कच्चा माल
"ए जपून रे!"
"काय जपून? अशीच मजा येते!"
"म्हणून काय इतकी तिखट भाषा वापरायची?"
"नाही तर काय? ही काय चारोळी आहे का?"
"ही चारोळी नाहीये... मात्र तू गुंड आहेस हे नक्की!"
"आणि तुम्ही माझे काका"
"पुरे! लेखणी चालवताना जास्त तिखटपणा नको, नाही तर फटके देईन मी व्यनितून!"
"ब्वॉर्र! राह्यलं! पण तुम्ही जरा अजून नवे धागे काढा ना. मस्त सागुती बनवू नव्या मटणाची."
"नक्को... आधीच तू सारखे स्वाक्षरीतून धक्के मारतो आहेस ते काय कळत नाहीयेत का मला?"
"हा हा हा"
"जरा हळू रे... खूप खट्याळपणा वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... प्रस्थापितांबरोबर तरी जपून प्लीज!"
"काही नाही होत हो... माझा कंट्रोल................. आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"बघ तरी तुला सांगत होतो... जपून, जपून."
"होय हो! ओव्हरकॉन्फिडन्समधे गेलो मी."
"आता समजून काय उपयोग! त्या दिवशी तुला समजलं असतं तर आज हे असं रोज याच वेळी याच मिपावर येऊन तुझी वाट बघत बसायची अंतहीन पाळी नसती आली माझ्यावर, टार्या!!!!"
:(
प्रतिक्रिया
13 Sep 2012 - 1:24 am | विकास
=))
13 Sep 2012 - 1:27 am | प्रभो
खतर्नाक :)
13 Sep 2012 - 1:29 am | बॅटमॅन
जुनी स्कॉच कशी खतरनाक होती, हे कळले. :) जय पिडांकाका.
(टीटोटलर परंतु रसास्वादभोक्ता) बॅटमॅन.
14 Sep 2012 - 12:39 pm | इनिगोय
13 Sep 2012 - 1:36 am | Nile
ही पण ष्टोरी वळकीची वाटतीए! फक्त 'अंताचा' भाग सोडून. ;-)
13 Sep 2012 - 3:02 am | गणपा
दुधापेक्षा दुधावरची साय जास्त लज्जतदार. ;)
13 Sep 2012 - 3:59 am | राजेश घासकडवी
विडंबन भारी जमलेलं आहे. टाऱ्या गेल्यापासून मिपा थोडं बदललं हे मान्यच करायला हवं.
(एके काळी सागुतीच काय, खिमा झालेला) व्यर्थेश कळबडवी
13 Sep 2012 - 10:02 am | टिवटिव
अगदि टारझन स्टाईल स्वाक्षरि...:)
13 Sep 2012 - 4:01 am | भडकमकर मास्तर
झकास ...
.. व्यनितून फटके देइन मस्तच.. ;)
13 Sep 2012 - 6:21 am | अत्रुप्त आत्मा
धडाधड
13 Sep 2012 - 7:33 am | ५० फक्त
हे जास्त भावलं - याद ना जाये बिते दिनोंकी.............
13 Sep 2012 - 8:17 am | सहज
सुडंबनच!!!
13 Sep 2012 - 9:00 am | मूकवाचक
=))
13 Sep 2012 - 10:38 am | नंदन
काही जुन्या दंग्यांची आठवण ताजी झाली...
13 Sep 2012 - 12:04 pm | श्रावण मोडक
तरीच हल्ली मला पश्चिम किनाऱ्याकडून सारखे 'दिन गेले भजनाविन सारे...' हे पद सारखं ऐकू येतंय राव. ;-)
त्यात पश्चिम ही मुक्तीची दिशा (असं आमचे बाळासाहेब (मंगेश्शकर) सांगून गेले आहेत). म्हणजे जे ऐकू येतंय ते खरंच असावं. ;-)
13 Sep 2012 - 12:53 pm | नंदन
पश्चिम ही मुक्तीची किंवा उन्मुक्तीची दिशा हे खरंच. पण यात काही आमचा 'वेस्टे'ड इंट्रेष्ट मुदलातच (किंवा इंट्रेष्ट असल्याने मुदलावर) नाही हो :).
13 Sep 2012 - 1:03 pm | श्रावण मोडक
साक्षीदाराचा नेहमीच बळी जात असतो यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. ;-)
13 Sep 2012 - 9:34 pm | रमताराम
हा बाबा माणसांसारखा का बोलत नाही? हे असं अव्यक्तातून व्यक्त होण्याची काय गरज?
13 Sep 2012 - 9:46 pm | Nile
तो माणूस आहे का पण? ;-)
13 Sep 2012 - 10:45 am | अमोल केळकर
:)
13 Sep 2012 - 2:43 pm | कवटी
भयकथा आवडली.
श्रद्धांजली!
13 Sep 2012 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
दंडवत! आणि अक्षरशः शेवटच्या शब्दापर्यंत सहमत! ;)
***
टार्याचा संदर्भ असल्यामुळे रडारड हे नाव शोभत नाही हां... तोडातोड (दात, हाडे इ.) किंवा फोडाफोड असं काही तरी नाव पाहिजे ब्वॉ! ;)
13 Sep 2012 - 2:59 pm | श्रावण मोडक
पडापड, किंवा धडपड?
13 Sep 2012 - 9:14 pm | पैसा
पिडां स्पेशल!
"उघड्या पुन्हा जाहल्या जखमा उरातल्या" ची आठवण झाली. पण टारबाचा संदर्भ असल्यामुळे रडारड ही टारबाची नाही तर त्याचे टार्गेट ठरलेल्यांची असावी असा संशय आहे!
० कैसा ०
13 Sep 2012 - 9:28 pm | Nile
चुकलं, चुकलं, संपादिकाबाई. (संपादकांचं नेहमीच कसं चुकतं, हीच तर (आमची रडा)रड आहे!) ;-)
पळा....
13 Sep 2012 - 9:34 pm | शिल्पा ब
अवडुंबर.
13 Sep 2012 - 9:43 pm | सोत्रि
पिडाकाका,
जबरदस्त! दंडवत स्विकारा! _/\_
- ( मिपावर येऊन वाट बघत बसणारा) सोकाजी
14 Sep 2012 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार
पिडांकाका पेश्शल 'उतारा'.
एकदम आवडेश आणि पटेश देखील.
14 Sep 2012 - 2:07 pm | झकासराव
मला वाटलं हे कवितेच विडंबन आहे म्हणुन वाचलच नाही आतापर्यंत. (म्हणल काकाश्री अचानक कविता??)
भारी लिहिलय. :)