मिपाच्या सदस्यांच्या पानावरची माहिती.

कलंत्री's picture
कलंत्री in जनातलं, मनातलं
4 Oct 2008 - 7:24 am

काल असाच अडलटप्पू ( रॅन्डम) विचार मनात आला की मिपाच्या आपल्या सदस्य मित्रांच्या पानावर जाऊन त्यांची माहिती मिळवायची.

मृदुला : तिच्या वैयक्तिक पानावर गेलो. तिची माहिती देण्याची पध्दत आवडली. अनुदिनीवरचा लेख आवडला. त्यावरील राजचे विचार आणि अनुची अनुदिनीही आवडली.

सखाराम_गटणे™ : माहिती आवडली.

घाटावरचे भट, जैनाचं कार्ट, ग्रीष्म, आगाऊ कार्टा, बिपिन कार्यकर्ते : त्रोटक माहिती आहे. अजून देता येईल

श्रीकृष्ण सामंत : फक्त व्यावसासिक माहिती आहे.

येडा खवीस : माहिती आहे. संकेतस्थळावर गेलो पण समजले नाही.

ऋषिकेश : त्रोटक माहिती.

१_६ विक्षिप्त अदिती : माहिती वेगळ्या आणि विनोदी पद्धतीने दिलेली आहे. संकेतस्थळाचे पाने खुलत नव्हते.

विसोबा खेचर : बहुआयामी असे व्यक्तिमत्त्व.

राघव : मोजकीच माहिती.

धनंजय, प्रभाकर पेठकर, चन्द्रशेखर गोखले, स्वप्ना हसमनीस, मुक्तसुनीत, कलंत्री, विनायक प्रभू, मदनबाण, सरपंच, स्वाती दिनेश : काहीही माहिती नाही : अरेरे, फारच वाईट्ट.....

वीज जाण्याच्या भितीने अजून काही लोकांची व्यक्तीरेखा माहिती पाहता आली नाही.

आपल्यालाही अशी काही वेगळी माहिती मिळाली तर टाका, म्हणजे जास्त तपशिलात जाऊन त्या त्या सदस्याचे वेगेळेही महत्त्व जाणता येईल.

( सर्वात महत्वाचे, वरील टिपण्णी जशी आली तशी लिहिली आहे, कोणालाही दुखावण्याचा हेतु नाही.)

हे ठिकाणमौजमजाप्रतिसादअभिनंदनप्रश्नोत्तरेप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

4 Oct 2008 - 7:45 am | मुक्तसुनीत

गमतीदार विषय.
मला वाटते , प्रोफाईलवरची ओळख हादेखील एक गमतीचाच भाग आहे. येथे संवाद होतात आभासी जगातल्या व्यक्तिरेखांमधे. जी ओळख पटते ती व्यक्त केलेल्या विचारांमधून.

विसोबा खेचर's picture

4 Oct 2008 - 7:45 am | विसोबा खेचर

वीज जाण्याच्या भितीने अजून काही लोकांची व्यक्तीरेखा माहिती पाहता आली नाही.

हा हा हा! माझंही कित्येकदा असंच होतं! वीज जाण्याच्या भितीने संगणकाशी निगडित बरीचशी काम अपुरी राहतात..

तात्या.

प्राजु's picture

4 Oct 2008 - 7:52 am | प्राजु

आमचे तात्या आहेत खरे बहुआयामी.. :)
धागा छान आहे. लगे रहो कलंत्री सर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सखाराम_गटणे™'s picture

4 Oct 2008 - 7:58 am | सखाराम_गटणे™

>>काल असाच अडलटप्पू ( रॅन्डम) विचार मनात आला
असलेच विचारातुन माहीती मिळते.

बाकी तुमचा उपक्रम चालु ठेवा,
धमाला, विजुभाउ, येलो नॉटी अंकल उर्फ पिडाकाका, आंन्दयात्री, डॉन्या, प्रियाली (नाव लिहायला पण भिती वाटते.), सर्कीट पहा खुप काही माहीती मिळेल.
काही ब्लाग्ज पहा, अजुन ज्ञानात भर पडेल.

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2008 - 5:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> १_६ विक्षिप्त अदिती : माहिती वेगळ्या आणि विनोदी पद्धतीने दिलेली आहे. संकेतस्थळाचे पाने खुलत नव्हते.
वेगळं आणि विनोदी असं मला काही दिसलं नाही. आणि माझ्या वेबसाईटचं म्हणाल तर सरकारी वेबपेज आहे, "आमाला हवं तर पान उघडेल नाय तर नाय उगडणार." बाकी सुट्टी आली किंवा फार महत्त्वाचं काम असलं, कसलीशी डेडलाईन आली की आमचं इंटरनेट, जी.एम.आर.टी.ची लिंक सगळं डाऊन होतं!

आणि माझी नवी वेबसाईट आता जवळजवळ तयार आहेच ...
http://abhirjoshi.com/sanhita/

मला वाटते , प्रोफाईलवरची ओळख हादेखील एक गमतीचाच भाग आहे. येथे संवाद होतात आभासी जगातल्या व्यक्तिरेखांमधे. जी ओळख पटते ती व्यक्त केलेल्या विचारांमधून.
मुक्तसुनीतशी सहमत. व्यक्त केलेल्या विचारांमधूनच खरी ओळख होते.

विजुभाऊ's picture

15 Oct 2008 - 4:40 pm | विजुभाऊ

प्रोफाईल मध्ये व्यायसायीक गोष्टींपेक्षा स्वतःला आवडणार्‍या गोष्टी जास्त लोकानी लोहिल्या आहेत. त्यायोगे रोजच्या व्ययसायापलीकडचे व्यक्तीमत्व प्रकट होत असते

धमाल मुलगा's picture

15 Oct 2008 - 5:30 pm | धमाल मुलगा

काय हो कलंत्रीसाहेब,
तुम्ही तर एकदम सरळमार्गाने जाणार्‍यांची माहिती पहायचा प्रयत्न केलात...
जरा टारगटांच्याही पहा की!

धनंजय, प्रभाकर पेठकर, चन्द्रशेखर गोखले, स्वप्ना हसमनीस, मुक्तसुनीत, कलंत्री, विनायक प्रभू, मदनबाण, सरपंच, स्वाती दिनेश : काहीही माहिती नाही : अरेरे, फारच वाईट्ट..

:) काय राव, ह्यातल्या जवळपास सगळ्यांना काहीही गरज नाही आपली ओळख वेगळ्याने करुन देण्याची!

आपल्यालाही अशी काही वेगळी माहिती मिळाली तर टाका, म्हणजे जास्त तपशिलात जाऊन त्या त्या सदस्याचे वेगेळेही महत्त्व जाणता येईल.

आपल्या टारझनची माहिती वाचलीत का? डेंजरस म्यान....व्हेरी डेंजरस म्यान...व्हेरी डेंजरस...

टारझन's picture

15 Oct 2008 - 5:59 pm | टारझन

आपल्या टारझनची माहिती वाचलीत का? डेंजरस म्यान....व्हेरी डेंजरस म्यान...व्हेरी डेंजरस...
बास का धम्या राव .. आम्ही आपले छोटे प्यादे (आकाराने मोठे असलो तरी) ... आद्य हलकट सम्राट आंद्या, श्री श्री बंगाली बाबा डॉणोजी आणी नडगीफोड कार्पोरेटर धमुद्दीन खां .. ह्यांचे आम्ही पाईक आहोत . .. ;)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

प्रकाश घाटपांडे's picture

15 Oct 2008 - 5:54 pm | प्रकाश घाटपांडे

"काल असाच अडलटप्पू ( रॅन्डम) विचार मनात आला की मिपाच्या आपल्या सदस्य मित्रांच्या पानावर जाऊन त्यांची माहिती ....".
आमाला अदुगर उडानटप्पु वाटल व्हत. आम्ही तो प्रयोग केला . त्या पानावरुन यका योगायोगाचे आश्चर्य व गंमत वाटली व्हती. त्याची खात्री झाल्यावर आमी यका नवीन सदश्येला हसुन खराडल . आमाला वाटल कि अरेच्चा तुमी कस काय वळाखल? अस ईचारतीन पन आगंतुक खर्डीबद्द्ल आन आमच्या हसन्याबद्द्ल त्येन्ला राग आला. त्यान्ला आंतरजालावरला लिंगो कळत व्हता म्हने. आता जेवायला बस्ल्यावर अनोळखी मान्सांना बी आमि या जेवायला म्हंतो. आता समदी मान्स सारखि नसत्यात.क्वाँची रिएक्षन कशी आसन ते काय पानावरुन समजत न्हाय. तरी बी अंदाज येतुय.
(आलात त तुमच्यासह नाहीत तुमच्या विना श्टाईल जगनारा)
प्रकाश घाटपांडे

अवलिया's picture

15 Oct 2008 - 6:55 pm | अवलिया

आमाला अदुगर उडानटप्पु वाटल व्हत. आम्ही तो प्रयोग केला .
याला म्हणतात उंटाच्या .....

त्या पानावरुन यका योगायोगाचे आश्चर्य व गंमत वाटली व्हती. त्याची खात्री झाल्यावर आमी यका नवीन सदश्येला हसुन खराडल .
सदस्य सदस्यात फरक असतो..

त्यान्ला आंतरजालावरला लिंगो कळत व्हता म्हने.
लिंगो म्हंजी काय वो... जरा 'मायबोलीत' उचकटुन सांगा ना आमास्नी..

आता जेवायला बस्ल्यावर अनोळखी मान्सांना बी आमि या जेवायला म्हंतो.
कस बोललात.... अहो उपाशी राहु पण दारात आलेल्याला उपाशी नाही ठेवणार...

आता समदी मान्स सारखि नसत्यात.
लाख मोलाचे वाक्य..

क्वाँची रिएक्षन कशी आसन ते काय पानावरुन समजत न्हाय. तरी बी अंदाज येतुय.
हं. पण कधी कधी फसगत होतेच. चालायचेच ! नाही का?..

कसे हॅ हॅ हॅ हॅ ;)

नाना

जैनाचं कार्ट's picture

15 Oct 2008 - 6:06 pm | जैनाचं कार्ट (not verified)

तेथे काय लिहायचं असतं हेच माझ्या टक्कु-यात बसत नाही आहे.. त्यामुळे जरा मोकळं मोकळ दिसत आहे.. ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विजुभाऊ's picture

16 Oct 2008 - 12:49 pm | विजुभाऊ

त्या जैनाच्या कार्त्याची वळख बघा जल्ला सगला डोल्यात पानी यताव. यवडी सुंदर वाक्यं हायेत तथं