मित्रहो,
हे आवाहन जर कोणाला इ-मेल ने आले असेल किंवा मिपाच्या धोरणात बसत नसेल तर उडवायला माझी अजिबात हरकत नाही.
खाली दिलेल्या मासिकाला आज ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत यासाठी ते अभिनंदनास पात्र आहे.
आपण सर्वजण त्यांचे अभिनंदन आणि आभारही मानूयात. या मासिकाचे संस्थापक श्री. गो.रा. परांजपे आपल्याला माहीत असतीलच. त्यांनी आकाशातल्या ग्रह तार्यांबद्दल जे पूस्तक लिहीले आहे तेच हे थोर गृहस्त.
मराठीत एवढी वर्षे विज्ञानाला वाहिलेले मासिक चालवायचे सोपे नसावे. आपण सर्वांनी याची वर्गणी ( वा्र्षिक रु. २००/- फक्त) भरून या कार्यास हातभार लावावा अशी विनंती.
वर्गणीचा अर्ज साठी येथे क्लिक करा : "अर्ज"
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
23 Jul 2011 - 8:23 pm | रणजित चितळे
मी वाचायचो मला आठवते वासंती काळे त्याच्या संपादक होत्या काही दिवस (वर्ष) नाव वासंतीच होते का आता आठवत नाही पण आडनाव काळे होते.
23 Jul 2011 - 9:11 pm | योगप्रभू
जयंतराव,
अर्जाच्या लिंकवर क्लिक करताच आमचा संगणक 'वॉर्निंग' द्यायला लागलाय.
त्यापेक्षा वर्गणी भरण्यासाठीचा पोस्टल अॅड्रेस नमूद करता का?
आजीवन वर्गणीदार होण्याची योजना आहे का?
23 Jul 2011 - 9:49 pm | जयंत कुलकर्णी
मला विशेष कल्पना नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला या मासिकाविषयी आजच कळाले. अर्थात श्री. परांजपे यांची सर्व पुस्तके माझ्याकडे असल्यामुळे हाही उपक्रम चांगला असणार असे वाटून आजच पैसे भरले.
13 Oct 2011 - 12:53 pm | सागर
महाराष्ट्रातून संपर्क करण्यासाठी वा वर्गणी भरुन अंक घरपोच मिळवण्यासाठी पत्ता असा लिहावा
महाराष्ट्रात वर्गणी २०० रुपये
सृष्टीज्ञान मासिक,
महात्मा फुले वस्तुसंग्रहालय,
१२०३, शिवाजी नगर, घोले रस्ता,
पुणे - ४११ ००४.
संपर्क : ०२०-२५५३२७५०
महाराष्ट्राबाहेरुन संपर्क करुन सृष्टीज्ञान घरपोच (अथवा ऑफिसपोच) मिळवण्यासाठी पत्ता इंग्रजीतूनच लिहावा
महाराष्ट्राबाहेर वर्गणी २००+२५ जास्तीचे पोस्टेज - एकूण २२५ रुपये चेक अथवा डिमांड ड्राफ्ट ने पाठवावेत.
इंग्रजी पत्ता:
Srushtidnyan Masik,
Mahatma Phule Vastusangrahalay
1203, Shivaji Nagar, Ghole road,
Pune - 411 004.
Contact: 020 – 25532750
25 Jul 2011 - 7:17 am | निनाद
इतके महत्त्वाचे विज्ञान संबंधित प्रकाशन असूनही त्याची एक साधी वेबसाईट नसावी?
जयंत साहेब संचालकांशी बोलाल का जरा?
मी पुढाकार घ्यायला किंवा मदतीला तयार आहे.
25 Jul 2011 - 10:37 am | जयंत कुलकर्णी
निनाद,
मी त्यांच्याशी बोलतो. लोकविज्ञन, तारांगण आणि सृष्टीज्ञान ही तिन्ही एकत्रच वाटचाल करतात असा अंदाज आहे. काय स्वरुपाची मदत आपण करू शकता व इच्छिता हे कळाल्यास, त्यातील योग्य माणसाची आपली गाठ घालून देता येईल.
धन्यवाद !
25 Jul 2011 - 7:19 am | निनाद
प्रकाशनाचे नाव सृष्टिज्ञान असे आहे. त्यावर मराठी विकीवर असलेला सृष्टिज्ञान (मासिक) लेख येथे आहे.
त्यात अधिक भर घालण्यास स्वागत आहे!
25 Jul 2011 - 9:13 am | Nile
इतकी वर्षे अखंडीत सूरू असलेल्या विज्ञानाच्या मराठी मासिकाबद्दल ऐकून फार बरे वाटले. मासिकाला मनापासून शूभेच्छा!
25 Jul 2011 - 9:24 am | सहज
हेच म्हणतो.
मनःपूर्वक शुभेच्छा! शिवाय वर्गणी देखील इतकी कमी आहे की वर्गणी भरुन हे अंक काही शाळांना भेट देता येतील!
माहीतीबद्दल धन्यवाद.
13 Oct 2011 - 3:09 pm | आत्मशून्य
हीच भावना आहे.
17 Oct 2011 - 1:29 pm | मदनबाण
वरील दोघांशी सहमत. :)
लहानपणी भाभा संशोधन केंद्राचे एक छोटेसे वैज्ञानिक माहितीचे पुस्तक वाचायचो ते या निमित्त्याने आठवले,बहुतेक कुतुहल नाव होत त्या पुस्तकाच.
14 Oct 2011 - 11:01 am | ५० फक्त
अंतर्नाद, विवेक आणि चित्रलेखाच्या यादीत हे पण टाकले गेले आहे, जयंत सर धन्यवाद.