अगदी सोपी 'फिटनेस टेस्ट'

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
28 Apr 2013 - 1:56 pm

कुणालाही, केंव्हाही, कुठेही पटकन करता येइल, अशी ही फिटनेस टेस्ट:

खाली (जमिनीवर) बूड टेकवून बसायचे, आणि कुठेही हात न टेकता, कसलाही आधार न घेता उठून सरळ उभे रहायचे.

बस, एवढीच ही टेस्ट आहे. ही अगदी साधी क्रिया देखील कित्येकांना जमत नाही, असे दिसून येते. याची कारणे खालील पैकी असू शकतातः
१. लठ्ठपणा, फाजील वजन.
२. पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे.
३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे
४. उदरपटल पुरेसे कार्यक्षम नसणे (उपायः कपालभाती प्राणायाम).

या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम.

तुम्ही स्वतः प्रचिती घ्या आणि शक्य असल्यास विविध वयोगटातल्या आणि शारीरिक ठेवणीच्या लोकांकडून ही चाचणी करवून निरिक्षणे सांगा.

जीवनमानराहणीविज्ञानअनुभवशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

पास झालो. :)
(बाळसं धरलेला) गणा

बॅटमॅन's picture

28 Apr 2013 - 2:06 pm | बॅटमॅन

+१.

आम्हीही पास झालो.

(बाळसेदार) बॅटमॅन.

अभ्या..'s picture

28 Apr 2013 - 2:47 pm | अभ्या..

मी तर मेरीटलिस्टात. :) रिपीट परफॉर्मन्समध्ये पण.
एकदम फीट न फाइन :)

प्रकाश घाटपांडे's picture

28 Apr 2013 - 2:06 pm | प्रकाश घाटपांडे

या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम.

इथच वांधा आहे ना! योग्य म्हणजे काय? ते कुणी व कसं ठरवायचं?

jaypal's picture

28 Apr 2013 - 2:09 pm | jaypal

आभ्यास केला तेंव्हा कुठे काठावर पास झालो.

स्पंदना's picture

28 Apr 2013 - 2:33 pm | स्पंदना

थांबा जरा. मला मनाची तयारी करु द्या. मग बसेन अन उठले तर लिहेन.

स्पंदना's picture

28 Apr 2013 - 2:41 pm | स्पंदना

फेल!!

प्रभाकर पेठकर's picture

28 Apr 2013 - 2:41 pm | प्रभाकर पेठकर

जीवंतपणी पापाचा पाढा 'चित्रगुप्ता' पुढे वाचला गेला.

जमणं शक्यच नाही. उगीच खोटं कशाला बोला.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Apr 2013 - 2:55 pm | परिकथेतील राजकुमार

ही अगदी साधी क्रिया करता आली, तर खालील अनुमान काढता येतील काय ? :-
१. लठ्ठपणा, फाजील वजन अजीबात नाही.
२. पाठीचा कणा आणि गुडघे मजबूत असणे.
३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती असणे
४. उदरपटल पुरेसे कार्यक्षम असणे

जरा कुठे घटकाभर मनाला बरं वाटलं तर हे आले लगेच शंकासेन्ही.

पाणी पित जा. शंकेखोर मन शांत होईल ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Apr 2013 - 3:16 pm | परिकथेतील राजकुमार

@ गणपा :- काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.

@जयपा :- दाद्या तू पाणी प्यायचा सल्ला देणे म्हणजे दावूदने दंबूक ऐवजी काठी हातात घेण्यासारखे आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Apr 2013 - 3:09 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-310.gifपा.......................स!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif

आतिवास's picture

28 Apr 2013 - 3:11 pm | आतिवास

'अगदी सोपी' या शब्दांशी असहमत :-)

चित्रगुप्त's picture

28 Apr 2013 - 3:36 pm | चित्रगुप्त

....'अगदी सोपी' या शब्दांशी असहमत....
नापास की पास ???

आतिवास's picture

28 Apr 2013 - 3:58 pm | आतिवास

आत्ता ऑफिसात आहे. करुन सांगते पण 'सोपी' जाणार नाही असा अंदाज आहे :-)

बाबा पाटील's picture

28 Apr 2013 - 3:59 pm | बाबा पाटील

विशेष प्राविण्यासह पास....

इनिगोय's picture

28 Apr 2013 - 4:25 pm | इनिगोय

जमलं! मी पास..

सस्नेह's picture

28 Apr 2013 - 4:30 pm | सस्नेह

डचमळत डचमळत काठावर पास.

अग्निकोल्हा's picture

28 Apr 2013 - 5:04 pm | अग्निकोल्हा

मग हातात सामान घेतलं, पुन्हा जमलं... फिटनेसची खात्रिच झाली.

प्यारे१'s picture

28 Apr 2013 - 5:14 pm | प्यारे१

सहज जमतंय!
-पण तरीही मोटुच प्यारे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2013 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोड इकडं तिकडं कलल्यासारखं झालं पण जमलं. :)

पण, आता आरोग्याचे धागे काढत जा राव :(

-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त's picture

28 Apr 2013 - 10:21 pm | चित्रगुप्त

चित्रकलेप्रमाणेच आरोग्य हा पण आवडता विषय आहे, पण त्याविषयी अधिकाराने लिहिण्याची कुवत किती, ही शंका, तरी प्रयत्न करेन.

चाणक्य's picture

28 Apr 2013 - 5:51 pm | चाणक्य

पास

प्राध्यापक's picture

28 Apr 2013 - 8:19 pm | प्राध्यापक

अगागा..... अबे कोण म्हणले रे याला सोपी फीटनेस टेस्ट....ही सोपी तर मग अवघड काय असेल.
(स्वगत-बघु जमेल पण दररोज करायला पाहीजे)

चिगो's picture

28 Apr 2013 - 8:54 pm | चिगो

१. उठतांना पाय मुडपला तर चालतो का?
२. उठतांना कललो तर पास की नापास?
३. उठल्यावर मोठा "हुऽ ऽ फ्फ" गेला तर?

(ग्रेसनी पास झाल्याची शंका असलेला, मोटू) चिगो

सोत्रि's picture

28 Apr 2013 - 8:56 pm | सोत्रि

पास झालो पण त्याचा अर्थ काय? मी फीट आहे?

- (घेरदार पोटाचा) सोकाजी

श्रीरंग_जोशी's picture

28 Apr 2013 - 8:58 pm | श्रीरंग_जोशी

सदर शारिरीक क्षमता चाचणी रोचक आहे.
अगदी सहजपणे उत्तीष्ठम करून उत्तीर्ण झालो आहे.

विसोबा खेचर's picture

28 Apr 2013 - 9:00 pm | विसोबा खेचर

मी नापास झालो पण नापास होताना आनंद चित्रपटातली 'मौत तू एक कविता है...' ही कविता आठवली आणि नापास होऊनदेखील एकदम डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखं वाटलं...! :-)

श्रावण मोडक's picture

29 Apr 2013 - 12:34 am | श्रावण मोडक

एकदम सोपी. मी मनोमनच केली. पास झालो. मग पुन्हापुन्हा केली, तरीही पासच झालो. अगदी बसमध्ये बसल्याबसल्या केली. ;-)

स्पंदना's picture

29 Apr 2013 - 5:05 am | स्पंदना

चितींग?
काय श्रामो हे मला पहिला नाही होय सांगायच, मनाने करायचं ते? उगा कंबर उसणली ना माझी!! :-(

रेवती's picture

29 Apr 2013 - 5:59 am | रेवती

पास.

शुचि's picture

29 Apr 2013 - 6:45 am | शुचि

अनुत्तीर्ण!!!

चौकटराजा's picture

29 Apr 2013 - 8:23 am | चौकटराजा

वय वर्षे ५९ व काही महिने...
करून पाहिले. चित्रगुप्त याना अश्विनिकुमार भेटलेले दिसताहेत बहुदा.
अटी तंतोतंत पाळल्या तर या वयाला तरी जमत नाही.
एका गुढग्यावर शरीराचा भार देऊन मात्र सह्ज उठता येते.
( पण हा फाउल असल्याने चित्रगुप्त महाराज रेड कार्ड दाखविणार बहुदा !! )

इरसाल's picture

29 Apr 2013 - 9:59 am | इरसाल

ह्या टेस्ट साठी कुठेही हात न टेकता,
पंगतीतुन जेवुन उठताना बाजुला डावा हात टेकुन
जास्त वेळ गुढगे टेकुन बसलो तर मग दोन्ही हात टेकावे लागतात कधी कधी.

वेल्लाभट's picture

29 Apr 2013 - 10:20 am | वेल्लाभट

१० बैठका
आणि १० डिप्स

मारता येणं, ही सुद्धा एक 'फिट' असल्याची पावती मानली जाते असं नेट वर वाचलं होतं.

चिगो's picture

30 Apr 2013 - 4:09 pm | चिगो

१० बैठका
आणि १० डिप्स

मारता येणं, ही सुद्धा एक 'फिट' असल्याची पावती मानली जाते असं नेट वर वाचलं होतं.

चला, कुठूनतरी 'फिट' असल्याचं सर्टीफिकेट मिळाल्याशी मतलब..

(ढेरीवाला पैलवान) चिगो..

महेश हतोळकर's picture

29 Apr 2013 - 10:25 am | महेश हतोळकर

रोज करतो; एका हातात जेवणाचं ताट आणि दुसर्‍या हातात पाण्याचं भांडं घेऊन.

मालोजीराव's picture

29 Apr 2013 - 10:41 am | मालोजीराव

पास !!!

सहज's picture

29 Apr 2013 - 10:59 am | सहज

सपशेल फेल. मूड ऑफ.

मूड ऑफ, फेल झाल्याचा नाही पण मी फेल आणी बायको पास :-(

चित्रगुप्त's picture

29 Apr 2013 - 11:51 am | चित्रगुप्त

सहजराव,
बायको पास हे जास्त महत्वाचे. कारण आता फक्त तुम्हाला स्वतःचीच काळजी घ्यायची आहे. शिवाय तुमची काळजी घेणारी फिट आहे, मग चिंता कसली?
वजन, पाठ, गुडघे, स्नायु, उदरपटल यापैकी कोणती बाजू कमकुवत आहे, हे शोधा आणि लागा उद्योगाला - सहा महिन्यात पास व्ह्यायचेच असे ठरवून. नक्की यश मिळेल.
तुमच्या प्रयत्नांबद्दल आम्हालापण कळवा.

सहज's picture

29 Apr 2013 - 1:52 pm | सहज

व्हिडिओ प्रमाणे जमले नाही तरी गुडघे जमीनीवर जोर देउन, हात न वापरता किंवा अन्य कशाचा आधार न घेता जमले तर पास की नाही?

ढालगज भवानी's picture

29 Apr 2013 - 5:58 pm | ढालगज भवानी

सहज तसे पास नाही. ते फक्त स्वतःला फसविणे झाले.

नवा आयडी बाकी शोभतोय हो !! ;)

ढालगज भवानी's picture

29 Apr 2013 - 6:03 pm | ढालगज भवानी

हाहाहा .... ते तूपाळ शिर्‍यासारखं सात्विक नाव नको झालय ;) आता या आय डी ने मस्त बोचकारणार.

बॅटमॅन's picture

29 Apr 2013 - 6:04 pm | बॅटमॅन

+१.

अगदी अगदी ;)

अवांतरः त्या नावामागचा इतिहास माहिती आहे का? असल्यास अजूनच मजा वाटेल =))

ढालगज भवानी's picture

29 Apr 2013 - 6:13 pm | ढालगज भवानी

अय्या काय इतिहास आहे? :(

ढालगज भवानी's picture

29 Apr 2013 - 6:54 pm | ढालगज भवानी

‘ढाल’ म्हणजे निशाण, ‘गज’ म्हणजे हत्ती. पेशव्यांच्या सैन्याच्या अग्रभागी हत्तीण असायची, तिचं नाव होतं, ‘भवानी’. त्यावरून ‘ढालगज भवानी’ हा वाक्प्रचार रूढ झाला.

शी!! :-/ परत बदलावसं वाटतय नाव :(

चित्रगुप्त's picture

29 Apr 2013 - 9:09 pm | चित्रगुप्त

आता नाव परत बदलून 'लवंगलतिका' 'कुसुमकलिका' 'मधुमालिनी' असलं काही घेणार का?
'आयडीसाठी नावे सुचवा' असा धागाच काढायचा का?

ढालगज भवानी's picture

29 Apr 2013 - 9:13 pm | ढालगज भवानी

खास मराठी म्हणून हे नाव घेतलय. आगाव लहान मुलींना आपण म्हणतो ना "ढालगज भवानी" तसे.

सूड's picture

29 Apr 2013 - 9:22 pm | सूड

कुंडलिनी ठेवा कुंडलिनी!! मिपा जागृत झाल्यागत वाटेल. ;)

कुंडलिनी तर नागिणीगत दिसते ना हो ;) मग तर मण डॉले मेरा तण डॉले येकदम =)) =))

सूड's picture

30 Apr 2013 - 1:54 pm | सूड

येवडं डॉलू नका, डॉले पानावतील. ;)

मी ओव्हर वेट आहे तरीपण हे सहज करू शकतो.

सर्वसाक्षी's picture

29 Apr 2013 - 12:22 pm | सर्वसाक्षी

आमचे तिर्थरूप - वय वर्षे ८६ हे हा प्रकार सहज करत असल्याने त्यांच्यापुढे मी ही चाचणी देण्यास अपात्र आहे (जरी उत्तिर्ण झालो असलो तरीही)

सूड's picture

29 Apr 2013 - 2:01 pm | सूड

सहज जमल्या गेले आहे...

(दोन अ‍ॅब्स पुसटशा दिसू लागलेला) सूड ;)

मालोजीराव's picture

29 Apr 2013 - 2:10 pm | मालोजीराव

६ प्याक अ‍ॅब्स दिखनेकेलिये यही सुभा-शाम २-२ बार किजिये…क्रिपा आनी शुरू होगी

- थर्ड . ऑफ मालोजीबाबा

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2013 - 5:17 pm | अत्रुप्त आत्मा

थर्ड . ऑफ मालोजीबाबा >>> =)) आय आय आय आय आय आय =))

सानिकास्वप्निल's picture

29 Apr 2013 - 2:19 pm | सानिकास्वप्निल

जमले जमले ..हुश्श्श्य :)

मी-सौरभ's picture

29 Apr 2013 - 8:22 pm | मी-सौरभ

हा पेपर मी ऑप्शन्ला टाकलाय. ;)

तर्री's picture

29 Apr 2013 - 8:53 pm | तर्री

पास !
अजून एक टेस्ट : डोळे मिटून एक पाय उचलून उभे राहायचे व १० आकडे मोजायचे. जमल्यास दुसरा पाय उचलून हेच टेस्ट करा. ( तेंव्हा पहिला पाय अर्थातच टेकवा )
जर जमले तर शरीर आणि मन ठाकठीक समजायचे.

तिमा's picture

30 Apr 2013 - 1:16 pm | तिमा

एका पायावर कमीतकमी ३० सेकंद उभे रहाता आले पाहिजे, मग डोळे उघडे ठेवले तरी चालेल!(सेकंद मोजण्यासाठी) ही टेस्ट फिजिओथेरपिस्टने सांगितली आहे.
ती सोपी वाटली तरी मूळ धाग्याच्या टेस्ट एवढीच कठीण आहे.

बाळ सप्रे's picture

30 Apr 2013 - 12:25 pm | बाळ सप्रे

कपालभाती हा उपाय फक्त उदरपटलासाठी आहे कि पहिल्या ३ मुद्द्यांसाठीदेखिल?
सर्व मुद्द्यांसाठी असल्यास - ज्यांना नाही जमलं हात न टेकता उठायला त्यांनी किती दिवस कपालभाती केल्यास जमेल हो चित्रगुप्त ?

कपालभाती म्हणजे कपाळावर भात लावायचा का?
मी आज पासुनच करते. तसही लहाण्पणी ताटात काही उरल की डोक्याला थापेन अशी धमकी ऐकुन माहीती आहे. त्यामुळे चालेल कपाल्भाती करायला.

तुमचा अभिषेक's picture

1 May 2013 - 12:02 pm | तुमचा अभिषेक

दोन्ही हातात पाण्याचे काठोकाठ भरलेले ग्लास घेतले.

जराही न डुचमळता, एकही थेंब न सांडता उठलो, अगदी लयबद्ध शिस्तबद्ध कि काय म्हणतात तसे.

येत्या १५ ऑगस्टला आता दिल्लीला परेडला जायलाही हरकत नसावी.. ;)

इरसाल's picture

1 May 2013 - 12:33 pm | इरसाल

ओ ती २६ जानेवारीला असते.१५ला लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतात.

तुमचा अभिषेक's picture

2 May 2013 - 10:11 am | तुमचा अभिषेक

अरे हो ना, चुकलेच, मी १५ ऑगस्ट आता आधी येणार असा ढोबळमानाने विचार करून डायलॉग मारला..

छोटा डॉन's picture

1 May 2013 - 7:44 pm | छोटा डॉन

एकदम फस्क्लास जमले.
उपरोक्त प्रयोग सलग १० वेळा करुन पाहिला, सगळ्याच प्रयत्नात उत्तीर्ण. आयला फिटनेस एवढा सोपा असेल असे वाटले नव्हते ;)
तरीही मनात शंका होती म्हणुन जोर-बैठका मारुन पाहिल्या, २०-२० चा सेट आरामात जमला.

- (तूर्तास खटाखट फिट)छोटा डॉन

पैसा's picture

1 May 2013 - 7:52 pm | पैसा

धागाकर्ते पास की फेल?

बाळ सप्रे's picture

2 May 2013 - 10:04 am | बाळ सप्रे

ही टेस्ट "चित्रगुप्ता"साठी नाही.. ते फक्त पास झालेल्यांच काय करायचं आणि नापास झालेल्यांचं काय करायचं ते ठरवतात. :-)

ऋषिकेश's picture

2 May 2013 - 2:31 pm | ऋषिकेश

अगदीच सहज पास.. पण वर पर्‍याने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी थांबलो आहे

चित्रगुप्त's picture

3 May 2013 - 12:34 pm | चित्रगुप्त

धागाकर्ता पास, पण अगदी टुण्णदिशी नाही उठता येत. पण हेही जमले पाहिजेच, म्हणून रोज पहाटे ४-६ कि.मि. चालणे, प्राणायाम, धावणे, पाठीचे व्यायाम वगैरे सुरु केले आहे.
परांच्या प्रश्नांच्या उत्तरादखल असे म्हणता येइल, की एकाद्या विषयात पास ३३ वा ४० टक्क्याने होता येत असले, तरी पास झाले याचा अर्थ तो विषय अगदी सांगोपांग अवगत झाला, असे नाही. त्यामुळे बसून हात न टेकता जरी उठता येत असेल, तरी त्याचा अर्थ वजन, पोट, स्नायुंची शक्ती इ.इ. अगदी यथायोग्य आहे, असा होत नाही. विडियोतील मुले जशी अगदी सहजपणे उभी रहात आहे, तसे जमले पाहिजे.
ही एक सुटसुटीत, काही विशेष सामग्रीशिवाय, वा विशिष्ट ज्ञानाशिवाय, आकडेमडे, तक्ते इ. शिवाय करता येण्याजोगी चाचणी आहे. वजन, रक्तदाब, कोलेस्टरॉल, इ. साठी असलेल्या तपासण्यांचे वेगणे महत्व आहेच.

पिशी अबोली's picture

3 May 2013 - 12:41 pm | पिशी अबोली

अरे वा..जमतंय की.. बाकी काही मित्र-मैत्रिणी फेल झाल्यामुळे विशेष आनंद होतो आहे. मला जमतंय म्हटल्यावर आता प्रत्येकाला करायला लावेन नक्की.. :)

आनंदी गोपाळ's picture

11 May 2013 - 1:15 pm | आनंदी गोपाळ

वयाचे दशक, व ४० नंतर पंचक लिहिल्यास अधिक चांगली कल्पना येईल.

प्रकाश जनार्दन तेरडे's picture

11 May 2013 - 11:26 pm | प्रकाश जनार्दन तेरडे

अहो काय राव !!!!
सगळेच पास झालो की@@@

कवितानागेश's picture

11 May 2013 - 11:52 pm | कवितानागेश

ही टेस्ट फारच सोपी आहे. मला धक्का बसलाय!
या टेस्टप्रमाणे मी एकदम फिट आहे. मी तर लॅपटॉप हातात घेउन पण खालून उठते बसते.

प्रभाकर पेठकर's picture

12 May 2013 - 10:19 am | प्रभाकर पेठकर

मला तर बनियन काढूनही जमत नाहिए.

प्रसाद गोडबोले's picture

22 Dec 2014 - 6:00 pm | प्रसाद गोडबोले

बनियन

बनियन चा काय संबंध आहे राव =))))

तुम्ही 'दुसरी कुठली फिटनेस टेस्ट' करुन पहात होता काय पेठकर काका ;) :D

भारी रे मेल्या चवकश्या तुला!! वशाड मेलो!!

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 6:56 pm | टवाळ कार्टा

आत्ता या वयात?

यावर्षासाठी कोणती सोप्पी टेस्ट आहे ?

चित्रगुप्त's picture

29 Dec 2014 - 6:22 pm | चित्रगुप्त

या वर्षासाठी कोणती सोप्पी टेस्ट आहे ?

ही घ्या या वर्षासाठीची टेस्टः
खालील स्थितीत किमान १५ ते ३० सेकंद स्थिर रहाणे .... बघा करून आणि सांगा.
.

हे जमले, की मग आणखी जबरदस्त फिटनेससाठी खालील व्यायाम करा:
http://youtu.be/cN0aR3m_0c0

सूड's picture

29 Dec 2014 - 6:25 pm | सूड

काका, अ‍ॅब्ज चा वर्कआऊट असेल त्यादिवशी ट्रेनर मिनीटभर या स्थितीत राहायला लावतो...

प्रसाद गोडबोले's picture

29 Dec 2014 - 6:31 pm | प्रसाद गोडबोले

खालील स्थितीत किमान १५ ते ३० सेकंद स्थिर रहाणे .... बघा करून आणि सांगा.

स्थिर रहाणे .... ह्म्म .... अवघड आहे

कपिलमुनी's picture

29 Dec 2014 - 6:32 pm | कपिलमुनी

कोंची जिम म्हणायची ही !
जॉइन व्हावा

प्रसाद१९७१'s picture

29 Dec 2014 - 6:34 pm | प्रसाद१९७१

काय सुरेख मुलगी आहे. व्व्वा

टवाळ कार्टा's picture

29 Dec 2014 - 8:32 pm | टवाळ कार्टा

चायला घरी असून पण माझा गणेशा झालाय

विवेकपटाईत's picture

29 Dec 2014 - 8:50 pm | विवेकपटाईत

पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे.
स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे

उदर ही ठीक नाही. बहुतेक ७ प्रकारच्या गोळ्या घेतो, नाव ही लक्षात नाही राहत. सौ.ला लक्षात ठेवावे लागतात. त्याचा परिणाम उदर वर होतोच.
शेवटी ४ पैकी ३ विषयांत प्राविण्य सहित नापास...

चित्रगुप्त's picture

29 Dec 2014 - 9:15 pm | चित्रगुप्त

मी स्वतः यावर्षी जून महिना अखेर पर्यंत पोटाचा नगारा, जिना चढताना त्रास, 'फिटनेस टेस्ट' मधे नापास, मूळव्याधग्रस्त असा झालेलो होतो. जुलाई पासून दररोज २-३ ग्लास भाज्या आणि फळांचा ताजा रस काढून पीणे, मैदा आणि कणकेचे पदार्थ अगदी कमी खाणे, आणि थोडासा व्यायाम हे सुरू केले. ५-६ दिवसात पोटातून 'कालसर्प बाहेर निघाला, मूळव्याध वीस दिवसात पूर्ण बरी झाली. आता ऊर्जा आणी उत्साह भरपूर वाढलेला आहे, धावत जिना चढू शकतो, पोट आणि वजन बरेच कमी झाले आहे, फिटनेस टेस्ट मधे पास.
याबद्दल पुणे-पाताळेश्वर कट्ट्यात माहिती सांगितली होती. त्यानंतर मिपाकर समीर यांनी सात दिवस नुसते जूस प्राशन करण्याचा प्रयोग केला. त्याबद्दल त्यांनी लिहावे, असे सुचवतो.
याबद्दल कुणाला माझ्याशी बोलायचे असेल, तर व्यनी करावा.

कंजूस's picture

29 Dec 2014 - 10:36 pm | कंजूस

मी जिंकलो आणि हारलो
फुडं बायको येऊन हुबी ऱ्हायली आणि मुलीने फोटो काढला. काहीतरी सन्मान्यजनक आणि माण उंचावेल अशि टेस्ट हाइ का ?
शाळेत असतांना पाचवी ते सातवी शाळेत कोणी पाहुणे आले की त्यांना "आमच्याकडे मुलानला योगासनेही शिकवतो" चे मी सांपल होतो मयुरासनही करत असे.