'बीपी' (बालक पालक)

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
6 Jan 2013 - 1:21 pm

लैंगिक शिक्षण! अतिशय नाजुक विषय!

आपल्या भारतीय समाजात या विषयावरचं बोलणं मुद्दाम टाळलं जातं. मग इतका संवेदनशील विषय कोणी, कसा आणी कधी शिकवायचा?? साधारण वयाच्या १२-१३ व्या वर्षापासून हे असंही काही असतं याची जाणिव व्हायला सुरूवात होते आणि ते नेमकं काय असतं हे जाणून घ्यायच्या नादात अनेक चुकीच्या गोष्टी मुलांपर्यंत पोहचतात. बरं कुतूहुल म्हणून वाटलेल्या अशा काही प्रश्नांची उत्तरे मोठ्या माणसांकडे विचारायचीही सोय नसते. अशा वेळी पालकांची मानसिकता आड येते. मग सभोवती असणार्‍या परिस्थितीतून जसं जसं या विषयातलं ज्ञान पिवळी पुस्तकं, सी ग्रेडच्या फिल्म, ब्लु फिल्मच्या सिडी-डिव्हीडीज अशा चुकीच्या पध्दतीने मुलांना मिळत जातं तसं तसं लैंगिक शिक्षण ह्या विषयाबद्दल त्यांच्या मनात एक वेगळंच आणि चुकीचं चित्र निर्माण होऊ लागतं. ज्या वेळी अशा सगळ्या गोष्टी मुलांच्या जीवनात प्रवेश करतात त्या वेळेला त्यांचं बालपण संपलेलं असतं आणि पौगंडावस्थेला सुरूवात झालेली असते.

1

रवि जाधवचा बालक पालक हा सिनेमा ह्या विषयाचं गांभीर्य आणि त्याबद्दलचा उपदेश अगदी हलक्या फुलक्या आणी सहज-सोप्या पध्दतीने लोकांपर्यंत पोहचवतो. मुलांच्या आणि पालकांच्या मधला दुवा साधण्याचं काम हा चित्रपट योग्य रितीने करतो. चित्रपटातलं कथानक हे ८०-९० च्या दशकात घडत असताना दाखवलंय. कथानक कधीही घडत असलं तरी प्रश्न मात्र तेच राहतात. अव्या, भाग्या, डॉली, चिऊ मध्यमवर्गीय घरातली १३ ते १४ वयोगटातली मुलं.

2

त्यांच्या आनंदाश्रम चाळीत असणार्‍या ज्योती ताईने गैरवर्तन केल्यानंतर चाळीत तिच्याबद्दल उलट-सुलट चर्चा होऊ लागतात आणि अशा एका चर्चेतून त्यांच्या कानावर पडतं "तरी मी आधी सांगत होते. आता काय? खाल्लं ना शेण!?" यातल्या खाल्लं ना शेण ह्या शब्दांचा अर्थ त्यांच्या बालमनाला झेपत नाही आणि मग दिवाळीतल्या सुट्टीत ह्या शब्दांचा अर्थ शोधण्याचं ते ठरवतात. बराच प्रयत्न करूनही जेव्हा त्यांना त्या शब्दांचा अर्थ मिळत नाही तेव्हा ते भाव्याचा मित्र 'विशू'ची मदत घ्यायचं ठरवतात. विशू हा त्यांच्याच वयाचा झोपडपट्टीत वावरणारा मुलगा. पण भौतिक परिस्थितून त्याला हे सगळं खुप लवकरच कळायला लागलेलं असतं. मग तो त्याच्या पध्दतीने जमेलं तसं हे ज्ञान त्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो.

ढिचँक-ढिचॅक! विशू त्याच्या पध्दतीने ह्या मुलांना समजेल असं ह्या विषयाला नाव देतो आणि अगदी सोप्या भाषेत त्यांना समजवायचा प्रयत्न करतो. मग पहिल्यांदा पिवळ्या पुस्तकांच चुकीचं माध्यम निवडून विशू त्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा तो प्रयत्न करतो. ढिचाँक-ढिचाक हे प्रत्येकाच्या मनात लपलेलं असतं जो त्याला बाहेर न काढता फक्त मनातच दडवून ठेवतो तो सभ्य आणि जो ते बाहेर काढतो तो असभ्य. विशूचं लैंगिक शिक्षणाबद्दलचं अतिशय अचुक पण मार्मिक मत. पिवळ्या पुस्तकांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे भाड्याने व्हिसीआर आणून तसले 'स्पेशल' सिनेमे पाहण्यापर्यंत जातो. ह्या सगळ्यातून त्यां मुलांमध्ये वैचारीक आणि मानसिक बदल होत जातात. आणि मग वयाने मोठ्या असणार्‍या चाळीतल्या मुलीला आय लव्ह यु बोलण्यापासून ते नेहमी सोबत वावरणार्‍या मैत्रिणीबद्दल आकर्षण निर्माण होणे अशा अनेक चुकीच्या गोष्टी करण्यापर्यंत त्या मुलांची मजल जाते. ब्लु फिल्म पाहिल्यानंतर भाग्याला चाळीतल्याच पण त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या नेहा ताईंबद्दल आकर्षण निर्माण होतं तर अव्याला चिऊबद्दल प्रेमाची भावना जागृत होऊ लागते.

7

4

3

चाळीतल्या कदम काकांना या गोष्टी माहीत पडल्यानंतर ते या मुलांच्या पालकांना जागं करण्याचा प्रयत्न करतात पण आधीच सभ्यतेची झापडं आपल्या डोळ्यांवर लावलेल्या त्या पालकांना ह्या गोष्टीतलं गांभीर्य पटकन कळत नाही. मुलांमध्ये हे ज्ञान देण्यासाठी पालकांकडूनच विरोध होतोय हे पाहिल्यानंतर कदम काका स्वतः मुलांना लैंगिक शिक्षणाविषयी समजावून सांगतात.

5

चित्रपटातल्या मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती विशू ह्या मुलाच्या माध्यमातून होते. पण आता सद्यस्थितीत विशूच्या जागी अनेक पोर्नोग्राफिक संस्थळ, मॅग्झीन्स, रस्त्यावर सहजरीत्या उपलब्ध होणार्‍या ब्लु फिल्मच्या सिडीज हे काम करताना दिसतात. पाश्चात्य देशात लैंगिक शिक्षण हे महत्वाचं मानलं जात असून ते आता शालेय उपक्रमातही सामाविष्ट केलं गेलंय पण त्याचबरोबर भारतासारख्या विकसनशील देशात हा विषय जाहिररीत्या बोलण्यात अजूनही लोकांना दडपण येतं.

असो.

'सेक्स एज्युकेशन' सारख्या धाडसी विषयाला हात घातल्याबद्दल रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर या दोन्ही निर्मात्यांचं कौतूक करावंस वाटतं.

नटरगं आणि बालगंधर्वनंतर रवी जाधव माझ्या आवडत्या दिग्दर्शकांच्या यादीत आला होता त्यामुळे त्याच्यासाठी हा सिनेमा पाहायला जाणं खुप आधीपासूनच ठरवलं. इतका नाजुक विषय पण त्याने त्याच्या दिग्दर्शकीय कौशल्यातून बरोबर हाताळलाय कि ज्यामुळे चित्रपट कुठेही भडक वाटत नाही.

चित्रपटाची कथा अंबर हडप आणि गणेश पंडीत यांनी प्रभावीपणे लिहलीय. मुलांच प्रबोधन करण्यासाठी कदम काका हे कॅरेक्टर नेमकं निवडलंय. विशाल शेखर यांनी दिलेलं चित्रपटाचं संगीत कानांना ऐकायला बरं वाटतं. विशाल दादलानीने गायलेलं करूया आता कल्ला कल्ला कल्ला हे एकदम गाणं एकदम रॉक झालंय. त्यातल्या त्यात शेखरचा आवाज असलेलं 'हरवली पाखरे' हे गाणं मला खुपच आवडलं. चुकीच्या लैंगिक शिक्षणामुळे मुलांच्या भावविश्वात झालेले बदल आणी त्यांच हरवत चाललेलं बालपण हे गाणं नेमक्या शब्दात व्यक्त करतं. चाळीतले कदम काका मुलांना 'सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो' शिकवत असतात आणि नेमक्या त्याच वेळेला हि चारही मुलं विशूच्या साह्हायाने ब्लु फिल्म पाहण्यासाठी भाड्याने व्हिसीआर घेऊन येतात. आणि बॅकग्राऊंडला गाणं वाजत असतं...

सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो,
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.

सिच्युऐशनला अनुसरून असणारं गाणं..एकदम चपखल! गुरू ठाकूर आणि रवि जाधव यांनी लिहलेल्या गीतांचे शब्द लक्षात राहतील असे आहेत.

महेश लिमयेच्या सिनेमॅटोग्राफीमुळे चित्रपटाला ऐक वेगळा आणि फ्रेश लुक येतो. दिवाळीतली दृश्य, नदीवरची सगळी दृश्य अतिशय सुंदर आहेत. चित्रपटात दाखवलेली आनंदाश्रम नावाची चाळ बहुदा आमच्या ठाण्यातल्या बी-केबीन इथली असावी.

चित्रपटात अविनाश खर्शीकर, आनंद अभ्यंकर, माधवी जुवेकर, सुप्रिया पाठारे, सई ताम्हणकर, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, सतिश तारे या सगळ्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे अभिनय केलाय. किशोर कदम यांनी सगळ्यांची काळजी घेणारा आणि मुलांवर बारीक लक्ष ठेवणारा कदम काका उत्तम साकारलाय. थोड्या काळासाठी अमृता सुभाष आणि सुबोध भावे हे दोघंही चमकून जातात. पण या चित्रपटाची सर्वात महत्वाची आणि मुख्य बाजु म्हणजे यातल्या सर्व बाल कलाकारांनी केलेला अभिनय. प्रथमेश परब, शाश्वती पिंपळीकर, मदन देवधर, भाग्यश्री सकपाळ, रोहित फाळके या पाचही मुलांनी अप्रतिम अभिनय केलाय. विशेषतः प्रथमेश परबने साकारलेला विशू. ह्या मुलाने विशूच्या भुमिकेत धम्माल अभिनय केलाय.

छान सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट पालकांनी आपल्या मुलांसोबत बसून आवर्जून पाहायला हवा. मला व्यक्तिशः खुप आवडला. चित्रपटाच्या सुरूवातीलाच फ्रँकलीन रोझवेल्टचं एक समर्पक वाक्य आहे.

'we may not be able to prepare the future for our children, but we can at least prepare our children for the future.'

****
४/५

कलासमाजजीवनमानविचारआस्वादसमीक्षामाध्यमवेध

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

6 Jan 2013 - 1:42 pm | आदूबाळ

छान रसग्रहण! हा चित्रपट पहायचा(च) आहे.

या महिन्यात इतरही चांगले चित्रपट येत आहेत - पुणे-५२ सारखे. त्याचंही रसग्रहण येऊद्यात!

लीलाधर's picture

6 Jan 2013 - 1:53 pm | लीलाधर

रसग्रहण आवडल्या गेले आहे

रसग्रहण आवडले. हा चित्रपट बघायचा आहे.

नावातकायआहे's picture

6 Jan 2013 - 1:57 pm | नावातकायआहे

कालच पाहिला..

पब्लिक खरी बीपि बघताना कॉमेंटस पास करणार नाहीत येवढ्या कॉमेंटस टाकत होत..
येडXX साले..

चित्रपट आवडला हे वेगळे सांगायला नको...
जरुर बघा..

पैसा's picture

6 Jan 2013 - 2:45 pm | पैसा

मराठीत असा अर्थपूर्ण सिनेमा म्हणजे बघायलाच हवा.

अनुप कुलकर्णी's picture

6 Jan 2013 - 2:52 pm | अनुप कुलकर्णी

अत्यंत नाजुक पण महत्वाचा विषय!

मुलांना लैंगिकतेची पहीली ओळख अश्लीलतेने होते ही सर्वात दुर्भाग्याची आणि चिंताजनक गोष्ट आहे!

एक-दोन महिन्यांपूर्वीच टेडातल्या टॉकमध्ये Make Love Not Porn नावाचा एक टॉक बघितला. न कळत्या वयातली मुलं पोर्न बघुन आपल्या साथीदाराकडूनही तशाच प्रकारच्या अपेक्षा ठेवतात असा त्या टॉकचा विषय. ते पाहून असा वाटलं की खरं तर लैंगिक शिक्षणाची व्याप्ती खूप जास्त आहे आणि त्याबाबतीत पाश्चात्य देशही फार पुढे गेलेले नाहीत. भारतात तर बोलायलाच नको!

रघुनाथ.केरकर's picture

6 Jan 2013 - 4:45 pm | रघुनाथ.केरकर

मला मझ्या शाळेतला वीशु आठवला..... आपल्या प्रत्येकाच्या वर्गात किन्वा शाळेत एक विशु होता......

विशु चा अभिनय खुप आवडला.... सगळ्यानी खुप छान काम केलय.

सई ऐवजी दुसरि कुणीहि घेतलि अस्ति तरी चालल अस्त....

बाकी सगळ अप्रतिम होत......

इनिगोय's picture

6 Jan 2013 - 8:04 pm | इनिगोय

परीक्षण छानच.

'हरवली पाखरे' गाणं एकदम मस्त ठेका धरायला लावणारं आहे.

मराठीत एवढा प्रगल्भ विषय हाताळल्याचे कौतूक वाटले.

तुम्ही सिनेमा पाहिलात तिथे प्रेक्षकांची प्रतिक्रिया कशी होती?

किसन शिंदे's picture

6 Jan 2013 - 9:13 pm | किसन शिंदे

मी पाहिलेल्या दुपारच्या शो ला सिनेमागृह जवळजवळ हाऊसफुल्ल झालं होतं. चित्रपट पुर्वार्धात विनोदी आणि उत्तरार्धात गंभीरतेकडे झुकत जातो. बहुतेक सर्वच प्रेक्षकांना चित्रपट आवडला होता. माझ्या मागे बसलेल्या १२ ते १६ वयोगटातल्या मुलांनी चित्रपटाचा पुरेपूर आनंद घेतला.

नन्दादीप's picture

12 Jan 2013 - 8:57 pm | नन्दादीप

आजच दुपारी पाहीला. पुर्वार्धात प्रचंड टाळ्या आणी शिट्ट्या,,, पन उत्तरार्धात मात्र त्याच प्रेक्षकांनी योग्य ठिकाणी टाळ्या वाजवून दाद पण दिली.

परिक्षण अगदी छान. सिनेमा बघणार.

विकास's picture

10 Jan 2013 - 12:59 am | विकास

असेच म्हणतो!

सुहास झेले's picture

6 Jan 2013 - 9:35 pm | सुहास झेले

मस्त परीक्षण रे....

आज बघायचा होता, पण योग जुळून आला नाही. लवकरच बघण्यात येईल :) :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Jan 2013 - 12:51 am | निनाद मुक्काम प...

सुंदर लिखाण झाले आहे ,

आमच्या शाळेचा माझी विद्यार्थी व पक्का डोंबिवलीकर रवी दादाने हा विषय मस्तच मांडला आहे
त्याची मधली सुट्टी मधील मुलाखत पाहण्यासारखी आहे ,

स्पा's picture

7 Jan 2013 - 5:43 am | स्पा

सुरेख परीक्शण

प्रचेतस's picture

7 Jan 2013 - 9:26 am | प्रचेतस

किस्ना, परीक्षण छान रे.

चांगले, संयत परिक्षण. विषय सांगितला आहे पण कथानक उघडे केलेले नाही (असे वाटते).
चित्रपट बघावा म्हणतोय.. बघु कसा वेळ मिळतो ते

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Jan 2013 - 12:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

उत्तम व संयत परिक्षण.
पहायचा होताचं, परिक्षण वाचल्यावर इच्छा बळावली.

मुलामुलींनी एकत्र बसून तशी कॅसेट पाहणे, मुलगी पिवळ्या पुस्तकाचं वाचन करतेय असे सीन पाहण्याइतका आपला ऑडियन्स म्याच्युअर नसल्याने अशा वेळी कॉमेंट्स, शिट्या येत असतील की काय अशी शंका येते. चित्रपटाच्या उत्तम थीमला असं पब्लिक मारक ठरतं. याच कारणाने सहकुटुंब बघण्यातही समस्या येऊ शकते.

पण हळूहळू बदल होईल अशी आशा.. चित्रपट पाहिला जाईल.. धन्यवाद किसना..

किसन्या मोट्टा लेखक झालास बा. तुझा लेख एका चोरानं चेपूवर चोप्य पस्ते केलाय.
मी निषेध नोंदवून आलोच आहे. (तो किति काळ टिकेल ते त्या चोरासच माहित.)
म्हटलं तुझ्या कानावर घालावं. :)
https://www.facebook.com/photo.php?fbid=585447694802555&set=a.1999321800...

ही चोरी श्रीकृष्ण ठाकूर या मिपाकरांनी नजरेस आणुन दिल्याबद्दल त्यांचे ही आभार. :)

किसन शिंदे's picture

7 Jan 2013 - 1:03 pm | किसन शिंदे

=)) =))

गणपा भाऊ त्या श्रीकृष्ण ठाकूर यांच्यासोबत तुमचेही धन्यवाद! :)

पैसा's picture

8 Jan 2013 - 6:00 pm | पैसा

त्या पेजवर पाहिलं तर मिपावरचे बरेच लेख चोप्य पस्ते केलेले दिसताहेत. कोणीतरी ऑफिशियल कारवाई करायला पाहिजे.

अनिल तापकीर's picture

7 Jan 2013 - 12:46 pm | अनिल तापकीर

आवडले रसग्रहण

तिमा's picture

7 Jan 2013 - 12:51 pm | तिमा

परीक्षण आवडले. पण आचरट कॉमेंटस करणारी टाळकी सगळीकडे असतातच. त्यांनी चित्रपट बघताना बेरंग करु नये ही अपेक्षा आहे. नाहीतर मुलांना योग्य शिक्षण न मिळता त्या कॉमेंटसच लक्षांत रहायच्या!

स्पा's picture

7 Jan 2013 - 12:52 pm | स्पा

चित्रपट खास जाऊन अर्थातच बघणार नाही
चायला, समाज प्रबोधनाचा ठेका काय फक्त मराठी वाल्यांनी घेतलाय काय ?
उठसुठ , याच्या वर प्रबोधन , त्याच्यावर प्रबोधन ...

आम्हाला करमणूक हवी " दबंग " सारखी ;)
प्रबोधन वेग्रे पाहू नंतर "टीवी" ला आल्यावर

प्रचेतस's picture

7 Jan 2013 - 12:55 pm | प्रचेतस

सहमत.
चित्रपट केवळ मनोरंजनासाठी हवा.

किसन शिंदे's picture

7 Jan 2013 - 3:04 pm | किसन शिंदे

मराठी वाल्यांनी घेतलाय काय ?
उठसुठ , याच्या वर प्रबोधन , त्याच्यावर प्रबोधन ...

मराठी चित्रपटांबद्दल हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. हि असली मानसिकता आधी बदलायला हवीय.

बालक पालक हा चित्रपट प्रबोधन तर करतोच पण त्याचबरोबर १००% मनोरंजनही करतो.

मराठी चित्रपटांबद्दल हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे.
चुकीचा समज = गैर समज
dats व्हाय चुकीचा गैरसमज = योग्य समज

हि असली मानसिकता आधी बदलायला हवीय.

तेच म्हणतोय , मराठी दिग्दर्शक , निर्मात्यांनी मानसिकता बदलायला हवी ;)

१. स्ट्रगलर
२. नाईट स्कूल
3. च्याम्पियंस
४. भारतीय
५. सुकन्या
६. मोकळा श्वास
७. आयना का बायना

:)

प्रचेतस's picture

7 Jan 2013 - 1:14 pm | प्रचेतस

=)) =)) =))

प्रबोधनकार का प्रबोधनपर?

शैलेन्द्र's picture

10 Jan 2013 - 4:23 pm | शैलेन्द्र

जावू दे ना, का छळातोस ते ला..

स्पा's picture

10 Jan 2013 - 4:24 pm | स्पा

=))

शन्वारीच मूव्ही पाह्यला !! प्रचंड आवडला. पब्लिक बरंच मॅच्युअर वाटलं त्या शो ला आलेलं. सुरुवातीची पाच मिनीटं सोडली तर कमेंट्स न येता उत्तम संवाद, रिअ‍ॅक्शनला टाळ्यांनी प्रतिसाद मिळत होता. परिक्षणही उत्तम लिहीलंय.

वपाडाव's picture

7 Jan 2013 - 2:55 pm | वपाडाव

नक्कीच पाहिल्या जाइल... परीक्षण आवडेश !!

स्मिता.'s picture

7 Jan 2013 - 3:07 pm | स्मिता.

चिरेअपटाचे परिक्षण आवडले. संधी मिलाली की नक्की बघेन. बाकी फोटोत दिसतंय की 'अश्या' चित्रफिती मुलं-मुली एकत्र बसून बघतायेत हे जरा पचायला जड जातंय... पण आपल्या माहितीच्या बाहेरही जग असतं किंवा दिग्दर्शकाने थोडी लिबर्टी घेतली असावी हे मान्य.

बन्डु's picture

8 Jan 2013 - 5:53 pm | बन्डु

लिबर्टी नाही. खरय तेच दाखवलं आहे

विनायक प्रभू's picture

22 Jan 2013 - 11:58 am | विनायक प्रभू

१९८० मधे पण होते आज पण आहे.

आम्हा याच वयातील मुलांच्या पालकांसाठी खरं तर या विषयावर संवाद साधणं अवघड्च होऊन जातय. मी नियमितपणे लोकसत्ता-चतुरंग सारख्या पुरवण्या वाचत असते. नक्कीच पाहीन हा चित्रपट!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Jan 2013 - 7:43 pm | निनाद मुक्काम प...

सिनेमात काही प्रसंगांना प्रेक्षक वेड्या वाकड्या कॉमेंट करतात आणि त्याने सहकुटुंब परीवाला जाण्यास अनेकांना संकोच वाटतो ,
माझे ह्या बाबतीत थोडे वेगळे म्हणणे आहे ,
जे आपल्या बायको व मुलांसोबत ह्या सिनेमाला येतात , त्यांची बायका व मुले ह्या समाजात त्यांच्या इतकीच समाजात वावरत असतात , आणि व अश्या प्रवृत्ती समाजात त्यांना नेहमीच दिसत असतात ,
माझ्या मते अश्या प्रवृत्तींना लाजून किंवा ऑकवर्ड वाटण्याचे काहीच गरज नाही ,
उलट ह्या प्रवृत्ती समाजात आहेत ,
किंबहुना हा सिनेमा अश्याच कॉमेंट करणाऱ्या प्रेक्षक नेमके कसे घडले व आपल्या समाजात अश्या प्रवृत्ती कश्या बनतात ह्याचे एक वास्तव तुम्हा आमच्या समोर मांडण्यासाठी बनवला आहे.
आपली मुले अश्या कॉमेंट करणाऱ्या वर्गाचा हिस्सा होऊ नये अशी प्रकर्षाने जाणीव होऊन कदाचित प्रेक्षक लैंगिक शिक्षणाचा अधिक गांभीर्याने विचार करतील .
जेव्हा थेटर मध्ये अश्या प्रसंगांना कॉमेंट येतात तेव्हा ह्या सिनेमा निर्मितीचा उद्देश व पालकांना योग्य तो संदेश
हा सिनेमा ऑन लाईन व ऑफ लाईन समजवून देतो,

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2013 - 9:28 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त प्रिक्शान.....लवकरच बघनार :-)

मालोजीराव's picture

8 Jan 2013 - 12:01 pm | मालोजीराव

किस्ना मस्त परीक्षण ...बघतो लवकरच
...बाकी सरकारने लैंगिक शिक्षण वर्ग या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असे वाटते आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत ते लक्षात घेता.
को-एड शिक्षण पद्धती हा एक या गोष्टींना आळा घालण्याचा चांगला उपाय होऊ शकतो.फक्त मुलांच्या किंवा फक्त मुलींच्या शाळा बंद कराव्यात असं वैयक्तिक मत आहे.

को-एड शिक्षण पद्धती हा एक या गोष्टींना आळा घालण्याचा चांगला उपाय होऊ शकतो.फक्त मुलांच्या किंवा फक्त मुलींच्या शाळा बंद कराव्यात असं वैयक्तिक मत आहे.

+१०००००००००००००००००००.

पूर्ण सहमत. ही नक्कीच एक चांगली सुरुवात होऊ शकते.

(सर्व शिक्षण कोएड शाळेत झालेला) बॅटमॅन.

आमच्या कोएड शाळेमध्ये नववीत असताना सेक्स एज्युकेशनचे वर्ग झाले होते. आणि मला आठवतंय, सर्व मुला-मुलींनी गांभीर्याने ते ऐकून घेतले.

(प्रश्न विचारण्याचं धाडस मात्र कोणाला झालं नाही)

विनायक प्रभू's picture

9 Jan 2013 - 3:58 pm | विनायक प्रभू

खूप दिवसांनी एक चांगला मराठी चित्रपट बघायला मिळाला.

तर्री's picture

10 Jan 2013 - 3:34 pm | तर्री

एक चांगला सिनेमा सुचवल्या बद्दल आभार.

निवेदिता-ताई's picture

12 Jan 2013 - 9:54 pm | निवेदिता-ताई

परिक्षण अगदी छान. सिनेमा बघणार.

चित्रा's picture

12 Jan 2013 - 10:08 pm | चित्रा

चित्रपट बघावासा वाटतो. संधी केव्हा येईल माहिती नाही.

परिक्षण आवडले.

मी-सौरभ's picture

14 Jan 2013 - 7:05 pm | मी-सौरभ

चित्रपट बघितला जाईल किसन देव...

अग्निकोल्हा's picture

16 Jan 2013 - 7:53 pm | अग्निकोल्हा

अजुन पाहीला नाही पण अतिशय सहज सुंदर परीक्षणामुळे काही प्रश्न सहज मनात आले जे बहुदा चित्रपट बघुनही तसेच रहावेत.

हा चित्रपट पसंतीला इतका का उतरतोय ? सुंदर दिग्दर्शन ? मराठीसाठी रोचक व धाडसी विषय ? की काही इतर कारण आहे ? विषय व हाताळणी कशीही असो ह्या चित्रपटामुळे लैगीक साहीत्याचा पौगंडावस्थेतला (व थोडासा आधीचाही ) वाचक वाढण्यात हातभार लागेल काय ?

चाळीतल्या मुलीला आय लव्ह यु बोलण्यापासून ते नेहमी सोबत वावरणार्‍या मैत्रिणीबद्दल आकर्षण निर्माण होणे अशा अनेक चुकीच्या गोष्टी करण्यापर्यंत त्या मुलांची मजल जाते.

नेहमी सोबत वावरणार्‍या मैत्रिणीबद्दल आकर्षण निर्माण होण्यात विषेश गैर काय आहे ? मुलींची कोणत्या चुका करण्यापर्यंत मजल जाते ?

स्वाती दिनेश's picture

16 Jan 2013 - 10:14 pm | स्वाती दिनेश

चित्रपटाचे परीक्षण आवडले, नक्की पहावा असा चित्रपट वाटतो आहे.
स्वाती

छोटा डॉन's picture

22 Jan 2013 - 1:49 pm | छोटा डॉन

गेल्या विकांताला चित्रपट पाहिला.
आवडला की नाही ते सांगता येत नाही, मात्र चित्रपट पाहण्याजोगा आहे हे नक्की. १००% अपेक्ष कशाकडुनच ठेऊ नये ह्या ब्रिदवाक्यानुसार चित्रपटात जे जे शक्य आहे ते योग्य पद्धतीने दाखवले आहे हे आवर्जुन सांगतो.
सगळ्यांची अ‍ॅक्टिंग उत्तम, खासकरुन बच्चेकंपनीने धमाल अ‍ॅक्टिंग केली आहे.
किशोर कदमांचा रोल जरा 'जास्तच' वाटला, कदाचित बेअरिंग फारच झाले असावे असा अंदाज आहे.
बाकी चित्रपट रोचक.

- छोटा डॉन

तू नळीवर सापडला. पाहिला.आवडला.
बाकी डॉन सारखंच.
किसनाचं परिक्षण देखील आवडलं.

पैसा's picture

23 Jan 2013 - 9:22 am | पैसा

किसनाचा हा लेख मला २/३ लोकांनी किसनाचं नाव वगळून फॉरवर्ड केलाय. मी त्यांना लेखाबद्दल सांगितलं. पण नेमके किती प्रमाणात आणि कोण वापरत आहे हे कोणी शोधून काढू शकेल का?

ऋषिकेश's picture

24 Jan 2013 - 10:27 am | ऋषिकेश

हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे.
यावर काहि तांत्रिक उपाय करता येतील का? मलाही अनेकदा मराठी संस्थळांवरचे लेख स्वतःचे म्हणून येतात. त्यांना मुळ लेखकाबद्दल सांगितलं तर प्रतिसाद येतो की "अरे मी तर फक्त मला आलेले इमेल फॉरवर्ड केले", जो पहिल्यांदा चोरी करतो त्याच्यापर्यंत योग्य तो मेसेज गेला पाहिजे.

हे स्थळ मुक्त आहे, इथे होशी लेखक येतात वगैरे सगळं खरं असलं, तरी मुळ लेखकाचा नामोल्लेखही न करता (प्रसंगी लेखनाचे श्रेय स्वतः घेऊन) असे करणे अत्यंत गैर वाटते.

बाकी हा चित्रपट अजून पहाण्याचा योग आलेला नाही. बघु कशी कसे जमतेय ते

विश्वेश's picture

23 Jan 2013 - 9:59 am | विश्वेश

चार पाच लोकांच्या मुलाखती घेऊन ( "तुम्ही लहानपणी काय केलेत? कसे केलेत? कोणाबरोबर केलेत?" ) ते प्रसंग एकत्र जोडून त्यात मसाला घालून दाखवण्याचा प्रयत्न.
ज्यांना नटरंग किवा बालगंधर्व आवडला त्यांना हा नक्की आवडेल ... मनोरंजक प्रसंगातून समाज प्रबोधन होते हे मला जरा पटणे अवघड आहे.

माझ्या ओळखीतील टिनएजर्स ना विचारल्यास त्यांच्या मते पहिला हाफ त्यांनी एन्जोय केला आणि दुसर्या हाफ ला त्यांना झोप आली ...
हा विषय गंभीर आहे आणि तो गंभीरपणे मांडला पाहिजे आणि मुलांनी देखील गंभीरपणे घेतला पाहिजे ... अर्थात यात त्यांच्या आई-बापाची जास्त जबाबदारी आहे.
अमराठी (ज्यांना मराठी बोलता येत नाही, मराठी संस्कृतीशी ज्यांची नाळ जुडली नाही असे) लोकांनी केलेले संगीताचे भजे देखील खूपले

मी कदाचित पुणे ५२ नंतर हा पहिला त्यामुळे नसेल आवडला (पुणे ५२ आपल्याला लई आवडला बुआ !)

मयुरपिंपळे's picture

27 Jan 2013 - 1:50 pm | मयुरपिंपळे

का कळे ना अशी हरवली पाखरे !!! मस्तच