फीस्ट (ऊर्फ फेसबुकचे इनोदी स्टेटस)

Primary tabs

रमताराम's picture
रमताराम in कलादालन
19 Jul 2012 - 10:49 am

आजच चेपुवर एका ग्रुपमधे एका सदस्याने अत्रंगी फेसबुककरांच्या लीलांचा विषय काढला. त्याने (त्याची परवानगी न विचारल्याने नाव देत नाही, पण स्टेटस हा 'ओपन टू आल' मामला असल्याने इथे पेस्टायला हरकत नसावी.) त्याने एका फेक नावाने आलेल्या दीडशहाण्याच्या स्टेटस नोटस ची यादी दिलेली ती अशी.
_______________
त्यांची सर्व 'भाशा'वैशिष्ट्यासह साधारण सूची येणेप्रमाणे:

१)(भारतीय प्रमाणवेळ ७.२०) : Hy, frends........haw r yoo? gud mornig..

२) (भारतीय प्रमाणवेळ : ८.१०) oopeeth khayla yaa@Kurundwad

3)(भा.प्र.वे. ११.००) chyayla, raaw kantalaa ala raao..yetaaw kaa nadiwar dumbuya?

4)(भा.प्र.वे. 2.00) (हे वाचून तर मी हसून वेडा झालो) hi mitr-mitrinino..dupaar jhali..yaa jhopaylaa..! :D

5)(भा.प्र.वे. 4.00) @ ghhadge andi depo for bying eg.........................

6) (भा.प्र.वे. 8.00) gud nayiet frend..udya bhetu..!

ह्या पोस्ट्सखाली कुठल्यातरी फेक प्रोफाइल असलेल्या अनुष्का शर्माचे चित्र असलेल्या कोण्या (आपण तिला तात्पुरते 'कत्रिना' म्हणू ) ललनेचा एक लाईक असतो आणि त्याखाली..Thanks Katrina.u look butiful अशी ही एक प्रोफाईलधारकाची कॉमेंट असते..!
________________________

दुसर्‍या एकाने हैट्ट स्टेटस टाकले म्हणे (खरे खोटे तो झुकरबर्ग जाणे) ते असे ....'सुहाग रात है, घुंघट उठा रहा हूं मैं'..... हसू नका, अजिबात हसू नका.... हे अजून खरे असो वा नसो, नजीकच्या भविष्यकाळात वाचायला मिळेल याबद्दल मला तरी खात्री आहे.

चला आता तुम्ही वाचलेले खरे/खोटे फेसबुक स्टेटस सांगा बघू. अट एकच ह.ह.पु.वा झाली पाहिजे.

ता.क.: असले स्टेटस टाकणे ही एक न-कला आहे असे आम्ही मानतो म्हणून हा धागा कलादालन सदरात आहे.

नृत्यउखाणेसंस्कृतीबालकथाबालगीतविनोदव्युत्पत्तीमौजमजा

प्रतिक्रिया

कालिंग इंटरणेट स्नेही...

काय बिका, पैसा तै :D ????

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jul 2012 - 7:16 pm | बिपिन कार्यकर्ते

एकदम चोक्कस स्पांडेशदादा! मात्र मी फक्त पाणी प्यायच्या सुट्टीतच स्टेटस अपडेट करतो. बरोबर ना परादादा? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jul 2012 - 7:21 pm | परिकथेतील राजकुमार

फक्त पाणी प्यायच्या सुट्टीतच

पाणी प्यायची आणि शू करायची सुट्टी हो.

पैसा's picture

19 Jul 2012 - 7:19 pm | पैसा

मेला रस्त्यावर गाडी चालवतोय हे पण अपडेट करतो!

ज्ञानेश...'s picture

19 Jul 2012 - 11:57 am | ज्ञानेश...

Tushar Patil posted to स्वच्छंद Only group members can see this post

हसता हसता ड़ोळे अलगद येतील भरुन ,बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन,कावरं-बावरं होण्यासारख काही नाही ,कुणीतरी आठवणं काढतय बाकी काहीनाही . रस्त्यामध्ये दिसतात किती चेहरे येता जाता,"एका" सारखेच दिसु लागतील सहज बघता बघता ,अवतीभवती सगळीकडे तोच माणुस दिसेल ,स्रष्टीमध्ये दोनच जीव ... आणखी कोणी नसेल ,भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुलकाही नाही ,कुणीतरी आठवण काढतय बाकी काही नाही

----------------------------------------

Roshni Kamble
Me tr nahi

Tushar Patil
tu athava kadhashi ashi chotisi asha pan nahi. :'(

Roshni Kamble
Theou pan nakos

Tushar Patil
nay thevna bagh mazya nantar tula mazi kami basel

मी_आहे_ना's picture

19 Jul 2012 - 1:55 pm | मी_आहे_ना

(नावं देत नाही) माझ्या एका 'मोरे' आडनावाच्या मित्रानी मागच्या वर्षी गणेश्-उत्सवाच्या काळात -
--- मोरे : "मोरया"
कॉमेंट्स -
--- पाटील - अहो मोरे या आधी प्रसादाला, नंतर त्यांना बोलवा.

अन्या दातार's picture

19 Jul 2012 - 3:14 pm | अन्या दातार

लोक कायपन स्टेटस अपडेट करुन राहतात राव!

नाना चेंगट's picture

19 Jul 2012 - 3:16 pm | नाना चेंगट

अपेक्षाभंग.

रमताराम नाव वाचून मोठ्या अपेक्षेने धागा उघडला.

असो, बदलीन.

रमताराम's picture

19 Jul 2012 - 8:28 pm | रमताराम

आम्ही जातीचे मूर्तीभंजक. आता आमचीच मूर्ती घडवताय म्हटलं तर फोडायला आमचाच घाव पहिला नको? :)

नाना चेंगट's picture

20 Jul 2012 - 2:19 pm | नाना चेंगट

आमचा मान हिरावून घेऊ नका ! ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jul 2012 - 7:15 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! या धाग्याकडून खूप अपेक्षा आहेत. :)

पैसा's picture

19 Jul 2012 - 7:24 pm | पैसा

Gud nun . . & advn Gud evng my al swt frnz . . . . . .

चिगो's picture

20 Jul 2012 - 1:15 pm | चिगो

"Men like back-bitching. They call it Discussion.."
- China May Singpo in 'Men are from Bars..."