खेळ मागल्यावेळी सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी -
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
.....
पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं.
हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत.
अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी!
मागल्यावेळी तर भन्नाट डोकी चाललेली.. यावेळी बघुयात कसे काय जमते ते!
मुमुक्षु :)
प्रतिक्रिया
18 Nov 2008 - 6:28 pm | लिखाळ
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
टमरेल नाही तरी 'बसून' घेतो राव
-- लिखाळ.
20 Nov 2008 - 12:47 pm | राघव
हाहाहा... हे मात्र जरा जास्तच झाले! :D
18 Nov 2008 - 6:31 pm | मदनबाण
टमरेल नाही तरी 'बसून' घेतो राव
च्यामारी लईच घाईत दिसताय राव!!! =))
कृ.ह.घे.
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
18 Nov 2008 - 7:17 pm | विनायक प्रभू
एकटाच वल्हवतो आहे आपली नाव
18 Nov 2008 - 7:25 pm | कपिल काळे
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
कोलीन आली तिकरुन पापलेटचा काय भाव
http://kalekapil.blogspot.com/
18 Nov 2008 - 8:28 pm | अनामिक
खळाळत्या नदीतिरी सांज घेते ठाव
अवनी सजली करुनी केशरी पेहराव
19 Nov 2008 - 1:34 am | श्रीकृष्ण सामंत
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
लखलखत्या वीजेमुळे किनारी दिसे नाव
वल्हवतवल्हवत कधी जाउं या पल्ल्याड
सांग साजणा! कभिन्न रात्र येईल का रे आड
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
19 Nov 2008 - 9:49 am | विजुभाऊ
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
परी काहुर मन आठवते तेच जुने घाव
यमकासाठी शब्द : वाव ,डाव, जेव, भाव ,व्हावं ,काव ,पडाव ,ट्यांव. कावकाव ,म्याव , चिव ,उरावं ,प्यावं , सोडावं
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
19 Nov 2008 - 5:06 pm | ब्रिटिश टिंग्या
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
परी विजुभौंना आठवते तेच जुने नांव
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
19 Nov 2008 - 3:48 pm | तृप्ती
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
हुर हुर दाटते मनी ,आठवुन तुझे नाव.
19 Nov 2008 - 5:00 pm | निखिलराव
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
तिथे किनारी बसलो खात मिसळ पाव
19 Nov 2008 - 6:17 pm | सागरलहरी
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
कधी काळीच्या अश्रूंत आज विरघळे जीव
19 Nov 2008 - 6:56 pm | टवाळचिखलू
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
खळाळुन हसलो मीही आठवुण "चिमणराव"
- चिखलू
19 Nov 2008 - 7:12 pm | विसोबा खेचर
अरे वा! छान आहे धागा.. :)
तात्या.
19 Nov 2008 - 7:30 pm | योगी९००
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
खादाडमाऊ मि.पा. वर करतोय म्याव म्याव
खादाडमाऊ
19 Nov 2008 - 8:13 pm | मनीषा
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
रविकिरणांचा कसा तेथे रंगे डाव |
19 Nov 2008 - 8:28 pm | सागर
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
मला काय माहीत कोणाचा हा घाव
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
देवा मंदीने मरतोय रे, आता तरी धाव
- सागर
19 Nov 2008 - 10:05 pm | प्राजु
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
झुळझुळत्या पाण्याशी झिम्मा खेळते नाव..
- प्राजु
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Nov 2008 - 12:49 pm | राघव
वा वा..
मस्त लिहिलंय सगळ्यांनी!
येऊ देत अजून..
एक माझाही प्रयत्न -
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव,
पैलतीरी उभा माझ्या विठ्ठलाचा गाव!
(हसरा) मुमुक्षु
22 Nov 2008 - 4:57 pm | दत्ता काळे
एक माझा प्रयत्न
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव,
कातळकोरीव घाटावरती क्रुष्ण-केशरी भाव