आदरणीय पंचायत समिती,
सदर लेख हा केवळ माझ्या कल्पनेतला आणि स्वप्नरंजनातला आहे. कुणाही जिवंत वा मृत व्यक्तिशी अथवा संकेतस्थळाशी याचा संबंध नाही आणि तसे कुणाला आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा असे मी जाहीर करतो. त्याचप्रमाणे या लेखात काही कॉमन कोकणी शिव्या आहेत, त्याही पंचायत समितीची हरकत नसल्यास या लेखात राहू द्याव्यात अशी माझी आग्रहवजा विनम्र मागणी आहे! त्या शिव्यांशिवाय या लेखाला साहित्यिक वगैरे मूल्य प्राप्त होणार नाही असे लेखक म्हणून माझे मत आहे!
कळावे,
आपला,
(मिसळपावचा एक सामान्य सदस्य!) तात्या अभ्यंकर.
=============================================
बरं का मंडळी,
तर अखेरीस एकदा दिवाळीच्या सुमुहूर्तावर नमोगताचा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला! हां हां, अहो असा गोंधळ नका घालू. मी नमोगत म्हटलंय, मनोगत नव्हे! :)
अहो मनोगताबद्दल काही बोलायची आपली साली लायकीच नाही. आपण पडलो साला एक नंबरचा भिकारचोट माणूस! :)
'नमोगत' हे माझ्या कल्पनेतलं एक संकेतस्थळ. तिथे मीही काही काळ लेखन वगैरे करत असे. (हेही माझ्या कल्पनेतलंच बरं का! किंबहुना, आता येथून पुढे मी जे जे काही लिहिणार आहे ते सगळं माझ्या कल्पनेतलंच आहे असं आपण समजा! :)
तर मीही काही काळ नमोगतावर लेखन वगैरे करत असे. सगळं कसं छान छान, गुडी गुडी, परिटघडीचं, सोवळ्याचं, व्याकरण-शुद्धलेखनाचं, ओव्यांचं (नुसत्याच ओव्यांचं बरं का, शिव्यांचं नव्हे!:) असं सगळं तिथे छान छान ब्राह्मणी, सुसंस्कृत, सुसंस्कारी, सुशिक्षित असं सुवातावरण! तिथे मी काही काळ रमलो, नक्कीच रमलो. पण नंतर माझा जीव उबू लागला. माझी आदळआपट, माझे अहंकार, माझ्या शिव्या तिथे चालेनाश्या झाल्या. तेथील करडी शिस्त मला पचेनाशी झाली आणि तिकडनं मी काढता पाय घेतला. म्हणजे कुल्याला पाय लावून पळतच सुटलो म्हणा ना! :) आणि मी स्वतःहून तिथून निघून गेलो नसतो तरी एक ना एक दिवस आमच्या शक्तिवेलूने नक्कीच लाथ मारून मला हाकललं असतं! :) (हा शक्तिवेलू म्हणजे नमोगताचा मालक बरं का रांडेचा! :)
तर काय सांगत होतो? हां, तर अखेरीस एकदा दिवाळीच्या सुमुहूर्तावर नमोगताचा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला!
अंक मात्र खरोखरंच छान आहे हो! अहो मराठी आंतरजालावरची थोर थोर साहित्यिक वगैरे असलेली मंडळी तिथे संपादक म्हणून कामाला असताना उत्तम दिवाळी अंक न निघता तरच नवल होतं! नर्मविनोदी शैलीत लिहिणारी मनु नाडकर्णी, ज्ञानपीठ पुरस्कार मिळता मिळता राहिलेले आणि स्वतःला साहित्याची वगैरे उत्तम जाण आहे असं स्वत:च स्वत:बद्दल म्हणणारे जीएप्रेमी असणारे आमचे ऐहिक राव, ही गद्यविभागातली थोर थोर मंडळी तसेच चांदीमयी, फिट्टरंजन, मिलिंद कणसे, हे पद्यविभागातले धुरंधर राजकारणी अशी एकापेक्षा एक बहाद्दर मंडळी रोज 'एक कप चाय अन वीस रुपये रोजी' च्या बोलीवर शक्तिवेलूने संपादक म्हणून नेमली होती. बाकी शक्तिवेलूने यावेळी दिवाळीअंकावर बराच खर्च केलेला दिसतोय हो! न करायला काय झालंय म्हणा, गेली अनेक वर्ष शिंच्याने अमेरिकेत अगदी बक्कळ पैका कमावला आहे! :)
आर्य आशिषभट्टाने मात्र नक्की कुणाच्या वशिल्याने संपादक मंडळात आपला नंबर लावलान कुणास ठाऊक?! बहुधा राजकीय विषयाचे काही लेख आल्यास त्यांचे संपादन करायला या आर्य आशिषभट्टाला शक्तिवेलूने रोज 'एक कप चाय आणि शिग्रेट' च्या बोलीवर नेमलं असावं! :) हा आर्य आशिषभट्ट बाकी राजकारण खलबत्त्यात घोटून घोटून पक्का राजकीय कंपाऊंडर झाला आहे! :)
बाकी घासूनाना, निष्प्रभावित, अश्विन मोडक, विदुला गोरे या मंडळींना शक्तिवेलूने नक्की कोणत्या निकषांवर संपादक मंडळात घेतलंन हे त्या शक्तिलाच माहीत! ही मंडळी कितपत साहित्यिक आहेत याची मला माहिती नाही. नाही म्हणायला त्यातली विदुला गोरे ही माझी अगदी चांगली मैत्रिण. स्वभावाने अगदी साधीभोळी आणि सरळ. ही बया या संपादकीय माफियांच्या टोळीत कशी काय सापडली कुणास ठाऊक! :)
पण एक मात्र आहे, की इतके दिवस नमोगताचा संपादकीय कारभार स्वत:ला सोकॉल्ड सुशिक्षित, पांढरपेशा समजणारा एक कुणीतरी अत्यंत माजुरडा इसम करत असे. पण आमच्या मिसळपावने पंचायत समितीवरील मंडळींची नांवे जाहीर केल्यामुळे निदान दिवाळीअंकाच्या संपादक मंडळींची नांवे तरी जाहीर करावीत, असे नमोगताला वाटले असावे! निदान एवढा धडा तरी नमोगताने मिसळपावकडून घेतला ही भाग्याची गोष्ट म्हणायला हवी! :) नाहीतर दिवाळी अंकाचे संपादनही 'प्रशासक' नावाच्या इसमाने एकट्यानेच केले असते! शिवाय त्या निमित्ताने सदर संपादक मंडळी आता निदान काही दिवस तरी 'संपादक' 'संपादक' म्हणून मिरवतील ही देखील आनंदाचीच गोष्ट आहे! :)
तर ते असो..!
तर असा हा बरेच दिवस गाजत असलेला नमोगताचा दिवाळी अंक एकदाचा प्रसिद्ध झाला. लोकांचे त्याला प्रतिसाद यायला सुरवात झाली. त्यात आमच्या मिसळपावच्या रुपालीनेही प्रतिसाद टाकलाय, अंकात एक पाककृतीही टाकली आहे बरं का! :)
सुमार जावडेकराचाही प्रतिसाद आला आहे. अनन्ता५२ ची कविता आवडली म्हणाला! बाकी सुमार जावडेकर, सर्वकाशी, दिवाकर पेठकर, अनन्ता५२, मथुरानाथ जलंत्री ही मंडळी म्हणजे शक्तिवेलूचे खास पित्ते बरं का! :) नाही म्हणायला भागम्भा, विवेकानंद गोळे ही मंडळी इतर संकेतस्थळांवर फिरताना दिसतात! :)
मथुरानाथ जलंत्री शिंचा मारे 'मराठी..' 'मराठी..' असं ओरडत गाव फिरत असतो म्हणून त्या फोकलिच्याला म्हटलं की तूही मिसळपाव ज्वाईंड कर, तर ते मात्र अजून त्या मराठी भाषेचा बुरखा पांघरलेल्याला जमलेलं नाही! तात्या अभ्यंकराचं संकेतस्थळ ना, मग नकोच बाबा ती कटकट आणि त्या शिव्या! त्यातून मथुरानाथ पडला शक्तिवेलूचा पित्त्या आणि हा तात्या तर भोसडीचा उठसूठ त्या शक्तिवेलूला शिव्या देत असतो! त्यापेक्षा नकोच ना ती तिखट, झणझणीत, शिवराळ मिसळ असं म्हणून मथुरानाथ नमोगताच्याच मऊभातात रमला आहे! :))
तर ते असो..
दिवाळीअंकाला प्रतिसाद येऊ लागले. छान छान, गुडी गुडी प्रतिसाद येऊ लागले.
स्वरदाचाही प्रतिसाद आला आहे. तिला तो देणं भागच आहे कारण ऋणनिर्देशमध्ये नमोगताने तिच्याबद्दल कसलंतरी ऋण व्यक्त केलं आहे! :) च्यामारी, पण मला एक समजत नाही ते असं की ऋणनिर्देशच्या यादीमध्ये आमच्या नित्त्यानंद काकांचं नांव कसं काय? नित्त्यानंद काकांनी नमोगत दिवाळी अंकावर नक्की कुठले उपकार केले ते समजलं नाही! साले हे संपादक मंडळवाले एकिकडे त्यांचा लेख नाकारतात आणि एकिकडे त्यांचं ऋणही व्यक्त करतात हा काय डब्बलगेम आहे कुणास ठाऊक! :)
तर ते असो..!
दिवाळीअंकाला प्रतिसाद येऊ लागले. छान छान, गुडी गुडी प्रतिसाद येऊ लागले.
आणि आणि आणि......शेवटी घडू नये तेच घडले! अरे हो हो, सांगतो सांगतो मंडळी! असे अधीर होऊ नका! :)
शेवटी पोष्ट्यागजाननाचा मोष्ट अवेटेड असा प्रतिसाद आला! ह्या पोष्ट्यागजाननाने म्हणे नमोगतावर संपूर्ण दासबोध उतरवून काढण्याचे काम केले आहे. गज्याची बायको गृहिणी, हीदेखील नमोगताची जुनी सदस्या. नमोगतावर इतर कुणी पाककृती लिहिलेल्या तिला सहन होत नाहीत! :)
ते काहीही असो, बाकी आमचा पोष्ट्यागजानन म्हणजे पक्का कावळा हो! हा एरवी कधी फारसा लिहीत नाही पण मधुनच मेंबर लोकांच्या पिंडांना चोची मारण्याचं काम हा अगदी चोख करतो! यावेळी मात्र पोष्ट्यागजाननाने मात्र कमालच केलीन! त्याने साक्षात संपादक मंडळालाच चोच मारली आहे! :)
'नाकारलेले गेलेले साहित्य वाचण्याची उत्सुकता आहे. अशा सर्वांनी इथे प्रसिद्ध करावे ही विनंती. नमोगतावर लेखनाला संपादकीय आडकाठी नसताना दिवाळी अंकाला असावी हे खटकले.
पर्दा नहीं जब कोई खुदासे बंदोंसे पर्दा करना क्या?'
अशी काडी टाकून पोष्ट्यागजानन मोकळा झाला! :)) पोष्ट्यागजाननचे हिंदी चित्रपट संगीतातील ज्ञान पाहता 'पर्दा नहीं जब कोई खुदासे बंदोंसे पर्दा करना क्या?' या टाईपची छप्पन्न गाणी टाकणे त्याला अवघड नाही! :)
दिवाळी नमोगताच्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळता मिळता राहिलेल्या धुरंधर संपादक मंडळाने म्हणे स्वतःच्या अक्कलेने काही लेखन नाकारले होते ते आता इथे प्रसिद्ध करावे असा आता पोष्ट्यागजाने आग्रह धरला आहे! मेले तिच्यायला आता संपादक मंडळवाले!:))
तरी मी वाटच बघत होतो की अजून पोष्ट्यागजाननाचा कसा काय प्रतिसाद आला नाही! :) तेवढ्यात अगदी बरोब्बर प्रतिसादांच्या अगदी ऐन मध्यावर या आमच्या कावळ्याने चोच मारली आहे :))
ते पाहून सुरवातीला छान छान, गुडी गुडी प्रतिसाद देणारी पोष्ट्यागजननाची बायडी गृहिणी हिने सुद्धा आपला पूर्वपवित्रा बदलला आणि संपादक मंडळाला धारेवर धरले. 'कुणाच्या तरी चकल्या की बाकरवड्या यापूर्वीच छापून आल्या आहेत त्या पुन्हा येथे कशा आल्या' असा सवाल गृहिणीने केला आहे. त्याचप्रमाणे चांदीमयीची एक पूर्वप्रसारित मुलाखतही इथे कशी प्रसिद्ध झाली असाही एक सवाल गृहिणीने विचारून आमच्या धुरंधर संपादक मंडळाची साफ गोची करून टाकली आहे! :))
पोष्ट्यागजाननाने आणि गृहिणीने घेतलेला पुढाकार पाहून आमच्या नित्त्यानंदकाकांनाही थोडसं बळ मिळालं आणि त्यांनीही संपादक मंडळाला एक लहानशी कानपिचकी दिली आहे. अर्थात संपादक मंडळाच्या जुजबी उत्तरापुढे आमच्या नित्त्यानंदकाकांनी पुन्हा एकदा मान टाकली आणि 'संपादक मंडळाने केलेल्या खुलाशाने माझे समाधान झाले आहे तेव्हा मी माझा आक्षेप मागे घेत आहे' असं लिहून नित्त्यानंदकाकांनी त्यातून माघार घेतली आहे! 'फुक्कट साला ऐहिक राव, आर्य आशिषभट्ट वगैरे लोकांशी कोण भिडणार?' असा साधा विचार त्यांनी केला असावा! :))
आमचा गजानुकर्ण बाकी मोठ्या मनाचा हो! त्याचा बिचार्याचा एक लेख दिवाळी नमोगताने नाकारला असतानासुद्धा त्याने बिचार्याने अगदी निष्ठेने संपादक मंडळाचीच वकिली केली आहे! मला गजानुकर्णाचा हा गूण घेतला पाहिजे. मी त्याच्या जागी असतो आणि माझं साहित्य नाकारलं गेलं असतं तर मी बराच तमाशा आणि शिवीगाळ केली असती! अर्थात, जिथे संपादन वगैरे आहे तिथे झक मारायला मी माझं साहित्य पाठवलंच नसतं हा भाग वेगळा!! :)
तर ते असो...
हे सगळं होतंय तोपर्यंत पोष्ट्यागजाननाने चांदीमयीच्या पूर्वप्रसारित मुलाखती संदर्भात,
"ईप्रसारण वर आले म्हणजे प्रसिद्ध झाले असे नाही का? दोन माध्यमे वगैरे पळवाटा आहेत. दुसरी कारणे शोधा. आम्ही संपादक आहोत, आमच्या मर्जीला येईल ते करू कोणी आम्हाला स्पष्टीकरण विचारू नये असे एकदाच जाहीर करा म्हणजे प्रश्न मिटला.
आमच्या मर्जीला येईल ते करू कोणी आम्हाला स्पष्टीकरण विचारू नये असे एकदाच जाहीर करा म्हणजे प्रश्न मिटला.
हा दुसरा बॉम्ब टाकला!
You said it... ! जियो पोष्ट्यागजानन, जियो....:)
संपादक मंडळ नेमा नाहीतर आणखी काही करा, शेवटी नमोगताच्या रक्तातली पिढीजात हुकूमशाही अजून गेलेली नाही म्हणायची!! :)
असो, तर मंडळी, अशी सगळी मजा! या आपल्या तात्या अभ्यंकराच्या देवगडातील पारावरच्या गजाली आहेत असं समजा! आमच्या कोकणात पारावर बसून अश्याच फुक्कटच्या दुसर्याच्या घरात डोकावत गजाली करण्याची पद्धत आहे! तेव्हा वाचा आणि सोडून द्या....:)
बाकी नमोगताचा दिवाळीअंक खरोखरंच देखणा आणि सुरेख झाला आहे यात काहीच वाद नाही. आणि एक माजी नमोगती म्हणून मला त्याबद्दल अभिमानच वाटतो!
चिअर्स....!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
10 Nov 2007 - 5:21 pm | राजीव अनंत भिडे
चिअर्स तात्या! -;)
तुफनी लिहिले आहेस. बाकी संपादक मंडळाची माफिया टोळी जबराच!
भागम्भा, शक्तिवेलू, पोष्ट्यागजानन, मथुरानाथ जलंत्री ही नावे खासच ठेवली आहेस. देवगडाच्या पारावर बसून तुझ्या गजाली प्रत्यक्षच ऐकतो आहे असे वाटले.
राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.
10 Nov 2007 - 6:08 pm | विकेड बनी
हसून झालं की काहीतरी लिहिन म्हणतो.
हीहीहीही
हीहीही!!!!
11 Nov 2007 - 1:16 am | विसोबा खेचर
ताज्या बातमीनुसार शंकरपाळेच्या ब्लॉगावरील पाककृती आणि चांदीमयीची पूर्वप्रसारित मुलाखत या बाबतीत आता गृहिणीने संपादक मंडळाला मस्तपैकी शालजोडीतला हाणला आहे! :) अजूनही पोष्ट्यागजानन आणि गृहिणी संपादक मंडळावर रुसलेले आहेत! आता गृहिणीचं असं म्हणणं आहे की तिने ज्या पाककृती दिवाळी अंकात छापून आल्या आहेत त्या पूर्वीच शंकरपाळेच्या ब्लॉगावर पाहिलेल्या होत्या पण बहुधा शंकरपाळेने हळूच ते लेखन पूर्वप्रकाशित वाटू नये म्हणून आपल्या ब्लॉगवरून काढून टाकलेले आहे.
गृहिणीने व्यक्त केलेली शक्यता नाकारता येत नाही. कारण शंकरपाळेने आमच्या चित्तपावन याहूसमुहावर दोन तीन दिवसांपूर्वीच तिच्या ब्लॉगाबद्दल लिहिले होते तेव्हा मी तो ब्लॉग पाहिला होता. तेव्हा तिथे गृहिणी म्हणते त्याप्रमाणे बर्याच पाककृती होत्या, परंतु आता त्यातील काही पाककृती नाहीश्या झालेल्या दिसतात! संपादक मंडळाने बहुधा शकरपाळेचे पाय धरले असावेत त्यामुळे त्यांच्यावर दया येऊन बहुधा श़करपाळेने आपल्या ब्लॉगवरील सदर पाककृती काढून टाकलेल्या असाव्या! :))
बाकी पोष्ट्यागजाननाने आणि गृहिणीने संपादक मंडळाला चांगलेच गोत्यात आणले असून सध्या संपा. मंडळातील सदस्य गृहिणीच्या शालजोडीतल्या प्रतिसादावर मूग गिळून बसले आहेत! काय करणार बिचारे ते तरी! झाल्ये खरी त्यांची गोची! :)
आपला,
(छद्मी!) तात्या.
11 Nov 2007 - 9:07 am | अण्णा
क्षमा करा पण हा लेख काही कळला नाही.
आधीचा एक लेखही असाच आहे.
या दोन स्थळांची मारामारी/स्पर्धा आहे का?
11 Nov 2007 - 9:17 am | विसोबा खेचर
क्षमा करा पण हा लेख काही कळला नाही.
चालायचंच! :)
आधीचा एक लेखही असाच आहे.
कुठला बरं? :)
या दोन स्थळांची मारामारी/स्पर्धा आहे का?
छे हो, मारामारी कुठली? अहो मिसळपाव तर अजून बाल्यावस्थेत असलेलं संकेतस्थळ आहे. ते उगाच कुणाशी मारामारी वगैरे करायला लागलं तर केव्हाच धारातीर्थी पडेल... :)
तात्या.
11 Nov 2007 - 9:27 am | अण्णा
संकेतस्थळावरील लेखनाचा, एक फसलेला दिवाळी अंक !!!
हा एका प्राध्यापकांनी लिहिलेला लेख, शीर्षकावरून एकांगी वाटला,.
व नंतर आपले लेखनही असे वाटले.
11 Nov 2007 - 9:43 am | विसोबा खेचर
व नंतर आपले लेखनही असे वाटले.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद! :)
आपण मायबाप वाचक, तेव्हा आपलं मत आमच्याकरता मोलाचं आहे! :)
तात्या.
11 Nov 2007 - 9:44 am | कोलबेर
तात्या,
तुमच्या ऐहिक रावांनीच सुरू केलेला हा साहित्य प्रकार आम्हाला जाम आवडतो. टवाळक्या फक्कड जमल्या आहेत.
पोष्ट्या गजानन, 'एक कप चाय अन वीस रुपये रोजी' , धुरंधर राजकारणी, मथुरानाथ सगळे सहीच ही ही ही!! आर्य आशिषभट्ट हे चक्रम.ऑर्ग च्या संपादक मंडळावर देखिल आहेत असे आमच्या कानावर आले आहे.. तिथलाच एखादा वशिला लावला असावा :-)
-------------------------------------------------------------------------------
मी कोकणी नसल्याने (मला तरी) शिव्या मात्र खटकल्या बुवा.
11 Nov 2007 - 9:52 am | विसोबा खेचर
आर्य आशिषभट्ट हे चक्रम.ऑर्ग च्या संपादक मंडळावर देखिल आहेत असे आमच्या कानावर आले आहे.. तिथलाच एखादा वशिला लावला असावा :-)
हा हा हा, शक्यता आहे! :)
मी कोकणी नसल्याने (मला तरी) शिव्या मात्र खटकल्या बुवा.
चालायचंच! आपण पंचायत समितीवर आहात तेव्हा आपल्याला शिव्या खटकल्या असल्यास आपण त्या काढून टाकू शकता! आम्हाला मात्र सदर लेखात त्या शिव्या आवश्यक वाटतात! पुढे मर्जी आपली...:)
अवांतर - माझा आणि बिरुटेसाहेबांचा लेख आल्यापासून नमोगतावरचा एक कुणीतरी अण्णा इथे घिरट्या घालू लागला आहे. सध्या तो आमच्या निरिक्षणाखाली आहे! :))
तात्या.
11 Nov 2007 - 10:03 am | कोलबेर
आपण पंचायत समितीवर आहात तेव्हा आपल्याला शिव्या खटकल्या असल्यास आपण त्या काढून टाकू शकता!
पंचायती वरील बाकीच्या मंडळींचे मत आजमावुन ते आम्ही ठरवुच! ...पण सध्या तरी जरा तुमच्या बरोबर शेवटच्या बाकड्यावर बसून टवाळक्या करायचा मूड आहे तेव्हा जरा आत सरका :-)
11 Nov 2007 - 12:04 pm | दिनेश५७
आमचा गजानुकर्ण बाकी मोठ्या मनाचा हो! त्याचा बिचार्याचा एक लेख दिवाळी नमोगताने नाकारला असतानासुद्धा त्याने बिचार्याने अगदी निष्ठेने संपादक मंडळाचीच वकिली केली आहे! मला गजानुकर्णाचा हा गूण घेतला पाहिजे. मी त्याच्या जागी असतो आणि माझं साहित्य नाकारलं गेलं असतं तर मी बराच तमाशा आणि शिवीगाळ केली असती! अर्थात, जिथे संपादन वगैरे आहे तिथे झक मारायला मी माझं साहित्य पाठवलंच नसतं हा भाग वेगळा!! :)
... नमोगताचे गजकर्ण खाजवल्यासारखे वाटले... शिव्यांमुळे, तात्या, लेखाला कोकणी मजा यावी, पण तो कोकणी माज मात्र वाटू नये. या प्रतिक्रियेमुळे कदचित `अण्णा'सारखं, मलाही निरीक्षणाखाली ठेवलं गेलं, तर त्या कल्पनेतल्या नमोगतात आणि मिसळपावात फरक कसा राहील?
11 Nov 2007 - 12:26 pm | विसोबा खेचर
... नमोगताचे गजकर्ण खाजवल्यासारखे वाटले... शिव्यांमुळे, तात्या, लेखाला कोकणी मजा यावी, पण तो कोकणी माज मात्र वाटू नये.
प्रत्येकाची बघण्याची दृष्टी वेगळी! मला माझं लेखन कुणी संपादित वगैरे करावं, तपासून पाहावं आणि मगच प्रकाशित करवं असं वाटत नाही! किंबहुना अश्या ठिकाणी मी लेखन पाठवत नाही/पाठवणार नाही! आता हा जर तुम्हाला माज वगैरे वाटत असेल तर त्याला माझा काय बरं इलाज?
या प्रतिक्रियेमुळे कदचित `अण्णा'सारखं, मलाही निरीक्षणाखाली ठेवलं गेलं, तर त्या कल्पनेतल्या नमोगतात आणि मिसळपावात फरक कसा राहील?
गैरसमज होतो आहे. मी नुसतं निरिक्षणाखाली ठेवलं आहे असं म्हटलं आहे, 'संपादकीय किंवा प्रशासकीय अनुमती' खाली ठेवलेलं आहे असं म्हटलेलं नाही! आता निरिक्षण काय हो, कुणीही कुणाचं करू शकतो! सांगायचा मुद्दा असा की आपल्याला किंवा अण्णाला कोणत्याही संपादकीय बंधनात ठेवलेले नाही, याची कृपया नोंद घ्यावी!
बाय द वे, मिसळपाववर 'संपादकीय किंवा प्रशासकीय अनुमती' लावण्याच्या बाबतीत कुणा एका माणसाची मुजोरी चालत नसून त्याबाबतचे संपूर्ण अधिकार पंचायत समितीकडे आहेत हे आपल्याला माहीत आहे काय?
असो! मला वाटतं, नमोगतातला आणि मिसळपावातला फरक वरील खुलाश्यानंतर आपल्या लक्षात आला असावा! :)
तात्या.
11 Nov 2007 - 2:50 pm | प्रमोद देव
बाकी काही म्हण तात्या! अरे मधल्या आळीचे नाव सार्थ केलेस हो! नाव बाकी काय शोधलेस! अगदी मस्त!
मनोगत! अरे अरे माफ कर ! नमोगत! त्याच्या बाबतीत तुझे म्हणजे कसे आहे ? तर "तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना"! अगदी असेच.शिव्या देण्याच्या निमित्ताने का होईना तू दिवसातून जितक्या वेळा हे नाव घेत असशील तितके देवाचे (माझे नव्हे रे)देखील घेत नसशील. खरे तर तात्या तुझा लेख नमोगताच्या दिवाळी अंकात नसल्यामुळे तो थोडासा वजनाला हलका झालाय असे माझे मत आहे. काय आहे की तुझ्यासारख्या महत्वाच्या माणसाला वगळून हा अंक प्रसिद्ध होऊच कसा शकतो? मला तरी हे फारसे पचले नाही.
मनु नाडकर्णी,ऐहिक राव, चांदीमयी, फिट्टरंजन, मिलिंद कणसे,सुमार जावडेकर, सर्वकाशी, दिवाकर पेठकर, अनन्ता५२, मथुरानाथ जलंत्री, आर्य आशिषभट्ट, घासूनाना, निष्प्रभावित, अश्विन मोडक, विदुला गोरे, नित्त्यानंद, पोष्ट्यागजानन वगैरे नावे बाकी झकास आहेत.
पण मला एक समजत नाही ते असं की ऋणनिर्देशच्या यादीमध्ये आमच्या नित्त्यानंद काकांचं नांव कसं काय? नित्त्यानंद काकांनी नमोगत दिवाळी अंकावर नक्की कुठले उपकार केले ते समजलं नाही!
ते आमचं शीक्रेट आहे बरं का!
साले हे संपादक मंडळवाले एकिकडे त्यांचा लेख नाकारतात आणि एकिकडे त्यांचं ऋणही व्यक्त करतात हा काय डब्बलगेम आहे कुणास ठाऊक! :)
पण लेख नाकारला त्याला काही कारण मात्र जरूर आहे. दिवाळी अंकासाठी आलेले लेखन इतके भरभरून आले होते की त्यातून सर्वोत्तम निवडताना संपादकमंडळाला नक्कीच खूप त्रास झाला असणार हे नक्की. त्यातून दिवाळी अंकासाठी लिहायचे म्हणून सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन लिहिलेले असणार. इतक्या सगळ्या कसलेल्या लेखकांमध्ये माझी वर्णी लागली असती तरच मला आश्चर्य वाटले असते. त्यामुळे वर्णी लागली नाही म्हणून त्याचे विशेष असे काही वाटले नाही. अर्थात वर्णी लागली असती तर मात्र लॉटरी लागल्याचा आनंद मात्र झाला असता. पण हरकत नाही. पुढच्या वेळी अजून जोमाने प्रयत्न करेन.
नव्याने बारसे झालेला
नित्यानंद
12 Nov 2007 - 9:43 am | विसोबा खेचर
खरे तर तात्या तुझा लेख नमोगताच्या दिवाळी अंकात नसल्यामुळे तो थोडासा वजनाला हलका झालाय असे माझे मत आहे. काय आहे की तुझ्यासारख्या महत्वाच्या माणसाला वगळून हा अंक प्रसिद्ध होऊच कसा शकतो? मला तरी हे फारसे पचले नाही.
छे हो प्रमोदकाका, काहीतरीच काय! उच्च दर्ज्याच्या लेखनाची अपेक्षा असणार्या संपादक मंडळाने माझे मोडकेतोडके लेखन नक्कीच नाकारले असते! :)
की त्यातून सर्वोत्तम निवडताना संपादकमंडळाला नक्कीच खूप त्रास झाला असणार हे नक्की.
असं असं! प्रमोदकाका, तुम्ही फारच बॉ समजूतदार आहात...
पण हरकत नाही. पुढच्या वेळी अजून जोमाने प्रयत्न करेन.
बेष्ट ऑफ लक..:)
आपला,
(संपादित) तात्या.
12 Nov 2007 - 9:47 am | विसोबा खेचर
प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनापासून आभार...:)
तात्या.
21 Oct 2011 - 1:51 am | आशु जोग
विसोबा खेचर यांचा हा खूप पूर्वीचा लेख आणि
आमचा मित्र परिकथेतील राजकुमार याचा अलिकडचा 'एक होता विदूषक' हा लेख
यांच्यामधे विलक्षण साम्य आढळले
'एक होता विदूषक'
http://www.misalpav.com/node/15639
खरं म्हणजे तात्या अभ्यंकरांना तसा मेसेज पाठवणार होतो
पण व्यक्तीगत मेसेजचेही भांडवल करणारे लोक इथे आहेत
http://www.misalpav.com/node/286
म्हणून इथे खुलेपणाने लिहितो आहे
बाकी तात्यांनी ज्या लोकांची नावे घेतली आहेत ती नावे वाचून
उगाच 'पदरी पडलं आणि पवित्र झालं' ही म्हण आठवली
कृपया इतक्या जुन्या धाग्याला प्रतिसाद का दिला याच मुद्द्याला कुणी लोंबकाळत बसू नये
या धाग्यातील भावना आजही मला ताज्या वाटतात.
डायरेक्ट तात्यांनी लिहिले तर आवडेल
इतरांनी तात्यांची भाटगिरी करू नये. त्यांनाही ते आवडत नसावे.
(मंगलाताईंच्या झुळूक मधील 'स्वामी भोपटकर' ही कथा राहून राहून आठवू लागली आहे)
21 Oct 2011 - 1:58 pm | श्रावण मोडक
असा अधुनमधून इतिहासाचा धांडोळा घेत चलाच. त्यानिमित्ताने मुखवटे आणि चेहरे समोर येत राहतात. ;)
21 Oct 2011 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> या धाग्यातील भावना आजही मला ताज्या वाटतात.
आज चार वर्षानंतरही सदरील लेख खूप ताजा वाटतो.
सालं तात्या लिहितो लै भारी. :)
-दिलीप बिरुटे
(तात्याच्या लेखनाचा फ्यान)
21 Oct 2011 - 9:52 am | पाषाणभेद
>>> या धाग्यातील भावना आजही मला ताज्या वाटतात.
समयोचीत लेख असेही म्हणायचे आहे काय?
21 Oct 2011 - 5:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>आमच्या कोकणात पारावर बसून अश्याच फुक्कटच्या दुसर्याच्या घरात डोकावत गजाली करण्याची पद्धत आहे!
कोकण आणि कोकणी माणसाची प्रगती का नाही झाली ते थोडे थोडे समजते आहे ;-)