पुरुषानं कसं सडेतोड असावं. मुळूमुळू करणं हा इतरांचा प्रांत. धडाकेबाजपणा हा पुरुषाचा मूळ गुणधर्म. तो त्यानं जपला पाहिजे अन् योग्यवेळी व्यक्त केलाही पाहिजे. मनात कुढत बसणे त्याचा पिंड नाहीच. जे वाटते, जे आवडते, जे पटते ते बोलून मोकळे होणे हाच खरा पुरुषार्थ. तसेच जे मनाविरुद्ध घडते, जे आवडले नाही अन् ज्यात आपले इप्सित साध्य होत नाही त्याचा प्रतिकार करणे, बिनतोडपणे त्याचा जाहीर लिलाव करणे व त्या विरुध्द आवाज उठविणे हाच पुरुषाचा धर्म असतो.
असो. इतकं सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे काही पुरुष ताकाला जातात खरे पण भांडं लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु समोरची पार्टी महाचाणाक्ष असते. तिला सिक्थसेन्स नावाचा प्रकार अवगत असतो. केवळ नजरेच्या विभ्रमानुसार पुरुषाच्या मनातली खळबळ अन् तळमळ ती जाणू शकते. त्याला नेमकं काय ओकायचं आहे हे ती जाणतेच पण तसे न दाखवता त्या पार्टीलाही आपले सूप्त हेतू पुरुषाकडून पूर्ण करवून घ्यायचे असतात. मग ती त्याचा टाय पकडून त्याला कुत्र्यासारखे हिंडवित जाते. पुरुष बिचारा आता तरी समोरची पार्टी हो म्हणेल, नंतर तरी ती सगळं हवाली करेल या आशेवर खोटं खोटं प्रेमाचं नाटक करीत राहतो, आपल्या शरीरातील गर्मी अन् उर्मी दोघींनाही दाबत राहतो.
प्रेमळपणाचा आव आणणे हा पुरुषाचा डाव असून समोरच्या पार्टीला कधी एकदा चीतपट करून कुस्ती मारतोय हा त्यामागे मूळ हेतू असतो आणि यात गैर ते काहीच नाही. पुरुष निसर्ग नियमाला धरूनच वागत असतो. फक्त व्यक्ती तितक्या प्रकृति या न्यायाने त्यात भावभावनांचे मिश्रण म्हणा किंवा डिव्होशन म्हणा असे उपप्रकार घुसडून प्रेम व्यक्त केले जाते, निभावले जाते. खरा चेहरा त्याने झाकलेलाच असतो. मग ताकाला जाऊन आपलं भांडं लपवायचं कशासाठी? सरळ सांगून टाकायचं ना- ‘कभी मेरे साथ, कोई रात गुजार...’ समोरच्या पार्टीदेखत ‘इलू इलू’ करण्यात काय अर्थ आहे. ती जर हो म्हणाली तर ठीक, नाही तर नेक्स्ट!
जे निसर्गानं बहाल केलंय त्याचा बेधडक वापर करायला हवा. आडवळणाने जाऊन वेळ कशाला घालवायचा? फटाफट सांगून मोकळं व्हायचं- ‘मला तुझ्याकडून हेच अपेक्षित आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करणार आहे. बोल तुला मंजूर आहे की नाही?’ कदाचित समोरची पार्टी आपल्या श्रीमुखात भडकावून देईल. पण घाबरून जायचे कारण नाही. तिला जे वाटत असतं ना की दुसरा कुणी निष्काम प्रेम करणारा भेटेल, तर तो त्या पार्टीचा गोड गैरसमज असतो. फार फार तर दोन तीन महिने तो नवखा भिडू ‘दम’ काढेल, नंतर मात्र आपले मनोवांछित फल प्राप्त्यर्थम कसे होईल याचीच संधी शोधीत राहील. प्रेम केल्यानंतर ओघाने ‘चाळे’ येतातच. झुडपाआड लपून कुणी काही ‘सोज्ज्वळ’ प्रेमाच्या गुजगोष्टी करीत बसत नसतो. किंवा त्याला ‘एकांत’ का हवा असतो, हे समोरच्या पार्टीला कळत नाही असे समजणे चूक समजावे का म्हणून? जर तिलाही हे कळलेले असेल तर आपल्याला जे हवं ते बेधडक सांगून टाकायला कचरायचं का म्हणून?
‘पोरींना प्रेम करायला कारण लागतं तर मुलांना प्रेम करायला जागा लागते!’ ही उक्ती काही चुकीची नाही. निवांत, अंधाऱ्या, निर्जन जागा पोरींपेक्षा पोरांनाच जास्ती माहिती असतात, हे काय उगाच नाही. जंगलातल्या नवनव्या वाटा, खडकाळ आडोसे, दऱ्याखोऱ्या, अर्धवट लेण्या व गुहा, ओसाड मंदिरे, चिडीचूप माळराने अशी कितीतरी ठिकाणे पोरांच्या हिटलिस्टवर असतात ते का म्हणून?
म्हणूनच ‘प्रेमाला’ जाऊन कधीच भांडं लपवायचं नसतं. कारण आपला बहुमुल्य वेळ वाया घालवून उचंबळून येणाऱ्या निसर्गाला पुरुषानं का म्हणून कोंडून ठेवायचं?
प्रतिक्रिया
6 Mar 2012 - 1:33 pm | जेनी...
समोरची पार्टि लै भारिये ;)
6 Mar 2012 - 4:40 pm | अनुराग
अश्यावेळि समोरचि पार्टी भारिच वाटते.
6 Mar 2012 - 1:39 pm | पक पक पक
याला म्हण्तात हरीदासाची कथा मुळपदावर..... ;)
6 Mar 2012 - 1:47 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी शॉल्लेट लिखाण आहे बॉस.
मिपावरती जे दोन/तीन वाचायच्या लायकीचे लिखाण करणारे आहेत, त्यात डॉक्टरांचा नंबर एकदम वरती आहे.
6 Mar 2012 - 2:32 pm | प्यारे१
पराशी कधी नव्हे ते सहमत.
डॉ. नी सांगितलेल्या गोष्टीचा सारांश मांडायचा तरः
उगाचच लोक प्रेम बिम वगैरे भानगडी करत बसतात.
खरी असते ती वासनाच. निव्वळ कामवासना.
स्त्रिया या अशाच उपभोग्यच वस्तूच आहेत...
(एकसमयावच्छेदेकरुन तीन च अथवा एका नंतर एक च लावून वाक्य वाचू शकता)
तू नही और सही और नही और सही हेच खरं!
6 Mar 2012 - 4:36 pm | अनुराग
+१
6 Mar 2012 - 1:47 pm | कपिलमुनी
प्रेम केल्यानंतर ओघाने ‘चाळे’ येतातच. ????????
6 Mar 2012 - 1:54 pm | नगरीनिरंजन
एकदम भांडेफोड लेख आहे.
चालू द्या.
6 Mar 2012 - 2:00 pm | चिरोटा
फूल टू लेख.
6 Mar 2012 - 2:02 pm | अन्नू
माsर डाला, अsल्लाsss... माsर डाला...
6 Mar 2012 - 2:28 pm | मालोजीराव
....याला मी ५ आउट ऑफ ८ म्हणेन ! (स्ट्रीक्टली डिपेंड ऑन टाईप ऑफ समोरची पार्टी)
१ आउट ऑफ ८ !
२ आउट ऑफ ८ !
फिरून पुन्हा आलेले कार्यकर्ते (समोरची पार्टी)
-- चुकार (मालोजी)
6 Mar 2012 - 2:34 pm | ५० फक्त
हम्म, वाचतोय, खरंतर या विषयावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे, तुम्ही सुरुवात केलीच आहे, धन्यवाद.
तथाकथित प्रतिष्ठा किंवा सदर संस्थळावर आयडिच्या माध्यमातुन घेतलेली भुमिका जपण्यासाठी दिलेल्या दांभिक प्रतिसादांकडे दुर्लक्ष करुन तुम्ही जे याच विषयावर लिहिताय, नेहमीच.
एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातले नैसर्गिक शरीरसंबंध हा एवढा वाईट/ बदनाम विषय का आहे की अजुनही की एखाद्या सार्वजनिक ठिकाणी खरी -खोटी नावं आणि आयडि घेउन वावरणा-या लोकांना यावर निकोपरीत्या लिहायला तर सोडाच पण कुणी लिहिलेलं नीट वाचुन समजुन घेणं अवघड व्हावं.
असो,
6 Mar 2012 - 3:40 pm | प्यारे१
>>>एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातले नैसर्गिक शरीरसंबंध हा एवढा वाईट/ बदनाम विषय का आहे की अजुनही की एखाद्या सार्वजनिक ठिकाणी खरी -खोटी नावं आणि आयडि घेउन वावरणा-या लोकांना यावर निकोपरीत्या लिहायला तर सोडाच पण कुणी लिहिलेलं नीट वाचुन समजुन घेणं अवघड व्हावं.
अधोरेखित शब्द, त्याचा अर्थ आणि वरचे डॉ. साहेबांचे लिखाण यात जरा जरी साधर्म्य आढळले तरी आपली शत प्रतिशत माघार! आणि जर वरच्या लिखाणाला निकोप म्हणत असाल तर बर्याच साईट्स, ग्रुप्स वर केलेल्या लिखाणाच्या तोडीस तोडे लिखाणाला (ज्याची थोडीशी झलक आपल्या काही आदरणीय/ माननीय सभासदांच्या लिखाणात दिसली होती.) देखील मिसळपाववर प्रसिद्धी देता येईल.
डॉ. दिवटे भावभावनांच्या/ विचारांच्या लिखाणापेक्षा स्त्री पुरुष या दोन्ही मनुष्य प्रजातींना नर-मादी पातळीवर आणवून ठेवण्याचा वारंवार प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात पुरुष हा फक्त आणि फक्त लैंगिक सुख या आदिम भावनेने पछाडलेला असतो असे त्यांचे मत दिसते. बर्याच अंशी ते बरोबर असले तरी ते योग्य त्याच जागी बरोबर वाटते.
अनेक वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये अशी प्रश्नोत्तरी असते ज्यामध्ये विचारलेले प्रश्न हे सेक्स शी आनुशंगिक असतात पण म्हणून या लिखाणाला त्या त्या वर्तमान पत्र / मासिकाच्या पहिल्या पानावर छापले जात नाही.
प्रश्न चर्चा करण्याचा नाहीच. तशी चर्चा करण्याने जर लोकविचार समृद्ध होते असेल तर जरुर करा पण त्यासाठी त्याची मांडणी तरी नीट (दोन्ही गोष्टीचा विचार करुन) करा की!
6 Mar 2012 - 3:47 pm | मालोजीराव
6 Mar 2012 - 4:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे
म्हणजे थोडक्यात "सत्यं ब्रूयात" पण आतील पानावर ब्रूयात, पहिल्या पानावर नको, असेच ना ??
6 Mar 2012 - 4:23 pm | प्यारे१
हॅ हॅ हॅ...! काही सायंदैनिकं अशाच विचारांनी 'प्रेरित' असतात असे लोकलमध्ये प्रवास करताना समजायचे. ;)
बाकी आणखी काही असेल तर आपणही 'आत'च 'ब्लूयात' ;) कसे?
7 Mar 2012 - 7:30 am | ५० फक्त
@ प्यारे, तुम्ही जी तुलना करत आहात ती अतिशय चुक आहे, ज्या साईट किंवा ग्रुपचा तुम्ही उल्लेख करत आहात, त्यावरच्या लेखनात बीभत्सता असते, विकृती असते. या लेखात ती तशी कुठे दिसत नाही.
'त्यातल्या त्यात पुरुष हा फक्त आणि फक्त लैंगिक सुख या आदिम भावनेने पछाडलेला असतो असे त्यांचे मत दिसते. बर्याच अंशी ते बरोबर असले तरी ते योग्य त्याच जागी बरोबर वाटते.' - म्हणजे, मिपा हे व्यासपीठ अशा प्रकारची मते व्यक्त करण्यास योग्य नाही असे असेल तर अशा बाबतीत मा. संपादक मंडळ योग्य ती काळजी घेत आहेच.
इतर माध्यमातुन या विषयावर जे लिहिले जाते, उदा. वर्तमानपत्रे, त्यात ते पहिल्या पानावर नसेल, याची कारणे वेगळी आहेत, पण या विषयावरच या क्षेत्रातल्या तज्ञांनी लिहिलेली पुस्तके आहेत, तसेच काही जाहीर कार्यक्रम देखील होतात, याचा उल्लेख दिवटेंनी त्यांच्याच एका मागच्या धाग्यावर केला होता.
7 Mar 2012 - 12:42 pm | प्यारे१
तुलना चुकीची आहे हे काही अंशी मान्य बाकी
>>>ज्या साईट किंवा ग्रुपचा तुम्ही उल्लेख करत आहात, त्यावरच्या लेखनात बीभत्सता असते, विकृती असते.
बीभत्सता आणि विकृतीशिवाय इतर रस देखील असतात बरं. ;) अधिक माहितीसाठी व्यनि करा. ;)
बाकी वरच्या लेखनात तुम्हाला विकृती दिसत नाही?
डॉक्टर म्हणवणारी एक व्यक्ती प्रेम अथवा त्याची अभिव्यक्ती, भाव भावना, परस्परांची काळजी करणं, एखाद्याचे काम करुन देणे या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त आपली सेक्स डिझायर पूर्ण करण्यासाठी वापरा अन्यथा त्यामध्ये काही तथ्य नाही असे 'सातत्याने' त्याच्या लेखाद्वारे व्यक्त करत असताना अशा प्रकारचे लिखाण निकोप वाटते?
मी तर म्हणेन की टीपी म्हणून वाचली जाणारी वरची लिखाणं सोडून देतो आपण मात्र अशा जबाबदारपणाचा आव आणून केलेल्या लेखनाचे दुष्परिणाम जास्त होतील.
तसाच विचार करायचा झाला तर एखादी पतिव्रतादेखील मादीच जी आपल्या ह्या इच्छा पूर्ण करु शकते आणि एखादी पैसे घेऊन काम करणारी स्त्री देखील...! काही डिस्क्रिमिनेशन आवश्यक आहे की नाही?
चित्रपटात एकच कृती करु धजणारा एक हिरो आणि एक व्हिलन का ठरतो याचा काही विचार?
'इज्जत घेणारा/ घेऊ पाहणारा ' व्हिलन आणि 'इज्जत आपखुशीने मिळणारा' हिरो एवढं सरसकटीकरण केलं की झालं?
7 Mar 2012 - 2:17 pm | मालोजीराव
होय नक्कीच आवश्यक आहे ! सर्व समाजाला एकाच नजरेतून बघणं अशक्य आहे...म्हणूनच नीरनिराळ्या व्यवस्था जन्माला आल्या असाव्यात !
ह्यो पाईनटाचा मुद्द्दा हाय !
- मालोजी
6 Mar 2012 - 2:39 pm | अविनाशकुलकर्णी
प्रेमीकांचे असे हाल होऊ नयेत म्हणुन पुण्यात प्रेम पुश्करणी याने के प्रेम पार्क उभारावेत त्या मुळे घुसमट थांबेल..
असा प्रस्ताव होता असे वाचनात आले होते.
राजकिय कुरघोड्यातुन नगर सेवकांनी वेळ काढुन प्रेमी युगलांचा विचार करावा..
6 Mar 2012 - 3:02 pm | ५० फक्त
किमान गेला बाजार हत्ती तरी उभे करावेत, अर्थात त्यामागं लपता येणार नाही, त्यासाठी बसलेले हत्ती लागतील.
6 Mar 2012 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा
पाणी पाणी...! हाय हाय...! आग आग...! इश्काची आग...!
6 Mar 2012 - 3:12 pm | सर्वसाक्षी
..मिपा वर विचारवंत नाहीत?
6 Mar 2012 - 3:23 pm | गणपा
साक्षीजींशी बाडिस. :)
बाकी मनुष्य हाही शेवटी एक प्राणीच. चार प्राणी जसे वागतात तसेच तो ही वागतो यात नवलते काय?
6 Mar 2012 - 3:56 pm | चिगो
साला एवढ्या बेधडकपणे स्त्री-पुरुष संबंधाबद्दल लिहायला हिम्मत लागते.. प्रेम म्हटलं की सर्वसाधारणे लोक "प्लॅटॉनिक लव्ह"च्या गफ्फा मारायला लागतात, आणि मग"प्रेमाचा गुलकंद" तयार होतो.. ;-)
सरळ-सरळ समोरच्या व्यक्तीला "माझं तुझ्या शरीरावर प्रेम आहे" हे कुणी सांगत नसलं तरी नैसर्गिकरीत्याच एकमेकांवरील प्रेमात मनासोबतच शरीराचाही विचार असतोच की.. आणि माझ्यामते त्यात चुकीचं काही नाही .(च्यायला भलत्याच वेळी "सुदृढ शरीरातच सुदृढ मन वसते" ही शारीरीक शिक्षणाच्या वर्गातली म्हण आठवतेय ;-)) कशाला, जर शारीरीक सौंदर्य जर इतकं बिनमहत्त्वाचं असेल (जितकं विशुद्ध प्रेमाचे उद्दातीकरण करणारे दाखवतात) तर ठरवून लग्न करतांनाही मुलीच्या "दिसण्यावर" इतका भर का दिल्या जातो?
म्हणजे अगदी आल्या आल्या "घाल ताक!" म्हणून भांडं पुढं केलं नाही, तरी नुसत्या हवा-पाण्याचा गप्पा मारुन ताक न घेता परत जायला कुणी येत नसतं, हे नक्की..
6 Mar 2012 - 4:53 pm | धन्या
या वाक्याचा शब्दशः अर्थ घेतला तरी बेक्कार हसायला आलं.
6 Mar 2012 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी आल्या आल्या "घाल ताक!" म्हणून भांडं पुढं केलं नाही, तरी नुसत्या हवा-पाण्याचा गप्पा मारुन ताक न घेता परत जायला कुणी येत नसतं, हे नक्की..
च्यायला, पब्लिक काय प्रतिसाद लिहील याची काय ग्यारंटी नाही. :)
-दिलीप बिरुटे
6 Mar 2012 - 8:40 pm | शैलेन्द्र
खत्त्त्त्तर्र्र्र्र्र्र्र्र्राआ लेख...
आवडला..
यापुढे वेलेंटाईन डेला लाल गुलाब न देता, ताकासाठी उभट भांड व घुसळायला रवी असा सेट द्यावा, व त्याला "दीवटे सेट" असे नाव द्यावे..
6 Mar 2012 - 9:37 pm | शिल्पा ब
काही लोक जसे कमतरता भरून काढण्यासाठी पोर्श, bently वगैरे गाड्या घेतात तसे हे लेख पडतात. गाड्या काही सगळ्यांनाच परवडत नैत!!
7 Mar 2012 - 1:28 am | आत्मशून्य
.
6 Mar 2012 - 11:28 pm | पिंगू
चला.. प्रेमाचा गुलकंद उधळायला ऑनलाईन लपाछुपीच्या जागा शोधुया म्हणतो..
- (अजून एकटा) पिंगू
6 Mar 2012 - 11:53 pm | जेनी...
ह्म्म
:P
:D
6 Mar 2012 - 11:49 pm | सुहास..
प्रेमळपणाचा आव आणणे हा पुरुषाचा डाव असून समोरच्या पार्टीला कधी एकदा चीतपट करून कुस्ती मारतोय हा त्यामागे मूळ हेतू असतो आणि यात गैर ते काहीच नाही. >>>
काही ही ! च्यायला, मग उगा 'सगळे पुरुष सारखेच' असा आरोप झाला की बोंबाबोंब कशाला ??
कारण आपला बहुमुल्य वेळ वाया घालवून उचंबळून येणाऱ्या निसर्गाला पुरुषानं का म्हणून कोंडून ठेवायचं? >>>
दिवटे काका, ( सटकल्यालं) लिखाण वगैरै म्हणुन ठीक पण सगळ काही तस झाल तर, मानवात आणि जनावरात काय फरक राहील ??
नाही म्हणजे थोडा - अधिक शारिरीक पिंच असतो हे अगदी मान्य, पण म्हणुन केवळ तीच भावना असते हे अमान्य , मुळात उद्युक्त व्हायलाच भावना आवश्यक असते हे माझे मत ...
बाकी चालु द्यात ( आणि सार्वजनीक संस्थळावर लेकी-बाळी आया-बहिणी ही असतात हे ही लक्षात असु द्यात. )
7 Mar 2012 - 11:35 am | विश्वनाथ मेहेंदळे
स्त्री पुरुष समानतेचे युग आहे. जे लेक-बाळ-बाप-भाऊ वाचू शकतात ते लेकी-बाळी आया-बहिणी पण वाचू* शकतीलच की.
* फक्त वाचू कशाला, लिहू पण शकतात आणि लिहितातच.
7 Mar 2012 - 12:59 pm | पियुशा
+१००००००००
टु सुहास
बाकी चालु द्यात ( आणि सार्वजनीक संस्थळावर लेकी-बाळी आया-बहिणी ही असतात हे ही लक्षात असु द्यात. )
7 Mar 2012 - 2:56 pm | अन्नू
प्रत्येक पुरुष हा सारखा नसतो. त्यामुळे प्रत्येकाच्या भावना, विचार, अंतरंग एकमेकांपासून बरेच भिन्न असतात.
शिवाय प्रेमाच्या बाबतीत बोलायच झालच तर प्रेम ही केवळ एक शुद्ध भावना असते. ती फक्त ज्याने प्रेम केले त्यालाच समजते किंबहुना त्याची त्याला जाण होते.
जर कोणी वासनेच्या हेतुने दुसर्याशी लाडीगोडी करत तिच्या मागे गोंडा घोळत असेल तर ते मुळात प्रेमच नसते.
"प्रेम हे देण्याचे नाव असते. हेतुपुरस्सर केलेले प्रेम हा फक्त स्वार्थ अणि कपटच असतो."
6 Mar 2012 - 11:56 pm | जेनी...
प्रतिक्रिया वाचन्यात पण कस्ल भारि सुख असत ...
:P
:D
7 Mar 2012 - 6:56 pm | शैलेन्द्र
+१११
7 Mar 2012 - 8:09 am | सूड
प्र का टा आ
7 Mar 2012 - 1:12 am | आत्मशून्य
जरा मर्दावानी डायरेक्ट, सतोड, स्पेसीफीक, अशा नेमक्या व उघड्या **ड्या देसी शब्दात मन मोकळं करायचं सोडुन हे काय प्रेम अनं भांडी-कुंडीच्या अलंकारीक लिखानात फसलैसा ?
7 Mar 2012 - 11:35 am | विश्वनाथ मेहेंदळे
इथे हेच पचेना झाले पब्लिक ला, आणखीन सडेतोड लिहिले तर काय होईल रे भाऊ ??
7 Mar 2012 - 2:30 pm | अत्रुप्त आत्मा
@आणखीन सडेतोड लिहिले तर काय होईल रे भाऊ ?? >>> हा धागा (सगळ्यांवर) उडेल. ;-)
7 Mar 2012 - 3:00 pm | परिकथेतील राजकुमार
जाता जाता एक प्रश्न सहज मनात आला, हे वरचे लिखाण श्री. दिवटेंच्या ऐवजी ज्यांना मिपावरचे सो-कॉल्ड धुरिणी, जेष्ठ, मिपाचे कालिदास-शेक्सपिअर वैग्रे म्हणले जाते असे किंवा इतर कोणी सन्माननीय सदस्याने केले असते अथवा माझ्या सारख्या हलकटाने जरी केले असते तर अशाच प्रतिक्रिया आल्या असत्या का ?
7 Mar 2012 - 10:46 pm | शिल्पा ब
सरसकट असेच लेख आले असते तर मी तरी त्या लेखनाविरुद्धच प्रतिक्रिया दिली असती.
हे दिवटे स्त्री अन पुरुष फक्त हे फक्त शारीरीक संबंधच ठेउ शकतात अशा मनोवृत्तीचे आहेत. मग जनावर अन माणसं यांच्यात काय फरक!!
जनरल प्रतिक्रीया इथेच देतेय:
अन हे लेखन जर अगदी शास्त्रशुद्ध अन माहीती देणारं वाटत असेल तर येता जाता इतर बायकांना अन लहान मुलींनासुद्ध हात लावणार्या नालायकात अन यांच्यात काय फरक करणार?
नुसतं इथेच का थांबा? वेगवेगळ्या जाती धर्मावरही असेच विचार असतील तर ते लेख का उडतात? फक्त तेच लेख विष पसरवतात का?
जाता जाता अजुन एक विचार : हे दिवटे एखादे स्त्रीपिसाट असु शकतात. काही घडण्याआधी किंवा अजुन काही घडण्याआधीची नांदी म्हणजे हे असे लेख असावेत असे वाटते. किंवा एकही स्त्री जवळ करत नाही म्हणुन आलेल्या नैराश्यातुन असे लेख पाडत असावेत.
7 Mar 2012 - 5:06 pm | प.पु.
परा ने टाकलेल्या धोबीपछाड साठी
पराला साष्टांग दंडवत.....
7 Mar 2012 - 9:02 pm | निनाद मुक्काम प...
माझ्या मते लग्न झालेल्या व न झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी व पु काळे ह्यांचा वपुर्झा वाचावे. अगर तू नळीवर ऐकावेत.
प्रेम म्हणजे काय ? ह्या वर १०० लेख व प्रत्येक लेखावर १०० प्रतिसाद आले तरी कळू शकणार नाही.
मी डोक्याने नाही हद्याने विचार करतो म्हणजे काय तर प्रत्यक्षात दोन्ही बाबतीत मेंदू व त्यात उद्यापित होणारी संप्रेरके हे आपण करतो त्या मागील विचाराचे स्त्रोत असते.
प्रेम ही भावना आहे. तर वासना ही देखील एक भावना आहे.
दिवटे साहेबांना एकेकाळी र धो कर्व्यांना गिरगावात जसा कडवा विरोध झाला तसा आता होत्त आहे. पण असे दिसत आहे की ह्या पर्वात तरी ते त्यांच्या ध्यासापासून ढळणार नाही आहेत.
असे हे मिपावरचे अनोखे ध्यास पर्व
बाकी हा धागा आणी लेख वाचून माझे मन गढूळ झाले आहे. मनात किल्मिषे दाटून आली आहेत .
माझ्या चित्तशुद्धीसाठी मी आता सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचणार आहे.
9 Mar 2012 - 9:36 am | सविता
डॉ. दिवटे हे स्त्री-पुरूष संबंध्/सेक्स या विषयावर चे शशिकांत ओक आहेत
किंवा
शशिकांत ओक हे "नाडी" या विषयावरील डॉ. दिवटे आहेत!
9 Mar 2012 - 12:33 pm | शिल्पा ब
याशिवाय हे मेडीकल डॉक्टर नसावेत असा दाट संशय आहे. मागे एकदा एका लेखात मुलांना चॉकलेट खायला दया असा सल्ला दिला होता..
9 Mar 2012 - 1:03 pm | नगरीनिरंजन
हम्म्म, तसे असल्यास त्यांनी पीएचडी कोणत्या 'विषया'त केली आहे याबद्दल उत्सुकता आहे.
9 Mar 2012 - 10:01 am | Pearl
मनात येईल तसंच वागायचे असेल तर कशाला पाहिजेत मानवी जीवनाचे निती-नियम.
कारण मनात नैसर्गिकरित्या एखाद्याचा खूप राग आला, खून करावासा वाटला, तर करा खून. मनात आज एकीबद्दल उद्या दुसरीबद्दल परवा तिसरीबद्दल नैसर्गिकरित्या आकर्षण वाटले तर त्या अनुशंगाने वागा लेखक म्हणतो तसा. कशाला निसर्गाशी प्रतारणा. हो की नाही. कसलाच फरक नको आपल्यात आणि जनावरात.