लादेन ध्यानप्रकार

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
11 Aug 2013 - 10:04 pm

अध्यात्म या विषयावर अनेक गैरसमज आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अध्यात्म गूढ, अंधूक, धूसर, अगम्य आहे हे नसून अध्यात्माविषयी विचार करणारे बहुतेक लोकं मठ्ठ असतात हे आहे. त्यांचा हा मठ्ठपणा दूर करण्याची जबाबदारी मी नाईलाजाने स्वीकारतो आहे. तशी ती जबाबदारी 'कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो, कृपया ही जबाबदारी स्वीकाराच. नक्की...' अशी विनंती करत काही शेकडो लोकं आले होते असं नाही. मला केवळ तसं वाटतं म्हणून मी स्वीकारतो आहे.

सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे काही वाचलं आहे, विचार केला आहे ते निखालस असत्य आहे हे तुमच्या मठ्ठ डोक्यात आधी भरवून घ्या. कारण तुम्ही जे वाचलेलं आहे ते स्मृतीमध्ये जातं. आणि तुमचं मन तुमच्या या स्मृती वापरून तुम्हाला भलतेसलते संदेश देतं. पण तरीही कृपया आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन या लेखावर प्रतिसाद लिहून मात्र नक्की करा. कारण तुम्ही काहीही लिहिलं तरी त्यातून तुमचं अडाणीपण, अभ्यासाचा अभाव, बुद्धीचा कोतेपणा, खालची वैचारिक पातळी याच गोष्टी दिसत रहाणार हे उघड आहे. तेव्हा मला त्या दाखवून देण्याच्या आनंदापासून वंचित ठेवू नका. कारण हा आनंद हा सच्चिदानंद आहे, ब्रह्मानंद आहे. या आनंदाची प्राप्ती करण्यासाठीच हा सृष्टीचा पसारा निर्माण झालेला आहे. पण दुर्दैवाने हे कोणालाच कळत नाही. दुर्दैव म्हणजे, ज्यांना कळत नाही त्यांचं दुर्दैव. माझं सुदैवच, कारण मला पुन्हा पुन्हा 'तुम्हाला हे कळलेलं नाही' असं सांगण्याची संधी मिळते. आणि माझ्या ब्रह्मानंदाच्या अकाउंटमधली ब्यालन्स वाढत वाढत जाते.

हा ब्रह्मानंद वाढवण्यासाठी मी एक सोप्या प्रकारचं ध्यान करतो. त्याचं नाव आहे लादेन ध्यानप्रकार. हा आधुनिक काळात निर्माण झालेला ध्यानप्रकार आहे. पौर्वात्य म्हणजे पुरातन असं आपण मानतो. पण नव्या संशोधनानुसार सर्व मानवजातीची निर्मिती सुपीक चंद्रकोरीच्या भागात झाली. त्यामुळे तो मध्यपूर्वेतला भाग सगळ्यात पुरातन आहे. लादेन ध्यानप्रकारही तिथेच निर्माण झाला. या संस्कृतीची जाण नसलेल्या पाश्चिमात्यांनी त्याला अतिरेक, दहशतवाद वगैरे म्हटलं. पण यावरूनच त्यांच्या ज्ञानाची पातळी दिसून येते. अभ्यास करून ती वाढवायला त्यांना शतकंही पुरणार नाहीत हे उघडच आहे.

हे तंत्र साध्य करणारा मनुष्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. ही साधना करायला सुरूवात केल्यावर सर्वप्रथम दृष्य परिणाम म्हणजे त्वचेची जाडी वाढायला लागते. जसजशी ती साधना अधिकाधिक करायला लागू तसतशी ती त्वचा अधिकाधिक जाड होते. नुसती ती जाडच होते असं नाही, तर तिला नखासारखं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे कितीही आघात केला तरी जखम होत नाही, आगीने चटका बसत नाही. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः' अशा स्वरूपाचा हा आत्माच नखरूपी त्वचेत रूपांतरित होतो. मला काही साधक असे माहित आहेत की ज्यांची त्वचा बावीस सेंटिमीटर जाड आहे. त्यामुळे वाग्बाण तर काय, खरे बाणही लागत नाहीत. काही साधकांच त्वचा जाड होण्याबरोबर तेलकटही होते. त्यामुळे कोणी त्यांना पकडायला गेलं तर हातातून पटकन् निसटून जाता येतं. आणि पकडायला जाणारे तेल लागलेले हात चोळत बसतात. मी अर्थातच या स्थितींच्या बराच पुढे गेलेलो आहे. आणि पुढच्या सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत. या पुढची पातळी म्हणजे त्वचा जाड आणि तेलकटच नव्हे तर मेंदूभोवती एक अभेद्य कवच तयार होतं. हाडं अश्मीभूत होण्याच्या प्रक्रियेला ऑस्सिफिकेशन असं म्हणतात. ही प्रक्रिया सजीवांमध्ये होताना दिसत नाही, पण लादेन ध्यानप्रकार करणारांना मात्र ही प्रक्रिया स्वतःमध्ये घडवून आणता येते. यामुळे इतरांचे विचार डोक्यावर आपटून दाण्णकन खाली पडतात. अशा कडेकोट बंदोबस्तामुळे साधकाला ध्यानपद्धती पुढे चालू ठेवणं सोपं जातं.

आता मी या ध्यानपद्धतीविषयी सांगतो. इतर ध्यानपद्धतींमध्ये अंतर्मुख होणं, स्वतःच्या विचारांच्या अधीन न होता सहज भरकटू देणं वगैरे काहीतरी भंपक गोष्टी असतात. आत्मोन्नतीसाठी आत्म्याचं निरीक्षण, मनाच्या अवस्थांचं वेगवेगळ्या पद्धतींनी नियंत्रण वगैरे निरर्थक गोष्टी असतात. या सगळ्यांचा तोटा असा की हे सर्व वैयक्तिक असतं. आपल्यापुरतं असतं. हा शुद्ध वेडेपणा आहे. असं करणारांना अध्यात्म समजलंच नाही असं मी म्हणेन. लादेन ध्यानपद्धतीत या आंतर्गत प्रक्रियेचं बाह्य प्रक्रियेत रूपांतर करण्यावर भर असतो. या ध्यानप्रकारात भिंतीकडे तोंड करून बसायचं नसतं, तर मोठ्ठ्या जनसमूहाला हातात मायक्रोफोन घेऊन 'हे बघा हे ध्यान करणं म्हणजे हे असं असतं' असं सांगायचं असतं. मग कोणी जर काही प्रश्न विचारले तर त्याला 'तुझ्यासारखा महामूर्ख आत्तापर्यंत पाहिला नाही' असं त्या मायक्रोफोनवरूनच ओरडून सांगायचं. अक्कल काढणे, वैयक्तिक बोलणे अशा जितक्या अधिक गोष्टी करता येतील तितकं ते ध्यान यशस्वी होतं. जितकी जास्त चर्चा 'तू अज्ञानी... नाही नाही तूच अज्ञानी.... तू माझ्या दुप्पट अज्ञानी..... तूच तूच तूच तूच शंभरवेळा अज्ञानी' या स्वरूपाची चालेल तितकं ते ध्यान यशस्वी झालं असं समजावं.

हे प्रकार खुलवण्यासाठी मुद्दामूनच काही विसंगतीपूर्ण विधानं करणं हे अत्यावश्यक आहे. म्हणजे आपण विडंबनं करायची, आणि इतरांनी आपल्याला चेष्टेने काही बोललं तर त्यांना 'तुम्ही विडंबनं करता, चेष्टा करता म्हणजे तुमची पातळी हीन आहे हे सिद्ध होतं' असं म्हणायचं. किंवा कधी मनाच्या दोन विंग्ज आहेत म्हणायचं कधी तीन विभाग म्हणायचं. खरं तर काही सुसंबद्ध बोलायचंच नाही. म्हणजे लोकांना चेव येतो आणि आपण कचाट्यात सापडू असं त्यांना वाटतं. ते जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा आपल्या तैलत्वचेच्या सहाय्याने सुळ्ळकन् सटकून निघून जायचं.

असो. ही केवळ सुरूवात आहे. मी तुम्हाला केवळ एक नवीन तंत्र शिकवतो आहे. तुम्ही हा ध्यानप्रकार करून बघा आणि परिणाम काय होतो ते तपासून बघा. त्वचा जाड, तेलकट, आणि मेंदूभोवती कवच निर्माण तर होईलच. कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.

शिक्षणमौजमजाप्रकटनमाहितीमदतवादप्रतिभा

प्रतिक्रिया

लै दिवसांपास्नं विचारावं म्हणतोय, हे "शिरां पडो" मधलं शिरां म्हंजे हो काय नक्की?? मला तर शिरा पडो तुझ्या तोंडी असंच वाटायचं, अजूनही वाटतं. तरी यावर शिरा आपलं प्रकाश पाडावा ही विनंती.

विजुभाऊ's picture

13 Aug 2013 - 4:18 pm | विजुभाऊ

म्हणतोय, हे "शिरां पडो" मधलं शिरां म्हंजे हो काय नक्की?? मला तर शिरा पडो तुझ्या तोंडी असंच वाटायचं, अजूनही वाटतं. तरी यावर शिरा आपलं प्रकाश पाडावा

ती मालवणी सभ्य शिवी आहे रे. "शिरा पडो तोंडात" या वाक्यात शिरा या ऐवजी शीळा हा शब्द वापरा म्हणजे अर्थ उमजेल. फक्त र च्या जागी ळ. चोप्य पेस्ते करायचे.

अच्छा असंय होय, आत्ता कळ्ळं काय ते. धण्यवाद विजुभौ!

लेखन समजले नाही, आताच १७६० प्रिन्ट काढल्या समजून घेतो, नाहीच समजले तर, परत परत वाचतो.. तरी *ट कळणार नाही हे माहीत असून देखील परत वाचतो व मग टंकतो.. धन्यवाद!

घासुगुर्जीनी बहुतेक त्यांचे आडणाव "उपाध्ये" असे बदललेले दिस्तेय

रामपुरी's picture

13 Aug 2013 - 1:12 am | रामपुरी

संग्राह्य लेख. तुमचा या ध्यानप्रकारावरचे प्रभुत्व लक्षात घेता आम्ही काही सुचविणॅ म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे. पण तरी निव्वळ नजरचुकीने एक महत्वाचे लक्षण मांडायचे राहून गेले आहे. ते येणेप्रमाणे...

प्रत्येक वेळी कोणीतरी एक महान व्यक्ती निवडून त्यांच्या अध्यात्म मार्गातल्या, त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यातल्या चुका काढायच्या (आपण कोण आहोत, आपली लायकी काय, आपल्या अकलेचं कोरडं पडलेलं डबकं इत्यादी किरकोळ गोष्टी विचारात न घेता). व्यक्ती निवडताना ती सर्वांना वंद्य असेल आणि तिच्याबद्दल कसलेही वाद नाहीत ही काळजी घ्यावी. जितके निर्विवाद महान व्यक्तीमत्व तितके बोनस पॉईंट जास्त. तर याने फायदा असा होतो की त्या महान व्यक्तीमत्वाचे भक्त पेटून उठतात. प्रतिवाद करायला लागतात. पण आपण अगोदरच मेख मारून ठेवावी की याबद्दल आत्ता चर्चा होणार नाही. मग ते बसतात बॉलिंग करत. आपण फक्त 'हा आजच्या चर्चेचा विषय नव्हे' अशी बॅट घुमवत बसावी. मागे ष्टंपाच नसल्याने आऊट व्हायची भीती नाही. आणि भक्त संप्रदाय मोठा असल्याने आपले पॉईंट मात्र आकाशाला भिडतात.

धर्मराजमुटके's picture

13 Aug 2013 - 3:44 pm | धर्मराजमुटके

ध्रुतराष्ट्र उवाच : "हे संजया, माझ्या महापराक्रमी मुलांना घाबरुन तो स्वता:ला भगवान म्हणवून घेणरा क्षीरसागराच्या तळाशी जाऊन तर बसला नाही ना ?

मुक्त विहारि's picture

13 Aug 2013 - 5:47 pm | मुक्त विहारि

मस्तच...

कळले पण मोक्श मिळतो का? जरा या प्रष्णाचे उत्तर देवुन उपक्रुत कराल काय?

राजेश घासकडवी's picture

14 Aug 2013 - 3:23 pm | राजेश घासकडवी

हो, अर्थातच मोक्ष मिळतो. मोक्षाची हाव सोडली तरच तो प्राप्त होतो हे कोणा मतिमंदालाही समजेल. खरा साधक मोक्षाच्या मृगजळामागे कधीच धावत नाही. त्याची आस धरत नाही. त्यामुळे ही साधना हेच साध्य. तुम्हाला ही साधना करण्याची तीव्र इच्छा नसेल तर केवळ 'मोक्ष मिळेल, मोक्ष मिळेल' असं घोकत साधनेच्या पाट्या टाकून काहीएक फायदा होणार नाही. मी जी ही साधना करायला सांगतो आहे याचं कारण या साधनेवरच प्रेम बसावं यासाठी.

ज्या सिद्धी या साधनेतून प्राप्त होतात त्या मिळाल्या तर इहलोकातलं आयुष्यही आनंददायी होतं. या साधनेची गंमत म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या सिद्धींमुळे साधना अधिक सोपी होते. म्हणजे अमुक एक अंतर गेल्यावर तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी अधिक वेगवान गाडी मिळेल असं दर पायरीला होतं. प्रयत्न करून पहा.

अनिरुद्ध प's picture

14 Aug 2013 - 3:38 pm | अनिरुद्ध प

किवा आपल्या साधना सम्प्र्दायाची 'मोक्ष' या सम्बन्धीत शब्दाची व्याख्या जाणुन घ्यावयास आवडेल.

अनिरुद्ध प's picture

14 Aug 2013 - 3:40 pm | अनिरुद्ध प

किवा आपल्या साधना सम्प्र्दायाची 'मोक्ष' या सम्बन्धीत शब्दाची व्याख्या जाणुन घ्यावयास आवडेल.

विसुनाना's picture

14 Aug 2013 - 1:49 pm | विसुनाना

१. आपण करत असलेला लादेन ध्यानप्रकार यशस्वी होतोय की नाही त्याचे मोजमाप कसे करावे?
२. आधीच मट्ठ मेंदू असलेल्यांच्या मेंदूचे ऑस्सीफिकेशन लादेन ध्यानप्रकाराने लवकरात लवकर होईल काय?

राजेश घासकडवी's picture

14 Aug 2013 - 3:30 pm | राजेश घासकडवी

१. आपण करत असलेला लादेन ध्यानप्रकार यशस्वी होतोय की नाही त्याचे मोजमाप कसे करावे

साधं मोजमाप म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या प्रतिसादांची संख्या. मूळ विषयाशी संबंध नसलेल्या प्रतिसादांसाठी दुप्पट पॉइंट घ्यायचे. त्यातही आपल्या विचारांनी चक्रावून गेल्याप्रमाणे आलेल्या प्रतिसादांना तिप्पट पॉइंट द्यायचे. तिरक्या चाललेल्या उपचर्चांना आणि आपल्याच शेवटच्या प्रतिसादांना स्पेशल बोनस पॉइंट. असे सगळे जर दर लेखाला १५० ते २०० पॉइंट मिळाले तर आपली साधना यशस्वी चालू आहे असं समजायचं.

२. आधीच मट्ठ मेंदू असलेल्यांच्या मेंदूचे ऑस्सीफिकेशन लादेन ध्यानप्रकाराने लवकरात लवकर होईल काय?

छे हो. हा साधनाप्रकार मठ्ठ लोकांसाठी नाहीच. माझ्यासारख्या अत्यंत हुशार माणसालाच ते जमतं. 'साधना करायला शिकवणं' हा त्या साधनेचा बहाणा आहे. मुख्य उद्देश लोकांना 'तुम्ही अज्ञानी आहात' हे सांगत रहाणं हा आहे.

पिशी अबोली's picture

14 Aug 2013 - 4:07 pm | पिशी अबोली

त्वचेची जाडी कमाल मर्यादेपर्यंत वाढलेले आदर्श कोण?
तेलकट झालेल्या त्वचेला वास कसला येतो?
लादेन ध्यानप्रकार करणार्‍या मुलांना कायमचं दूर ठेवण्यासाठी मुलींना काही ध्यानप्रकार सुचवाल का?

पैसा's picture

14 Aug 2013 - 4:13 pm | पैसा

वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे असेल तर गुरूजींच्या स्विस बँक अकौंटला फण्ड्स ट्रान्सफर करावे लागतील. माझ्याशी संपर्क करावा.

कवितानागेश's picture

14 Aug 2013 - 4:33 pm | कवितानागेश

म्या फार्फार त्रासात होते.
ना दिवसाची चैन ना रात्रीची नीन.
दु:खात होते. तडफडत होते.
रोज ट्रेनमध्ये बायकांशी झगडायची.
नवरा म्या केलेला चहा घ्यायचा नाही.
फार्फार शीक वाटत होते.
मग मला एका फरीश्त्यानी या लादेन ध्यानप्रकाराच्या गोटात खेचले... अप्ले ते हे... मार्गदर्सन केले.
म्या हेच रोज करु लागले.
मला मायक्रोफोन फार्फार आवडू लागले.
मला माझा आवाजचा फार्फार आवडू लागला.
मला मीच फार्फार आवडू लागले.
माझा अन्दाजच बदलला.
म्या एकदम आनंदी र्हाउ लागले.
नवरा स्वतःच्या हातानी चहा करुन मला आदरानी देउ लागला.
ट्रेनमधल्या बायका झगडायचा थांबल्या. मी चढली की मला वाट करुन देउ लागल्या.
माझा जीवन या लादेनमुळे सुखी झाला.
तुम्हीदेखिल करा, रोज करा, लादेन ध्यानप्रकार!!

रामपुरी's picture

14 Aug 2013 - 8:59 pm | रामपुरी

तुमची साधना यशस्वी झाली आहे हे उघड आहे. "म" ची संख्या जेवढी जास्त तेवढी साधना यशस्वी...

राजेश घासकडवी's picture

16 Aug 2013 - 5:40 pm | राजेश घासकडवी

इतरांप्रमाणे तुम्ही मनाची कवाडं मिटून घेतलेली नसल्यामुळे तुम्हाला या ध्यानाचा फायदा झाला. तुमच्या अनुभवाइतकं जीवंत उदाहरण असूनसुद्धा अजूनही इतर प्रतिसादांतून लोकं मस्करी, कुचेष्टा, टिंगल यापलिकडे जाताना दिसत नाहीत. हसतात त्यांचे दात दिसतात या उक्तीप्रमाणे त्यांचीच बौद्धिक कुवत दिसून येते.

कवितानागेश's picture

17 Aug 2013 - 12:19 am | कवितानागेश

गुर्जी, मधल्या कुठल्यातरी लेखातला हा भाग इथे टाकायला हवा होता.

जितक्या मोठ्या समुदायाला तुम्ही सतत संदेश देत राहाल तितक्या मोठ्या प्रमाणात तुमचा भक्तवर्ग वाढेल. कोण म्हणतं परपेच्युअल मोशन मशीन बनवणं अशक्य आहे म्हणून? हे यंत्र चालतं याचं कारण लोकांचा सत्य म्हणून मान्यता देण्याचा दृष्टीकोन. सत्य हे खूप लोकांना 'चालताना मातीवर आपल्या पाऊलखुणा उमटाव्या, व मागे वळून पाहाताना त्यातं पाणी साठून चंद्राचं प्रतिबिंबं दिसावं' तसं दिसतं. जितकी लोकं जास्त तितक्या पाऊलखुणा जास्त, व तितकीच जास्त चंद्रबिंबं.

तरीही साधनानंद थांबेल की नाही याची शंकाच आहे.
नमस्कार आणि आशिर्वाद,
अभ्यासू माउ

राजेश घासकडवी's picture

15 Aug 2013 - 7:55 am | राजेश घासकडवी

त्वचेची जाडी कमाल मर्यादेपर्यंत वाढलेले आदर्श कोण?

अशी नावं सांगणं हे आमच्या साधकांमध्ये बसत नाही. मात्र एक सांगू शकतो, आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत - त्यात व्यासपिठांवर उभे राहाणारे अनेक राजकारणी नीट निरखून पहा. बऱ्याच जणांनी कातडी जाड करण्यासाठी हीच साधना केलेली आहे.

तेलकट झालेल्या त्वचेला वास कसला येतो?

एरंडेलाचा. हात चोळत बसणारांना तोंडातही एक कडवट चव रहावी यासाठी एरंडेल तेल निर्माण होण्याची व्यवस्था आहे.

लादेन ध्यानप्रकार करणार्‍या मुलांना कायमचं दूर ठेवण्यासाठी मुलींना काही ध्यानप्रकार सुचवाल का?

त्याची काही गरज नाही. मुलींनी ज्यांना आधीच दूर ठेवलेलं आहे असेच लोक या साधनेकडे वळतात.

पिशी अबोली's picture

16 Aug 2013 - 11:07 am | पिशी अबोली

हं..वाटलंच... ;)

खाजकुयली झिन्दाबाद!

विटेकर's picture

16 Aug 2013 - 5:06 pm | विटेकर

आपल्या अनुभवाच्या खाली " हे पत्र १०० जणांना पाठ्विल्यास आणि ५०० जणांना पाठ्विल्यास काय होईल " हे लिहले नसल्याने " णिषेद" !
फलप्राप्ती का नाय लिव्ली?

अनिरुद्ध प's picture

16 Aug 2013 - 5:54 pm | अनिरुद्ध प

काय काका त्याणि फलप्राप्ती ते काय म्हन्तात ते आदिच लिवुन ठेवलय,आस काय करताव.

प्यारे१'s picture

17 Aug 2013 - 12:28 am | प्यारे१

गुर्जी...
लादेन म्हणजे एखाद्यावर 'जबरदस्तीने 'पुश' करेन' असं काहीसं आहे का?
का ये बलात्कार नाही है बबुवा?

राजेश घासकडवी's picture

17 Aug 2013 - 2:27 am | राजेश घासकडवी

अर्थातच. लादेन ध्यानपद्धतीचं नाव हे साधकाने आपली मतं इतरांवर लादत राहण्यावरूनच आलेलं आहे.

हाच ध्यानप्रकार अशा जबरदस्तीशिवाय करता येतो, पण त्याचं नाव वेगळं आहे. त्याला बिन-लादेन म्हणतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2013 - 2:33 am | डॉ सुहास म्हात्रे

ही बिन-लादेन पद्धत तर अजूनच जास्त आतंकवादी जबरदस्ती झाली ! चक्क असं कर नाहीतर तुला बिन (डब्यात) मध्ये कोंबेन म्हणताय ! ;)

DEADPOOL's picture

26 Nov 2015 - 11:54 pm | DEADPOOL

पण आमची मानसिक कुवत नाही हो समजून घेण्याची!

कंजूस's picture

30 Aug 2023 - 3:25 am | कंजूस

स्फोटक धागा
हा इतका स्फोटक धागा कसा काय अडगळीत पडला?
सुरुवातच गुरु शिष्य संवादाने झाली.

चौकस२१२'s picture

30 Aug 2023 - 6:28 am | चौकस२१२

आता मी या ध्यानपद्धतीविषयी सांगतो.
नको .. कशाला? बोलबलायला इथे ध्यान म्हणून काही करायला बसलं कि उलट ५० विषय डोक्यात येतात ... त्यापेक्षा सहजपणे झोप कशी लागेल याचे काही तंत्र असेल तर सांगा ... "चल ५ मिनितटे झोपतो म्हणून" जी लोक लगेच ढाराढूर झोपू शकतात त्यांचे गुपित सांगा जास्त फायदा होईल समाजाचा