जन्नत २

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
7 May 2012 - 12:42 pm


इम्रान हाश्मीचे चित्रपट चालण्याचे कारण गमतीने 'ASS' (Action, Songs, Sex) असे आम्ही कायम म्हणत आलेलो आहोत. नुकताच आलेला त्याचा जन्नत २ देखील ह्या सगळ्या अपेक्षांना पुरून उरतो. कुणाल देशमुखचे दिग्दर्शन आणि भट गँगचे प्रॉडक्शन हा चित्रपट घेऊन आले आहे.
नेहमीप्रमाणेच हा चित्रपट mechanic ह्या चित्रपटावर थोडाफार बेतलेला आहे. अर्थात भट गँगची ती खासियतच आहे म्हणा. 'ब्लडमनी' चा धसका घेऊन देखील ह्या चित्रपटाला हजेरी लावली, मात्र चक्क चक्क ह्यावेळी बराच टाईमपास झाला हे मान्य करावे लागेल. अर्थात चित्रपटाला जाण्याआधी आपली मिनिटा मिनिटाला 'भेणचोद' सारखी सतत वापरली जाणारी शिवी आणि 'चुत्तड पे लाथ' सारखे डायलॉग ऐकण्याची मानसिक तयारी आहे का ह्याचा विचार करून मगच पुढे पाऊल टाकावे.

सोनू दिल्ली अर्थात इम्रान हाश्मी हा एक अनधिकृत आर्म डिलिंग रॅकेट मधला छोटासा मोहरा असतो. सोनू के के सी (कुत्ती कमिनी चीज) ह्याच नावाने तो सगळीकडे ओळखला जात असतो, आणि अर्थात त्या नावाला जागणारे जीवन देखील जगत असतो. रिव्हॉल्वर, देशी कट्टे विकत आपली गुजराण तो करत असतानाच अचानक त्याच्या आयुष्यात दाखल होतो ए. सी. पी. प्रताप रघुवंशी (रणदीप हूडा). ह्या प्रतापची बायको प्रवासात दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ठार झालेली असते आणि त्याच हल्ल्यात ह्या प्रतापच्या डोक्यात शिरलेली गोळी अजूनही तिथेच अडकलेली असते म्हणे. अर्थातच 'बदले की आग' ह्या न्यायाने प्रताप ह्या अनधिकृत आर्म रॅकेटसची पाळेमुळे खणून काढण्याची जिद्दीने झपाटलेला असतो.

सोनू दिल्लीला कधी धमकावून, कधी तुरुंगात पाठवून तो त्याचे जिणे हराम करून सोडतो. शेवटी हे सगळे असह्य झालेला सोनू त्याच्याशी हातमिळवणी करतो आणि पोलिसांचा खबर्‍या बनतो. पहिल्याच खबरीच्या वेळी काहीतरी घोळ होतो आणि दुसरेच पोलीस तिथे उपटतात. पळून जाण्याच्या प्रयत्नात सोनूचा डीलर मारला जातो आणि सोनूची रवानगी तुरुंगात होते. ह्या मधल्या काळात सोनू साहेब जान्हवी (इशा गुप्ता) नावच्या डॉक्टरणीच्या प्रेमात पडतात आणि एक वेगळाच ट्रॅक सुरू होतो.

आता प्रताप सोनू दिल्लीला जान्हवीला सगळे सांगण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायला लागतो आणि वरच्या लेव्हलला अर्थात सिंडिकेटमध्ये काम करून ह्या रॅकेटच्या मुख्य कर्त्याधर्त्यापर्यंत पोचवण्याची अट घालतो. जान्हवीला सोनूचे सत्य माहिती नसल्याने आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडल्यावरती एक साधे जीवन जगण्याचे आमिष मिळाल्याने सोनू देखील ह्याला तयार होतो. एका सिंडिकेटच्या पार्टीत सोनू आपले गन्स मधले ज्ञान दाखवून मुख्य बॉसच्या खास माणसाला खूश करतो आणि त्याचा सिंडिकेट मध्ये प्रवेश होतो. आता खबरी आणि सिंडिकेट मधला माणूस अशा सोनूच्या दुहेरी आयुष्याला सुरुवात होते.

सोनूच्या आयुष्यात लग्न करून जान्हवीचा प्रवेश होतो आणि पुन्हा एकदा सोनूचे आयुष्य वेगळे वळण घेते. जान्हवीचा बाप मंगलसींग तोमर (मनीष चौधरी) हाच ह्या रॅकेटचा मुख्य असतो आणि आता सोनू वेगळ्याच कचाट्यात सापडतो. इकडे जान्हवीचा बाप सोनू मधले गुण ओळखून त्याला आपला वारस नेमतो आणि एक नवाच खेळ सुरू होतो. सिंडिकेट मधल्या खबरी कोणीतरी बाहेर फोडतो आहे हे एव्हाने सगळ्यांच्या लक्षात आलेले असते आणि संशयाची सुई सतत सोनूकडेच वळत असते, आणि त्यातच पोलिसांच्या खबरी सिंडिकेटला पुरवणारा देखील कोणीतरी आहे हे सोनुला समजते. ह्या सगळ्याला कंटाळून सोनू आता डबलगेम खेळण्याचा निर्णय घेतो. पैसे जमा करायचे आणि सरळ जान्हवीला घेऊन देशाबाहेर पळून जायचे तो ठरवतो. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच असते. ते नक्की काय असते, सोनू पळून जाण्यात यशस्वी होतो का, प्रताप नक्की काय खेळ खेळत असतो हे सगळे समजून घ्यायचे असेल तर जन्नत २ ला हजेरी लावणे गरजेचे आहे.

भट गॅंगचा चित्रपट म्हणजे डायरेक्शन, लोकेशन्स अशा चर्चा करण्यात काही अर्थच नसतो. कथेचा प्लॉट व्यवस्थित 'उचलला' आहे का नाही, आणि संगीत कितपत बरे आहे येवढेच लक्ष द्यायचे. 'प्लॉट' उचलला देखील छान गेला आहे आणि संगीत देखील सुसह्य आहे. 'तू ही मेरा खुदा.. ' सारखी गाणी गाजत असल्याने त्याचा देखील फायदा चित्रपटाला मिळतोच आहे. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर अशा टिपीकल भूमिकांचा आता सरावच झालेला असल्याने इम्रान हाश्मी अगदी सहजपणे चित्रपटभर वावरला आहे. इशा गुप्ताला अंगप्रदर्शनाचेच काम आहे आणि तिने ते पुरेपूर सुंदर निभावले आहे. खास उल्लेख करावा लागेल तो रणदीप हूडा आणि मनीष चौधरी ह्यांचा.

'डी', 'साहब बिवी और गँगस्टर' अशा चित्रपटातून भूमिका साकारणार्‍या रणदीप हूडाने आपल्या अभिनयात कमालीचा बदल घडवला आहे. एक अभिनेता म्हणून त्याच्याकडून ह्यापुढे काही एक अपेक्षा ठेवायला नक्की हरकत नाही. मनीष चौधरीला आपण 'पावडर' सारख्या मालिकांमध्ये अतिशय सहज आणि सुंदर अभिनय करताना ह्या आधी देखील पाहिले असेलच. इथे देखील त्याने आपल्या आवाजाचा, चेहर्‍याचा सुरेख वापर करत मंगलसींगची भूमिका झकास साकारलेली आहे. टिपीकल बॉलीवूड चित्रपटाचे चाहते असाल तर जन्नत तुमची मन्नत पूर्ण करणार हे नक्की.

मौजमजाचित्रपटमाध्यमवेधआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 May 2012 - 12:48 pm | प्रचेतस

झकास परीक्षण पराशेठ.

प्रीत-मोहर's picture

7 May 2012 - 12:54 pm | प्रीत-मोहर

* ते सोनु दिल्ली केकेसी आहे. बाकी परिक्षण मस्तच.

(परा पुणे केकेसी च्या परिक्षणांची फ्यान) प्रीमो

स्पा's picture

7 May 2012 - 12:55 pm | स्पा

ह्म्म्म

गणामास्तर's picture

7 May 2012 - 1:05 pm | गणामास्तर

परीक्षण नेहमी प्रमाणेच झकास.
येत्या वीकांताला बघितला जाईल.

सुहास झेले's picture

7 May 2012 - 1:30 pm | सुहास झेले

मस्त परीक्षण... सिनेमा बघितला जाईल :) :)

घाईत लिहीला असे वाटले तरी उत्सुकता नक्की :)

स्मिता.'s picture

7 May 2012 - 1:50 pm | स्मिता.

येत्या विकांताच्या चित्रपटाची सोय झाली. बाकी परिक्षण नेहमीप्रमाणी छानच!

कुंदन's picture

7 May 2012 - 1:57 pm | कुंदन

छे कसले सिनेमे बघतोस रे ;-)
त्यापेक्षा मॉल मध्ये फिरत जा.

विकांताला तु सुचवलेला "साहब बिबी और गुलाम" बघितला , तेंव्हापासुन डोके दुखते आहे.
बाकी परिक्षण नेहमीप्रमाणे मस्तच.

राजघराणं's picture

7 May 2012 - 2:02 pm | राजघराणं

भट गँग चे चित्रपट पहाणार नाही अशी उग्रभीषण प्रतिज्ञा मी केली होती ! आता ती मोडणार .. :)

उत्तम परीक्षण. थोडे सविस्तर लिहायला पाहिजे होते.

कपिलमुनी's picture

7 May 2012 - 2:02 pm | कपिलमुनी

आधी लॉर्ड ऑफ वॉर ची कॉपी आहे असा वाटला होता

चिगो's picture

7 May 2012 - 2:14 pm | चिगो

इम्रान हाशमी काही काही चित्रपटांत आवडलाही आहे. "व. अ. टा. मुंबई" त्यातला एक.. "मर्डर २" त्यातल्या खलनायकामुळे आवडला.. हा ही बघू जमेल तेव्हा..

मुनीवर, "लॉर्ड ऑफ वार" ह्या आमच्या आवडत्या चित्रपटाची आठवण काढून दिल्याबद्दल धन्यवाद.. आता डाऊनलोडवणार हा..

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2012 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा

आजच टाकावा असा इचार करत होतो..
अता गेलच पाहिजे..लै बोरींग झालय,थोडा टाइमपास तरी होइल.. :-)

सोत्रि's picture

7 May 2012 - 10:34 pm | सोत्रि

थोडा टाइमपास तरी होइल

आले..आले, गुर्जी लक्षात आले ;)

- (हलकट) सोकाजी

नाना चेंगट's picture

7 May 2012 - 2:33 pm | नाना चेंगट

मान्यवरांवर शिंतोडे नसल्याने परिक्षण जमले नाही.

पैसा's picture

7 May 2012 - 3:11 pm | पैसा

हा चित्रपट कोणत्या गटाला डोळ्यासमोर ठेवून तयार केलाय म्हणे? म्हणजे आम्ही बघावा की नाही? लोक कधी कधी परीक्षकाला "पैसे वाचवल्याबद्दल धन्यवाद" असं म्हणतात. आता आम्ही "पैसे घालवल्याबद्दल मर मेल्या" असं म्हणावं काय?

विनायक प्रभू's picture

7 May 2012 - 4:33 pm | विनायक प्रभू

हम्म
परा ची समाज सेवा.

आबा's picture

7 May 2012 - 6:21 pm | आबा

त्या ट्रेलरच्या काही फ्रेम्स मध्ये चक्क उजेड दिसतोय, भट साहेब रेप्युटेशनला जागले नाहीत...
असो,
बघितला पाहिजे !

. अर्थात चित्रपटाला जाण्याआधी आपली मिनिटा मिनिटाला 'भेणचोद' सारखी सतत वापरली जाणारी शिवी आणि 'चुत्तड पे लाथ' सारखे डायलॉग ऐकण्याची मानसिक तयारी आहे का ह्याचा विचार करून मगच पुढे पाऊल टाकावे.

____/\____!!!!

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
रजत अरोरानं संवाद लिहिले असतील अशी पक्की खात्री आहे.
वन्स अपॉन ए टाईम ईन मुंबई मध्येही हीच गँग होती.

जुर्म के रास्ते कितने भी मखमली क्यूं ना हो सर, खतम तो जेल के कंबल में ही होते है

गाडी चाहे कितनी भी तेज हो सर - उसे रोकने के लिये बस एक कील काफी है

( रणजीत हुडाच्या मुखावाटे )

अ‍ॅगनेल के कान में भी उसी ने मूता होगा"

"ये घोडों पे पैसे लगाते लगाते गधों पे कब से पैसे लगाने लगे"
(चंद्रू च्या मुखाने )

वात आला नुसता.

सोत्रि's picture

7 May 2012 - 10:38 pm | सोत्रि

इम्रानचा सिनेमा पैसे देवुन बघणे शक्य नाही. डाऊनलोडून बघितला जाईल.

- (जन्नत की सैर करावी असे वाटणारा) सोकाजी

यावेळी जरा अभिनय येणारी माणसं आहेत वाटतं सिनेमात. ब-यापैकी तटस्थ परीक्षण.धन्यवाद.

अमृत's picture

8 May 2012 - 5:46 pm | अमृत

मस्त परीक्षण...

अमृत

परिक्षण आवडले. हा शिनेमा बघण्याची जरूरी नाही वेळेतच कळले. हिरवीनीला पाहिल्यावर क्षणभर लारा दत्ताची आठवण आली. इम्रान हाश्मी एकाच प्रकारचे सिनेमे करतो. त्यातली गाणीही सर्दी झालेल्या आवाजातल्या गायकाने गायलेली असतात. बेंबीच्या देठापासून ओरडत गाणं म्हणायला सुरुवात होते आणि कडवं संपता संपता भजन म्हटल्यासारखा ठेका देत सर्दावलेला कोरस गातो. हे नेहमिचेच आहे. रणदीप हुडा मात्र चांगले काम करतो.

गणामास्तर's picture

8 May 2012 - 8:31 pm | गणामास्तर

>>>>>>रणदीप हुडा मात्र चांगले काम करतो.

डी,रिस्क ई. चित्रपटातील रणदीप हुडाचा मख्ख चेहरा घेऊन केलेला वावर बघून हसायला येत.
असे मख्ख चेहरे बघितले ना की 'मेरे मेहबूब तुझे' गाण्यातील राजेंद्र कुमारचाच चेहरा येतो पहिल्यांदा डोळ्यासमोर. :)

बाकी सहमत.

रेवती's picture

8 May 2012 - 8:51 pm | रेवती

ही ही ही.
असेल तसंही असेल.
त्याचे पूर्वीचे सिनेमे पाहण्याआधी मी त्यापेक्षाही मख्ख चेहरे पाहिले असल्यास रणदीप त्यातल्यात्यात उजवा वाटला असेल.;)