पोपट

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
8 Oct 2015 - 7:31 pm

अथांग विश्वात चमचमणाऱ्या चांदण्या तशा असंख्य आहेत. निर्वात पोकळीत एक गोल गोळा भिंगत असेल. गडद ढगांतुन आत शिरल्यावर निळेशार पाणी आणि हिरवीगार झाडं दिसतील. वेगवेगळे देश, दगडधोंडे आणि डोंगररांगा ईकडेतिकडे पसरलेले असतील. नीट निरखुन बघितल्यास आमचं कुरसुंडी हे गाव पण दिसंल. याच गावात आमचं घर आहे. आतल्या खाटेवर मी बसलेला असेन. पण तुम्ही माझ्याकडं बघू नका. हाताकडं बघा. तिथं एक मच्छर बसलेला असेल. फट्याक..!! मारला मी त्याला. बघा आहे की नाय गंमत!
आता पुन्हा हळुहळु वर जा. ढगाबिगांच्या खुप वर. लांबवर गेल्यावर मागे वळुन पाहा. गोल गोळा अजुन भिंगताना दिसेल. दुरुनच त्याला साष्टांग ठोका. आणि तसेच पुढे जा!
चला नेक्स्ट!!

बालकथाविज्ञानमौजमजाप्रकटनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

8 Oct 2015 - 7:43 pm | बाबा योगिराज

____/\____

अभ्या..'s picture

8 Oct 2015 - 7:48 pm | अभ्या..

जव्हेरभाऊ.

एकटेएकटे पार्टी तरी करा नायतर मिपावर तरी लिहा. पण एकावेळी एक.

आणि एखाद्या दिवशी नाही लिहिलं तर मालक हाकलत नैत लगेच. ;)

जव्हेरगंज's picture

8 Oct 2015 - 7:54 pm | जव्हेरगंज

लैच रद्दड झालीय कायहो. आसुद्या, चालायचचं. तशीही बालकथा आहे ही. शशक वगैरे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Oct 2015 - 8:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

एवढ्या खाजगी गोष्टी मुक्त संस्थळावर टाकू नयेत भौ. लोकांचे गैरसमज होतात :)

जव्हेरगंज's picture

8 Oct 2015 - 9:50 pm | जव्हेरगंज

खाजगी बिजगी काय न्हाय! आपलं सगळं इम्याजनरी असतं!

कविता१९७८'s picture

8 Oct 2015 - 8:56 pm | कविता१९७८

समजल नाही लिखाण

तर्राट जोकर's picture

8 Oct 2015 - 9:16 pm | तर्राट जोकर

ते फ्रीजमधलं जिन्नस...

धर्मराजमुटके's picture

8 Oct 2015 - 9:18 pm | धर्मराजमुटके

अतिशय सुंदर कथा ! पण ते पोपट कुटं ग्येलं ???

टवाळ कार्टा's picture

8 Oct 2015 - 11:20 pm | टवाळ कार्टा

आरश्यात बघितला तर दिसेल

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2015 - 9:51 am | बिपिन कार्यकर्ते

माझी दाबून ठेवलेली कळ तुझ्या कळफलकातून बाहेर पडली रे! ;)

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 10:16 am | टवाळ कार्टा

खिक्क...कळ दाबून ठेवली तर वर लिहिले आहे तसे काही तरी प्रसवेल =))

धर्मराजमुटके's picture

9 Oct 2015 - 4:38 pm | धर्मराजमुटके

बघीतला हो आरसा ! पण तिथे पोपट नाही दिसला. दुसराच पक्षी दिसला. जाऊदे नाव सांगत नाही त्याच जाहिररित्या :)

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2015 - 8:53 pm | बिपिन कार्यकर्ते

असं कसं? आम्हाला तर दिसला ब्वॉ आरश्यात, लेख वाचल्यावर! ;)

>>>>नीट निरखुन बघितल्यास आमचं कुरसुंडी हे गाव पण दिसंल.

नाव कुठं तरी चाववाचल्यासारखं वाटतंय.
बाकी अभ्या..शी आम्ही नेहमीच सहमत असतो. आमाला श्या दिल्या तरी!

जव्हेरगंज's picture

8 Oct 2015 - 9:39 pm | जव्हेरगंज

कुरसुंडी काल्पनिक हाय! तुम्ही पण ना....

टीप: कथा काल्पनिक आहे. (!!) सर्वांनी नोंद घ्यावी!!

पैसा's picture

8 Oct 2015 - 9:48 pm | पैसा

त्या माई तुमच्या गावच्या का? हळदीकुंकवाला बोलावलं तर आल्या नाहीत तेव्हापासून शोधतेय त्यांना.

जव्हेरगंज's picture

8 Oct 2015 - 9:56 pm | जव्हेरगंज

व्हय जी. तुमचा नीरुप धाडतु त्यास्नी. सध्या त्या धोतरं वर करीत असत्यात. आय मीन कपडे धुण्याचा व्यवसाय हाय त्यांचा.

अस्वस्थामा's picture

8 Oct 2015 - 11:45 pm | अस्वस्थामा

चला... माईंचे हे स्वतःच मिपावर आलेले दिसतायत.. ;)

बादवे, मस्त लिहिलंय हो..
जिलबी प्रकारात आजकाल असं दर्जेदार कै पडत नै फार काही. त्या अभ्या..ला मनावर घेऊ नका. त्याचा तांब्या एकतर थंडावलाय अन इतरांना पण आसं डिस्करेज करतोय वरुन.. ;)

आता सिरियस नोट,
एकंतर ध्यानस्थ होण्याच्या प्रक्रियेचा हा अस्तित्ववादी आविष्कार असे म्हणता येईल. आपले पूज्य सर तसेच इतर तज्ञ याबद्दल बरेच सांगून गेले आहेतच. जेव्हा ध्यानाच्या अत्युच्च पातळीवर जडत्वापासून मुक्ती मिळते तेव्हा निर्वातातून विश्व दर्शनाचेच वर्णन लेखकाने सुरुवातीस केलेले दिसतेय.
जशी मनोवस्था परत जडत्वाकडे झुकू लागेल तसे मग ढग, झाडे इ. इ. चराचराचे अस्तित्व दर्शवणारे घटक जाणवू लागतील.
मग लेखकु आपल्याला सुक्ष्मात घेवून जातो आणि हातावरचा डास दाखवतो. हा तुमचा "मी" चा निदर्शक आणि त्याचेच रुपकात्मक निर्दालन दर्शवून लेखक गोळीबंद असा परिणाम साधतो तेही अगदी थोडक्या शब्दात.
तिथेच "फट्याक" असा नादसूचक मांडून हा परिणाम अगदी वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवतो. शेवटची दोन (होय दोन!!) अवतरणे तर यात अजूनच भर घालतात.

यानंतर ध्यानाची एक महत्वाची पायरी की फक्त सरांनीच इथे मांडली परंतु कोणालाही तेव्हा समजली नव्हती ती म्हणजे पुन:श्च जडत्वाकडून अनंताकडे जाणे. लक्षात घ्या की इथे शॉर्टकट नाहीत. तेव्हा ज्या मार्गाने आलात त्याच मार्गाने सांगता इतकाच साधा सरळ याचा अर्थ.

या सर्वांवर कडी म्हणजे लेखकाने केलेला शेवट.!! याला तोडच नाही. "चला नेक्स्ट" असे म्हणून लेखक तुम्हाला आता पुढच्या यत्तेसाठी तयार करत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला याही जाणिवेच्या प्रवासासाठी तयार करत आहे. निव्वळ अप्रतिम..

अजून येवू द्या असेच तुमच्या अप्रतिम प्रतिभेचे पैलूदार मौक्तिक. आणि असाच आस्वाद घेण्याची संधी मिळू द्या मिपाकरांना..
..
..
..
(अगदी अतिअवांतर : कै चिलमीचा बार लावलावता कै रे भौ.. अनि डासाने काशी केली मधीच? ;) )

तर्राट जोकर's picture

9 Oct 2015 - 12:00 am | तर्राट जोकर

आयडी बंद झालेल्या दिस्तोय. अक्सेस डिनायड बिल्ला नंबरः18002

चांदणे संदीप's picture

9 Oct 2015 - 12:17 am | चांदणे संदीप

कहर प्रतिसाद!
ते पायांचा फूटु काडैची पद्धत बंद झाली नसेल तर एक काढून ठेवा आमच्यासाठी, येतोच!
____/\____

चांदणे संदीप's picture

9 Oct 2015 - 12:21 am | चांदणे संदीप

आर्र... स्वारी बर्का जव्हेरगंजभौ... ते लेख आवाल्डा हे सांगैच राहूनच गेल्त!
तुमचाबी एक फूटु मारून ठेवा, कुरसुंडीच रिझर्वेशन करतोय!

Sandy

अस्वस्थामा's picture

9 Oct 2015 - 2:08 pm | अस्वस्थामा

हा हा हा..
बस का संंदीप भौ.. ;) उगी हरभर्‍याचं झाड दाखवू नका राव..
जिलबी संप्रदायाचे शिष्य खवळिले ना तर मिपा ढवळतील..

@जोकरराव, ते "संक्षी सर" आता मिपा-दीर्घ संन्यासवासी झाले आहेत. परंतु त्यांचे लेखन वाचायचे असल्यास सापडू शकेल.

तिथं एक मच्छर बसलेला असेल. फट्याक..!! मारला मी त्याला.
या रतिबाच्या मागे साला एक मच्छर आहे तर !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अधीर मन झाले,मधुर घन आले... :- निळकंठ मास्तर

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Oct 2015 - 6:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

काय काल बम बम भोले का?

जव्हेरगंज's picture

9 Oct 2015 - 8:42 am | जव्हेरगंज

अत्यंत रटाळ कथा वाचायला दिल्याबद्दल क्षमस्व.
वैयक्तिक हल्ले टाळल्यास बरे होईल.

अस्वस्थामा's picture

9 Oct 2015 - 2:11 pm | अस्वस्थामा

@जव्हेरगंज, कथा रटाळ नाहीय हो. चांगलीच आहे हे मनापासून सांगतोय. तेव्हा लिहित रहा.
चेष्टा मस्करी तेवढी चालतेच हो.

(तुम्ही कशाला वैयक्तिक हल्ले म्हणताय ते ठौक नै त्यामुळे पास)

नाखु's picture

9 Oct 2015 - 8:56 am | नाखु

लिखाण नसे हिरवट (तरी)
चल हाण धोपट
हा राघू जो ना दिसला ना ऊडला

========================

"काय कू" नाखु

द-बाहुबली's picture

9 Oct 2015 - 2:28 pm | द-बाहुबली

अबाबा.. ही कथा स्पष्ट करायला जव्हेरभाउंनी अजुन एक लेखमाला लिहावी अशी विनंती आहे.

- अखिल्मिपीयगोंधळल्यालेसदस्यहक्कनिवारण्मंच्सदस्य

बरं बरं, केव्हापासून होतंय हे असं?

बॅटमॅन's picture

9 Oct 2015 - 8:48 pm | बॅटमॅन

ओह आय सी!

जव्हेरगंज's picture

9 Oct 2015 - 9:04 pm | जव्हेरगंज

जाऊ द्या रे खाली, आता वर आणू नका. लैच भंकस धागा आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2015 - 9:14 pm | बिपिन कार्यकर्ते

Your past comes back to haunt you! ;)