कॅमेरा कोणता खरेदी करायचा ?कॉम्पॅक्ट की एस एल आर ?

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
2 May 2012 - 3:19 pm

आपल्याला प्रकाशलेखनाची उर्फ फोटोग्राफीची उर्फ छायाचित्रणाची आवड बहुतेकाना असते. त्यापासून मिळणार्‍या फोटोच्या गुणवत्तेची प्रत्येकाची अपेक्षाही वेगवेगळी असते व या छंदावर पैसा तरी किती उधळावा याचीही प्रत्येकाची तयारी वेगवेगळी असते. बाजारात फक्त ४ एक्स च्या डिजिटल झूमपासून ते ४२ एक्स च्या ऑप्टीकल झूमपर्यंत आवाका असलेले कॅमेरे विकत मिळतात. त्यात प्रामुख्याने दोन प्रकारचे कॅमेरे मिळतात .
ते प्रकार म्हणजे १) कॉम्पॅक्ट कॅमेरे २) एस एल आर उर्फ सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरे
. व्यावसायिक फोटोग्राफऱ हा पहिल्या प्रकारच्या कॅमेर्‍याकडे ढुंकूनही बघत नाही.त्याचे कारण काय असावे असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिकच आहे कारण आपले कॉम्पॅक्ट कॅमेरे वापरून व फोटोशॉपसारख्या फोटोएडीटरचा वापर करून आपणही थोडेफार काही काम व्यावसायिक फोटोग्राफरसारखे करून शकतो.मग त्याच्याकडे असणार्‍या त्याच्या खास एसेल आर कॅमेर्‍याचाच आग्रह तो का धरीत असतो हे आपण जाणून घेउ परिणामतः आपल्यापैकी ज्याना शक्य असेल त्याना एसेलआर वर पैसाही खर्च करता येइल.

या दोन्ही प्रकारच्या कॅमेर्‍यात तीन मूलभूत फरक आहेत. ते असे

१) दर्शन खिडकी तंत्र २) अधिकाधिक भिंगे बसविण्याची सोय ३) चित्र "बद्ध" करणार्‍या डिजिटल संवेदकाचे आकारमान
१) कॉम्पॅक्ट प्रकारच्या कॅमेर्‍यात सम्वेदक व दर्शन खिडकी हे एका जागी नसतात त्यामुळे दर्शन खिडकीतून दिसणारे चित्र हे संवेदकावर येणार्‍या चित्रापेक्षा वेगळे असते, काहीसे कापलेले.
तसे एसेलआर मधे ही संवेदक व दर्शन खिडकीची जागा वेगवेगळी असते पण त्यात दोन्ही ठिकाणी दिसणारी चित्र सारखी असतात कारण संवेदकाच्या समोर भिंगाला ४५ अंश कोन करील असा आरसा असतो. त्याच्या वर एक लोलक वसविलेला असून तो लोलक आरशात पडणारे चित्राचे प्रतिबिब जसेच्या तसे दर्शन खि़डकीकडे पाठवतो. फोटो काढण्याची कळ दाबली की आरसा वर उचलला जाउन भिंग व संवेदक यांची " नजरानजर" होऊन चित्र संवेदकावर पडते व साठवले जाते.
२) कॉम्पॅक्ट प्रकारच्या कॅमेर्‍यात ठोसपणे जोडलेले भिंग असते त्याच्या मर्यादेत ते पुढे मागे होऊन झूम होते. एसेलार मधे मात्र स्वतंत्र पणे हेतू अनुसार वेगवेगळी भिंगे जोडता येतात. त्यामुळे अगदी लांब असणार्‍या (उदा चंद्र) वस्तूच्या फोटोसाठी यात खास प्रकारचे टेले -भिंग तसेच जवळच्या फोटो साठी वाईड-भिंग जोडता येते.
३) संवेदकाचे आकारमान कॉम्पॅक्ट प्रकारच्या कॅमेर्‍यात जेवढे असते त्यापेक्षा एसेलआर मधे मोठे असते सबब फोटोतील बारकावे अधिक दिसू शकतात. या संवेदकाचे आकारमान मोठे असल्याने प्रकाशाची संवेदना असणारी अधिकाधिक केंद्रे एसेलार मधे असल्याने कमी प्रकाशात फोटो घेऊन सुद्धा चित्रातील रंगीबेरेंगी ठिपके येण्याचे प्रमाण एसेलार मधे कमी असते. त्यामुळे इमारती अंतर्गत घेतलेल्या प्रकाश चित्रांच्या छपाईत हा दोष कमी दिसतो. व्यावसायिक फोटेग्राफर लग्न मुंजीत अशा प्रकारची फोटोग्राफी करून अल्बम तयार करतात. आता आले ना आपल्या लक्षात ते एसेलाआर च्या एवढे प्रेमात का पडलेले असतात ते ?

काही फायदे कॉंम्पॅक्ट चे -
१) आकाराने लहान वजनाने हलके त्यामुळे जवळ बाळगायला सोपे २) निरनिराळे सृजनात्मक प्रकाशचित्रे तयार करण्याच्या सोप्या सोयी. ३) किमती कमी त्यामुळे सर्वसाधारण जनतेस परवडणारे ४)आरसा नसल्याने तो जॅम होऊन कॅमेरा बंद पडण्याची भीती नाही.
काही तोटे कॉंम्पॅक्ट चे - २) अधिक भिंगे लावता येत नाहीत. ( काही किमती कॉंम्पॅक्ट मधे ही सोय असते ) .फोकस हवा असे क्षेत्र कमी मिळते त्यामुळे फोटोचा विषय व बाकीच्या गोष्टी यात बाकीच्या गोष्टी नाईलाजाने फोटोत फोकसमधे घ्याव्या लागतात.( मॅक्रो मोडमधे फुलांचे फोटो घेताना काही प्रमाणात फोटोचा विषय सोडून इतराना डिफोकस करता येते. ) खास पोट्रेट टाईपचे फोटो काढताना अडचणी निर्माण होतात.

काही फायदे एसएलार चे -१) रॉ फॉरमॅटमधे फाईल्स तयार करता येतात यात जास्त माहिती असते व नंतर स्वता: फोटेग्राफर आपल्याला हवी तशी जेपीईजी ( कॉप्रेस्ड) फाईल तयार करू शकतो.( रॉ फॉर्मॅट आता किमती कॉम्पॅक्ट मधेही मिळतो)
२) कमी फोकस क्षेत्र निर्माण करता येत असल्याने आपल्याला हव्या असलेल्या विषयाच्या अलीकडील व पलीकडीत वस्तू डिफोकस करून फोटो -विषयाकडे लक्ष खेचून घेता येते. ३) बाह्य फ्लॅश दिवा वापरता येऊन प्रकाश पडण्याचा कोन बदलता येतो.व फ्लॅश विषयाच्या जवळही नेता येतो. ( काही भारी कॉंम्पॅक्ट मधेही ही सोय असते. ) ४) पूर्ण मानवी नियंत्रण फोकस, प्रकाश, वेळ यावर ठेवता येते. व ३० सेकंदा पेक्षाही मोठ्या एक्स्पोजरला वापरता येते. (याचा उपयोग रात्री चांदंण्यातील निसर्गाचा ( न हलणार्‍या गोष्टींचा) फोटो काढण्यासाठी होतो.) आपले समाधान होईपर्यंत हाताने भिंग पुढे मागे करून योग्य तो फोकस मिळविता येतो. ५) स्नॅपचे बटण दाबल्यानंतर शटर उघडण्यास कॉंम्पॅक्ट च्या मानाने तुलनात्मक कमी वेळ लागतो त्यामुळे क्षणिक प्रतिक्रियांचा फोटो काढताना फायदा होतो. ( उदा. लग्नात घास देतानाचा फोटो. )

काही तोटे फायदे कॉंम्पॅक्ट चे - १) मोठा संवेदक त्यामुळे त्यास साजेशे मोठे भिंग यामूळे भिंग व संवेदक दोघांवर होणारा खर्च वाढतो. वजन वाढते. २) आरसा, लोलक व मोठी भिंगे यामुळे कॅमेर्‍याचे वजनात वाढ सबब इकडून तिकडे सहजपणे कॅमेरा नेता येत नाही. ३) यास लागणारी अतिरिक्त भिंगे महाग त्यामुळे एकूणच खर्च वाढतो.

थोडक्यात आपण काय शिकायचे .- ज्यात फोकस ला वाव असेल , कमी प्रकाशात चित्र घेतल्यास त्यात येणारे टिपके कमी करणारा संवेदक असलेला थोडीसी किंमत जास्त असलेला कॉंम्पॅक्ट कॅमेरा आपण घेतल्यास एसएलार च्या जवळपास जाणारी फोटोग्राफी करू शकतो. पण आपण पक्षी निरि़क्षक,फुलवेडे , जंगल वेडे असू तर एसेलाआर ला जवळ करावे अर्थात खिसा काय म्हणतो हे त्याला विचारून !

तंत्रराहणीप्रकटनसमीक्षाशिफारससल्लामाहितीमदत

प्रतिक्रिया

कॅमेरा कोणता खरेदी करायचा ?कॉम्पॅक्ट की एस एल आर ?
शिर्षक वाचुन वाट्ल सल्ला मागत आहात ;)
पण इथे तर तुम्ही कॉम्पॅक्ट कॅमेरे अन एस एल आर उर्फ सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरे याबाबत उपयुक्त माहीती पुरवलीत
आभारी आहोत :)

स्मिता.'s picture

2 May 2012 - 7:03 pm | स्मिता.

शीर्षक वाचून सल्ला हवा आहे असे वाटले. पण लेखात छान माहिती मिळाली. आणखी तपशिलात लेख येवू द्या.

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2012 - 3:25 pm | परिकथेतील राजकुमार
स्पा's picture

2 May 2012 - 3:32 pm | स्पा

लेख आवडला...
पण ते अगदी मराठी भाषांतर खटकले , उदा . दर्शन खिडकी तंत्र, सम्वेदक वेग्रे
वाचताना त्रास होत होता , असो हे माझे मत झाले,,

बाकी तुलना आणि माहिती आवडली

चौकटराजा's picture

2 May 2012 - 6:15 pm | चौकटराजा

लिहिताना मलाच त्रास झाला पण हे संस्थळ मराठी साठी, मराठी माणसांचे असल्याने प्रयत्न केला झालं !

अच्छा! यामुळे 'चौकटराजा' होय :p

यामुळे म्हणजे कशामुळे रे भाऊ ? असो, अतिशय माहितीपूर्ण लेख. पुलेशु

>>यामुळे म्हणजे कशामुळे रे भाऊ ?

--- त्यांना कॅमेर्‍यांच्या चौकटीं ;-) मध्‍ये असलेल्या खाचाखोचा :p माहित आहेत म्हणून रे ;-)

प्रास's picture

2 May 2012 - 7:08 pm | प्रास

हॅ हॅ हॅ! यक्कुशेठ!

चौराकाकांचा व्यासंग चौफेर असल्याचं जाणवतंय.

माहिती आवडलीय.

पुलेशु

मुक्त विहारि's picture

2 May 2012 - 3:42 pm | मुक्त विहारि

छान माहिती.....

उपयुक्त माहिती.
चला आता एखादा एसएलआर विकत घेणे आले.

सस्नेह's picture

2 May 2012 - 4:52 pm | सस्नेह

याचबरोबर कॉम्पॅक्ट अन एसेलआरच्या वेगवेगळ्या बनावटीच्या किंमती दिल्यास लेख अजून उपयुक्त होईल.

चौकटराजा's picture

2 May 2012 - 6:12 pm | चौकटराजा

कमीतकमी डिजिटल एस अल आर २८००० रूपयापासून सुरू होतो. व कॉम्पॅक्ट २५०० पासून .

सध्या मिररलेस कॅमेर्‍यांचे वारे वाहण्यास सुरु झाले आहे,त्यावर सुद्धा आपण काही लिहावे.

सर्वसाक्षी's picture

2 May 2012 - 9:15 pm | सर्वसाक्षी

चौरा साहेब,

उत्तम माहिती.

मिपाकरांनो, एस एल आर निकॉनचा घेत असाल तर किट लेन्स घेउ नका, खास करुन १८-५५ एकदम फडतुस आहे जी बहुधा किट लेन्स म्हणुन दिली जाते. कदाचित इतर बनावटीच्या एस एल आर च्या बाबतीतही असेच असू शकते. स्वस्त आणि मस्त म्हणताना उत्पादक कुठेतरी तडजोड करतातच.

कौन्तेय's picture

7 May 2012 - 2:17 pm | कौन्तेय

मी तीन वर्षांपूर्वी फार विचारपूर्वक निकोन डी३००० घेतला. ते त्यावेळचे सगळ्यात प्राथमिक मोडेल होते. किट लेन्स न घेता १८~१०५ मि.मि. ही लेन्स घेतली आणि त्यानंतर जे काही सुटलोय त्याला तोड नाही. मला फोटोग्राफीच्या तंत्रातल्या लौकिक खाचाखोचा समजत नाहीत. फोटोग्राफीच्या परिभाषेत मी फार काळ कुणाशी वाद नाही घालू शकणार कदाचित, पण माझे फोटो चार चौघांपेक्षा सरस येतात एवढं मी विनयाने म्हणू शकतो.
घेतेवेळी सगळे क्यामेरे इंटरनेटवर समीक्षून झाल्यावर शेवटी उरले निकोन नि क्यानन. त्यांतून निकोन निवडताना हे पाह्यलं की निकोनची रंगसंगती जास्त वास्तवदर्शी आहे. क्याननची जरा जास्त उत्सवी आहे. म्हंजे प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट. त्यात फार वाईट काही नाही; एकेकाची निवड. बाकी काही नाही. दुसरं म्हंजे त्या प्राथमिक मोडेलमधेही निकोनवाला स्वचलित फोकस संवेदक प्रकाश शलाका फेकणारा दिवा (ऑटो फोकस सेन्सिंग लाइट) वेगळा देत होता, तर क्याननवाला तेच काम फ्ल्याशच्या दिव्याकडून करून घेत होता. पण जिथे गाजावाजा न करता अंधारात फोटो काढायचेत अशा ठिकाणी त्याची अडचण झाली असती म्हणून नि:शंक मनाने निकोन घेऊन घरी आलो. आता एकदा या दिंडीत लागलो की मागे पहायचं नसतं. म्हंजे निकोननिष्ठ नि क्यानननिष्ठ असे ठळक गट आहेत जे आयुष्यभर त्यांच्या दैवतांशी प्रतारणा करीत नाहीत.
मीही म्हणतो, 'परधर्मो भयावहः'!
एकदम ताजे फ़ोटो इथे आहेत.

शैलेन्द्र's picture

7 May 2012 - 5:28 pm | शैलेन्द्र

अगदी .. अगदी..

आत्ता घ्यायचा तर निकॉन ५१०० घ्यावा..

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2012 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा

आशु जोग's picture

2 May 2012 - 11:47 pm | आशु जोग

साध्या मानसाला सोनी सायबरशॉट बरा ना हो भाऊ

सानिकास्वप्निल's picture

3 May 2012 - 12:04 am | सानिकास्वप्निल

छान माहिती :)

चांगली माहिती, धन्यवाद.

पण सगळ्यांनाच एक विनंती, ते प्रत्येक शब्दाचं विशेषतः तांत्रिक शब्दांचं मराठीकरण टाळा, शश्प काही कळत नाही मग मुळ विषयातलं.

अस्वस्थामा's picture

3 May 2012 - 7:50 pm | अस्वस्थामा

परा,
तुम्हाला बऱ्याच धाग्यावर अशा जुन्या आणि बिनचूक धाग्यांचा संदर्भ देताना पाहिले आहे.. मिपा ची तर शोध व्यवस्था तितकी चांगली नाही.. (कारण काही असो ) मग तुम्ही कसे संदर्भ शोधता याची उत्सुकता आहे..

या धाग्यालाच अपडेट करीत आहे.
लोकांना कॅमेराबाबत प्रश्न पडलेत

मला काहीच कंटेंट दिसत नाहिये.
प्रतिसादामध्ये ही फक्त रिप्लायकर्ता आयडी आणि सहि येव्हडेच दिसते आहे..

पुष्कर जोशी's picture

18 Oct 2012 - 1:35 am | पुष्कर जोशी

अनेक प्रतिक्रीया दिसत नाहीत ...

अँग्री बर्ड's picture

18 Oct 2012 - 9:22 am | अँग्री बर्ड

Nikon P510 घ्या. मी स्वतः वापरतोय. शिवाय तुमच्या बजेट मध्ये बसणारा आहे, घेण्यापूर्वी एकदा किंमत सांगा, मी विचारून बघतो. मुंबईला फोर्ट मध्ये ललीत मध्ये, पुण्यात दगडूशेटजवळ कीर्ती जनरल स्टोअर मध्ये किंमत विचारा. ऑनलाईन मागवू नका, महाग पडेल.

रिकामटेकडा's picture

21 Oct 2012 - 11:26 pm | रिकामटेकडा

खर्च आणि वजनाचा मुद्दा बघता एस एल आर घेणे योग्य ठरत नाही कॉम्पॅटमध्ये ब-याच सोयी नसतात. याचा मध्यम मार्ग म्हणजे ब्रिज कॅमेरा. ज्याला एस एल आर सारखे मेन्यु असतात पण लेन्स बदलता येत नाही. उदा Canon PowerShot SX50 HS, Panasonic Lumix DMC-FZ200, Sony Cyber-shot DSC-HX200V, Nikon Coolpix P510
वरीलपैकी माझ्याकडे Panasonic Lumix DMC-FZ१५० आहे आणि त्याच्याने अतिशय उत्तम फोटॊ काढता.येतात.

http://www.dpreview.com/products/search/cameras#criterias=SpecsCoreParam...
यादुव्यावर जाउन आपण आपणास हवे असलेल्या फिचर्स चा कॅमेरा शोधू शकतो.

रिकामटेकडा's picture

21 Oct 2012 - 11:36 pm | रिकामटेकडा

a

a

a

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2012 - 11:38 pm | श्रीरंग_जोशी

फोटोज खरच सुंदर आहेत. खरे श्रेय तर फोटो काढणार्‍याचेच. कॅमेरा तर निमित्तमात्र!!

>> खरे श्रेय तर फोटो काढणार्‍याचेच. कॅमेरा तर निमित्तमात्र!!

यावर एक धागा निघू शकतो

सांजसंध्या's picture

22 Oct 2012 - 8:34 pm | सांजसंध्या

काका तुम्हाला कॅमेरा कशाला हवाय ? तुम्ही चित्रं काढता असं सांगितलेलं आठवतंय.

आम्ही हा धागा काढला तो मिपावरील इतर फोटो शौकिनांच्या माहिती साठी. आमच्या कडे दोन कॅमेरे आहेत. पण अजून " क्या बात है" असा फोटो यावयाचा आहे.