माहिती हवी आहे - हिरे, माणिक, मोती, पोवळा

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in जनातलं, मनातलं
25 Dec 2014 - 11:14 am

मौल्यवान खडे, त्यांचे दागिन्यांतील महत्व वा वापर, त्यांची पारख, खरेदी, व इतिहास याच्या ज्ञानाविषयी आपला आनंदी आनंदच आहे. म्हटलं इथे काही मर्गदर्शन मिळाले तर मदत होईल. हिरे सोडले तर बाकीच्या खड्यांबद्दल अंतरजाळावर सुद्धा वाचण्याची काही सोय नाही कारण त्यांचे विंग्रजी नावे माहित नाहीत, आणि जर अंदाजाने काही शोधले तर नेमके तेच शोधत आहोत याचा भरोसा नाही.

माझ्या मनात सध्या असलेले प्रश्नः

इथे कुणी खड्यांच्या मराठी नावासोबत त्यांचे विलायती नावे देऊ शकेल का?

हिरे घ्यायला गेल्यावर ते कारखाण्यात बनवलेले नाहीत (खाणीतून मिळवलेले अस्सल आहेत) यासाठी काय परिक्षा असते?

सोने/चांदी/तांबे त्वचेला स्पर्ष होईल असे पावरल्यावर त्याचे अमुक काही फायदे होतात असे म्हटले जाते. खड्यांच्या बबतीतही तसे ऐकायला मिळते. त्यावर काही माहिती कुठे मिळेल?

माणिक - यांची पारख कशी करावी? यांचा वापर कोणत्या दागिण्यांमध्ये होतो?

पोवळा - लाल तांबड्या रंगाचे असतात. असे ऐकुन आहे की काही श्रद्धाळू लोक वेगवेवेगळी
यंत्रे, तबकड्या गळ्यात घालताना याचा वापर करतात. तसेच नवीन घरात गृहप्रवेशावेळी सुद्धा यांचा मान आहे असे ऐकून आहे. याबद्दल कुणाला माहिती अधिक माहिती आहे का?

मोती - मोती जर शिंपल्यातून काढावे लगातात तर रस्त्याच्या कडेला किलोच्या भावात विकायला कसे काय परवडतात. ते खोटे (म्हणजे कारखाण्यात बनवलेले) असतात काय?

अशा प्रकारचे लेखन अगोदरच मिपावर झालेले असतील तर इथे धागे चिटकवले तरी उत्तम.

बरेच वर्षांनी लिहित आहे तेव्हा कृपया चु भू द्या घ्या.

जीवनमानराहणीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

25 Dec 2014 - 11:50 am | टवाळ कार्टा

अग्गाग्गा...ज्याम मूड आलाय दंगा घालायचा...पण जौदे :)

एक जेमोलजीचा कोर्स करून टाका.
कृत्रिम आणि खरे हिरे यात केमिकली काहीच फरक नसतो.

खरे मोती आणि कल्चर्ड मोती दोन्ही खरे नैसर्गिकरित्या किड्यांनीच बनवलेले असतात. पण किलोच्या भावातले प्लास्टीकचे असतात.

हीरा diamond ,मोती pearl, माणिक ruby ,पाचू emarald ,jade पुषकराज topaz, आणि नील saphire हीच मौल्यवान रत्ने precious stones/gem/jewel आहेत. इतर 'खडे' कमी मौ॰रत्ने semi precious stonesआपल्या भारतात वापरात नव्हती.

कंजूस's picture

25 Dec 2014 - 1:07 pm | कंजूस

पोवळे वापरात होते.

आयुर्हित's picture

25 Dec 2014 - 1:10 pm | आयुर्हित

REGISTERED OFFICE & EDUCATIONAL CENTER :

ADDRESS : 29, Gurukul Chambers, 187-189, Mumbadevi Road,
Mumbai - 400 002.
TELE PHONE : 91-22-2342 0039 / 2341 3785
FAX : 91-22-2341 3785
E-MAIL : edu@giionline.com, infoedugii@gmail.com
WEBSITE : www.giionline.com

LABORATORY SERVICES :
ADDRESS : 304, Sukh Sagar Building, N. S. Patkar Marg, Opera House, Mumbai - 400 007.
TELE : 91-22-23612769 / 66519030 / 66519031
FAX : 91-22-23679189
E-MAIL : marketing@giionline.com, gemforum@giionline.com, gemforum@gmail.com

NEW BRANCH FOR DIAMOND STUDDED JEWELLERY CERTIFICATION

ADDRESS : C/o Indian Institute of Gems & Jewellery, Bagmal Laxmichand Parikh Campus,Plot No. 111/2, 13th Road, MIDC, Andheri (East), Mumbai – 400093
TELE : 91-022 – 28263504 / 05
WORKING DAYS : Monday to Friday (Saturday – Sunday: Closed)
TIMINGS : 9.15 a.m. to 4.30 p.m.
E-MAIL : info@giionline.com

DIAMOND DETECTION RESOURCE CENTER

ADDRESS : S.G. Jhaveri Trading Center, H-Tower (West), Bharat Diamond Bourse
Bandra - Kurla Complex
TELE : 91-22-60602888
E-MAIL : ddrc@giionline.com

तुमचे प्रतिसाद बरेचदा पैशाची मागणी करणारे असतात बुवा ! :)
म्हणजे व्यक्तीशः तुम्ही पैसे मागतायत असे नाही.
ते इथे फुकटचा सल्ला मागतायत आणि तुम्ही त्यांना कोर्स करायला सांगा. :)

बरीच लोकं भ्रमात जगतात नाही का!
स्पष्ट लिहिलेले वाचता येवूनही मनातले भ्रम काही जाता जात नाही!!
वरील प्रतिसाद लिहून आपण आपल्या मनातील भ्रम स्पष्ट केले आहेत.

१) मला माझा किमान एक प्रतिसाद दाखवा, जेथे मी पैशाची मागणी केली आहे.

२) ते इथे फुकटचा सल्ला मागतायत असे कुठे लिहिले आहे?

3) मी त्यांना कुठेही कोर्स करायला सांगितलेले नाही, उलट कंजूससरांनी त्यांना कोर्स करायला सांगितले आहे हे आपण वाचलेले दिसत नाही. मी फक्त पत्ता दिला आहे, हे कृपया परत लक्ष देवून वाचावे.

मनात अनेक भ्रम असले तर हे असेच नेहमी होणार हे हि तितकेच खरे!

धर्मराजमुटके's picture

26 Dec 2014 - 4:35 pm | धर्मराजमुटके

मी प्रतिसादात दिलेल्या स्मायली वाया गेल्या तर. तुम्हाला माझा प्रतिसाद विनोदी वाटला नाहि म्हणजे मी लिहिण्यात कोठेतरी कमी पडलो.
असो.
मी लिहिलेले समोरच्याला समजते हा देखील माझा एक भ्रमच आहे हे आज समजले. मनापासून क्षमस्व ! कटुता नको.

भास्कर केन्डे's picture

8 Jan 2015 - 1:02 am | भास्कर केन्डे

आयुर्हित साहेबा, तुमचे उत्तर आवडले हो. त्यांचा प्रतिसाद हलके घेण्यासाठी होता.
धन्याद

कपिलमुनी's picture

25 Dec 2014 - 3:29 pm | कपिलमुनी

असे प्रश्न पडतात म्हणजे तुम्ही लक्ष्मी रस्त्यावरच्या पुना गाडगीळांकडे खरेदी करत नाही? ?

त्यांचा हा एक जुना माहितीपूर्ण लेख आठवला. मौल्यवान खड्यांबद्दल माहिती देणारी लेखमालिका सुरु करावी, अशी रामदासांना त्यावेळी गळ घातली गेली होती, ती त्यांनी लिहिली नसेल तर लवकरच लिहितील अशी आशा आहे.

यावर काही डिस्कवरी चानेलचा कार्यक्रम असेल तर पाहा. पैसे खर्च न करता माहिती मिळेल. महागड्या कार्स संबंधी तसे कार्यक्रम बऱ्याच चानेलचे आहेत. आपल्याला कोणी श्रीमंत त्याच्याकडची रत्ने फुकट दाखवून माहिती देत असेल तर मी येण्यास तयार आहे.अशी विनंती केल्यास तो म्हणेल "मसूरदाल मॉँगनेवाले का मुंह तो देखो ।"
हैदराबादच्या सालारजंग म्युझिअमच्या २६क्रमांकाच्या दालनात बरीच रत्ने पाहता येतील.

चौकटराजा's picture

26 Dec 2014 - 8:27 pm | चौकटराजा

youtube.com वर precious stone documentary असा सर्च द्या .

भास्कर केन्डे's picture

8 Jan 2015 - 12:57 am | भास्कर केन्डे

एकापेक्षा एक उत्तम प्रितिसाद दिल्याबद्दल अनेकानेक आभार.

पोवळ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्याचे विलयती नाव काय आहे हे कृपया कुणी सांगाल का?

आमच्या मंडळीचे पोवळ्याच्या महत्वाबद्दल तिच्या मैत्रिनि मैत्रिणीसोबतचे संभाषण ऐकुन जरा कुतुहल जागे झाले आणि धागा टाकला. ओघात बर्‍याच गोष्टी कळाल्या. धन्यवाद!

बहुगुणी's picture

8 Jan 2015 - 1:49 am | बहुगुणी

पोवळे (प्रवाळ) म्हणजे red coral. आधिक माहिती इथे मिळेल.

कलंत्री's picture

10 Jan 2015 - 12:20 pm | कलंत्री

हिर्‍यामोतीला आपण खडा म्हणतो यात काहीतरी गोम असली पाहिजे. दगडाच्या छोट्या हिश्याला पण आपण खडाच ( खडा-माती) असे म्हणतो.