१९५८ मध्ये भारत सरकारद्वारे वनवासी व गिरीजनांच्या विकासाच्या उद्देशाने ढेबरभाईंच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. या समितीचा उद्देश वनात व डोंगराळ प्रदेशात राहणार्या या जनजातींच्या उत्थानाच्या दृष्टीने आवश्यक त्या नितींचे निर्धारण करणे असा होता. त्यादृष्टीने मग जनजातींशी प्रत्त्यक्ष संपर्क साधुन परिस्थीतीचा आढावा घेण्याच्या उद्देशाने ढेबरभाई आपल्या सदस्यांसोबत जशपुर येथे आले. येथे कल्याण आश्रामाचे कार्य सुरु होते त्याची त्यांनी पहाणी केली. बाळासाहेब देशपांडे हे कल्याण आश्रमाचे कामाचे प्रमुख होते. त्यांच्याशी ढेबरभाईंनी कामासंबंधी विस्तृत चर्चा केली. त्यानंतर भोपाळहुन बाळासाहेबांना तार व एक पत्र मिळाले. पत्रात कल्याण आश्रम शाळेला शासकिय अनुदान प्रदान केल्याबद्दल सुचना होती. हे अनुदान मिळण्यासंबधी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्याचे हेतुने बाळासाहेब मग भोपाळ येथे संबधीत कार्यालयात गेले. तेथे संबधीत अधिकार्यांना भेटल्यावर त्यांना कळले की शिक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतल्यामुळे त्यांना देण्यात येणारे अनुदान रद्द केल्या गेले आहे.
बाळासाहेब हे लढाउ वृत्तीचे होते त्यामुळे सहजासहजी हार मानणारे नव्हते. ते शिक्षण मंत्र्यांना भेटले व त्यांना अनुदान रद्द करण्याच्या कारणाबाबत विचारपुस केली. मंत्र्यांनी उडवा उडवीची उत्तरे देउन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब व्यवसायाने वकील होते व पुर्वी सरकारी अधिकारी पण राहुन चुकले होते. त्यांनी अनुदान रद्द करण्याचे कारण जाणुन घेण्याचा आग्रह धरला. तेंव्हा मंत्री बोलुन गेले " तुम्ही जनसंघी आहात" एका आठवड्यापुर्वी काही राजकीय कारणा वरुन जनसंघानि त्यांचा पुतळा जाळला होता. त्याचा राग मंत्री महोदयांना होता. बाळासाहेबांना या प्रकाराबद्दल काहीच माहिती नव्हती.
मल्याळी मध्ये एक म्हण आहे " बाजारात मार खाल्ल्याचा राग घरी आईवर काढणे" किंवा मराठीत " "वड्याचे तेल वांग्यावर". तसा प्रकार येथे घडला होता. बाळासाहेबांना हा प्रकार सहन झाला नाही. त्यांनी लगेच प्रत्युत्तर दिले. "काळ्य़ा टोपी च्या बदल्यात पांढरी टोपी घालुन आलेला मी भिकारी नाही" आणी असे म्हणुन ते बाहेर निघुन आले शिक्षण मंत्री त्यांचा तो आवेश बघतच राहीले. हे मंत्री होते पंडित शंकरदयाल शर्मा जे नंतर भारताचे महामहिम राष्ट्रपती झाले.
पण बाळासाहेब रिकाम्या हाताने जशपुर ला परतले नाहीत. भोपाळहुन परततांना ते नागपुरला उतरले व संघ कार्यालयात गुरुजींना भेटले. अनुदाना बद्दल ची माहिती त्यांनी गुरुजींना दिली. त्यावर गुरुजी दोन्ही हात उंच करुन हसले व म्हणाले " उत्तम, अती उत्तम बरेच झाले.
आपण आपले काम आत्मनिर्भर होवुन केले पाहिजे. मग ते कार्यकर्त्यांबाबत असो अथवा साधनांबाबत आपण आपल्या पायावर उभे राहवयास शिकले पाहिजे. जे काम शासनाच्या मदतीने किंवा अनुदानाने चालते ते मग शासनावर अवलंबुन राहते.आणी मग शासनाकडुन मदत बंद झाली की मग ते कार्यच बंद पडते.
बाळासाहेबांसाठी गुरुजींचे हे शब्द म्हणजे सांत्वना नव्हती तर एक मोलाचे मार्गदर्शन होते. आणि हेडगेवार भवनातुन मिळालेले हे अमोल अनुदान होते. जे अक्षय होते. इतरांना वाटल्यावर ही परिपुर्ण राहणारे अनुदान.
या घटनेनंतर २० वर्षानंतरचा किस्सा. १० ऑक्टोबर १९७७ चा. तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई कल्याण आश्रमात राहीले. ४ महिन्यानंतर १९७८ च्या फेब्रुवारी मध्ये बाळासाहेब प्रधानमंत्री कार्यालयात मोरारजी भाईंना भेटले. प्रधान मंत्री बोलले " मै आपकी क्या सहायता कर सकता हुं, शासकीय अनुदान के बारे मे कल्याण आश्रम की नीति क्या है?" यावर बाळासाहेब उत्तरले "किसी प्रकार का शासकीय अनुदान न लेनेकी नीति है कल्याण आश्रम की. आप कल्याण आश्रम को भेट देने आये थे, तब आप की व्यस्तता के कारण अपनी कृतज्ञता व्यक्त नही कर पाया, इसलिए जब आश्रम के काम के लिए यहा दिल्ली मे आया, सोचा की आपका व्यक्तीश: दर्शन कर आभार प्रकट करुं".
मोरारजी भाई प्रसन्नतेने म्हणाले "आपकी यह निती बहुत प्रशंसनीय है:. तिथेच बसलेले आदिम जाती सेवक संघाचे श्री श्रीकान्त भाई ना ते म्हणाले " देखो, श्रीकान्त, कल्याण आश्रम की सफलता का रहस्य तुम पुछ रहे थे, उसका रहस्य है, वह पूर्णत: आत्मनिर्भर है:."
"आत्मनिर्भर" हेच शब्द बाळासाहेबांनी २० वर्षापुर्वी गुरुजींच्या मुखातुन ऐकले होते, आज देशाचे प्रधान मंत्री त्याचाच पुनरउच्चार करीत होते.
प्रतिक्रिया
15 Mar 2012 - 12:10 pm | यकु
व्वा: !
धन्य ती माणसं.
इस लिखावट की ज़ेर-ओ-ज़बर को सलाम.
और भी आने दिजीए.
बाकी हा किस्सा इथे लिहिलात, आता तुम्ही इथल्या आत्मनिर्भरतेच्या तयारीला लागा असे सुचवतो .. जनसंघी, काँग्रेसवाले, शिवसेनावाले, मनसेवाले इथेही सगळेच आहेत.
15 Mar 2012 - 12:21 pm | निश
विश्वास साहेब, अप्रतिम लेख .
खर तर हल्लिच्या युगात जि काहि सरकारचि मदत घेण्या करिता ज्या संस्थांचि रिघ लागलि आहे त्यांचे डोळे उघडणारा हा तुमचा लेख आहे.
बाळासाहेबांना व त्याना सल्ला देणार्या गुरुजिना माझा नमस्कार.
सुंदर उदबोधक लेख.
15 Mar 2012 - 12:26 pm | कवितानागेश
ग्रेट. :)
15 Mar 2012 - 12:44 pm | पिलीयन रायडर
भारीच ना... आवडलं.. तुमचं लिखाण आणि प्रसंग सुद्धा..!!
15 Mar 2012 - 12:57 pm | सुकामेवा
असेच प्रसंग व अनुभव असतिल तर नक्की लिहा.
15 Mar 2012 - 1:39 pm | RUPALI POYEKAR
अप्रतिम लेख
15 Mar 2012 - 2:16 pm | राजो
हे एखाद्या हिंदी लेखाचे भाषांतर आहे का???
15 Mar 2012 - 2:27 pm | प्यारे१
>>>सरकारी अधिकारी पण राहुन चुकले होते
यात काय चुकीचं आहे? ;) सरकारी अधिकारी झाल्यामुळे आपण काही चुकीचे केले असे वाटले असेल ना त्यांना :)
भावना को अपनालो घंटाल. ;)
बाकी रा. स्व. संघाच्या मुशीतून बरेच बरेच चांगले लोक निर्माण झालेले आहेत, होत आहेत हे संघाचं मोठंच काम आहे.
15 Mar 2012 - 3:02 pm | राजो
:) बर.. बर...
16 Mar 2012 - 10:34 am | विश्वास कल्याणकर
तुम्ही कसे ओळकले? आमच्या संस्थेच्या हिंदी पाक्षिकातील लेखाचे भाषांतर आहे.
16 Mar 2012 - 11:20 am | राजो
"रेह चुके थे" चे "राहून चुकले होते" असे शब्दशः भाषांतर केले आहे ना..
15 Mar 2012 - 3:49 pm | अजितजी
खूप च छान!---अजित गद्रे
15 Mar 2012 - 4:16 pm | मी-सौरभ
:)
15 Mar 2012 - 5:31 pm | स्वातीविशु
खुप छान :)
16 Mar 2012 - 6:56 pm | अमितसांगली
खूप चांगला लेख....खूप चांगली माहिती.....