इंग्रजी स्पेलिंग्ज इतकी तर्कशून्य का?

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
16 Feb 2016 - 1:30 am

माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना.

किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या धुक्यात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती.

त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले. A चा उच्चार ऍ किंवा अ, e चा ए, i चा इ, o चा ओ किंवा ऑ, u चा उ किंवा अ, डबल ई चा ई, डबल ओ चा ऊ वगैरे वगैरे. आम्ही ते आज्ञाधारकपणे पाठ केले. वापरायला सुरवात केल्यावर मात्र असं लक्षात आलं की जितके शब्द नियमात बसतात तितकेच नियमबाह्य आहेत. आपण मराठीत अपवाद हा शब्द वापरतो कारण नव्व्याण्णव टक्के नियमात, म्हणून एक टक्का अपवाद. इथे अपवादच अपवाद. मग नियमांना किंमत काय?

आमची स्थिती पुण्यामध्ये वन वे रस्त्यावर योग्य दिशेनी वाहन चालवणार्यासारखी व्हायची. इतकी वाहनं चुकीच्या दिशेनी येतात की आपणच चुकतो आहोत की काय असं वाटायला लागतं. दुहेरी वाहतुकीच्या रस्त्यावर आपण डाव्या अर्ध्यामध्ये चालवतो. पण या वन वे मध्ये उलटे येणार्यांची एक खासियत असते. एकदा दिशेचा नियम मोडलाच आहे म्हटल्यावर यांना डाव्या उजव्याचंही सोयरसुतक राहात नाही. कुठूनही येतात. मात्र हेडलाइट लावून. चोरोंके भी असूल होते हैं !

इंग्रजीचे शब्दही असेच. ‘डबल ओ’ चा उच्चार ‘ऊ’ होतो हे आम्हाला पाठ. लुक, बुक वगैरे. मग ‘ब्लुड’ का नाही? त्याचा उच्चार ‘ब्लड’ करावा हे कुणी ठरवलं? असं आहे का, की ‘ब्लुड’ अशा उच्चाराचा दुसरा एखादा शब्द आहे आणि त्याचा आणि blood या शब्दाचा गोंधळ होऊ नये म्हणून एक विचारी भाषाशास्त्रज्ञानी हा निर्णय घेतला? अजिबात नाही. म्हणजे हा पूर्णपणे Random Decision आहे.

एक महत्वाची गोष्ट नेहमी आपण शिकतो. ती म्हणजे कुठल्याही बाबतीत Random Decision घ्यायचा नसतो. प्रत्येक निर्णय हा उपलब्ध माहिती (Available Data) आणि तर्क (Logic) यावरच घ्यायचा. मग याच भाषेच्या बाबतीत असं का?
बरं, आता कुठला शब्द नियमाप्रमाणे उच्चारायचा आणि कुठचा वेडावाकडा हे आम्हाला कसं कळणार? तर ते ‘ऑक्सफोर्ड’ नावाच्या शब्दकोशातून. ‘ऑक्सफोर्ड’ ह्या शब्दाची उत्पत्ती ‘ऑक्स-फोड’ या जोडशब्दात आहे. त्याबद्दल मी पुढे तुम्हाला सांगेनच.
War ‘वॅर’ नव्हे, वॉर.
Son सॉन नव्हे, सन.
‘ow’ हे n च्या नंतर लागले, उदा. now, की त्याचा उच्चार औ.
तेच ‘ow’ हे n च्या आधी लागले, उदा own, की त्याचा उच्चार ओ.
One म्हणजे ‘वन’. ह्यातला ‘व’ हा उच्चार कुठून आला? देवास ठाऊक !
Know - सुरवातीला k लावायचा, शेवटी w लावायचा. का ? वेळगंमत म्हणून ?

उदाहरणं द्यावी तितकी थोडी. पण ते जाऊ द्या. कळस म्हणजे निःशब्द (silent) अक्षरं ! ती पाठ करायची, लिहायची देखील. पण उच्चार करायचा नाही ! म्हणजे खिसा खालून न शिवण्यासारखं. दिसतो खिशासारखा, आत हात देखील घालता येतो. पण काही ठेवलं की खालून बाहेर पडतं ! हॅ हॅ हॅ हॅ ! याला भाषा म्हणायची, विनोद म्हणायचा का अक्कलशून्यपणा?

या सगळ्यांचा बाप म्हणजे silent & anti-silent अक्षरं एकत्र ! काही लिहिलेली अक्षरं वाचायची पण त्यांचा उच्चार करायचा नाही. त्याऐवजी एक न लिहिलेलं अक्षर तिथे आहे अशी कल्पना करायची आणि त्याचा उच्चार करायचा ! शब्द आहे ‘कर्नल’. स्पेलिंग आहे colonel. ‘एल्’ चा उच्चार करायचा नाही. त्याच्या नंतरच्या ‘ओ’ चा ही उच्चार करायचा नाही. त्या दोघांऐवजी तिथे ‘आर’ आहे अशी कल्पना करायची, आणि त्याचा उच्चार करायचा. आधीच्या ‘ओ’ चा उच्चार ‘अ’ असा करायचा. सोप्पं आहे की नाही?

थोडक्यात काय, तर नुसता नियम माहीत असून काहीही उपयोग होऊ नये, सगळे शब्द पाठच करायला लागावे अशी व्यवस्था केलेली आहे. शालेय जीवनातलं समांतर उदाहरण द्यायचं म्हटलं तर असं म्हणता येईल. शाळा जर मोठी असेल तर शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावर कोठला वर्ग कुठे आहे याचा नकाशा लावलेला असतो. शिवाय साधारणपणे एकाच इयत्तेचे वर्ग एका मजल्यावर असतात. प्रत्येक वर्गावर इयत्ता आणि तुकडी लिहिलेली असते. असं समजा की कुठलाही वर्ग कुठेही भरवला, एकाही वर्गावर इयत्ता आणि तुकडी लिहिली नाही तर काय होईल? मुलं आणि शिक्षकांना ते समजेपर्यंत भटक भटक भटकायला लागेल. पालक तर हरवूनच जातील. वर म्हणायचं, “त्यात काय इतकं? एकदा पाठ झालं की काही प्रॉब्लेम येत नाही!”

असं तर काही शक्य नाही की कित्येक भाषापंडित एकत्र बसले आणि त्यांनी ठरवलं, “आपण एक तर्कशून्य स्पेलिंग आणि उच्चार असलेली भाषा बनवूया.” मग ही भाषा अशी झाली तरी कशी?

मला माहीत आहे याचं कारण. एकदा भाषांतरदेवी माझ्या स्वप्नात आली होती. तिनी मला सांगितलं. मी तुम्हाला सांगतो.
सुरवातीला इंग्रजी भाषेची स्पेलिंग व्यवस्थित होती. रक्त blud होतं, लिहिणं rite होतं, बिबट्या lepard होता, साखर shugar होती.

इंग्लंडमध्ये राजेशाही होती. अर्थातच सामान्य जनतेची मुलं शाळेत जात होती. राजाचा मुलगा शाळेत कशाला जाईल? शिक्षकच राजवाड्यात येऊन त्याला शिकवत. एक दिवस राजकुमाराचं इंग्रजीचं शिक्षण चाललं होतं. शिक्षकांनी त्याला ‘रॉन्ग’ चं स्पेलिंग विचारलं. राजकुमारानं बुद्धी राणीकडून घेतलेली होती. त्याला काही केल्या ‘रॉन्ग’ चं स्पेलिंग आठवेना. त्यानी अंदाजानी ठोकून द्यायला सुरवात केली, “डब्ल्यू . . . . आर. . . .”.

“नाही. बाळराजे”, शिक्षकांनी हळुवारपणे हस्तक्षेप केला. (अर्थातच 'हळुवारपणे'. राजकुमाराच्या कानाखाली आवाज काढायची कुणा शिक्षकाची शामत असते काय?) "तुमचं स्पेलिंग चुकतंय बाळराजे."

आपल्या सर्वांच्या दुर्दैवानी नेमकी तेव्हांच राणी शेजारून चालली होती. आपल्या बाळराजाचं स्पेलिंग चुकलं ? हे कसं शक्य आहे ? तिनी स्वतः मुलाला रॉन्गचं स्पेलिंग विचारलं. त्या म्हशाच्या डोक्यात ‘डब्ल्यू’ घट्ट बसलेला होता. त्यानं सांगितलं “डब्ल्यू आर ओ एन जी – रॉन्ग”. राणी काळजीत पडली. उद्या हा गादीवर बसला की त्याचं हसं होईल. काय करावं ?

जर महम्मद डोंगरापर्यंत जाणार नसेल तर डोंगरच महम्मदकडे आणावा. तिनी बाळराजांना सगळ्या शब्दांची स्पेलिंग विचारली. त्यानी मनाला वाटेल ती उत्तरं दिली. सगळी नोकरांकरवी लिहून घेतली गेली.

दुसर्या दिवशी इंग्लंडभर दवंड्या पिटल्या गेल्या. “आत्तापासून ही नवीन स्पेलिंग बरोबर धरली जातील. जुनी विसरून जा.”
हे सगळं होत असताना राजा स्वारीला गेलेला होता. परत आल्यावर त्याला ही हकीकत समजली. तो हैराण. हा मूर्खपणा त्याला अजिबात पसंत नव्हता. पण राजा असला तरी तो नवरा होता. राणीच्या हट्टापुढे तोही हतबल.

आपल्या पु.लं. नी देखील एका कथेत लिहिलं आहे – रामरायाला काय म्हाइत नव्ह्तं काय का सोन्याचं हरीन बिरीन काय पन नसतं मनून? पन बायकोच्या हट्टापुडं कोनाचं काय चालनार? शीतामाई म्हनली असती, “खा कंदमुळं अन् कोपर्यात पडा चीप.” तो गेला आनायला अन् रामायन घडलं.

सांगायचा मुद्दा काय, तर राजाराणीचा जाम वाद झाला पण नेहमीप्रमाणे राणी जिंकलीच. आपला पोरगा शुद्ध बैलोबा आहे हे राजाला माहीत होतं. त्याचं थोबाड फोडायला राजाचे हात शिवशिवत होते पण तो तर राणीसाहेबांचा लाडका. त्यामुळे प्रत्यक्षात नाही तर निदान प्रतीकात्मक तरी फोडायचं राजाने ठरवलं. म्हणून या नवीन स्पेलिंग्जचा जो शब्दकोश बनवला त्याला नाव त्यानी ठेवलं बैलाची धुलाई अर्थात ‘ऑक्स-फोड’. याच शब्दाचा पुढे अपभ्रंश ‘ऑक्सफोर्ड’ असा झाला.
तेव्हांपासून ऑक्सफोर्ड शब्दकोशाला जगन्मान्यता मिळाली आणि त्यातली स्पेलिंग आणि उच्चार आपल्या मानगुटीवर बसले ते आजपर्यंत !

वाईटातही चांगलं शोधायलाच हवं. जर का तेव्हां राजकुमाराचा गणिताचा किंवा विज्ञानाचा अभ्यास चालला असता तर? गेलो असतो सगळे अबाउट टर्न करून परत अश्मयुगात !

कथाभाषाशब्दक्रीडाविनोदkathaaमौजमजाविचारलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

माहितगार's picture

16 Feb 2016 - 3:03 am | माहितगार

मस्त लिहिलय, लेखन कौशल्याला १०० मार्क आणि विचार मांडणीला १०० मार्क, तुम्ही मार्क मागितले नव्हते पण आम्ही दिले ;)

बहुगुणी's picture

16 Feb 2016 - 4:02 am | बहुगुणी

चांगला कल्पनाविस्तार!

आणि त्या पुण्यनगरीच्या उल्लेखाने धाग्याच्या 'शंभरी'ची निश्चिती :-)

“English grammar is so complex and confusing for the one very simple reason that its rules and terminology are based on Latin, a language with which it has precious little in common. Making English grammar conform to Latin rules is like asking people to play baseball using the rules of football.” - Bill Bryson

या निमित्ताने काही quotes आठवले:

“Why do we have noses that run and feet that smell?”

“Never make fun of someone who speaks broken English. It means they know another language.”

“English is a funny language; that explains why we park our car on the driveway and drive our car on the parkway.”

आणि ही एक कविता:

Why English Is So Hard

We'll begin with a box,
and the plural is boxes.
But the plural of ox should be oxen,
not oxes.

Then one fowl is goose,
but two are called geese.
Yet the plural of moose
should never be meese.

You may find a lone mouse
or a whole lot of mice.
But the plural of house is houses,
not hice.

If the plural of man
is always called men,
Why shouldn't the plural of pan
be called pen?

The cow in a plural
may be cows or kine,
But the plural of vow is vows,
not vine.

And I speak of foot,
and you show me your feet,
But I give you a boot ...
would a pair be called beet ?

If one is a tooth
and the whole set are teeth,
Why shouldn't the plural of booth
be called beeth ?

If the singular is this
and the plural is these,
Should the plural of kiss
be nicknamed kese ?

Then one may be that,
and three may be those,
Yet the plural of hat
would never be hose.

We speak of a brother,
and also of brethern,
But though we say mother,
we never say methern .

The masculine pronouns are
he, his and him,
But imagine the feminine
she, shis and shim!

So our English,
I think you'll all agree,
Is the trickiest language
you ever did see.

- author unknown

[अवांतरः “‘I am’ is reportedly the shortest sentence in the English language. Could it be that ‘I do’ is the longest sentence?”]

क्रेझी's picture

16 Feb 2016 - 8:30 am | क्रेझी

कविता मस्तच आहे :)
आणि लेखपण आवडला :) :)

श्लेष अफलातून आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Feb 2016 - 3:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

अवांतर मस्तं आहे =))

स्रुजा's picture

17 Feb 2016 - 6:15 am | स्रुजा

हाहा.. तल्लख बुद्धीमान विनोद ( विटी जोक ;) )

अवांतर फार च हुशार :)

पहाटवारा's picture

17 Feb 2016 - 11:42 am | पहाटवारा

मस्त लेख अन प्रतीक्रिया..
अजून एक वाचले होते..

Is cheese the plural of choose?
If teachers taught, why didn't preachers praught?
If a vegetarian eats vegetables, what does a humanitarian eat?
In what language do people recite at a play, and play at a recital?
Ship by truck, and send cargo by ship?
Have noses that run and feet that smell?
Park on driveways and drive on parkways?
Sweetmeats are candies, while sweetbreads, which aren't sweet, are meat.
We take English for granted. But if we explore its paradoxes, we find that quicksand can work slowly, boxing rings are square, and a guinea pig is neither from Guinea nor is it a pig.
And why is it that writers write, but fingers don't fing, grocers don't groce, and hammers don't ham?
If the plural of tooth is teeth, why isn't the plural of booth beeth?
One goose, 2 geese. So, one moose, 2 meese?
One index, two indices?
How can the weather be hot as hell one day and cold as hell another?
When a house burns up, it burns down.
You fill in a form by filling it out, and an alarm clock goes off by going on.
When the stars are out, they are visible, but when the lights are out, they are invisible.
And why, when I wind up my watch, I start it, but when I wind up this essay, I end it?
.English muffins were not invented in England or French fries in France.
How can 'slim chance and a fat chance' be the same, while ' wise man and a wise guy' are opposites?

-पहाटवारा

लिहिलेला एक छान लेखं.

पडलेले प्रश्न आहेत हे. इंग्लिश शिकवताना आपल्या मराठी भाषेचा सोपेपणा आणि उच्चारांप्रमाणे शब्द लिहिले जाणं हे किती दिलासादायक आहे ते समजतं. कौतुक या गोष्टीचं आहे की अशी धेडगुजरी भाषा असूनही इंग्लिश आज जगाची ज्ञानभाषा आहे.
बाकी लेख सुंदर. पुलेशु.

माहितगार's picture

16 Feb 2016 - 12:15 pm | माहितगार

@बोका प्रतिसादातील तुमचे विचार आणि भावना पोचली, पण इंग्रजीवर टिका करण्यासाठी आपल्यास धेड आणि गुजर अशा दोन समाजांना डावावर लावणे खूपते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2016 - 3:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तो एक वाक्प्रचार आहे मा.गा. तसं इतर जातींचा नामोल्लेख असणारेही अनेक वाक्प्रचार आणि म्हणी आहेत.

http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A7%E0%A5%87%E0...

याच्यानुसार धेडगुजरी हा शब्द जातिवाचक ठरत नाही. मुळात त वापरताना जातिवाचक आहे हे मला माहित नव्हते पण माझे मित्र विश्वनाथ मेहेंदळे उर्फ विमे यांनी ही link पाठवून पुरावाच दिला, तो मी इथे देतोय.

नीलमोहर's picture

16 Feb 2016 - 10:27 am | नीलमोहर

colonel = कर्नल, शुध्द अन्याय आहे हा :)
ऑक्स-फोड = ऑक्सफोर्ड ;)
शाळेपासूनच इंग्लिशशी छान मैत्री झाल्यामुळे अडचण सहसा येत नाही, जरी प्रश्न अनेक पडतात.

विशाखा पाटील's picture

16 Feb 2016 - 10:29 am | विशाखा पाटील

छान लिहिलंय :) फार त्रासदायक भाषा आहे ही. इतकी वर्ष अभ्यास करूनही छळते. २६ मुळाक्षरे आणि त्यांचे उच्चार ४४. स्वर फक्त ५ , पण उच्चार २१. मग होतो बुवा गोंधळ... शाळेत असताना उच्चारासाठी 'phonemic script' का शिकवत नाही, कोण जाणे! आमच्या वेळी (इ. स. १९८० चा काळ) तरी शिकवत नव्हते. कॉलेजला गेल्यावर आणि तेही इंग्रजी विषय मुख्य होता म्हणून डिक्शनरीत उच्चार कसे शोधायचे ते कळले.

रमेश आठवले's picture

16 Feb 2016 - 10:54 am | रमेश आठवले

George Bernard Shaw याना इंग्लिश भाषेतील स्पेलिंग आणि उच्चार यांच्या नियम शुन्यतेचा फार राग होता. तो व्यक्त करण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले की फीश या शब्दाचा उच्चार मी घोटी असा करू शकतो .ते कसे ते पहा. F असा उच्चार rough या शब्दात gh या अक्षरांनी होतो. तसेच विमेन या शब्दात ओ चा उचार इ असा करतात आणि nation या शब्दात श या उच्चारासाठी ti ही अक्षरे वापरतात.
त्यांच्या मृत्युपत्रात त्यांनी ही उचार आणि स्पेलिंग यांच्या मधील तफावत दूर करण्याच्या कामासाठी निधी ठेवला होता.

प्रसाद१९७१'s picture

16 Feb 2016 - 10:55 am | प्रसाद१९७१

त्याचे कारण म्हणजे जशी आत्ता स्पेलिंग दिसतात त्याच प्रकारचे उच्चार पूर्वी ( अनेक शतका पूर्वी ) लोक करत असत. नंतर उच्चार बदलले पण स्पेलिंग तिच राहीली.
उत्तर इंग्लंड मधल्या लोकांचे उच्चार म्हणुनच वेगळे वाटतात. अजुनही तिथे लोक "लक" ला "लुक" म्हणतात अशी अनेक उदाहरणे.

गॅरी ट्रुमन's picture

16 Feb 2016 - 11:21 am | गॅरी ट्रुमन

इंग्रजी भाषा पहिल्यांदा शिकायला लागलो तेव्हा या प्रकारामुळे खूपच गोंधळ उडायचा.पण नंतर ते अंगवळणी पडत गेले. सायबाच्या भाषेतील नवेनवे शब्द शिकायला तर मला खूपच आवडते.जी.आर.ई च्या परीक्षेच्या वेळी असेच कित्येक नवे शब्द माहित झाले होते.त्यातले बरेचसे शब्द नेहमीच्या वापरात नसल्यामुळे विसरायला झाले असले तरी कधीतरी अनपेक्षितपणे त्यापैकी एखादा शब्द वाचायला/ऐकायला मिळाला तर कुणी "कुंभ के मेले मे बिछडा हुआ अपना" मिळाल्याचे समाधान होते.

(सुरवातीला इंग्रजी भाषा अजिबात न आवडणारा पण आता इंग्रजी भाषेचा विशेषतः व्होकॅब्युलरीचा प्रचंड मोठा पंखा) ट्रुमन

मित्रहो's picture

16 Feb 2016 - 11:28 am | मित्रहो

लहान मुलानी मला शिकवल स ऑ न सॉन आणि स अ न सन. पाच वर्षाच्या पोराला हे अपवाद शिकवायचा मला कंटाळा आला आणि मी सोडून दिल.
तसे बऱ्याच भाषेत वेगवेगळ्या प्रकारचे अपवाद असतात. या अपवादांमुळे मग ती भाषा शिकायला कठीण जाते. त्यावर उपाय म्हणून esperanto भाषा तयार केली गेली पण तीचा हवा तेवढा प्रसार झाला नाही.

पण वडिलांनी एकच सांगितलं, ही आपली भाषा नाही, तुला ती आत्मसात करायची असेल तर जशी आहे तशी शिक. विषयच संपला !

चांदणे संदीप's picture

16 Feb 2016 - 12:55 pm | चांदणे संदीप

पुलंच 'फ़िख्याडली' आठवल!

पुण्यावरचा विनोद ठीकठाक...इथे सुधारणेला वाव आहे! तरीही वर बहुगुणी म्हणतात तसे.....

आणि त्या पुण्यनगरीच्या उल्लेखाने धाग्याच्या 'शंभरी'ची निश्चिती :-)

बाकी लेखन उत्तम, आवडले!

Sandy

सुरुवातीला इंग्रजीचे स्पेलिंग आणि उच्चार हे बरोबर लायनीत होते. पुढे पुढे ग्रेट व्हॉवेल शिफ्ट नामक प्रकारामुळे बोलीभाषा झपाट्याने बदलली परंतु लिखित भाषा मात्र त्यांच्याप्रमाणे बदलली नाही, जुनीच स्पेलिंग्स वापरात राहिली. त्यामुळे त्रांगडे झाले.

बॅटमॅन's picture

16 Feb 2016 - 2:40 pm | बॅटमॅन

हे सगळे इंग्रज जगभर फैलावण्याच्या जस्ट अगोदरचे. त्यामुळे इंग्रज आपल्या देशात आला तो अशी अडनीड स्पेलिंग्स घेऊनच.

बोका-ए-आझम's picture

16 Feb 2016 - 4:43 pm | बोका-ए-आझम

Great Vowel Shift?

मी-सौरभ's picture

16 Feb 2016 - 5:50 pm | मी-सौरभ

या विषयावर एक स्वतंत्र लेख टंक की.
ब्लोग लिहून लिन्क दिलीस तरीही चालेल.

गवि's picture

16 Feb 2016 - 2:54 pm | गवि

हॅ हॅ हॅ..खुसखुशीत.

बाय द वे, फ्रेंचशी गाठ पडलेली दिसत नाही. नाव घेऊन च्यायला वाईन मागायची पंचाईत होते.
...

झालस्तर त्या पॅरिसमधल्या champ elysees या रस्त्याचा उच्चार "शाँजेलिझे".

आय रेस्ट माय केस.

अस्वस्थामा's picture

16 Feb 2016 - 7:22 pm | अस्वस्थामा

एवढा समुद्र तरी ओलांडून कशाला जायचं? इंग्रजाच्या वेल्स मधली वेल्श भाषा सगळ्यांना पुरुन उरणारी आहे. नुसतं कार्डिफ लिहायचं तर हे स्पेलिंग पहा "Caerdydd" आणि हो हे पहा एका गावाचं नाव "Llanfairpwllgwyngyll", गावतली लहान पोरं कसा पत्ता सांगत असतील कोण जाणे. :)

अजून म्हणजे, इतर युरोपियनांच्या तर्‍हा पाहिल्या की इग्रजी लय प्रेमळ आणि समजूतदार वाटते हो. चालवून घेतेत सगळ्या दुनियेतल्या लोकांचे उच्चार. फ्रेंच आणि जर्मन लोकांना तुम्ही wine ला vine म्हटल्याबद्दल किती वाईट वाटतं (की राग येतो!) ते पाह्यलंय (मला अजून दोन्हीतला फरक कळालेला नाही).

आदूबाळ's picture

16 Feb 2016 - 9:56 pm | आदूबाळ

vine म्हणजे वेल ना?

भिंगरी's picture

16 Feb 2016 - 3:11 pm | भिंगरी

कळस म्हणजे निःशब्द (silent) अक्षरं ! ती पाठ करायची, लिहायची देखील. पण उच्चार करायचा नाही ! म्हणजे खिसा खालून न शिवण्यासारखं. दिसतो खिशासारखा, आत हात देखील घालता येतो. पण काही ठेवलं की खालून बाहेर पडतं ! हॅ हॅ हॅ हॅ ! याला भाषा म्हणायची, विनोद म्हणायचा का अक्कलशून्यपणा?

मस्तंच लिहीलाय लेख.

नया है वह's picture

16 Feb 2016 - 3:52 pm | नया है वह

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Feb 2016 - 3:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं खुसखुशीत लेख !

इंग्लिश ही जगभराच्या भाषांकडून केलेल्या उसनवारीवर बनलेली भाषा आहे (बॉरोव्ड लँगवेज)... सद्याच्या इंग्लिशमधील ८०% शब्द इतर भाषांतून आलेले आहेत !

https://en.wikipedia.org/wiki/Lists_of_English_words_by_country_or_langu...

कधी ते शब्द स्पेलिंग घेऊन पण उच्चार बदलून आले तर कधी उच्चार घेऊन पण स्पेलिंग बदलून आले. त्यात स्थानिक भाषिकांनी केलेल्या उच्चार व स्पेलिंगच्या बदलांनी अजूनच खिचडी झाली आहे.

फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि त्याचा काय उच्चार करतात हे पाहिले तर इंग्लिश परवडली असे म्हणायची पाळी येते ! :)

फ्रेंच भाषेत काय लिहितात आणि त्याचा काय उच्चार करतात हे पाहिले तर इंग्लिश परवडली असे म्हणायची पाळी येते !

अगदी!! खिरापतीसारखी मुळाक्षरं वापरुन उच्चार पळीभर तीर्थ दिल्यासारखा असतो बर्‍याचदा.

मित्रहो's picture

16 Feb 2016 - 7:24 pm | मित्रहो

खिरापतीसारखी मुळाक्षरं वापरुन उच्चार पळीभर तीर्थ दिल्यासारखा असतो बर्‍याचदा

१०० टक्के सहमत

रमेश आठवले's picture

16 Feb 2016 - 9:15 pm | रमेश आठवले

फ्रेंच भाषेतील स्पेलिंग वरून उच्चार करण्यासाठी एक नियम नेहमी लागू पडतो. तुम्ही जो उच्चार कराल तो स्पेलिंग प्रमाणे नसला पाहिजे .

आगाऊ म्हादया......'s picture

26 Feb 2016 - 7:51 am | आगाऊ म्हादया......

+१

पैसा's picture

16 Feb 2016 - 5:42 pm | पैसा

मस्त खुसखुशीत लिहिलंय! बहुगुणींचा प्रतिसाद पण भारी!

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Feb 2016 - 6:55 pm | बिपिन कार्यकर्ते

इंग्रजी व तीमधील बदलांकरता हा एक उत्तम दुवा बघावा.

http://www.vox.com/2015/3/3/8053521/25-maps-that-explain-english

यात वॉवेलशिफ्टबद्दलही आहेच.

स्वीट टॉकर's picture

16 Feb 2016 - 9:05 pm | स्वीट टॉकर

सर्वजण,
मनापासून धन्यवाद.

माहितगार, माझ्या मिसळपाववरील पहिल्या लेखाचे तुम्ही पहिले प्रतिसादगार. तुम्ही शंभर मार्क दिलेत! लेख worth झाला!

ही इंग्रजी स्पेलिंग्सची जखम कायमच ठसठसंत राहाणार. त्यावर विनोदाची फुंकर घालण्याचा प्रयत्न.

पुण्यनगरीवर टिपण्णी केल्याबाबत - मी स्वतः पुणेकर आहे. पुणेकर आणि मुंबईकर यांच्या स्वभावात मला काहीही फरक आढळला नाही. (दोन्हीकडचे छान आहेत.) आणि हो. मी स्वतः स्पष्टवक्ता नसलो तरी पुणेरी पाट्यांमधला स्पष्टपणा मला अतिशय प्रॅक्टिकल वाटतो.

स्वाती दिनेश's picture

16 Feb 2016 - 9:14 pm | स्वाती दिनेश

खुसखुशीत लेख..
गविंसारखेच मलाही फ्रेंच भाषाच आठवली पटकन. इंग्रजी बरीच बरी म्हणायची त्या फ्रेंच उच्चार आणि स्पेलिंग्ज पुढे..
स्वाती

गवि's picture

16 Feb 2016 - 9:21 pm | गवि

नायतर काय..

"कुलकर्णी" लिहून उच्चार "अल्बुकर्क" करण्यापैकी.

जेपी's picture

16 Feb 2016 - 9:20 pm | जेपी

लेख आवडला..

उगा काहितरीच's picture

16 Feb 2016 - 9:49 pm | उगा काहितरीच

लेख आवडला. "स्वीट टॉल्केर" . ;-)

गॅरी ट्रुमन's picture

16 Feb 2016 - 10:55 pm | गॅरी ट्रुमन

काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सऍपवर मला हा फॉरवर्ड आला होता:

"मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे. असेल आठवी-नववीत.पण चेन्नईहून थेट पुण्याला; मग मराठीचा गंध कसा असणार?थोडं शिकवल्यावर मी तिला काही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती. एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले. तीन चार शब्दांचे अर्थ सांगितले. शेवटचा शब्द होता-- लाव/लावणे.

मी तिला म्हटलं, 'अगं, वाक्य लिहून आणायचंस,नुसता अर्थ कसा सांगू? काहीही असू शकेल'.
एका शब्दाचा/व्हर्बचा अर्थ काहीही?तिला कळेना.
'ओके, टेल मी ऑल द मीनिंग्ज'. ती म्हणाली.
तिला वाटलं असतील दोन तीन अर्थ!
पण मराठीचा इंगा तिला अजून कळायचा होता.
मी मनात म्हटलं, चला, आजचा वेळ या लावालावीतच घालवू.
'हे बघ, तू मराठीचा क्लास लावला आहेस '. 'ओह्, आय हॅव जॉइंण्ड द क्लास '.लगेच वहीत क्लास लावणे =जॉइंन असं लिहिलं.
'क्लासला येताना तू आरशासमोर काय तयारी केलीस? पावडर लावलीस? ''ओ येस '.
'आपण पार्टीला,फंक्शनला जाताना लिपस्टिक,कुंकू/टिकली लावतो.''येस, आय अंडस्टँड '.- टु अप्लाय. तिनं लिहिलं.
'पण आपण केसांना पिन्स, हेअरबॅंडही लावतो. तिथे तो अर्थ नाही होत '. 'ओके; वी पुट ऑन दॅट''.
'आता बघ. मी चहाचा कप तोंडाला लावला, आणि बेल वाजली.
कालच्या तुझ्या पुस्तकात गाईने चाऱ्याला तोंड लावलं. आपण बाळाच्या गालाला हात लावतो. इथे काय? प्रत्यक्ष स्पर्श करतो. टच्! '
चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली.
म्हणाली, 'हां, तुम्ही पार्कमधला बोर्ड वाचून दाखवला ना त्यादिवशी; फुलांना हात लावू नये.
आणि त्या छोट्याला त्याची आई म्हणाली ना, 'पुस्तकाला पाय लावू नको. सो—टु टच्.'
'मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार लाव. मीन्स शट् द डोअर '.
'हो. दार लाव किंवा दार बंद कर म्हणजे तेच '.
'मीन्स लाव,बंद कर सेम! पण मग तुम्ही दिवा लावते म्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर!'
'बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत लाव = शट् = बंद कर.
पण दिवा लाव = स्विच ऑन.
म्हणूनच तुला म्हटलं वाक्य लिहून आण बाई!
संदर्भ/रेफरन्स शिवाय नुसता लाव कसा समजणार?
आणखी खूप ठिकाणी लावणे हे व्हर्ब आपण वापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या गोंधळात नाही टाकत. '
'नो,नो. प्लीज टेल मी मोअर '. म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली.
'बरं! आता अपण इलेक्ट्रिकचा दिवा, टी.व्ही, रेडिओ इ. लावतो तेव्हा स्विच ऑन करतो. पण देवासमोर नीरांजन,उदबत्ती,समई लावतो तेव्हा काय करतो? लाइट ऑन! पेटवतो.फटाके लावतो, आग लावतो, गॅस लावतो = पेटवतो.'
ती भराभरा लिहून घेत होती.
तेवढ्यात आतून कुकरची शिट्टी आली.
'बघ, मी कुकर लावलाय. दोघी हसलो.
आधीचा कुठला अर्थ आहे का यात?
खरं तर यात अनेक क्रिया आहेत.
सगळ्याला मिळून एक सुटसुटीत शब्द —
'लावलाय.'
आंघोळीचं पाणी लावलंय मधे असंच! '
'मी रोज सकाळी अलार्म लावते'. ती अचानक म्हणाली आणि हसत सुटली.
ओह्! एव्हरीथिंग इज सो डिफरंट! '
'सो कनक्लूजन? –एव्हरी लाव इज डिफरंट! '
जिगसॉ पझल घेऊन बसलेल्या नातवाला मी हाक मारली. तर तो म्हणाला,
'थांब गं आजी! मी हे लावतोय ना!'
'हे,लुक. तो लावतोय = ही इज अरेंजिंग द पीसेस.
टु अरेंज! '
'तो शहाणा आहे.वह्या-पुस्तकं कपाटात नीट लावून ठेवतो.
कपाट छान लावलेलं असतं त्याचं'.
वहीत लिहून घेऊन ती उठली, गुड बॉय, असं त्याचं कौतुक करून ती घरी गेली.
पण माझं विचारचक्र चालूच राहिलं.आता मनाच्या अदृश्य स्क्रीनवर लाव, लावते, लावले हे सगळं बोल्ड मधे यायला लागलं.
रोजच कोणालातरी आपण फोन लावतो. बडबड, कटकट करणाऱ्यांना आपण म्हणतो, 'ए, काय लावलंय मगापासून?'
आजीने कवळी लावली = फिक्स केली

आणि आजी कवळी लावते. म्हणजे रोज वापरते.(यूज)
पट्टा लाव=बांध. बकल, बटन लाव = अडकव
बिया लावणे, झाडे लावणे = पेरणे, उगवणे.
इतके इतके मजूर कामाला लावले.(एम्प्लॉइड.)
वजन ढकलणारा,ओढणारा नेट/जोर लावतो. (अप्लाइज स्ट्रेंग्थ)
आपण वडिलांचं, नवऱ्याचं नाव लावतो म्हणजे काय करतो?
सुंदर गोष्ट मनाला वेड लावते. या शब्दांच्या खेळानंही मला वेड लावलं.
इतक्यात आमची बाई आली. आल्याआल्याच म्हणाली, 'विचारलं काओ सायबांला?' (मुलाच्या नोकरीबद्दल)
'विचारलं की, पाठव म्हणाले उद्या '.
'हा, मंग देते त्याला लावून उद्या'. (ओहो! लावून देते = पाठवते!)
आणि लावालावी मधे तर कोण,कुठे काय लावेल!
अशी आपली ही मायमराठी! शिकणाऱ्याला अवघड, पण आपल्याला सुंदर!
आता 'हे आर्टिकल सगळ्यांना ग्लोबल मराठीवर लाव' '. घरच्यांनी सल्ला दिला.
'आणि नाही लावलं तर मनाला लावून घेऊ नको '
अशी चेष्टाही केली"

मराठीत लावणे या क्रियापदाचे इतके वेगवेगळे अर्थ होतात. इतरही अनेक क्रियापदांविषयी असे लिहिता येऊ शकेल.

इंग्रजीतल्या स्पेलिंगला नियमापेक्षा अपवाद जास्त म्हणून मराठीतील मिसळपाव.कॉमवर इंग्रजीत स्पेलिंग्ज तर्कशून्य का ही चर्चा होत असेल तर तशीच इंग्रजीतील एखाद्या पिझ्झाबर्गर.कॉमवर मराठीतील क्रियापदे तर्कशून्य का (परस्परांशी काहीही संबंध नसलेल्या अनेक वेगवेगळ्या परिस्थितीत एकच क्रियापद कसे "लावता येते") अशी चर्चा होत असेल का?

मराठी ही आपली मातृभाषा म्हणून अमृतातही पैजा जिंकत वगैरे असली आणि आपण या गोष्टीला भाषेची लवचिकता वगैरे म्हणत असलो तरी अशा गोष्टींमुळे नव्याने मराठी शिकत असलेल्यांनाही त्रास होतच असेल की. आपल्याच भाषेची ही बाजू अनेकदा आपल्याला अतीपरिचयामुळे लक्षातही येत नाही. खरे तर इतर भाषांमधील कुठल्या तरी गोष्टीला आपण तर्कहिन म्हणणे हे असे खुसखुशीत लेख लिहिण्या-वाचण्यापुरतेच आणि त्यावरून थोडेफार मनोरंजन करण्यापुरतेच ठेवावे असे मला वाटते. कसली ती इंग्रजी (किंवा अन्य कोणतीही भाषा), "आमची मराठी बघा कशी लवचिक" म्हणून फुकाचे अभिमान देत मिशीला पिळ नको.

डिस्क्लेमर: ही गोष्ट मी एक जनरल गोष्ट म्हणून लिहित आहे. लेखकाला किंवा अन्य कोणाही सदस्याला तसे वाटते असे मला म्हणायचे नाही. हा खुसखुशीत लेख मलाही आवडला आहेच.

अहो, आपल्या मराठीत क्रियापदे इंग्रजीपेक्षा खूप कमी आहेत. अर्थात ती लॉजिकल नाही असे कुणी म्हणु शकणार नाही़.
कालच माझ्या मुलाला (वय ६) क्रो आणि क्रोकोडाईल या स्पेलिंगचा फरक सांगतांना माझी भंबेरी उडली.

गामा पैलवान's picture

17 Feb 2016 - 2:37 am | गामा पैलवान

डोस्क्याचा मासळीबाजार करून घ्यायचा असेल तर ससेक्स बोलीभाषेतले उच्चार पहावेत.

ही ससेक्समधल्या गावांची यादी आहे :

----------------------------------------------------------------------
स्थानिक उच्चार - वर्णक्रम (स्पेलिंग) - देवनागरी
----------------------------------------------------------------------
Ahson - Alciston - आह्सन
Arndel - Arundel - आर्नडेल
Blashnun - Blatchington - ब्लाशनन
Chanklebury - Chanctonbury - शांकलबरी
Charnton - Chalvington - शाऽनटन
Chiddester - Chichester - चिडेस्टाऽ
Envul - Henfield - एन्वूल
Furrel - Firle - फाराल
Gorun - Goring - गाओरन
Heffel - Heathfield - हेफेल
Helsum - Hailsham - हेल्सम
Hors-am - Horsham - हॉर्स-अम
Lunnon - London - लुनन
Medhas - Midhurst - मेडास
Merricur - America - 'मरिकऽऽ
Pemsy - Pevensey - पेम्झी
Pettuth - Petworth - पेटअथ
Stammer - Stanmer - स्टॅमर
Tarrun - Tarring - टारन
Simson - Selmeston - सिम्सन
----------------------------------------------------------------------

स्रोत : https://en.wikipedia.org/wiki/Sussex_dialect#Places

ग्लासगोची इंग्रजी तर महाभयानक आहे. ती इंग्लिश लोकांनाही समजत नाही. ग्लासगोतल्या स्थानिक ग्राहकांसाठी कॉल सेंटरात नोकरभरती करायच्या वेळेस English with glaswegian accent अशी चक्क जाहिरात करतात.

-गा.पै.

आदूबाळ's picture

17 Feb 2016 - 2:48 am | आदूबाळ

केविन ब्रिजेस नावाचा एक स्टँडअप कॉमेडियन आहे. त्याचे ग्लासगोवियन / स्कॉटिश बोलीतले कार्यक्रम जरूर ऐका. तो सिनेमाचं तिकीट काढण्यासाठी फोन करतो तो प्रसंग महालोल आहे.

मयुरेश फडके's picture

18 Feb 2016 - 2:28 pm | मयुरेश फडके

पार भुस्काट झालय डोक्याच. बापरे एव्हढा फरक फक्त इग्रजीत ???

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2016 - 10:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

महाराष्ट्रात ३०७ हजार चौ किमी क्षेत्रफळावर ११.५ कोटी मराठी भाषिक राहतात. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जिल्ह्यामधल्या मराठीत तिचे वेगळेपण ओळखता येईल इतके फरक आहेत.

युकेत २४२ हजार चौ किमी क्षेत्रफळावर ६.५ कोटी लोक राहतात. त्यामुळे तेथे विभागवार इंग्लिशमध्ये फरक असणे सहाजिक आहे. जगात देशोदेशी बोलल्या जाणार्‍या इंग्लिशमध्येही बरेच फरक असतात व त्यावरून अनेक देशांच्या नावांवरून तेथिल इंग्लिश भाषा ओळखली जाते; उदाहरणार्थ, अमेरिकन इंग्लिश, ऑस्ट्रेलियन इंग्लिश, इंडियन इंग्लिश (भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि नेपाळमध्ये बोलली जाणारी इंग्लिश), इ.

असे फरक सगळ्याच भाषांमध्ये आढळतात... म्हणूनच म्हणतात की, दर २० मैलांवर भाषा बदलते.

डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या दुव्यात म्हटल्याप्रमाणे, इंग्रजीने अनेक भाषांतून आलेले शब्द सामावून घेतल्याने हा स्पेलिंगचा घोळ निर्माण झाला आहे. 'कर्नल' शब्दाबाबत बोलायचं तरः

ह्या शब्दाचं मूळ इटालियन. सैन्याची एखादी तुकडी एका रांगेत चालत असताना, त्या रांगेवर - इंग्लिश column, इटालियन colonna - नियंत्रण ठेवणारा अधिकारी तो कोलोनेलो (colonnello). हाच शब्द जेव्हा फ्रेंचमध्ये आला तेव्हा त्यातला 'ल' बदलून 'र' झाला आणि त्याच शब्दाचा फ्रेंच उच्चार 'कोरोनेल'च्या जवळपास जाणारा होऊ लागला. फ्रेंचमधून जे हजारो शब्द इंग्लिशने उचलले, त्यात ह्या 'कोरोनेल'चाही समावेश होता.

तत्पूर्वी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. जवळजवळ सतराव्या शतकापर्यंत इंग्रजीत एकाच शब्दाची निरनिराळी स्पेलिंग्ज अस्तित्वात असणं, ही अगदी सामान्य बाब होती. दस्तुरखुद्द शेक्सपिअरनेही आपल्या नावाचे स्पेलिंग सध्याच्या प्रचलित Shakespeareप्रमाणे कधीच लिहिलं नाही. १६११ मध्ये प्रसिद्ध झालेलं 'किंग जेम्स बायबल', छपाईतल्या तंत्रातली प्रगती आणि वाढती साक्षरता ह्यासारख्या कारणांमुळे पुढे एका शब्दाचे एक ठरावीक स्पेलिंग नक्की होत गेले. ब्युबॉनिक प्लेगच्या साथीमुळे लंडनच्या दिशेने झालेल्या मोठ्या स्थलांतरामुळे इंग्लिशमधल्या स्वरांच्या उच्चारात घडून आलेल्या बदलांचाही (ग्रेट वॉव्हल शिफ्ट) यात मोठा वाटा होता.

फ्रेंचमधून पंधराव्या शतकात जेव्हा हा शब्द इंग्लिशमध्ये आला, तेव्हा अर्थातच त्याची अनेक स्पेलिंग्ज रूढ होती. पण coronel हे स्पेलिंग आणि 'कोरोनेल' हा उच्चार त्यातल्या त्यात सर्वमान्य होता. योगायोगाने याच काळात ग्रीक आणि लॅटिनमधले क्लासिक साहित्य इंग्लिशमध्ये येऊ लागले होते. १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपलच्या (आजचे इस्तंबूल) झालेल्या पाडावामुळे तेथील ग्रीक साहित्याचे व व्याकरणाचे विद्वान, शास्त्रज्ञ, कवी, संगीतकार, खगोलशास्त्रज्ञ, वास्तुविशारद पश्चिम युरोपाकडे वळले. रेनेसान्सचा पाया रचण्याचे काम याच 'ब्रेन ड्रेन'मुळे झाले असं म्हणायला हरकत नसावी.

भाषांतराच्या ह्या सुवर्णयुगात जेव्हा इंग्लिश भाषांतरकारांचे इटालियन सैनिकी साहित्याकडे लक्ष गेले तेव्हा त्यांनी 'कोरोनेल'च्या स्पेलिंगचे शुद्धीकरण करून ते मूळ इटालियन स्पेलिंगशी - colonnello शी नाते सांगणारे colonel असे केले. तेव्हापासून कर्नल हा उच्चार आणि त्याचे वरकरणी विसंगत वाटणारे colonel हे स्पेलिंग अस्तित्वात आले.

'ल' आणि 'र' मधल्या ह्या संगीतखुर्चीला भाषाशास्त्रात 'लिंग्विस्टिक डिस्सिमिलेशन' (linguistic dissimilation) अशी संज्ञा आहे. त्याचे उपप्रकार आणि अधिक उदाहरणे येथे वाचता येतील. पण ही अदलाबदली केवळ युरोपियन भाषांतच होते असं नाही. 'पूर्वरंग'मध्ये पुलंनी जपानमध्ये 'परूळेकर'चा उच्चार पालुरीकर कसा होतो, त्याचा विनोदी किस्सा सांगितला आहे.

(अन्यत्र पूर्वप्रकाशित लेखातून)

बाकी समजून घेतले, तर फ्रेंच उच्चारांचे नियम इंग्रजीपेक्षा बरेच सोपे आणि युनिफॉर्म आहेत. मात्र थेट पुलंनीच यावरच्या विनोदांची परंपरा घालून दिल्याने (महाजनो येन गता: स शान्जेलिझे? :)), मराठी जनांना हे बहुधा स्वीकारणं जड जात असावं असं स्वानुभवावरून वाटतं.

सुनील's picture

17 Feb 2016 - 8:31 am | सुनील

अगदी हाच परिच्छेद शोधत होतो, पण काल मिळाला नव्हता!

बाकी समजून घेतले, तर फ्रेंच उच्चारांचे नियम इंग्रजीपेक्षा बरेच सोपे आणि युनिफॉर्म आहेत

सहमत.

वरकरणी अनियमित भासणार्‍या फ्रेंच स्पेलिंग-नियमात भलतीच नियमितता आहे!

सहमत, इंग्रजी सोडल्यास अन्य युरोपियन भाषांचे स्पेलिंगनियम एकदम नियमित आहेत-अगदी भारतीय भाषांसारखेच. पण सर्व युरोपियन भाषांकडे आपण इंग्रजीच्या चष्म्यातून पाहत असल्यामुळे त्यांची स्पेलिंग्स अनियमित वाटतात इतकेच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2016 - 3:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

फ्रेंच शब्दांचे उच्चार इंग्लिशपेक्षा जास्त फोनेटिक आहेत (अक्षरांच्या फ्रेंचमधल्या उच्चारांचे नियम समजून घेतल्यास) हे नक्की. पण हातभर लांब शब्द लिहून त्याचा उच्चार एखाददुसर्‍या सिलॅबलवर भागविण्याचे फ्रेंच कसब निर्विवाद आहे, इकडे माझा रोख होता :)

जर्मन भाषा मात्र (अक्षर शब्दाच्या सुरुवातीला आहे की शेवटी यावरून त्याच्या उच्चारात होणारा बदल जमेस धरूनही) वट्ट फोनेटिक आहे.

बॅटमॅन's picture

17 Feb 2016 - 6:13 pm | बॅटमॅन

डच भाषाही तशीच आहे, एक्दम फोनेटिक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2016 - 6:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

दोन्ही पश्चिम जर्मेनिक भाषा आहेत. अर्थातच, त्या दोन सख्ख्या बहिणींत खूप साम्य आहे.

German is a West Germanic language spoken mainly in Germany, Austria, Switzerland, Liechtenstein, Belgium, Luxembourg and Italy.

Dutch is a West Germanic language spoken mainly in the Netherlands and Belgium.

गामा पैलवान's picture

17 Feb 2016 - 7:05 pm | गामा पैलवान

चेक भाषा फोनेटिक आहे असं आमची एक चेक मैत्रीण आम्हाला ( = मला आणि बायकोला) म्हणालेली.
-गा.पै.

होबासराव's picture

19 Feb 2016 - 4:35 pm | होबासराव

माझा तिथे जो कलिग होता त्याचे नाव Jan पण उच्चार Yan असा करायचे, WML ला VML म्हणायचे.

गॅरी ट्रुमन's picture

19 Feb 2016 - 4:42 pm | गॅरी ट्रुमन

माझा तिथे जो कलिग होता त्याचे नाव Jan पण उच्चार Yan असा करायचे,

जर्मन भाषेत J चा उच्चार य असा करतात. कदाचित डच भाषेतही तसेच असेल.

(जर्मन भाषा शिका या पुस्तकावरून जर्मन शिकायचा दोनदा अयशस्वी प्रयत्न केलेला) ट्रुमन

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2016 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

जर्मनमध्ये...
J ला योट् म्हणतात आणि त्याचा उच्चार य सारखा होतो; उदा : ja (या) = yes
V ला फाऊ म्हणतात आणि त्याचा उच्चार फ सारखा होतो; उदा : von (फोन) = of / from
W ला वी म्हणतात आणि त्याचा उच्चार व सारखा होतो; उदा : wagen (वागन) = car

(जालावरून साभार)

मैत्र's picture

19 Feb 2016 - 11:18 pm | मैत्र

डच भाषा बर्‍याच ठिकाणी जर्मन भाषेला जवळची आहे.
पण अर्थात काही विशिष्ट गोष्टी युनिक अशा आहेत.

उदा: g चा उच्चार हा डच मध्ये जवळजवळ अरेबिक ख सारखा (म्हणजे कणेकर म्हणतात तसं इस वख्त मधला ख खूप लांबला की दिलीपकुमार) .. gezellig या शब्दाचा उच्चार साधारणतः खजॅलिख असा होतो !!
नेमका मराठीत लिहिणंही अवघड आहे.

तसंच r -- शब्दाच्या शेवटी येणारा r एकतर खूप जास्त रोल केला पाहिजे किंवा g - ख च्या जवळ गेला पाहिजे.
अशा गमती जमती सोडल्या तर भाषा फोनेटिक आहे जर्मन सारखीच.

काही वेळा इंग्रजी मध्ये जे आहे त्याच्या उलट
म्हणजे poel - dutch = pool - english
boot - dutch = boat - english

बॅटमॅन's picture

22 Feb 2016 - 2:59 pm | बॅटमॅन

g = ख़, तो घसा खरवडलेला ख. नेहमीचा ख नव्हे.

बाकी का? साठी डचमधील शब्द आहे "वारोम". त्यातला र हा नेहमीचा र नसून त्या खरवड-ख च्या एकदम जवळचा आहे.

(इक हाऊड फान नीदरलांड्स टं लेरेन).

गामा पैलवान's picture

18 Feb 2016 - 6:40 pm | गामा पैलवान

माहितीबद्दल धन्यवाद, नंदन!

तुमचा प्रतिसाद वाचून मुंबईत पवईच्या जवळ असल्फा गाव आहे त्याची आठवण झाली. त्या परिसरात नाव आसनपे नावाचे गाव असल्याचा उल्लेख सापडतो. (बहुतेक महिकावातीची बखर). तर त्याचे इंग्रजी काळात Asanpe नामे स्पेलिंग बदलून Asalfa झाले असावे असा तर्क आहे. इथे n चा l झालेला दिसतो.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2016 - 10:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्थानिक नावांची इंग्रजांनी जगभर प्रचंड मोडतोड केली आहे. त्यातील काही बदल नकळत/नजरचूकीने/अज्ञानाने, काही मूळ नावांचे स्पेलिंग इंग्लिशमध्ये बसवताना होणार्‍या बदलांमुळे तर काही केवळ जेत्याच्या गुर्मीने घडलेले आहे. खडकीचे किरकी/किर्की, शीवचे सायन, इ.

घाटावरचे भट's picture

19 Feb 2016 - 1:21 pm | घाटावरचे भट

खडकीचे नाव जरी kirkee केले असले तरी ते उच्चारी kir-kee असे नसून kirk-ee असे आहे. (kirk चा उच्चार 'कॅप्टन कर्क' मधला 'कर्क' सारखा).

राही's picture

23 Feb 2016 - 3:26 pm | राही

अन्त्य 'ए'चा आ' होण्यासाठी इंग्रजच कशाला पाहिजे? पूर्ण कोंकणपट्टीत नपुंसकलिंगी अंत्य 'एं'चा उच्चार 'आं' (आता अनुस्वारविरहित फक्त 'आ') करण्याकडे कल आहे. 'एं'कारान्त ग्रामनामे सहसा नपुंसकलिंगी असतात. जसे- दिवें, आपटें, खंडाळें, रोहें, कळवें, गणपतिपुळें, मसुरें, आचरें, आरनाळें, कोंडिवटें, वांदरें, या सर्वांचे स्थानिक उच्चार 'आ'कारान्त असतात. उदा. दिवा, आपटा, रोहा, आरनाळा ,कर्नाळा वगैरे. नुसती ग्रामनामेच नव्हेत तर नपुंसकलिंगी 'एं'कारान्त बहुतेक शब्द 'आ'कारान्त उच्चारले जातात. गोमटें-गोमटां, खुरपें-खुरपा, मढें-मढा वगैरे. देशावरही हा कल आहेच.
आणि शब्दांची मोडतोड आपोआपही होत असते. माल्यकूटाचे मालखेड, राजगृहचे राजगिर, वर्धमानचे बर्द्वान्,क्षारवापीचे खारबाव वगैरे. काळाच्या ओघात संस्कृतमधल्या लांबलचक नावांचे देशीकरणात लघुरूप झाले. उदकमंडलम्, पर्णवल्ली,सुवर्णपुर, कृष्णगिरी ही नावे सुटसुटीत झाली.
आसनपेचा उच्चार आसनपाच होत होता असेल कदाचित. न चा ल झाला असेल उच्चारात. पण इंग्रज लोक भारतीय नावांचे त्यांच्याकडून योग्य उच्चार व्हावेत अशीच स्पेलिंग्ज़ बनवत असत.

चौकटराजा's picture

17 Feb 2016 - 6:45 am | चौकटराजा

इसको बोलता है थ्रेड ! सर्व प्रतिसाद ही धाग्याला बळ देताहेत हे अनुभवून नवे लेखन विभाग धन्य झाला असेल. बाकी इन्ग्रजी परवडली पण फ्रेन्च ? आई ग.........

मस्त लेख आणि प्रतिसाद. मजा आली वाचायला.

अन्या दातार's picture

17 Feb 2016 - 3:05 pm | अन्या दातार

अप्रतिम चिंध्या फाडल्यात इंग्रजीच्या. हहपुवा होत होती लेख वाचताना. =))

ऋषिकेश's picture

17 Feb 2016 - 4:01 pm | ऋषिकेश

लेख छान, नंदनचा प्रतिसाद अधिकच उत्तम!

स्वीट टॉकर's picture

17 Feb 2016 - 7:48 pm | स्वीट टॉकर

सर्वजण,

लेख लिहिताना त्याच्या मागे माझा अजिबात अभ्यास नाही. मात्र प्रतिसाद खरोखरंच अभ्यासपूर्वक लिहिलेले आहेत. अतिशय कौतुकाची गोष्ट आहे.

पुन्हा एकदा धन्यवाद!

यावर विं दा करंदिकरांची कविता आहे जुनी.

रॉजरमूर's picture

19 Feb 2016 - 12:57 am | रॉजरमूर

असला उफराटे पणा आपल्याकडे पण आहेच की
गावे त्यांचे स्पेलिंग आणि उच्चार
या विषयी बालवयातच गोंधळ उडालेला
बेळगाव -Belgum
बेळगाव -Belgum स्पेलिंग वरून उच्चार बेलगम होईल पण आपण बेळगाव म्हणायचे आता बेळगाव जळगाव मालेगाव ह्याच्या स्पेलिंग मध्ये
gaon का लावायचे gav किंवा gaav का नाही हा प्रश्न लहानपणी नेहमी पडायचा अनेक शिक्षकांना या विषयी मी विचारायचो पण त्यांनाही
याचे निरसन नाही करता आले
तसेच पुण्यातील खडकी -Kirkee वास्तविक स्पेलिंग Khadki हवे पण ते आहे किरकी

बरं आता ठेवली असतील इंग्रजांनी त्यांच्या सोयीनुसार नावे,नसेल त्यांची जीभ वळत पण आता ते जाऊन ७० वर्षे व्हायला आलीत तरी आपले लोक
तेच चुकीचे स्पेलिंग authentic म्हणून मिरवतात या गोष्टीचा प्रचंड संताप येतो .
आता आता पर्यंत वसई चे Basin हे नाव रेल्वे स्टेशन वर झळकत होते .
लोकल मधील इंग्रजाळलेल्या कॉलेज कन्यका आपसांत बोलत असत तेव्हा व्हेअर डू यू लिव या प्रश्नावर आय लिव इन "बेसिन " हे उत्तर ऐकून आमची चांगली करमणूक होत असे. तसेच

चंदीगड -Chandigarh या नावाचे बाबतीत chandigad का नाही चन्दिगर्ह असे चुकीचे का लिहायचे ?

राही's picture

23 Feb 2016 - 4:37 pm | राही

जेव्हा ब्रिटिशांनी बेळगाव हा शब्द प्रथम ऐकला असेल तेव्हा तो बेळगांव असा अनुस्वारयुक्त ऐकला असेल. आता इंग्रजी स्पेलिंगमध्ये या अनुस्वाराला नक्की कुठे बसवले असता 'बेळगाव' या उच्चाराच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा उच्चार साधता येईल असा प्रश्न त्यांना नक्कीच पडला असेल. आपला 'आ' हा उच्चार तंतोतंत त्यांच्याकडे नाही. फादर, रादर, आस्क यातले आ थोडे भिन्न आहेत. तेव्हा त्यांनी Belgaon' हे त्यांच्याकडून त्यातल्या त्यात बरोबर उच्चार होईल असे स्पेलिंग बनवले. महाराष्ट्राबाहेरील गावांची नावे ही मराठीतल्याप्रमाणे उच्चारली जात नाहीत. तेव्हा आपण जरी गाव असा उच्चार केला तरी इतर लोक गांवच म्हणणार. वसईंचे बसीन हेही उच्चारानुसार झाले आहे. मूळ वसईं हा उच्चार स्थानिक बोलीत अनुस्वारयुक्त होता. अजूनही जुने मूळ स्थानिक लोक वस्सईं असेच म्हणतात. अय किंवा अई या उच्चारासाठी पोर्तुगीज़ आणि कित्येक अन्य भाषांमध्ये ei (Einstein) हे वर्ण वापरले जातात. आणखी म्हणजे आपला जो जोरकस 'व' आहे तो त्यांच्यात नाही. w चा त्यांचा उच्चारही वेगळा आहे. हे सर्व लक्षात घेऊन त्यातल्या त्यात योग्य उच्चारी असे Bassein हे स्पेलिंग बनवले गेले. चंडीगढ किंवा इतर अनेक गढी-गढांचे आणि 'ड'युक्त शब्दांचे उत्तरभारतीय, पंजाबी उच्चार आपल्यासारखे नाहीत. त्यांच्याकडे एक अधिकचा नुक्तावाला ढ, ड असतो आणि त्याच्या उच्चार आपल्यापेक्षा वेगळा, थोडा हलका असतो. तो इंग्लिशमध्ये त्यातल्या त्यात 'rh' दाखवता येतो. खडकीचेही तसेच आहे. 'के' चा त्यांचा उच्चार ख होतो ( उदा फिख्याड्ली) आणि ड चा 'r' च्या जवळपास. म्हणून त्यांना योग्य उच्चार करता येईल असे Kirk-i' हे स्पेलिंग त्यांनी बनवले.
इंग्रज लोक नामकरण, लेखन या बाबतीत दक्ष असत.

मार्मिक गोडसे's picture

19 Feb 2016 - 12:59 pm | मार्मिक गोडसे

OK चे दिर्घरूप,स्पेलिंग व अर्थ काय आहे?

स्वीट टॉकर's picture

19 Feb 2016 - 4:14 pm | स्वीट टॉकर

रॉजर मूर - तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. आपल्याला आता सरळ सोपी स्पेलिंग्स करायला काहीच हरकत नाही. आ ला डबल ए वापरावा.

स्वीट टॉकर's picture

19 Feb 2016 - 4:15 pm | स्वीट टॉकर

मार्मिक गोडसे - मी शिकलो होतो त्याप्रमाणे तो शब्द okay असा आहे. त्या चा शॉर्ट फॉर्म OK असा झाला. खरं खोटं देव जाणे!

चिगो's picture

19 Feb 2016 - 4:47 pm | चिगो

मस्त, खुसखुशीत लेख..

बहुगुणी आणि गॅरी ट्रुमन साहेबांचा प्रतिसादही चपखल..

“Never make fun of someone who speaks broken English. It means they know another language.”

क्या बात हैं..

हुप्प्या's picture

19 Feb 2016 - 9:50 pm | हुप्प्या

बर्नॉर्ड शॉने इंग्रजी भाषेच्या वैशिष्ट्यांची व वैगुण्यांची भरपूर टिंगल केलेली आहे.
फिशचे स्पेलिंग जी एच ओ टी आय असे होऊ शकते असे त्याचे विधान प्रसिद्ध आहे. फ, इ, श वगैरे उच्चार अन्य शब्दांत जी एच, ओ व टी आय अशा अक्षरांनी निर्माण केले असतात त्यावर त्याची ही मखलाशी होती.

त्याचे असेही वाक्य आहे की एका इंग्रजाने (बोलण्याकरता) तोंड उघडले की दुसर्‍या कुठल्यातरी इंग्रजाला त्याच्या बोलण्याचा तिटकारा वाटलाच समजा! (म्हणजे, इंग्रजी बोलण्याच्या अनेक पद्धती आहेत आणि त्या प्रकारे बोलणारे एकमेकाला पाण्यात पहातात). पूर्वी हे इंग्लंडच्या विविध भागात चालत असेल. पण आज ते जगभराच्या दूरदूरच्या कानाकोपर्‍यात होत असल्यामुळे ते जास्त जाणवेल.
अजून एक शॉचे वाक्य : इंग्लंड आणि अमेरिका हे एका समान भाषेने विभागले दोन देश आहेत!

अशी एक किंवदंता आहे की फार पूर्वी इंग्लंडच्या एका शहरात एका श्रीमंत माणसाने पैज लावली की २४ तासात एक नवा शब्द मी इंग्रजी भाषेत आणून दाखवीन. मग त्याने एका दिवसात जवळपासच्या सगळ्या गावात नोकर पाठवून एकच शब्द जिथे मिळेल तिथे, भिंतीवर, फलक ठोकून रंगवला. एका दिवसात तो शब्द सगळ्यांच्या तोंडात आला आणि तो माणूस पैज जिंकला. आज फेसबुक आणि ट्विटर् असल्यामुळे ते जास्त सहज शक्य आहे.

तो शब्द म्हणजे क्विझ. (ही बहुधा एक दंतकथा आहे!)
डेट (कर्ज), रिसिट, डाउट (आणि इतर) ह्या शब्दांतले उपटसुंभ बी आणि पी हे नंतर घुसवलेले आहेत. जुन्या इंग्रजी भाषेतील मूळ शब्दात ही अडगळ नव्हती. पण काही ढुढ्ढाचार्यांना असे वाटले की ज्या मूळ लॅटिन शब्दापासून हे शब्द बनले आहेत त्यांच्याशी जास्त साम्य असणारी स्पेलिंगे बनवली तर इंग्रजीची शान वाढेल आणि म्हणून ही अनुच्चारित अक्षरे चक्क घुसडली आहेत!

मधुरा देशपांडे's picture

19 Feb 2016 - 10:04 pm | मधुरा देशपांडे

लेख आवडला. खुसखुशीत लिहिलंय. प्रतिसादही माहितीपूर्ण.
पण अशा गमती जमती प्रत्येक भाषेत असतील. फोनेटिक असूनही जर्मन भाषेच्या इतर अनेक गमतीजमती आहेत, फोनेटिकलाही काही अपवाद आहेत. एक साधा शब्द जर इतर ४ भाषांमध्ये ३ अक्षरी असेल, तर जर्मन मध्ये तोच शब्द १५ अक्षरी असू शकतो. जर्मन भाषेतील विचित्र नियमांबद्दल, शब्दांबद्दल अनेक विनोदी लेख, व्हिडिओ देखील बरेच आहेत आणि ते पटतातही. जेवढा त्या भाषेशी संबंध येतो, तसे ते लक्षात येऊ लागतात. प्रत्येक प्रांतागणिक बोलीभाषा अजूनच वेगळी आहे. इंग्रजीची सवय असल्यामुळे असेल पण सतत जर्मन बोलावे लागले तर इंग्रजी सुद्धा खूप सोपी वाटते बरेचदा. :)

गॅरी ट्रुमन's picture

22 Feb 2016 - 2:46 pm | गॅरी ट्रुमन

एक साधा शब्द जर इतर ४ भाषांमध्ये ३ अक्षरी असेल, तर जर्मन मध्ये तोच शब्द १५ अक्षरी असू शकतो.

या कारणामुळे मी पुस्तके वाचून जर्मन शिकायचा नाद सोडून दिला--एकदा नाही तर दोनदा.एवढे लांबलचक शब्द जर्मन लोक कसे काय लक्षात ठेवतात कोणास ठाऊक. मित्रत्व किंवा सॉलिडॅरीटी यासाठी Freundschaftsbezeigungen हा काहीसा लांबलचक जर्मन शब्द एकाने मध्यंतरी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला होता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2016 - 4:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

मित्रत्व किंवा सॉलिडॅरीटी यासाठी Freundschaftsbezeigungen हा काहीसा लांबलचक जर्मन शब्द एकाने मध्यंतरी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला होता.

अश्या शाब्दीक वेल्डिंगबाबतीत जर्मनचे संस्कृत भाषेशी खूप साम्य आहे. :) हे लांबलचक शब्द म्हणजे समास असतात...

Freund + schafts + bezeigungen = friend + ship / ly + relation = मित्रत्वाचे नाते.

त्यातल्या मूळ शब्दांचे अर्थ माहित असले तर त्या सामासिक शब्दाचा अर्थ समजणे सोपे असते.

गॅरी ट्रुमन's picture

22 Feb 2016 - 6:04 pm | गॅरी ट्रुमन

त्यातल्या मूळ शबदांचे अर्थ माहित असले तर त्या सामासिक शब्दाचा अर्थ समजणे सोपे असते.

पटले. असे काहीतरी लॉजिक असणार असे वाटलेच होते. मी स्वतः शिकायचा प्रयत्न केला त्यावेळी त्या लॉजिकपर्यंत पोचूच शकलो नव्हतो :(

मधुरा देशपांडे's picture

22 Feb 2016 - 6:24 pm | मधुरा देशपांडे

हो बरोबर आहे, असं करून अर्थ पण कळायला सोपं जातं आणि उच्चार सुद्धा. पण तरीही ते उच्चार, ते शब्द लक्षात ठेवणे हे सतत वापरताना नको वाटतं कधीतरी. त्यातही खूप तांत्रिक बाबी किंवा वैद्यकीय क्षेत्रातले असतील तर मग विचारायलाच नको. जर्मन भाषेत डॉक्टरांशी संभाषण, ही प्रत्येक वेळी मोठी परीक्षा असते. ;)

अन्य भाषांच्या तुलनेत जर्मन भाषा ऐकावयास कशी वाटते? याबद्दलचा हा एक धमाल व्हिडिओ पहा.

https://www.youtube.com/watch?v=-_xUIDRxdmc

मधुरा देशपांडे's picture

22 Feb 2016 - 7:33 pm | मधुरा देशपांडे

येस्स. हेच ते व्हिडिओ. याचा रोज प्रत्यय येतो. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2016 - 2:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

तिमा's picture

22 Feb 2016 - 7:42 pm | तिमा

स्पेलिंग्ज शिवाय, जुने, आम्ही शिकलेले तर्खडकरी उच्चार आणि इंग्रजी माध्यमातून शिकलेली आमची पुढची पिढी यांतही बराच फरक पडतो. त्यांत आणखी कहर, म्हणजे अमेरिकेत गेलेली आमची पुढची पिढी जे उच्चार करतात त्यापुढे आम्ही गावंढळ ठरतो.

प्रमोद देर्देकर's picture

23 Feb 2016 - 1:15 pm | प्रमोद देर्देकर

इंग्रजी भाषेत स्वतःचे असे फक्त १२०००च शब्द आहेत बाकी सगळे लॅटीन , फ्रेन्च , ग्रीक, वगैरे शब्द त्यात येवुन मिसळलेले आहेत.
पहा राजीव दिक्षीत यांचा हा व्हिडीयो.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2016 - 1:36 pm | गॅरी ट्रुमन

इंग्रजी भाषेत स्वतःचे असे फक्त १२०००च शब्द आहेत बाकी सगळे लॅटीन , फ्रेन्च , ग्रीक, वगैरे शब्द त्यात येवुन मिसळलेले आहेत.

तामिळसोडून इतर भारतीय भाषांमध्येही मुळातले शब्द किती आणि किती शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे आले आहेत आणि किती शब्द संस्कृतोद्भव आहेत हा पण संशोधनाचाच विषय ठरेल. जर का एखाद्या गोष्टीसाठी आपल्या भाषेत चपखल शब्द नसेल तर इतर भाषांमधून शब्द घेऊन ते मुळचे आपलेच आहेत असे वाटावे इतके अंगवळणी पडणे ही माझ्या मते भाषेसाठी चांगली गोष्ट आहे- वाईट नाही.

राजीव दिक्षित हे अनेकदा अशा 'अनटिनेबल' गोष्टींवरून टिका करायचे. म्हणूनच त्यांना मिपावरच 'प्रातःविस्मरणीय' असे कुणीतरी म्हटले होते :(

अहो खुद्द तमिळमध्येही अनेक संस्कृतप्राकृत शब्द आहेत- फक्त ते तत्सम ऐवजी तद्भव जास्त आहेत. सोकॉल्ड प्यूरतमिळ वाल्यांच्या पचनी हे पडत नै इतकेच.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2016 - 4:33 pm | गॅरी ट्रुमन

धन्यवाद.

याविषयी तुमच्याच प्रतिसादाची वाट बघत होतो :)

भाषणाच्या पहिल्याच मिनिटात ही वाक्यं कानी पडली आणि इतक्या आत्मविश्वासाने, इतकी चुकीची माहिती दिलेली पाहून काही भूतपूर्व (तरीही अभूतपूर्व) आयडी आठवले :)

"मात्र बारा देशों में अंग्रेजी चलती है| अमरिका है, कनाडा है, ब्रिटेन है; और थोडासा (sic) लैटिन अमेरिका के देश हैं| और वहाँ तो मैं मानता नहीं अंग्रेजी चलती है, ज्यादा लैटिन चलती है - अंग्रेजी की खिचडी बन गयी है लैटिन के साथ|"