मस्त रिमझिम पावसात 'शुध्द शाकाहारी कट्ट्यासाठी' स्वादमध्ये पोहचलो तेव्हा घड्याळात संध्याकाळचे ६:३० वाजले होते आणी नेहमीच्या सवयीप्रमाणे एकाही कट्टेकरयाचा तिथे पत्ता नव्हता. भराभर सगळ्यांना फोन करुन 'कोण कुठे अडकलय?' याचा अंदाज घेतला. '१ कप वाफाळता चहा आणी समोर भारताची बॅटींग' असा दुहेरी योग जिथे तुम्ही अनुभवाल तिथे बाकीच्या जगाचा विसर तुम्हाला नक्कीच पडेल, तसा मलाही पडला. मग रामदास काका त्यांनतर थोड्या फार फरकाने माझीही शॅम्पेन(हा 'तो' असावा कि 'ती' ह्या बद्दल मला नेहमी शंका पडत असे.) :) मला येवून जॉईन झाले. बरेच तर्क वितर्क करूनही शॅम्पेनराव आयडेंटिटी सांगायलाच तयार होईना, "सगळे जमा झाले कि मग खुलासा करतो." असं सांगुन उगाचच आमची उत्सूकता वाढवत होते. एकीकडे गप्पा मारता मारता दुसरीकडे बटाटेवड्यावर ताव मारण्याचे उद्योगही चालू होते. रिकाम्या झालेल्या बटाटेवड्याच्या प्लेट्स पाहायला मग मिपाचे तरुण रक्ताचे(कि गरम डोक्याचे) :) लेखक स्पा यांचे आगमन झाले, मग त्यांच्या मला 'हे नको ते नको' करण्याच्या भानगडींमूळे त्या वेटरच्या चेहरयावरचे भाव 'मग बोर्नवीटा आणून देवू का?' असे झाले होते. एव्हाना लाईट्स गेल्याने आम्ही मग रस्त्यावर येवून उभे राहिलो त्याच वेळेस मेहदंळे काका त्यांच्या नेहमीच्या 'कुर्ता पायजमा आणी खांद्यावर शबनम' या पेहरावात न येता चक्क जीन्स आणी टी-शर्ट या वेशात आले होते त्यामुळे त्यांच्या मागोमाग आलेल्या प्राचीचाही बराच गोधंळ उडाला. निदे आणी मस्त कलंदर हे जोडपंही पाठोपाठ आल्याने आम्ही सर्व पुन्हा एकदा आत जावून बसलो आणी गप्पांचा फड पुन्हा रंगात आला त्यात गगनविहारी आम्हाला येवून सामील झाले.
मिसळपाव आणी बटाटेवड्यांचा आस्वाद घेता घेता चर्चा जोरात रंगली होती......सुड, मिका, इंटरनेटस्नेही, लीमाऊजेट अशी मंडळी अजूनही यायची बाकी होती.
मकमावशीच्या चेहरयाकडे बघून तुम्हाला काय वाटतं?.....उत्तर सांगा बक्षीस जिंका!
झणझणीत मिसळपाव!
अजून एक फोटो.. :)
कट्ट्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्येच बिपीनदा आणी परा यांचेही फोन येवून गेले. शेवटी थाळीची वेळ झाल्याने आम्ही खाली बेसमेंटकडे निघालो त्याचवेळी सुधांशू आणी इंटरनेटस्नेही हे दोघेही येवून आम्हाला जॉईन झाले. लीमाऊ आणी मिकांचा अजूनही पत्ता नव्हता.
बेसमेंटमधल्या ह्या पेंटीगवरुन काकांनी इथे मिपावर वदनी कवळ घेता नावाचा लेख बरयाच दिवसांपुर्वी टाकला होता.
बेसमेंटला गेल्यावर इंट्या सर्वात शेवटी आल्याने सगळ्यांना ओळाखायला सांगून त्याची ओळख परेड चालू केली. मकीकडे बोट करुन "लीमाऊजेट का?" असं विचारणं इथपर्यंत तर सगळं ठिक होतं पण रामदास काकांकडे निर्देश करुन "हे नक्कीच विजूभाऊ असणार" असं त्याने बोलताच संपूर्ण बेसमेंटमध्ये जोरदार हास्याचे फवारे उडाले. रामदास काकांच्या अर्धवट राहीलेल्या बरयाच लेखांची चर्चा झाली त्यावरुनच मग धंद्याचा पुढील भाग काकांनी सर्वांना सांगीतला.
स्वादची शुध्द शाकाहारी थाळी!
डावीकडून प्राची, मस्त कलंदर, निदे, गवि, रामदास काका, जॅक स्पॅरो(स्पावड्या), किसन शिंदे, विमे, सुड, इंटरनेटस्नेही आणी माझीही शॅम्पेन.
मंडळींच जेवण होऊन टेबलही मोकळा झाला होता....बरयाच उशीरने माऊताई त्यांच्या यजमानांसोबत आल्या होत्या, डावीकडे वरच्या बाजुला त्यांच जेवण चाललयं....कन्या आजारी असल्याने मिकांना यायला जमलं नव्हतं.
सर्वात शेवटी सुडने डब्यातून भाजणीचे वडे न आणता हे आणलं होतं, काय दिसतय??? ढोकळा!! छॅ, तो ढोकळा नसून पनीर बर्फी आहे. 'फोटोसहीत पाकक्रुती लवकरच टाकण्यात येईल' अशी जाहीर घोषणाही लगेच करण्यात आली.
बर्फी खावून यंग जनरेशन दात दाखवतय..:D
शेवटी हॉटेल बंद होण्याची वेळ झाल्याने सगळ्यांना आवरते घ्यावे लागले. :( पावसाची रिमझीम चालूच होती आणी सगळ्यांनी एकमेकांचे निरोप घेतले.
प्रतिक्रिया
1 Aug 2011 - 3:34 pm | विजुभाऊ
पावसाने घात केला. घराबाहेर पडणे मुश्कील होतं मला त्या दिवशी.
तसा फोन सुद्धा केला होता रामदास काकाना.
पण तुमची मयफील झकास जमली होती असे एकुणच जाणवतय. मिस केलं बरंच काही
1 Aug 2011 - 3:50 pm | प्रास
पण घरातून बाहेरच होतो. वाहतुक मुरांब्यामुळे ना घरका ना कट्टेका अशा लटकत्या अवस्थेत राहिलो. x-(
दुपारी वसई तिथून येताना वाहतुकीत २ तास, मग घोडबंदर रोडवर पाऊण तास, मग बोरिवलीला गाडी पकडायला जाताना पाऊण तास मग मध्येच वाहतुकीमुळे मिरारोड स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला तर तिथे पोहोचायला अर्धा तास.
आमचं सालं गणितच फिसकटलं. फास्ट ट्रेनने दादरात पोहोचेतो साडे आठ. साडेपाच सहा तासाचा खोळंबा करून फक्त घरी पोहोचू शकलो. :-(
अगली बारी म्हमईमेच करेंगे कुछ दोस्तों.....
सदस्यांनी कट्टा एंजोय केलेला बघून आनंद झाला आणि स्वादची अमर्यादित थाळी बघून प्रचंड जळजळ.
मला आता ताबडतोब "प्रवाळ पंचामृत रस" वाळा घातलेल्या पाण्याबरोबर गिळायला निघालं पाहिजे..... ;-)
1 Aug 2011 - 3:37 pm | ऋषिकेश
अरे वा जोरात कट्टा झालेला दिसतोय!
दोन चार वगळता सगळे नेवे चेहरे बघुन मिपा प्रगती करतंय ही खुणगाठ पक्की झाली :)
बाकी शेवटाच्या 'यंग जनरेशन्च्या' फोटोतून मक-निदे गायब झालेले दिसले हे निरिक्षण नोंदवले जावे :प
1 Aug 2011 - 3:54 pm | बिपिन कार्यकर्ते
निरीक्षणाशी सहमत. साक्षात मकमावशींचीच खोडी काढली राव! डेरिंग आहे! ;)
1 Aug 2011 - 9:45 pm | आनंदयात्री
तु काय काड्या टाकतोस रे बिकाका ?
बाकी यंग जनरेशनमधुन चाईल्ड जनरेशन मध्ये आणलेस असे वाटायला जागा आहे .. हा फोटो बघा, कसे एकदम छान "शाळेला चाल्लो आम्ही !" सारखे छान पावडर टिकली करुन आलेत, निदे अगदी आईनी पाडुन दिलेला भांग स्टाईल भांग पाडुन आलाय. मस्त रिजुनिवेटेड फ्रेश दिसतायेत दोघे :)
1 Aug 2011 - 3:56 pm | गवि
मलाही वगळलेय की सफाईने यंग जनरेशनमधून...
-(क्रुद्ध) गवि.
बाकी नवनवीन सभासद मित्र इन्क्लुडिंग मैत्रिणीसुद्धा, याव्यात हाच हेतू होता.
पराभाऊ ठाण्यात असूनही आले नाहीत म्हणून निषेध.
1 Aug 2011 - 5:39 pm | कुंदन
ऑ , खरे की काय ?
1 Aug 2011 - 10:01 pm | मस्त कलंदर
यंग जनरेशन म्हणून 'उमेदवारी' जाहिर केलेल्यांचा फोटो टाकलाय र त्याने. समजून घे रे
1 Aug 2011 - 3:40 pm | सुनील
हम्म. तर कट्टा (रद्द न होता) झाला, हे पुराव्यानिशी शाबीत तर झालं!
वर्णन छान पण अजूनही खुलवता आलं असतं.
फोटो फ्लिकर वरून टाकले नाहीत का? (कारण मला ऑफिसमधून चक्क दिसताहेत!)
1 Aug 2011 - 11:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>हम्म. तर कट्टा (रद्द न होता) झाला..
झाला म्हणजे काय होणारच होता. रद्द झाला वैग्रे हे विनोद म्हणून किंवा उपरोधाने लिहिले होते. हल्ली लहान मुलांना कळणारे विनोद मोठ्यांना कळेनासे झाले आहेत हो. ;-)
1 Aug 2011 - 11:49 pm | रेवती
असं कै नै.
मलाही आधी वाटलं की काहीतरी भांडणं होवून कट्टा रद्द झाला.
कोणत्या हाटेलात करायचा यावरून काही चर्चा रंगली नव्हती होय?
पिणार्यांना जरा साध्या कट्ट्याची अॅलर्जी आहे असं वाटत होतं म्हणून मी तिथे प्रतिसाद देणार होते की अश्या कट्ट्याला मुली कश्या येणार? आजकाल कुणाचं काय सांगावं?
ओले कट्टे करताना तिथे महिलांचा सहभाग नको असे सांगितल्यासारखेच अस्ते.
मिपाचे म्हणून जे कोणते कट्टे होतील त्यात स्रीयांनाही येण्याजाण्याची तेवढीच मोकळीक असली पाहिजे.
नाहीतर आपापसात फोनवून तुम्ही प्रायव्हेट कट्टे करत चला.
(हा प्रतिसाद तिथे दिला नव्हता हे इथे सांगते आहे.)
2 Aug 2011 - 1:47 am | प्राजु
ताई... तुमच्या हाती लाटणे आहे असे का दिसते आहे मला? ;)
2 Aug 2011 - 3:54 am | रेवती
आज जरा वेळ होता म्हणून उनाडक्या करत होते.
प्रतिसाद दिल्यावर मलाही तो जरा जास्तच वाटला पण नंतर वेळ मिळाला नाही म्हणून दुरुस्ती राहून गेली.
असो. तुम्ही आजकाल मिस्ड कॉल्सकडे दुर्लक्ष करता वाटतं.
1 Aug 2011 - 3:52 pm | बिपिन कार्यकर्ते
हॅहॅहॅ!!! छान छान!!! चार घटका आनंडात गेल्या म्हणायच्या!!!
'वाट लागली निख्याची!' असं वाटलं
पाठवून द्या!
@ प्राची : बाईंच्या अगदी जवळ बसलीयेस... जेवण गेलं ना नीट? का इथेही धपाटेच खावे लागले?
1 Aug 2011 - 6:10 pm | प्राची
बिका,कॉलेज संपलं आता,मग कशाला भिती?
आता मकी मॅम मिपाकर फ्रेंड झाल्यात. :)
1 Aug 2011 - 4:03 pm | स्पा
कट्टा खतरनाक झाला
जम धमाल आली...
नेहमी प्रमाणे रामदास काकांनी ५ मिनिटात सूत्र त्यांच्या हातात घेतली.. आणि बर्याच अनुभवांची पोतडी उलगडली गेली
धमाल सुरूच होती.. पावसाने खो घातल्याने जरा मेम्ब्रांची संख्या रोडावली , पण हरकत नाही , पुढच्यावेळी जास्त धमाल करू
बाकी, बिपिंदांनी मधेच फोन करून "खास त्यांच्या शैलीत" शुभेच्छा दिल्या .
जेवण झकास होतच, पण सूड ची "पनीर बर्फी" कहर होती... पोटात जागा असती तर अजून हादडली असती :)
1 Aug 2011 - 4:06 pm | गवि
किसन. अरे जाम मजा आली. अजून बरंच काही लिहिलं नाहीयेस तू.
यावेळी स्वादचा हॉल जणू एक्स्क्लुझिव्ह आपल्यालाच मिळाला. एकही इतर कस्टमर आला नाही. त्यामुळे अडीच तीन तास स्वादच्या आतच गप्पांची मैफिल जमवता आली. उगीच रस्त्यात येऊन उभे रहावे लागले नाही.
रामदासकाकांनी गप्पांमधे भन्नाट रंगत आणली. धंदाचा पुढचा भाग एखाद्या सिनेमाच्या प्रीमियरप्रमाणे किंवा निमंत्रितांच्या खास शो प्रमाणे प्रथम ऐकायला मिळाला. त्यांची कथनशैली अद्भुतच आहे.
कट्ट्याला सुरुवातीला काहीसे टीसीएस कट्ट्याचे स्वरूप येऊ घातले असतानाच बहुधा रामदासकाकांनी की आणि कोणीतरी ते तातडीने आवरले ;)
गप्पांमधे हास्यस्फोटांनी आणि एकूण दंग्याने वरचे कर्वेमालक खाली येतील अशी भीती वाटत होती. पण त्यांनी ग्राहकभिमुख धोरण राबवून हे सर्व चालवून घेतले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. :)
डाळिंबी उसळ आणि टॉमॅटो सार झकास होते. अळूचे फदफदे असते तर जास्त मजा आली असती.
असाच कट्टा लवकर पुन्हा होवो. नेक्स्ट टाईम महेश लंच होम असे सूचित करतो.
1 Aug 2011 - 4:09 pm | किसन शिंदे
कामातून वेळ काढून लिहलाय हो गवि, जरा समजून घ्या की. :(
1 Aug 2011 - 4:29 pm | गवि
अरे हो रे किसन मित्रा..
उत्तमच लिहीले आहेस. काही काही राहिले म्हणजे जे लिहीलेय ते उणे नव्हे.. माझ्या म्हणण्याचा अर्थ की बर्याच मजेदार गप्पागोष्टी घडल्या आणि त्या सगळ्या वृत्तांतात पकडणे शक्य नाही याची जाणीव आहे रे.
:) फोटो पण झकास.
1 Aug 2011 - 4:16 pm | बिपिन कार्यकर्ते
कट्ट्याला न येताही सहमत. याहून जोरदार झाला असणार कट्टा!
पाठीमागं लायनीत हुबं र्हावा मालक! ;)
1 Aug 2011 - 4:43 pm | माझीही शॅम्पेन
आमचा पहिला पब्लिक अपियारंस असल्याने थोडा भाव खावून घेतला इतकच आणि अहो किसन्शेथ तुम्ही आम्हाला ओळखल नाहीच , बहुधा क्लू दिल्या नंतर तुम्ही भ्रमण-ध्वनी वरून धाग्यावर आलेल्या प्रतिक्रियेवरून अंदाज बांधला :)
आणि हो मी पण मकना ओळखू शकलो नाही !
ओळख परेड चालू असताना विमे काकांनी स्वतःबद्दल आणखी काही माहिती सान्ग (म्हणजे बचेलर कि लग्न) अस सूडला सांगताना , प्राचीने म्हणजे विमे काकानंच कोणी तरी स्वतःला विचारायला हवाय अस म्हणून षटकार मारला :)
अगदी अगदी लगेच टीसीएस च्या आय-टी हमालांनी कंपू-बाजी सुरु केली ...पळा आता :)
ह्या यादीत कोथिंबीर वाड्या पण घाला ! आणि ताटात आलेली रबडी एकदम खल्लास होती
किसान चं लिहिले आहेस ! फोटो सगळे छान आले आहेत (छोट्या वड्यांचा फोटो विसरलो वाटत आपण काढायला)
1 Aug 2011 - 4:48 pm | गवि
ह्या यादीत कोथिंबीर वाड्या पण घाला !
आँ.. ?? कोथिंबिर वड्या?
..माझ्यापर्यंत कशा नाही आल्या त्या? की तुम्ही आधीच खाऊन बसला होतात सगळे..?
हे चुकीचे झाले... :(
1 Aug 2011 - 5:03 pm | किसन शिंदे
त्याला म्हणायचयं अळूच्या फदफद्यांसोबत कोथींबीर वड्याही असायला हव्या होत्या.
1 Aug 2011 - 11:44 pm | माझीही शॅम्पेन
होय ! बरोबर !!!
1 Aug 2011 - 11:44 pm | माझीही शॅम्पेन
होय ! बरोबर !!!
1 Aug 2011 - 4:11 pm | स्पा
चालतंय रे किश्न्या ...
डोंट वरी :)
1 Aug 2011 - 4:13 pm | पियुशा
व्व्वा झकास की :)
1 Aug 2011 - 4:21 pm | ५० फक्त
तुम्ही कट्ट्याला सुक्ष्मरुपाने हजर होता असे इंट्याने सुडच्या खवत लिहिलेले स्पावड्याने वाचले म्हणे, खरे की काय.. ?
1 Aug 2011 - 4:59 pm | पियुशा
हा प्रती कोना सन्दर्भात लिहिलाय तुम्ही ५० फक्त ?
1 Aug 2011 - 4:14 pm | ५० फक्त
मस्त रे लई भारी कट्टा झालेला आहे. बरेच नवे चेहरे दिसले या वेळी किंवा काही जुनेच चेहरे नव्याने दिसले.
@ सुड- पनीर बर्फी कोरईगडाला आणली असती तर, उपास नव्हता त्या दिवशी आमचा.
@ ईंटया - ट्रेक आणि कट्टॅ करुन लवकरच सुधरातोय.
@ स्पा - प्रत्येक फोटोत कोप-यात का रे तु, तुझा फोटो कुणी शादी.कॉम ला नाय चढवणार.
@ प्रास - येवढ्या वेळात पुण्याला आला असतास, तिथुन. असो. पुढचा कट्टा मुंबईत करु तेंव्हा भेटुच. (स्पावड्या ब्लु कोरलला चवकशी कर रे जरा,)
माझे दोन कट्टे मिस झालेत या पुढच्या कट्ट्याला नक्की, पावसाळ्यानंतर असेल तर माझ्या रेड मर्क्युरीला घेउन.
1 Aug 2011 - 4:19 pm | यकु
मस्त मजा केलीत राव.
आम्ही इकडे एकसमयावच्छेदेकरुन कट्टा जमवण्याची तयारी केली होती... पण प्रा. डाँ.च्या भेटीस जाता आले नाही.. मग गंडले सगळे आणि रेग्युलर ;-) कट्टा झाला.
आता पुढच्या वेळी चलो पुणे..!!!!
यासाठी प.रा., धमाल मुलगा, गगनविहारी, विजुभौ, स्पावड्या, सुधांशू या मंडळींनी पुढाकार घ्यावा..
प्रा. डॉ. व मी इकडून येऊ..
कसं म्हणता?
1 Aug 2011 - 4:21 pm | गणपा
सोज्वळ कट्टा छानच झाला म्हणायचा. :)
@ रामदास काका प्रिमियर झाला ना दणक्यात. मग आता झळकवा की चित्रपट 'आम' आदमीसाठी बोर्डावर. :)
1 Aug 2011 - 4:33 pm | प्यारे१
>>>सोज्वळ कट्टा छानच झाला म्हणायचा.
उगाच 'सोज्वळ लोकांचा कट्टा छानच झाला म्हणायचा' असे वाचले आणि उडालो. परत वाचून 'जिमिणी'वर आलो.
बाकी काही लोक अकाली वृद्ध का वाटायलेत ब्वा? (काका 'काका'च असल्याने ते सोडून ;) )
इतक्यात झालेलं अथवा होऊ घातलेलं लग्न तर कारणीभूत नाही ना? ;)
1 Aug 2011 - 4:37 pm | मुलूखावेगळी
छान!!!!
मस्त च फोतो न वर्णन
सगळ्यांनी मज्जा केली आहे हे दिसतेय.
पुढील कट्ट्याला शुभेच्छा :)
1 Aug 2011 - 4:59 pm | कुंदन
३० ला च दुपारी मुंबईहुन निघालो दुबै साठी त्यामुळे हजर नाही राहता आले.
पुढच्या वेळी जरुर प्रयत्न करीन.
1 Aug 2011 - 5:08 pm | बिपिन कार्यकर्ते
तू अजूनही जातोस ठाण्यात? ! ;)
1 Aug 2011 - 5:12 pm | मदनबाण
मस्त कट्टा झालेला दिसतोय... :)
कट्ट्याला येता आले नाही याचे लयं वाईट वाट्टतया... :(
1 Aug 2011 - 5:23 pm | वपाडाव
सुडक्या, तुला अजुन कुणी गळ नाही का रे घातली?
नाही म्हटलं इतका सुरेख (वर सांगितल्याप्रमाणे) सैपाक येतो ना तुला....
प्वरिवांची लैन लागली असंन घरासमोर....
येका (जर ईमाने इतबारे जगलास तर नाहीतर सगळ्यांचे आयौष्य बर्बाद) प्वरीचं नशीब खुलणार हय....
बाकी :: फुडच्या येळेला कट्ट्याला यणार... यणार म्हंजी यणार...
1 Aug 2011 - 6:05 pm | प्राची
>>प्वरिवांची लैन लागली असंन घरासमोर....
>>येका (जर ईमाने इतबारे जगलास तर नाहीतर सगळ्यांचे आयौष्य बर्बाद) प्वरीचं नशीब खुलणार हय....
होय तर..त्या प्वरीपण कुठल्या माहितीए? देवरुखच्या,रामदास काकांन्नी सांगितल्याप्रमाणे.. :P
1 Aug 2011 - 6:52 pm | वपाडाव
ओ बै...
काय काय घडलं हुतं जरा इस्कटुन सांगता का?
हितं शक्य नसंन तर व्यनि करा / खवमदी सांगा....
1 Aug 2011 - 10:19 pm | प्राची
रामदासकाकांनी सूडला सांगितलं की,देवरुखच्या मुली फारच सुंदर असतात असं म्हणतात.यावर सूड जरासा लाजला.
मग काही वेळाने सूडनेच कमेंट मारली की,गोर्या आणि घार्या डोळ्यांच्या मुली जरा जास्तच ताठ असतात.
सूड तर गुढग्याला बाशिंगच बांधून बसलाय.रेवतीताई लवकर मनावर घ्या.
1 Aug 2011 - 10:48 pm | रेवती
मी कधीच मनावर घेतलय प्राची!
किर्तनाला जाते आणि गोदाक्का, पार्वतीआजी, यशोदाक्का यांच्या नाती देवळात आज्ज्यांना गाडीतून आणून सोडताना बघते. स्पा, सुधांशुला कितीवेळा सांगितलं तर ही आजकालची मुलं तिकडं फिरकत नाहीत मुळी. देवावर विश्वास नाही म्हणे! अरे देवीवर बरा विशवास आहे तुमचा? आँ?
1 Aug 2011 - 10:57 pm | बिपिन कार्यकर्ते
काकू जपून हां!!! एवढी सगळी लग्नं एकदम निघाली तर तुम्हालाच उभं रहायचं आहे कंबर बांधून...
2 Aug 2011 - 12:15 am | ५० फक्त
'' यांच्या नाती देवळात आज्ज्यांना गाडीतून आणून सोडताना बघते. स्पा, सुधांशुला कितीवेळा सांगितलं तर ही आजकालची मुलं तिकडं फिरकत नाहीत मुळी''
रेवतीआजी, त्या नाती नंतर गाडीतुन कुठं जातात माहितेय का ? सुड सांग रे तुला कट्ट्याला यायला उशिर का झाला ते, कुणाची नात होती गोदाक्काची का यशोदाजींची? जिच्या गाडिनं वसईला दोन तास, घोडबंदर रोडला अर्धा तास ट्रॅफिक जाम केला, तु सुखी गाडीत अडकलास पण प्रास बिचारा येउ शकला नाहि त्यामुळं ते.
अरे किमान त्याला गाडित तरी घ्यायचं कि रे, बसला असता गप्प, काहि बोलला नसता कुठं, हो कि नाय रे प्रास , नसतास ना दिला त्रास गोदाक्कच्या नातीला, मग. ..
आणि रेवतीआजी, गाडीचं लायसन मिळतं १८ व्या वर्षी, या पोरांना आता कुठं सोळावं लागलंय, हो ना रे ईंट्या.?
2 Aug 2011 - 9:04 am | वपाडाव
रेवतीआज्जी....
अशा नाती इकडे (पक्षी : भारतात) कुठे बघायला/भेटायला मिळतील ??? (मिळतील का?) ;)
2 Aug 2011 - 9:54 am | सूड
गोदाआज्जींची ......गोदाआज्जींचीच नात ती !! तिच्याच गाडीनं ट्रॅफिक जॅम झाला. तो पार्वतीआज्जींचा केतन आणि ती रंगीत पाण्याच्या बाटल्याच मिरवत होती गाडीत. त्यांच्या मागच्याच गाडीत मी होतो, पण हा प्रकार बघून डोळे इतके दिपले की प्रास भाऊ दिसलेच नाही. बघ हो रेवतीआज्जी इतकं कौतुक करतेस त्या मुलींचं, कशा आहेत त्या सर्व गावाला ठावकी आहे. ;) ५० फक्त तुम्हीच बोललात म्हणून बरं हो, एरवी माझं बोलणं नसतं खरं वाटलं.
2 Aug 2011 - 9:58 am | स्पा
रेवती आजी
2 Aug 2011 - 12:19 pm | प्रास
हे अस्सं होतं होय? नि मी बापडा त्या बिचार्या पावसाला 'श्या' घालीत व्हतो.....
मी मागच्या सिटवर डोळे मिटून एकदम गप गुमान बसून र्हायलो असतोय..... शहाण्यासारखा....!! :-)
सुडा, मी दिसलो नाही म्हंजे ठार आंधळाच असावास लेका...! माझ्या डिस्प्ले चित्रातून तरी ओळखायचंस ;-)
1 Aug 2011 - 6:58 pm | मस्त कलंदर
बदलापूरच्या मुलींबद्दल रामदासकाकांनी काय सांगितलं ते ऐकलं नाहीस वाट्टं!!!
1 Aug 2011 - 8:15 pm | चतुरंग
नावातच 'बदला' आहे तर! ;)
-रंगा
खुद के साथ बातां - रंग्या, मार खायची लक्षणं आहेत हा!
1 Aug 2011 - 8:33 pm | बिपिन कार्यकर्ते
आणि बदलापूरच्या सुनांबद्दल?
1 Aug 2011 - 8:36 pm | रामदास
जावयांबद्दल म्हणायचं होतं का ?
(तुझे याद रखूंगा ठाकूर..... याद रखूंगा)
1 Aug 2011 - 10:59 pm | बिपिन कार्यकर्ते
नाही... सुनांबद्दलच... फारच विक्षिप्त असतात असं ऐकून आहे...! ;)
1 Aug 2011 - 11:48 pm | सूड
लिहीणारच होतो, पण म्हटलं उगा ३_१३ वाजायचे, म्हणून गप्प बसायचे ठरविले आहे. ;)
2 Aug 2011 - 3:57 am | रेवती
या प्रतिसादानंतर ते वाजणारच आहेत.
येऊ द्या म्याडमना!
1 Aug 2011 - 10:08 pm | मस्त कलंदर
सुना नाही हो, मुलींबद्दलच. रामदासकाका एकेकाळी काय काय उद्योग करायचे हे आम्हाला या कट्ट्यात कळलं ;-)
1 Aug 2011 - 10:46 pm | बिपिन कार्यकर्ते
छोटा गोडबोले?
1 Aug 2011 - 11:39 pm | रेवती
आम्हालाही ते उद्योग कळ्ळेच पाहिजेत अशी मागणी आहे.
रामदासकाका मला इथे मिपावर टोमणे मारून तिकडे सगळ्यांशी बरे वागतात असं दिसतय.
1 Aug 2011 - 5:58 pm | स्मिता.
कट्टा छान झालेला दिसतोय. यावेळी आणखी काही नवीन चेहरे दिसलेत.
असेच कट्टे होवू द्यात.
1 Aug 2011 - 6:03 pm | चतुरंग
पाऊस असूनही उपस्थिती चांगली होती.
बर्याच टोपणनावांना आणि नावांना चेहरे आहेत हे बघून आणि मिपापरिवार वाढता आहे हे बघून ड्वाले पाणावले! ;)
रामदासकाका, लिखाण तिकडे गुपचुप जाहीर करताय होय? आम्ही काय पाप केलंय हो, इकडे झटका की शाईचे चार थेंब!
-आद्यमिपाकट्टेकरी रंगा
1 Aug 2011 - 6:22 pm | प्राची
मकीमावशीच्या चेहर्यावरचे भावः ' निघताना घराला नक्की व्यवस्थित टाळा लावला ना ? '
1 Aug 2011 - 6:32 pm | माझीही शॅम्पेन
अरे कोलेज संपल म्हणून मकी मावशीची शाळा का :) ?
1 Aug 2011 - 6:51 pm | मस्त कलंदर
मी तेव्हा टीव्ही पाहात होते. घराला कुलूप लावलंय की नाही असा विचार करताना मुद्रा वेगळी असावी लागते. नाहीतरी १७ तारखेच्या आधी एकदा भेटणारच आहेस ना, तेव्हा सांगते नक्की कशी ते. क्काय?
1 Aug 2011 - 8:13 pm | चतुरंग
ते टीवी पहात होते वगैरे सांगायचं झालं, खरी बाब प्राची सांगून बसली आहे! ;)
असो असो! ;)
-रंगा
1 Aug 2011 - 6:54 pm | आत्मशून्य
किसन वाइच लांबडं लिवायला पायजेल हूतं... पन एकूनच मिपाकर जमलेले बघायला मंज्या आली... ओक सायब नवते काय ? त्यांचाच तर मूख्य हात होताना कट्टा भरवण्यात ?
1 Aug 2011 - 7:09 pm | प्रभो
मस्त रे!!!! कट्टा झकास झालेला दिसतोय.
1 Aug 2011 - 7:16 pm | रेवती
किसनमहाराजांचा विजय असो!
बिझी असूनही त्यांनी वृत्तांत चांगला लिहिला आहे.
सर्व फोटू आवडले.
पदार्थ दाखवण्याचा दुष्टपणा केला नसता तरी चाललं असतं.;)
सुधांशुने लग्नाळू असण्याची झायरात केल्यामुळे त्याला स्थळं बघण्याचं माझं काम हलकं झालं.
देशपांडेकाकू शेजारीच बसल्याने प्राची गरीब गाय झाल्यासारखी वाटते आहे.
देशपांडेकाकांना घरकाम येत असल्याने संगणक चालू असला तरी घर कसं स्वच्छ असतं यांचं!
इंट्या अभ्यास सोडून इथे टाईमपास करतोय म्हणून रागावल्या गेले आहे.
चला, आता इनो घेऊया!
1 Aug 2011 - 8:01 pm | अन्या दातार
सुधांशुने लग्नाळू असण्याची झायरात केल्यामुळे त्याला स्थळं बघण्याचं माझं काम हलकं झालं
हलकं झालं की वाढलं?? त्याचे लग्न झालेले नाही अजुन तरी
1 Aug 2011 - 8:42 pm | रेवती
मुलगा मोठा झाला.
आपली कामे(उदा. स्वयंपाक करणे, लग्नाळू असल्याची झायरात करणे इ.) आपणच करू लागला या अर्थी म्हटलय ते!
नुकत्याच सुरळीच्या वड्याही शिकलाय म्हणे!
2 Aug 2011 - 12:08 am | सूड
ही आमच्या रेवतीआज्जीची खासियतच हो !! सगळं शिकवलंन् , अगदी नारळीपाकाच्या लाडवापासून ते सुरळीच्या वड्यांपर्यंत पण कशाचं क्रेडीट असं काय ते घ्यायची नाही ती. ;)
1 Aug 2011 - 10:04 pm | मस्त कलंदर
ती गरीब गायच आहे, फक्त इथे दंगा घालतेय. पहिल्यांदा मलाही पटलं नव्हतं, ही तीच प्राची आहे असं!!
खुद के साथ बाता: बाकी, सगळ्या काका-काकवांनी आज मला काकू म्हणायचा चंग का बांधलाय?? त्यांना आम्ही काका-काकू म्हणतो याचा निषेध वाटतं!!
1 Aug 2011 - 10:42 pm | रेवती
माझ्या प्रतिसादांवरूनच कित्ती वाईट वाटलेय हे समजले असेल.
असा कट्टा, रामदासकाकांच्या गप्पा ;), जेवण सगळं मिस् केलं. छ्या!
पुन्हा इनो.
1 Aug 2011 - 7:20 pm | सहज
नवे, जुने मिपाकर भेटल्याचे पाहून ड्वोले ....
मकी काकी मात्र 'व्हॉच्यु टॉकिंन बाउट विलीसची' आठवण ताजी करत आहेत. मकी काकींच्या समोर बहुदा गविकाका / विमेकाका बसले असावे असावेत त्यामुळे बहुदा हे जेवण कधी ऑर्डर करणार आहेत, बटाटेवडा, मिसळपाव काय चालले आहे. असो आपण दोन घास ... असे काहीसे भाव असावेत.
1 Aug 2011 - 7:46 pm | नितिन थत्ते
कट्टा झकास झालेला दिसतो आहे. :)
पण व्यक्तींची नावे आणि फोटो यांची सांगड घालायला काही जमली नाही. :(
1 Aug 2011 - 7:58 pm | बिपिन कार्यकर्ते
काका, वरून आठव्या आणि नवव्या ... खालून चौथ्या आणि पाचव्या फोटोत आहेत की... क्लॉकवाइज बघा.
3 Aug 2011 - 4:10 am | इंटरनेटस्नेही
अतिशय ओघवतं आणि खुमासदार वर्णन, श्री. किसन देवा.. लेखन मनापासुन आवडले. फोटोग्राफ्स देखील उत्तम! :)
**
कट्टा अतिशय जोरदार झाला! आणि धम्माल मजा आली! सर्व मान्यवरांना भेटुन आनंद झाला.. जोरदार पाऊस असल्याने माझं आर-सिटी घाटकोपर येथे खरेदी आणि मग कट्टा असं जे नियोजन होतं ते बर्यापैकी गंडल.. आधी घरातुन निघताना पाऊस थोडासा कमी झाला होता मात्र घाटकोपर येथे पोहचे पर्यंत खुपच उशीर झाला.. शेवटी कसं बसं अत्यावश्यक तेवढं काम उरकुन, बस ने ठाण्याला निघालो, वाटेत पावसाचा वाढता वेग बसचा वेग आणखीन मंद करत होता.. शेवटी कसं बसं एकदाचं तीन हात नाक्याला पोहोचलो.. नौपाडा विभाग शोधण्यात आणखीन वेळ गेला.. त्यानंतर किसनदेव यांनी प्रत्यक्ष हॉटेल पर्यंत पोहोचण्यासाठी फोनवर मार्गदर्शन केले.. (अंगभुत आळसामुळे आम्ही पत्ता लिहुन घेतलाच नव्हता! ;) ) तो पर्यंत मंडळी स्वाद मधील वरची मिसळीची/बटाटेवड्यांची खादाडी संपवुन आमची आणि अन्य काही मंडळीची वाट पाहत होती तिथे पोहोचलो. तेवढ्यात सुडचे आगमन झाले आणि नंतर आमची 'धम्माल गँग' बेसमेंटकडे मुख्य कार्यक्रम - स्वादची अमर्यादित थाळी चापणे करता रवाना झाली.. मित्रमंडळी आणि कट्टे म्हटलं तसा माझा कल आहे प्रामुख्याने मांसाहारी खाद्यपदार्थ आणि तोंडी लावायला अल्पसं अपेय! मात्र 'स्वाद'च्या जेवणाची चव एवढी भन्नाट होती, की आता मी कदाचित कायमचा शाकाहरी होईन की काय अशी माझी मलाच भिती वाटु लागली! ;)एका बाजुला स्वादचं रुचकर भोजन आणि सोबत रामदास काका, मस्त कलंदर ताई, निदे, गगनविहारी आदी विद्वजनांचीशी चर्चा आणि इतर मान्यवर मिपा मित्रपरिवारा सोबत सोबत मनमोकळ्या गप्पा, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच! निघता निघता लीमा ताईचे त्यांच्या यजमानांसहित आगमन झाले, यामुळे अजुन काही काळ आम्हा सर्वांना गप्पा मारता आल्या.. शेवटी मात्र हॉटेल चालकांनी 'क्लोजिंग टाईम' अशी हाक दिल्यानंतर मात्र आम्हांला निघावे लागले.. आम्ही 'माझीही शॅम्पेन' सोबत ठाणे स्थानक येथे रवाना झालो आणि तिथुन बोरिवली करता बीईएसटी बस पकडली.. पावसाचा जोर आता ठाण्यात तरी कमी झाला होता, मात्र जस जशी बस मुंबईच्या दिशेने रवाना होऊ लागली तस तसा पाऊस पुन्हा वाढला! आता मात्र आम्हाला चिंता लागली की आम्ही आज'च' घरी पोहोचोतोय की नाही? ;) कारण रात्रीचे १२ केव्हाच वाजुन गेले होते.. बसचा वेग अजुन ट्रॅफिक मध्येच विरुन चालला होता.. आणि जेव्हा आम्ही आमचे गंतव्यस्थानक 'बोरीवली पश्चिम' येथे पोहोचलो तेव्हा रात्रीचे १२.३० वाजले होते..देवकृपेने १२.३९ ची शेवटची चर्चगेट लोकल मिळाली तेव्हा मात्र आम्ही भरून पावलो!
**
अश्या दिलखुलास आणि ध्म्माल कटट्यांना आमची रोज येण्याची तयारी आहे! एक अतिशय मेमोरेबल कट्टा!
2 Aug 2011 - 12:43 am | सूड
शिंदे सरकार, धागा उत्तम फोटु झकास !!
घरनं निघणार तेवढ्यात एक मित्र दारात उभा, त्याच्या आईनं म्हणजे देशपांडे काकूंनी (हे फक्त नामसाधर्म्य आहे, आक्षेप नसावा ;) ) नानकटाई पाठवली होती. ह्या भल्या माणसाने घरात आल्याआल्या नानकटाईची पिशवी माझ्या हातात ठेवलंन्. चहाचं आधण टाकलेलंच होतं म्हटलं आता जरा आरामातच निघावं, गाड्यांचं टाईमटेबल कोण बघतंय एकदा असं काही खाणं पुढ्यात असल्यावर !! जी गाडी सुटली तिच्यानंतर सरळ पाऊण तासानं गाडी होती. गाडीला हीऽऽ गर्दी !! बर्फीचा ( खाद्यपदार्थाचं नाव ) डबा आणि त्यातली बर्फी नीट पोहोचली हेच फार.
2 Aug 2011 - 1:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>शिंदे सरकार, धागा उत्तम फोटु झकास !!
असेच म्हणतो. पुढील सर्व कट्ट्यांचे फोटो काढण्याचे कंत्राट तुला देण्यात यावे असा ठराव मांडत आहे.
2 Aug 2011 - 1:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>शिंदे सरकार, धागा उत्तम फोटु झकास !!
असेच म्हणतो. पुढील सर्व कट्ट्यांचे फोटो काढण्याचे कंत्राट तुला देण्यात यावे असा ठराव मांडत आहे.
2 Aug 2011 - 1:39 pm | किसन शिंदे
>>असेच म्हणतो. पुढील सर्व कट्ट्यांचे फोटो काढण्याचे कंत्राट तुला देण्यात यावे असा ठराव मांडत आहे.
काय बोलताय? पण टेंडर कधी निघाले ते कळ्ळंच नाही.
2 Aug 2011 - 9:08 am | प्रचेतस
झकास फोटू आणि वर्णन रे किसन. आता पुढच्या कट्ट्याला नक्कीच हजेरी लावली पाहिजे.
2 Aug 2011 - 12:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे
शुशा आणि सुका कट्टा असला तरी उपस्थितीवर त्याचा काहीही फरक पडणार नाही हे माहित होते. मात्र सकाळपासून पावसाचा एकूण रागरंग पाहून किती जणांना जमेल असा प्रश्न पडला. त्यातून सध्या मध्यरेल्वे ची परिस्थिती जरा जास्तच नाजूक आहे. थोडा पाऊस पडला तरी सर्दी पडसे होते तिला. सुदैवाने तसे काही झाले नाही आणि लांबवरून येणारे बरेच जण येऊ शकले. यालाच मुंबईकरांचे स्पिरीट म्हणतात बहुतेक. काही जणांना स्पिरीट म्हटले की दुसरेच काही आठवते म्हणे. ;-)
असो, तर स्टेशन वर कुणालाही विचारा प्रकारचा पत्ता, त्यातून मी नेमका तो लिहून घेतला नव्हता, त्यामुळे ३-४ जणांना विचारणे, सूड आणि गविंना फोन करणे (दोघेही मागून येत होते) या प्रकारातून गेल्यावर मी इच्छित स्थळी पोहोचलो. तिथे ४-५ जण कोंडाळे करून उभे होते. रामदासकाका, स्पा, किसन आणि अजून दोन नवे चेहरे. त्यातील मुलगी म्हणजे प्राची असणार हे झटकन लक्षात आले. मी स्पा च्या समोर जाऊन उभा राहिल्यावर, "हे बघा विमे आले" असे तो म्हणाला. त्या नंतर विसेक सेंकंद माझ्या बाजूला उभी असलेली प्राची वळून रिकाम्या रस्त्याकडे पाहत यात नक्की मेहेंदळे काका कुठे असतील याचा अंदाज घेत होती. दुसरी व्यक्ती म्हणजे शाम्पेन भाऊ निघाला. (आणि च्यायला "भाऊ"च निघाला. मिपावर ३३% आरक्षण आणा रे.)
मग निदे, मकीमावशी आणि गवि आले. प्रथमच भेटणाऱ्या मिपाकरांच्या वलखी-पालखी झाल्या. त्यातून प्राची ही मकीमावशीची विद्यार्थिनी आहे हे कळले. जेवताना त्या बाजूबाजूला बसल्या होत्या. अशा ठिकाणी शिक्षकांबरोबर बसायचे म्हणजे वेगळाच अनुभव. मला का कोण जाणे सर्कशीतील वाघ आणि शेळीचे एकत्र जेवण या प्रकारची आठवण येत होती.
जेवण सुरु केल्यावर प्रत्येकाने ओळख सांगण्याचा उपक्रम (दचकू नका, पल्याडले नाही) राबवला गेला. वेगवेगळ्या सदस्यनामांमागच्या गोष्टी ऐकताना मजा आली. जेवण सुरु करताना सुरु झालेला हा उपक्रम जेवण संपेपर्यंत चालला. दर १-२ ओळखीनंतर काहीतरी अवांतर निघायचे. अवांतर म्हणण्यापेक्षा पंचतंत्र किंवा अरेबियन नाईट्स मध्ये एका गोष्टीतून दुसरी निघते तशा गोष्टी निघत गेल्या. जेवण संपता संपता ली माऊ मावशी आल्या. या वेळेला त्या एकट्या न येता बोका काकांना पण घेऊन आल्या होत्या. (मरतोय आता बहुतेक)
बाकी स्वाद ची मिसळ आणि थाळी झकास. चवीला उत्तम (आणि खिशाला पण). सूड ने आणलेली बर्फी पण झकास. मात्र ३ वाट्या बासुंदी खाल्ल्यामुळे सूड ची बर्फी एकच खाऊ शकलो याचे खंत आहे. सूड परत बर्फी करून आणेल अशी आशा असल्याने चिंता नाही. सदर बर्फीला दरड-बर्फी नाव ठेवण्याचे रेकमेंडेशन देत आहे (प्रेरणा मकीमावशी ची कमेंट)
ज्यांना इच्छा असूनही या कट्ट्याला येता आले नाही, त्यांना भेटायचा योग लवकरच यावा ही इच्छा. स्पा/सूड, ऐकताय ना? पुढच्या कट्ट्याचे मनावर घ्या. मात्र थोडे आधी व्यनी करून कळवा. मी वेस्टर्न इंडिया भागाची ईनो ची एजेन्सी घेऊन ठेवीन म्हणतो. काही काही टेरीटरीत तुफान खप होईल असा अंदाज आहे.
विश्वनाथ ईनोंदळे
2 Aug 2011 - 3:37 pm | वपाडाव
पैल्या गिर्हाईकाचं नाव ल्हिउन घ्या....
2 Aug 2011 - 4:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे
पहिल्या आणि सर्वात मोठ्या गिऱ्हाईकाचे नाव माहित आहे मला ;-)
2 Aug 2011 - 3:53 pm | विजुभाऊ
आणि च्यायला "भाऊ"च निघाला. मिपावर ३३% आरक्षण आणा रे.
पाय ची किंमत ३.१४ ची ओळख झाल्यावर हे विधान मागे घ्याल ही ग्यारन्टी
2 Aug 2011 - 4:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आरक्षणातून लायसेनधारी व्यक्तींना वगळण्यात यावे अशी उपसूचना मांडतो.
2 Aug 2011 - 4:41 pm | इंटरनेटस्नेही
=))
विमे!
=))
2 Aug 2011 - 4:30 pm | स्पा
आरक्षणातून लायसेनधारी व्यक्तींना वगळण्यात यावे अशी उपसूचना मांडतो
=))
=))
=))
असेच नमूद करू इच्छितो
4 Aug 2011 - 1:36 pm | गणेशा
छान झालाय कट्टा आणि वृत्तांत