्यांची उकल करण्याची ताकद असणारा (महा)मानवच, हजारो वर्षांपूर्वी झाला असा दावा असलेल्या त्या महिषासूरमर्दनाच्या प्रसंगाची, यथार्थ उकल करून त्यामागचा योग्य मतितार्थ शोधून काढून, केवळ सकल विश्वाच्या भल्यासाठी, विश्वाच्या माथावर थोपून, विश्वाचे भले करू शकेल; असा विश्वास ठेवायला हरकत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2016 - 6:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निष्कर्ष

१) स्मृती इराणींचे भाषण मुद्देसूद, पुराव्यासहित, भावनिक आणि आवेशपूर्ण होतं, भाजप मधे काही जेष्ठ नेत्यानंतर त्यांचंही नाव भाषनासाठी घेतलं पाहिजे.

२) स्मृती इराणी खोटं बोलत आहे, अपूर्ण माहितीवर बोलत आहेत. संसदेत त्याच्या विरोधात विरोधीपक्ष संसदेत हक्कभंग प्रस्ताव आणत आहेत.

३) हक्कभंग प्रस्ताव आणल्याने काही थोर गोष्ट होणार नाही.

-दिलीप बिरुटे

विवेक ठाकूर's picture

28 Feb 2016 - 7:15 pm | विवेक ठाकूर

प्रश्र आवेशपूर्ण आणि भावनिक बोलण्याचा आहे का खरं बोलण्याचा आहे याचा एकदा विचार करून पाहा .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2016 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संक्षि सेठ ! ठीक आहे मुद्दा मान्य करू विषय भावनिक नाही, त्या खोट्याही बोलल्या असतील पण बोलल्या कशा ते सांगा ना ?

-दिलीप बिरुटे

सचोटी महत्वाची का टिआरपी वाढवायला केलेली भाषणबाजी ? मग सिनेमा आणि संसद यात काय फरक राहीला?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2016 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजकारणी लोक सर्व सारखेच. मग ते कोणत्याही पक्षाचे असो आपल्याला काही पटतं काही पटतं काही पटत नाही. काही खोटार्ड़े
वाटतात आणि कारण नसतांना प्रामाणिक वाटतात. प्रामाणिक वाटलेले लोक आपल्याला कधी पुन्हा खोटार्ड़े वाटतात. आपण नागरिक म्हणून कोणाच्याही मताने वाहून जाऊ नये. विठा तुम्ही तर नैच नै.

आबेदा प्रवीणच्या गायकीवर तुम्ही धागा काढा.

-दिलीप बिरुटे

विवेक ठाकूर's picture

28 Feb 2016 - 8:53 pm | विवेक ठाकूर

आता यापुढे काय बोलणार डिबी ? सुजाण समजून घेतील आणि खोटयानां घरी बसवतील तर राजकारणात बदल घडेल . सगळेच सारखे म्हणून करा देशाचं वाटोळं असा दृष्टीकोन ठेवून कसं चालेल ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2016 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमचं माझं मत या लोकांना बदलू शकत नाही. व्यवस्थेत इराणी लोकांनी नाकारली तरी ती आपल्या समोर संसदेत असते. आपल्याला राहुल गांधी पटत नाही, आणि मोदी फेक पंतप्रधान वाटतात तरीही आपण दोघांना स्वीकारतो. बदल ना ते करतात ना बदल हे करतात आपण दगडापेक्षा वीट मऊ स्वीकारतो. आणि नेहमीच आपली फसगत होत असते आपण नागरिक खुप स्वप्नाळु असतो आणि आपल्या वाटेला असं हे सर्व येतं. कशाला आपण इतकं भावनिक व्हायचं ?

-दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम's picture

28 Feb 2016 - 9:08 pm | बोका-ए-आझम

आम्हाला इथले काही फेक आयडी पण पटत नाहीत. त्यांना चपला घालून चालू पडायला तर सांगू शकतो की नाही? पण ते परत येतात आणि आपलं नसलेलं ज्ञान झाडतात. अशांचं काय करावं?

विवेक ठाकूर's picture

28 Feb 2016 - 11:32 pm | विवेक ठाकूर

नेहमीच आपली फसगत होत असते आपण नागरिक खुप स्वप्नाळु असतो आणि आपल्या वाटेला असं हे सर्व येतं. कशाला आपण इतकं भावनिक व्हायचं ?

किमान समोर असलेल्या फॅक्ट्सवरुन आपण मत बनवू शकत नसलो तर मग शिक्षणाचा काय उपयोग? आणि या रितीनं तर परिस्थिती आणखी बिघडत जाईल.

तुम्ही फक्त साक्षर आहात, सुशिक्षित नाही.स्वाभिमानी तर त्याहून नाही!

श्रीगुरुजी's picture

28 Feb 2016 - 9:18 pm | श्रीगुरुजी

संक्षि सेठ ! ठीक आहे मुद्दा मान्य करू विषय भावनिक नाही, त्या खोट्याही बोलल्या असतील पण बोलल्या कशा ते सांगा ना ?

त्यांच्या ४९ मिनिटांच्या भाषणातील अनेक मुद्द्यांपैकी नक्की कोणते व नक्की किती मुद्दे खोटे होते या विचारणेवर अजून योग्य उत्तर आलेले नाही. संपूर्ण ४९ मिनिटांचे भाषण खोटे होते का, त्यात कणभरही खर्‍याचा अंश नव्हता का यावर काहीही उत्तर नाही. त्याऐवजी "इराणी भाषणात फेकंफाक करीत होत्या", "त्या भाषणात खोटे बोलल्या", "बाईंचं भाषण म्हणजे दामटून खोटं बोलण्याचा वस्तुपाठ आहे. " असे सरसकटीकरण केले गेले. अर्थात काही आयडींकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नव्हती.

नाखु's picture

29 Feb 2016 - 9:00 am | नाखु

सुहास म्हात्रे सर धन्यवाद.

तुमच्या धाग्याने काही आय्डी (पुनरुजीवीत प़क्षी लिहिते झाले) हे चांगले झाले. मुद्देसूद चर्चेचे दिवस सरले असे वाटताना ही काळ्या ढ्गाची सोनेरी किनार आवडली.

गंमत म्हणजे मुंबईतल्या सेना पराक्रमाविषयी कायदेशीरका धागा निघाला नाही.

प्रदीप साळुंखे's picture

29 Feb 2016 - 11:37 am | प्रदीप साळुंखे

अरे रे रे
काय कशाला कीस पाडत बसताय एवढा सगळेजण तुम्ही.
नेते सुखात अन् समर्थक दुखात

विवेक ठाकूर's picture

29 Feb 2016 - 12:50 pm | विवेक ठाकूर

महाराष्ट्र टाइम्सचा हा आजचा अग्रलेख वाचनीय आहे. तो बाईंच्या भाषणामागच्या विदारक वस्तुस्थितीचं यथार्थ वर्णन करतो.

सदर लेख मिपावरच्या माथेफिरुंच्या आकलनाच्या आवाक्या बाहेर आहे, पण सुज्ञ आणि विचार करु शकणार्‍यांना परिस्थिती नक्की काय आहे याची निश्चित कल्पना येईल.

चेक आणि मेट's picture

29 Feb 2016 - 2:56 pm | चेक आणि मेट

सदर लेख मिपावरच्या माथेफिरुंच्या आकलनाच्या आवाक्या बाहेर आहे,

काय सांगता हा लेख तुमच्या आवाक्याबाहेर आहे?
मला पटत नाही ब्वा!

पण सुज्ञ आणि विचार करु शकणार्‍यांना परिस्थिती नक्की काय आहे याची निश्चित कल्पना येईल.

प्रस्थापितांविरूद्ध लिहण्याची वर्तपानपत्रांची जुनीच खोड आहे ती!
मग प्रस्थापित कोणीही असू दे काँग्रेस किंवा भाजप,त्यांना काही फरक पडत नाही,त्यांना त्यांच्या पेप्राचा खप महत्वाचा.
सूज्ञ आणि विचार करणारे फार कमी आहेत हो!!
नाहितर परत काँग्रेसच निवडून आली असती.
काय म्हणता?

बोलबच्चनांच्या भूलथापांना जनता बळी पडते

अगदी खरं आहे,काँग्रेसच्या 50 वर्षाच्या राजवटीतही जनता कायम भूलथापांना बळी पडत होती.
काय करणार ना?सूज्ञ आणि विचारी लोकांची कमतरता दुसरं काय?

मार्मिक गोडसे's picture

29 Feb 2016 - 6:34 pm | मार्मिक गोडसे

अगदी खरं आहे,काँग्रेसच्या 50 वर्षाच्या राजवटीतही जनता कायम भूलथापांना बळी पडत होती.
काय करणार ना?सूज्ञ आणि विचारी लोकांची कमतरता दुसरं काय?

'इंडीया शायनींग' सारख्या भुलथापांना जनता बळी पडली नाही. 'मौनीबाबांनी' कुठलीही बोलबच्चनगीरी केली नसतानाही सलग दोन टर्म सरकार चालवले. देशाचे नागरीक चांगलेच सुज्ञ आणी विचारी आहेत. असे बोलून तुम्ही त्यांचा अपमान करीत आहात.

चेक आणि मेट's picture

29 Feb 2016 - 8:36 pm | चेक आणि मेट

'इंडीया शायनींग' सारख्या भुलथापांना जनता बळी पडली नाही. 'मौनीबाबांनी' कुठलीही बोलबच्चनगीरी केली नसतानाही सलग दोन टर्म सरकार चालवले.

हेच तर मला म्हणायचे आहे,
जनता निवळ्ळ बोलबच्चनगिरी आणि भूलथापांना बळी पडते,असे विठा म्हणत होते,त्यावर उपरोधिक प्रतिसाद आहे तो माझा.

बोका-ए-आझम's picture

29 Feb 2016 - 9:03 pm | बोका-ए-आझम

की सोनियाजींनी त्यांना बळीचा बकरा म्हणून पुढे करुन राहुल गांधींसाठी पार्श्वभूमी तयार करायचं काम केलं? राहुल गांधी हे फक्त एक खासदार होते, मंत्री नव्हते. पण त्यांनी भ्रष्टाचारविरोधी कायद्याला, जो त्यांच्याच पक्षाने मांडला होता, त्यावर तीव्र नापसंती दाखवल्यावर लगेच डाॅ.मनमोहन सिंग यांनी थ्परतेने तो कायदा बदलला. त्यावर सोनिया गांधींनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. सरकारला कायद्याचा मसुदा बदलावा लागला. दुस-या एखाद्या खासदाराने असं केलं असतं तर बदलला असता का? याचा अर्थ उघड आहे. सोनिया गांधी या अनभिषिक्त पंतप्रधान होत्या, त्या पदाच्या कुठल्याही जबाबदारीशिवाय. नरेगाचं पूर्ण श्रेय प्रसारमाध्यमांनी सोनिया गांधींना मिळालं, ती योजना संकल्पनास्वरुपात आणणा-या जीन ड्रेझ यांना नाही. ती मसुदास्वरुपात मांडणाऱ्या मनमोहन सिंगनाही नाही. अशी वागणूक पक्षातूनच मिळाल्यामुळे दयानिधी मारन आणि ए.राजा यांच्यासारखे मित्रपक्षांचे मंत्री शिरजोर झाले. डाव्या पक्षांचा जेव्हा पाठिंबा होता तेव्हा त्यांच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष बिमन बोस यांनी अत्यंत उद्दामपणे पंतप्रधानांना - Mind your own business असं म्हटलं होतं. पंतप्रधानांच्या मर्जीतल्या माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंग यांनाही कुठल्यातरी अमेरिकन अहवालात आलेल्या नुसत्या एका संशयावरून राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आलं.
असे अनेक प्रसंग आहेत. आणि तुम्ही म्हणताय मनमोहन सिंग सरकारने दोन टर्म्स देश चालवला? डाॅ.मनमोहन सिंगनी देश चालवला असता तर फार वेगळी आणि चांगली परिस्थिती असती. जो माणूस पी.व्ही. नरसिंह रावांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं असताना पूर्ण देशाचा चेहरामोहरा बदलू शकला, त्याने स्वतः पंतप्रधान असताना किती जबरदस्त कामगिरी करायला हवी होती? पण तसं घडलं नाही आणि त्याचं कारण उघड आहे - the Super PM called Sonia Gandhi आणि कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार नसणारे राहुल गांधी. त्यांचा अपमान यांनी केला. बाकी कोणी काय अपमान करेल?

श्रीगुरुजी's picture

29 Feb 2016 - 9:07 pm | श्रीगुरुजी

'मौनीबाबांनी' कुठलीही बोलबच्चनगीरी केली नसतानाही सलग दोन टर्म सरकार चालवले.

'मौनीबाबांनी' चालवले का सुपर पीएम ने चालविले?

तर्राट जोकर's picture

29 Feb 2016 - 9:23 pm | तर्राट जोकर

हे सरकार कोण चालवतंय?

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2016 - 11:16 am | श्रीगुरुजी

काय हा प्रश्न!

मार्मिक गोडसे's picture

1 Mar 2016 - 10:31 am | मार्मिक गोडसे

'मौनीबाबांनी' चालवले का सुपर पीएम ने चालविले?

प्रत्येक राजकीय पक्षाची आपली आपली कार्यपद्धत असते. लोकशाहीपद्धतीने निवडून आलेल्या सरकारच्या पंतप्रधानाने देशाच्या हितासाठी आपल्या पक्षातील प्रतिनीधींना बरोबर घेवून निर्णय घेतले तर त्यात आक्षेपार्ह काय आहे? एकाधिकारशाही लोकशाहीला मारक असते हे जनतेने दाखवून दिलेले आहे.

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2016 - 11:18 am | श्रीगुरुजी

लोकशाहीपद्धतीने निवडून आलेल्या सरकारच्या पंतप्रधानाने देशाच्या हितासाठी आपल्या पक्षातील प्रतिनीधींना बरोबर घेवून निर्णय घेतले तर त्यात आक्षेपार्ह काय आहे?

::) इथेच विरोधाभास आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Feb 2016 - 2:07 pm | श्रीगुरुजी

अगदीच वरवर लिहिलेला आणि उथळ स्वरूपाचा लेख आहे. "बिहारमधील पराभव, केंद्र सरकारचे अनेक पातळ्यांवरील अपयश, रोहीत वेमुला आत्महत्या प्रकरण, गिरगाव चौपाटीवरील आगीत खाक झालेली 'मेक इन इंडिया'ची प्रतिष्ठा यामुळे नैराश्याच्या गर्तेत ढकलल्या गेलेल्या नरेंद्र मोदीभक्तांना जेएनयूमधील कथित राष्ट्रदोही घोषणांमुळे उर्जा मिळाली" हे वाक्य अगदीच हास्यास्पद आहे. इराणींच्या भाषणातील तथाकथित असत्य कथनाचे कोणतेही ठोस उदाहरण न देता "भाषणात सत्याचा अभाव होता" असा सरसकटीकरण करणारा अत्यंत उथळ आणि असत्य निष्कर्ष या वृत्तपत्राला शोभणारा नाही. ""Smriti Irani, this is not a serial, this is real life. Bring out the facts, don't fabricate them," हे रोहीत वेमुलाच्या आईचे वाक्य पढविल्यासारखे वाटते. त्याच्या आईने दिल्लीत येऊन अशी पढिक प्रतिक्रिया देणे, केजरीवाल, सोनिया गांधींची भेट घेणे इ. घटनांवरून रोहीत वेमुलाच्या आत्महत्येचा कसा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि कोण यामागे आहेत ते दृग्गोचर होते.

आणि यांनी तर मिपावरील सदस्यांची (१) माथेफिरू किंवा (२) सुज्ञ व विचार करू शकणारे अशी थेट दोन भागात विभागणीच करून टाकली आहे. एकतर तुम्ही माथेफिरू तरी आहात किंवा सुज्ञ व विचार करू शकणारे तरी आहात. यापलिकडे तिसरा पर्याय नाही. असला उथळ आणि वरवर काहीतरी लिहिलेला लेख ज्यांना पटतो ते सुज्ञ व विचार करू शकणारे आणि उर्वरीत माथेफिरू ही व्याख्या छान आहे. या व्याख्येप्रमाणे मी व इतर बरेचजण माथेफिरू ठरतात आणि हे सुज्ञ व विचार करू शकणारे ठरतात असे दिसते.

नाव आडनाव's picture

29 Feb 2016 - 3:51 pm | नाव आडनाव

हे रोहीत वेमुलाच्या आईचे वाक्य पढविल्यासारखे वाटते.
तुमचे अझंप्शन भारी असतात...

तर्राट जोकर's picture

29 Feb 2016 - 4:08 pm | तर्राट जोकर

तुमचे अझंप्शन भारी असतात...

>>> गलत गलत गलत. वो अझंप्शन नही माय लॉर्ड, खालिस सच है. बस सच.

श्रीगुरुजी's picture

29 Feb 2016 - 8:41 pm | श्रीगुरुजी

मी ते वाक्य पढविल्यासारखे वाटते असे म्हटले आहे. पढविले आहे असे लिहिलेले नाही. रोहीत वेमुलाच्या कुटुंबाची एकूण पार्श्वभूमी पाहिली तर दिल्लीत येऊन त्याच्या आईने असे वाक्य म्हणणे हे नक्कीच शंकास्पद वाटते.

200

बाकी चलु द्या वाचतोय..

लेखनावर फोकस होतो असा लौकिक असलेल्या संकेतस्थळावर व्यक्तीगतपणाची मर्यादा लांछनास्पदपणे ओलांडली गेली आहे. पोस्ट मान्यवरांची असल्यानं त्यावर संपादकीय हस्तक्षेप न होणं स्वाभाविक असलं तरी स्वतःच्या पिताश्रींचं संकेतस्थळ असल्याप्रमाणे, पटत नसेल तर निघा असं कुणीही म्हणतो आणि ती मतस्वातंत्र्याची गळचेपी आहे याचं किमान भानही ठेवत नाही.

प्रतिवादात दिलेला पुराव्यासाठी सदस्याची संबंधित व्यक्तींशी ओळख असणं गरजेचं नाही इतकी किमान समज नसलेल्या सदस्यानं, स्वतःचे संस्कार इतक्या प्रच्छन्न आणि बेदिक्कतपणे दाखवण्याची घटना, संकेतस्थळावर एकाच राजकीय पक्षाची भलामण केली जावी असा संकेत देते की काय अशी परिस्थिती आहे. ज्याप्रमाणे देशात, पटत नसेल तर देश सोडा अशी भाषा कोणताही तद्दन करतो त्याचंच हे प्रतिबिंब दिसतं.

एनी वे, महाराष्ट्र टाइम्सच्या अग्रलेखातून प्रतिवादात व्यक्त केलेले विचार लाखो लोकापर्यंत पोहोचले आहेत याचा अर्थ किमान कुठे तरी दडपशाहीला शह देण्याचा प्रयत्न होतोयं. सत्ताधारी पक्षाविरोधात कुणीही कितीही सबळ पुराव्यानिशी बोललं तरी ` हातभर भाषणात वितभर खोटं बोलल्यानं काय होतं? इतका निर्लज्ज प्रश्न विचरला जातो आणि पुन्हा सत्तधारी पक्षाची तळी उचलली जाते. अर्थात, असं करतांना खोटं हे फक्त फॅक्ट्सवर बेतलेलं असतं, भाषणात व्यक्त केलेल्या भारंभार विचारांवर दोन्ही कडून बोलता येईल, इतका सामान्य विचार सुद्धा केला जात नाही.

प्रकाशित होणार्‍या प्रत्येक राजकीय लेखावर अशीच परिस्थिती आहे, चालू आहे ते कोणताही विधीनिषेध न बाळगता दामटून रेटणं हा प्रघात झाला आहे. देशात चाललेल्या दडपशाहीला प्रोत्साहन देण्याचं काम इथले काही सदस्य नेटानं चालवतायंत आणि उघड दिसणार्‍या घटनांना वेगळंच वळण देऊन, वेळ पडली तर सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडून स्वतःचा एक कलमी अजेंडा राबवतायंत असं चित्र आहे.

नाव आडनाव's picture

1 Mar 2016 - 11:05 am | नाव आडनाव

सर, १०० % सहमत.

तर्राट जोकर's picture

1 Mar 2016 - 11:10 am | तर्राट जोकर

मनातलं बोल्लात! हॅट्सऑफ.. __/\__

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2016 - 11:22 am | श्रीगुरुजी

महाराष्ट्र टाइम्सच्या अग्रलेखातून प्रतिवादात व्यक्त केलेले विचार लाखो लोकापर्यंत पोहोचले आहेत

असतील. मग? लाखो लोकापर्यंत पोहोचले म्हणून ते उथळ आणि पूर्वग्रहदूषित विचार सत्य असतात का?

याचा अर्थ किमान कुठे तरी दडपशाहीला शह देण्याचा प्रयत्न होतोयं.

हहपुवा

सत्ताधारी पक्षाविरोधात कुणीही कितीही सबळ पुराव्यानिशी बोललं तरी ` हातभर भाषणात वितभर खोटं बोलल्यानं काय होतं? इतका निर्लज्ज प्रश्न विचरला जातो आणि पुन्हा सत्तधारी पक्षाची तळी उचलली जाते. अर्थात, असं करतांना खोटं हे फक्त फॅक्ट्सवर बेतलेलं असतं, भाषणात व्यक्त केलेल्या भारंभार विचारांवर दोन्ही कडून बोलता येईल, इतका सामान्य विचार सुद्धा केला जात नाही.

सबळ पुरावे? कोठे आहेत ते? आणि खोटं हे फक्त फॅक्ट्सवर बेतलेलं असतं हे शब्द तर प्रचंड विरोधाभासी आहेत.

प्रतिसादात मी दिलेले पुरावे हे मत नसून फॅक्ट्स आहेत आणि तुम्ही काय किंवा सत्ताधारी काय कुणीही ते नामंजूर केलेले नाहीत. तुमच्या विचारसरणीचं तर त्याहून नवल आहे कारण तुम्ही म्हणता `इतक्या मोठ्या भाषणात इतकंच खोटं? कारण तिथे तुम्हाला बोलायची संधीच नाही !

लाखो लोकापर्यंत पोहोचले म्हणून ते उथळ आणि पूर्वग्रहदूषित विचार सत्य असतात का?

तुमचे विचार संपूर्ण एकांगी आहेत हे इथला कुणीही सदस्यच काय, तुम्ही स्वतःचं लिखाण शांतपणे वाचलं तरी कळेल. आणि एकांगी विचार हे पूर्वग्रहिताचं दुसरं नांव आहे. अर्थात, संकेतस्थळापेक्षा वर्तमानपत्रातून कैक पटीनं मोठं काम होतं त्यामुळे चिंता नाही.

याचा अर्थ किमान कुठे तरी दडपशाहीला शह देण्याचा प्रयत्न होतोयं...हहपुवा

दडपशाही चालू आहे याकडे डोळेझाक करुन आपलं म्हणणं रेटत जाणं हे खरं तर हास्यास्पद आहे. पण वेळ निघून गेल्याशिवाय ते लक्षात येणार नाही असं दिसतंय.

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2016 - 12:47 pm | श्रीगुरुजी

प्रतिसादात मी दिलेले पुरावे हे मत नसून फॅक्ट्स आहेत आणि तुम्ही काय किंवा सत्ताधारी काय कुणीही ते नामंजूर केलेले नाहीत.

वा! आता तुम्ही जे जे म्हणता ते ते फॅक्ट्स झाले तर.

तुमच्या विचारसरणीचं तर त्याहून नवल आहे कारण तुम्ही म्हणता `इतक्या मोठ्या भाषणात इतकंच खोटं? कारण तिथे तुम्हाला बोलायची संधीच नाही !

संपूर्ण भाषणात सत्याचा अभाव होता हे मटामधील वाक्य, तशाच अर्थाचे तुमचे आधीच्या प्रतिसादातील वाक्य असे जे सरसकटीकरण केले त्यांनीच वरील वाक्य लिहावे हा दैवदुर्विलास!

तुमचे विचार संपूर्ण एकांगी आहेत हे इथला कुणीही सदस्यच काय, तुम्ही स्वतःचं लिखाण शांतपणे वाचलं तरी कळेल. आणि एकांगी विचार हे पूर्वग्रहिताचं दुसरं नांव आहे. अर्थात, संकेतस्थळापेक्षा वर्तमानपत्रातून कैक पटीनं मोठं काम होतं त्यामुळे चिंता नाही.

हा संपूर्ण परिच्छेद तुम्हालाचा लागू होतो. मला नाही.

दडपशाही चालू आहे याकडे डोळेझाक करुन आपलं म्हणणं रेटत जाणं हे खरं तर हास्यास्पद आहे. पण वेळ निघून गेल्याशिवाय ते लक्षात येणार नाही असं दिसतंय.

मोदी सरकारने आपला पुख्खा बंद केल्याने ढोंग्यांनी काही महिन्यांपूर्वी "असहिष्णुता", "दडपशाही" अशी कोल्हेकुई करून पुरस्कार परतीचे नाटक केले होते ते आठवत असेलच.

मोदीद्वेष, भाजपद्वेष, संघद्वेष इ. मुळे सत्य काय आहे याकडे डोळेझाक करुन आपलं म्हणणं रेटत जाणं हे खरं तर हास्यास्पद आहे.

विवेक ठाकूर's picture

1 Mar 2016 - 3:31 pm | विवेक ठाकूर

वा! आता तुम्ही जे जे म्हणता ते ते फॅक्ट्स झाले तर.

माझा आरोप रोहित वेमुल्लाच्या आत्महत्ये संदर्भात बाईंनी केलेल्या विपर्यासाला आहे. त्याबाबतीत दिलेला पुरावा ही फॅक्ट आहे. आणि सरकार ती नामंजूर करु शकलेलं नाही. तुम्ही कदाचित माझा पहिला प्रतिसाद न वाचताच चालू केलं आहे. त्यामुळे मी फक्त फॅक्ट्सवर बोलतो आहे आणि तुम्ही विपर्यास करतायं.

संपूर्ण भाषणात सत्याचा अभाव होता हे मटामधील वाक्य, तशाच अर्थाचे तुमचे आधीच्या प्रतिसादातील वाक्य असे जे सरसकटीकरण केले त्यांनीच वरील वाक्य लिहावे हा दैवदुर्विलास!

खरा दैवदुर्विलास हा की तुम्ही काय की लेखक काय, इतक्या उघड खोट्या गोष्टीला किरकोळ समजून परत वर `बाकीच्या भाषणातला आवेग पाहा' म्हणतायं. आणि तुम्ही तर त्याही पुढे जाऊन, हक्कभंगाला केराची टोपली दाखवली जाते म्हणालायं ! म्हणजे खोट्याची ना खंत ना खेद परत वर ही मग्रुरी !

हा संपूर्ण परिच्छेद तुम्हालाचा लागू होतो. मला नाही.

आता तुमचा प्रतिसाद पुन्हा वाचा, म्हणजे कशाचाही विधिनिषेध न बाळगता मुद्दा रेटत राहण्यानं, तो परिच्छेद कुणाला लागू होतो ते कळेल.

मोदी सरकारने आपला पुख्खा बंद केल्याने ढोंग्यांनी काही महिन्यांपूर्वी "असहिष्णुता", "दडपशाही" अशी कोल्हेकुई करून पुरस्कार परतीचे नाटक केले होते ते आठवत असेलच.

पुरस्काराचा इथे संबंध काय? कुठलीही गोष्ट कुठेही जोडतायं ! मुद्दा लक्षात घ्या. देशभक्ती ही भाजपची प्रायवेट अफेअर नाही, इथल्या प्रत्येक सुजाण नागरिकाला देशप्रेम आहे. त्यामुळे कोर्टाच्या आवारात आणि पोलीस पाहार्‍यात, एखाद्याला मारहाण करणं हे मारणार्‍यांच्या देशभक्तीचं प्रतिक अशी धारणा करुन सत्तेबद्दल दहशत निर्माण करणं मूर्खपणा ठरतो. कारण ते सामान्यांचा व्यवस्थेवरचा आणि सरकारच्या नि:पक्षपातीपणावरचा विश्वास उडवतं. आणि इथंही नेमकं त्याचच प्रतिबिंब दिसतंय हा प्रश्न आहे. त्यावर लगेच, नसेल पटत तर निघा म्हणणं म्हणजे, जर समजत असेल तर, ... पुन्हा तिच चूक होते आहे.

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2016 - 10:29 pm | श्रीगुरुजी

माझा आरोप रोहित वेमुल्लाच्या आत्महत्ये संदर्भात बाईंनी केलेल्या विपर्यासाला आहे. त्याबाबतीत दिलेला पुरावा ही फॅक्ट आहे. आणि सरकार ती नामंजूर करु शकलेलं नाही. तुम्ही कदाचित माझा पहिला प्रतिसाद न वाचताच चालू केलं आहे. त्यामुळे मी फक्त फॅक्ट्सवर बोलतो आहे आणि तुम्ही विपर्यास करतायं.

स्मृती इराणींनी काहीही विपर्यास केलेला नाही. रोहीत वेमुलाच्या आत्महत्येचा फायदा घेऊन विरोधी पक्षांचे कसे किळसवाणे राजकारण सुरू आहे ते त्यांनी लोकसभेत सप्रमाण दाखवून दिले आहे. परंतु नावडतीचे मीठ अळणी असल्याने तुम्हाला त्यांचे प्रत्येक वाक्य खटकत आहे.

खरा दैवदुर्विलास हा की तुम्ही काय की लेखक काय, इतक्या उघड खोट्या गोष्टीला किरकोळ समजून परत वर `बाकीच्या भाषणातला आवेग पाहा' म्हणतायं. आणि तुम्ही तर त्याही पुढे जाऊन, हक्कभंगाला केराची टोपली दाखवली जाते म्हणालायं ! म्हणजे खोट्याची ना खंत ना खेद परत वर ही मग्रुरी !

समजा ही गोष्ट खोटी असेल (तुमच्या समाधानासाठी तसं एक क्षणभर गृहीत धरू या),तरी मूळ घटनेच्या तुलनेत तिथे डॉक्टर किती वाजता पोहोचले, पोलिस किती वाजता पोहोचले इ. वेळापत्रक हे अत्यंत बिनमहत्त्वाचे आहे. मुळात रोहीत वेमुलाच्या मृत्युनंतर डॉक्टर तिथे २-३ तासांनी पोहोचले का १२ तासांनी हा मुद्दाच महत्त्वाचा नाही कारण त्याचा मृत्यु खूप आधी झालेला होता.

आणि हक्कभंगाबाबत कसली आली आहे मग्रुरी? संसदेचे, विधिमंडळाचे कामकाज कसे चालते हे इतक्या वर्षात समजले नाही का? प्रत्येक अधिवेशनात हक्कभंग, हक्कभंग असा आरडाओरडा विरोधी पक्षांकडून होतो आणि नंतर सर्व काही शांत होते. आजवर असे अनेक हक्कभंग प्रस्ताव आले आणि कचर्‍याच्या टोपलीचे धनी झाले. या प्रस्तावाचेही तेच होणार आहे. आणि हे सांगितले तर ही म्हणे मग्रूरी!

आता तुमचा प्रतिसाद पुन्हा वाचा, म्हणजे कशाचाही विधिनिषेध न बाळगता मुद्दा रेटत राहण्यानं, तो परिच्छेद कुणाला लागू होतो ते कळेल.

मुद्दे तुम्हीच रेटत आहात. मी फक्त त्यातील चुकीच्या गोष्टी खोडत आहे.

पुरस्काराचा इथे संबंध काय? कुठलीही गोष्ट कुठेही जोडतायं ! मुद्दा लक्षात घ्या. देशभक्ती ही भाजपची प्रायवेट अफेअर नाही, इथल्या प्रत्येक सुजाण नागरिकाला देशप्रेम आहे. त्यामुळे कोर्टाच्या आवारात आणि पोलीस पाहार्‍यात, एखाद्याला मारहाण करणं हे मारणार्‍यांच्या देशभक्तीचं प्रतिक अशी धारणा करुन सत्तेबद्दल दहशत निर्माण करणं मूर्खपणा ठरतो. कारण ते सामान्यांचा व्यवस्थेवरचा आणि सरकारच्या नि:पक्षपातीपणावरचा विश्वास उडवतं. आणि इथंही नेमकं त्याचच प्रतिबिंब दिसतंय हा प्रश्न आहे. त्यावर लगेच, नसेल पटत तर निघा म्हणणं म्हणजे, जर समजत असेल तर, ... पुन्हा तिच चूक होते आहे.

आधीच्या प्रतिसादात तुम्हीच दडपशाहीचा मुद्दा आणलात. म्हणून मला त्यातील फोलपणा दाखवून द्यावा लागला. त्यासाठी हे ढोंग्यांच्या पुरस्कार परतीच्या नौटंकीचे उदाहरण चपखल होते म्हणून दिले.

देशभक्ती हे भाजपची नाही हे मान्य आहे. परंतु देशद्रोह ही मात्र काही ठराविक पक्षांचीच मक्तेदारी आहे हे नक्की.

तर्राट जोकर's picture

1 Mar 2016 - 11:07 pm | तर्राट जोकर

देशद्रोह ही मात्र काही ठराविक पक्षांचीच मक्तेदारी आहे हे नक्की
>> सिद्ध करा अथवा विधान मागे घ्या.

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Mar 2016 - 10:55 am | श्री गावसेना प्रमुख

तुम्ही सत्ताधाऱ्यांवर इतके आरोप केले ते सिद्ध केले कि केजरीवाल सारखे आरोपीने स्वताच निर्दोषत्व स्वताच सिद्ध केले पाहिजे ह्या वृत्तीने पळ काढला

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 11:01 am | तर्राट जोकर

का बोल रहे हो भैय्या? कछु समझ ना आत रही. थोडा विस्तारसे कथन करें.

रोहीत वेमुलाच्या आत्महत्येचा फायदा घेऊन विरोधी पक्षांचे कसे किळसवाणे राजकारण सुरू आहे ते त्यांनी लोकसभेत सप्रमाण दाखवून दिले आहे.

हाइट! इथे विरोधकांचा काय संबंध? विरोधक राजकारण करतायंत हे खोटं विधान बाईंनी केलंय आणि त्यांच्या वक्तव्यातली विसंगती आता अंगाशी आलीये. तुम्ही माझा पहिला प्रतिसाद वाचलेलाच नाही हे आता नक्की झालं.

समजा ही गोष्ट खोटी असेल (तुमच्या समाधानासाठी तसं एक क्षणभर गृहीत धरू या),तरी मूळ घटनेच्या तुलनेत तिथे डॉक्टर किती वाजता पोहोचले, पोलिस किती वाजता पोहोचले इ. वेळापत्रक हे अत्यंत बिनमहत्त्वाचे आहे. मुळात रोहीत वेमुलाच्या मृत्युनंतर डॉक्टर तिथे २-३ तासांनी पोहोचले का १२ तासांनी हा मुद्दाच महत्त्वाचा नाही कारण त्याचा मृत्यु खूप आधी झालेला होता.

सॉलीड ज्योक ! याला म्हणतात अंधभक्ती. तो जर आधीच गेला होता तर ` वेळीच मदत मिळाली असती तर तो वाचू शकला असता, एक बच्चेकी माँ बोल रही है, वगैरे भंकस कशाला करायची? यालाच तर नौटंकी म्हणतात.

आजवर असे अनेक हक्कभंग प्रस्ताव आले आणि कचर्‍याच्या टोपलीचे धनी झाले. या प्रस्तावाचेही तेच होणार आहे. आणि हे सांगितले तर ही म्हणे मग्रूरी!

पुन्हा तेच ! आहो, खोट्याची शरम नाही आणि संसेदेची दिशाभूल केल्यामुळे हक्कभंगाचा ठराव दाखल झालायं तर तुम्ही म्हणतायं `असे किती ठराव आले आणि गेले'...आणखी किती रेटणार?

मुद्दे तुम्हीच रेटत आहात. मी फक्त त्यातील चुकीच्या गोष्टी खोडत आहे

रोहितच्या आत्महत्ये संदर्भात बाईंची विधानं, समोर आलेल्या पुराव्यांशी विसंगत आहेत इतकी साधी गोष्टच तुमच्या लक्षात येत नाही, खोडणं तर बाजूलाच. आणि पुन्हा विरोधकच त्याचं राजकारण करतायंत ही रेटूगिरी आहे.

देशभक्ती हे भाजपची नाही हे मान्य आहे. परंतु देशद्रोह ही मात्र काही ठराविक पक्षांचीच मक्तेदारी आहे हे नक्की

शाब्बास ! हेच तर मला दाखवून द्यायचं होतं. भाजप सोडता बाकीचे (तुम्ही फक्त सोयिस्करपणे `ठराविक' शब्द वापरालयं) देशद्रोही. किंवा आगदी सरळ सांगायचं तर जे भाजप च्या विरोधात ते देशद्रोही!

एनी वे, तुमची भक्ती सर्वजाहीर आहे त्यामुळे मी थांबतो. बेशरमपणाचं प्रदर्शन करुन एकानं स्वतःच्या विचारांची पातळी दाखवली, पण तुम्ही निदान व्यक्तीगत तरी झाला नाहीत त्याबद्दल आभार.

तुमच्या सारख्या स्व गवसलेल्या माणसाची अश्या प्रतिसादांतून आणि भौतिक गोष्टींमधून होणारी चिडचिड पाहून अंमळ गंडल्यासारखे झाले मला.
मी काय म्हणतो, हे सर्व लोक आहेत हे असेचं आहेत आणि त्यात फरक पडणार नाही याची बेशर्त स्वीकृती करून मुक्तपणे,आनंदाने जगणे अवघड आहे का ?

विवेक ठाकूर's picture

2 Mar 2016 - 6:54 pm | विवेक ठाकूर

जर कुणी अपमान केला तर त्याचा जवाब तसाच देता आला पाहीजे . राजकीय परिस्थिती बद्दल म्हणाल तर उघड दिसणाऱ्या गोष्टींविरूद्ध लिहीणं म्हणजे चिडचिड नाही. स्व गवसलेल्यासाठी जीवन थ्री . डायमेन्शनल चित्रपटासारखं आहे . आपल्याला योग्य वाटेल ते प्रामाणिकपणे करायचं, नाही पटलं इतरांना तर दिलं सोडून .... त्यानं स्व ला काही बाधा येत नाही .

गणामास्तर's picture

2 Mar 2016 - 8:21 pm | गणामास्तर

अच्छा, स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.
तुमच्या प्रतिसादातून स्वर चिडका जाणवला म्हणून शंका वाटली इतकेचं.

आपल्याला योग्य वाटेल ते प्रामाणिकपणे करायचं, नाही पटलं इतरांना तर दिलं सोडून ....त्यानं स्व ला काही बाधा येत नाही .

'दिलं सोडून...' हे जे तुम्ही आत्ता म्हणताय ते तुमच्या वरच्या प्रतीवादांतून जाणवत नाहीये.
अर्थात त्याने स्व अबाधित राहतो हे तुम्ही स्वानुभवानेच सांगत असाल आणि तसे असूही शकेल असे गृहीत धरतो.

स्व गवसलेल्यासाठी जीवन थ्री . डायमेन्शनल चित्रपटासारखं आहे . आपल्याला योग्य वाटेल ते प्रामाणिकपणे करायचं, नाही पटलं इतरांना तर दिलं सोडून .... त्यानं स्व ला काही बाधा येत नाही .

गणा मास्तर तुम्हाला समजलेच नाहि सर काय म्हणाले ते पुन्हा वाचा बघु एकदा. काय थ्रि डायमेन्शनल दिसतय ?
अरे खुष नका होउ...स्व इतक्या लवकर नसतो गवसत. डोळे तपासा नंबर वाढल्या मुळे थ्रि डायमेन्शनल दिसतय.

श्रीगुरुजी's picture

2 Mar 2016 - 11:01 pm | श्रीगुरुजी

हाइट! इथे विरोधकांचा काय संबंध? विरोधक राजकारण करतायंत हे खोटं विधान बाईंनी केलंय आणि त्यांच्या वक्तव्यातली विसंगती आता अंगाशी आलीये. तुम्ही माझा पहिला प्रतिसाद वाचलेलाच नाही हे आता नक्की झालं.

विरोधकांचाच संबंध आहे. एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यावर तो दलित आहे हे जाहीर झाल्यावर लगेच राहुल, केजरीवाल इ. मंडळी प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपण्यासाठी तातडीने हैद्राबादला गेले व किळसवाणे राजकारण सुरू झाले. हेच तर स्मृती इराणींनी दाखवून दिल्यावर काँग्रेस खासदारांनी लोकसभेतून पळ काढला.

सॉलीड ज्योक ! याला म्हणतात अंधभक्ती. तो जर आधीच गेला होता तर ` वेळीच मदत मिळाली असती तर तो वाचू शकला असता, एक बच्चेकी माँ बोल रही है, वगैरे भंकस कशाला करायची? यालाच तर नौटंकी म्हणतात.

याच्यात काय जोक आहे आणि कसली अंधभक्ती? उलट तुमचाच अंधद्वेष स्पष्ट दिसतोय. जो तेलंगण पोलिसांनी अधि़कृत अहवाल दिलेला आहे (तेलंगणमध्ये भाजप वा मित्रपक्षांचे सरकार नाही) त्याच्याच आधारावर माहिती दिली तर त्यात कसली आलीय नौटंकी? अंधद्वेष थोडा वेळ बाजूला ठेवलात तर सर्व काही स्पष्ट समजून येईल.

पुन्हा तेच ! आहो, खोट्याची शरम नाही आणि संसेदेची दिशाभूल केल्यामुळे हक्कभंगाचा ठराव दाखल झालायं तर तुम्ही म्हणतायं `असे किती ठराव आले आणि गेले'...आणखी किती रेटणार?

कसलं खोटं आणि कशाबद्दल शरम बाळगायची? शरम बाळगायची तर ती प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपणार्‍या काँग्रेस आणि आआपवाल्यांनी बाळगायली हवी. संसदेत दरवर्षी असे अनेक हकभंग प्रस्ताव येतात आणि जातात. आजतगायत एखाद्या हक्कभंग प्रस्तावामुळे काही प्रेक्षणीय घडल्याचे ऐकले नाही. या प्रस्तावाचे देखील तेच होणार आहे ही वस्तुस्थिती स्पष्ट दिसत आहे. तुमची ते मान्य करायची तयारी नाही. हक्कभंग प्रस्तावासारख्या एखाद्या फुसक्या गोष्टीचा ज्यांना आधार वाटतो आणि असे प्रस्ताव जे गांभिर्याने घेतात ते उद्या लोकसभेत कोणीतरी दंडाला काळी फीत बांधून आले तरी त्याला गांभिर्याने घेतील.

रोहितच्या आत्महत्ये संदर्भात बाईंची विधानं, समोर आलेल्या पुराव्यांशी विसंगत आहेत इतकी साधी गोष्टच तुमच्या लक्षात येत नाही, खोडणं तर बाजूलाच. आणि पुन्हा विरोधकच त्याचं राजकारण करतायंत ही रेटूगिरी आहे.

त्यात काहीही विसंगती नाही. आत्महत्या झाली हीच सर्वात आणि एकमेव गंभीर व महत्त्वाची घटना आहे. डॉक्टर किती वाजता आले, पोलिस किती वाजता पोहोचले इ. तपशील बिनमहत्त्वाचा आहे. एखाद्या खुनाचा तपास करताना पोलिस पंचनान्यात "खून झालेल्या स्थळापासून नैऋत्येला अमुक कदमांवर जांभळाचे झाड आहे, वायव्येला तमुक कदमांवर खांब आहे" असले अनेक फालतू व बिनमहत्त्वाचे तपशील असतात. घडलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात अशा तपशीलाला महत्त्व नसते. तसेच इथेही आहे.

तुम्हाला हक्कभंग प्रस्तावासारख्या बिनमहत्त्वाच्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. त्याचप्रमाणे डॉक्टर किती वाजता पोहोचले, पोलिस किती वाजता आले हे बिनमहत्त्वाचे तपशील देखील तुमच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाचे आहेत. वस्तुतः असल्या तपशीलांना अजिबात महत्त्व नसते.

शाब्बास ! हेच तर मला दाखवून द्यायचं होतं. भाजप सोडता बाकीचे (तुम्ही फक्त सोयिस्करपणे `ठराविक' शब्द वापरालयं) देशद्रोही. किंवा आगदी सरळ सांगायचं तर जे भाजप च्या विरोधात ते देशद्रोही!

भाजप सोडता बाकीचे सर्वजण देशद्रोही असे मी म्हटलेले नाही. भाजपच्या विरोधातले सर्वजण ते देशद्रोही असेही मी लिहिलेले नाही. उगाच स्वतःच्या मनाचे व स्वतःला सोयिस्कर असे अर्थ काढू नका.

एनी वे, तुमची भक्ती सर्वजाहीर आहे त्यामुळे मी थांबतो. बेशरमपणाचं प्रदर्शन करुन एकानं स्वतःच्या विचारांची पातळी दाखवली, पण तुम्ही निदान व्यक्तीगत तरी झाला नाहीत त्याबद्दल आभार.

तुमचा भाजपद्वेष देखील जगजाहीर आहे.

बोका-ए-आझम's picture

2 Mar 2016 - 9:46 pm | बोका-ए-आझम

तुम्हीपण कोणाशी वाद घालताय? ज्यांना स्वाभिमान नाही अशा फालतू लोकांना का महत्व देताय? वाद शहाण्या लोकांशी घालावा. मूर्खांशी घालू नये. ज्यांना आपण मूर्ख आहोत हे मान्यच नाही अशा शतमूर्खांशी तर वाद घालूच नये.

स्वतःच्या विव्दतेचं आणि संस्कारांचं केलेलं हे बेशरम प्रदर्शन संपादकीय नजरेतून सुटतंय हे केवळ नशीब !

बोका-ए-आझम's picture

3 Mar 2016 - 1:19 am | बोका-ए-आझम

तुम्ही स्वतःच्या प्रतिसादांचं एकदम perfect वर्णन केलंय इथे!तो विद्वत्ता शब्द थोडा चुकीचा लिहिलाय तो सुधारा आधी!

मार्मिक गोडसे's picture

1 Mar 2016 - 11:50 am | मार्मिक गोडसे

मस्तच, विठासर

तर्राट जोकर's picture

1 Mar 2016 - 11:31 am | तर्राट जोकर

इराणींनी आपल्या पुस्तकाचा भलताच अर्थ संसदेत सांगितला असे सर्मिला बोस यांचे म्हणणे. लेख बोलीभाषेत नाही पण अभ्यासू जाणकारांचे अडत नसते.

http://scroll.in/article/804314/smriti-irani-misrepresented-my-work-in-h...

तर्राट जोकर's picture

1 Mar 2016 - 3:18 pm | तर्राट जोकर

आपण संतुष्ट नाही असे मायावतींनी बोलल्यावर इराणींनी आपला शब्द पाळला नाही. जुमलोंकीसरकारसे और कया उम्मीद.

विकास's picture

1 Mar 2016 - 5:59 pm | विकास

मला वाटते त्यांनी मायावतींना सांगितले की बसपच्या कार्यकर्त्यांना पाठवा, त्यांच्याकडे शीर देते म्हणून...

पण त्या मायाळू असल्याने त्यांनी तसे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पाठवले नाहीत... ;)

तर्राट जोकर's picture

1 Mar 2016 - 8:07 pm | तर्राट जोकर

फालतू डायलॉगबाजी करण्यासाठी संसद ही एकता कपूरच्या सिरीयलचा सेट नाही एवढे कळत नाही. तरी भगत लोक आपल्याच पक्षाच्या टीन्पाट नेत्यांची तळी उचलतात. थोडा तरी स्वाभिमान बाळगा.

विकास's picture

1 Mar 2016 - 9:01 pm | विकास

आपले ते भाषण स्वातंत्र्य आणि दुसर्‍याची ती फालतू डायलॉगबाजी का? हे बरं आहे. अर्थात त्यात नवल काहीच नाही...

तरी भगत लोक आपल्याच पक्षाच्या टीन्पाट नेत्यांची तळी उचलतात.

टिन्पाट आहेत का नाहीत, ते माहीत नाही. पण त्यांच्यामुळे स्युडोसेक्युलर्स आणि स्वयंघोषित विचारवंत यांना सतत बर्नॉल आणि इनो लागते आहे हे पाहून जी मजा येते ना ती त्या पप्पूच्या बाललिलांमुळे पण येत नाही बघा! ;) आणि हो एक गोष्ट नक्की आहे, एकीकडे मोदीभक्त म्हणून हिणावणारे लोकं हे फक्त मोदींच्याच आरत्या ओवाळताना दिसत नाहीत...

... किंबहूना मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. उद्या जर माध्यमांनी तसेच स्युडोसेक्युलर्स आणि स्वयंघोषित विचारवंत यांनी ठरवले की मोदीतला म अथवा मोदी सरकार मधला स आठवडाभर उच्चारायचा देखील नाही, अगदी अनुल्लेख करायचा, तर तुम्हाला मोदी-मोदीसरकार भक्ती-स्तुती काहीच ऐकू येणार नाही. एकदम सोप्पा उपाय आहे, पण तो जमण्यासाठी बर्नॉल आणि इनोचा कमी वापर होणारी प्रकृती असायला हवी, इतकेच काय ते.

तर्राट जोकर's picture

1 Mar 2016 - 9:10 pm | तर्राट जोकर

हा हा, जोकर तर मी आहे. पण इतर लोकच जास्त प्रयत्न करतात.

असो. तुम्हाला काम होण्यापेक्षा नौटंकीबाजी, सर्कसमधे जास्त इंटरेस्ट असेल तर कोण काय करेल? जशी बुद्धी तशी आवड.

कोणाला बर्नाल आणि इनो लागतंय हे आपल्या आपण इमॅजिन करुन गुदगुल्या करुन घ्यायची मानसिकता भक्तांमध्ये पसरली आहे. त्यासाठी विरोधकांनी काही करायची गरज नाही. भाजपाकडे निवडणुकीच्या वेळेस तोंड फाटेस्तोवर केलेल्या घोषणा पुरे करता नाकीनऊ येतंय, त्या लपवायला हे बर्नाल, इनोचे फंडे भक्तांमधे पसरवुन मुळ विषयापासून लक्ष भरकटवतात. तुम्ही त्यांची पळी उचला. सामान्य माणसाला तुमच्या सर्कशीत विण्टरेस्ट नाही.

विरोध का आलम यह है भारत में की.........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अगर नरेन्द्र मोदी कह दे की शौच के बाद हाथ धोना अनिवार्य है तो.....
विरोधी बोलेंगे नही हम तो चाटेंगे

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 2:37 pm | तर्राट जोकर

भक्त न बोलताच चाटतात हा भाग वेगळा.

बोका-ए-आझम's picture

2 Mar 2016 - 9:50 pm | बोका-ए-आझम

बॅन झाल्यावरचे दिवस छान होते असं वाटतंय बहुतेक तुम्हाला!

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 9:56 pm | तर्राट जोकर

तुमच्या बॅन होण्याच्या प्रयत्नांना शुभेच्छा! शेख तू अपनी देख.

सदस्य झाल्यावर एका वर्षाच्या आत एकदा बॅन होऊन दाखवण्याचं तुमचं कसब अफलातून आहे. कसं जमतं बुवा? इकडे लोक ८-८ वर्षे सदस्य आहेत पण एकदाही बॅन नाही झाले. तुमची गोष्टच वेगळी. बरं झाले ते झाले, परत येऊन सुद्धा फरक नाहीच पडलेला. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ती हीच बहुतेक!

तर्राट जोकर's picture

3 Mar 2016 - 8:07 am | तर्राट जोकर

जशास तसे उत्तर दिले की ब्यानची कारवाई होते. भक्तमंडळी किती खालची भाषा वापरतात ते कधी लक्षात येत नाही, विरोधकांनी पलटवार केला की वर्मी लागतो. चालायचेच. इथे सर्वांचेच पाय मातीचे.

की मी दररोज श्वास घेतो.

तुम्हाला मिपा-विरोधभक्तीरत्न पुरस्कार जाहीर करत आहोत...
'वापसी करायची की नाही ते आपणच ठरवा.

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 2:39 pm | तर्राट जोकर

बर्नाल इनो संपलेत इतक्यात?

होबासराव's picture

1 Mar 2016 - 9:12 pm | होबासराव

यांना सतत बर्नॉल आणि इनो लागते आहे हे पाहून जी मजा येते ना ती त्या पप्पूच्या बाललिलांमुळे पण येत नाही बघा! ;)
खरच आहे.
पाच राज्यातल्या निवडणुकांच्या तारखा जस जश्या जवळ येत जातिल ये खुमारि तो और बढने वालि है. आता पर्यंत मिपावर भाजपा साठि गुर्जि, आप साठि नांदेडियन आणि काँग्रेस करता काहि आयडिज किल्ला लढवत होत्या, छान चर्चा होत होति पण आजपर्यंत कम्युनिस्टांतर्फे त्यांचि बाजु मांडायला कोणि नव्हता चला त्याचि कमि पुर्ण झालि. सध्या सगळ्या धाग्यावंर धुमाकुळ घालणार्‍या एका आय डि ने, सगळ्या धाग्यांवर म्हणजे जिथे जातिल तिथे रोहित वेमुला, जेएनयु हे सोबत घेउनच जातात. बरोबर आहे ह्यावेळेस पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा आहेत निवडणुका.
मज्जानि लाइफ्....कब कब है निवडणुका

पैसा's picture

1 Mar 2016 - 10:29 pm | पैसा

किती प्रतिसादांचे टारगेट आहे? अक्कल, बुद्धी, निर्लज्ज, भगतगण, टिनपाट, पप्पू सगळे आवश्यक ते शब्द येऊन संपादकांच्या हेतूंवर शंका वगैरे साग्रसंगीत झाले. झाले का समाधान?

विकास's picture

1 Mar 2016 - 10:39 pm | विकास

अक्कल, बुद्धी, निर्लज्ज, भगतगण, टिनपाट, पप्पू
असे ऐकून आहे की आता स्वयंघोषित बुद्धीवादी वाद घालण्याआधी अंतस्थ चर्चा करताना शेवटी, "श्रूती, स्मृती इराणोक्त" असे म्हणू लागले आहेत म्हणून! ;)

पैसा's picture

1 Mar 2016 - 10:46 pm | पैसा

=)) =)) =))

असंका's picture

3 Mar 2016 - 11:09 am | असंका

=)) =))

कहर!!

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2016 - 11:06 pm | श्रीगुरुजी

हक्कभंग प्रस्ताव प्रेमी विठा यांच्यासाठी एक आनंदाची बातमी. आता लोकसभेत ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याविरूद्ध भाजपने हक्कभंग प्रस्ताव आणला आहे.

हे दोन्ही हक्कभंग प्रस्ताव शेवटी कचर्‍याच्या टोपलीतच जाणार आहेत हेवेसांन.

अर्धवटराव's picture

1 Mar 2016 - 11:45 pm | अर्धवटराव

शेवटी काय, तर "दलीत, अल्पसंख्यांना चिरडुन टाकणे, विरोधकांची मुस्क्टदाबी करणे हा सरकारचा एकमेव अजेंडा आहे" या एक्सीसभोवती सगळं गुर्‍हाळ व्यवस्थीत सुरु आहे. असल्या निर्लज्ज आणि आत्मघातकी राजकारणावर सरकारने तसलाच जालीम उपाय योजावा. काँग्रेसला गांधी घरण्याच्या लीलांवरुन बेजार करावं. मुलायम, लालु, मायावती वगैरे मंडळीकरता सीबीआय सारख्या संस्था उपयोगात आणाव्या. पवार साहेब, नितीशकुमार वगैरे मंडळींना सत्ता, पैसा वगैरे ऑफर करुन खुष ठेवावं. कम्युनीस्टांकरता वेगळं काहि करण्याची गरज नाहि. त्यांचा समाचार उर्वरीत विरोधक घेतीलच. केजरीवाल साहेबांना मात्र शक्य असेल तिथे जोड्याने हाणावं.

विकास's picture

1 Mar 2016 - 11:57 pm | विकास

केजरीवाल साहेबांना मात्र शक्य असेल तिथे जोड्याने हाणावं.
ते सध्या अस्वस्थ आहेत. चांगली-वाईट जी काही आहे ती, प्रसिद्धी स्मृतींजीन मिळत आहे त्यामुळे माध्यमांसाठी ते विस्मृतीत गेले आहेत. असे काहीसे वातावरण तयार झालेले आहे.

म्हणजे मोदिंच्या नावाने शंख करायला मोकळे.. शिवाय प्रसिद्धी :) बाटा वगैरे कंपनीचा जोडा असेल तर पूर्ण इव्हेण्टला स्पॉन्सरशीप सुद्धा मिळेल :)

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Mar 2016 - 4:30 pm | श्री गावसेना प्रमुख

बिहार मध्ये ज्या हत्या होताहेत ते लोक nda चे घटक असल्याने आणि दलित नसल्याने त्यांच्या हत्येच्या निषेधाची गरज नाही,पुण्यवान फक्त खांग्रेसी किंवा त्यांचे सहकारी,त्यांचे भाट । पाव वड्या साठी मारले तर माध्यम व खांग्रेसी भाट शिमगा करतात,तिकडे बिहारी आमदाराने लहान मुलीवर बलात्कार केला तरी गपचिप ।

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 4:48 pm | तर्राट जोकर

पाववड्यासाठी लई नका रडू सेनाप्रमुख,

शिवसेना आमदाराने लहान मुलीवर बलात्कार केल्याची ही बातमी घ्या. जुनी आहे पण बातमी आहे.

दोन्हि हि घटना घाणेरड्या आणि निषेधार्ह आहेत, पण तजो साहेब सेम निच पणा शिवसेने च्या एखाद्या आमदारने केला म्हणुन पहिलि घटना निंदनिय नाहि ठरत का?

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Mar 2016 - 4:58 pm | श्री गावसेना प्रमुख

अहो ह्यांनी गूगल सर्च करून प्रतिसाद लिहिलाय, त्या बातमीत आमदार नाहीये,पण तो rjd चा आमदार आहे म्हणून हे सेनेच्या आमदाराच्या बातम्या शोधताहेत।

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 5:05 pm | तर्राट जोकर

गुगल सर्चला काही समस्या? शिवसेनेचीही बातमी मांडली तर त्रास होतो का? बिहारच्या आमदाराची बातमी तुम्हाला अंतर्ज्ञानाने कळली का? बाकी गुगल सर्चचा उद्देश खालच्या प्रतिसादात दिला आहे.

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 5:01 pm | तर्राट जोकर

होबासराव, अशा नीच घटनांना राजकिय परिप्रेक्ष्यातून पाहणे हे लोक कधी सोडतील हाच माझा प्रश्न आहे. गावसेनाप्रमुख बिहारी आमदाराच्या कृत्याचा दाखला वडापाव कृत्याच्या बचावासाठी देतात हीच मानसिकता किती नीच आहे?

होबासराव's picture

2 Mar 2016 - 5:06 pm | होबासराव

अशा नीच घटनांना राजकिय परिप्रेक्ष्यातून पाहणे हे लोक कधी सोडतील हाच माझा प्रश्न आहे.
एकदम सहमत, पण तजो तुम्हि सुध्दा तेच करताय ना दुसरे उदाहरण देउन. माझ्यासाठि तरि दोन्हि प्रकार सारखेच आहेत. असो.

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 5:08 pm | तर्राट जोकर

तेच, मी फक्त आरसा दाखवतो म्हणजे मीही तेच करतो असे नाही. आरसा नको असेल तर बाष्कळ प्रतिवाद, सुमार लॉजिक टाळलेले बरे.

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Mar 2016 - 5:10 pm | श्री गावसेना प्रमुख

मी बचाव केलेला नाही,मी फक्त भाटांचा दुतोंडी पणा दाखविला।ह्यांनी 100 पाववडे मागितले म्हणून सेनेच्या कार्यकर्त्याने मारले म्हणून ओरडणारे,आणि लालू यादव मुलाच्या लग्नाला आख्ख शोरूम बंदुकीच्या जोरावर खाली करायचा ,तेव्हा का नाही विरोध करायचे,
इथे भक्त किंवा भाट कितीही ओरडले तरी अजून एक बार मोदी सरकार।

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 5:30 pm | तर्राट जोकर

रे बाब्बा! अशी काय उदाहरणं देताय जणू शिवसेनेत सगले धुतल्या तांदळाचेच. दहशतीच्च्याच जोरावर वाढवलेली शिवसेना दुसर्‍यांच्या दहशतीच्या कम्प्लेणी करते तेव्हा दुतोंडीपणा कशाला म्हणतात ते सोदाहरण कळतं हो.

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Mar 2016 - 4:55 pm | श्री गावसेना प्रमुख

मग ह्या आमदाराला काही शिक्षा वैगरे झाली कि नाही।

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 5:07 pm | तर्राट जोकर

मग ह्यातरी आमदाराला शिक्षा होईल काय? किंबहुना कोण्यातरी आमदाराला कधीतरी रेपसाठी शिक्षा झाली आहे का?