वारी, गिरगावातील समर्थ भोजनालयाची!

संताजी धनाजी's picture
संताजी धनाजी in जनातलं, मनातलं
5 Nov 2008 - 7:53 pm

नमस्कार मंडळी,

एक दीड आठवडयापूर्वी तात्यांनी "आजची खादडी" मध्ये एक मस्त माश्यांच्या थाळीचे चित्र [म्हणजे फिश बरं का ;) ] टाकले होते. आणि खाली ब्लॉगचा दुवा होता. तो वाचुन झाल्यावर समर्थ भोजनालयाला भेट देण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पाणी सुटले होते हो तोंडाला!

आणि दिवाळीत सासुरवाडीला [दादर] चाललोच होतो तर म्हटले जावूनच येवूयात.

म्हणुन शुक्रवारी सकाळी ११:३० ला हिंदमाता वरुन ६६ पकडली. तसे बसने फिरणे कमीच. बस वाहकाला सांगितले की बाबा कांदेवाडी आली की सांग. तो काहीतरी बडबडला. वाटले की हो म्हणाला, म्हणुन बाहेरची गम्मत जम्मत पहात बसलो. एक अर्ध्या तासाने भाऊंना विचारले तर म्हणतात बस दोन तीन थांबे पुढे आली. मुंबईत वाहक बस थांबा आल्यावर सांगत नाहीत का हो? असल्या शिव्या घातल्या त्याला [मनातल्या मनात हो] आणि खाली उतरलो.

आधीच आम्हाला मुंबई नवीन, त्यात भलत्याच ठिकाणी उतरुन एका न पाहिलेल्या स्थळाचा शोध चालु झाला. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला... नाही नाही, चुकलेच. दुष्काळात तेरावा महीना म्हणायचे होते.

सासरेबुवांनी "६६ नंबर", "कांदेवाडी", "मीरबत लेन", "साहित्य संघ" वगैरे कळीचे शब्द सांगुन ठेवले होते. आणि आमच्या स्मरणशक्तिवर आगाध विश्वास असल्याकारणाने बायकोने कागदावर सगळे लिहुन पण दिले होते. नवरा मुंबईत हरवायला नको हा विचार! [आणि आमच्या मते] चांगले नवरे परत परत मिळत नाहीत हा दुसरा असावा. मी मुंबईत एकटा फिरुच शकत नाही असे तीची ठाम समजुत आहे. असो.

बसच्या रस्त्यावरुन उलटा मागे मागे सर्वभाषिक लोकांजवळ चौकशी करत मीरबत लेन जवळ आलो [एकदाचा]. मग तसेच पुढे येवुन एका काकांना विचारले तर त्यांनी व्यक्तिगत चौकशी वगैरे करुन मार्गदर्शन केले आणि वर समर्थ भोजनालयात अतिशय उत्तम जेवण मिळते हे ही सांगितले. मनात म्हटले वा! बाकी गिरगाव एकदम छान वाटले.

मग पुढे गेल्यावर सापडले एकदाचे समर्थ भोजनालय! भोजनालय कसले? घरच होते ते. पहिल्या खोलीत रामभाऊंच्या तसबीरीला नमस्कार केला.
अ

काय हवे ते सुची पाहुन एक जागा रीकामी होण्याची वाट पहात पहील्या खोलीत बसलो होतो.
सुचीमध्ये खालील पदार्थ होते [सगळे आठवत नाहीत]:
१. कोळंबी फ्राय
२. सुरमई फ्राय
३. पापलेट फ्राय
४. मांदेली फ्राय
५. बांगडा
६. फिश मसाला [का असेच काहीतरी]
अजुन बरेच काही...
पाणी सुटले ना, तोंडाला? :D

आत मध्ये डोकावले तर फक्त सहा बाके होती. एका बाकावर तीन जण; तेही फक्त भींतीच्या बाजुला. त्यामुळे एकूण १८ लोक बसू शकतील एव्हढीच जागा.
a

खोलीत एक जण "डोके गमावलेल्या मुरारबाजीसारखा" ताटे वाढत आणि काय हवे नको ते पहात होता. त्याचे नाव "नाथा" :) [हे नंतर कळले].

बाहेर लोकांची संख्या वाढत होती. काही वेळाने एक जण उठला हे पाहील्यावर मी तेथे जाउन बसलो. नाथा थोडया वेळाने भिरभिरत आला. त्याला एक मांदेली फ्राय आणि सुरमई फ्राय ची ऑर्डर दिली आणि [परत] वाट पहात बसलो. लोक फार मन लावून जेवत होते आणि माझी भूक वाढत होती. तेव्हढ्या वेळात स्वतःचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला
a

आणि आला! नाथा आला! सुरमई आणि मांदेली घेउन आला! वा! काय तो नजारा होता. वासानेच अर्धमेला झालो. दोन्ही थाळ्या समोर स्थानापन्न झाल्या. हात मांदेलीकडे गेला आणि पुढच्या क्षणी तोंडात :D वा, काय सुंदर चव. अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत! सुरमईचे पण तसेच. अजिबात तेलकट नाही. अतिशय ताजे मासे. सोबतीला सोलकढी होतीच. मजा आली.

सर्व ताट कसे संपले ते कळलेच नाही. मला ताटाचे एक छान छायाचित्र काढायचे होते पण लोकलज्जास्तव नाही काढले. माफ करा मला :( नाथाला माझे जेवतानाचे छायाचित्र काढायची विनंती केली पण गडबडीत तेही बरोबर नाही आले. :(

जेवण झाल्यावर हात धुताना खास पुणेरीपणा द्रुष्टिस पडला. बेसिनच्या आरश्याखाली खालील सुचना होती:
"क्रुपया तोंड धूताना किळसवाणे आवाज करु नयेत"
a
म्हटले, वा इकडेपण का? [जरा गडबडीत छायाचित्र काढल्यामुळे नीट आले नाही].

आणि सर्वात कडी म्हणजे जेवणाचे बिल फक्त मोजुन ७३ रुपये झाले. पैसे देताना नाथाला सांगितले की तात्या अभ्यंकरांनी पाठवले आहे. बर बर म्हणाला :)
काहीही असो मित्रांनो आणि मैत्रीणींनो, एक गोष्ट ठरवली: ह्या पुढे मुंबईला आलो की एक चक्कर गिरगावात.

प्रवासमौजमजाप्रकटनमतअनुभवमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2008 - 8:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फक्त कोणतेच चित्र दिसत नाही :(

संताजी धनाजी's picture

5 Nov 2008 - 8:32 pm | संताजी धनाजी

मला तर दिसत आहे बुवा.
:?
बघतो हं. पळभर थांबा.

एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान
- पु.लं.ची गोळाबेरीज
[http://www.madhurmulay1978.blogspot.com]

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Nov 2008 - 8:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रिकामी करुन बघा फोटू दिसत आहेत का ते, म्हणजे नक्की समजेल.

(फोटो चढवण्यावरून स्वतःचं डोकं एकेकाळी चढवून घेतलेली) अदिती ;-)

ताजा कलमः फोटो दिसत आहेत त्यामुळे प्रतिसाद संपादित केला आहे.

अवांतरः वृत्तांत मस्त आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2008 - 8:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ताजा कलमः फोटो दिसत आहेत

आता फोटो दिसत आहेत. :)

शेवटचा फोटो आवडला : कृपया सोंड धुतांना किळसवाणे आवाज करु नये. थोडं थोडं स्पष्ट वाचता येतं :)

संताजी धनाजी's picture

5 Nov 2008 - 8:43 pm | संताजी धनाजी

हुश्श्य! #:S जमले एकदाचे.
ह्या चित्रांनी जीव काढला हो.

एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान
- पु.लं.ची गोळाबेरीज
[http://www.madhurmulay1978.blogspot.com]

वल्लरी's picture

6 Nov 2008 - 5:48 pm | वल्लरी

सॉरी,मी टाकलेल्या फोटो मुळे तुम्हि पोस्ट केलेल्या घाग्याची वाट लागली....

ह्या चित्रांनी जीव काढला हो.
खरचं

संताजी धनाजी's picture

5 Nov 2008 - 8:44 pm | संताजी धनाजी

आभार!

एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान
- पु.लं.ची गोळाबेरीज
[http://www.madhurmulay1978.blogspot.com]

पिवळा डांबिस's picture

6 Nov 2008 - 3:50 am | पिवळा डांबिस

समर्थ भोजनालयात जाऊन आल्याबद्दल आपले अभिनंदन!!!

भरल्या ताटाची छायाचित्रे न दिल्याबद्दल त्याहूनही अभिनंदन!!!
इथे मिपावर काही बदमाष लोक (:))तिथल्या पदार्थांची छायाचित्रे दाखवून आम्हाला उगीचच जळवतात (त्यांच्या बैलाला घो!!!)
:)

रेवती's picture

5 Nov 2008 - 8:35 pm | रेवती

कुठे आहेत?
वृत्तांत छानच (मी मासे खात नसूनसुद्धा) आवडला.

रेवती

संताजी धनाजी's picture

5 Nov 2008 - 8:45 pm | संताजी धनाजी

आता बघ?

एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान
- पु.लं.ची गोळाबेरीज
[http://www.madhurmulay1978.blogspot.com]

रेवती's picture

5 Nov 2008 - 8:59 pm | रेवती

धन्यवाद!
जेवणार्‍या लोकांच्या चेहर्‍यावरचे समाधान बघूनच कळतयं पदार्थ कसे असतील ते.

रेवती

प्राजु's picture

5 Nov 2008 - 8:49 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

5 Nov 2008 - 11:19 pm | विसोबा खेचर

वा! वृत्तांत वाचून खूप आनंद वाटला.. :)

अरे समर्थ म्हणजे माझं दुसरं घरच आहे रे ते!

आमचे रामभाऊ तर चांगले दोस्त होते माझे!

आपल्या नंदनने देखील समर्थची वारी केली आहे! :)

आपला,
तात्या प्रभू.

नंदन's picture

6 Nov 2008 - 2:44 am | नंदन

मे महिन्यातल्या वारीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पुढच्या वेळी मोरी आणि सुके मटण नक्की ट्राय करा :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

संताजी धनाजी's picture

6 Nov 2008 - 11:04 am | संताजी धनाजी

जरुर. पण मासे दिसले की बाकीचे काही दिसतच नाही हो!

एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान
- पु.लं.ची गोळाबेरीज
[http://www.madhurmulay1978.blogspot.com]

सूर्य's picture

6 Nov 2008 - 3:10 am | सूर्य

वा! तोंडाला पाणी सुटायला लावणारा वृत्तांत आहे.

अवांतर : मला तर फक्त संताजीच दिसतोय, धनाजी कुठे आहे ;)

- सूर्य.

संताजी धनाजी's picture

6 Nov 2008 - 11:07 am | संताजी धनाजी

हा मी धनाजी. कोण विचारतो आहे रे मला? काय काम आहे? एक दिवस जरा बाहेर गेलो तर बोंबाबोंब.
-धनाजी

चतुरंग's picture

6 Nov 2008 - 3:22 am | चतुरंग

मासेखाऊ होतो कोणे एकेकाळी आता खात नाही पण तुझे वर्णन वाचून पुन्हा सुरु करावे की काय असे वाटते!?

(खुद के साथ बातां : रंगा, हे 'समर्थ भोजनालय' शाकाहारी भोजन देण्यास 'असमर्थ' दिसते! ;) )

चतुरंग

संताजी धनाजी's picture

6 Nov 2008 - 11:08 am | संताजी धनाजी

रे चतुरंगा,
मासे सोडणारा तु पहिलाच भेटलास. का सोडलेस?

एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान
- पु.लं.ची गोळाबेरीज
[http://www.madhurmulay1978.blogspot.com]

अनिल हटेला's picture

6 Nov 2008 - 8:32 am | अनिल हटेला

वॄत्तांत आवडला !!

भरल्या ताटाचा फोटो न दिल्यामुळे शुभेच्छा @!@!!!

अवांतरः एक दिवस पोट भरून हादडण्यापेक्षा ,दोन दिवस रीतसर हादडावे ...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

संताजी धनाजी's picture

6 Nov 2008 - 11:12 am | संताजी धनाजी

अरे मला फोटो काढायची खुप ईच्छा होती. पण लोक म्हणतील ह्याला काय जेवण मिळत नाही की काय म्हणुन नाही काढला :|

एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान
- पु.लं.ची गोळाबेरीज
[http://www.madhurmulay1978.blogspot.com]

लवकरात लवकर आता पुढच्या वेळेस जेव्हा मुंबई ला चक्कर होईल तेव्हा समर्थ भोजनालय भेट नक्की...!!!
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

धोंडोपंत's picture

6 Nov 2008 - 1:45 pm | धोंडोपंत

वृत्तांत आवडला. ताटाचा फोटो हवा होता. असो.

पुढील भेटीत वांद्र्याच्या हायवे गोमांतक उर्फ कोकण्याची खानावळ या हाटेलला जरूर भेट द्या.

केवळ मासे खाण्यासाठी.

आपला,
(मासेखाऊ) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

वल्लरी's picture

6 Nov 2008 - 2:28 pm | वल्लरी

धोंडोपंत राव ,
हायवे गोमांतक चे नुसते नाव काड्ले तरी तोंडाला पाणी सुट्ते हो... :SS
भारत भेटीत न चुकता एकदा तरी जातो आम्हि तिकडे सहकुटुंब-सहपरिवार
काही फोटो टाकते..इतरांच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटो... :SS

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Nov 2008 - 2:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उघडा टॅग बंद करण्याचा प्रयत्न करा रे कोणीतरी ...
मला नाही जमलं.

टारझन's picture

6 Nov 2008 - 2:51 pm | टारझन

ज्याणे प्रतिसादाच लिंक्स दिल्या आहेत त्याने त्या उडवाव्यात ... आणि फक्त युआरएल द्यावी !!

उगाच डोकं आपटू नये !!

जै जै रघुवीर समर्थ
-समर्थ टारदास

टारझन's picture

6 Nov 2008 - 2:51 pm | टारझन

ज्याणे प्रतिसादाच लिंक्स दिल्या आहेत त्याने त्या उडवाव्यात ... आणि फक्त युआरएल द्यावी !!

उगाच डोकं आपटू नये !!

जै जै रघुवीर समर्थ
-समर्थ टारदास

वल्लरी's picture

7 Nov 2008 - 8:17 am | वल्लरी

सुरमई फ्राय

कोंबडी वडे

माशाचे कालवण/फिश करी

विसोबा खेचर's picture

20 Aug 2009 - 11:30 pm | विसोबा खेचर

हायवे गोमांतकही मला घरच्यासारखे आहे, मी कधी तिथे जेवायला गेलो की जवळा आणि कर्ली न सांगता माझ्या पानात पडते..

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Nov 2008 - 3:02 pm | बिपिन कार्यकर्ते

अरे थांबा रे, ट्युशन चालू आहे...

बिपिन कार्यकर्ते

साधारणतः १९६८ सालां पासून मी गिरगांव मधे असतानां रोज यांच भोजनालयांत जेवत असे.
परदेशांत जाण्या पर्यन्त येथील सर्व प्रकरच्या जेवणाचा आस्वाद घेतला. (१९७८ च्या आसपास)
त्या वेळेस ३रु. ५०पै. थाळी होती.
गेल्या ४० वर्षांत येथे फोटो शिवाय जरा सुध्हा बदल झालेला दिसत नाही.
(मराठी माणसाची अ ल्प संतुष्ठ व्रुत्ती , खालची पायरी सोडल्या शिवाय माणूस वरच्या पायरी वर चढत नाही,
जुन्याला कवटाळून बसल तर नवीन गोष्टी कशा पकडता येतील ?
परप्रांतीयाने आता पर्यंत ८ वेळा बदल केला असता, व अमाप पैसा कमवला असता)

जुन्या आठवणीना उजाळा मिळाला,
आभार.

अनंत छंदी's picture

11 Nov 2008 - 12:50 pm | अनंत छंदी

:P अहो ते माशांच्या थाळीचे फोटो नका ना देऊ, तोडाला पाणी सुटते त्याला जबाबदार कोण?

संताजी धनाजी's picture

20 Aug 2009 - 10:22 pm | संताजी धनाजी

मासे ;)
- संताजी धनाजी

संदीप चित्रे's picture

21 Aug 2009 - 12:33 am | संदीप चित्रे

फोटो न दिल्याबद्दल निषेध पण समर्थवारी घडल्याबद्दल अभिनंदन.
बाकी साक्षात सासरी जाताना वाटेत थांबून मस्त जेवून वगैरे गेला असाल तर तुम्ही एकतर खूप धीट आहात किंवा लग्न नवीन असावं म्हणून अजून 'बायको' ह्या व्यक्तीशी खरी भेट झाली नसावी ;)

वल्लरी,
'हाय वे गोमंतक'चे फोटो देऊन नजर तृप्त केल्याबद्दल धन्स :)