भन्नाट ७

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
13 Sep 2011 - 2:08 pm

भन्नाट
भन्नाट २
भन्नाट ३
भन्नाट ४
भन्नाट ५
भन्नाट ६

"अरे ? मी कुठे म्हणतोय तुम्ही खोटे बोलताय म्हणून ? बरं मला सांगा मी. सुवास त्या खोलीला खिडक्या किती आहेत? खोलीच्या आत खोलीच्या समोर ? खोलीच्या बाजूला ?"

"साहेब खोलीला एकच खिडकी आहे जी मागच्या अंगणात उघडते आणि स्टॉकची खोली असल्याने आजूबाजूला प्लायवूड लावून ती बंद केलीये साहेब."

"इंटरेस्टिंग ! मला खरंच आश्चर्य वाटतंय मी. सुवास, की ह्या अशा गुहे सारख्या बंद खोलीत उभा राहून तुम्हाला हे तिघेही रेसरमधून इलियासवार आलेत हे कसे काय दिसले असावे?" ठाणकन अमरचा प्रश्न आदळला आणि सुवास आणि दीक्षितांचा एकदमच आ वासला गेला.
=====================================================
कोर्टात असह्य शांतता पसरली होती, अमरच्या अचानक बाणासारख्या सुटलेल्या प्रश्नाने झेले तर पूर्णपणे भंजाळलाच होता.

"झेले... मी काहीतरी विचारले तुम्हाला."

"ऑ .. म्हणजे म्हणजे साहेब ते... ते..."

"तुम्हाला आरोपी खरेच दिसले होते ? का दिसल्याचे तुम्हाला कोणी सांगायला सांगितले आहे ?"

"ऑब्जेक्शन युवर ऑनर ! " दीक्षित धडपडत उभे राहिले.

"सस्टेन्ड ! मिस्टर विश्वास .."

"सॉरी सर. झेले तुम्ही अजूनही उत्तर दिलेले नाहीत."

झेले एकदा अमरच्या तोंडाकडे आणि एकदा दीक्षितांच्या तोंडाकडे आलटून पालटून पाहत होता.

"झेले तुम्ही नक्की ह्या तिघांना पाहिलेत ? का हा तुमचा अंदाज होता ? झेले कोणाला पाठीशी घालताय तुम्ही ?"
अमरच्या प्रश्नांच्या सरबत्तीने झेले आता चांगलांच गांगरला होता.

"साहेब म्हणजे मी गाडी थांबल्याचा आवाज ऐकला आणि नंतर ह्या तिघांना बोलताना ऐकले. आणि मी जेव्हा पुन्हा खोलीतून बाहेर आलो तेव्हा हे तिघेही मला हॉटेलमधून बाहेर पडताना दिसले. त्यांवरून मी योग्य तो अंदाज बांधला."

"झेले, म्हणजे तुम्ही ह्यापैकी एकालाही प्रत्यक्ष बघितले नाहीत ? नीट विचार करून उत्तर द्या. अर्थात खोटी साक्ष दिल्याबद्दल तुरुंगात जायची तुमची इच्छा नसेल तर..."

"साहेब मी फक्त ह्यांचे बोलणे आणि गफूर साहेबांचे विव्हळणे ऐकले साहेब. खरंच सांगतोय साहेब."

"अर्रे ? पण मगाशी तर तुम्ही जिन्यावरून डोकावलेत तेव्हा तुम्हाला दारा बुलंद मारामारी करताना दिसले असे म्हणत होतात. झेले तुमची ती साक्ष खरी मानायची का ही ?"

"साहेब म्हणजे मी डोकावलो होतो आणि मला तो माणूस दिसला पण होता साहेब.. आणि..."

"गप्प बसा मिस्टर झेले ! तुम्ही अजून किती खोटे बोलणार आहात ? तुम्ही ना कोणाला पाहिलेत ना कोणाला बोलताना ऐकलेत. घटनेच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही पायात काच लागली म्हणून बाहेर पडलात ते एकदम पोलीस आल्यावरच उपस्थित झालात. मधल्या वेळात तुम्ही कुठे होतात मिस्टर झेले ?"

"खोटे आहे साहेब. मी ..मी इलियास मध्येच होतो."

"झेले तुम्ही कोणालातरी पाठीशी घालत आहात आणि ते तुम्हाला फार जड जाणार आहे. युवर ऑनर गरज पडल्यास ह्या साक्षीदाराला पुन्हा तपासण्याची मला परवानगी मिळावी. हे जाऊ शकतात."

अमरचे बोलणे संपले आणि जज केसरांनी घड्याळाकडे पाहिले. लंच अवर्सला कोर्ट थांबले आणि अमरने गोल्डीकडे धाव घेतली.

"गोल्डी १ तासात मला ह्या सुवासची पूर्णं हिस्ट्री पाहिजे. जोडीला इलियासच्या बॅक एंट्रेन्सचा नकाशा आणि इलियासमधून लॉजच्या दिशेनं उघडणार्‍या सगळ्या दरवाज्यांची माहिती."

"पण अमर एक तास म्हणजे..."

"ते मला माहिती नाही ! १० च्या जागी ३० माणसे लाव.. बट इन्फॉर्मेशन पाहिजेच आणि एका तासात."

टिक ... टिक....
कोर्टाचे दुपारचे सेशन सुरू झाले आणि काहीशा दुर्मुखल्या चेहर्‍याने बॅ. दीक्षित उभे राहिले.

"युवर ऑनर माझा पुढचा साक्षीदार आहे इन्स्पेक्टर ब्रिजेश लाल."

साक्षीदाराचे नाव एकताच कोर्टातला माणूस अन माणूस सावरून बसला. आता केसला खरा रंग भरायला लागला होता. ब्रिजेशची साक्ष महत्त्वाची. हा साक्षीदार जर दीक्षितांनी व्यवस्थित हाताळला तर केस काँक्रिट होणारच होणार.

ब्रिजेशनी सरावल्यागत शपथ घेतली आणि तो प्रश्नांचे वाट पाहतं उभा राहिला.

"इन्स्पेक्टर, ह्या सर्व गुन्ह्यांचा तपास तुम्हीच केलात. बरोबर ?"

"येस सर. एका विशेष आदेशाद्वारे हे सर्व प्रकरण माझ्याच ताब्यात देण्यात आलेले आहे."

"गुड ! तर इन्स्पेक्टर लाल, गुन्ह्यांची पार्श्वभूमी तर आम्ही जाणतोच, आता प्रत्यक्षात काय घडले त्याची हकिगत तुमच्याकडून ऐकायला कोर्टाला आवडेल."

"घटनेच्या दिवशी रात्री ११ च्या सुमारास आम्हाला 'सलमा' लॉज मधून गुन्ह्याची माहिती देणारा फोन आला. त्यावेळी ड्यूटीवर असलेले इन्स्पेक्टर नाईक आणी साथीदार तातडीने तिथे धावले. मी जेव्हा तिकडे पोचलो तेव्हा आरोपी क्रमांक एक मंदार पटवर्धन आणि आरोपी क्रमांक दोन दारा बुलंद हे अगोदरच तिथे बघ्यांमध्ये उपस्थित होते. गुन्हा ज्या रूममध्ये घडला ती रूम मंदार पटवर्धनांच्या नावावर बुक केलेली होती. ह्या दोघांसमोरच रूम उघडण्यात आली, आतली परिस्थिती आणि पोलिसांची शिताफी पाहून आरोपी खरेतर मनातून घाबरले होते, मात्र त्यापैकी एक आरोपी दारा बुलंद आमचे कडे तोडून पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र मंदार पटवर्धनला ताबडतोब घटनास्थळावरच अटक करण्यात आली."

"व्हेरी गुड वर्क इन्स्पेक्टर. रूममध्ये नक्की काय प्रकार घडला होता आणि तुम्ही कोणत्या पुराव्यांखाली आरोपी निश्चित केले ते आता कोर्टापुढे सांगा."

"रूमचे दार लोटलेलेच होते, मात्र दाराखालून रक्ताचा ओघळ पॅसेजपर्यंत पोचला होता. तो पाहूनच वेटरने बोंब ठोकली होती. एक मोठी रूम आणि वॉशरुम अशी आतली रचना होती. मयत गफूर आणि रघुवीर ह्यांची प्रेते खोलीत पडली होती तर दोन्ही स्त्रियांची वॉशरुम मध्ये. चौघांनाही एकाच प्रकारच्या अर्थात नेदरलॅंड अँड सिल्व्हीयाच्या कोल्टनी गोळ्या घालण्यात आलेल्या होत्या. रघुवीरच्या छातीत दोन आणि गफूरच्या डोक्यात एक गोळी घालण्यात आली होती. दोन्ही स्त्रियांवर आधी बलात्कार करून मग त्यांचा खून करण्यात आला होता. दोघींच्या कपाळात बरोब्बर एकेक गोळी मारण्यात आली होती."

ब्रिजेशचे वर्णन ऐकून कोर्टातला प्रत्येकजण मनात हळहळ व्यक्त करत होता. किती हे अमानुष क्रौर्य.

"त्यानंतर तुम्ही काय केलेत मिस्टर लाल ?"

"मंदारला आम्ही तातडीने घटनास्थळावरच अटक केली. गफूरची ओळख लगेचच पटली आणि तेव्हाच त्याच्या इलियास मध्ये घडलेली मारामारी आणि त्याला मिळालेली धमकी साक्षीदारांकडून समोर आली. इन्स्पेक्टर नाईकांवर पंचनाम्याचे काम सोपवून मी ताबडतोब दारा बुलंद आणि फिरोज इराणीच्या मागे धावलो. नशीब असे बलवत्तर की रघुवीरच्या घरी कोळीवाड्यात चौकशीला पाठवलेल्या टीमच्या ताब्यात विनासायास फिरोज इराणी सापडला. त्याच्या घेण्यात आलेल्या झडतीत त्याच्या गाडीत हत्येशी संबंधीत रिव्हॉल्वर देखील पोलिसांना मिळाले. पोलिसांनी त्याला जागेवरच अटक केली."

"आणि तिसरा आरोपी कसा ताब्यात आला इन्स्पेक्टर?"

"तासाभरातच दोन संशयितांना अटक झाल्याने आमचा उत्साह वाढला होताच. मधल्या काळात आम्हाला इलियास मध्ये आरोपींचे आणि गफूरचे झालेले सविस्तर बोलणेच रेकॉर्ड केलेले सापडले आणि सगळाच उलगडा झाला. पंचनामा करून इन्स्पेक्टर नाईक परत येताच आम्ही तीन तुकड्या करून दारा बुलंदच्या मागावर निघालो. आरोपी मात्र आम्हाला शिताफीने हुलकावणी देऊन पुन्हा लॉज मध्ये शिरला आणि तिथे त्याने ह्या केसमधील एक महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या लॉजच्या मालकाचा गळा दाबून खून केला. आम्ही पोचेपर्यंत आरोपी तिथून फरार झाला होता. शेवटी अथक प्रयत्नांनंतर आरोपी आमच्या ताब्यात आला."

"युवर ऑनर गुन्ह्यांची प्रत्यक्ष हकिगत आणि हेतू इन्स्पेक्टर ब्रिजेश लाल ह्यांच्या साक्षीतून उघड झाला आहेच. जसं जशी केस पुढे सरकेल तसतसे अजूनही पुरावे, कारणे आपल्या समोर येत राहतीलच. यू मे क्रॉस मी. विश्वास. " नाटकीपणाने झुकून दीक्षित म्हणाले आणि अमर हसत उभा राहिला.

एकवार अमरची निळी जादुई नजर कोर्टावरून फिरली आणि आता ह्या जादुगाराची करामत बघायला केसरांसकट सर्वजण सावरून बसले. अमर क्रॉस करणार म्हणल्यावर ब्रिजेश देखील स्वतःला पुन्हा पुन्हा सावरत होता.

"तर इन्स्पेक्टर ब्रिजेश लाल, आपण आत्ताच एकेका आरोपीला आपण शिताफीने कशी अटक केली ते कोर्टापुढे सांगितलेत. ऐकून खरेच खूप कौतुक वाटले मुंबई पोलीस डिपार्टमेंटचे. पण ह्या सगळ्यात तुम्ही आरोपी क्रमांक तीन दारा बुलंद ह्याला कसे पकडलेत त्याचे रोमहर्षक वर्णन सांगायचे का बरे टाळलेत ?" अमरची भेदक नजर ब्रिजेशच्या नजरेत मिसळली आणि ब्रिजेश सारखा इन्स्पेक्टर देखील क्षणभर थरारला. "सांगताय ना इन्स्पेक्टर आम्हाला ती हकिकत?"

ब्रिजेश काही न सुचत असल्यासारखा एकदम सुन्न नजरेने अमरकडे पाहतं होता. अमर असा काही स्टॅंड घेईल ह्याची त्याला कल्पनाच नव्हती. शेवटी अमरलाच त्याची दया आली आणि तो पुन्हा जज केसरांकडे वळला.

"इन्स्पेक्टर साहेब बहुदा स्वतःची स्तुती करायला लाजत असावेत. ठीक आहे ही हकिगत मीच कोर्टापुढे आणतो." अमर घाईघाईने आपल्या टेबलाकडे गेला आणि एक वर्तमानपत्र आणून त्याने जजसाहेबांना सादर केले.

"युवर ऑनर बॉम्बे मिररच्या २३ तारखेच्या ह्या अंकात पान नंबर एक वरती अगदी मोठ्या अक्षरात मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेले हे निवेदन बघा.

उजव्या कोपर्‍यात दाराचे स्केच आणि खाली माहिती देण्यात आलेली होती. 'सदर फोटोतील इसम हा तीन खून आणि दोन बलात्कारांसारख्या गुन्ह्यातला प्रमुख आरोपी असून सध्या फरार आहे. समाजविघातक अशा ह्या व्यक्तीची वा त्याच्या ठिकाणाची माहिती देणार्‍यास योग्य ते इनाम देण्यात येईल व त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

"पाहिलेत युवर ऑनर ? केस सरू होऊन निकाल लागायच्या आधी, रादर हातात काही ठोस पुरावे येण्याच्या आधीच डिपार्टमेंट एका निरागस नागरिकाला खुनी, बलात्कारी आणि समाजविघातक ठरवून मोकळे देखील झाले. पोलिसांचे काम हे संशयितांना पकडणे आहे का न्यायदान करणे आहे ? हा अधिकार ह्यांना कोणी दिला? ह्या अशा बेकायदा कृत्याबद्दल आणि माझ्या अशिलाची जाहीर बदनामी केल्याबद्दल सदर जबाबदार अधिकारी आणि सरकारी वकील ह्यांना योग्य ती समज देण्यात यावी."

जज केसरांनी एकदा नाखुशीने ब्रिजेशकडे पाहिले आणि धीरगंभीर स्वरूपात बोलायला सुरुवात केली. "सदर वर्तमानपत्रातील जाहीरात पाहता आणि त्यामागील डिपार्टमेंटचा हेतू लक्षात घेऊन देखील हे कृत्य अजिबात समर्थनीय नाही. ह्यापुढे पुन्हा असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट जाणीव हे कोर्ट देत आहे.

दीक्षितांकडे पाहून डोळे मिचकावत अमर पुन्हा ब्रिजेशकडे वळला. अपमानित ब्रिजेश कसातरी सावरून पुन्हा तयार झाला होता.

"इन्स्पेक्टर ब्रिजेश... तुम्ही जाऊ शकता.'

ऑ ? हे काय भलतेच ? अमरनी ब्रिजेशची उलटतपासणी घेतलीच नाही ? काय आहे तरी काय त्याच्या मनात ? ही केसच येवढी काँक्रिट आहे की अमरला आपला पराभव स्पष्ट दिसतोय ? का ह्या निळ्या कोल्ह्याला खरा गुन्हेगार ऑलरेडीच माहिती आहे ? ह्या शेवटच्या विचाराने मात्र बॅ. दीक्षितांच्या छातीत बारीकशी कळ उभी राहिली. स्वतःला कसेतरी सावरत ते उभे राहिले.

"युवर ऑनर माझा पुढचा साक्षीदार आहे बॅलेस्टिक एक्स्पर्ट मि. वाळवेकर."

अमर जणू काही ह्याच साक्षीची वाट पाहत असल्यासारखा पुढे झुकून बसला आणि ते पाहून दीक्षितांनी पुन्हा एकदा छातीत उठणार्‍या कळेला दाबण्याचा प्रयत्न केला.

(क्रमशः)

कथामौजमजाआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Sep 2011 - 2:20 pm | बिपिन कार्यकर्ते

आयला!

स्पा's picture

13 Sep 2011 - 2:24 pm | स्पा

जबराट

वाचतोय.....

परवाच किस्ना कडून सु शिंची पुस्तक वाचल्याने..
सर्व हिरो व्यवस्थित समजलेले आहेत
आता अधिक आपुलकीने हि मालिका वाचली जाईल असे नमूद करतो

छोटा डॉन's picture

13 Sep 2011 - 2:26 pm | छोटा डॉन

पुढे काय रे ?
च्यायला पटकन लिही बे !

- छोटा डॉन

किसन शिंदे's picture

13 Sep 2011 - 2:44 pm | किसन शिंदे

आता उत्सुकता खुप ताणली गेलीय... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.

अमर जणू काही ह्याच साक्षीची वाट पाहत असल्यासारखा पुढे झुकून बसला आणि ते पाहून दीक्षितांनी पुन्हा एकदा छातीत उठणार्‍या कळेला दाबण्याचा प्रयत्न केला.

या शेवटच्या वाक्याने खुदकन हसुच आलं... त्या टकल्या दिक्षीतच्या छातीत वारंवार येणार्‍या कळेने त्याला काहीच कसं होत नाही, प्रत्येक वेळेला अमरच्या करामती पाहत हे आपले छातीतली कळ सोसायला उभेच असतात. :D

धमाल मुलगा's picture

13 Sep 2011 - 3:03 pm | धमाल मुलगा

मित्रा, सार्बिट्रेट!
सार्बिट्रेटच्या जोरावर तर दिक्षीत अजूनही केससाठी उभे राहू शकतायत. :)

स्पा's picture

13 Sep 2011 - 3:16 pm | स्पा

दिक्षीत

दीक्षितांनी आत्तपर्यंत साधारण वयाची ९० दी आरामात गाठली असले नै ;)

धमाल मुलगा's picture

13 Sep 2011 - 4:01 pm | धमाल मुलगा

कल्पना नाही बुवा.

दिक्षीतांच्या सहस्त्रदर्शनसोहळ्याचं आमंत्रण मिळालेल्यांपैकी कोणी भाग्यवंत ह्याचा खुलासा करेल काय?

धन्यवाद. ;)

चिंतामणी's picture

13 Sep 2011 - 2:57 pm | चिंतामणी

दोन महिन्यांनी ७वा भाग आला.

श्री चरणी पुन्हा प्रार्थना करतो की लेखक परा यांचे प्रकृती स्वास्थ असेच राखावे म्हणजे पुढील भाग लौकर येतील.

धमाल मुलगा's picture

13 Sep 2011 - 3:00 pm | धमाल मुलगा

आता खरी मजा येणार!!!

वाळवेकर आणि डॉ.सिन्हा आल्याशिवाय केस गरागरा फिरुच शकत नाय ना राव :)

तुमचे कोर्टातले वाद-प्रतिवाद चालूद्या. तोपर्यंत मी आलोच डॅनी कुठाय ते शोधून. आणि हो, मंदार अडकलाय लफड्यात. डॉ. बंकीम चक्रवर्तींना कळवलंय का? बघुया का त्यांची काही मदत होते का ते?

-धमाल सायगल.

किसन शिंदे's picture

13 Sep 2011 - 3:24 pm | किसन शिंदे

"चार नाही फिरोज पाच ! आज दुपारी हॉस्पिटल मधून घरी जात असतानाच रमी नाहिशी झाली आहे आणि तिच्या बरोबर असलेल्या डॅनीचा देखील कुठेच तपास लागत नाहीये."
- भन्नाट भाग २

आता प्रिन्सला शोधायला जाऊ नका कारण तो ऑलरेडी रमी आणी डॅनीच्या शोधात गेला असेल. ;)

धमाल मुलगा's picture

13 Sep 2011 - 3:59 pm | धमाल मुलगा

किसनद्येवा, आय माय स्वारी हां!
हे पर्‍या फोकलीचं दर दोन चार महिन्यांनी एकेक भाग टाकतंय, कसं सगळं लक्षात रहायचं ह्या वयात? ;)

>>आता प्रिन्सला शोधायला जाऊ नका कारण तो ऑलरेडी रमी आणी डॅनीच्या शोधात गेला असेल.
ठीकच. मी बापडा काय काय म्हणून करणार. जाऊन बसतो झालं मोहिनीचं सांत्वन करत.

जाऊन बसतो झालं मोहिनीचं सांत्वन करत.
अरे त्यासाठी मी हाय कि.. तुम्ही बसा सुरी बरोबर पत्ते कुटत

धमाल मुलगा's picture

13 Sep 2011 - 9:09 pm | धमाल मुलगा

अमिना खातूनच्या तावडीतून सुटका कधी झाली रे तुझी? ;)

गणपा's picture

13 Sep 2011 - 3:00 pm | गणपा

(क्रमशः)

आलिया भोगासी असावे सादर
क्रमशःलेखनाचा करावा का 'सत्कार'?

प्राजक्ता पवार's picture

13 Sep 2011 - 3:37 pm | प्राजक्ता पवार

पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...

सुहास..'s picture

13 Sep 2011 - 4:03 pm | सुहास..

देव पावला बाबा एकदाचा !!

ओळ न ओळ उत्कंठावर्धक !!

प्यारे१'s picture

13 Sep 2011 - 4:44 pm | प्यारे१

हे खरं पति- आपलं- प्रतिक्रियाखेचक लिखाण..!!!
पराचं लिखाण पाहून 'सुशि' स्वतः प्रतिक्रिया देऊ लागले?

परा, मोठे भाग टाक रे!!!

सुहास..'s picture

14 Sep 2011 - 5:18 pm | सुहास..

पराचं लिखाण पाहून 'सुशि' स्वतः प्रतिक्रिया देऊ लागले? >>>

@प्यारे१ (हे @ लिहावे लागले कारण हल्ली लोक्स प्रतिसादाच्या एवजी उत्तरेच जास्त देतात, मी उत्तर द्यायला जायचो आणि प्रतिसाद जायचा गाळात,सर्वात खाली ;) म्हुणुन्....असो ..तर )

@प्यारे१

मित्रा/भावा/दोस्ता/भदन्ता/वत्सा/अलाण्या/फलाण्या ;)

मला सुशिं म्हणणे म्हणजे देशी दारुच्या दुकानाबाहेर चणे-फुटाणे विकणार्‍याला जगलर म्हणण्यासारखे आहे. हे तरी मी तुला किती वेळा सांगु ? ;)
मुळ धाग्याविषयी सांगतो. सुशिंच्या रहस्य कथा म्हणजे काय हे आधी सांगतो ! सर्वात आधी पात्र निर्मीती,मग त्यांना गुफंणे, रहस्याची निर्मीती करणे आणि सरते शेवटी झटके देत त्याची उकल करणे, यात सुशिंचा हातखंडा होता (अर्थात त्यामुळे त्यांना कोणी केवळ रहस्य कथा कार म्हणणार असेल तर त्यांनी, निदान,दुनियादारी, येता-जाता, चार चौघं, पाळ-मुळ,इत्यादि-इत्यादि, हमखास, सॉरी सर वाचुन घेणे ही नम्र विनंती, यादी मोठी आहे बाकीची ही वाचल्यानंतर ;) ) पण त्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे गाभा(प्लॉट) !! हा गाभाच इतका जबरदस्त असायचा की वाचक खिळवुन गेला पाहिजे, रहस्याची उकल झाली तरी कथेतली पात्र डोक्यात घुमत असत, आता पर्यंत पर्‍याने या लेखमालेत तेच केले आहे, पात्रनिर्मीती मी मान्य करतो की सोप्पी होती, पण गाभा मात्र प्रचंड अवघड ! तो संभाळण्याची कसरत पर्‍याने आतावर केली त्याचे कौतुक तर आहेच, शिवाय रहस्य-उकल करतानचे आव्हान तो कसा पेलवतो याची उत्सुकता देखील आहे.

राजेश घासकडवी's picture

13 Sep 2011 - 5:18 pm | राजेश घासकडवी

मस्त.

प्रीत-मोहर's picture

13 Sep 2011 - 5:23 pm | प्रीत-मोहर

वाचिंग ... पुढचा भाग लौकर येउद्यात

वपाडाव's picture

13 Sep 2011 - 5:56 pm | वपाडाव

ग्रेट....
पुन्हा एकवार मागाहुन आजतोवर एकुण एक भाग चावुन काढला.....
येउ देत....

प्रचेतस's picture

13 Sep 2011 - 6:11 pm | प्रचेतस

मस्त रे, पुढचे भाग टाक रे आता पटापट

नगरीनिरंजन's picture

13 Sep 2011 - 6:20 pm | नगरीनिरंजन

खूपच रंगात आलंय कोर्ट. येऊ द्या पटापट.

स्मिता.'s picture

13 Sep 2011 - 7:02 pm | स्मिता.

अर्रे... अजून क्रमशः आहेच का?
आता जरा पटापट टाक पुढचे भाग.

मी-सौरभ's picture

13 Sep 2011 - 8:59 pm | मी-सौरभ

>>अजून क्रमशः आहेच का?

तुम्हाला काय वाट्लं?? गोष्ट संपली??

येऊ दे रे पुढचा भाग लौकर..

प्रास's picture

13 Sep 2011 - 9:00 pm | प्रास

एकदम झक्कास!

उत्कंठापूर्ण लिखाण.

जर्रा लवकर लवकर भाग टाकत चला बुवा..... आपली छोटीशी विनंती.

पुलेप्र

५० फक्त's picture

14 Sep 2011 - 4:20 am | ५० फक्त

मस्त रे पुढचा भाग येउ दे लवकर.

स्पंदना's picture

14 Sep 2011 - 6:29 am | स्पंदना

नुसत्या डायलॉग मध्ये पुर कथानक सादर करण्याचे सामर्थ्य !

__/\__

मृत्युन्जय's picture

14 Sep 2011 - 12:58 pm | मृत्युन्जय

प्रत्येकवेळेस नविन भाग वाचताना जुने भाग वाचायला लागतात कारण ते विस्मरणात गेलेले असतात. एवढे चांगले लिहितोस तर जरा भरभर लिही की बे. सालं याच्या दोन भागांमध्ये वाजपेयींचे चार पॉज बसतील.

मनराव's picture

14 Sep 2011 - 3:57 pm | मनराव

वाचतो आहे........

परा शेट......
पुढचा भाग लौकर येऊ द्यात.......... लै टाईम लावता लिवायला.........

प्रोफेश्वर's picture

31 Oct 2011 - 6:50 pm | प्रोफेश्वर

पुढे काय झालं?

चिगो's picture

2 Nov 2011 - 12:05 pm | चिगो

एकदम जोरात, परा.. पण थोडी घाई करत जा रे, भाऊ.. "दो दिन आरजू में कट गये, दो इंतजार में असं करु नगं..

प्रीत-मोहर's picture

30 Nov 2011 - 5:43 pm | प्रीत-मोहर

किती दिवस भन्नटच घोंगड भिजत ठेवणार आहात ?

Maharani's picture

19 Jan 2012 - 7:36 pm | Maharani

भन्नटच !! पुढचा भाग कधी????

जबरदस्त FAN of
SuShi/Amar Vishvas/Mandar/Firoz and now परिकथेतील राजकुमार !!!!!!!!!!!!!!!!!

मी-सौरभ's picture

19 Jan 2012 - 9:38 pm | मी-सौरभ

सन्मानणीय प्.रा.जी.

आपल्या नव्या फॅनसाठी तरी पुढचा भाग टंका...

कपिलमुनी's picture

27 Nov 2015 - 5:12 pm | कपिलमुनी

लिहायला सुरुवात केली आहे तर पुढचा भाग येउ द्या

अनुराधा महेकर's picture

28 Apr 2016 - 5:43 pm | अनुराधा महेकर

हा धागा बन्द पडला आहे का?

पुढे कुठे वाचायला मिळेल?

चिंतामणी's picture

30 Apr 2016 - 7:06 pm | चिंतामणी

त्याच्या खरडवहित विचारा हा प्रश्ण. कदाचीत उत्तर देइल.

अनुराधा महेकर's picture

2 May 2016 - 11:05 am | अनुराधा महेकर

विचारले आहे. उत्तराच्या प्रतिक्शेत..

पुढचे भाग कुठे वाचायला मिळेल?

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Jan 2018 - 11:29 pm | घाशीराम कोतवाल १.२

पुढचे भाग कुठे वाचायला मिळेल?

लिहिलिच नाहि कुठे उल्थला आहे हा परा देव जाने
परा अरे हि तरि कथा पुर्न कर

सुशि आठवले दीक्षितांच्या टकलावरच्या खारका पण आठवल्या

आगाऊ म्हादया......'s picture

7 May 2020 - 8:39 am | आगाऊ म्हादया......

असं का केलंत परा शेठ?

हाहाहा. कुणाकडूनही काहीही अपेक्षा करताय राव. तो परा आहे. कसलं डोंबलं पूर्ण करतोय कथा!

प रा व्हाट्सअ‍ॅपवर मग्न असतो. त्याला तेथे आग्रह करा. मग टाकेल बहुतेक तो

OBAMA80's picture

11 May 2020 - 11:22 am | OBAMA80

मस्त..पुढचे भाग येऊ देत लवकर

पुढचा भाग टाका की राव