धनवंतरी सेवा यात्रा- एक आरोग्य प्रकल्प
ईशान्य भारतात सेवा भारति पुर्वांचल द्वारे आरोग्य मित्र व आरोग्यम हे कायम स्वरुपी राबवले जाणारे प्रकल्प आहेत तसेच धन्वंतरी सेवा यात्रा प्रकल्प दरवर्षी एप्रिल मध्ये राबविला जातो इशान्य भारतातील दुर्गम प्रदेशातिल जनजातीमध्ये वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये कायम विचार मंथन सुरु असते व अनेक पर्यायांबाबत साधक बाधक चर्चा होत असते. अशाच विचार मंथनामधुन धनवंतरी सेवा यात्रेची कल्पना पुढे आली व ती ३/५/२००५ पासुन मुर्त स्वरुपात अमलात येवु लागली.
नॅशनल मेडिकोज आरगनायझेशन, सेवा इंटरनॅशनल व सेवा भारति पुर्वांचल यांनी एकत्रित पणे धनवंतरी सेवा यात्रा प्रकल्पाला मुर्त स्वरुप देण्यात मोलाचा वाटा उचलला. या प्रकल्पाद्वारे स्वयंसेवी डॉक्टर व निमवैद्यकिय कार्यकर्त्यांनी नियमीतपणे ठराविक वेळी मोफत वैद्यकिय सेवा शिबीराचे कार्यक्रम सुदुर व दुर्गम अशा प्रदेशात राबविण्याचे ठरविण्यात आले.
धन्वंतरी सेवा यात्रा क्र.१
वरील योजनेनुसार बनारस विद्यापिठातील नउ डॉक्टरांचा प्रथम गट गोहाटीला आला तो दि. ०३/०५/२००५ रोजी. मग या डॉक्टरांची विभागणी ५ चमुत करण्यात आली व त्यांना इशान्य भारताच्या वेगवेगळ्या भागात पाठविण्यात आले.. या गटाने १२३ गावात २३ शिबीरे घेतली व ४००९ ऋंग्णांवर उपचार केले त्यात १७०१ पुरुष व २३०८ स्त्रियांचा समावेश होता.
धन्वंतरी सेवा यात्रा क्र. २
०३/०५/२००६ रोजी बनारस हिंदु विद्यापिठ, आग्रा वैद्यकिय महाविद्यालय व गुरु तेग बहादुर वैद्यकिय महाविद्यालय, नवी दिल्ली व स्वामी विवेकानंद मिशन हॉस्पीटल वायनाड, केरळ येथील एक रिसर्च स्कॉलर मिळुन २३ तरुण डॉकटरांची चमु धनवंतरी सेवा यात्रेत सामील होण्याच्या उद्देशाने गोहाटीत दाखल झाली. योजनेनुसार ४/५/२००६ रोजी त्यांचे १० गट करण्यात आले व त्यांना इशान्य भारतातील दुर्गम गावात पाठविण्यात आले. या चमुने २७६ गावात ५१ शिबीराचे आयोजन करुन ८४३३ ऋंग्णांवर उपचार केले ज्यात ३७५० पुरुष व ४६८३ महिलांचा समावेश होता.
धन्वंतरी यात्रा क्र.३
२०/६/२००६ रोजी ४ डॉक्टरांची एक चमु दिल्लीहुन नागालैंड व मणीपुर राज्यातील जनजातीं ना मोफत वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने गोहाटी येथे दाखल झाली. या चमुने ५२ गावात १४ शिबीरे आयोजीत केली व एकुण १७७४ ऋंग्णावर उपचार केले ज्यात ७४१ पुरुष व १०३३ महिलांचा समावेश होता.
धनवंतरी सेवा यात्रा क्र.४
या यात्रेत देशभरातील ६७ डॉक्टरांचा समावेश होता ज्यात २३- डॉ.बनारस हिंदु विश्वविद्यालयाचे, ५- भावनगर वैद्यकिय महाविद्यालय,गुजरात मधुन , ५-सुरत च्या सरकारी वैद्यकिय महाविद्यालयाचे, २-आग्रा येथुन, १-रोहतक हुन, ११-गोहाटी वैद्यकीय महाविद्यालयाचे, १६-आसाम वैद्यकिय महाविद्यालय डिब्रुगढ, २- सेवा भारती पुर्वांचलाचे व १- नागालैंड मधुन होते. पाहुणे डॉ.चे आगमन ३/७/२००७ रोजी गोहाटीत झाले व त्यांच्या निवासाची व्यवस्था सेवा भारति, पुर्वांचलाच्या फलटन बाझार गोहाटी कार्यालयात करण्यात आली. सर्व डॉक्टरांना १६ गटात विभागुन त्यांना वेगवेगळ्या भागात पाठविण्यात आले. हे कार्य खुपच कठिण होते याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना या भागाची खुपच कमी किंवा अजिबात माहिती नव्हती. त्यांच्या या भागाबद्दलच्या कल्पना अत्यल्प किंवा चुकिच्या आधारावर असल्याने चमत्कारीक होत्या. मात्र सेवा भारतिच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने ही यात्रा देखील कमालीची यशस्वी पार पडली या यात्रेत ७३ शिबीरे आयोजीत केली गेली ज्यात २२७ गावे अंतर्भुत होती. यात एकुण १२५०९ ऋंग्णांवर उपचार केल्या गेले ज्यात ५२५६ पुरुष व ७२५३ महिलांचा समावेश होता.
या सर्वात मोठ्या सेवा यात्रेचा समारोप समारंभ देखील तितकाच भव्य होता. याचे आयोजन गोहाटीच्या उझान बझार येथील विवेकानंद केन्द्रात केल्या गेले ज्यात गोहाटी मेडिकल कॉलेजचे निदेशक व तेथील क्षेत्रिय नेत्र चिकीत्सा संस्थेचे प्रमुख डॉ चिरंजीव बरुआ हे अध्यक्ष म्हणुन आमंत्रित होते. तसेच याच कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक व शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ रत्नेष्वर स्वर्गिआरी हे विशेष अतिथी म्हणुन उपस्थीत होते.
अशा प्रकारच्या या यात्रा आजतागायत दरवर्षी सुरु असुन संपुर्ण देशातुन यास भरगोस प्रतिसाद मिळत आहे. या यात्रांचा उद्देश केवळ या सुदुर भागात मोफत वैद्यकीय उपलब्ध करुन देणे हाच नसुन तर उमलत्या तरुण डॉक्टरांच्या पिढीत सामाजिक जवाबदारीचे भान निर्माण करत असतांनाच त्यांच्यात समाजातिल दुर्बल व दुर्लक्षीत घटकांबद्दल त्यांची बांधीलकी निर्माण करणे हे देखील आहे.
ही नवीन पिढी या दोन्ही अपेक्षेमध्ये पुर्ण उतरली असुन आपल्या बद्दल समाजाच्या असलेल्या अपेक्षेची त्यांना पुर्ण जाणीव आहे हे या धन्वंतरी सेवा यात्रेला संपुर्ण देशातुन मिळणार्या प्रतिसादावरुन सिध्द झाले आहे.
प्रतिक्रिया
14 Mar 2012 - 2:49 pm | मुक्त विहारि
अजुन असे लोक आहेत तर...
14 Mar 2012 - 7:35 pm | पैसा
तरूण डॉक्टर्स यात सहभागी होताना पाहून बरं वाटलं.
14 Mar 2012 - 10:20 pm | अर्धवटराव
प्रकल्पांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
अर्धवटराव
15 Mar 2012 - 3:43 pm | RUPALI POYEKAR
खरच माहितीबद्दल धन्यवाद