मराठी विकिपीडियावरून स्वांतत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
26 Jul 2015 - 4:54 pm

नमस्कार,

ऑगस्ट महिन्यात मराठी विकिपीडियास सर्वाधीक वाचकांच्या भेटी मिळतात. या कालावधीत नवनवीन सदस्यांना मराठी विकिपीडियाशी जोडण्यासाठी आणि लिहिते करण्यासाठी काही वेगळे करून पहाण्याचा मानस होता आणि आहे. या वेळी स्वांतत्र्य दिवसा निमीत्त मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत फारसे लेखन न केलेल्या लोकांनी दिलेले - म्हणजे तुमचे स्वतःचे शुभेच्छा संदेश ठळक पणे प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. उद्देश हाच कि लिहिण्याच्या फारशा अटी ठेवायच्या नाही आणि काय लिहू हा प्रश्नही कमीत कमी ठेवायचा. आजकाल प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाला हॅप्पी... डे म्हणतच असतो तेच अर्थात तुम्हाला आवडलेल्या शब्दांमध्ये स्वातंत्र्य दिवसाला मराठी विकिपीडियावरून करायचे एवढेच.

अर्थात हे संदेश मिसळपाव अथवा व्यनितून स्विकारले जाणार नाहीत ते मराठी विकिपीडियावर येऊनच पोस्ट करावे लागतील. ( हा धागालेख प्रतिसाद रहीत ठेवण्याची विनंती संपादकांना करत आहे.)

१) सदस्याची मराठी विकिपीडियावरील संपादन १०० पेक्षा कमी असावी किंवा एकाही संपादन संख्येचा अनुभव नसला तरी चालेल.
२) शुभेच्छा संदेश मराठीत असावा आणि शक्यतो मराठी विकिपीडियावर टंकीत केलेला असेल तर अधिक उत्तम.
३) संदेश आणि नमुद केलेले संदेश देणाऱ्याचे नाव सभ्यतेच्या संकेतांचे पालन करणारे असावे.

४) या विकिपानावर (दुव्यावर) आपण आपला विकिसंदेश लिहुन पाहू/देऊ शकता.
.
.
.
.
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%A8/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8
उपरोक्त छायाचित्र विकिमिडीया कॉमन्सच्या सौजन्याने. विकिपीडिया लोगो हा विकिमिडीया फाऊंडेशनचा अधिकृत कॉपीराइटेड लोगो आहे आणि त्या लोगोच्या वापरावर मर्यादा आहेत.

स्वातंत्र्य स्वस्त नसते, ते तुमच्या आमच्या सर्वांच्या जगण्याने, जगवण्याने आणि जागवण्याने टिकते !

वावरसंस्कृतीप्रकटनसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनअनुभव

प्रतिक्रिया

पैसा's picture

14 Aug 2015 - 10:20 pm | पैसा

सर्वांना शुभेच्छा!

धागा वर येण्यासाठी हा प्रतिसाद देत आहे. तसेही वाचनमात्र ठेवला तर तो झपाट्याने दुसर्‍या तिसर्‍या पानावर जाईल. त्यामुळे इथेही थोड्याफार पतिक्रिया द्यायला हरकत नसावी. शिवाय तिथे विकि वर शुभेच्छा देऊच!

अरे वा! नक्की प्रयत्न करतो.

कोमल's picture

15 Aug 2015 - 10:30 pm | कोमल

विकिसंदेश जोडला आहे.. _/\_

माहितगार's picture

17 Aug 2015 - 11:20 am | माहितगार

_/\_ या निमीत्ताने अनेक शुभेच्छा संदेश प्राप्त झाले आणि मराठी विकिपीडियाच्या असंख्य वाचकांपर्यंत पोहोचले. आणि उद्देश्य परिपुर्तीसही चांगले साहाय्य झाले या बद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार