गीतगुंजन ४
गीतगुंजन ३
गीतगुंजन २
गीतगुंजन १
गीतगुंजन ५ : "Come On Eileen"
ऐशीचं दशक हे सर्वार्थानं पॉप संगीताचं दशक मानलं जातं. या काळात इतर प्रकारचं संगीत निर्माणच झालं नाही असं नाही पण यासाठी की हा काळ 'किंग ऑफ पॉप' हे बिरुद मिळालेल्या 'मायकल जॅक्सन'चा होता. आज पॉप संगीतच काय पण कोणत्याही प्रकारचं पाश्चात्य संगीत न आवडणार्या माणसालाही 'मायकल जॅक्सन' हे नाव माहिती असतं. या दशकात एका पाठोपाठ एक अप्रतिम गाणी देऊन मायकल जगभरातल्या संगीतप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनलेला.
पण या लेखाचा विषय आत्ता मायकल जॅक्सन किंवा पॉप संगीत नसून थोडा निराळाच आहे. जगभरात लोकप्रिय गाण्यांची यादी चार्ट्स या नावाने बनवली जाते. वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचे त्यांचे चार्ट्स बनवले जातातच पण पाश्चात्य संगीतात, गाण्याची जगभरातली प्रसिद्धी, अमेरिकेतल्या बिलबोर्ड टॉप १०० काऊण्टडाऊन चार्टमधील त्या गाण्याच्या स्थानावरून ओळखली जाते. गाणं तिथे पहिल्या १० त असेल तर त्या गाण्याची जागतिक विक्री तुफान होते असं मानलं जातं आणि काही अंशी ते खरंही आहे. कारण या संगीताचा मुख्य ग्राहक अमेरिका आहे आणि तिथल्या चार्टमध्ये पहिल्या १० त म्हणजे तडाखेबंद विक्रीचा पुरावाच, नाही का?
तर झालं असं होतं की या बिलबोर्ड टॉप १०० चार्टमध्ये मायकेल जॅक्सन १९८१ पासून अगदी ठाण मांडूनच बसलेला. आता त्याची गाणीच इतकी चांगली होती की कोणत्या ना कोणत्या आकड्यावर ती असायचीच. त्याचं 'बिली जीन किंग' हे गाणं अनेक आठवडे पहिल्या क्रमांकावर होतं. पण १९८३च्या एप्रिल महिन्यात या गाण्याला जोरदार धक्का देऊन बाजूला सारलं, 'डेक्सीज मिडनाईट रनर्स' या ग्रूपच्या 'कमॉन आयलीन' या गाण्याने. त्या काळात ही तशी धक्कादायकच घटना होती.
'डेक्सीज मिडनाईट रनर्स' हा ७८ साली बनलेला मूळचा प्रसिद्ध ब्रिटिश ग्रूप. रॉक, पॉप, जॅझ, ब्लूज यांचं मिश्रण करून 'सोल' तर्हेचे संगीत बनवणारा नि गाणारा. त्यांच्या संगीताला 'न्यू वेव म्युझिक' अशा नावानेही संबोधलेलं आढळतं. त्यांचा केवीन रोलँड हा म्होरक्या गायक. 'डेक्सीज मिडनाईट रनर्स'च्या Too-Rye-Ay नावाच्या अल्बममध्ये त्यांनी, केवीन रोलँडने, जिम "बिग जिम" पॅटर्सन आणि बिली अॅडम्स यांच्या सहकार्याने लिहिलेलं 'कमॉन आयलीन' हे गाणं गायलेलं आहे.
'बिली जीन किंग'ला पहिल्या क्रमांकावरून बेदखल करणार्या या गाण्याची सुरूवात सेल्टिक-आयरिश तर्हेच्या फिडल (व्हायोलीन) वादनाने होते. पण पुढे गाण्यात रॉक, जॅझ, पॉप आणि कंट्री प्रकारच्या संगीताचं एक भन्नाट मिश्रण होतं आणि हे गाणं जसं जसं पुढे सरकतं तसं तसं आपली पकड घेत जातं. एका विशिष्ठ लयीत सुरू झालेलं गाणं मध्येच विलंबित लयीत सरकतं आणि तिथून हळू हळू लय वाढवून शेवटाला पार नादावून टाकतं. गाण्याच्या अंतर्याच्या संगीतामध्ये बॅन्जो, गिटार, फिडल, सॅक्सोफोन आणि ऑर्गन यांचं एकत्र रसायन पार वेड लावतं. सुरूवातीपासून ड्रम्सने अख्ख्या गाण्याला असं जबरदस्त तोलून धरलंय की कुठेच पकड सुटत नाही. नीट कान देऊन ऐकाल तर बॅन्जोने जोडलेलं कंट्री-कनेक्शन भन्नाट आहे. केवीन रोलँडचा आवाजही गाण्यातली भावना व्यवस्थित श्रोत्यापर्यंत पोहोचवतो.
तर ऐका हे 'डेक्सीज मिडनाईट रनर्स'चं 'कमॉन आयलीन'
या वरच्या गाण्याचं कवर वर्जन १९९६ साली 'सेव फेरीज' नावाच्या कॅलिफोर्नियाच्या अमेरिकन ग्रूपने, त्यांच्या 'इट मीन्स एव्हरीथिंग' नावाच्या दुसर्या अल्बममध्ये गायलं. त्याचबरोबर हे गाणं त्यांनी 'सिंगल' स्वरूपातही बाजारात आणलं आणि ते ही प्रचंड लोकप्रिय झालं. 'सेव फेरीज'ने या गाण्याचा मूळ ढाचा तोच ठेवला पण त्यांनी जे फरक केले त्यामुळे अनेकांना हे गाणं मूळ गाण्यापेक्षाही जास्त आवडलं.
'सेव फेरीज'ने केलेला मुख्य फरक म्हणजे गायक. त्यांची म्होरकी मोनिक पॉवेल नावाची गायिका होती. त्यामुळे अर्थातच गाण्याचा आवाज 'स्त्री'चा झाला आणि होय महाराजा, हा फरक गाण्याला एक वेगळीच पातळी मिळवून देतो! या गाण्यात मोनिक जबरदस्त गाते आणि विडिओत दिसते सुद्धा मस्त! याशिवाय 'सेव फेरीज'ने मूळ गाण्यातल्या बॅन्जो आणि फिडल या वाद्यांना फाटा दिला आहे पण त्याजागी ट्रंपेट आणि थ्रॉम्बोन वापरलेलं आहे. यामुळे झालंय काय की गाणं एकदम जॅझ वळणाचं रॉक गाणं झालंय. गाण्याची सुरूवातही मूळ गाण्यापेक्षा द्रुत लयीत होते त्यामुळे ड्रम्सची कारागिरीही भन्नाट झालीय. एकाच गाण्याला थोडीशी वेगळी ट्रीटमेण्ट दिल्याने त्यांच्यात कसा फरक पडतो हे या दोन गाण्यांवरून चटकन् लक्षात येतं.
तेव्हा आता ऐका 'सेव फेरीज'चं 'कमॉन आयलीन'
हे अख्खं गाणं "Come On Eileen"
Poor old Johnny Ray
Sounded sad upon the radio
Moved a million hearts in mono
Our mothers cried
Sang along, who'd blame them
Now you're grown, so grown, now I must say more than ever
Toora loora toora loo rye aye
And we can sing just like our fathers
[Chorus:]
Come on Eileen, oh I swear (what he means)
At this moment, you mean everything
With you in that dress my thoughts I confess
Verge on dirty
Ah come on Eileen
These people round here wear beaten down eyes
Sunk in smoke dried faces
They're so resigned to what their fate is
But not us (no never), no not us (no never)
We are far too young and clever
Remember
Toora loora toora loo rye aye
Eileen I'll hum this tune forever
Come on Eileen oh I swear (what he means)
Ah come on, let's take off everything
That pretty red dress Eileen (tell him yes)
Ah come on let's, Ah come on Eileen
That pretty red dress, Eileen (tell him yes)
Ah come on let's, ah come on Eileen
Please...
Come on Eileen too-loo rye-aye
Come on Eileen too-loo rye-aye
Toora toora-too-loora
Now you have grown, now you have shown, oh Eileen
Come on Eileen, these things they are real and I know
how you feel
Now I must say more than ever
things round here have changed
Too-ra loo-ra too-ra loo-rye-aye
[Chorus]
आशा आहे गीतगुंजन मालिकेतलं हे ५ वं पुष्प आवडलं असेल.
जाता जाता - 'कमॉन आयलीन'ने मिळवलेल्या बिलबोर्ड टॉप १०० काऊण्टाडाऊन चार्टमधल्या पहिल्या स्थानाचं सुख फक्त एकच आठवडा टिकलं. त्यांना दुसर्याच आठवड्यात मायकेल जॅक्सनच्या 'बीट इट' या गाण्याने धक्का देऊन स्वतःची स्थापना पहिल्या क्रमांकावर केली.
प्रतिक्रिया
18 Dec 2011 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपले लेखन वाचतो आहे.
-दिलीप बिरुटे
18 Dec 2011 - 11:56 am | पियुशा
आमच्या सारख्या अज्ञानी लोकाना तुमच्या या धाग्यातुन बरिच माहीती मिळत आहे
धन्यवाद :)
18 Dec 2011 - 5:41 pm | जमीर इब्राहीम 'आझाद'
आणि पहिला उद्गार आला "बापरे... !! काय जबरी आहे या माणसाची हॉबी..! "
खुप खुप धन्यवाद तुम्हला..!
गीतगुंजन मालिकेतलं हे ५ वं पुष्प आणिए आधिची पुष्पे सुद्धा खुपच वाचनीय होती..!!
:-)
18 Dec 2011 - 6:21 pm | किचेन
गाण सुंदर आहेच.पण तुमच परीक्षण आणि माहिती, आणि लेखनशैलीही अतिशय सुंदर.लिहित राहा आम्ही वाचतोय.
19 Dec 2011 - 10:03 am | गवि
या गाण्यात मोनिक जबरदस्त गाते आणि विडिओत दिसते सुद्धा मस्त!
+१००
अगदी अगदी.. नियत फिरली माझी बघून..
अशा गाण्यांची ओळख करुन देऊन एक अनोखं काम करत आहेस प्रासभाऊ.. मनापासून आभार.