Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विलासराव on Sat, 08/16/2014 - 11:42
लेखनविषय (Tags)
धर्म
वाङ्मय
मुक्तक
विनोद
जीवनमान
प्रवास
अर्थकारण
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
समीक्षा
अनुभव
संदर्भ
प्रश्नोत्तरे
प्रतिभा
विरंगुळा
ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही. प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती. शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) जिवनात चढउतार येतच असतात. हार-जीत,सुख-दुख,मान-अपमान, मनासारखे -मनाविरुद्ध काही घडणे अशा विरोधाभासी घटनांची निरंतर साखळी म्हणजे आपले जीवन. म्हणुन घडतय ते १००% आपल्या नियंत्रणात नाही याचा बोध व्हावा यासाठीच साधनावीधी.सोप्या शब्दात सांगायचं तर दोन्हीही विरोधाभासी घटनांमधे मनाचे संतुलन ढळु न देणे. कुठल्याही टोकावर न जाता मध्यम मार्गाने चालणे. रबर ताणायचा कीती हे थोड्याशा प्रयत्नाने साध्य करता याबद्द्ल दुमत नसावे अशी आशा करतो. साधना यासाठीच की कितीही मोठं दु:क्ख असुद्या ते दु:क्ख आहे हे कोणालाही समजते. पण सुख आल्यावर हेही काही काळाने का होईना ते दु:ख्खात बदलते हे लवकर लक्षात येत नाही.आपले संतुलन सुखाने बिघडते. आता प्रश्न असा आहे की मी सुखाच्या आनंदाला मुकायचे का ? तर अजिबात नाही. सुख आल्यावर आनंद , दुक्ख आल्यावर दु:क्खाकडे तटस्थपणे पहा. निरासक्त होउन बस्स. तेवढंच पुरेसे आहे . त्यातुन तुमचा तुम्हाला बोध होईल. आता अध्यात्माच्या नावाने इतकी बोंबाबोंब झालीय जगात की एवढंच करायचं आनी दु:क्खातुन मुक्ती हे केवळ अशक्य वाटायला लागतं. करुन न पाहता शंका उमटतात.मन इतकं बावरलेलं झालय की ते समतेने पाहुच शकत नाही कारण जन्मापासुनची सवय. असो. आपण नेहमी बाहेर पहातो, उदा: मिपावरील प्रतिक्रिया पहा कुठल्याही धाग्यावरील. एका धाग्यावर मत नोंदवलेलं असेल तर दुसरीकडे त्याच व्य्क्तीने विसंगत विधान केलेलं आढ्ळुन येइल. बर्याचदा ते विनोदाचा भागही असेल.पण काही वेळा ते आपल्याच आधी केलेल्या विधानाच्या विरुद्ध असेल. आपण नकळत पण सतत दुसर्याच्या वागणुकीचे डोळ्यात तेल घालुन मुल्यमापण करत असतो. सगळी साधना हिच की आपण आपल्याच वागणुकीचे मुल्यमापन करावे म्हणजे आपल्याला आपलाच बोध होईल. विचार करुन बोलले तर नंतर शब्द गेल्यावर वाइट वाटुन घेण्याची वेळ येणार नाही.असो. झाले हे प्रबोधन फारच झाले काय? नाही मग हे वाचा http://www.aisiakshare.com/node/3140 झाले मग हे वाचा. http://misalpav.com/node/28489 कविताताई मनावर घेउ नका फक्त यातील गंमत अनुभवा. हे अगदी मनापासुन सांगतोय.मला रात्री जाग आली आनी एकदम आठवले कवीताताइंना साई भेटले अन मी तर प्रत्यक्ष साई. अर्थातच तुमच्या सारखे त्यांना ओळखनारे लोक (ज्ञानी) जगात दुर्मीळ.मीही याच ज्ञानी वर्गातला साधक आहे. म्हण्जे पुर्ण ज्ञान झाले नाही आणि पुर्ण अज्ञानही गेले नाही. पन जगात तर अज्ञानी लोकांची संख्या जास्त असते. पण कलीयुगाचा महीमा पहा मी प्रत्यक्ष साई असुनही मलाच त्याचा विसर पडला. पुरावे देतो थांबा. त्यातही काही लोकांच्या प्रतिक्रवाचामी देतोय त्या काळजीपुर्वक तपासा हे लोक पुढे चालुन ज्ञानी होणारच हे सत्य त्यातुन प्रकट होतेय. हे घ्या पुरावे: http://misalpav.com/node/21788 काही खास विलासरावला प्रत्यक्ष भगवान शंकरानं जरी चिलीम ऑफर केली तरी ते ती हातात घेणार नाहीत हे मी आता सांगू शकतो. स्वत: विपश्यना करीत प्रत्येक पाऊल टाकणारे, 'आपल्याला कशातलं काही कळत नाही' हा गुरुमंत्र असणारे विलासराव रस्ताभर सगळ्या जगाची नालस्ती करीत होते - आणि मी त्यांना दाद देत होतो. अर्थात हे फक्त माझी परिक्षा पाहण्यासाठीच. मला कळतं असा आव मी आणत होतो, मग विलासरावच्या रुपातले साईबाबा मला सोडणार काय? माझा बेकअलीपणा त्या रस्ताभर सांडत होता. परिक्रमा झाल्यानंतर विलासराव त्यांच्या प्रेमाच्या लोकांची साईबाबांच्या रुपात भेट घेतील. म्हणजे मी विलासरावच्या रुपात साईबाबांसोबत फिरत होतो, आणि मला ते कळत नव्हतं, मी त्यांना अक्कल शिकवत होतो, पण साईबाबा विलासराव या मुंबईच्या माणसाच्या रुपात माझ्यासोबत फिरत आहेत हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं नाहीच - ते मला माझ्यावर विनाकारण खूश झालेल्या एका नाथपंथीय योग्यानं दाखवलं. कसं ते पुढे सांगू. आत्मशून्य आणि विलासराव मुंबईतून परिक्रमेसाठी निघत असताना विलासरावांनी त्याच्यासाठी आणि स्वत:साठी सारखाच शर्ट, पंचा आणि रुमाल घेतला होता. म्हणजे दोघांचा पेहराव सारखाच. तीन तासांपूर्वी आत्मशून्य त्या पेहरावात रस्त्यावरून जात असताना त्या कॉन्स्‍टेबलने पाहिलं होतं आणि आता तो आत्मशून्यच हे कसं ते मला विलासरावांनी समजून सांगितलं होतं? तुम्हाला, हे वाचणार्‍यांना काय कळलं? हे परब्रह्मच वेगवेगळ्या रुपात फिरतंय आणि वेगवेगळी रुपं दाखवून मरणांत परिक्षा घेतंय. माझ्‍या ओळखीच्या असलेल्या विलासरावच्या रुपात आलेल्या साईबाबांनी किती प्रकारे मला इशारे केले असतील, पण मी ते सगळं मातीत घालत होतो. आता, घडून गेलेल्या प्रत्येक गोष्‍टीची संगती मला अचूक लागतेय, ती गुरुने माझ्यावर केलेल्या कृपेमुळं. तुम्हा वाचणार्‍यांना स्वत:च स्वत:च्या बळावर कमावलेली नजर असेल, किंवा तुमच्या मस्तकी कधी कोणा गुरुचा हात राहिला असेल तरच तुम्हाला हे सगळं खरं आहे का याचा अंदाज येईल. नाहीतर तुमच्यालेखी यशवंत कुलकर्णी नावाचा कुणीतरी पोट्‍टा पागल झाला अशी नोंद लागेल. मध्‍येच लागलेल्या एका धाब्यासमोर रांजण भरुन ठेवलेले होते, तिथेही विलासरावांनी पाणी पिलं, मीही पिलं. त्यांनी त्या धाब्यावरच्या लोकांना 'पानी पिना है किंवा पानी पिएं क्या' असं काहीतरी दरडावून विचारलं होतं एवढं आठवतंय. तेवढ्या 14 कि.मी. मध्‍ये विलासरावच्या रुपात आलेल्या साईबाबांनी त्यांच्या प्रत्येक हालचालीतून हजारो दृष्‍टांत दिले असतील, पण मला त्यावेळी नजर कुठे होती? चालत चालत दहा किलोमीटर अंतर कापलं. आजूबाजूला शुकशुकाट असलेल्या रस्त्याच्या कडेला एक फुलवाला फुलांच्या माळा करीत बसला होता. तिथं माठ भरून ठेवलेला होता. पुन्हा तिथं पाणी पिलं. विलासरावांच्या रुपातील साईबाबांनी त्याच्याशीही दोन गोष्‍टी केल्या. त्याला काय कळलं असेल देवजाणे. पुन्हा दोनतीन किलोमीटर पुढे पोहोचलो असू. महेश्वरमध्‍ये गेल्यानंतर कुठे जाऊन थांबायचं ते विलासरावच ठरवत होते तिथे शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या वृद्धाला विलासरावांनी थांबण्‍याच्या सोईबद्दल विचारलं. तो म्हणे तुमची थांबण्‍याची व्यवस्‍था मागेच असलेल्या लॉजमध्‍ये होऊ शकते. त्यानं दोन-दोनदा विलासरावांना नमस्कार केला. विलासरावांनी कुणालाही काही दरडावून विचारलं की बिनदिक्कत पुढे जात होते, मग मीच माझ्या लाजकाजं त्या उत्तर देणार्‍याला धन्यवाद किंवा थँक्यू म्हणत होतो तेव्हा विलासरावच्या रुपातील साईबाबा मला सांगत होते, कशाचे धन्यवाद? नर्मदे हर, नर्मदे हर म्हणायचं. मी भेटलेल्यांपैकी बर्‍याच लोकांना नर्मदे हरही म्हणालो आणि धन्यवाद थँक्यूही म्हणालो. एका गाड्यावर खरबूजं विकायला ठेवली होती. विलासरावच्या रुपातील साईबाबा म्हणाले 'मला खरबूजं फार आवडतात. आज रात्री खरबूजच खाऊ.' म्हटलं घेऊन टाकू. वीस रुपये देऊन एक खरबूज घेतलं. मध्‍येच त्यांनी त्यांना भेटलेल्या कुठल्यातरी 'प्रति साई'चा किस्सा सांगितला. तो जो कोण माणूस असेल त्यानं स्वत:ला 'प्रति साई' घोषित केलंय आणि तो आश्रम बांधून रहातोय. त्याच्या गावापासून शिर्डीपर्यंत तो उलटा चालत जातो. पेपरमध्‍ये बातम्या वगैरे येतात. प्रति साई आहे तर शिर्डीपर्यंत उलटा कशाला चालत जातो म्हणून मी खूप मोठ्यानं हसलो. विलासरावच्या रुपातील साईबाबा त्यालाही भेटून आले होते - तेव्हा त्याने विलासरावांच्या रुपातील साईबाबांना विपश्यनेबद्दल चार गोष्‍टी विचारल्या आणि विलासरावांनीही त्या त्याला सांगितल्या. राजराजेश्वर मंदीराच्या दिशेनं निघालो. या मंदीरात जायचं अर्थातच विलासरावच्या रुपातील साई बाबांनी ठरवलं होतं. मंदीराचं गेट ओलांडून आत गेलो. एक वृद्ध ब्राह्मण कद घालून मंदीराच्या पायरीवर बसला होता. विलासरावांच्या रुपातील साईबाबांनी त्याला इथे थांबण्याची व्यवस्‍था होऊ शकते का हे विचारलं. तो म्हणे, 'कम हियर, व्हेअर डू यू केम फ्रॉम?' मग विलासरावांनी काय सांगायचं ते सांगितलं. कुठले आहात, कुठून येताय वगैरे चारदोन गोष्‍ट झाल्या. तो मंदीराच्या समोरच्या प्रांगणाकडे हात दाखवून म्हणे, 'यहां सो जाओ.' विलासरावांनी त्या वृद्ध ब्राह्मणाच्या इंग्रजी बोलण्‍याची माझ्यासमोर टर उडवली. आयला यक्कुशेठ, काय करताय प्रास - Tue, 29/05/2012 - 19:18 आयला यक्कुशेठ, काय करताय हो? दोन दिवसाच्या परिक्रमेची गोष्ट अशी काही सांगताय की जणु आमच्या डोळ्यांपुढेच घडतेय. पण जे काही बुद्धी टिपतेय त्यांची पूर्णच्या पूर्ण संगती लावणं अवघड होऊन बसलंय ना.... मला कल्पना आहे की हे असलं काही अनुभवल्यानंतर ते तसंच्या तसं मांडणं खूपच कठीण होत असावं पण आमचा आपला नेहमीप्रमाणेच यक्कुशेठांच्या लिखाणाला समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शक्य तितक्या लवकर पुढले भाग टाका. वाट बघत आहे. विलासरावांबद्दल काळजी वाटतेय पण त्यांच्यातल्या अध्यात्मिक शक्तीची कल्पना आहेच म्हणून ठीक.... आत्मशून्यची काळजी करणारे आम्ही कोण पामर? विलासरावांबद्दल काळजी यकु - Tue, 29/05/2012 - 19:59 विलासरावांबद्दल काळजी वाटतेय काळजी? अहो तो माणूस जिथे जाईल तिथे सांगतोय की द्यायचं असेल खायला तर तयार द्या, सदावर्त वगैरे देऊ नका. हाताने बनवत नाही. कुठल्यातरी मंदीराच्या पुजार्‍यानं नारळ दिलं, त्यावरच गड्याचा दिवस गेला. त्याच्या आधी कुठलंतरी मंदीर त्यांना आवडलं, तिथे बाहेर, ओट्यावरच ते झोपत होते, तर तिथल्या ब्राह्मण पुजार्‍यानं त्यांची जात आणि धर्म विचारला. आणि यांनी सांगितला तेव्हा यांना पडक्या खोलीत पाठवून देण्यात आलं. माणूस अहमदनगर जिल्ह्यातून आलाय हे लक्षात घ्‍या आणि त्यांची काळजी करु नका. पण त्यांच्यातल्या अध्यात्मिक शक्तीची कल्पना आहेच म्हणून ठीक.... तुम्ही त्यांना आध्‍यात्मिक शक्तीबद्दल विचारुन बघा आणि काय उत्तर देतात पुन्हा एकदा पहा. आत्मशून्यची काळजी करणारे आम्ही कोण पामर? मी महेश्वरचे सगळे घाट पालथे घातले, आश्रमांमध्‍ये त्याची विचारपूस केली, पण त्याची भेट व्हायची नव्हतीच. माणूस अहमदनगर जिल्ह्यातून प्रास - Wed, 30/05/2012 - 11:23 माणूस अहमदनगर जिल्ह्यातून आलाय हे लक्षात घ्‍या आणि त्यांची काळजी करु नका. अहो यक्कुशेठ, अहमद नगरचा माणूस अहमद नगरच्या माणसाला व्यवस्थित ओळखणारच की! Wink तुम्ही त्यांना आध्‍यात्मिक शक्तीबद्दल विचारुन बघा आणि काय उत्तर देतात पुन्हा एकदा पहा. विलासरावांना असल्या गोष्टी पुन्हा पुन्हा विचारून त्यांनी दिलेल्या उत्तरांवरूनच काढलेला निष्कर्ष आहे हा... आत्मशून्याचं आत्मशून्यच सांगेल असं मानून चालू Wink बाकी पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत.... गुंगवून टाकणारं लिहिलंस वल्ली - Wed, 30/05/2012 - 09:01 गुंगवून टाकणारं लिहिलंस रे. विलासरावांसारख्या सज्जन माणसाबरोबर भरपूर गप्पा मारत फिरण्याचा योग वसई आणि कान्हेरीच्या भटकंतीत आलाच होता. यकुविलास आवडला. नगरीनिरंजन - Wed, 30/05/2012 - 09:29 यकुविलास आवडला. हम्म... साईबाबांना भेटायला लीमाउजेट - Wed, 30/05/2012 - 14:37 हम्म... साईबाबांना भेटायला हवं... Smile ते सिल्व्हासा की कुठे नोकरी करीत होते तेव्हा काहीतरी वाचून की कुठल्या घटनेमुळे तीन दिवस सतत रडत राहिले आणि त्यांना उपरती झाली. मग सगळं सोडून ते तिथून शिर्डीला चालत आले. विलासराव अहमदनगर जिल्ह्यातलेच असल्याने त्या दोघांतच संवाद चालला होता. शिर्डीपासून जवळच असलेल्या कोकणखार गावाबद्दल बोलणं सुरु होतं. बहुतेक जनार्दन स्वामी त्यांचे गुरु. कारण जनार्दन स्वामींचा सगळ्यात अव्वल पट्‍टशिष्य होऊन दाखवीन असं काहीतरी त्यांच्या बोलण्‍यात आलं होतं. परिक्रमेबद्दल वगैरे बराच वेळ बोलणं सुरु होतं. शहरात जाऊन चहा, नाष्‍टा करुन येण्याचा विषय निघाला. ते म्हणे चला, मी पण येतो. मग त्यांनी आधी बहुतेक आम्हाला विश्वेश्वराच्या मंदीरात नेलं. तिथे दर्शन वगैरे घेऊन मंदीरातूनच वर गेलेल्या रस्त्याने आम्ही आम्ही थांबलो होतो त्या मठीत आलो. मी तिथे त्यांचे आणि त्यांच्या पायाचे फोटो काढले. विलासराव म्हणे, झालं! हे लिहिणार आता तुमच्याबद्दल इंटरनेटवर. म्हटलं हो, आपल्याला प्रॅक्टीकल करुन पहाणारी माणसं आवडतात. योगी महाराज हसले. बाकी नारायण नारायण. कुठल्या प्रतीसादावर उत्तर द्यायच याचे हक्क राखीव नरा: नारायण!!!!!! आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम ..........!!!!!!!
  • Log in or register to post comments
  • 14853 views

प्रतिक्रिया

Submitted by इरसाल on Tue, 08/19/2014 - 10:38

In reply to हैला ! by सस्नेह

Permalink

तुम्हीपण म्हणजे !

आम्हीपण म्हणजे आमच्या घरी उजव्या सोंडेचा गणपती आहे म्हटल....(इरसालबुवांनी शर्टाची कॉलर नाकात सुरळी करुन घालत म्हटलं) पण अस करताना इरसाल बुवाच उजव्या सोंडेचे गणपती वाटत होते (इति पुलंच्या एका कथानकातुन साभार.......भेंडी)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 08/19/2014 - 13:09

In reply to तुम्हीपण म्हणजे ! by इरसाल

Permalink

उजव्या सोंडेचा गणपती

त्यावरून हा अप्रतिम लेख आठवला. http://www.misalpav.com/node/15353
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Tue, 08/19/2014 - 13:27

In reply to उजव्या सोंडेचा गणपती by बॅटमॅन

Permalink

मस्त धागा आहे तो. आजच पाहीला

मस्त धागा आहे तो. आजच पाहीला बॉ. आजकाल हा परा असत कुठे.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 08/18/2014 - 18:09

In reply to एक by इरसाल

Permalink

पाचेक वर्तुळं झाली की

पाचेक वर्तुळं झाली की ऑलिंपिकवाला लोगो होईल!
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 08/18/2014 - 18:18

In reply to पाचेक वर्तुळं झाली की by यशोधरा

Permalink

किंवा "आवडी"चा

किंवा "आवडी"चा
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 08/18/2014 - 18:19

In reply to किंवा "आवडी"चा by आदूबाळ

Permalink

आवडीच्या लोगोत चार असत्यात !!

आवडीच्या लोगोत चार असत्यात !!
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 08/18/2014 - 18:22

In reply to आवडीच्या लोगोत चार असत्यात !! by सूड

Permalink

बरोब्र!

बरोब्र!
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 08/19/2014 - 10:39

In reply to बरोब्र! by आदूबाळ

Permalink

ते

त्रिकोणवाले एक वर्तुळ नाय चालणार ?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 08/18/2014 - 23:45

In reply to एक by इरसाल

Permalink

हे वर्तुळ नै हो !

हे वर्तुळ नै हो ! ही स्पायरल आहे... अवकाशातल्या गॅलॅक्सीसारखी बाहेरच्या दिशेने अनंत कालासाठी उलगडत जाणारी... एक टोक दुसर्‍याला शिवायचा चानसच नाय ! पण गॅलॅक्सीसारखीच बघायला लय भारी वाटते खरी ! :) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 08/19/2014 - 16:08

In reply to हे वर्तुळ नै हो ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

एक मस्त फोटू

टाका की राव, ग्याल्याक्षीचा. गेल्या साली गेला होता ना तुम्ही ?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 08/19/2014 - 16:54

In reply to एक मस्त फोटू by सस्नेह

Permalink

गेल्या साली कश्याला ? ह्ये

गेल्या साली कश्याला ? ह्ये आत्ताच जावून आलो नव्हं! फोटू, फोटू... तर हे घ्या फोटू त्या ग्याल्याक्षींचे... Image removed. Messier51 sRGB . Image removed. Seyfert Sextet Complex आणि हा पण एक अजून... Image removed. नोकियांचा ग्याल्याक्षी ग्रँडचा ह्यांची ग्याल्याक्षी आमच्या घराजवळंच हाय बगा ! :) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 08/19/2014 - 17:00

In reply to गेल्या साली कश्याला ? ह्ये by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ओ आप्पा,

ओ आप्पा, ते शाम्शूम हाय शाम्शूम. आपके प्रतिसाद को 'नो'-किया गया है ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 08/19/2014 - 20:55

In reply to ओ आप्पा, by प्यारे१

Permalink

राईट्ट, राईट्ट... शाम्शूमच

राईट्ट, राईट्ट... शाम्शूमच हाय. थोडा फिर्नेको जानेका था. उस गडबडमे गल्तीसे मिष्टेक हुवा ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Tue, 08/19/2014 - 21:02

In reply to गेल्या साली कश्याला ? ह्ये by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

गेल्या साली कश्याला ? ह्ये

गेल्या साली कश्याला ? ह्ये आत्ताच जावून आलो नव्हं! मला वाटलं मला एकट्यालाच फिरता येतय ब्रम्हांडामधे. एक्कासाहेब तर छुपे रुस्तम निघाले. कधी ना कधी भेट होइलच तिकडे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 08/19/2014 - 23:01

In reply to गेल्या साली कश्याला ? ह्ये by विलासराव

Permalink

अहो ब्रम्हांडच आमचे मूळ गाव..

अहो ब्रम्हांडच आमचे मूळ गाव... पृथ्वीवर कधीमधी असतो झालं :) ;) या मिपावर्च्या लोकान्ला आजाबात सान्गू नका... नायतर कायबाय प्रतिसाद टाकत्याल ;) नक्की भेटू. IC 1101 कशी वाततेय ? तिथेच कट्टा करू या :) लवकर ठरवा... कारण पुढच्या काही मिलियन वर्षांत ही आतापर्यंत माहित असलेली सर्वात मोठी गॅलॅक्सी नष्ट होऊन जाणार आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 08/19/2014 - 23:52

In reply to अहो ब्रम्हांडच आमचे मूळ गाव.. by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

इक्का, विडिओ नक्कीच सुरेख असणार!

एरर का येतेयं पाहाणार का?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 08/20/2014 - 00:08

In reply to इक्का, विडिओ नक्कीच सुरेख असणार! by संजय क्षीरसागर

Permalink

एरर का येतेयं...

तुमची साधना कमी पडत असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 08/20/2014 - 00:51

In reply to एरर का येतेयं... by सूड

Permalink

येस, विडिओ बघितला

धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Wed, 08/20/2014 - 07:38

In reply to एरर का येतेयं... by सूड

Permalink

सही जवाब

सही जवाब +१११११११११
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Wed, 08/20/2014 - 07:48

In reply to अहो ब्रम्हांडच आमचे मूळ गाव.. by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

>>>>>>लवकर ठरवा... कारण

>>>>>>लवकर ठरवा... कारण पुढच्या काही मिलियन वर्षांत ही आतापर्यंत माहित असलेली सर्वात मोठी गॅलॅक्सी नष्ट होऊन जाणार आहे ! घाई काय आहे? चिंता कसली? होउद्या नष्ट. जो उत्पन्न होता है वो नष्ट होणे के लिये,नष्ट होके खतम नही होता फिर उत्पन्न होता है, ऐसेही हे भवसंसार चलता है. बोले तो परीवर्तन ही संसार का नियम है ना!!!!!!!!! >>>>>नक्की भेटू. तथास्तु!!!!!! >>>>>IC 1101 कशी वाटतेय ? तिथेच कट्टा करू या कट्टा करण्याशी मतलब. IC 1101 किंवा कुठेही. ती असेल नसेल हो पण आपण तर असणारच आहोत. संक्षी बरोबर आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 08/20/2014 - 09:55

In reply to >>>>>>लवकर ठरवा... कारण by विलासराव

Permalink

ती असेल नसेल हो पण आपण तर असणारच आहोत!

आपण कुठे जाणार? स्वरुप तर कायम आहे. पण ते एक आहे, कट्टा कुणासोबत करणार?
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Wed, 08/20/2014 - 10:15

In reply to ती असेल नसेल हो पण आपण तर असणारच आहोत! by संजय क्षीरसागर

Permalink

आपल्याबरोबरच म्हन्जे

आपल्याबरोबरच म्हन्जे स्वरुपासोबत आणी तेही शक्य नसेल तर राहीलं बॉ.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 08/20/2014 - 10:34

In reply to आपल्याबरोबरच म्हन्जे by विलासराव

Permalink

आहो, स्वरुपात आपण एकच आहोत म्हटल्यावर

कट्टा कसा होणार? शिवाय स्वरुप अचल आहे त्यामुळे त्याला गंतव्य नाही. आणि त्याही पुढे जाऊन, स्वरुप नाही अशी जागाच नाही, तर ठिकाण कसं ठरणार? आता स्वरुप म्हणजे काय याचा उलगडा न झालेल्यांना हे कळणं अशक्य आहे आणि ज्यांना कळावंस वाटतंय त्यांना पर्वणी!
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Wed, 08/20/2014 - 10:54

In reply to आहो, स्वरुपात आपण एकच आहोत म्हटल्यावर by संजय क्षीरसागर

Permalink

आता स्वरुप म्हणजे काय याचा

आता स्वरुप म्हणजे काय याचा उलगडा न झालेल्यांना हे कळणं अशक्य आहे सहमत. मीही यातलाच. फरक एवढाच की मला स्वरुप म्हणजे काय हे वाचुन माहीती आहे,
प्रचीती
नाही.
त्यासाठी माझ्या समजेप्रमाणे प्रयत्न चालु आहेत. तरीही येइल किंवा नाही याची चिंता मी करत बसत नाही. कारण ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल हे मला मान्य आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com