एवरु लेरनी

अन्या दातार's picture
अन्या दातार in जनातलं, मनातलं
6 Dec 2011 - 3:36 pm

काही गोष्टींचे मोल ती गोष्ट ज्याच्याकडे आहे त्याला जितकी कळते त्याहून चांगल्या तर्‍हेने ती गोष्ट ज्याच्याकडे नाही त्याला उमजत असावी. आईचे प्रेम म्हणजे काय? ममता म्हणजे काय? या गोष्टी कधी सांगून कळण्यासारख्या असतात काय? तर एखाद्या अनाथ म्हणून वाढलेल्याला ही जाणीव प्रकर्षाने होत असेल.
असो, सांगायचा उद्देश हा, की परवा आमच्या लाडक्या टॉलिवूड मधील एक निरंजन हा चित्रपट परत बघत होतो. त्यातीलच एक गाणं ऐकले आणि काही विचार उगाचच मनात आले.

गाण्याची एकंदर सिचुएशन अशी: नायिका(कंगना) मध्यरात्री धावत-पळत नायकाचा(प्रभास) शोध घेत जाते. काही गल्लीगुंड तिचा पाठलाग करतात. फारसे धावायला न लागता, एकदाचा नायक भेटतो आणि इतक्या रात्री काय झक मारायला म्हणून बाहेर पडलीस असे विचारत थप्पड लगावतो. नायिका त्याच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करते. नायक गुंडांना थँक्स म्हणून परतीची वाट धरायला सांगतो.
गुंड गेल्यावर, मगाचचा डायलॉग रिपीट करायला सांगितल्यावर नायिका साळसूदपणे नकार देते; आणि नायकाचा बांध फुटतो. अश्रू ढाळायला सुरवात करतो. नायिकेला सांगतो की "आजवर कुणीच मला प्रेम केले नाही. तुझे प्रेम आहे हे कळल्यावर मी रडेन नाहीतर काय करु?"

आणि अश्या रितीने एक सुंदर गाणे चालू होते.

गाण्याचे भाषांतर इथे देत आहे.

तुला कुणिच नाही असे वाटून घेऊ नकोस
मी तुझ्यासोबत आयुष्यभर असेन
अंधारात मी तुझ्यासाठी उजेड बनेन
कधीच स्वतःला एकटे समजू नकोस
माझं जीवन-मरण तुझ्याबरोबर असेल
डोळ्याच्या पापणीप्रमाणे मी तुझ्यासोबत असेन

प्रेमाने तुझ्या हनुवटीवरुन हात फिरवेन
तुझी ठसठसती जखम मी भरुन काढेन,
त्यामागचे दु:खही दूर करेन; तुझा श्वासही बनेन
भूतकाळाने तुला खुपच दु:ख दिले आहे
जरी वाईट आठवणी तुझ्यासोबत आहेत
तरी मी त्यावर फुंकर घालेन (जेणेकरुन तु भूतकाळ विसरशील)
तुझी शप्पथ, मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही
तुझ्या आनंदाची मी शाश्वती देते.

तुझा आवाज बनून मी तुझे नाव घेत राहिन
डोळ्यांनी नेहमीच तुझा शोध घेत राहिन
तुझ्या डोळ्यांची मी चमक बनून राहिन
नेहमी तुझाच विचार करत राहिन
तुझ्या कथेत मी ट्विस्ट बनून येईन
तुझी सहचारिणी बनेन
तुझे दु:ख मी घेईन, व तुला त्यातून मुक्त करेन
मीच तुझे पालक होईन
----------------------------------

गाणे आवडायची जी काही म्हणून कारणे असू शकतात ना, ती सगळी या गाण्यात आढळतात. सुंदर चाल, सुंदर शब्द, सुंदर पिक्चरायझेशन, सुंदर अभिनय..........अजुन काय सांगावे?
तर मंडळी, घ्या लुत्फ या सुंदर, अप्रतिम गाण्याचा.

कलासंगीतसमाजचित्रपटविचारआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

पियुशा's picture

6 Dec 2011 - 3:46 pm | पियुशा

हा हीरो कोण आहे रे ?
याचे आठ्वद्ड्यातुन एक दोन तरी पिक्चर असत्तात सेट म्याक्स वर (हिन्दी ड्ब )
असो गाण्याचा अर्थ भारी आहे :)

वपाडाव's picture

6 Dec 2011 - 7:07 pm | वपाडाव

प्रभास - http://en.wikipedia.org/wiki/Prabhas_Raju_Uppalapati

हे गाणं ऐका बाळांनो... मस्त सुरेल गाणं आहे....
बोल आहेत - मनसा नुव्वंटे चोटे चेप्पम्मा...

प्यारे१'s picture

6 Dec 2011 - 4:03 pm | प्यारे१

मस्त रे.........
अजून एक दाक्षिणात्य चित्रपट(?) चाहता दिसला. ;)

मी-सौरभ's picture

6 Dec 2011 - 4:13 pm | मी-सौरभ

>>सुंदर चाल, सुंदर शब्द, सुंदर पिक्चरायझेशन, सुंदर अभिनय

व्हिडो पाहुन प्रतिक्रिया देणेत येइल...

मस्त रे.
साउथिंडीयन चित्रपट बघत नसलो तरी हे गाणे लैच आवडले.
अन्या, पिक्चरची लिंक दे रे.

अन्या दातार's picture

6 Dec 2011 - 9:00 pm | अन्या दातार

सर्व प्रतिसादकांचे आभार.

वल्ली: तुनळीवर संपूर्ण पिक्चर १४ भागांमध्ये उपलब्ध आहे. इथे बघ

तुमच्या आणि वपाडाव यांच्या दाक्षिणात्य चित्रपट ज्ञानाबद्दल ऐकुन होतोच, हापिसात व्हिडो दिसत नाही आता घरी जाउन बघेन.

तुमच्याकडे जयम च्या चिन्नदे चिन्नदे ची लिंक आहे का रे ? दे ना इथंच.

वपाडाव's picture

7 Dec 2011 - 3:02 pm | वपाडाव

५०, ते चिन्नदे नव्हे तर सिन्नदो असे आहे.....
ही घ्या लिंक = http://www.youtube.com/watch?v=VCFqSCM4xhY

५० फक्त's picture

9 Dec 2011 - 7:49 am | ५० फक्त

दाचिपं वपाडावकाका यांना धन्यवाद.

आमच्या धडाडीच्या काळातलं हे गाणं बरेच दिवस सापडत नव्हतं, बहुदा चिन्न्दो चिन्नदे असं हुडकत होतो म्हणुन झालं असावं.

वपाडाव's picture

9 Dec 2011 - 1:41 pm | वपाडाव

दाचिपं
पदवी बद्दल मंडळ आपले आभारी आहे.....

इंटरनेटस्नेही's picture

8 Dec 2011 - 5:11 am | इंटरनेटस्नेही

चित्रपट ओळख आवडली.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2011 - 11:33 am | परिकथेतील राजकुमार

गाण्याची पार्श्वभूमी, गाण्याचे बोल सर्व काही सुंदर शब्दात व्यक्त केले आहे.
रसग्रहण एकदम आवडेश.

आता अशा काही गाण्यांबरोबरच लगे हात त्या चित्रपटाची देखील ओळख करून दिलीत तर अतिशय आवडेल.