विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?

खटासि खट's picture
खटासि खट in जनातलं, मनातलं
6 Mar 2015 - 12:14 pm

आमच्या मनात अनेक विचार येत असतात ( हे कशाचे लक्षण असावे ?)
इथे येऊन शंका विचारून ज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही मिपावर आलो. पण इथे आल्यानंतर आम्हालाही वाटू लागले आहे की आम्हाला सुद्धा चार लोकांनी विद्वान म्हणावे. संतुलित प्रतिसाद देणारा सेन्सीबल आयडी अशी आमची ओळख व्हावी असे आम्हालाही वाटू लागले आहे. त्यासाठी अनेक शंका विचारण्याचे धागे ( दारू पिण्यास सुरूवात कशी करावी, जुगारात यशस्वी कसे व्हावे, बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे, अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे इ. इ. ) पेंडिंग ठेवून हा विषय प्राधान्याने घ्यावा असे योजले.

तरी विद्वान म्हणवून घेण्यासाठी काय करावे ? विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत याबद्दल संबंधितांनी प्रेमाने मार्गदर्शन करावे ही विनंती.

नाट्यउखाणेजीवनमानतंत्रऔषधोपचारविज्ञानशिक्षणमौजमजाचौकशी

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Mar 2015 - 12:52 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खट्या, अरे 'विद्वत्तापूर्ण प्रतिसाद पहायचे असतील तर ते खटासी खट ह्याचे प्रतिसाद पहा' असे हे कालच म्हणाले. जेपी,श्रीगुरुजी,जॅक स्पॅरो,मीरजकर-बॅटमॅन.. हे ही शर्यतीत आहेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Mar 2015 - 1:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माई तुम्ही टवाळ कार्ट्यास, आजानुकर्णास आणि इतर अनेक जेष्ठ मिपाकरांना विसरलात काय वयोमानाप्रमाणे =))

खटासि खट's picture

7 Mar 2015 - 3:27 pm | खटासि खट

*yahoo*

संदीप डांगे's picture

6 Mar 2015 - 1:26 pm | संदीप डांगे

१. दुसर्‍याला ठार अज्ञानी ठरवून त्याच्या बुद्धीचा, आकलनाचा कमाल अपमान करणे.
२. आपल्याला सगळ्यातले सगळे कळते असा ठाम विश्वास असणे.
३. आपल्याकडे मुद्दा असो वा नसो पण शब्दबंबाळ प्रतिसाद लिहिणे प्रचंड आवश्यक.

वरीलप्रमाणे गोष्टी तुमच्या प्रतिसादात असतील तर तुम्ही विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद दिला आहे असे समजावे. हाय काय नाय काय.

सतिश गावडे's picture

6 Mar 2015 - 1:30 pm | सतिश गावडे

या तिन्ही निकषांवर पुरेपुर उतरणारा एक विद्वान आयडी काही काळापूर्वी सरुटॉबानेच्या सहभोजनाचे अजीर्ण होऊन हेवनवासी झाला.

उगा काहितरीच's picture

6 Mar 2015 - 2:32 pm | उगा काहितरीच

जाणकारांच्या प्रतिक्षेत

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Mar 2015 - 2:45 pm | कैलासवासी सोन्याबापु

खटपणा सोडा !!

सुबोध खरे's picture

6 Mar 2015 - 3:00 pm | सुबोध खरे

आपण विद्वान नावाची डू आय डी घ्या म्हणजे आपोआपच लोक आपल्याला विद्वान म्हणू लागतील

एक एकटा एकटाच's picture

6 Mar 2015 - 4:02 pm | एक एकटा एकटाच

:-D

सांजसंध्या's picture

7 Mar 2015 - 12:49 pm | सांजसंध्या

घर कसं चालवावं, घर आणि ऑफीस यांची तारेवरची कसरत कशी करावी, मुलांचा अभ्यास, त्यांचं भावविश्व, त्यांच्यावरचे संस्कार, पाककृती आत्मसात करणं आणि खाऊ घालणं, घर नीटनेटकं आणि सुंदर लावणं, स्वच्छता ठेवणं आणि तत्सम विषय सोडून कुठल्याही विषयावर बिनधास्त मत दिलं की ते विप्र ठरतं ही खूणगाठ मनाशी बाळगावी...

खटासि खट's picture

7 Mar 2015 - 3:30 pm | खटासि खट

*dash1*

कंजूस's picture

6 Mar 2015 - 3:01 pm | कंजूस

१)ज्याच्या लेखाला वि॰ प्रतिसाद द्यायचे असतील तो आईडी फार मुरलेला आणि प्रसिद्ध नसावा नवखा असावा.
२)त्याची रास ४ -८ -१२ असावी.
क्रमश:

प्रॅक्टीसराव सुरू करतो इथंच.

आणि दर वेळी त्याचे पठण/ मनन/ चिंतन केल्यावर प्रत्येक वेळी भलभलते अर्थ निघतील तेव्हाच तुम्ही विद्वत्ताप्रचुर म्हणून ओळखले जाल हो !!

खटासि खट's picture

7 Mar 2015 - 3:31 pm | खटासि खट

*mosking*

नाखु's picture

6 Mar 2015 - 3:48 pm | नाखु

नियम : तुम्ही टंकलेले तुम्हालाच शेवटपर्यंत कळले नाही आणि भविष्यातही कळणार नाही अशी श्बद्योजना ठेवा हळूहळू तुम्ही वि.प्र. म्हणून गणले जाल.

वाचकांची पत्रेवाला
भोट वाचक नाखु.

खटासि खट's picture

8 Mar 2015 - 11:45 am | खटासि खट

काल मधरात्री जाग आली तेव्हां हे संस्थळ देखभालीसाठी बंद असल्याचे लक्षात आले. या समयी या संस्थळावर एक संदेश झळकत होता की हे संस्थळ मधरात्री ००.१० वा निद्रावस्थेत जाईल आणि मध्यरात्री १.०० वाजता पुन्हा जागृतावस्थेत येईल. तरी सदस्य व लेखकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. पण १.०० वाजता काही हे संस्थळ चालू झाले नाही.२. वाजताही ते चालू नव्हते. केव्हां चालू झाले हे समजले नाही. पण या काळात एक सत्य उमगले ते असे की लेखक झाल्याशिवाय लेखकाची दु:खे उमजत नाहीत. संस्थळ चालू झाले, न झाले सदस्यांना काही फरक पडत नाही. ते सन्नी देओल अथवा अन्य कुणाच्या अदाकारी पाहू शकतात. पण लेखकाचे तसे नसते. आपल्या अदाकारीवर किती लाईक्स आले आहेत. किती प्रतिसाद आले आहेत हे कळावे यासाठी तो रात्रीचा दिवस करू शकतो. अशा वेळी एक एक सेकंद सुद्धा त्याला युगासारखा वाटू शकतो. लेखकांया या अवस्थेची टिंगल करणा-यांनी स्वतः लेखक होऊन पहावे. उपोषणाशिवाय महात्मा होता येत नाही तसे प्रतिसादाशिवाय लेखक बनता येत नाही हे सत्य आम्हाला निद्रीतावस्थेतील संस्थळावर येऊन उमगले आहे.

दारू पिण्यास सुरूवात कशी करावी

पाणी पितो तशीच, तोंडाने!!

जुगारात यशस्वी कसे व्हावे

सतत खेळावे, एकतर कंगाल व्हाल किंवा शहाणपण येईल.

बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे

आधीच भोकं असलेले, ब्लेड मारल्यासारखे दिसणारे फ्याशनेबल बनियान घ्यावे. म्हणजे भोक पडायची वाट बघून "आता काय करु" असा प्रश्न पडणार नाही.

अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे

लंगोट वापरावयास सुरुवात करावी, म्हणजे इलॅस्टीकचा प्रश्न सतावणार नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2015 - 7:18 pm | अत्रुप्त आत्मा

@ लंगोट वापरावयास सुरुवात करावी>> :-D आणि लंगोटी वापरल्यास इल्याक्ष्टिक आणखी टिकेल! =))

खटासि खट's picture

6 Mar 2015 - 10:44 pm | खटासि खट

इथं पण लिंगभेद ?
निषेध !

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2015 - 8:25 am | अत्रुप्त आत्मा

असो!

खटासि खट's picture

8 Mar 2015 - 11:36 am | खटासि खट

मागे घेतला निषेध.

खटासि खट's picture

7 Mar 2015 - 3:33 pm | खटासि खट

*clapping*

सोत्रि's picture

8 Mar 2015 - 6:11 am | सोत्रि

धागाकर्त्याच्या मनात असलेले प्रश्न अगदी योग्य आहेत. किंबहूना बहुसंख्यांच्या मनात हे प्रश्न पडत असतीलच. त्यामुळे ती प्रश्नावळी व्यापक आणि जनताभिमुख होती असे मानन्यास प्रत्यवाय नसावा. परंतु सूडरावांनी त्या प्रश्नांंना दिलेली उत्तरे ही मूळ प्रश्नांशी नाळ सोडून भलतीच उपरोधिक आहेत. त्यामुळे जनताभिमुख प्रश्नांना असे अतिउरफाटे वळण देणे हे अतिशय अश्लाघ्य वर्तन आहे असेही म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.

ह्या उपरिनिर्दिष्ट प्रश्नांची ठाम उत्तरे अस्मादिकांकडे आहेतच, पण जनमाणसांत त्यावर काही वक्तव करणे हे सूडरावांनी केलेल्या अश्लाघ्य वर्तनाच्या पार्श्वभूमीवर सयुक्तिक न ठरावे, सबब खजिल होऊन प्रश्नांवर मौन बाळगण्याचे ठरविले गेल्या आहे!

- (स्वयंघोषित विद्वत्ताप्रचुर) सोकाजी

अत्रन्गि पाउस's picture

8 Mar 2015 - 8:48 am | अत्रन्गि पाउस

नैष्ठिक मौन असेल तर मंडळींनी सांगितल्यावर पाव कप दुध पिऊन मौन सोडावे ...
आणि मौनाचे फायदे ह्यावर एक मौलिक व्याख्यान द्यावे आपणास मिपाच्या माध्यमातून या ठिकाणी अशा पद्धतीने विनंती करणेत येत आहे ...

खटासि खट's picture

8 Mar 2015 - 11:38 am | खटासि खट

मौनाचि अंतरे असा एक आयडी घ्यावा असे वाटत आहे.

पिंपातला उंदीर's picture

7 Mar 2015 - 3:27 pm | पिंपातला उंदीर

For starters एखादा विचित्र आणि सगळ्यात उठून दिसणारा आय डी घ्यावा

खटासि खट's picture

7 Mar 2015 - 3:40 pm | खटासि खट

विचित्रवीर्य कसा वाटतो ?

खटपट्या's picture

8 Mar 2015 - 11:59 am | खटपट्या

अश्लील वाटतो !!

खटासि खट's picture

8 Mar 2015 - 8:18 pm | खटासि खट

महाभारतकालीन आयडी आहे की..

सगळ्यांत उठून दिसायची शक्यता नाकारता येत नाही...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Mar 2015 - 12:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2015 - 4:49 pm | अत्रुप्त आत्मा

=)) रामा परमेश्वरा! =))