मणीपुर

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in भटकंती
13 Mar 2012 - 9:24 am

२० फेब्रुवारी तो २५ फेब्रुवारी २०१२ मी मणीपुर मध्ये होतो. इंफाल मध्येचे माझा मुक्कम होता. मोइरैंग येथील सुभाष बाबुंचे वार मेमोरीयल व लोकताक लेक हे विष्णुपुर जिल्यातील ठीकाणे जगप्रसिध्द आहेत.
सुभाष चंद्र बोस यांचे स्मारक मोइरैंग

लोकताक लेक हे जगातील प्रसिध्द तळे व तरंगणारे जंगल.

तळ्यात दिसणारे बेटासारखा जो भुभाग दिसतो तो तरंगत्त असतो. पुराच्या वेळी स्थानीक लोक आपली जनावरे या भुभागावर बांधुन ठेवतात्त. ही बेटे तरंगत असल्यामुळे जनावरे सुरक्षित राहत्तात. पुर ओसरल्यावर मग आपाआपली जनावरे घेउन जातात.

मणीपुर मधील मैती समाज हा वैष्णवी असुन कृष्ण भक्त आहे इंफाल येथे इस्कान मंदिर आहे व अतिशय सुंदर आहे.

लोकताक येथे एल्डी जातीचे हरीणे असुन त्यांची संख्या येथे ३०० च्या आसपास आहे त्यांना डांसींग डीअर असेही म्हणतात. ही प्रजाती आता संपणाच्या मार्गावर आहे. याबाबत माहीती येथे आहे

नागा कुकी जमात्तीतील वैमनस्यामुळे मणिपूर मध्ये कधी कोणता प्रसंग उदभवेल सांगता येत नाही. तब्बल १२० दिवस केलेली मणीपूरची आर्थिक कोंडी उटवल्यानंतर मी गेलो होतो त्यावेळी त्याकाळातील परिस्थीती तेथील लोकांनी सांगीतली त्या ऐकुन मी थक्क झालो. २५० रुपये लिटर पेट्रोल मिळत होते. आजही ल हान दुकानात पेट्रोल विकल्या जाते.

मणीपुर ला दक्षिण - पुर्व आशियाचे प्रवेशद्व्वार अस सार्थ पणे म्हटल्या जाते. सिल्चर-इम्फाळ-मोरे या मार्गे सहा पदरी ट्रान्स ओशियन ह्हायवे या महामार्गाने भारत दक्षिण पुर्व आशियातील म्यानमार, थायलंड, लाओस, इंडोनेशिया सिंगापुरशी जोडला जाणार आहे. त्यामुळे या महामार्गावरील महत्वाचे व्यापारी केंन्द्र म्हणुन मणिपूरचे महत्व अनन्य साधारणपणे वाढणार आहे. शिवाय मणिपूरला रेल्वे मार्गाने जोडणारा जिरीबान -तुपूल-इम्फाळ हा महत्वाकांक्षी रेल्वे मार्ग मार्च २०१६ पर्यंत पुर्ण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आहे. अशा स्थितीत या रेल्वे मार्गा च्या सुरु असलेल्या बांधकामावर युनाइटेड नागा कौन्सील ने बंदी पुकारली आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या यशस्वीतेवर प्रश्न चिन्ह निर्माण ज्झाले आहे.

प्रतिक्रिया

छान.
तरंगणार्‍या बेटांचे फोटो मस्त.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2012 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनही माहितीपूर्ण आहे. अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

मी-सौरभ's picture

13 Mar 2012 - 10:57 am | मी-सौरभ

थोडा छोटा लेख आहे. अजून माहिती वाचण्यास उत्सुक आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2012 - 11:42 am | अत्रुप्त आत्मा

+१

वा.. बेट तरंगतं म्हणजे विलक्षण रचना असणार याची.. निसर्गाचा चमत्कार.

मणिपूरचं वर्णन एरवी कधी बघाय / वाचायला मिळत नाही. ते उपलब्ध केल्याबद्दल तुमचे आभार. आणखी वाचण्यास उत्सुक.

सेम टु सेम असेच बोल्तो.

सर्वसाक्षी's picture

13 Mar 2012 - 4:00 pm | सर्वसाक्षी

१४ एप्रिल १९४४ रोजी आझाद हिंद सेनेने मोईरांग येथे तिरंगा फडकावला होता त्याची आठवण झाली!

वर्णन आणि चित्रे, दिन्ही झकास

पैसा's picture

13 Mar 2012 - 10:17 pm | पैसा

फोटो आणि वर्णन आवडले. ईशान्य भारताची छान ओळख करून देता आहात. धन्यवाद!

५० फक्त's picture

14 Mar 2012 - 4:50 pm | ५० फक्त

मस्त ओळख, या निमित्ताने मिपाकरांना ईशान्य भारताची ओळख होते आहे, तिकडं जायचा मोह होतो आहे. धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

16 Mar 2012 - 12:25 pm | तुषार काळभोर

खरंच निसर्गाचा चमत्कार आहेत. नदीतलं गवत, माती आणि थोडेफार जैविक अवशेष यांनी ती तरंगती बेटं बनली आहेत, असं इथे सांगितलंय.