जात जातच नाही ... काय करू??

दीपकशेठ's picture
दीपकशेठ in जनातलं, मनातलं
4 Feb 2013 - 11:12 am

खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना....

मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर..
खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही..
तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय??
बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या .....
हेच तर आम्हाला नको आहे ना... विचार केला २-३ वेळा म्हणून बघू होतील तयार, पण नाही :(
आता वडिलाने असा पवित्र्रा घेतल्यावर मुलगी तरी काय करणार? कुणाला वाटणार असा काही झाले म्हणून.. आणि हि धमकी खरी ठरली तर??

तरीही हिम्मत हरली नाही आहे.. लढतो आहे

पण हे मात्र खरा आहे, वडील धाऱ्याना समाज महत्वाचा असतो... पण मुलांच्या ख़ुशी साठी कुठे तरी थोडी तरी तयारी दाखवली तर काय हरकत आहे?

तुम्हीच सुचवा अश्या वेळी काय केले पाहिजे?

समाजजीवनमानविचारमतसल्लामदत

प्रतिक्रिया

सूड's picture

7 Feb 2013 - 6:37 pm | सूड

मला कळतच नाही लोकं चार चार वर्षांचं एखाद्या व्यक्तीसोबत असलेलं नातं कसं विसरतात. घरचे नाही म्हणाले मोडा लग्नं, कोणीतरी स्वामी म्हणाले पत्रिका जुळत नाही मग मोडा लग्न, मुलीची आई/ मुलाचे बाबा जीव देतो म्हणता चला मोडा लग्न. नाती येवढी सहज विसरता येतात? जेव्हा एक जाउन दुसरी व्यक्ती आयुष्यात येते तेव्हा प्रेम होतंच ना? मग आधीच्या व्यक्तीबरोबर केलेला सगळा टाईमपास असतो का? पहिलंच पाऊल पुढे टाकताना हा विचार का होत नाही आणि तो जर पहिल्यांदा केला नाही तर नंतर मागेपुढे पाहू नये असं माझं तरी मत आहे न पेक्षा घरचे जे ठरवून देतील ते आपल्याला पसंत पडत असेल तर हो म्हणावं, असला हो नाहीचा व्याप करत बसू नये.

दीपक हे तुम्हाला असं नाहीये आजपर्यंत जी प्रकरणं पाहिली / ऐकली त्यावरुन सहज मनात येऊन गेलं.

अनुराधा१९८०'s picture

7 Feb 2013 - 6:57 pm | अनुराधा१९८०

पटले. मला तरी दिपकशेठ काहितरी कारणे देत आहेत असे वाटते.

एक्झॅकटली हेच म्हणायचं होतं, या धरसोडीच्या विषयावरचा उत्तम चित्रपतत तनु वेड्स मनु, जबरा विषय तेवढाच जबरी हाताळला आहे, कुणी त्या सहनायिकेचं नाव सांगेल का, ती जिच्या लग्नात निम्मा सिनेमा होतो ती, नंतर एका चहाच्या जाहिरातीत होती.

अभ्या..'s picture

8 Feb 2013 - 1:18 am | अभ्या..

पन्नासराव तिचं नांव अदिती राव हैदरी. ती ये साली जिंदगी मध्ये पण होती. पण तिथे चित्रांगदा सिंग असल्याने ही लक्षात आली नव्हती ;)

दीपकशेठ's picture

7 Feb 2013 - 1:30 pm | दीपकशेठ

६-८ महिन्यात काय काय झाला ते सर्व नाही लिहतां आला या धाग्यात, थोडक्यात परीस्तीही लिहिली आहे..
सतत प्रयत्न चालू होते, तिचे आत्या, मामा, भाऊ, बहिण,आई, दाजी सर्वांची मदद घेतली आम्ही, पण शेवटी तिच्या वडिलांनी जीवाचा बारा वाईट करण्याचा निर्णय मागे घेतलाच नाही.. आणि आम्ही आमच्या साठी एक जीव जावा?? ते पण वडिलांचा???
किती म्हटला तरी हे सुद्धा आयुष्यभर पुरला असता...

माफी असावी..

छे.. माफी वगैरे मागून कशाला हो लाजवताय.. इनफॅक्ट वरवर सल्ला दिला असेल तर आम्हीच दिलगिरी व्यक्त करतो..

शिवाय, तुम्ही जितकी माहिती दिलीत त्यावरच आधरित सर्वांनी मत दिलं. न दिलेल्या माहितीवर, बीटवीन द लाईन्स माहीत नसताना कसं मत देणार कोणी?

कोणी जीव वगैरे देण्याची धमकी दिली तर ते इमोशनल ब्लॅकमेलिंग असू शकतं, पण त्यातून त्यांचा तीव्र विरोधही दिसतो हे खरंच. अशा वेळी तुम्ही हे सर्ब समोरासमोर फेस करुन, पाहून, जोखूनच निर्णय घेतला आहे. यू वेअर द बेस्ट जज..आता त्याविषयी खंत बाळगू नका. आगे बढो.. नवीन स्वप्न पडतील आणि खरीही होतील ही ग्यारंटी आम्ही देऊ इच्छितो..

दादा कोंडके's picture

7 Feb 2013 - 4:19 pm | दादा कोंडके

नवीन स्वप्न पडतील आणि खरीही होतील ही ग्यारंटी आम्ही देऊ इच्छितो.

कशी काय?

लाईफ शुअरली मूव्हज ऑन..
तसं होतं असं प्रत्यक्ष अनुभवात, स्वतःच्या आणि आजुबाजूच्यांच्या, असल्याने त्यांना तो दिलासा देतो आहे.

दादा कोंडके's picture

7 Feb 2013 - 6:45 pm | दादा कोंडके

तसं होतं असं प्रत्यक्ष अनुभवात, स्वतःच्या आणि आजुबाजूच्यांच्या, असल्याने त्यांना तो दिलासा देतो आहे

धन्यवाद! ;)

नवीन स्वप्न पडतील आणि खरीही होतील ही ग्यारंटी आम्ही देऊ इच्छितो.. बरं झालं अशी ग्यारंटी ब-याच जणांना हवी आहे.

तुम्हि कॉन्ट्रॅक्ट घेता/देता का ग्यरंटीचे... ??

तसं असेल तर काही जणांना तुमचा णंबर देऊन टाकतो...... ;)

गवि's picture

7 Feb 2013 - 6:30 pm | गवि

.

हो हो आम्ही घेतो कॉन्ट्रेक्ट ग्यारंटीचे, स्वप्न पडायच्या पण ती खरी करण्यासाठी अंथरुणातुन उठुन अंथरुणापेक्षा अंमळ लांब पाय पसरायची डेरिंग पाहिजे.

खटासि खट's picture

4 Feb 2013 - 6:47 pm | खटासि खट

दादा
समाज म्हणून तुम्हाला फायदे हवेत कि प्रेम ? शहरात जातसमाजातून बहिष्कृत केलं तरी फरक पडत नाही. लग्न आणि दु:खद प्रसंगात काय ते तेव्हढेच नातेवाईक एकत्र येणं इतकंच सामान्यांच्या बाबतीत नातेसंबंध आणि जातीचं महत्व आहे. राजकिय व्यक्तींना मात्र जातीचं महत्व आहेच आहे.

खटासि खट's picture

4 Feb 2013 - 6:50 pm | खटासि खट

आणखी एक मार्ग आहे. पण खडतर आहे. सामाजिक सुधारणेचं व्रत हाती घ्या. जातीभेद संपवा आणि मग सुरजभाऊच्या शिनुमामातल्यासारखं सगळ्यांनी एकत्र क्लोज अप फोटु काढुन घेत लगीन करा. लग्नात नातवंडांना मांडीवर बसू द्या

आनन्दिता's picture

4 Feb 2013 - 8:22 pm | आनन्दिता

दीपकशेठ,

ती मुलगी जर मराठा असेल अन तेही छोट्या खेड्यातील, तर खरंच १०० वेळा विचार करा पळून वगैरे जाण्याआधी... तिच्या घरच्यांच्या आयुष्य नरक होऊन जाईल.. पुढे कदाचित माफ करतील ही तुम्हाला पण त्यांच्या जखमा कधीही भरून येणार नाहीत...

दादा कोंडके's picture

4 Feb 2013 - 8:40 pm | दादा कोंडके

ती मुलगी जर मराठा असेल अन तेही छोट्या खेड्यातील, तर खरंच १०० वेळा विचार करा पळून वगैरे जाण्याआधी... तिच्या घरच्यांच्या आयुष्य नरक होऊन जाईल.

त्यपेक्षा तुम्ही लवकर स्वर्गात जाण्याची शक्यता जास्त आहे. ;)

आनन्दिता's picture

4 Feb 2013 - 8:45 pm | आनन्दिता

हम्म..
याला मात्र मी ही सहमत! :)

काळा पहाड's picture

4 Feb 2013 - 8:54 pm | काळा पहाड

हिंसा-अहिंसा धाग्याची प्रिंटआऊट काढून त्यांना वाचायला दिल्याने काही फरक पडण्याची शक्यता आहे का?

इथल्या भल्याभल्यांच्या भाषा ऐकुन आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आलीय.. तर त्यांना प्रिंटा दाखवून काय करू!

ह्म्म याला मात्र मीहि सहमत आहे ...
अहो दिपक काका ... बेक्कार लोक असतात आमच्या ९६ कुळात ... :(
आमच्याकडे तर गावी एका मुलीने तीच्याच मामाच्या गावातला मुलगा पण
जराशीच खालच्या जातीतला होता ... तर त्याच्यासोबत पळुन जाऊन लग्न केलं
मग तिच्या बाबांनी आणि चुलत्यांनी त्यांना शोधुन त्या मुलाला तिथेच मारुन टाकलं :(
आणि मुलीला घरी आणुन विष पाजुन मारुन टाकलं :(
आणि स्वताहा पोलिस स्टेशन ला जावुन सांगितलं आम्हि केलं हे सगळं
गावच्या पोलिस पाटलाला हाताशी धरुन केस दाबुन टाकली ....

हे सगळं आणि अश्या अनेक गोष्टी आई मला वरचेवर सांगत असते ..... :( :-/

घाबरायला होतं न मग मला :( ..... पण तिला नै न समजत ते :-/

काळा पहाड's picture

4 Feb 2013 - 10:32 pm | काळा पहाड

अहो दिपक काका ... बेक्कार लोक असतात आमच्या ९६ कुळात ... smiley

हे म्हणजे तुम्ही ९६ कुळी आहात याची जाहिरात ना?

जेनी...'s picture

4 Feb 2013 - 10:37 pm | जेनी...

नाहियो काळा काका :(
जाहिरात कसली डोम्बलाची त्यात :-/
मी आपला धोक्याचा इशारा दिला दिपक काकांना :-/

हे सगळं आणि अश्या अनेक गोष्टी आई मला वरचेवर सांगत असते .....

पुजाताई, बरोबरे, तुम्हाला सारखं सांगावं लागणारच. काय भरोसा नाही तुमचा.

जेनी...'s picture

5 Feb 2013 - 12:17 am | जेनी...

ओ अधिकाका ....
आमच्याकडे नडला त्याला फोडला हे ब्रिदवाक्य असतय लोकांचं ...
तुमी मला नडु नका हं ... सांगुन ठेवते :-/
माझ्या दादालाच नाव सांगिन :-/

आन् आमच्यात बी आला अंगावर तर घेतला शिंगावर हे धोरण आसतया.

जेनी...'s picture

5 Feb 2013 - 12:25 am | जेनी...

आँ ??
मंजी तुमी माझ्या दादाला शिंगाव घेणार ???

मला आधीपासनच डावुट होता बगा .. कि तुमी शिंग असणारा प्राणि हाय म्हणुन =))

मी कोणत्या पक्षाचा खास माणूस हाये हे तुम्ही ओळखलं नाय अजुन,म्हणून आसली मजा सुचतीए. जौ दे काय बोलणार, शेवटी आपलेच दात आन् आपलेच होट.

अनन्या वर्तक's picture

5 Feb 2013 - 9:05 pm | अनन्या वर्तक

दादा कोंडके तुमची प्रतिक्रिया वाचताना सहज एका वाक्याने लक्ष वेधून घेतले.....~तिच्या घरच्यांच्या आयुष्य नरक होऊन जाईल.. ~ म्हणजे नक्की काय होईल?

ईन्टरफेल's picture

4 Feb 2013 - 9:19 pm | ईन्टरफेल

नड्ला तर फोडला हिच आमचि संक्रुति आहे ! खेड्यतलि
मग विचार करा !

दिपकराव जरा पोरीच्या बापाचे आणी भावाचे बॅकग्राउण्ड सांगता काय ? शक्य ती मदत मिळवुन देउ,पन लक्षात ठेवा normally वाय झेड पब्लिक असत आमच्, खर्‍या खोट्या इभ्रतीसाठी मारायची आणी मरायची तयारी असते यांची त्यामुळे विचार करुन निर्णय घ्या.....

दीपकशेठ's picture

7 Feb 2013 - 1:49 pm | दीपकशेठ

मुलीचा बाप शेती करतो, १-भाऊ एम टेक, १-व्यवसाय आणि एक शिक्षण घेतो..
खरा आहे तुमचा, त्यांनी मुलीला मारायची धमकी सुद्धा दिली होती आणि स्वतः पण मरण्याची तयारी होती. आणि आम्ही असा केला तर ते जीव देणार हेच उत्तर ४-५ वेळा भेटला.. त्यांच्या अश्या निर्णयामुळेच आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...

अभ्या..'s picture

4 Feb 2013 - 11:03 pm | अभ्या..

पाटीलबाबा तुमची तयारी समजू शकतो हो पण तुम्ही म्हणता तसे

खर्‍या खोट्या इभ्रतीसाठी मारायची आणी मरायची तयारी असते यांची

हे गुण मुलीत पण असले म्हणजे?
त्यामुळे तुमच्या इशार्‍याशी सहमत. दिपकराव विचार करून निर्णय घ्या

शैलेन्द्र's picture

4 Feb 2013 - 11:09 pm | शैलेन्द्र

:) चालुद्या, सह्या करायच्या असतील तेंव्हा बोलवा..

पुण्याच काम आहे, आम्ही नाही म्हणत नाही,,..

मी नै बै येणार सहि करायला सुद्धा :-/
आमची लोकं मलाच शोधुन मारतिल :(

शैलेन्द्र's picture

5 Feb 2013 - 9:22 am | शैलेन्द्र

छे.. कशा हो तुम्ही अन तुमची लोक..

जाउद्या, तुम्ही खोटी सही करा.. शॉर्ट वाली..

सुकु's picture

5 Feb 2013 - 4:52 am | सुकु

तुम्हीच विचार करा.
- तुम्ही कुठे रहाता? गावात की शहरात? तुमचे उत्पन्नाचे साधन काय? समजा तुमचे काही बरे-वाइट झाले तर भावी पत्नी एकटीने जगू शकेल काय?
- दोघांना भाउ-बहीण आहेत काय? असतील तर त्यांची लग्ने झाली आहेत काय? बहीणींना जास्त त्रास होतो लग्न जुळवायला अशावेळी.
- तुमचे प्रेम आहे म्हणजे काय आहे? - म्हणजे मैत्री मग प्रेम? बघता-क्षणीच प्रेम?
- समाजामधे सगळी उदाहरणे दिसतील अशा प्रकरणामधील. - सुखांत (सगळे सरळ झाले), दु:खांत (खून, म्रुत्यु, घटस्फोट ... सगळे प्रकार होतात) त्यामुळे उदाहरणे शोधून उत्तर मिळणार नाही. तुमचे उत्तर तुम्हालाच ठरवावे लागेल.
- तुम्हाला कधितरी सामाजिक प्रश्नांवषयी आवड होती? असेल तर तुम्हाला त्यातील त्रासाची कल्पना आहे.
- तुम्ही पूर्वी कधी जे बरोबर वाटते त्यासाठी विरोध पत्करून वाटते ते केले आहे काय?

जेनी...'s picture

5 Feb 2013 - 5:13 am | जेनी...

बापरे !!
म्हणजे ह्या सगळ्यांचा विचार करुन प्रेम करायचं असतं ??? :(

मग नक्कोच बै :-/
एवढा विचार करत बसण्यापेक्षा आईपप्पाणी बघुन दिलेल्याशीच लग्न सोयिस्करे ...
तिथे आपलं डोकं लावाय लागत नाय :P

:D

५० फक्त's picture

5 Feb 2013 - 7:49 am | ५० फक्त

ईंट्रनेट्वर क्मी दिव्स राहिलेत म्हंजे फार्च अशुद्ध्लिव्हाए असे न्व्हे.

जेनी...'s picture

5 Feb 2013 - 9:58 am | जेनी...

हो क्का???

इतका त्रास होत असेल तर वाचु नये अशुद्ध ... कुणी जबरदस्ती तुमचे डॉळे अशुद्ध लिहिलेल्या
अक्षरावर फोकस करुन नाय धरलेले ... :-/

बॅटमॅन's picture

5 Feb 2013 - 2:16 pm | बॅटमॅन

तेच्म्हंतो. उग्गिच आप्लं डोळ्याला अन डॉस्क्याला शॉट्ट तेच्यामारी!!

मुलिचे वडिल ज्या व्यक्तिला मानतात/ शक्यतो अशी व्यक्ति जिच्यावर आर्थिक कमाइची गणितेही अवलंबुन असतात मान असतो, त्यांच्याकडुनच जर मध्यस्ति करता आलि तर तुमचं काम होउ शकतं कोणालाच त्रास न होता. अन्यथा...

विलास अध्यापक's picture

5 Feb 2013 - 9:16 am | विलास अध्यापक

ये इष्क नही आसां इतना
इक आगका दरिया है
और डूबके जाना है !

आनन्दिता's picture

5 Feb 2013 - 9:37 am | आनन्दिता

दिपकशेठ

प्रश्न विचारुन गायबलात तुम्ही..
इतके सगळेजण इथे डोकी खाजवत बसलेत तुमच्यासाठी.. सांगा तरी तुम्हाला यातले उपाय पट्तायत की नाय ते....

दिपकशेठ बहूधा इथले नाना उपाय वाचून पळून गेले असतील.... हिमालयात.

अवांतरः मी शिर्षक जाता जातच नाही असे वाचले
:P

दीपकशेठ's picture

7 Feb 2013 - 1:52 pm | दीपकशेठ

गायब कसा होणार, अडकलो होतो सर्वांची जमवा जमाव करण्यात आणि शेवटचा प्रयत्न करण्यात.. झाला निर्णय..
आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...

मृत्युन्जय's picture

5 Feb 2013 - 10:33 am | मृत्युन्जय

तु नही और सही और नही और सही असा दृष्टीकोन ठेउन जगणे जमत असेल (तुम्हाला ही आणि तिलाही) तर विसरा तिला आणी पुढे जा. नपेक्षा तिच्याशीच संसार मांडणे उत्तम. तुम्ही तिलाच मनात ठेउन दुसृया कोणाशी लग्न केलेत तर तुमच्या २चे आणि तुमाच्य जोडीदारांचे अश्या ४ जणांचे आयुष्य बरबाद कराल.

बाकी राहिला प्रश्न भावंडांचा आणि घरच्यांचा तर त्यला काही इलाज नाही. होइल हळु हळू सगळे ठीक. सगळ्यांचे भले होइल. लग्न नाही केलेत तर मात्र तुमचे नुकसान होइल.

आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Feb 2013 - 10:39 am | श्री गावसेना प्रमुख

गुलाबी गँगला बो लावा बरोबर ठिकाणावर येतील सगळे.

दीपकशेठ's picture

6 Feb 2013 - 11:34 am | दीपकशेठ

आधी सर्वांचे आभार... चांगले सल्ले दिलेत म्हणून...
शेवटी आम्ही वडिलांच्या आणि सर्वांच्या ख़ुशी साठी तडजोडीचा हा कडू प्याला पिण्यास तयार झालो... :( :'(

४-५ वेळा माघार घेऊन प्रत्येक वेळी खूप हिम्मतीने लढलो, पण शेवटी हेच... तिच्या वडिलांनी काही पर्याय नाही ठेवला म्हणून.. हरलो आम्ही... एक जीव वाचविण्यासाठी :( आमच्याच स्वप्न्नाना आम्ही स्वप्नाच ठेवणार...

आमच्या वडिलांचे आणि घरच्यांचे खूप आभार, जे मला इतका पाठींबा दिला आणि माझ्या साठी तिच्या वडिलांबरोबर पुढे होऊन चर्चा केली म्हणून...

योगप्रभू's picture

6 Feb 2013 - 12:15 pm | योगप्रभू

दीपकशेठ,
फुलू पाहणारं तुमचं प्रेम गाडलंत ना, तसंच त्याच्या आठवणीही खोल गाडून त्यावर कायमचा मातीचा थर टाका.
म्हणजे असं की, आता पुढच्या आयुष्यात नव्या जोडीदारावर प्रेमाचा पुरेपूर वर्षाव करा. जुन्या आठवणींनी काळजात कळ येऊन प्रेम पातळ करु नका. अन्यथा तुम्ही दोघेही आणखी दोन नव्या व्यक्तींवर अन्याय कराल.

मन१'s picture

6 Feb 2013 - 7:08 pm | मन१

+१

दीपकशेठ's picture

7 Feb 2013 - 1:57 pm | दीपकशेठ

मनाची तयारी करत आहोत...
लगेच लग्न कारण तर शक्य नाही... मनस्थीती निट झाली कि बघू पुढच...

आजानुकर्ण's picture

6 Feb 2013 - 6:58 pm | आजानुकर्ण

चांगला आणि परिपक्व निर्णय. तुम्हाला याचा पश्चाताप होणार नाही. शुभेच्छा.

अभ्या..'s picture

6 Feb 2013 - 8:06 pm | अभ्या..

असो मला मात्र पश्चाताप झालेला आहे.
यापुढे प्रेमात काय करु, आंतरजातीयचे काय करु, वयाचे काय करु, पोळी करु की चपाती करु असे धागे उघडणार नाही, वाचणे आणि प्रतिसाद देणे तर दूरच.
फक्त नंदनवनात जाता जाता दिपकशेठ एकच अगदी खरे खरे सांगून जा.
त्या मुलीचे वडील काय म्हणाले? आणि तुमचे वडील काय म्हणाले घरी आल्यानंतर?
त्यांच्या शब्दात सांगितले तर फार बरे होइल.

दीपकशेठ's picture

7 Feb 2013 - 2:01 pm | दीपकशेठ

मुलीचे वडील: हे शक्य नाही, मला गाव वाळीत टाकणार, आणि मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही.. मला समजून घ्या..
माझे वडील पुढे तरी काय बोलणार?? मला हेच त्यांनी सांगितल आणि बघ तुझा विचार काय वाटते ते.. त्यांचा तर हाच निर्णय आहे... तुमच्या मुळे एक जीव जाऊ शकतो, आणि हे ओझे तुम्हाला आयुष्यभर वाहावे लागणार..

बाबा पाटील's picture

6 Feb 2013 - 11:53 am | बाबा पाटील

पोरांनो सुखी रहा....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Feb 2013 - 5:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझा एक ब्राम्हण मित्र आणि माळी मैत्रिणीचा असाचं प्रॉब्लेम झाला होता. दोघांच्या घरचे तयार नव्हते. शेवटी आम्ही मित्रांनी दोघांच्या घरच्यांना एकत्र बोलाऊन नीट समजावल तेव्हा कुठे तयार झालेत. दोघांचा साखरपुडा नुकताच पार पडला, आता लग्नाची तारीख ठरवायचं चालु आहे.
नीट समजावलं घरच्यांना तर तेही समजावुन घ्यायला तयार असतात. तुम्ही दोघं एकमेकांशिवाय कशी राहु शकणार नाहीत ते सांगा. तुम्ही तिच्या आईवडीलांची आणि ती तुमच्या आई-वडीलांची सदैव काळजी घ्याल हे ही सांगा. आई-वडील ऐकतात योग्य पद्धतीनी सांगीतलं तर. आणि नाहीच ऐकल तर दोघही सज्ञान असल्यान लग्न करु शकताच. समाजाच काय आहे हो? चार दिवस बोंब मारतील नंतर विसरुन जातील. तुमचं मनापासुन प्रेम असेल एकमेकांवर तर एवढी रिस्क नक्कीच घ्यायला पाहीजे. आयुष्य तुम्हाला समाजातल्या सो कॉल्ड जात-पोलिसांबरोबर काढायचं आहे की तुमच्या प्रेमाबरोबर ते पण पहा.

(प्रेम व्यक्त नं करता आल्यानं तिच्या लग्नाला जायला लागलेला) मन उधाण वार्‍याचे.

जेनी...'s picture

6 Feb 2013 - 8:13 pm | जेनी...

एक शंकाये मला :

प्रेम केलं तर लग्न करणं कम्पल्सरीये का ?? :(
नुसतं प्रेम नै का जमणार ?? :(
लग्न केलच पाहिजे का ?? :-/

श्रीरंग_जोशी's picture

6 Feb 2013 - 8:45 pm | श्रीरंग_जोशी

पोरी, जगात कम्पल्सरी असं काहीच नसतं...

टवाळ कार्टा's picture

7 Feb 2013 - 12:55 am | टवाळ कार्टा

टाळ्या ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Feb 2013 - 9:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक शंकाये मला :

तुम्ही ३ विचारल्या आहेत. :D

प्रेम केलं तर लग्न करणं कम्पल्सरीये का ??

वेल सद्ध्या लिव्ह ईन रेलशनशिप चा प्रकार जवळपास समाजमान्य होत चाल्लाचं आहे की. पण तो स्वतंत्र वादाचा मुद्दा आहे :).

नुसतं प्रेम नै का जमणार ??

जमु शकेल, पण जर आयुष्य एकत्र काढायचचं नसेल तर प्रेम तरी कशाला करा? :).

लग्न केलच पाहिजे का ??

मी लग्न केल पाहीजे अश्या मताचा आहे. भले ते वैदिक पद्धतिनी असो किंवा रगिस्टर.
करावं का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्ण आहे.

आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...

दोघं एकमेकांशिवाय कशी राहु शकणार नाहीत हे सुद्धा सांगून झाला, माझ्या घरचे पुढे होउन तिच्या वडिलांशी बोलले..पण व्यर्थ .. :(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Feb 2013 - 9:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो पण तुम्ही स्वतः त्यांच्या वडीलांना समजवायचा प्रयत्न करुन पाहीलात का? कदाचीत तुमचा आत्मविश्वास पाहुन त्यांचा निर्णय बदलु पण शकतो. माघार घेऊ नका अशी. एकदा प्रयत्न तर करुन पहा. प्रयत्नांती परमेश्वर. :).
तुम्ही प्रयत्न कराल अशी अपेक्शा बाळगुन तुम्हाला शुभेच्चा देतो.

(लग्नाच्या आईसक्रीम पार्टीच्या प्रतिक्शेमधील) मन उधाण वार्याचे :)

दीपकशेठ's picture

8 Feb 2013 - 7:33 am | दीपकशेठ

नाही ...
मी स्वतः तिच्या वडिलांशी नाही बोललो, पण हो तिच्या अत्त्याशी बोललो. तिचा पाठींबा होता, तिनेही प्रयत्न केले, पण तिच्या भावापुढे काहीही चालू शकले नाही. तुझा आणि माझा संबद्ध राहणार नाही आणि मला जिवंत राहू द्यायचा नाही वाटता तुला , असा म्हटल्यावर ती तरी काय करणार...
माझ्या वडिलांना मी फोन वर विचारायला सांगितले पण तो प्रयत्न सुधा निष्फळ.. :(

आता विचारले तर ते मुलीला त्रास देतील आणि काहीही करू शकतात, ते मला नाही बघितला जाणार.. असाही खूप त्रास होतोय आम्हाला... पण तिला बाकी त्रास नको म्हणून आता प्रयत्न थांबिवले... आणि दोघांची हिम्मत पण संपली...
आता फक्त बोलणं चालू असता, पण मनाला माहित आहे कि किती केले तरी...

शुबेच्चा दिल्या... धन्यवाद

चावटमेला's picture

6 Feb 2013 - 9:21 pm | चावटमेला

एक कन्फेशन.

धागा पाहताक्षणीच ह्यात इतके मुक्तपीठीय पोटेन्शिअल असेल असं ह्या पामरास खरंच वाटलं नव्हतं ;)

खटपट्या's picture

7 Feb 2013 - 1:25 am | खटपट्या

आमचा घोड्यान्चा धन्दा आहे. पान्ढरे, काळे, खरबे उपलब्ध.
जमले कि सान्गा. खास सवलत पण देवू.

आनन्दिता's picture

7 Feb 2013 - 2:52 am | आनन्दिता

देवा..... कोणाच काय तर कोणाच काय?.!!! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Feb 2013 - 9:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१

खटपट्या's picture

8 Feb 2013 - 4:38 am | खटपट्या

शेवटी काय ठरले ते कळ्वा हो. घोडे बिनकामाचे उभे आहेत.