गीतगुंजन - ९ : My Heart Is Beating

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
5 Jan 2012 - 8:17 pm

गीतगुंजन - ८, गीतगुंजन - ७, गीतगुंजन - ६, गीतगुंजन - ५, गीतगुंजन - ४, गीतगुंजन - ३, गीतगुंजन - २, गीतगुंजन - १

गीतगुंजन - ९ : My Heart Is Beating -> Preeti Sagar

भारतातही डीसेंट इंग्लिश गाण्यांची कमी नाही आणि मला ताबडतोब आठवणारं पहिलं भारतीय इंग्लिश गाणं प्रीति सागरचं "My Heart is beating" हे होतं. विचार केला यावर लिहावं.

खरं तर हे काही भारतीय हिन्दी चित्रपटामधलं पहिलं इंग्लिश गाणं नाही. बाँबे टॉकिजच्या १९३३ सालच्या 'कर्मा' नावाच्या चित्रपटामध्ये पहिल्यांदा देविकाराणीने पहिल्यांदा इंग्लिश गाणं गायलेलं. त्याचे बोल होते, ""Now The Moon Her Light Has Shed." 'कर्मा' हा इंग्लिश - हिन्दी असा द्वैभाषिक चित्रपट होता.

मग १९७५ साली चित्रपट आला 'ज्युली'. एका एंग्लो-इंडियन कुटुंबाची कहाणी सांगणारा हा सिनेमा. स्वत:ला इतर भारतीय समाजापेक्षा वेगळ समजणारं, उच्च समजणारं, बदलत्या सामाजिक परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेऊ इच्छिणारं असं हे कुटुंब आणि त्यातली ही ज्युली, सर्वात थोरली. इंग्लिश एटिकेट्स जपणारे कुटुंबीय जेवणानंतर ज्युलीला गाण्याचा आग्रह करतात आणि तेव्हा ती हे गाणं प्रिती सागरच्या आवाजात गाते.

तारुण्याच्या उम्भरठ्यावर असलेली ज्युली शिकत असते, बाहेरच्या जगात, समाजात फिरत असते. तिच्यात तिच्या पालकांचा विशेषत: तिच्या आईचा 'कूपमंडूक'पणा आणि स्वत:ला इतरांपेक्षा निराळ समजण्याचा दृष्टीकोन नसतो. या गाण्यात तिचे तिच्या वयाला आणि काळाला साजेसे विचार फार आनंद देतात. ज्युली चित्रपटाचे गीतकार 'आनद बक्षी' आहेत पण मला नक्की कल्पना नाही की या गाण्याचे नेमके गीतकार कोण आहे. संगीतकार आहेत राजेश रोशन....

गाणं अप्रतिम आहे आणि माझ्या मते इथे स्थान मिळण्यासाठी योग्य आहे.

जरूर आनद घ्या....

आणि हे 'My Heart Is Beating' गीत

My heart is beating, keeps on repeating
I' m waiting for you - 2

My love encloses a plot of roses
And when shall be then our next meeting
Cause love you know
That time is fleeting, time is fleeting
Time is fleeting

My heart is beating, keeps on repeating
I' m waiting for you

My love encloses a plot of roses
And when shall be then our next meeting
Cause love you know
That time is fleeting, time is fleeting
Time is fleeting

Oh when I look at you
The blue of heaven seems to be deeper blue
And I can swear that
God himself seems to be looking through
Zu zu zu zu ru zu, I' ll never part from you
And when shall be then our next meeting With love you know
That time is fleeting, time is fleeting
Time is fleeting

Spring is the season
That drops the reason of lovers who are truly true
Young birds are mating
While I am waiting, waiting for you
Darling you haunt me, say do you want me
And if it is so, when are we meeting
Cause love you know
That time is fleeting, time is fleeting
Time is fleeting

My heart is beating, keeps on repeating
I' m waiting for you
My love encloses a plot of roses
And when shall be then our next meeting
Cause love you know
That time is fleeting, time is fleeting
Time is fleeting

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

छान आहे हे गाण
ऐकताना मस्त वाटतं

विलासराव's picture

5 Jan 2012 - 9:05 pm | विलासराव

हे बरं वाटलं बॉ ऐकायला.

छान आहे ऐकायला,माझ्या
आवडत्या गाण्यापैकी एक...

प्रचेतस's picture

5 Jan 2012 - 11:09 pm | प्रचेतस

मस्त गाणं
खूप आवडलं ऐकायला.

मराठी_माणूस's picture

6 Jan 2012 - 12:26 pm | मराठी_माणूस

राजेश रोशन ने ज्युलीला दिलेल संगीत हे नेहमीपेक्षा वेगळ संगीत होत.

प्रास.. मस्त गोड गाणं आहे.. गीतगुंजनमधे नक्कीच येण्यासारखं..

आत्मशून्य's picture

6 Jan 2012 - 3:50 pm | आत्मशून्य

.

मराठी_माणूस's picture

6 Jan 2012 - 9:09 pm | मराठी_माणूस

एक अडाणी शंका. आता पर्यंत ज्या ज्या गीतांचे शब्द इथे वाचले , ती गाणी कोणत्या वृतात बसतात. ध्रुवपद, कडवे, यमक असा काही प्रकार दीसत नाही.

आनंदी गोपाळ's picture

6 Jan 2012 - 10:27 pm | आनंदी गोपाळ

लै आवडतं गाणं हाय!
पिक्चर बोगस. अन सगळी गानी लै झक्कास!

That time is fleeting, time is fleeting
Time is fleeting ~

गायलेले इंग्रजी शब्द कळतात असं हे एकमेव गाणं.... खुप मस्त आहे. गर्लफ्रेंड कशी असावी याचं मनात चित्र या पिक्चरनं उभं केलं होतं.

सहमत....
मी पहिल्यांदा खालचे शब्द न वाचता गाण ऐकल आणि मला ते समजल!

विंनती :तुम्ही ब्रायन आदमच inside out टाका न..

हरीन्द्रनाथ चट्टोपादध्याय हे याचे गीतकार आहेत असे कोठेतरी वाचले होते. बाकी गाणी आनंद बक्षीची असावीत.

मस्त गाणे आहे, आणि ही माहितीही छान. कधीकधी चित्रपट्/गाणे पाहून सुद्धा बाकी संदर्भ नीट लक्षात आलेले नसतात. ते कळाल्याने आवडला लेख.

या चित्रपटात हे गाणे प्रीती सागरकडून, "साँचा नाम तेरा" हे अतिशय सुंदर गाणे आशा व उषा कडून, आणि "ये राते नयी पुरानी" हे गाणे लता कडून गाऊन राजेश रोशन ने खूप वैविध्य आणले होते गाण्यांत.

मस्त कलंदर's picture

7 Jan 2012 - 3:01 pm | मस्त कलंदर

माझं खूप आवडतं गाणं आहे हे.
धन्यवाद.

अवांतरः या सिनेमातल्या हिरॉईनला पाहण्यापेक्षा मी छोट्या श्रीदेवीलाच पाहात होते. :-)

पैसा's picture

7 Jan 2012 - 5:52 pm | पैसा

बर्‍याच वर्षानी आलेलं इंग्लिश गाणं आणि प्रीती सागरचा लता आशा यांच्यापेक्षा वेगळा आवाज हे कॉम्बिनेशन लोकाना नेहमीपेक्षा वेगळं म्हणून आवडलं असावं. त्यातही राजेश रोशन यांची गाणी तरुणाना आवडतील अशी, अगदी आत्ता आता आलेल्या 'कहो ना प्यार है' पर्यंत असल्यामुळे ही हे गाणं प्रचंड हिट झालं.