काळजी करण्यासारखे काय आहे त्यात ???

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
3 Dec 2007 - 3:26 pm

आधीच जाहीर करतो, इंटरनेट वरून साभार...............

आज फक्त २ गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत ......

एक म्हणजे तुमची तब्येत चांगली आहे का तुम्ही आजारी आहेत ?

जर तुमची तब्येत ठणठणीत असेल तर मग काळजी कशाची करता, मस्त जीवनाचा आनंद घ्या .......

पण जर तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही आजारी आहात तर तुम्हाला २ गोष्टींची काळजी करायला हवी.....

एक तर तुम्ही बरे व्हाल का आजारपणातच मरून जाल ?

जर तुम्ही बरे होणार असाल तर काळजी करण्यासारखे काही नाही.........

पण जर तुम्ही आजारपणातच मरण्याची शक्यता असल्यास तुम्हाला काळजी करण्यासारख्या २ गोष्टी आहेत.....

त्या म्हणजे तुम्ही स्वर्गात जाल की नरकात ?

जर स्वर्गात गेलात तर त्यासारखे उत्तम काहीच नाही ........

आणि समजा चुकून नरकात गेलात [ जातालच ना ....] तर तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्यात येवढे मग्न व्हाल की तुमच्याकडे काळजी करण्यासाठी वेळच ऊरणार नाही.........

तेव्हा काळजी सोडा आणि मस्त जीवनाचा आनंद घ्या !!!!!!!

मांडणीविनोदमुक्तकजीवनमानमौजमजाप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

3 Dec 2007 - 4:08 pm | विसोबा खेचर

आणि समजा चुकून नरकात गेलात [ जातालच ना ....] तर तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्यात येवढे मग्न व्हाल की तुमच्याकडे काळजी करण्यासाठी वेळच ऊरणार नाही.........

हे बाकी खरं आहे! :)

आपला,
(निष्काळजी) तात्या.

आनंदयात्री's picture

3 Dec 2007 - 4:14 pm | आनंदयात्री

आहे.

आपलाच,
(मोठा डॉन)