सोलापुरची आणखी एक खासीयत

पांथस्थ's picture
पांथस्थ in जनातलं, मनातलं
27 Sep 2008 - 1:05 am

भाजलेले मटण

सोलापुरला भाजलेले मटण म्हणुन एक खाद्य प्रकार मिळतो.

खाटिका कडुन मटण विकत घ्यायचे. त्याला सांगायचे की भाजुन घेण्यासाठी हवे आहे. म्हणजे तो मटणाचे थोडया वेगळ्या प्रकारे तुकडे करतो आणि चिरा मारुन देतो. बोनलेस पाहिजे असल्यास तसे सांगावे. हे मटण घेउन भाजणार्‍याकडे जायचे. ते लोक मटणाला त्यांचा पारंपारिक घरगुती मसाला लावुन काहि वेळ मुरत ठेवतात (मटणाला चिरा मारल्यामुळे मसाला आतपर्यंत जाण्यास मदत होते - अर्थात खाल्ल्यावर आग किती लागली पाहिजे हे सांगितल्यावर त्यानुसार मसाला लावला जातो). नंतर हे मटणाचे तुकडे कबाबांप्रमाणे लोंखंडी सळ्यांवर लावुन विस्तवावर भाजले जाते. मटन भाजुन देणार्‍यांची एकाच ओळीत ६-७ दुकाने आहेत. घरि येउन मटणाचा स्वाद घेतला जातो. (काहि 'विशिष्ट स्थितीतील' लोक तिथेच बैठक मारतात). मटण भाजणार्‍यांकडे कडक भाकर्‍याही मिळतात. ह्या कडक भाकर्‍या आणि त्या बरोबर भाजलेले मटण म्हणजे पुछो मत यार! पुढच्या वेळी सोलापुरला भेट द्याल तेव्हा हा रसानुभव घेण्यास विसरु नका! (जे लोक मांसाहार करत नाही त्यांना सोलापुरच्या गरमी मधे स्वतः भाजुन निघणे हाच एक पर्याय! असो.)

छायाचित्रे:

प्रवासमौजमजाछायाचित्रणअनुभवमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

27 Sep 2008 - 1:11 am | प्राजु

वर्णन आणि फोटो सह्हीच...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

फोटो झ्याक आलेत... चव पण मस्त असणार...

बाबा

विसोबा खेचर's picture

27 Sep 2008 - 8:38 am | विसोबा खेचर

व्वा! व्वा! :)

हे मटण दारूसोबत तर फारच छान लागेल.... :)

आपला,
(मटण आणि पीटर्स स्कॉट प्रेमी) तात्या.

सुनील's picture

27 Sep 2008 - 8:43 am | सुनील

आयला, तोंडाला पाणी सुटलं की राव! सोलापूरात एक चक्कर टाकायलाच हवी!

हे मटण दारूसोबत तर फारच छान लागेल....
तात्या, लेखातील -
(काहि 'विशिष्ट स्थितीतील' लोक तिथेच बैठक मारतात)

हे वाक्य त्यांचासाठीच असावे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ह्याला चायनीज मध्ये यांग्रौ म्हनतात !!

यांगरौ म्हणजे बक-याचे मटण !!!

आणी अगदी असेच बोनलेस असते !!

शिवाय व्यवस्थीत मसाला लावलेला असल्याने खायला मजा येते !!

(अवंतरः चीने साले जास्त तीखट खात नाहीत ,पण मी गेलो की पेशल तीखट लावुन मगच भाजायला सांगतो...)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सुनील's picture

27 Sep 2008 - 9:10 am | सुनील

चीने साले जास्त तीखट खात नाहीत
काय म्हणता? चीनच्या शेझवान प्रांतातील लोक तिखटजाळ खातात असे ऐकून आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनिल हटेला's picture

27 Sep 2008 - 9:34 am | अनिल हटेला

हो खर आहे तुमच !!!

सिचुआन प्रांतात सुद्धा तीखट् खातात !!

अगदी कोल्हापूरी झटका म्हणता येइल !!

पण जिथे मी सध्या आहे तीथल सांगत होतो , राजे !!

( सिचुआन रेस्टॉरंट चा मी रेग्युलर गी-हाईक आहे !)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

झकासराव's picture

27 Sep 2008 - 5:01 pm | झकासराव

काय खतरनाक फोटु आहेत हो.
मी नॉनवेज खात नाही पण हे फोतु बघुन तोन्डाला पाणी सुटल की.
ह्या प्रकाराला टिक्का करणे म्हणतात का?
(हे अशाच प्रकारे मसाला लावुन भाजलेल पनीर खाउन आनंद माननारा) झकास

`................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

गणपा's picture

27 Sep 2008 - 6:14 pm | गणपा

पांथस्था, लाजवाब फोटो.
मुंबई-अहमदाबाद हायवेवर (चारोटी नाक्याच्या पुढे) असलेल्या महालक्ष्मीच्या जत्रेची आठवण करुन दिलीत.
या जत्रेत बरेच जण नुसत भाजलेले मटण चापायला येतात.
-गणपा.

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Sep 2008 - 6:29 pm | ब्रिटिश टिंग्या

दिसायला तर लै झाक दिसतयं......ट्रायला पाहिजे.....
मटणाच्या नवीन पद्धतीची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!