ईशान्य भारतात जाणे हा दर वर्षी माझ्यासाठी एक नविन अनुभव असतो. या वेळी मला श्री अविनाशजी बिनीवाले यांचे सोबत एकाच ठीकाणी राहण्याचा योग आला. त्यांचे सोबत घालविलेले क्षण व गप्पा हा एक वेगळा अनुभव होता. या भेटीत मला अरुणाचल मधील पासीघाट व झीरो व्हैली येथे जाण्याचा योग आला. ही दोन्ही ठीकाणे निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत आल्हाददायक आहेत. त्याच प्रमाणे दिब्रुगड व तिनसुखिया येथेही माझा प्रवास झाला. पासीघाट येथील फोटो खाली देत आहे.
पासिघाट येथील सियांग नदिचे पात्र व त्यावरील विशाल पुल.
पर्वत रांगांच्या पार्श्वभुमीवरील सियांग व त्यावरील पुल.
मावळत्या सुर्याच्या किरणांनी आकाशात काढलेल्या रंगछटा.
झिरो वैली हे अरुणाचल मधील एक थंड हवेचे ठीकाण येथील सर्वात उंच ठिकाण हे ५७०० फुट असुन ही वैली सभोवताली पर्वत रांगांनी वेढलेलि असल्याने यास आकाशात झीरो चा आकार असल्याने याचे हे नाव पडले असावे. सभोवताल पसरलेली धानाची हिरवे गार शेते व सभोवताली पर्वत रांगा देहभान विसरवतात.
येथे एक विशाल शिवलीग २००४ मध्ये आढळले व तेथे जाण्याचा मार्ग देखील अवघड पण तितकाच लक्षवेधक
अधिक फोटो व माहिती पुन्हा कधी तरी.
प्रतिक्रिया
18 Jul 2011 - 12:08 pm | सहज
छान आहेत फोटो!
18 Jul 2011 - 12:09 pm | विलासराव
फक्त साईज बदला.
६४० बाय ४८० टाकुन बघा हवं तर.
आनी पुढ्च्या वेळेस शक्य असेल व तुमची हरकत नसेल तर कळवा.
मीही येतो.
18 Jul 2011 - 1:32 pm | विश्वास कल्याणकर
माझा प्रवास फोटो मध्ये दिसतो तितका मोहक नसतो तेंव्हा विचार करा.
18 Jul 2011 - 10:10 pm | विलासराव
मला.फक्त थोडेसे अगोदर कळवा.
18 Jul 2011 - 1:47 pm | सुमो
अधिक फोटो व माहिती पुन्हा कधी तरी.
हे लवकर येऊ द्या. फोटो व त्याखाली तेथील माहिती वाचायला/बघायला आवडेल.
विलासराव यांनी म्हटल्याप्रमाणे, ६४० X ४८० फोटो असा दिसेल.
18 Jul 2011 - 1:58 pm | सविता००१
मस्त आहेत फोटो
18 Jul 2011 - 5:47 pm | स्वाती दिनेश
फोटो छानच!
स्वाती
19 Jul 2011 - 1:35 am | पुष्करिणी
सुंदर आहेत फोटो, जरा सविस्तर वर्णन लिहा ना प्रवासाचं प्लीज.