गीतगुंजन - ५
गीतगुंजन - ४
गीतगुंजन - ३
गीतगुंजन - २
गीतगुंजन - १
गीतगुंजन - ६ : Its My Life --> Jon Bon Jovi
पडद्यावर बॉन जोवी, लॉस एंजलीस शहरातल्या सेकण्ड स्ट्रीट टनेल मध्ये गातोय आणि ते टॉमी आपल्या घरून कॉम्प्यूटरवर लाईव बघतोय. इतक्यात त्याला त्याच्या जिना नावाच्या मैत्रीणीचा फोन येतो. ती त्याच ठिकाणी ते गाणं ऐकतेय आणि त्याला विचारतेय, "अरे तू कुठेयस? इथे बॉन जोवी धमाल गातायत तर ताबडतोब ये. तुझ्याकडे फक्त ५ मिनिट्स आहेत.
"
आणि या नंतर पडद्यावर एक तुफानी धावाधाव दिसते. बॉन जोवीच्या कॉन्सर्टसाठी जीवाच्या आकांताने पळणारा टॉमी, त्याच्या मार्गात येणारे निरनिराळे अडथळे, या अडथळ्यांना चुकवून ते गाणं लाईव ऐकायला जाण्यासाठी केलेले त्याचे प्रयत्न आणि हे सारं होत असताना पार्श्वभागी ऐकू येणारं बॉन जोवीचं गाणं, "Its My Life."
हे सारं एक भन्नाट रसायन आहे.
ऑस्कर विजेता (सर्वोत्तम ध्वनि-मुद्रणासाठी) चित्रपट यु-५७१ च्या चित्रिकरणानंतर काही दिवसातच २००० साली बॉन जोवीने हे गाणं, रिची साम्बोरा आणि मॅक्स मार्टिन यांच्या सहकार्याने लिहिलं आणि आपल्या 'क्रश' नावाच्या अल्बमसाठी रेकॉर्ड केलं. यातल्या "Its My Life" या शब्दांमुळे हे गाणं सर्व थरातल्या लोकांकडून आणि त्यातही विशेषत: नवयुवकांकडून स्वत:चं आयुष्य स्वत: घडवण्याच्या विचाराने मोठ्याप्रमाणावर उचललं गेलं आणि परिणामी ते अनेक देशांच्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत "चोटीकी पादान पर" जाऊन बसलं.
चपखल शब्द, मस्त चाल, सॉलिड रिदम, सुरेल सिंथेसायजर आणि जबरदस्त गिटार रिफ यांचा एकत्रित परिणाम म्हणून या गाण्याला ग्रॅमी अवोर्ड्सचं 'सर्वोत्तम रॉक' गाण्याचं नॉमिनेशनही मिळालेलं.
एकदा बॉन जोवीचं हे खतरनाक रॉक गाणं आणि त्याचा अप्रतिम विडिओ अवश्य बघा......
हे गीत -
This ain't a song for the brokenhearted
No silent prayer for the faith departed
And I ain't gonna be just a face in the crowd
You're gonna hear my voice when I shout it out loud
It's my life
It's now or never
I ain't gonna live forever
I just wanna live while I'm alive
(It's my life)
My heart is like an open highway
Like Frankie said, "I did it my way"
I just wanna live while I'm alive
'Cause it's my life
This is for the ones who stood their ground
For Tommy and Gina who never backed down
Tomorrow's getting harder, make no mistake
Luck ain't even lucky, gotta make your own breaks
It's my life
And it's now or never
I ain't gonna live forever
I just wanna live while I'm alive
(It's my life)
My heart is like an open highway
Like Frankie said, "I did it my way"
I just wanna live while I'm alive
'Cause it's my life
You better stand tall
When they're calling you out
Don't bend, don't break
Baby, don't back down
It's my life
It's now or never
'Cause I ain't gonna live forever
I just wanna live while I'm alive
(It's my life)
My heart is like an open highway
Like Frankie said, "I did it my way"
I just wanna live while I'm alive
(It's my life)
And it's now or never
I ain't gonna live forever
I just wanna live while I'm alive
(It's my life)
My heart is like an open highway
Like Frankie said, "I did it my way"
I just wanna live while I'm alive
'Cause it's my life!
(छायाचित्र आंतरजालावरून साभार)
प्रतिक्रिया
21 Dec 2011 - 10:55 pm | गवि
झक्कास गाणं आहे प्रासबॉस...
कॉलेजात घेऊन गेलात एकदम... काय काय आठवतंय.
जाम बंडखोर गाणं.. बादवे.. याचा नाशिक ढोल मिक्स ऐकलाय का? सॉल्लिड..
22 Dec 2011 - 11:38 am | गवि
बॉन जोव्हीची आणखी काही नितांतसुंदर गाणी, अत्यंत खास असलेली आणि मला आवडणारी. ज्यांनी ऐकली नसतील त्यांनी जरुर ऐकावी.. तुनळी अॅक्सेस नसल्याने लिंका देऊ शकत नाहीये.
१) इन दीज आर्म्स.
२) बॅड मेडिसिन
३) डेड ऑर अलाईव्ह (गिटारचे पीसेस खंग्री)
४) ब्लेझ ऑफ ग्लोरी (यंग गन्स सिनेमा)
५) कीप द फेथ
६) बेड ऑफ रोझेस (काहीसे शांत आवडणार्यांसाठी.. पण शेवटी एकदम स्फोट..)
७) रन अवे
क्रॉसरोड्स हा त्याच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांचा आल्बम ही एक किंमतीच्या शतपट आनंददायक परतावा देणारी खरेदी ठरावी..
दीज डेज हा आल्बम मात्र गंडला आहे..
22 Dec 2011 - 12:50 pm | प्रास
१) इन दीज आर्म्स.
२) बॅड मेडिसिन
३) डेड ऑर अलाईव्ह (गिटारचे पीसेस खंग्री)
४) ब्लेझ ऑफ ग्लोरी (यंग गन्स सिनेमा)
५) कीप द फेथ
६) बेड ऑफ रोझेस (काहीसे शांत आवडणार्यांसाठी.. पण शेवटी एकदम स्फोट..)
७) रन अवे
22 Dec 2011 - 12:52 pm | गवि
वाह.. क्या बात... फार आभारी आहे प्रासभाऊ...
22 Dec 2011 - 11:36 am | निखिल देशपांडे
मला याचे अॅकॉस्टिक वर्जन जास्त आवडते.
22 Dec 2011 - 12:18 pm | प्रास
गाण्याची अनेक वर्जन्स देण्याचा पाश्चात्य संगीतात प्रघात आहे आणि अॅकॉस्टिक वर्जन हे त्याचं द्योतक आहे.
पण अडचण अशी आहे की बरेचदा या गोष्टी गाण्याची जातकुळी बघून होत नाहीत. काहीसा त्या गाण्याच्या कलाकाराचा आपण हेच गाणं अशा वेगळ्या प्रकारेही गाऊ शकतो हे दाखवण्याचा अट्टाहास म्हणून असा प्रयोग केला जातो. त्याचच Its My Life चं अॅकॉस्टिक वर्जन हे रूप वाटतंय.
Its My Life गीतानुसार ते ज्या पद्धतीने म्हणणं अपेक्षित आहे ती पद्धत अवलंबूनच मूळ गाण्याची चाल आलेली आहे असंच वाटतं. अॅकॉस्टिक वर्जनमधलं हळूवारपण इथे रसभंग करतंय असं मला वाटलं म्हणून त्याची लिंक मी या भागात दिली नाही.
दर वेळी असंच होतं असं नक्कीच मी म्हणणार नाही. कारण ईगल्सचं हॉटेल कॅलिफोर्निया आणि हॉटेल कॅलिफोर्निया ही हार्ड रॉक आणि अॅकॉस्टिक दोन्ही वर्जन्स भन्नाट आहेत.
असो. शेवटी तुमच्या आवडीबद्दल आदर आहेच.
धागा वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे.
:-)
22 Dec 2011 - 10:39 pm | निखिल देशपांडे
माझ्या बाबतीत म्हणशील तर तुझ्या प्रमाणे माझे पण अनेक गाण्यांसोबत होतेच.. ओढुन ताणुन केलेले वर्जन्स फारच कंटाळवाणे ठरतात..
पण या गाण्याचा बाबतीत म्हणशील तर जेव्हा मी अकॉस्टिक वर्जन पहिल्यांदा ऐकले त्यावेळच्या मनस्थीतीचा/वातावरणाचा परीणाम असावा असे मला वाटते... त्या आधी अनेक वेळा हार्ड रॉक वर्जन एकुन सुद्धा हे गाणे मनातुन आवडले...
बाकी हॉटेल कॅलीफॉर्नीया बद्दल काहीच बोलु शकत नाही... दोन्ही बेस्टच...
आता या सिरीज मधे कोणते गाणे पुढे घेताय???? थोडे आगामी आकर्षण असे काही द्या ना...
22 Dec 2011 - 12:26 pm | यशोधरा
भारी.
22 Dec 2011 - 9:53 pm | मराठी_माणूस
एक अडाणी शंका. ईंग्लीश गाणी बहुत करुन जीव खाउन ओरडूनच का म्हटली जातात
22 Dec 2011 - 10:01 pm | प्रास
तसं काही नसतं मराठी माणसा!
काही गाण्यांची गरज असते तशाप्रकारे गायन करायची जसं वरचं Its My Life गाणं. त्यात एक प्रकारचा स्वतःच्या जीवनाचा कंट्रोल स्वतःकडेच राखणार', असा काहीसा भाव आहे तो हळूवारपणे कसा सांगणार?
तोच मुद्दा निदेंच्या प्रतिसादाच्या उत्तरात मांडला आहे. निदेंना याच गाण्याचे हलके-फुलके अॅकॉस्टिक वर्जन आवडले आहे. हे असे आहे.
मला व्यक्तिशः हार्ड रॉक वर्जन प्रकार आवडला ज्याची मीमांसा मी वर केली आहे.
शेवटी प्रत्येकाला स्वतःची आवड असते आणि किमान मला त्याच्याबद्दल आदर आहे.
वरचं गाणं ऐकून असं म्हणता येणार नाही की सर्वच गाणी अशी ओरडून म्हंटली असतात. ते गाण्याच्या जातकुळीनुसारच ठरतं.
22 Dec 2011 - 11:11 pm | प्रभो
माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक...
प्रासभौ...पुढच्या भागात समर ऑफ ६९ येऊ दे.. :)
22 Dec 2011 - 11:15 pm | प्रास
ब्रायन अॅडम्स येणार गीतगुंजनवर हे नक्की!
अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
:-)
23 Dec 2011 - 11:20 am | गवि
ब्रायन अॅडम्स येणार गीतगुंजनवर हे नक्की!
>>>>
वा वा... आनंदीआनंद..
क्लाऊड नंबर नाईन, रन टू यू ही दोन गाणी विसरु नयेत..