कुणालाही, केंव्हाही, कुठेही पटकन करता येइल, अशी ही फिटनेस टेस्ट:
खाली (जमिनीवर) बूड टेकवून बसायचे, आणि कुठेही हात न टेकता, कसलाही आधार न घेता उठून सरळ उभे रहायचे.
बस, एवढीच ही टेस्ट आहे. ही अगदी साधी क्रिया देखील कित्येकांना जमत नाही, असे दिसून येते. याची कारणे खालील पैकी असू शकतातः
१. लठ्ठपणा, फाजील वजन.
२. पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे.
३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे
४. उदरपटल पुरेसे कार्यक्षम नसणे (उपायः कपालभाती प्राणायाम).
या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम.
तुम्ही स्वतः प्रचिती घ्या आणि शक्य असल्यास विविध वयोगटातल्या आणि शारीरिक ठेवणीच्या लोकांकडून ही चाचणी करवून निरिक्षणे सांगा.
प्रतिक्रिया
19 Mar 2015 - 10:56 am | चित्रगुप्त
अलिकडे जरा जोशात येऊन न झेपण्याइतके धावणे, वेगात चालणे वगैरे केल्याने गुडघे/मांड्या दुखावल्या जाऊन पुन्हा या टेस्टीत नापास झालेलो आहे. आता काही दिवस आराम करून पाय वगैरे ठीक झाल्यावर पुन्हा पास होता येईल, या आशेत आहे.
26 Mar 2015 - 3:21 am | कायरा
खाली मांडी धालून बसता येत नाही. त्यामुळे टेस्ट मध्ये नापास. खूपच मागे पडले. कपालभाती, चालणे करुन बघू या! पास होण्याचा प्रयत्न करीन.
31 Mar 2015 - 1:37 am | सांगलीचा भडंग
जमली . मी पास :-)
31 Mar 2015 - 1:37 am | सांगलीचा भडंग
जमली . मी पास :-)
31 Mar 2015 - 8:53 am | भिंगरी
एक गुढगा टेकुन उठले,पण सवय केल्यावर जमेल असं वाटंतय.
29 Jan 2023 - 3:48 pm | चित्रगुप्त
२०१५ नंतर आज पुन्हा ही टेस्ट केली, आणि .... सपशेल नापास.

सध्या वय ७१ आहे आणि एकंदरित तब्येत चांगली आहे. कोणतेही औषध घ्यावे लागत नाहीये. परंतु गेली काही वर्षे व्यायाम नियमित केलेला नाही. मात्र सध्या पायी चालणे किमान एक तास तरी होते. आत्ता PLANK करून बघितल्यावर ४५ सेकंद करू शकलो.
आता यावर आत्मपरिक्षण आणि नेमके काय करायला हवे हे शोधून ते केले पाहिजे. वजन कमी करणे आणि पायांचे व्यायाम करून स्नायूंची शक्ती वाढवणे गरजेचे आहे असे वाटते. यावर जाणकार मिपाकर योग्य सल्ला देऊ शकतील अशी आशा आहे.
प्लँकः
29 Jan 2023 - 7:00 pm | Bhakti
वय ७१ ,वेळ ४५ सेकंद plank
PLANK अवघडच आहे मला.
अजूनही beginners plank च करते,साईड प्लंकच्या तर नादालाच लागत नाही.