खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना....
मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर..
खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही..
तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय??
बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या .....
हेच तर आम्हाला नको आहे ना... विचार केला २-३ वेळा म्हणून बघू होतील तयार, पण नाही :(
आता वडिलाने असा पवित्र्रा घेतल्यावर मुलगी तरी काय करणार? कुणाला वाटणार असा काही झाले म्हणून.. आणि हि धमकी खरी ठरली तर??
तरीही हिम्मत हरली नाही आहे.. लढतो आहे
पण हे मात्र खरा आहे, वडील धाऱ्याना समाज महत्वाचा असतो... पण मुलांच्या ख़ुशी साठी कुठे तरी थोडी तरी तयारी दाखवली तर काय हरकत आहे?
तुम्हीच सुचवा अश्या वेळी काय केले पाहिजे?
प्रतिक्रिया
4 Feb 2013 - 12:01 pm | स्पंदना
पुढ जाण्यासाठी पाउल उचललेल्यांच्या मागच्यांच जळीत विचारा मला. उअरलेल्या भावंडांच आयुष्य विचारा मला.त्यातल्यात्यात मुलगी म्हणुन आता जा तुही कुणाचा हात धरुन असा जनकांनी दिलेला सल्ला विचारा मला.
घराच्या चार भिंतीत बसलेला घरचा कर्ता विचारा मला.
अगदी लग्न झाल्यावरही मी चटकेच सोसतेय. जाणारे पुढे बघुन जातात अन मागचे भोगतात.
माझा सल्ला? शहरात चालेल हे. छोट्या गावात, खेडेगावात जेथे मानाने राह्ञल जात तेथे त्या माणसाला गावात तोंड बाहेर दाखवण अशक्य होतं. घरची बाकिची भावंड अक्षरशः होरपळतात. अजुनही हा बदल घडणार नाही आपल्या पालकांच्या बाबतीत खेडेगावात, पण आपण आपल्या मुलांना हे स्वतंत्र्य देउ.
तुमची बाजु समजुन घेतलेली नाही अस समजु नका. तुमची स्वप्न, एकमेकाला न विसरण, सगळ सगळ माहिताय, पण जर वडिलांचा हा स्टॅंड असेल तर तुम्ही त्यांच आयुष्य उध्वस्त करताय. जन्मभर ते ज्या मानाने राहिले, स्वतःच्या पिढीच्या पुढे एक पाउल जाउन त्यांनी मुली शिकवल्या, त्यांना तुम्ही शंभर पावल फरफटताय. याच्या पुढच जातीपाती तिलांजलीच कार्य आपण आपल्या मुलांच्या बाबतीत करू अस निदान मी तरी ठरवलय.
तुम्ही जी अपेक्षा करताय त्याच्या विरुद्ध सल्ला आहे माहित आहे. पण हे जळजळीत स्वतः भोगलेल सत्य आहे.
4 Feb 2013 - 2:39 pm | नगरीनिरंजन
सहमत आहे. रीतीनेच लग्न करा. लग्न हा एक सामाजिक व्यवहार आहे त्याचा प्रेमाशी काहीही संबंध नाही. एका बाजूनेही प्रॉब्लेम असेल तरी पुढे खूप त्रास होतो.
जुनी खोडं आता सुधारणे शक्य नाही. तुमच्या मुलांना मात्र चांगल्याच गोष्टी शिकवा आणि जात-पात न पाहता त्यांच्या निवडीला पाठिंबा द्या.
4 Feb 2013 - 10:38 pm | आजानुकर्ण
सहमत. पुढचा होणारा त्रास जर खूप जास्त असेल तर इट इज नॉट वर्थ इट. all cats are grey in the dark...
4 Feb 2013 - 8:23 pm | आनन्दिता
+१
4 Feb 2013 - 12:19 pm | अत्रुप्त आत्मा
पोलिस...वकिल...सामाजिक संस्था...मिडिया सगळ्यांची मदत घ्या... आणि बिनधास्त पळून जाऊन लग्न करा...
आणि ह्या http://antisuperstition.org/# दिलेल्या लिंकवरुन जा... तिथल्या पेजवर डाविकडे खाली
असं लिहिलेलं आहे...त्याची माहिती वाचा...तिथे बर्याच कार्यकर्त्यांचे फोन नंबर्स आहेत. बेलाशक फोन करा...मदत मिळेल. :-)
4 Feb 2013 - 3:09 pm | मालोजीराव
बुवा परतीकिर्येच्या खाली तुमचा भ्रमण-ध्वनी क्र टाकायचा विसरले जणू तुम्ही ...ऑ :D :P
4 Feb 2013 - 12:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
माझे मतः
दोघांच्याही आई वडीलांचे समुपदेशन करुन, त्यांची सहमती मिळवूनच पुढे जा. आणि त्या साठी अआंनी दिलेल्या माहीतीवरुन मदत मिळवा. पळून जाऊन तुम्ही फक्त आणि फक्त तुम्हा दोघांसाठी व तुमच्या दोघांच्या आईवडिलांसाठी वेदनाच विकत घ्याल.
4 Feb 2013 - 12:54 pm | संजय क्षीरसागर
घोडा म्हणजे पळणारा, अंडरवर्ल्डमधे वापरतात तो नाही.
तुमच्या डियरला एसेमेस पाठवा, `आय एम कमिंग, बी रेडी'
मग दौडत सासरी जा, तिला मागे बसवा आणि स्ट्रेट ऑर्थरसीट पॉइंटवर जा (महाबळेश्वर).
तिथून सासर्याला कॉल करा : `आय एम ऑन ऑर्थरसीट पॉइंट विथ योर डॉटर बिहाइंड' (घोड्यावर आहात ही खबर वार्यासारखी पसरलेली असेल त्यामुळे ते वेगळं सांगायची गरज नाही).
कुणाची काय बिशाद आहे नाही म्हणायची?
मग घोडा विकून टाका महाबळेश्वरात आणि एसटीनं घरी येऊन लग्न करा.
4 Feb 2013 - 1:09 pm | इरसाल
सल्ला क्र.१ तुम्ही तुमच्या वडिलधार्यांशी व्यवस्थितपणे बोला.म्हणा मी जर दुसर्या मुलीशी लग्न केले तर ते फक्त नातं निभावुन नेणे हा प्रकार होईल.व या प्रकारने ना मी ना ती(दुसरी मुलगी) सुखी राहिल. आणी आम्ही दुखी म्हणजेच तुम्हीही दु:खी व्हाल.
सल्ला क्र. २ हाच एपिसोड तुमच्या बरोबरीच्या सवंगड्याने आपल्या घरी करावा.
सल्ला क्र.३ जर दोन्ही घरी तरीही नकार असेल तर तुम्ही एकमेकांना विसरुन जाणे व वडिलधारे म्हणतील त्या जोडीदाराबरोबर नवा डाव सुरु करणे ह्यातच दोन्ही कुटुंबांचे भले राहिल.
वर अपर्णाअक्षय यांनी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही दोघांनी बंड करुन जरी लग्न केले तर तुम्ही दोघच सुखी असाल व तुमच्या व तिच्या लहान भाउ-बहिण, किंवा आईवडिल यांचे समाज जिणे मुश्कील करेल.
तरी ह्रुदयाने विचार न करता बुद्धीने सारासार विचार करुन योग्य निर्णय घ्यावा.
देव करो दोन्ही कुटुंब ह्या प्रकाराला सहमत होवोत.
4 Feb 2013 - 4:05 pm | प्रभाकर पेठकर
ह्याची तरी गॅरंटी काय?
4 Feb 2013 - 4:44 pm | इरसाल
त्याचीही गॅरंटी नाही पण इतके जीवापाड प्रेम करत आहेत तर राहतील सुखी असा आपला ठोकताळा वर्तवला.
4 Feb 2013 - 1:09 pm | काळा पहाड
सगळे प्रतिसाद बालिश आहेत. अपर्णा अक्षय चा सोडला तर. या प्रश्नाला सध्या उत्तर नाही. एकतर तुम्हाला त्रास होईल किंवा त्या बापाला (आणि पर्यायाने त्या मुलीला). कुणाला त्रास द्यायचा हे तुमच्यावर आहे. कटू आहे, पण सत्य आहे.
4 Feb 2013 - 1:13 pm | इरसाल
अश्याच एका मित्राला १३/१४ वर्षे झालीत अजुन घरच्यांनी स्वीकारले नाही.
भावाचा प्रेमविवाहाचा चान्स घालवला म्हणुन तो कोपलाय बहिणी म्हणतात तु आमचा भाउ नाहीस पुन्हा फोन करु नकोस.मुलीचे आईवडिल, नात झाली म्हणुन आले नी गोड झाले हेच एक समाधान.
4 Feb 2013 - 1:32 pm | परिकथेतील राजकुमार
हे आधी लक्षात आले नाही का?
आता 'विरोध' आहे म्हणून मुलीची साथ सोडून देणार का काय ? हा त्या पोरीवरती अन्याय नाही का ?
चांगले शिकले सवरलेले दिसता, आणि हे असले वागत होय ? (हेच प्रश्न त्या पोरीला देखील विचारा)
4 Feb 2013 - 1:38 pm | संजय क्षीरसागर
म्हणून मी घोड्याचा पर्याय सुचवलाय
4 Feb 2013 - 1:34 pm | नक्शत्त्रा
जात सोडून तुमचे इतर गुणां्चा उहापोह करा.
माज्या मैत्रीने मैत्रिणीची हकीकत.
त्यांनी ३वर्ष वाट पा ि हली े. मग एक कि कडचे पालक तैयार झाले े आि ण सहा महिन्यांनी दुसरे. आता स्र्व ठीक आहे. एकमेकांचे सुख्दुख वाटून घेतात. पण ......................
पण मुलीचे भावाचे लग्न जमले नाही २ वर्ष. आणि मुलाच्या बहिणेचे अजूनही नाही लग्न जमलेले.
भावनेच्य भरात निर्णय नका घेवूत.
वेळ द्या ..............आणि स्वताला सिद्ध करां. जात सोडून तुमचे इतर गुणां्चा उहापोह करा. मुलीचे पालक मुलीच भवितव्यं आणि सामाजिक बदिल्की बघतात. अत्य्नच्य साठी इकडे आड आणि तिकडे विहीर असते. इतर जवळच्या नात्लागणं विश्वासात घ्या. आणि मदत घ्या त्यांची. तुम्हीही धीराने जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना समजावण्याचा प्रयत करा.
किमयेची अपेक्षा नाकात करू. सत्य स्वीकारा.
4 Feb 2013 - 1:38 pm | अभ्या..
वेडी आशा ती हिच रे.
त्यावेळी पण वाटले असेल सगळं सुरळीत होईल म्हणून.
आतापण वाटतेय त्यांना मिपावर काहीतरी उत्तम सोल्युशन मिळेल म्हणून. वेडी आशा, दुसरे काय?
पोरगी तु दिलेले उत्तरच देईल. हे आधी लक्षात आले नाही का?
4 Feb 2013 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार
म्हणून तर आधी हे प्रश्न पोरीला पण विचारा असा सल्ला दिलेला आहे. आणि तिने जर 'हेच' उत्तर दिले तर तिला सरळ कोपरापासून हात जोडा आणि एकटेच चालायला लागा. कारण मुलीच्या बाजूने देखील प्रेम करण्या आधी विचार व्हायलाच हवा होता.
बाकी राहिली जात-बिरादारी वैग्रेची गोष्ट, तर सरळ सरळ फाट्यावरती मारा. आज तुम्हीच हा धडा घालून दिलात, तर तुमच्या भावा-बहिणींसमोर, पुढच्या येणार्या पिढी समोर एक आदर्श निर्माण होईल, त्यांना देखील धाडस मिळेल. कुठलीही चुकीची व्यवस्था बदलताना त्रास हा सहन करावाच लागणार आहे. नुसती 'आदर्श' लोकांची चरित्रे वाचून आणि त्यांच्या त्यागाचे गोडवे गाऊन काही होत नाही, वेळ आली की त्यांनी जी वाट चालली, त्या वाटेवर दोन पावले टाकायचे धाडस देखील असायलाच हवे.
4 Feb 2013 - 4:04 pm | स्पंदना
.
परा काय सांगतो आहेस ते कळतय का? महाराष्ट्रात ऑनर किलिंग नाही आहे. अन त्या दोघांना त्रास होइल अस कुणीच म्हंटलेल नाही आहे. त्रास होतो ते त्यांच्या बहिण भावांना? यांचीच फक्त लग्न होतात. बाकिच्या बहिण भावांच्या नशिबी त्यांची काहीही चुक नसताना त्रास अन अवहेलना. आईच्या नशिबी प्रचंड मानसिक छळ, अन वडिल जे आजवर चार चौघात त्यांच्या मते ताठ मानेने उभे रहात होते ते या (त्यांच्या मते) मानहानीपायी घरात कोंडुन घेतात. आता होउ दे काय व्हायच ते मला तरी मला पाहिजे तो जोडिदार (अगदी स्पष्ट म्हणावस वाटतय पण नाही म्हणत) मिळतोय ना म्हणुन डोळ्यावर स्वार्थाची झापड ओढुन बाकिच्या भावंडांना बिन लग्नाच ठेवायच असेल अन आजवर नांदलो त्या घराला एक घास सुद्धा घश्याखाली उतरवेना अश्या वातावरणात ढकलायच असेल तर करा बापडे. फेडा पांग!
हेच शहरात आजकाल सगळीकडेच आहे असु दे म्हणुन चालत, अन तेथे तुम्ही एक सामान्य असता. खेडगावाची गोष्ट वेगळी. तिथे मग काल पर्यंत तुमचे भाउबंद म्हणुन असणारेही "हे आमच्यातले नव्हेत "म्हणुन रिकामे होतात.
4 Feb 2013 - 1:48 pm | गवि
द्विधा मनःस्थिती आहे ना? काय करु असा प्रश्न पडतोय ना? अडून राहिलाय ना निर्णय?
मग त्या मुलीशी लग्न करु नका.
आईबापांना तुमच्या आयुष्यातून मागे टाकू शकणारी पोरगी मिळेल तेव्हाच तिच्याशी लग्न करा कारण तीही तुमच्यासाठी तेच करणार आहे.. कारण तीच आयुष्याला पुरणार आहे.
गविकाकांचा सल्ला: व्हेन देअर इज डाउट, देअर इज नो डाउट..
4 Feb 2013 - 1:59 pm | संजय क्षीरसागर
लग्न करणारा कुणाला जुमानत नाही आणि चर्चा करणारा डेरींग करत नाही!
4 Feb 2013 - 3:35 pm | ५० फक्त
माझ्या माहितीतलं वाक्य ' कामातुराणां भयं न लज्जा' असं आहे, लग्नातुराणां भयं न लज्जा' असं आताच ऐकतोय.
4 Feb 2013 - 2:02 pm | अविनाशकुलकर्णी
मुळात जात जाण्याचा इतका हट्ट का?
समरसता महत्वाची ..
जात घालवण्याच्या विचारा मागे धर्मान्तराचा मोठा डाव शिजत आहे का??
4 Feb 2013 - 2:04 pm | बॅटमॅन
अभ्यासपूर्ण प्रतिसाद. अतिशय काथ्यागर्भ वाक्ये.
१.मुळात जात जाण्याचा इतका हट्ट का???
२.समरसता महत्वाची ..
३.जात घालवण्याच्या विचारा मागे धर्मान्तराचा मोठा डाव शिजत आहे का??
आयला, इथेच तीन टॉपिक तयार झाले की =)) =)) =)) =))
4 Feb 2013 - 2:08 pm | अविनाशकुलकर्णी
ति जर ब्राह्मण असति तर हा प्र्श्ण उभा राहिला असता का?
4 Feb 2013 - 2:12 pm | गवि
ते सर्व N.A. आहे असं वाटत नाही का?
सध्या जे आहे ते असं आहे आणि त्यांना प्रश्न पडलाय, जी स्थिती आहे ती "अंडर गिव्हन कंडिशन्स ऑफ टेंपरेचर अँड प्रेशर" अशी आहे.. तेव्हा हेच लग्न आयर्लंडमधे होणार असतं तर? किंवा स्वतः प्रश्नकर्ता सौदी असता तर, अशा प्रकारे विचार करुन काही उपाय मिळेलसं वाटत नाही.
4 Feb 2013 - 2:10 pm | भिकापाटील
घाबरु नको. एकमेकांच्या आईवडीलांना कन्व्हेन्स करा. मलाही १२ वर्शापूर्वी असाच प्रोब्लेम आला होता
आता सोल्ह झाला आहे. आता नातवंडांना मांडीवर खेलवताअत.
आता मस्त चाललय आमच
4 Feb 2013 - 2:12 pm | भिकापाटील
वेलप्रसंगी जात बदलु शकत्ता
कालजी नसावी
4 Feb 2013 - 2:17 pm | घाशीराम कोतवाल १.२
मायला सोपा उपाय घरच्यांना सांगा धर्म बदलोत आम्ही दोघ विषय संपला
जोक्स अपार्ट पण प्रेम करताना हा विचार केला होतात का नाही ना ? मग आता मागे का हटताय सरळ कोर्ट मॅरेज करा
आणि वेगळे रहा आज ना उदया सगळे सरळ होतात
4 Feb 2013 - 2:31 pm | अविनाशकुलकर्णी
तोच मोठा डाव शिजत आहे
4 Feb 2013 - 3:33 pm | घाशीराम कोतवाल १.२
समजल नाही ह्यात कसला डाव अकु?
4 Feb 2013 - 3:56 pm | अविनाशकुलकर्णी
सामुहि धर्मान्तर
4 Feb 2013 - 2:28 pm | कवितानागेश
नका करु हो . जाउ दे हे लफडं! :)
( इथे एकामागोमाग एक लोकांनी हो-नको-हो-नको-.... अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आता माझ्या नम्बरला 'नको' येतय- म्हणून "नको!")
4 Feb 2013 - 2:43 pm | अभ्या..
पळून जावा हो. लै मज्जा येती.
पोलीस, मित्र, नातेवाईक, पालक, काही शत्रू (असतील तर), भटजी, वकील्, मोबाईल कंपन्या सगळेच जण कामाला लागतेत.
आपण फक्त पळून जायचे. बाकीचं सगळं आपोआप होतय. ;)
मला हाय आणभव.
(मौतै आता मी हो नंबरचा प्रतिसाद दिलाय बघ ;))
4 Feb 2013 - 6:38 pm | जेनी...
मी ' हो ' म्हणु कि ' नको ' म्हणु ??? :(
4 Feb 2013 - 6:40 pm | बॅटमॅन
काहीच नको म्हणूस, बैस गपचिप. बघू जमतंय का =))
4 Feb 2013 - 6:44 pm | जेनी...
:-/
जा बाबा कट्टी :-/ :-/
4 Feb 2013 - 6:45 pm | बॅटमॅन
क्या बात है!
4 Feb 2013 - 6:48 pm | जेनी...
भौराया इथे मस्ती नक्को ... :-/ शीरेस विशये हा ...
नैतर दीपू काका म्हणतील ..
" जाता जात नाहित ....... मी काय करु ??? " :(
=))
4 Feb 2013 - 6:52 pm | मालोजीराव
:))
4 Feb 2013 - 6:54 pm | बॅटमॅन
कायचं म्हणे भौराया. गप बघू आधी!
4 Feb 2013 - 2:54 pm | अधिराज
साम, दाम, दंड, भेद सगळे प्रयत्न करा. आता रणांगणातून पळ काढू नका. आणि महत्वाचं म्हंजे लगिन झाल्यानंतर सासरच्यांना अभिमान वाटेल असे काम करा. होईल समदं सुरळीत.
4 Feb 2013 - 3:25 pm | संजय क्षीरसागर
लवकरात लवकर त्यांना आजी-आजोबा करा. नायतर पुन्हा याच शीर्षकाखाली धागा काढाल!
4 Feb 2013 - 3:29 pm | अधिराज
हा हा हा, सर तुम्ही म्हंजे ना अगदी हे आहात. कुणाचा अनुभव म्हणायचा हा?
4 Feb 2013 - 3:50 pm | ५० फक्त
तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर बदला असं सुचित करावयाचं आहे काय ?
4 Feb 2013 - 3:52 pm | नि३सोलपुरकर
__/\___
4 Feb 2013 - 3:57 pm | मालोजीराव
:)) :)) :))
4 Feb 2013 - 3:58 pm | संजय क्षीरसागर
ते असलं काय आणि नसलं काय... काही फरक पडत नाही
4 Feb 2013 - 4:04 pm | अभ्या..
अगागागागागा
_____/\______
4 Feb 2013 - 4:12 pm | बॅटमॅन
पडतो की हो, कर्ते अन प्रेक्षक दोगांनाबी..हां अर्थात ते सर्वं खल्विदं भ्रम इव वगैरे सोडून हां.
4 Feb 2013 - 4:07 pm | बॅटमॅन
=)) =)) =)) =)) _/\_
4 Feb 2013 - 5:31 pm | अत्रुप्त आत्मा
५० मी फक्त निर्वतलो आहे.........
4 Feb 2013 - 6:17 pm | दादा कोंडके
:))
4 Feb 2013 - 6:27 pm | चिगो
अरे, काय चाललंय काय? =)) =)) =)) तो काय बोलतोय नी तुमचं आपलं भलतंच..
4 Feb 2013 - 6:31 pm | वपाडाव
ओ मालक, काय हे...!
4 Feb 2013 - 8:11 pm | संजय क्षीरसागर
आम्ही आधी केलं! (आणि घरी सांगितलं नाही) त्यामुळे `जात..जातच नाही काय करू?' असा प्रश्न पडला नाही.
4 Feb 2013 - 10:41 pm | जेनी...
धाग्यात पहिला शब्दच नसता तर आणखी मज्जा आली असती =))
6 Feb 2013 - 6:19 pm | वपाडाव
आपण डुड आहात का?
7 Feb 2013 - 3:46 pm | मालोजीराव
तुम्ही ब्याचलर आहात का ?
7 Feb 2013 - 3:50 pm | श्री गावसेना प्रमुख
त्यांच शिक्षण चालु आहे वाटते
8 Feb 2013 - 7:18 am | दीपकशेठ
मी software अभियंता आहे, आणि सध्या अमेरिकेत नौकरी करत आहे...
8 Feb 2013 - 3:59 pm | श्री गावसेना प्रमुख
मालोजीराव श्री वडापाव रावांना बॅचलर म्हटले त्यावर ती कॉमेंट्स होती तुम्हाला उद्देशुन नव्हे
8 Feb 2013 - 4:02 pm | पिलीयन रायडर
तरी मुलीचे वडील नाही म्हणले???
8 Feb 2013 - 4:05 pm | श्री गावसेना प्रमुख
वाईट परीस्थीती आहे राव्,काहीतरी खोट असावी मुलात असे अगोदर म्हणायचे
4 Feb 2013 - 3:36 pm | चावटमेला
हिंदी शिणेमा ष्टाईल काय तरी करा की राव, दो मासूम दिलों की मोहब्बत, जालिम दुश्मन जमान, जुदाई, परत मिलन असलं काहीतरी, लै भारी वाटेल. टांगा पलटी, घोडे फरार...
4 Feb 2013 - 3:47 pm | बॅटमॅन
टांगापल्टीच्या आधीचं काटाकिर्र विसर्लात काय हो चावटमेले ;)
4 Feb 2013 - 3:52 pm | ५० फक्त
टांगा पल्टी असं वेगवेगळं लिहावं असं म्ह्णायाचं का तुम्हाला ?
4 Feb 2013 - 4:06 pm | बॅटमॅन
अर्रर्र, हे कनेक्शन तं इसरलोच होतो =))
4 Feb 2013 - 4:14 pm | प्रसाद गोडबोले
पुढचं आयुष्य तुम्हाला कोणा सोबत जगायचं आहे ? फक्त त्या माणसांची पर्वा करा ... बाकीचे गेले उडत .
आणि हाच प्रश्न युमच्या प्रेयसीला विचारा ...
पुढचं आयुष्य कोणा सोबत जगायचं आहे ? ती जर आईवडील म्हणाली तर विषयच संपला ( तुमचा पोपट झाला =)) )
पण ती जर तुमच्या सोबत जगायचे असे म्हणाली...अन तुमची खरच स्वतःच्या एकट्याच्या जीवावर सुखाचा संसार करण्याची औकात असेल , आत्मविश्वास असेल , तर कोणाला घाबरु नका ... सरळ पळवुन न्या पोरीला ....आळंदीला जाऊन लग्न करा . पुण्यात एखादं छोटं घर घेवुन संसार सुरु करा .( मुलीचे आईवडील त्रास देणार असे वातत असेल तर आधीच पोलीसांना तशी कल्पना देवुन ठेवा , ट्रस्ट मी , अशावेळी पोलीस नक्कीच मदत करतात !)
(वेळप्रसंगी मी मदतीला उभी राहेन ...)
4 Feb 2013 - 7:42 pm | काळा पहाड
अग आई ग !!
7 Feb 2013 - 2:07 pm | दीपकशेठ
मुलीचे वडील: हे शक्य नाही, मला गाव वाळीत टाकणार, आणि मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही.. मला समजून घ्या..
माझे वडील पुढे तरी काय बोलणार?? मला हेच त्यांनी सांगितल आणि बघ तुझा विचार काय वाटते ते.. त्यांचा तर हाच निर्णय आहे... तुमच्या मुळे एक जीव जाऊ शकतो, आणि हे ओझे तुम्हाला आयुष्यभर वाहावे लागणार..
आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...
4 Feb 2013 - 4:50 pm | कोल्हापुरवाले
माझ पण असच होत कि गा!
मी शींपी आणि ती -४ ( ९६ कुळी मराठा)
मी गावात्ला न ती पुन्यातली.
तस्सा सगळ्यास्नी समजावयाला १ वरीस लगल बगा.
आमीपण घरातल्यास्नी घेतल्याशीवाय लगीनच करायच नाही अस ठरीवल हुत.
शेवटी तयार झाली सगळी, कालच्या १ तार्खीला ७ महीने झले लग्न हुन !
१ जमेची बाजू म्ह्जी दोन्ही बजुचे तसे शीकलेले होते.
8 Feb 2013 - 1:00 am | टवाळ कार्टा
"१ जमेची बाजू म्ह्जी दोन्ही बजुचे तसे शीकलेले होते."
??
शिकलेले होते म्हणुन "फक्त" १ वर्श लागले असे म्हणायचे आहे का?
इथल्या किती मिपाकरांमधे आपल्या पालकांना "स्वताच्या जातीची लाज वाटते" असे सांगायची हिंम्मत आहे?
4 Feb 2013 - 4:50 pm | घाशीराम कोतवाल १.२
ज्ये बात बघा गिरिजाजी पण तेच म्हणतात विचार करा
अन तुमची खरच स्वतःच्या एकट्याच्या जीवावर सुखाचा संसार करण्याची औकात असेल , आत्मविश्वास असेल , तर कोणाला घाबरु नका ... सरळ पळवुन न्या पोरीला ....आळंदीला जाऊन लग्न करा
हा पॉईंट महत्वाचा नाही तर तुमच दुनियादारीतल्या त्या पोरासारख व्हायच त्याच नाव आता आठवत नाही आहे :dash J)
4 Feb 2013 - 4:58 pm | इरसाल
म्हणजे ती काय आयुष्यभर लग्न करणार नाही की काय? मग तर असाही आणी तसाही पोपट ठरलेलाच.
पण जर तुम्ही जीवनात बायकोची काळजी घेण्याइतके परिपुर्ण असाल तर बाकीचे पर्याय चाळु शकता.
बाकी रक्षाबंधन, भाउबीज, दिवाळसण, धोंड्याचा महिना, लक्ष्मीपुजन विसरावे लागेल.
4 Feb 2013 - 5:34 pm | प्रसाद गोडबोले
पुढचं आयुष्य कोणा सोबत जगायचं आहे ? ती जर आईवडील म्हणाली तर विषयच संपला
म्हणजे ती काय आयुष्यभर लग्न करणार नाही की काय? मग तर असाही आणी तसाही पोपट ठरलेलाच.
>>>काही पोरी असतात हो , आई वडील अशी बाजु घेणार्या ! त्याआधी आगदी मिठ्याबिठ्या मारुन प्रेमाच्या आणाभाकाही घेतलेल्या असतात ...पण ऐन वेळेला डाव पल्टी होतो....पोरीची आई आत्महत्या करायची धमकी देते ... मुलीच्या वडीलांना माईल्ड हार्ट अॅटॅक येतो ...
वगैरे वगैरे ....
जाउनद्या ....कशाला उगाच जुन्या जखमांवर मीठ चोळताय इरसाल्राव ??
4 Feb 2013 - 5:40 pm | इरसाल
तसल्या पोरींचा निषेधच.
4 Feb 2013 - 10:36 pm | आजानुकर्ण
गिरीजाकाकू तुम्हाला असे एखाद्या मुलीने गंडवले आहे की काय? उघड्या पुन्हा झाल्या जखमा उरातल्या वगैरे म्हणता म्हणून विचारले.
4 Feb 2013 - 10:52 pm | काळा पहाड
काकूंच्या उरातल्या जखमा एका मुलीमुळे? अग बाबो.
4 Feb 2013 - 10:53 pm | प्रसाद गोडबोले
आमची ही कविता वाचा http://www.misalpav.com/node/23686 :(
4 Feb 2013 - 5:05 pm | अनुराधा१९८०
सुखी जीवनासाठी मानसशास्त्र आणि आपल्या संतानी सांगीतलेले "reduce your options" हे तत्व पाळा. तुम्ही एकाच वेळेला २ दगडांवर पाय ठेवायचा प्रयत्न करत आहात. एक ठरवा आणि ते मनापासुन प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करा.
4 Feb 2013 - 5:54 pm | विलासिनि
दिपकशेठ,
“Think Thousand times before taking a decision But - After taking decison never turn back even if you get Thousand difficulties!!”
एकदा स्वतःच्या निर्णयाची खात्री करुन घ्या व तो पक्का करा.
5 Feb 2013 - 7:48 am | ५० फक्त
आणि अजुन एक नम्र विनंती, तो जो काय निर्णय वगैरे घेतलात ना की मग इथंच किमान याच धाग्यावर अपडेट तरी करा, काय झालं ते नाहीतर या आधी असे बरेच टैमपास धागे आले आणि गेले अगदी गुलाबजामुंच्या पाकापासुन शेजा-या-या बोक्याच्या मुतापर्यंत. मग कधी इथं कुणी खरंच मदत मागायला आला तरी त्याची चेष्टाच होईल.
मा. संपादक मंडळ,
असे मदत मागणारे धागे प्रकाशित करण्यापुर्वी सदर धागाकर्त्यांशी व्यनि किंवा फोनवर संपर्क साधुन संपादक मंडळ अशा मदतीच्या गरजेची खात्री करुन घेउ शकते का ? असा एक विचार आला उगीच मनात. बाकी दंगाच करायचा असेल तर काय तो कुठेही करता येईल.
6 Feb 2013 - 11:30 am | दीपकशेठ
आधी सर्वांचे आभार... चांगले सल्ले दिलेत म्हणून...
शेवटी आम्ही वडिलांच्या आणि सर्वांच्या ख़ुशी साठी तडजोडीचा हा कडू प्याला पिण्यास तयार झालो... :( :'(
४-५ वेळा माघार घेऊन प्रत्येक वेळी खूप हिम्मतीने लढलो, पण शेवटी हेच...
आमच्या वडिलांचे आणि घरच्यांचे खूप आभार, जे मला इतका पाठींबा दिला आणि माझ्या साठी तिच्या वडिलांबरोबर पुढे होऊन चर्चा केली म्हणून...
6 Feb 2013 - 1:33 pm | परिकथेतील राजकुमार
आपण लढल्याचे आपल्या लेखनातून कुठेच जाणवले नाही.
तो शब्द 'रडलो' असा आहे का ? पण हिम्मतीने कसे रडतात हा प्रश्न आलाच...
6 Feb 2013 - 1:37 pm | गवि
बराच काळ तुमच्याशी सहमत होण्याचं निमित्त शोधत होतो. धन्यवाद.
मला मुळातच या नात्यातल्या पक्केपणाबद्दल खात्री नव्हती वाटत. अन्यथा दोघेही तयार असताना काय करु असा प्रश्नच पडला नसता..
6 Feb 2013 - 4:14 pm | संजय क्षीरसागर
6 Feb 2013 - 6:50 pm | मन१
bulls eye.
क्लिमान शब्द. अचूक संदेश.
7 Feb 2013 - 1:43 pm | दीपकशेठ
नाते खरेच आहे, शंका नसावी... परीस्तिथी वाइऎत आहे...
६-८ महिन्यात काय काय झाला ते सर्व नाही लिहतां आला या धाग्यात, थोडक्यात परीस्तीही लिहिली आहे..
सतत प्रयत्न चालू होते, तिचे आत्या, मामा, भाऊ, बहिण,आई, दाजी सर्वांची मदद घेतली आम्ही, पण शेवटी तिच्या वडिलांनी जीवाचा बारा वाईट करण्याचा निर्णय मागे घेतलाच नाही.. आणि आम्ही आमच्या साठी एक जीव जावा?? ते पण वडिलांचा???
किती म्हटला तरी हे सुद्धा आयुष्यभर पुरला असता...
माफी असावी..
7 Feb 2013 - 2:43 pm | ५० फक्त
याला काउंटर म्हणुन तुमच्या दोघांपैकी कुणी जीव देण्याची धमकी दिली असती तर वडिलांनी असाच विचार केला असता का ? आणि तसा केला असता तर एका जिवंत माणसासाठी तुम्ही केलेला प्रेमाचा त्याग अर्थपुर्ण आहे असं म्हणता येईल, नाहीतर नाही. असं माझं वैयक्तिक मत आहे.