लादेन ध्यानप्रकार

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
11 Aug 2013 - 10:04 pm

अध्यात्म या विषयावर अनेक गैरसमज आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अध्यात्म गूढ, अंधूक, धूसर, अगम्य आहे हे नसून अध्यात्माविषयी विचार करणारे बहुतेक लोकं मठ्ठ असतात हे आहे. त्यांचा हा मठ्ठपणा दूर करण्याची जबाबदारी मी नाईलाजाने स्वीकारतो आहे. तशी ती जबाबदारी 'कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो, कृपया ही जबाबदारी स्वीकाराच. नक्की...' अशी विनंती करत काही शेकडो लोकं आले होते असं नाही. मला केवळ तसं वाटतं म्हणून मी स्वीकारतो आहे.

सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे काही वाचलं आहे, विचार केला आहे ते निखालस असत्य आहे हे तुमच्या मठ्ठ डोक्यात आधी भरवून घ्या. कारण तुम्ही जे वाचलेलं आहे ते स्मृतीमध्ये जातं. आणि तुमचं मन तुमच्या या स्मृती वापरून तुम्हाला भलतेसलते संदेश देतं. पण तरीही कृपया आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन या लेखावर प्रतिसाद लिहून मात्र नक्की करा. कारण तुम्ही काहीही लिहिलं तरी त्यातून तुमचं अडाणीपण, अभ्यासाचा अभाव, बुद्धीचा कोतेपणा, खालची वैचारिक पातळी याच गोष्टी दिसत रहाणार हे उघड आहे. तेव्हा मला त्या दाखवून देण्याच्या आनंदापासून वंचित ठेवू नका. कारण हा आनंद हा सच्चिदानंद आहे, ब्रह्मानंद आहे. या आनंदाची प्राप्ती करण्यासाठीच हा सृष्टीचा पसारा निर्माण झालेला आहे. पण दुर्दैवाने हे कोणालाच कळत नाही. दुर्दैव म्हणजे, ज्यांना कळत नाही त्यांचं दुर्दैव. माझं सुदैवच, कारण मला पुन्हा पुन्हा 'तुम्हाला हे कळलेलं नाही' असं सांगण्याची संधी मिळते. आणि माझ्या ब्रह्मानंदाच्या अकाउंटमधली ब्यालन्स वाढत वाढत जाते.

हा ब्रह्मानंद वाढवण्यासाठी मी एक सोप्या प्रकारचं ध्यान करतो. त्याचं नाव आहे लादेन ध्यानप्रकार. हा आधुनिक काळात निर्माण झालेला ध्यानप्रकार आहे. पौर्वात्य म्हणजे पुरातन असं आपण मानतो. पण नव्या संशोधनानुसार सर्व मानवजातीची निर्मिती सुपीक चंद्रकोरीच्या भागात झाली. त्यामुळे तो मध्यपूर्वेतला भाग सगळ्यात पुरातन आहे. लादेन ध्यानप्रकारही तिथेच निर्माण झाला. या संस्कृतीची जाण नसलेल्या पाश्चिमात्यांनी त्याला अतिरेक, दहशतवाद वगैरे म्हटलं. पण यावरूनच त्यांच्या ज्ञानाची पातळी दिसून येते. अभ्यास करून ती वाढवायला त्यांना शतकंही पुरणार नाहीत हे उघडच आहे.

हे तंत्र साध्य करणारा मनुष्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. ही साधना करायला सुरूवात केल्यावर सर्वप्रथम दृष्य परिणाम म्हणजे त्वचेची जाडी वाढायला लागते. जसजशी ती साधना अधिकाधिक करायला लागू तसतशी ती त्वचा अधिकाधिक जाड होते. नुसती ती जाडच होते असं नाही, तर तिला नखासारखं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे कितीही आघात केला तरी जखम होत नाही, आगीने चटका बसत नाही. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः' अशा स्वरूपाचा हा आत्माच नखरूपी त्वचेत रूपांतरित होतो. मला काही साधक असे माहित आहेत की ज्यांची त्वचा बावीस सेंटिमीटर जाड आहे. त्यामुळे वाग्बाण तर काय, खरे बाणही लागत नाहीत. काही साधकांच त्वचा जाड होण्याबरोबर तेलकटही होते. त्यामुळे कोणी त्यांना पकडायला गेलं तर हातातून पटकन् निसटून जाता येतं. आणि पकडायला जाणारे तेल लागलेले हात चोळत बसतात. मी अर्थातच या स्थितींच्या बराच पुढे गेलेलो आहे. आणि पुढच्या सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत. या पुढची पातळी म्हणजे त्वचा जाड आणि तेलकटच नव्हे तर मेंदूभोवती एक अभेद्य कवच तयार होतं. हाडं अश्मीभूत होण्याच्या प्रक्रियेला ऑस्सिफिकेशन असं म्हणतात. ही प्रक्रिया सजीवांमध्ये होताना दिसत नाही, पण लादेन ध्यानप्रकार करणारांना मात्र ही प्रक्रिया स्वतःमध्ये घडवून आणता येते. यामुळे इतरांचे विचार डोक्यावर आपटून दाण्णकन खाली पडतात. अशा कडेकोट बंदोबस्तामुळे साधकाला ध्यानपद्धती पुढे चालू ठेवणं सोपं जातं.

आता मी या ध्यानपद्धतीविषयी सांगतो. इतर ध्यानपद्धतींमध्ये अंतर्मुख होणं, स्वतःच्या विचारांच्या अधीन न होता सहज भरकटू देणं वगैरे काहीतरी भंपक गोष्टी असतात. आत्मोन्नतीसाठी आत्म्याचं निरीक्षण, मनाच्या अवस्थांचं वेगवेगळ्या पद्धतींनी नियंत्रण वगैरे निरर्थक गोष्टी असतात. या सगळ्यांचा तोटा असा की हे सर्व वैयक्तिक असतं. आपल्यापुरतं असतं. हा शुद्ध वेडेपणा आहे. असं करणारांना अध्यात्म समजलंच नाही असं मी म्हणेन. लादेन ध्यानपद्धतीत या आंतर्गत प्रक्रियेचं बाह्य प्रक्रियेत रूपांतर करण्यावर भर असतो. या ध्यानप्रकारात भिंतीकडे तोंड करून बसायचं नसतं, तर मोठ्ठ्या जनसमूहाला हातात मायक्रोफोन घेऊन 'हे बघा हे ध्यान करणं म्हणजे हे असं असतं' असं सांगायचं असतं. मग कोणी जर काही प्रश्न विचारले तर त्याला 'तुझ्यासारखा महामूर्ख आत्तापर्यंत पाहिला नाही' असं त्या मायक्रोफोनवरूनच ओरडून सांगायचं. अक्कल काढणे, वैयक्तिक बोलणे अशा जितक्या अधिक गोष्टी करता येतील तितकं ते ध्यान यशस्वी होतं. जितकी जास्त चर्चा 'तू अज्ञानी... नाही नाही तूच अज्ञानी.... तू माझ्या दुप्पट अज्ञानी..... तूच तूच तूच तूच शंभरवेळा अज्ञानी' या स्वरूपाची चालेल तितकं ते ध्यान यशस्वी झालं असं समजावं.

हे प्रकार खुलवण्यासाठी मुद्दामूनच काही विसंगतीपूर्ण विधानं करणं हे अत्यावश्यक आहे. म्हणजे आपण विडंबनं करायची, आणि इतरांनी आपल्याला चेष्टेने काही बोललं तर त्यांना 'तुम्ही विडंबनं करता, चेष्टा करता म्हणजे तुमची पातळी हीन आहे हे सिद्ध होतं' असं म्हणायचं. किंवा कधी मनाच्या दोन विंग्ज आहेत म्हणायचं कधी तीन विभाग म्हणायचं. खरं तर काही सुसंबद्ध बोलायचंच नाही. म्हणजे लोकांना चेव येतो आणि आपण कचाट्यात सापडू असं त्यांना वाटतं. ते जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा आपल्या तैलत्वचेच्या सहाय्याने सुळ्ळकन् सटकून निघून जायचं.

असो. ही केवळ सुरूवात आहे. मी तुम्हाला केवळ एक नवीन तंत्र शिकवतो आहे. तुम्ही हा ध्यानप्रकार करून बघा आणि परिणाम काय होतो ते तपासून बघा. त्वचा जाड, तेलकट, आणि मेंदूभोवती कवच निर्माण तर होईलच. कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.

शिक्षणमौजमजाप्रकटनमाहितीमदतवादप्रतिभा

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

11 Aug 2013 - 10:25 pm | आशु जोग

नावात काय नाही ! अशी एक म्हण आहे मराठीत.

पैसा's picture

11 Aug 2013 - 10:27 pm | पैसा

ठार! क्रमशः राहिलंय काय? असो, तरी पुढचे लेख न लिहिण्यासाठी काय घ्याल?? =))

तरी पुढचे लेख न लिहिण्यासाठी काय घ्याल??

असं लिहून तूच इथे लेखकांना निरुत्साही करण्याचा प्रयत्न करते आहेस. माझ्या बाजूनं तर सतत संकेतस्थळाच्या मूल्यवर्धनाचाच प्रयत्न असतो. मात्र संपादकांनीच असा तेजोभंग आरंभण्याला काय म्हणावं? इतक्या झटक्यात तू वर जे काही लिहलं आहेस ते तुझ्याविषयी कुणी लिहीलं असतं तर तुझी काय परिस्थिती झाली असती याचा विचार कर. सूज्ञ व्यक्तीकडे कृतज्ञता आणि दिलदारी दोन्ही असते. ती 'पुढचे लेख लिहू नका' असं कसं म्हणू शकते?

पैसा's picture

11 Aug 2013 - 10:47 pm | पैसा

माफ करा पण इतरांच्या बुध्दीची कुवत काढणे किंवा इतर लोक किती वैचारिक उंची गाठू शकतात यावर लेखात भाष्य करून कितपत मूल्यवर्धन होते? तुमच्या लेखातील कन्टेन्टपेक्षा इतर गोष्टींवर चर्चा का होते? याचे कारण (माझ्या मते) इतरांच्या बुध्दीची कुवत काढण्याचा प्रकार आणि असे वारंवार झाले तर ते कोणाला आवडेल? आणि बाय द वे, मी या संकेतस्थळावर एका निकनेमने लिहिते आणि कोणी कोणत्या नावाने लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. तुम्हाला माझे नाव माहित आहे पण ते नाव मी इथे वापरत नसताना तुम्ही परस्पर ते इथे कसे वापरू शकता?

आँ. आणि संपादक झाले म्हणून काय झाले, आम्हाला काय आवडीनिवडी, भावना असू नयेत काय!

-हिलरी क्लिंटन

राजेश घासकडवी's picture

11 Aug 2013 - 10:55 pm | राजेश घासकडवी

तुझं खरं नाव काय आहे मला माहित नाही. किंबहुना तूही खरी आहेस की नाही हे मला माहीत नाही. हे मी स्वीकारू शकतो. कारण माझं मन मला काय सांगतं याकडे मी लक्ष देत नाही. पण सहीमध्येच तू ज्योति कामत असं लिहिलेलं आहेस. कदाचित ते तुझं नाव नसेलही. कदाचित 'योगी पावन मनाचा' हेही नाव असू शकेल. या सगळ्या गोष्टी मी सूज्ञ असल्याने मला समजतात. तुला समजत नाहीत म्हणून अनुकंपा वाटते. पण सर्वांनीच सतत माझी वैयक्तिक पातळीवर उतरून चेष्टा करावी हे बरोबर नाही. हे स्पष्ट सांगणं याला जर तुझ्या बुद्धीची कुवत काढणं असं वाटत असेल तर समज बापडी. त्यावरून तुझ्या मानसिकतेची समज येते.

पैसा's picture

11 Aug 2013 - 11:00 pm | पैसा

माझी मानसिकता काढल्याने तुमचा प्वॉइंटाचा मुद्दा कसा काय सिद्ध होतो ब्वॉ? सगळी माया आहे हे समजायला सूक्ष्मात जायची गरज नाही. असं तुम्हाला कधीपासून होतंय हो?

राजेश घासकडवी's picture

11 Aug 2013 - 11:07 pm | राजेश घासकडवी

तुमची मानसिकता काढल्याने प्वॉइंटाचा मुद्दा सिद्ध बिलकुल होत नाही. मला या साधनेचे मिळणारे प्वॉइंट्स वाढतात. हे लेखात इतक्या स्पष्टपणे लिहिलेलं आहे. लेख पुन्हा एकदा शांतपणे वाचून काढावा ही विनंती.

माया या शब्दाच्या अर्थाच्या पातळ्याही तुमच्या लक्षात आलेल्या नाहीत. माया म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलेली - तो फारच ढोबळ अर्थ आहे. माया म्हणजे प्रेमसुद्धा. माया म्हणजे जाडी वाढल्यावरही कपडा मोठा करता यावा यासाठी ठेवलेली जागासुद्धा. आणि माया म्हणजे गोळा करण्याची मायाही. मी इथे प्रतिसादांची माया गोळा करतो आहे हेही तुमच्या लक्षात आलेलं नाही.

एकंदरीत तुमचं नाव काहीही असलं तरी 'सूज्ञा' निश्चित नसावं असं वाटत रहातं आहे.

पैसा's picture

11 Aug 2013 - 11:18 pm | पैसा

तुमचंच बरोबर! लेख शांतपणेच काय प्रिंट औट काढून वाचेन आणि अर्थ कळलाच तर परत येईन. आता माझी सूक्ष्मात जायची वेळ झाली. तुमचं चालू द्या!

राजेश घासकडवी's picture

11 Aug 2013 - 11:20 pm | राजेश घासकडवी

अशा तिरक्या प्रतिसादांत जेव्हा समोरची व्यक्ती दगडावर डोकं आपटत बसल्याचं फीलिंग घेऊन शेवटी कंटाळून, वैतागून निघून जाते तेव्हा मला बोनस पॉइंट्स मिळतात...

साकार बोनस पॉईंट्स की निराकार बोनस पॉईंट्स..?

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2013 - 12:03 am | राजेश घासकडवी

बोनस पॉइंट्स हे निराकारच असतात. तुमच्याकडे काही क्रेडिट कार्ड वगैरे नाही का? त्या कंपन्या ज्या बोनस पॉइंट्स वगैरे देतात त्यांविषयी तुम्हाला काहीच माहीत नाही? आपलं इतकं अज्ञान इतक्या प्रच्छन्नपणे उघड करण्याची लोकांना हौस असावी. स्ट्रीकिंग करणं वगैरेची काही लोकांना विकृत हौस असते त्यातलाच हा प्रकार असावा.

असो. तुमच्या अज्ञानावर पांघरूण घालून लज्जारक्षण करण्याचाच माझा प्रयत्न आहे. तर या निराकार बोनस पॉइंट्सचा वापर मला पुढच्या सिद्धी मिळवण्यासाठी करता येतो. जसे की इथल्या सर्व सदस्यांची व्यक्तिगत माहिती उघड करण्याची शक्ती. ती थोड्या प्रमाणात मिळालेली आहेच, पण पुरेसे पॉइंट्स झाले की ही शक्ती अजूनही वाढेल. मग मला सगळ्यांचे क्रेडिट कार्ड नंबर्स, बॅंक अकाउंट नंबर्स, पासवर्ड्स, व्यक्तिगत पत्रं सगळं काही दिसेल. अमेरिकन सिक्युरिटीवाल्या लोकांना या सिद्धीमुळेच तर हे सगळं करता येतं.

मोदक's picture

12 Aug 2013 - 12:31 am | मोदक

अर्रे..???

साध्या प्रश्नावरून पार स्ट्रीकींग पर्यंत पोहोचलात की!! नेहेमीप्रमाणे अंमळ गल्लत होते आहे की तुमच्या कंपूत (त्या मैदानावर पळणार्‍यांच्या) ओढण्याचा प्रयत्न..?

असो.. सिद्धी प्राप्त झाली की कळवा. त्यावेळचे त्यावेळी पाहू ;-)

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2013 - 12:57 am | राजेश घासकडवी

साध्या प्रश्नावरून पार स्ट्रीकींग पर्यंत पोहोचलात की!!

लादेन ध्यानपद्धती अशीच असते मोदका, लादेन ध्यानपद्धती अशीच असते. (श्रेयअव्हेर वि.वा.शिरवाडकर)

खाली लिहिला आहे तोच प्रतिसाद पुन्हा एकदा येथे देतो..

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!!

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2013 - 1:18 am | राजेश घासकडवी

शेवटचा प्रतिसाद आपलाच ठेवण्याची धडपड आवडली. पण मी ती चालू देणार नाही. कारण शेवटचा प्रतिसाद आपलाच असण्याचे स्पेशल पॉइंट्स असतात.

मोदक's picture

12 Aug 2013 - 1:23 am | मोदक

:-))

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2013 - 1:30 am | राजेश घासकडवी

:)

प्रास's picture

12 Aug 2013 - 1:35 am | प्रास

घासकडवींच्या आजच्या रविवारचा दिनक्रम कळला.....

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2013 - 1:46 am | राजेश घासकडवी

रविवार दुपार फुकट घालवण्याची गरज नाही. मी कधीतरी साताठ दिवसांनी येईन आणि हळूच इथे शेवटचा प्रतिसाद देऊन जाईन.

मोदक's picture

12 Aug 2013 - 1:48 am | मोदक

वाचनखूण साठवली आहे!

मोदक's picture

12 Aug 2013 - 1:36 am | मोदक

धन्यू..

हे बघ्ण्याची सिद्धी एका सोफ्ट्वेर (Software),मध्ये आधीच आहे,आपण सिद्धी प्राप्त करे पर्यन्त त्यानी सुद्धा पुढील पातळी गाठ्ली असेल्,असो सिद्धी प्राप्त कर्ण्यासाठी शुभेच्छा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2013 - 4:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

हेच काम बीपीओ कंपन्यातल्या कर्मचार्‍यांना व्हितॅमीन एम् चा प्रसाद चढवून काही साधकांनी अगोदरच केल्याच्या बातम्या वाचल्या आहेत ;)

देवांग's picture

13 Aug 2013 - 6:28 pm | देवांग

थंड घ्या

चिगो's picture

16 Aug 2013 - 4:58 pm | चिगो

कदाचित 'योगी पावन मनाचा' हेही नाव असू शकेल.

मी इथंच गचकलो.. =)) =))

क्लिंटन's picture

12 Aug 2013 - 10:02 am | क्लिंटन

पोट धरधरून गडाबडा लोळत हसायची स्मायली आहे का हो कोणाकडे? :)

बॅटमॅन's picture

12 Aug 2013 - 12:42 pm | बॅटमॅन

=)) हीच ना? आधी = मग ) मग ) टाईपवा विदौट स्पेस, होऊन जाईल.

प्रसाद गोडबोले's picture

12 Aug 2013 - 4:31 pm | प्रसाद गोडबोले

पण त्यात पोट धरलेलं कुठ दिसतय ??

बॅटमॅन's picture

12 Aug 2013 - 5:13 pm | बॅटमॅन

फ्रंट व्ह्यू आहे हो तो, डोक्याने सगळे झाकून टाकलेय. त्यामुळे ऑर्थोग्राफिक नियमाप्रमाणे डोस्कंच तेवढं दिष्णार.

अभ्या..'s picture

12 Aug 2013 - 5:54 pm | अभ्या..

परस्पेक्टॆव्ह बरोबर आयसोमेट्रिक बी गण्डलय काय ? ;-)

बॅटमॅन's picture

12 Aug 2013 - 5:58 pm | बॅटमॅन

हाहा अगदी अगदी ;)

नानबा's picture

19 Aug 2013 - 12:15 pm | नानबा

फ्रंट व्ह्यू मध्ये दात डाव्या बाजूला कसे दिसतील ओ??
ही घ्या हो एक स्माईली. यात पोट धरून हसत नाहीये पण तुमचं काम होऊन जाईल याने. :)

as

विजुभाऊ's picture

12 Aug 2013 - 12:51 am | विजुभाऊ

गुरुजी पैसातै सोबत सहमत.

विजुभाऊ's picture

12 Aug 2013 - 12:58 am | विजुभाऊ

गुरुजी पैसातै सोबत सहमत.

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2013 - 1:01 am | राजेश घासकडवी

अहो सात मिनिटांपूर्वीच कळलं होतं ते. पुन्हा पुन्हा काय सांगताय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2013 - 2:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

"शेवटचा प्रतिसाद आपलाच असण्याचे स्पेशल पॉइंट्स असतात." असं तुम्हीच ना म्हणाला होतात. विजुभाऊ मिसळपाववरचे सन्माननीय आणि अनुभवी सदस्य आहेत. अशा (लवेचेप्रच्या) युक्त्या तुमच्या आधीपासून त्यांना माहित आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Aug 2013 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा

अरे अरे घासू, मी कित्ती कित्ती हसू..! ?
हसून हसून हुभा र्‍हाऊ,की मांडी घालुन बसू..! http://www.sherv.net/cm/emo/laughing/belly-laugh.gif
===================================

@मला काही साधक असे माहित आहेत की ज्यांची त्वचा बावीस सेंटिमीटर जाड आहे.>>> =))
@लादेन ध्यानपद्धतीत या आंतर्गत प्रक्रियेचं बाह्य प्रक्रियेत रूपांतर करण्यावर भर असतो.>>> =))
प्रत्येक वाक्या वाक्यावर हसतो आहे..! http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

राजेश घासकडवी's picture

11 Aug 2013 - 10:41 pm | राजेश घासकडवी

मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे. तर तुम्हाला स्मायली टाकण्यापलिकडे काही सुचत नाही. सतत निष्कारण उपहासात्मक प्रतिसाद आणि असंबद्ध विडंबनं या मागची मानसिकता एकदा उलगडून दाखवतो म्हणजे पुन्हा असं करण्यापूर्वी जरा विचार केला जाईल.

निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक उंची गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.

मैत्र's picture

11 Aug 2013 - 11:24 pm | मैत्र

"निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक उंची गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते. "

याचा व्यत्यास असा होईल काय ?

"उच्च स्तरावर काम करतो असे वाटणार्‍या बुद्धीला कमालीचा अहंगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक खोली गाठता येत नाही. मग गंभीरपणाचा आव आणून ती स्वतःचा समर्थन करू पाहते."

राजेश घासकडवी's picture

11 Aug 2013 - 11:30 pm | राजेश घासकडवी

होय. हा व्यत्यास सत्य आहे. पण मी सोडून इतर सर्वांच्या बाबतीत.

मैत्र's picture

12 Aug 2013 - 12:54 am | मैत्र

पण मी सोडून इतर सर्वांच्या बाबतीत.

प्रतिसाद आवडल्या गेला आहे.. हाण्ण.आत्मविश्वास असावा तर असा.

अनिरुद्ध प's picture

12 Aug 2013 - 5:01 pm | अनिरुद्ध प

कुठेतरी वाचले आहे कि 'अहन्कार जळोनी जावा' पण ईथे 'मी' पणा काही सुटत नाही,असो या आमच्या प्रतिसादाने आपले बोनस (बोगस) गुण वाढोत.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Aug 2013 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा

@मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे.
तर तुम्हाला स्मायली टाकण्यापलिकडे काही सुचत नाही.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

@निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो>>> =)) हे राम... http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/setting-himself-on-fire.gif आत्मा दहन..आपलं ते हे..आत्मदहन करीत आहे मी या वाक्यावर! =))

@कारण तिला कुठलीही वैचारिक उंची http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif गाठता येत नाही....
आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.>>> http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif

अनिरुद्ध प's picture

13 Aug 2013 - 6:49 pm | अनिरुद्ध प

हे कस काय बुवा,कारण आम्ही गीतेतील 'नैनन छिन्दन्ति' असे काहिसे ऐकले आहे.तेव्हा या अज्ञानाचे निराकरण करावे.

चौकटराजा's picture

12 Aug 2013 - 4:46 pm | चौकटराजा

हे पहा राजेश की काय कोण असाल ते....,
तुम्ही हा धागा लिहिताना तुमचा फार नि पार गोंधळ उडलाय याला आमच्या आमच्या अध्यात्माच्या भाषेत ( तुम्हाला ती भाषा कळणे नाही ) संभ्रमावस्था म्हणतात. अर्थात ज्याला बुद्धी त्यालाच संभ्रम पडणार हेही आम्ही जाणतो.आता तुमच्यावरआम्ही ही सरळ सरळ का टीका करतो आहोत हे सांगतो. धाग्यात तुम्ही म्हणताय शिक्षण मौजमजा . ओके? मग मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे हे वाक्य कशासाठी ? ऑं ? तुम्ही एकतर मौज ठेवा किंवा गंभीरपणा.. एक पे रहना .. ग्वोडा चतुर ग्वोडा चतुर ये कया लगाया हे या ग्वोडा बोलो या चतुर......
अरे बापरे पण मी इथे मौज मजा करायला आलो होतो मलाही संभ्रमाची बाधा झाली की काय ?? ..

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2013 - 4:54 pm | राजेश घासकडवी

माझ्या मते शिक्षण ही गंभीर मौजमजाच असते. पण विषयांमध्ये गंभीर असं कुठे सापडलं नाही.

कवितानागेश's picture

11 Aug 2013 - 10:44 pm | कवितानागेश

हे राम!!!!!!
=))
=))

अवतार's picture

11 Aug 2013 - 10:58 pm | अवतार

_/\__/\__/\_

प्रभाकर पेठकर's picture

11 Aug 2013 - 11:27 pm | प्रभाकर पेठकर

हा: हा: हा: पालथ्या घड्यावर अजून बादलीभर पाणी. उपयोग शून्य.

=)) =)) =)) =))

ताक कीबोर्डवर सांडलंय. बाकीचं नंतर सांडतो आपलं सांगतो.

शिल्पा ब's picture

11 Aug 2013 - 11:57 pm | शिल्पा ब

अय्या गडे !!

खटपट्या's picture

12 Aug 2013 - 12:19 am | खटपट्या

मी एक मिपाचा नवीन वाचक आहे. हे असे काहीतरी पहिल्यान्दा वाचतो आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

धर्मराजमुटके's picture

13 Aug 2013 - 3:50 pm | धर्मराजमुटके

कळेल ! कळेल !! नक्की कळेल. थोडी कळ काढा.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!!!

विजुभाऊ's picture

12 Aug 2013 - 1:13 am | विजुभाऊ

गुरूर देवो: राजेश्वरः...........

पुष्कर जोशी's picture

18 Aug 2013 - 1:54 am | पुष्कर जोशी

गडाबडा

प्रसाद गोडबोले's picture

12 Aug 2013 - 1:23 am | प्रसाद गोडबोले

महान =))

उत्खनक's picture

17 Jun 2020 - 9:40 pm | उत्खनक

सध्याचा मिपावर चाललेला तथाकथित अध्यात्मिक गोंधळ पाहता आणि मार्कस भौंनी केलेल्या खास सुडंबनानं, घासुगुर्जींनी केलेल्या ह्या स्वतंत्र वृत्तीच्या डुंबनाची प्रकर्षानं आठवण जाहली. सात वर्षांपुर्वीची परिस्थिती अजूनही जवळ-जवळ तशीच कायम आहे हे पाहून खरंच विस्मय जाहला..! धमाल आहे अगदी!!

हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ म्हणतात त्याचा पुनःप्रत्यय आला!! म्हटले, हा आनंद आपण एकट्यानंच घेण्याचे पातक का करावे?? म्हणून हा खननोद्योग! =))

प्रसाद गोडबोले's picture

29 Aug 2023 - 11:02 pm | प्रसाद गोडबोले

तब्बल १० वर्षांनी ह्या लेखनाची आठवण आली . जुन्या आठवणी जाग्या झ्याल्या अन हसु आले =))))

परिस्थीतीत आजही जैसे थे च आहे ! =))))

जय गुर्देव
__/\__

उन्मेष दिक्षीत's picture

29 Aug 2023 - 11:05 pm | उन्मेष दिक्षीत

हॅज कन्सिस्टन्सी ! परफेक्शन को इम्प्रुव करना मुश्कील होता है - दिल चाहता है !

आजही मीपा संक्षीना मिस करते आहे म्हणजे बघा !

धीस *@^&"? ध्यान व्यान इज नॉट माय कप ऑफ टी.
सो आप्ला तर पास बॉ. :)

नंदन's picture

12 Aug 2013 - 4:28 am | नंदन

त्वचा जाड, तेलकट, आणि मेंदूभोवती कवच निर्माण तर होईलच. कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.

ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय? :)

बाकी लेख फक्कडच. स्पांडोबांच्या, आपलं प्रसन्नच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत ;) (प्रास प्रास!)

कवितानागेश's picture

12 Aug 2013 - 7:27 am | कवितानागेश

व्हेअर इज द स्पा ऑफ द अस? :(
टीम लीडर बेपत्ता असल्यानी कुठला स्टँड घ्यायचा ते कळत नाहीये. त्यामुळे कालपासून फक्त हसत लोळतेय.. ;)

कालपासून फक्त हसत लोळतेय.. >> भलताच व्यायाम झाला असेल नै? ;)

धमाल मुलगा's picture

12 Aug 2013 - 9:46 pm | धमाल मुलगा

ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय?

=)) =)) =))
बा नंदना...तुजपुढे अगदी हातच टेकले आहेत रे!

उत्खनक's picture

17 Jun 2020 - 9:41 pm | उत्खनक

ब्रेबचाईल्ड!!! छ्या.. मिपाची बातच काही और आहे! :))

अगागागा, ब्रेन खिमा केलात की हो एकदम =)) =)) =))

वारल्या गेलो असून एक साष्टांग दंडवत स्वीकारावा. _/\_

अनिरुद्ध प's picture

13 Aug 2013 - 6:52 pm | अनिरुद्ध प

हा तुला दन्ड्वत.

सुहास..'s picture

14 Aug 2013 - 11:08 am | सुहास..

ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय >>>

=)) =)) =))

मायला या नंद्या च्या !

चिगो's picture

16 Aug 2013 - 5:53 pm | चिगो

कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.

हे म्हणजे धोनीष्टाईल झालं.. लास्ट बॉलवर सिक्स आणि वर्ल्ड्कप खिशात.. ;-)

ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय?

=)) =))

चित्रगुप्त's picture

12 Aug 2013 - 8:48 am | चित्रगुप्त

अभिनंदन
ध्यानाचे एकशे आठ प्रकार आजवर ठाऊक होते, त्या सर्वांहून वरचढ ही लादेन ध्यानपद्धती निर्माण करून आपण एक अद्वितीय आणि अभिनंदनीय कृत्य केलेले आहे, आणि समस्त मानवजातीवर अगणित उपकार करून ठेवलेले आहेत.

कृपया "साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील" हे कसे घडते, या ध्यान पद्धतीतून साधकाची एकंदरित वाटचाल 'समाधीतून संभोगाकडे' अशी होते का, 'स्ट्रीकिंग करणे' या ध्यान-प्रकाराशी याचा काही संबंध आहे का, वगैरे खुलासा करावा. याशिवाय 'बेशर्त स्वीकृती' असल्याशिवाय सुद्धा हे ध्यान करता येते का, हेही लिहावे. अभ्यास वाढवावा, म्हणून हे प्रश्न विचारले आहेत, वाचकांनी सुद्धा नीट वाचून समजवून घ्यावे, म्हणजे जीवन आनंदमय होईल.

"पूजा" कार घासू गुर्जींकडून इतक्या उथळ आणि हलक्या लेखाची अपेक्षा नव्हती
असले ध्यान प्रकार शिकवून तुम्ही समाजाला अंध:श्रद्धेच्या दरीत लोटताय असे वाटत नाहीये का तुम्हाला?

तुझ्या प्रतिसादात परा दिसला. ;)

राजेश घासकडवी's picture

12 Aug 2013 - 4:57 pm | राजेश घासकडवी

असले ध्यान प्रकार शिकवून तुम्ही समाजाला अंध:श्रद्धेच्या दरीत लोटताय असे वाटत नाहीये का तुम्हाला?

मी अंधश्रद्धेच्या दरीत लोटतोय? अहो मी माझे आणि इतर साधकांचे अनुभव सांगितले. ते सत्यच आहेत. या साधनेने मोक्षाच्या वाटेवर अनेक सिद्धी मिळतात. मला सांगा, तुमची त्वचा आहे का बावीस सेंटीमीटर जाड? नाही ना? मग ही पद्धती वापरून बघायला काय हरकत आहे?

कळले पण मोक्श मिळतो का?

लोकांच्या अध्यात्माबद्दल काय काय कल्पना असतात!
राजेश, तुम्ही स्वतःच अतिशय संभ्रमित आहात. त्यात अजून इतरांना काय सांगताय?

कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो

जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे

वरील दोन वाक्यांतच तुमचा संभ्रम उघड झालेला आहे.

सर्व मानवजातीची निर्मिती सुपीक चंद्रकोरीच्या भागात झाली.

हे म्हणजे तर संभ्रमित अवस्थेची पुढची पायरी दाखवण्याचा प्रकार आहे. लेखाचा आणि या वाक्याचा काहिएक संबंध नाहीये.

मी तुम्हाला केवळ एक नवीन तंत्र शिकवतो आहे

मी या ध्यानपद्धतीविषयी सांगतो

हा आधुनिक काळात निर्माण झालेला ध्यानप्रकार आहे.

कधी तंत्र, कधी पद्धती, कधी प्रकार.. इतके संभ्रमित मन असतांना तुमच्या ज्ञानाची काय पातळी आहे ते समजलेच आहे.

अध्यात्म समजलंच नाही असं मी म्हणेन.

इथे तर स्वतःच मान्य केलेलं आहे की तुम्हाला काहीही समजलेलं नाही. विषय संपला!

केवळ काहीतरी असंबद्ध खरडायचे आणि आपल्या तोकड्या ज्ञानाचे जगजाहीर प्रदर्शन करायचे याशिवाय या लेखाचे काहीही प्रयोजन नाही असे मी म्हणेन. असा प्रतिसाद देण्याची माझी इच्छा नव्हती. पण स्वतःला कळत नसलेल्या विषयात कुणी उगाच काही बोलू लागला तर त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.

---
केवळ मीच सत्य लिहितो.

कवितानागेश's picture

16 Aug 2013 - 9:01 am | कवितानागेश

:D

चिगो's picture

16 Aug 2013 - 5:55 pm | चिगो

=)) =))

चिगो.. पुण्यतिथी, १६ ऑगस्ट..

आनंदी गोपाळ's picture

18 Aug 2013 - 9:42 am | आनंदी गोपाळ

पण स्वतःला कळत नसलेल्या विषयात कुणी उगाच काही बोलू लागला तर त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.

म्हंजे तुम्ही लिवलंय त्या विषयात तुमाला बी काय कळत नाय असं म्हंताय का?

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2013 - 7:47 pm | राजेश घासकडवी

आनंदी गोपाळ,

या लेखावर माझ्या बाजूने प्रतिसाद देणारे तुम्ही पहिलेच! यावरून एकट्या तुम्हालाच प्रगल्भता नाही तरी किमान अक्कल आहे हे दिसून येतं.

मला एक समजत नाही. मी या लेखात केवळ एक तंत्र सांगितलेलं आहे. असं असूनही माझ्यावर सगळ्यांनी असे हल्ले करण्याचं कारण काय? या लेखात काही भडकाऊ नाही, कुणाविरुद्ध बदनामीकारक शब्द नाही. मिसळपावच्या आधिकारिक धोरणात तर बसतोच आहे, नाहीतर संपादकांनी उडवला असता. मग सर्व सदस्यांनी असं माझ्यावर तुटून का पडावं? म्हणजे सगळेच सदस्य अज्ञानी तर आहेतच, पण त्यांना किमान सुसंस्कृतपणाही नाही असं समजावं का?

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2013 - 8:05 pm | प्रभाकर पेठकर

सर्व सदस्यांनी असं माझ्यावर तुटून का पडावं?...... .....त्यांना किमान सुसंस्कृतपणाही नाही असं समजावं का?

अरेरे! थोडक्यात लेखाच्या मुळ स्वभावाला सोडून दूर गेलात. प्रश्न नाही. विधानं करा.
'सर्व सदस्य विनाकारण माझ्यावर तुटून पडत आहेत.' आणि 'त्याच्यापाशी किमान सुसंस्कृतपणाही नाही.'

मी तुमच्या प्रतिसादावर लिहीलं आहे. हा तुमच्यावर वैयक्तिक हल्ला वगैरे नाही.

आनंदी गोपाळ's picture

18 Aug 2013 - 11:32 pm | आनंदी गोपाळ

हे एक.
त्यावर तशाच मनोवृत्तीत जाऊन प्रतिसाद देणे हे म्हणजे खालील बिरबलाच्या गोष्टिसारखे आहे.
तुमचे अभिनंदन!

*
एकदा एक बहुरूपी बादशहासमोर म्हणे बैलाचे सोंग करीत असतो. बघ्यांत उभा असलेला एक लहान मुलगा त्या बैलाला खडा मारतो. अन मग नंतर खुश होऊन स्वतःची मळलेली टोपी बैलाला उर्फ बहुरूप्याला बक्षीस देतो. हे पहाणारा बादशाह त्या मुलाला बोलावून घेतो अन विचारतो, की हे नक्की काय केलेस? मुलगा सांगतो, खाविंद, जनावराला खडा मारला, तर ते तिथली चामडि हलविते. ते या बहुरूप्याने केले. त्याचे सोंग वठले, म्हणून मी टोपी बक्षीस दिली!
तर 'म्हणे', तो बादशहा होता अकबर, व हा मुलगा बिरबल.

घासकडवींनी नुसता खडूस लेख लिहिलेला नाही, तर त्यावर त्यांच्या प्रकृतीच्या विसंगत असे भांडकुदळ व आक्रस्ताळे प्रतिसाद देखिल देत आहेत.

हे मला एकट्याला नव्हे, अनेक जुन्या जाणत्या मिपाकरांना जाणवले आहेच. मी मारलेल्या खड्याला योग्य प्रतिसाद आला, याचाच अर्थ, बहुरूप्याचे सोंग चांगले वठते आहे..

*

गुर्जी, जौ द्या ना. की फर्क पैन्दा?

प्रसाद प्रसाद's picture

12 Aug 2013 - 1:03 pm | प्रसाद प्रसाद

चक्क कळलं की हो क्काय लिहिलंय ते...... हल्ली मनावर काही लिहून आले की मी पास देतो.

राही's picture

12 Aug 2013 - 1:21 pm | राही

छे बुवा. सगळीकडे या भुंग्यांच्या रुणझुणाटाने उच्छाद मांडलाय नुसता.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Aug 2013 - 1:43 pm | प्रकाश घाटपांडे

मागच्या वेळी आपण पूजेची पथ्ये सांगितली होती. त्याचा अनेकांना फायदा झाला होता. तशी काही या लादेन ध्यानाची पथ्ये असतात का?

लेख वाचला , प्रतिसादही वाचले…. हा लेख उद्देशात्मक आहे कि उपहासात्मक आहे हे काही कळले नाही बा !!
पण फार करमणूक झाली … अगदी ROFL !

नानबा's picture

12 Aug 2013 - 10:03 pm | नानबा

पुढला भाग आला की कळेलसं वाटतंय. आत्ता तरी लेख कर्टली अँब्रोजचा उसळलेला चेंडू सचिन न वाकतासुद्धा त्याच्या डोक्यावरून जावा तितका बाऊन्सर गेलेला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2013 - 10:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा मी तुमच्यावर "लादेन" तोच सर्वोत्तम ध्यानप्रकार, जरादेखील शंका घेतलीत तर.... याप्रकारचा वाटतो, म्हणून त्याचे नाव "लादेन ध्यानप्रकार" असे पडले असावे.

प्रसाद प्रसाद's picture

13 Aug 2013 - 2:00 pm | प्रसाद प्रसाद

he he he

पिवळा डांबिस's picture

12 Aug 2013 - 10:56 pm | पिवळा डांबिस

=))
शिरां पडो या घासुगुर्जीच्या!!
आता काही दिवस फक्त वाचनमात्र रंवतलंय हो माझो संकल्प मोडूक लावलो मेल्यान!!!!