एक हात कठड्यावर ठेऊन,
अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन,
मी उभा आहे गॅलरीत!
तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर
मन रमून गेले फार!
इथेच बसून नाही का लावत
तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला!
नाही.....वेडा नव्हतोच कधी
समंजस होतो खूप म्हणून
गॅलरी नाही ओलांडत
आजही!
मला नाही जमत लिहायला,
तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला!
इतकं जग पाहूनही
प्रेमबीम पण नाही कळत मला!
पण....तू तिथे कुस बदललीस कि
इथे माझी झोपमोड होते,
एवढेच बारीक जाणवते!
अन, अवेळी उठून मी
एक हात कठड्यावर ठेऊन
उभा राहतो गॅलरीत
कुणी हाक मारेपर्यंत.....!
प्रतिक्रिया
21 Nov 2015 - 11:55 pm | एस
छान आहे कविता. आवडली. शेवट परत सुरुवातीकडे घेऊन जातो.
24 Nov 2015 - 5:35 pm | पालीचा खंडोबा १
वा फारच छान
22 Nov 2015 - 12:56 am | रातराणी
सुरेख! :)
22 Nov 2015 - 6:13 am | अत्रुप्त आत्मा
खूपच आवडली
22 Nov 2015 - 6:20 am | पिचकू
काय आवडली? कविता /गॅलरी?"तुझ्या शब्दांचे अत्तर म्हणजे काय? "नाही.....वेडा नव्हतोच कधी समंजस होतो खूप म्हणून गॅलरी नाही ओलांडत आजही!"-ते बरं केलं.तेरावा मजला असेल तर?
22 Nov 2015 - 6:46 am | मांत्रिक
मस्तच!
22 Nov 2015 - 6:48 am | चलत मुसाफिर
अफाट!
22 Nov 2015 - 7:52 am | इडली डोसा
हे विषेश आवडले.
22 Nov 2015 - 7:53 am | दमामि
वा!!!!
22 Nov 2015 - 10:29 pm | पैसा
छान कविता!
30 Nov 2015 - 1:41 pm | माहितगार
हि कविता देखिल आवडली
30 Nov 2015 - 2:01 pm | पद्मावति
सुन्दर!
30 Nov 2015 - 2:12 pm | जातवेद
क्या बात है!
30 Nov 2015 - 2:13 pm | अनुप ढेरे
आवडली!