सत्तरीतल्या डिस्को संगीतातील एक नाव म्हणजे 'बोनी एम्'.
यांचं एकूण जरा विचित्रच आहे.....
या ग्रूपच्या मूळ मेम्बर्सपैकी 'लिझ मिचेल', 'मॅझी विल्यम्स', 'मार्सिया बेरेट' या तिघी जमैकन आणि लीड मेल व्होकलीस्ट 'बॉबी फारेल' हा अरुबाचा पण हा ग्रूप बनवण्यात आला जर्मनीमध्ये. त्यातही यांचा बोलावता धनी होता 'फ्रांझ रुथर', ज्याला जग 'फ्रँक फारीयन' म्हणून ओळखत होतं, तो जर्मन संगीतकार-गायक.
फ्रँक'ला 'आर अॅण्ड बी' संगीतात प्रचंड रस होता. हा संगीत प्रकार प्रामुख्याने कृष्णवर्णीयांमध्ये प्रसिद्ध आहे आणि यातील कलाकारही प्रामुख्याने त्यांच्यातलेच असतात. त्याचं आर अॅण्ड बी गाणं 'बोनी एम्' नावाने युरोपात गाजू लागलं तेव्हा त्याला असं वाटलं की ही त्याची गाणी आहेत यावर कुणी, तो गौरवर्णीय असल्याने, विश्वासच ठेवणार नाही. मग म्हणून त्याने 'बोनी एम्'चा चेहरा म्हणून 'बॉबी फारेल'ला पुढे केलं आणि स्वत: पडद्यामागे राहून नवी गाणी करू लागला. 'बोनी एम्'च्या गाण्याच्या मूळ अल्बम्समध्ये आणि अनेक टीव्ही कार्यक्रमांत पुरुषी आवाज 'फ्रँक'चाच असायचा पण चेहरा मात्र 'बॉबी'चा असायचा. यांची त्या काळातली गाणी नीट ऐकली आणि पाहिली तर त्याचं लिप-सिंकींग खूपदा लक्षात येतं.
'बोनी एम्'ची अशी वेगळ्या धर्तीची डिस्को गाणी आधी जर्मनीत आणि नंतर संपूर्ण युरोपात खूपच लोकप्रिय झाली. या प्रकारच्या गाण्यांना पुढे 'म्युनिक डिस्को' अशी संज्ञाही मिळाली.
'बोनी एम्'चं Daddy Cool हे एक असंच म्युनिक डिस्को गाणं आहे. 'बोनी एम्'चा चेहरा बॉबी फारेल याचा नाच 'अजब' या एकाच शब्दात व्यक्त करता येईल अशी खात्री आहे.
'बोनी एम्'च्या Daddy Cool या गाण्यामध्ये जी काही मजा आहे ना, ती शब्दामधली नाही तर ती 'फ्रँक'च्या संगीत दिग्दर्शनामध्येच आहे असं मला वाटतं. तरी हे गीत असं आहे -
She's crazy like a fool
What about it daddy cool?
She's crazy like a fool
What about daddy cool?
I'm crazy like a fool
What about daddy cool?
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
She's crazy like a fool
What about daddy cool?
I'm crazy like a fool
What about daddy cool?
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
She's crazy about her daddy
Oh she believes in him
She loves her daddy
She's crazy like a fool
What about daddy cool?
I'm crazy like a fool
What about daddy cool?
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
Daddy, daddy cool
छायाचित्रे आंतरजालावरून
प्रतिक्रिया
24 Jan 2012 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा
बोनी एम म्हंजे...आमच्या(शाळेतल्या दिवसातल्या) विंग्रजी कलेक्षन मधला महत्वाचा दुवा...![](http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif)
बर्याच अठवणी ताज्या झाल्या लेखा मुळं...
बाय दी रिटर्न ऑफ बॅबिलॉन हे त्यांचच गाणं ना?माझ्या अठवणी प्रमाणे
नाइट फ्लाइट टू व्हिनस तर अजुनही मला अठवतं..तेंव्हा त्याचे हेडफोनवर स्टिरिओफोनिक इफेक्ट ऐकायला मजा यायची...मला वाटतं त्या अल्बमचं नाव रशपुटिन..का कायसं होतं(आंम्हाला दुकानातल्या क्यासेटी परवडायच्या नाहित :-( म्हणुन आंम्ही जुन्या/चोर बाजारातनं आणायचो...१०/१० रुपायला :-) )
मज्जा आली पण लेख वाचायला...असच लिहा पुढे त्यांच्या गाण्यांबद्दल
24 Jan 2012 - 6:08 am | गवि
हो.. अगदी
घराघरात असायची बोनी एमची कॅसेट किंवा रेकॉर्ड
बाय द रिव्हर्स ऑफ बॅबिलॉन हे गाणं त्यांचंच.
23 Jan 2012 - 11:44 pm | अन्नू
मस्तच आहे.
मध्येच शाहरुख खानच्या गाण्याची आठवण आली-
डॅडी कुल- कुल- कुल
मेरा बेटा फुल- फुल- फुल!! ;)
24 Jan 2012 - 2:08 pm | टूळ्टूळ
गाणे चांगले आहे पण..... त्या गाण्यातली एक गायिका मधेच सीत्कारल्यासारखे आवाज काढते ते का बरे ? गाण्याच्या ओळी वाचल्यावर ह्या आवाजाचा संदर्भ लागत नाही असे वाटते.
टूळ्टूळ