डायरीचे पान

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
17 Jun 2015 - 12:03 pm

मज व्यथेची हाव कुठे,
कुंपणाची धाव कुठे

दुःख ही जरासे पचले नाही,
वेदनेला वाव कुठे

जिंकला समर जरी तो,
तरी सुखाची हाव कुठे

झाली माणसे परागंदा,
राहिले मज गाव कुठे

रेखले होते तुझे नाव ज्याच्यात,
हरवले ते डायरीचे पान कुठे

#जिप्सी

gazalमराठी गझलहझलकवितामुक्तकगझल

प्रतिक्रिया

खेडूत's picture

17 Jun 2015 - 1:33 pm | खेडूत

छान .

जिंकले समर जरी ते
असं हवं होतं का?

(समर हा माणूस नसेल तर!)

जिप्सी टोपण नावाने लिहिणाऱ्या कवीच्या काही कविता वाचल्या आहेत. ते आपणच काय?

महासंग्राम's picture

18 Jun 2015 - 2:25 pm | महासंग्राम

इथे समर म्हणजे युध्द धरलेले आहे …

मिपा वर माझी हि दुसरीच पोस्ट आहे …

एक एकटा एकटाच's picture

17 Jun 2015 - 7:05 pm | एक एकटा एकटाच

मस्त
आवडली

गणेशा's picture

18 Jun 2015 - 2:01 pm | गणेशा

छान .. आवडली कविता

वेल्लाभट's picture

18 Jun 2015 - 2:08 pm | वेल्लाभट

थोडी मीटर-वजनात गंडली असली तरी चांगली आहे. छान.
पण ते शेवटाला पा'न' आणि 'व' न जुळून आल्याने शेवट आवडता आवडता आवडला नाही.

महासंग्राम's picture

18 Jun 2015 - 2:23 pm | महासंग्राम

आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद आपल्या सुचनेप्रमाणे अजून सुधार करण्याचा प्रयत्न करेन …
असेच मार्गदर्शन असु दया

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2015 - 3:55 pm | अत्रुप्त आत्मा

आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2015 - 7:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली रचना. लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी's picture

19 Jun 2015 - 7:14 am | श्रीरंग_जोशी

साधी सोपी रचना आवडली.

महासंग्राम's picture

19 Jun 2015 - 9:54 am | महासंग्राम

धन्यवाद मंडळी _/\_

विशाल कुलकर्णी's picture

19 Jun 2015 - 10:49 am | विशाल कुलकर्णी

छान ...

शब्दबम्बाळ's picture

20 Jun 2015 - 3:41 pm | शब्दबम्बाळ

छान लिहिलंय!
एक प्रश्न,
मज व्यथेची हाव कुठे,
कुंपणाची धाव कुठे

या ओळींमधून काय सुचित होत, कोणीतरी सांगावे…

महासंग्राम's picture

22 Jun 2015 - 10:21 am | महासंग्राम

दोन्ही ओळी वेगवेगळ्या आहेत

मज व्यथेची हाव कुठे- कोणालाच स्वतःला दुःख , व्यथा मिळावी असे वाटत नाही, पण व्यथा नकळतपणे भेटते.
कुंपणाची धाव कुठे- आणि कितीही व्यथा दुःखे भेटली तरी मनुष्य स्वतःभवती आखलेले रिंगण सोडत नाही. त्यातच समाधान मानतो .
असे सुचित करायचे आहे.

शब्दबम्बाळ's picture

22 Jun 2015 - 11:56 pm | शब्दबम्बाळ

छान आणि धन्यवाद! :)

बॅटमॅन's picture

22 Jun 2015 - 12:12 pm | बॅटमॅन

रचना आवडेश!

महासंग्राम's picture

22 Jun 2015 - 1:25 pm | महासंग्राम

धन्यवाद...बॅटमॅन

तुमचे नाव आवडले

चांगली कविता. खोदकामात काही छान सापडलं की आनंद होतो! लिहित रहा! :-)