"गफुर चरसीचा अड्डा?" मंदारने फिरोजकडे पाहतं विचारले आणि त्याक्षणी फिरोजने दाराकडे बघून स्मित केले. दोघांची विचार करण्याची पद्धत अगदी सहज जुळून गेली. इन्स्पेक्टर लाल तिघांकडे आळी पाळीने पाहतं असतानाच मंदारने फेयर डिलच्या मागच्या सिटवर झेप घेतली आणि फिरोजने क्षणात गाडीला वेग दिला.
आज कोणा कोणाच्या कबरी खणल्या जाणार ह्याची चिंता करत लालने जीपकडे मोर्चा वळवला.
अंधाराला सुसाट वेगाने कापत फिरोजने गाडीला वेग दिला, गाडीच्या वेगा बरोबरच तिघांच्या डोक्यातली विचारचक्रे देखील दुप्पट वेगाने धावत होती. सामच्या तरुणींच्या चिंतेने दारा ग्रासला होता तर मंदारला रमीची चिंता सतावत होती. फिरोज मात्र गफुरच्या अड्ड्यावर काय बंदोबस्त असेल त्या विचारात गुंतला होता.
गफुर चरसी असले सडकछाप नाव असले तरी गफुर काही लहान सहान माणूस नव्हता. वयाच्या १२ व्या वर्षी मुंबईत पळून आलेल्या गफुरने बूट पॉलिश करण्यापासून ते चरसाची ने-आण करण्यापर्यंत सगळे धंदे करून झालेले होते. वयाच्या १४ व्या वर्षी मुश्ताक साठी रोज ५ किलो चरसाची लोकलमधून ने आण करायचा पठ्ठ्या. मुश्ताक पकडला गेल्यावर एक वर्षासाठी भडवेगीरी करण्यापर्यंत देखील गफुरची मजल गेली. ह्याच व्यवसायात त्याची आणि सुगंधा लॉजच्या मॅनेजरची ओळख झाली. ह्या मॅनेजरचे खरे नाव होते रतनसींग पण त्याचे एकूण शौक पाहून दोस्त मंडळी त्याला नवाबच म्हणायची. राहणीमान अगदी नवाबी, राजस्थानी असूनही सुरमा वगैरे लावून जुन्या बाजारातली शेरवाणी वापरणारा हा माणूस दिसायचा पण नवाबा सारखाच. ह्याच नवाबने एक दिवशी गफुरचे आयुष्य पालटून टाकले.
एका पावसाळी रात्री गफुरच्या झोपडीवर दणदणा थापा पडल्या. ह्या व्यवसायात आल्यापासून पोलिसांची भिती अशी उरलीच नव्हती, मग आता कोण तडमडलंय काय माहीत अशा वैतागत गफुरने दार उघडले तर समोर पाण्यात निथळत नवाब उभा. काही महिन्यातच त्यांची एकदम गहरी दोस्ती झाली होती पण गफुरच्या घरी मात्र नवाब पहिल्यांदाच आला होता. गफुरला जवळजवळ दरवाज्यातून बाजूला ढकलतच तो आत शिरला. हातातली बॅग पलंगाखाली सारून त्याने पहिल्यांदा दरवाजा बंद केला.
"गफुर दोस्त आज मुझे बचा ले, जिंदगीभर तेरा अहसानमंद रहुंगा."
कोणा शेठला ३ लाख रुपयाचा चुना लावून नवाब त्याचे दागिने आणि थोडे फार पैसे घेऊन फरार झाला होता, तो थेट गफुरकडे येऊन थांबला होता. गफुरने जुन्या धंद्यातली थोडीफार ओळख वापरून नवाबला मुंबईच्या बाहेर काढले आणि थेट राजस्थानला रवाना केले. सगळे शांत होईपर्यंत माल सांभाळायची जबाबदारी देखील घेतली. नवाबचे नशीब खरेच चांगले असावे किंवा त्या शेठचा लुटला गेलेले माल काळ्या पैशातला असावा, कारण त्याने पोलिसात तक्रारच नोंदवली नाही. शेठचे भाड्याचे गुंड मात्र काही दिवस नवाबला शोधत मुंबई पालथी घालत होते. सगळे शांत झाल्याची खात्री होताच तिसर्याच महिन्यात नवाब मुंबईला हजर झाला. मैत्रीला जागलेल्या गफुरची आठवण ठेवून त्याने सरळ एक लाख रुपये उचलून गफुरच्या हातावर ठेवले. मुश्ताक पकडला गेल्यावर चारी दिशांना पांगलेली माणसेच मोठ्या सुज्ञपणे गफुरने गोळा केली आणि नव्याने धंदा सुरू केला, मात्र आता ह्या नव्या धंद्याचा तो मालक होता.
ह्या अशा गफुरच्या अड्ड्यावर होणारा प्रतिकार नक्कीच साधा नसणार ह्याची फिरोजला खात्रीच वाटत होती. भन्नाट वेगात त्याची रेसर इलियास नॉनव्हेजच्या बाहेर उभी राहिली आणि आजूबाजूच्या शेकडो नजरा त्यांच्याकडे वळल्या. ह्याच हॉटेलच्या बेसमेंटला गफुरचा अड्डा होता. फिरोजची कार बघूनच अनेक जणांनी त्या गल्लीतून काढता पाय घेतला होता, जे थोडे फार टोणगे उरले होते त्यांनी मंदारला कार मधून बाहेर पडताना बघून मागचा रस्ता पकडला होता. मंदार आणि फिरोज एकत्र ? आज एकतर गफुरची शंभरी भरलीये किंवा ह्या संपूर्ण एरियाची तरी.
फिरोजने सरळ इलियास मध्ये घुसून खाली जाणारा जिना पकडला. "अरे साब अरे साब नीचे सब फुल है" म्हणत एक दणकट वेटरने फिरोजला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र दाराने सरळ त्याच्या मानगुटीलाच हात घालून एखाद्या मांजराला उचलून बाजूला करावे तसे बाजूला केले. दणदणा पायर्या वाजवत तिघेही तळघरात दाखल झाले. तळघरात २ कोपर्यात २ ट्यूब लावून बर्यापैकी उजेडाची व्यवस्था केलेली असली तरी सर्व तळघर अक्षरशः: धुराने भरून गेलेले होते. रस्त्यात पडलेली, उभी असलेली माणसे जाणवत होती हेच काय ते उजेडाचे आभार. वेळ घालवून काहीच उपयोग न्हवता, सुरुवात करायलाच हवी होती. फिरोजने सरळ समोर आलेल्या एकाला उचलून कडेला भिरकावून दिले, तोवर मंदारने काउंटरकडे धाव घेतली होती. पळून जाण्याच्या एकमेव रस्त्यावर दारा पहाडासारखा ठाम उभा होता. 'ग फु र' हे तीन शब्द आणि तो त्या माणसाकडे चित्त्यासारखा झेपावणार होता.
फिरोजच्या बैदुलाने कामाला सुरुवात केली आणि फुटलेली नाकं आणि सुजलेली तोंडे घेऊन गर्दी कडेला पांगायला लागली. 'गफुर..' मंदारची आरोळी तळघरात घुमली आणि काही वेळातच काउंटरच्या मागचे दार उघडून एक व्यक्ती बाहेर आली. "माझ्या गिर्हाईकांना जाऊ दे फिरोज ! त्यांचे ह्याच्याशी काही घेणे देणे नाही" ती व्यक्ती ठामपणे म्हणाली. आता दाराच्या जोडीला फिरोज उभा राहिला आणि जाणार्या प्रत्येक चेहर्याची ओळख करून घेतच तो त्यांना बाहेर सोडायला लागला. एकदा पाहिलेला चेहरा फिरोज कधीच विसरत नसे आणि गफुरच्या दुर्दैवाने त्याला फिरोजने पाहिलेले होते.
काही क्षणातच तळघर रिकामे झाले आणि अंधारातून बोलणारी व्यक्ती उजेडात आली. तो गफुरच होता ह्यात शंका नव्हती.
"अरे वा ! आज फिरोजच्या जोडीला मंदार इथे आलाय म्हणजे आमची गणना टॉपच्या गुन्हेगारात व्हायला लागली तर. पण सध्यातरी मी किंवा माझ्या कुठल्याच माणसाने कायदा मोडलेला नाही, मग तुम्ही इथे कसे ? माझ्या माणसाला शोधताय का माझ्याकडे येणार्या कोणाला?"
"गफुर मला नवाब हवाय !" गफुरच्या डोळ्यात डोळे घालत मंदार म्हणाला. नजरेत एक चुकीची हालचाल आणि मंदारचा पंच त्याचे चार दात तरी नक्कीच पाडणारं होता.
"नवाब... कोण नवाब ?" गफुर आपली मेंदी लावलेली दाढी कुरवाळत म्हणाला आणि क्षणात फिरोजचा हात हालला. फिरोजच्या बैदुलाने गफुरच्या नाकाचा पार पिंगपाँगबॉल करून टाकला होता. गफुरची किंचाळी हवेत घुमली आणि मागच्या दारातून ६/७ गुंड हजर झाले. त्याचवेळी जिन्यावरूनही पावलांचे आवाज ऐकू यायला लागले. पण जोवर दारा बुलंद जिन्याजवळ हजर होता तोवर तरी त्यांची फिकीर करायची गरज नव्हती.
गफुरच्या हुकुमाची वाट न पाहता एकदम सहाजण मंदार आणि फिरोजवर झेपावले.. पण हि दोन भुतं काय करू शकतात ह्याची त्यांना कल्पना नव्हती. अंगावर धावून येणार्या एकाला मंदारने सरळ दोन्ही हात धरून आपल्याकडेच ओढून घेतले, मंदारच्या डोक्याची आणि त्याच्या नाकाची प्रेमळ भेट झाली आणि निदान तासाभरासाठी तरी तो डोळ्यापुढे अंधार घेऊन आडवा झाला. इकडे फिरोजच्या बैदुलाने एकाचे पुढचे दोन दात जमिनीला अर्पण केले होते तर एकाच्या नाकाचा आणि गालांचा आकार इडली बरोबर स्पर्धा करायला लागला होता. फिरोज आणि मंदारच्या तावडीत सापडलेल्यांची अवस्था तरी बरी म्हणावे अशी स्थिती मागच्या जिन्यावरून आलेल्यांची झाली होती. त्यांच्यातल्या एकाला दाराने सरळ दोन पाय धरून उचलला होता आणि त्यालाच गोल गोल फिरवून सगळ्याचा चोपत होता. शेवटी कंटाळा आल्यावर तर त्याने सरळ सापडला माणूस की उचल आणि फेक भिंतीवर असाच सपाटा लावला होता. शेवटचा माणूस भिंतीवर फेकून दारा, मंदार आणि फिरोजकडे आला तोवर आजूबाजुची माकडे संपवून ते गफुरच्या समोर पाय रोवून उभे होते.
गफुरच्या अड्ड्याची राखरांगोळी करून तिघेही बाहेर आले तेव्हा रस्ता सुनसान पडला होता, मात्र त्याकडे लक्ष द्यायला त्यांना फुरसत कुठे होती. इतर दोघे बसताच फिरोजने कारला भन्नाट वेग दिला आणि गाडी कोळीवाड्याकडे सुसाट निघाली. कुठल्याही परिस्थितीत लवकरात कोळीवाड्यांतला रघुवीरकडे नवाबला गाठायचे होते. फिरोजची कार कोळीवाड्यात घुसली आणि चकाट्या पिटणारी टाळकी सावध झाली. त्यातली बरीच टाळकी फिरोजला चांगलाच ओळखून होती. एका टोळक्यापाशी पत्ता विचारायला फिरोजने कार थांबवली. "मंदार साहेब आज इकडे कुठे ? ओळखले ना मला ? मी हरी, कुलाबा मर्डर केसवाला?" एक जाडगेला माणूस सगळ्यांना मागे सारत पुढे झाला. मंदारने उगाचच चेहर्यावर ओळखीचे भाव आणले आणि त्याला रघुवीरचा पत्ता विचारला. "रघुवीर तर दुपारीच वस्ती सोडून गेला, दोन बॅगा होत्या हातात त्याच्या. बहिणींना कोल्हापुराला न्यायचे म्हणत होता." पुढच्याच क्षणी फिरोजने कारला टर्न मारला आणि गाडी स्टेशनकडे पळवली.
"फिरोज एखादा 'पी. सी. ओ.' दिसला तर बघ, दिनेशला फोन लाव आणि त्याला ताबडतोब माणसांना स्टेशन कव्हर करायला सांग." नाक्याच्या मेडिकलमध्ये बूथ दिसला आणि करकरत फिरोजने कारला ब्रेक दिला.
"हॅलो मी फिरोज बोलतोय, दिनेश आहे?"
"देतो साहेब...." काही क्षणातच दिनेशचा आवाज फोनमध्ये घुमला.
"फिरोज कुठे आहात तुम्ही ? आणि मंदार तुमच्या बरोबर आहे?'
"हो हो... अरे आधी मी काय सांगतोय ते ऐक, ताबडतोब स्टेशन कव्हर करा, रघुवीर नावाचा माणूस ताब्यात घ्यायचाय."
"त्याची गरज नाही फिरोज, आता मी काय सांगतोय ते ऐक. गफुरच्या अड्ड्या शेजारच्या लॉजमध्ये गफुर, रघुवीराची प्रेते पोलिसांना आताचं सापडली आहेत आणि त्याच्या जोडीला २ मुली देखील आहेत. चारही जणांना गोळ्या घातल्यायत आणि संशयित म्हणून लॉजच्या मॅनेजरने तुम्हा तिघांची नावे तक्रारीत नोंदवली आहे...."
(क्रमशः)
प्रतिक्रिया
29 Dec 2010 - 12:24 pm | अवलिया
वाचत आहे......
29 Dec 2010 - 12:26 pm | छोटा डॉन
येकदम भन्नाट !!!
पुढे काय ?
- छोटा डॉन
29 Dec 2010 - 12:35 pm | टारझन
झकास रे ... किती भाग आहेत लेका याचे टोटल ?
29 Dec 2010 - 3:44 pm | गणपा
+२
29 Dec 2010 - 12:39 pm | sneharani
मस्त...!
अशीच कथा जाऊ दे अगदी भन्नाट!
29 Dec 2010 - 12:39 pm | स्वानन्द
आह्हा!! भन्नाटच. आणि तो क्रमशः पण काय अगदी टाय्मिंग ला आलाय!!
>>"त्याची गरज नाही फिरोज, आता मी काय सांगतोय ते ऐक. गफुरच्या अड्ड्या शेजारच्या लॉजमध्ये गफुर, रघुवीराची प्रेते पोलिसांना आताचं सापडली आहेत आणि त्याच्या जोडीला २ मुली देखील आहेत. चारही जणांना गोळ्या घातल्यायत आणि संशयित म्हणून लॉजच्या मॅनेजरने तुम्हा तिघांची नावे तक्रारीत नोंदवली आहे...."
एकदम सुशि च!
29 Dec 2010 - 12:49 pm | बबलु
लै भारी !!!
पुढचे भाग पटापट टाका राव.
29 Dec 2010 - 12:52 pm | बबलु
लै भारी !!!
पुढचे भाग पटापट टाका राव.
29 Dec 2010 - 1:07 pm | प्राजक्ता पवार
वाचत आहे ...
29 Dec 2010 - 1:17 pm | गवि
चांगले लिखाण झालेय. पण पहिले भाग जास्त आवडले होते.
पुढचा भाग सुरुवातीच्या भागांसारखा असेल याची खात्री आहे..
29 Dec 2010 - 1:18 pm | गणेशा
अतिशय जबरी .. एकदम भन्नाट ..
सुहास शिरवळकर "दुनियादारे" सोडले तर वाचलेच नाहियेत .. मागेच चिगो च्या धाग्यावरुन लिस्ट करुन घेतली आहे त्यांची पुस्तके विकत घेण्यासाठी .. त्या आधीच तुमची ही बहारदार कथा वाचायला मिळाली आहे त्यामुळे छान वाटले ..
अशेच लिहिर रहा .. वाचत आहे
29 Dec 2010 - 1:31 pm | पिंगू
झकास.. भन्नाट आहे नावासारखीच...
29 Dec 2010 - 1:34 pm | असुर
नाकाची प्रेमळ भेट, पिंगपाँगबॉल वगैरे टिपिकल सुशि रे!!!!
हे जमलंय!!!! मस्तच!!!
--असुर
29 Dec 2010 - 2:17 pm | स्वाती दिनेश
नाकाची प्रेमळ भेट, पिंगपाँगबॉल वगैरे टिपिकल सुशि रे!!!!
हे जमलंय!!!! मस्तच!!!
अगदी असेच,
परा... पुढचे भाग लवकर लिही..
स्वाती
29 Dec 2010 - 2:28 pm | धमाल मुलगा
डोळ्यापुढं अंधार घेऊन किमान तासभर आडवा, चार दात जमिनीला अर्पण... :)
आणि पर्या, साल्या....इतका घाण ट्विस्ट? दिडशेच्या वेगात चाललेली गाडी गचकन १८० अंशात वळवल्यागत झालं ना बे.
बहोत खुब..बहोत खुब!
29 Dec 2010 - 2:50 pm | चिगो
एकदम सुसाट.... लौकर लौकर लिवा की राव...
29 Dec 2010 - 3:42 pm | सूड
पुढचे भाग लवकर लिवा राव !! हा भागही सही झालाय !!
29 Dec 2010 - 1:35 pm | ऋषिकेश
वाचतो आहोत.. भन्नाट लिहितोस हे तर जगजाहिर आहे :)
(क्रमशः)
29 Dec 2010 - 1:51 pm | सुहास..
ऊच्च !! ऊच्च !! ऊच्च !! ऊच्च !!
29 Dec 2010 - 1:58 pm | प्रचेतस
एकदम भन्नाट रे पर्या,
आता मग अमर विश्वास आणि टकलावर खारका मारणारे बॅ. दिक्षीत येणार तर...
29 Dec 2010 - 2:09 pm | मस्त कलंदर
काही काही ठिकाणी तर टिपिकल सुशि टच जमलाय...
कालचा टोमणा इतका लागला काय रे परोबा??? असे असेल तर रोजच एक-दोन टोमणे मारीन म्हणते!!!
29 Dec 2010 - 6:33 pm | सखी
काही काही ठिकाणी तर टिपिकल सुशि टच जमलाय... असेच म्हणते.
सुशि, वपुमधुन बाहेर पडले असले तरी भन्नाट वाचायला भन्नाट मजा येते आहे, हेही तितकेच खरे.
29 Dec 2010 - 2:19 pm | स्पा
पऱ्या.. एकदम जबरी....
नावाप्रमाणेच कथेने जबराट स्पीड पकडला आहे...
आता तू पण स्पीड पकड आणि भाग पटापट टाक....
29 Dec 2010 - 2:37 pm | बिपिन कार्यकर्ते
भयानक वेग... पुभालटा.
30 Dec 2010 - 8:53 am | प्रीत-मोहर
ऐसेच बोल्ती हय....पुभालटा
29 Dec 2010 - 5:13 pm | स्वाती२
झकास!
29 Dec 2010 - 5:29 pm | सूर्य
झ..का..स...!! पुढच्या भागाची वाट बघतोय..
- सूर्य
29 Dec 2010 - 10:13 pm | आत्मशून्य
बाकी पूढील भाग लवकर यावा असे वाटते पण तो येईलच अशी अपेक्षा नाही , कारण शेवटी सूशीच्या कथांचे/त्यातील प्रसंगांचे व्यवस्थीत पारायण करणे मग त्यानंतर त्यात स्वतःच्या ओळी शींपडने हे इतक सोपं आहे काय ? आय मीन तूला आर.एन.डी. साठी वेळ हा द्यावाच लागेल.... तरीपण आतूरतेने वाट पाह्तोय....पूढील भागाची.
29 Dec 2010 - 8:21 pm | आदिजोशी
झाला का पुढचा भाग लिहून. मेल्या बकिच्या धाग्यांवर कॉमेंट्स टाकण्यापेक्षा हे लिही पटापट.
30 Dec 2010 - 12:20 am | मी-सौरभ
फक्त 'लिही पटापट' साठी :)
30 Dec 2010 - 8:54 am | प्रीत-मोहर
आदित्य भौ शी १००% सहमत
29 Dec 2010 - 8:42 pm | वाचक
पराषेठ,
शैली सुरेख जमली आहे, आणि आत्त्तापर्यंतच्या भागात काळाचे भान सुंदर राखले गेले आहे (ह्या नायकांचा काळ जुना आहे, साधारण ऐंशीच्या मध्यातला) त्यामुळे 'सेल फोन' नसणे वगैरे उत्तम जमवले आहे.
चौघाना एकत्र आणण्याची कल्पना (नाविन्यपूर्ण नसली) तरी खूपच 'एक्सायटींग' आहे. ह्यापूर्वी 'गुरुनाथ नाईकांनी' असा प्रयत्न केला होता, एका दिवाळी अंकात - त्यांचे सगळे मानसपुत्र (गरुड, गोलंदाज, तीरंदाज, कॅप्टन दीप वगैरे) त्यांना भेटायला येतात, पण शेवट 'हे नाईकांचे स्वप्न होते' असे दाखवून फारच पोपट केला होता.
सु. शि. नी पण असा प्रयत्न एका कादंबरीत केला होता, ह्यात मंदार आणि फिरोज एकत्र होते पण त्यात मंदार फक्त शेवटी फिरोजचा जीव वाचवतो, एकत्र कथानक नव्हते, तसेच नक्की आठवत नाही पण अमर सुद्धा मंदार किंवा फिरोज बरोबर होता.
अशा कथानकासाठी 'स्पीड' अत्यंत गरजेचा आहे आणि पुढचे भाग पटापट टाकणे हेही :)
पुलेशु.
29 Dec 2010 - 9:57 pm | बहुगुणी
आणि पुढच्या भागाची वाट पहायला लावणारंही.
@वाचकः मला पहिला भाग वाचल्या पासूनच गुरूनाथ नाईकांच्या 'गरूड' आणि इतर कथांची आठवण येत होती, शैली वेगळी असली तरीही विषय असेच. नाईक म्हणे अजूनही लिहितात, आणि त्यांनी नुकताच १२०० पुस्तकं लिहून विक्रम केला आहे. मिळालं तर पुन्हा वाचायला हवं. त्यांच्या विषयी आधिक माहिती इथे मिळाली.
29 Dec 2010 - 10:02 pm | धमाल मुलगा
हे ठाऊकच नव्हतं द्येवा! :)
तरीच मी विचार करतोय, २०१० सालात गुरुनाथ नाईकांची एव्हढी पुस्तकं रॅक्सवर का दिसतायत.
ग्रेट! पुढच्या 'भारत'वारीत आता गुरुनाथ नाईक कलेक्षन :)
धन्यवाद बहुगुणी.
29 Dec 2010 - 10:24 pm | चिगो
>>सु. शि. नी पण असा प्रयत्न एका कादंबरीत केला होता, ह्यात मंदार आणि फिरोज एकत्र होते पण त्यात मंदार फक्त शेवटी फिरोजचा जीव वाचवतो, एकत्र कथानक नव्हते,<<
बरोबर.. पुस्तकाचे नाव "हव्यास"..
>>तसेच नक्की आठवत नाही पण अमर सुद्धा मंदार किंवा फिरोज बरोबर होता.
हां, बरोबर बोलताहात. मलापण नाव आठवत नाही, पण फिरोज आणि अमर एकत्र होते. आणि ही कादंबरी सुशिंनी एका मोठ्या ब्रेकनंतर (सामाजिक कादंबर्यांनंतर) लिहीली होती...
30 Dec 2010 - 12:31 am | सुहास..
बरोबर.. पुस्तकाचे नाव "हव्यास".. >>
हव्यासच !!
हां, बरोबर बोलताहात. मलापण नाव आठवत नाही, पण फिरोज आणि अमर एकत्र होते. आणि ही कादंबरी सुशिंनी एका मोठ्या ब्रेकनंतर (सामाजिक कादंबर्यांनंतर) लिहीली होती... >>
फिरोज आणि अमर !! आणि मंदार ! अर्धवट राहीली होती बहुतेक !!
अवांतर : चिन्म्या , अरे महिना नाय झाला रे अजुन !!
30 Dec 2010 - 3:19 am | संदीप चित्रे
असलेल्या पुस्तकाचे नाव - 'टेरिफिक' !
(माझ्या आठवणीप्रमाणे)
30 Dec 2010 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार
ती बहुदा फिरोजची नायक म्हणुन पहिली कादंबरी 'सहज' होती. त्यात अमर त्याला खुनाच्या केस मधुन बाहेर काढतो पण नंतर खरा खुनी मात्र फिरोजच शोधतो.
30 Dec 2010 - 5:15 pm | चिगो
ती नाही. संदिप म्हणतो ती असेल कदाचित. एक रेफरन्स देतो. त्यात इं. ब्रिजेश लाल असिस्टंट पोलिस कमिश्नर झालाय..
@ सुहास
>>अवांतर : चिन्म्या , अरे महिना नाय झाला रे अजुन !!
हॅ हॅ, लाजलो बगा मी... ;-) बायकोलापण "सुशिं"ने झपाटावं, ह्यासाठी प्रयत्न सुरु झालेयत भाऊ..
30 Dec 2010 - 5:31 pm | असुर
नाव नाय आठवत, पण गोष्ट आठवतेय!
फिरोज एका सोशल क्लबच्या नाटकात हिरोचं काम करत असतो. त्या नाटकाच्या शेवट फिरोज मरणार आणि त्याला शवपेटीकेत घालून नेणार असा असतो. तर व्हिलन (आठवत नाही) डाव करुन खरी शवपेटीका वापरुन फिरोजला जिवंत पुरायची व्यवस्था करतो.
व्हिलनच्या दुर्दैवाने मंदार ते नाटक पहायला आलेला असतो. त्याला शंका येते आणि तो व्हिलनच्या गुंडांचा पाठलाग करतो. फिरोजला जिवंत समाधीतून वाचवतो. मग दोघं मिळून व्हिलन, त्याचे गुंड वगैरे लोकांना देमार कुटतात.
हा सगळा कुटाणा कुणी व्हिलन फिरोजच्या खुन्नसमध्ये हे सगळं करतोय अशा ष्टोरीलाईनसाठी आहे.
आता पराला पुस्तकाचं नाव आठवेल!! :-)
--असुर
30 Dec 2010 - 7:20 pm | वाचक
माझ्याकडे असलेल्या "शहेनशहा" नावाच्या कादंबरीत ही गोष्ट आहे.
30 Dec 2010 - 10:26 pm | चिगो
ही "हव्यास"ची ष्टोरी आहे... असि. कमिश्नर ब्रिजेश लाल वाली वेगळी आहे. त्यात एक बंगाली का काय वकील/वकीलीणचं पात्र पण आहे..
30 Dec 2010 - 6:53 pm | कानडाऊ योगेशु
माझ्या अंधुक आठवणींनुसार सुशिंचे मानसपुत्र एकमेकांना ओळखत असत.म्हणजे मंदार पटवर्धन नायक असलेल्या कादंबरीत मंदारच्या तोंडुन अमर विश्वासचा निष्णात वकील असा उल्लेख होता.पण कथासूत्रात मात्र एकच नायक होता.
बाकी सार्या हॉलिवुड सुपरहिरोंना एकत्र आणण्याची किमया स्केरी मूव्हीज मध्ये पाहीली होती.
29 Dec 2010 - 10:12 pm | प्रभो
मस्त बे पर्या!!!!
भाड्या पुढचे भग लिही पटापट...
29 Dec 2010 - 10:16 pm | विनायक बेलापुरे
वाचतोय ....
29 Dec 2010 - 11:54 pm | दैत्य
वेगात लिखाण होउ दे!
30 Dec 2010 - 3:34 am | निनाद मुक्काम प...
लेखन एकदम ढिशुम ढिशुम आहे
30 Dec 2010 - 11:10 am | दिपक
30 Dec 2010 - 12:59 pm | पिवळा डांबिस
वाचतोय!
आणि पुढल्या भागाची वाट पहातोय!!
:)
30 Dec 2010 - 1:49 pm | नगरीनिरंजन
हा भाग सर्वात जास्त आवडला. गोष्ट रंगतीये. लिहा पटापट.
30 Dec 2010 - 1:56 pm | स्पा
सु शी काय करतात हल्ली?
30 Dec 2010 - 4:00 pm | असुर
साध्यासुध्या वाचकांचा कंटाळा आल्याने सध्या '३३ कोटीं'साठी रहस्यकथा, कादंबर्या, वगैरे लिहीतात म्हणे!!
--असुर
30 Dec 2010 - 4:07 pm | स्पा
त्या '३३ कोटींची' मज्जा आहे ब्वा
30 Dec 2010 - 7:16 pm | नावातकायआहे
लिहायला भारी जमत म्हनुन लै आखडु नका..
फुडला भाग टाका लौकर!
30 Dec 2010 - 11:39 pm | आशु१९७२
सु शि च्या सर्व कथा मस्त आहेत.
झूम, मधुचन्द्र,जाई आगदि छान आहेत.
7 May 2020 - 6:59 am | आगाऊ म्हादया......
फाईट सीन्स टिपिकल सुशि,
पण फिरोज दिनेश ला ओळकायलाय पण मुकेश भाटिया दिसेना, अस्वस्थ वाटायलय मला